|
Asami
| |
| Sunday, June 24, 2007 - 4:11 pm: |
| 
|
मी गंगा प्रदूषणाबद्दल बोलात नाहिये. GHE बद्दल बोलतोय हि साधी गोष्ट तू का लक्षात घेत नाहियेस ? GHE आणी गंगा प्रदुषण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकात काम केले म्हणजे दुसरे झाले असे नाही. आत्ता उगाच इथे जे काम होतेय त्याचे कौतुक का करत नाहिस असे फाटे please नको. तो माझ्या posts चा विषय नाहिये. मूळ मुद्द्यापासून न भरकटता GHE साठी कोणी काय केले आहे किंवा काय केले पाहिजे ह्याबद्दल बोलणार असशील तर अच पुढे बोलु. मी आधी म्हटल्याप्रमाणे भारतातल्या कुठल्याही पक्षाला GHE चे काहीच सोयरसुतक नाहिये हे उघड आहे. कमीत कमी गंगेचा प्रश्न आहे म्हणून तरी एखादी हिंदुत्ववादी संघटना / पक्श आवाज उठवेल अशी निष्फळ अपेक्षा आहे. आणी GHE चे म्हणशील तर मला नाही वाटत ही जागतिक समस्या या सन्घटनान्च्या आवाक्यात येइल. >>मूळात प्रत्येकाने हाच विचार केला तर बोलणेच खुंटले. नाही का ?
|
Slarti
| |
| Sunday, June 24, 2007 - 6:57 pm: |
| 
|
असामी, मला वाटते की ते माझ्या गंगाप्रदूषण मुद्द्याला उत्तर देत आहेत. (परत एकदा, क्षमस्व). च्यायला, मी २४ तास संगणकासमोर बसत नाही. त्यामुळे काही नवे post आल्याआल्या तडकाफडकी त्याची नोंद घेणे प्रत्येक वेळी मला शक्य नाही. चिन्मयने सांगितलेले कार्य मला माहिती नव्हते (मला संपूर्ण माहिती आहे असा दावा नाही). त्यात धर्मगुरु सहभागी आहेत हे बघून सुखद धक्का बसला. शिवाय प्रदूषणकारक अशा कर्मकांडांकडे (शव फेकणे इ.) हिंदू जर डोळसपणे बघायला तयार असतील तर फारच उत्तम. आता थोडे हरितगृह परिणामाविषयी. जनजागृती सोपी नाही याची मलाही कल्पना आहे. त्याला वर्षे जावी लागतात हेही मान्य. पण म्हणूनच आताच सुरूवात व्हावी. ते काम आमच्या एका संघटनेचे नाही म्हणून गप्पच बसता येणार नाही. कमीत कमी पुनर्धमांतर, हिंदूंना हिंदुत्वाची जाणीव करून देणे इ. गोष्टींइतकाच महत्वाचा असा हा प्रश्न आहे. मग propaganda machinery राबवायला काय हरकत आहे ? बरे, या पक्षांना राजकीय फायदा करून घ्यायलासुद्धा बराच वाव आहे. एक जबरदस्त long term issue मिळाला आहे हे लक्षात घेण्यात यावे. सांगायचा मुद्दा हा की काम अवघड आहे, मोठे आहे, त्यामानाने आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून मोठे पक्ष / संघटना यांकडे बघायचे. इथे कोणत्याच पक्षाला रस नाही हो त्यात. आता (एका अर्थी सुदैवाने) गंगेच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला. निदान हिंदुत्ववादी पक्ष तरी यावर कृती करतील ही आशा / अपेक्षा ठेवणे वावगे नाही असे वाटते.
|
Chyayla
| |
| Sunday, June 24, 2007 - 7:12 pm: |
| 
|
GHE बद्दल माझे पण दुमत नाही त्याचे महत्व आहेच पण त्यातल्या त्यात तुम्ही जो मुद्दा काढला की अशा प्रकारच्या कामात हिन्दु सन्घटनान्चा सहभाग नाही असे तुम्ही म्हणत होता त्याला मी उत्तर दीले हे तुझ्या लक्षात नाही का आले? माझी पोस्ट नीट वाच म्हणजे कळेल. तरीही नसेल कळत तर माझी या विषयावरची ही शेवटची पोस्ट
|
Asami
| |
| Monday, June 25, 2007 - 12:45 am: |
| 
|
अशा प्रकारच्या कामात हिन्दु सन्घटनान्चा सहभाग नाही असे तुम्ही म्हणत होता त्याला मी उत्तर दीले हे तुझ्या लक्षात नाही का आले?>>आलेले ना लक्षात कि तुम्ही मूळ मुद्द्याला शांतपणे बगल दिलित ती , पण विषय गंभीर आहे नि कधीतरी तुम्हाला पण ते उमगेल नि स्वत : च्या नि आपल्या core values च्या भल्याची निगराण आपणच करायची असते , तिथे अमक्याला सांगा नि तमक्याने केले नाहि तर आम्ही का करू अशा भूमिकांचा शेवटी काही उपयोग नसतो हा common sense येइल अशी अपेक्षा ठेवतो.
|
Chyayla
| |
| Monday, June 25, 2007 - 3:43 pm: |
| 
|
केदार वाइट गोष्ट हीच कि हिंदू धर्माचा उदो उदो करणारेही ह्याबाबत काहीच करत नाहित. कैक वर्षांपासून या देशातील पर्यावरण संघटना गंगाप्रदूषणाचा प्रश्न काढत आहेत. असामीने दिलेल्या बातमीत तर याविषयी काम करणार्या लोकांची / संघटनांची नावेही दिली आहेत. लोक बर्याच काळापासून आवाज उठवत आहेत. त्यांना भाजप आदी पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे का ? संसदेत त्याविषयी किती प्रश्न विचारले आहेत ? कसा पाठपुरावा केला आहे ? त्यांचे या प्रश्नांसंबंधी धोरण काय (काही असलेच तर) आणि त्यांच्या जाहिरनाम्यात ते अंतर्भूत आहे का ? हे त्यांच्याकडूनच नव्हे तर सर्वच पक्षांकडून अपेक्षित आहे. पण ते बाकीचे पक्ष हिंदुत्ववादी नाहीत. हिंदुत्ववादी पक्षांनी हे न करणे म्हणजे धर्मनिरपेक्ष तत्वावर उभ्या राहिलेल्या एखाद्या पक्षाने 'आम्ही फक्त हिंदु व इस्लाम यांचाच विचार करू' असे म्हणण्यासारखे आहे (पक्षाच्या धोरणात सुसंगती हवी). म्हणजे ज्यांच्या लेखी या प्रश्नाचे महत्व केवळ अनन्यसाधारण असावे ( because it is their core principle ) ते हिंदुत्ववादी पक्ष हे करत नाहीत (माझ्या माहितीप्रमाणे), त्यामुळे त्यांची हिंदुत्ववादाची जी भूमिका आहे तिच्या सातत्याबद्दल (= consistency ) व प्रामाणिकतेबद्दल शंका येते hi.ndUism हे core identity असणार्या एकातरी पक्षाचे ह्याबाबत केलेले काम मला दाखव , म्हणजे तुला माझ्या post मधला उद्वेग कळेल पण हिंदुत्ववादी लोक हिंदू धर्माशी निगडीत इतर प्रश्नांकडे ज्या जागरुकतेने बघतात, ती जागरुकता, ती तीव्रता इथे दिसत नाही. हा प्रश्न गंगेचा आहे, म्हणून हिंदू धर्माशी निगडीत आहे. मग केवळ 'त्यात परकीय शक्ती / धर्माचा हात नाही' किंवा 'गंगेवर होणारे परिणाम हे एका झटक्यात दिसणारे नाहीत (उदा. रामसेतू तोडणे)' यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते असे वाटते असामी तु ही चर्चा वेगळ्या BB वर हलवलीस म्हणुन उत्तर देणे क्रमप्राप्त झाले. तरी वरच्या सगळ्या पोस्ट कुणी लिहिल्यात प्रत्येक बाबीनम्धे मला कुठेही GHE बद्दल तुम्हीही गम्भीर दीसत नाहीत. आणी मला वाटत तुमचे वरचे मुद्दे मी पुराव्यासकट खोडुन काढलेत तेन्व्हा तुम्ही निदान हे तरी मान्य कराल अशी अपेक्षा केली होती. त्यातल्या त्यात 'आम्ही फक्त हिंदु व इस्लाम यांचाच विचार करू' हे विधान खोडुन काढले. मी परत म्हणतो की स्वता: काही न करता केवळ दुसर्याला हे करा ते करा असे म्हणुन मग ते का करत नाही म्हणुन रडत बसण्याला काही अर्थ नाही? आधी देशातले प्रदुषण नियन्त्रित करा आणी मग Global च्या गोष्टी कराव्यात. Charity begins from home हे तत्व ईथेही लागु पडते याचा अर्थ असा नाही की आम्ही फ़क्त आमचेच घर स्वछ करु आणी आजुबाजुला उकीरडा तसाच ठेवु पण सुरुवात मात्र घरापासुन करावी हा अर्थ. त्या अनुषन्गाने आधी गन्गेचे प्रदुषण रोखणे हे Core Value मधे बसत नाही का? हिन्दु सन्घटनान्चा प्रभाव भारतात समजु शकतो पण त्याने अमेरिका आणी ईतर विकसित देशाना सान्गावे आणी ते देश मग GHE साठी प्रदुषण थाम्बवतील हे शक्य आहे का? म्हणुन थोडा Practical विचार जमिनीवर पाय ठेवुन करावा. जगात अनेक पर्यावरणवादी सन्घटना आहेत त्या टाहो फ़ोडुन GHE बद्दल बोलतात पण कोणाच ऐकल आहे म्हणुन ते पर्यावरणवादी नसलेल्या एखाद्या सामाजिक सन्घटनेचे ऐकतिल. बरे मीच तुम्हाला आवाहन देतो की एक सामाजिक सन्घटना (कोणतीही असो पण पर्यावरणवादी नव्हे) Global Warming साठी काय करु शकते? शेवती सामाजिक सन्घटना व पर्यावरणवादी सन्घटना यान्च्यात Core values मधे काही फ़रक रहाणार की नाही? याचेही उत्तर द्या. स्वता:च्याच देशात घाण प्रदुषण ठेवुन दुसर्याला उपदेश देण्यात काय अर्थ आहे कोण विष्वास ठेवेल. आधी करावे मग सान्गावे तरच त्याला मान मिळेल नाहीतर ती नुसती निष्फ़ळ तोन्डाची वाफ़च. हिन्दुत्ववादी सन्घटना कोणाच्या अपेक्षेवर काम करत नाहे हा माझा अनुभव आहे तर ईथे प्रत्यक्ष कार्य करणार्याला (यालाच स्वयमसेवक म्हणावे ना) प्रेरणा व सहकार्य देतो. त्याच प्रेरणेतुन आज देशभरात समाजोपयोगी व अगदी प्रदुषणासारख्या विषयावरही प्रकल्प स्वता:च्या नावाच्या उदो उदो न करता चालतात. त्यातलेच एक उदाहरण गन्गा रक्षा समितीचे म्हणुन दीले. याचप्रमाणे कोणीही यावे त्याचे स्वागतच आहे. कारण Core values च्या भल्याची निगराण करायला नेहमीच तयार असतो. असामी तुझ्या वरच्या पोस्टनी माझी निराशा केली. तरी Common Sense नाही तर मग चर्चाच बन्द करावी नाही का? असो चु. भु. दे. घे.
|
Asami
| |
| Monday, June 25, 2007 - 4:00 pm: |
| 
|
जाऊ दे रे बाबा. गेली वितळून गंगोत्री तर गेली , शेवटी पक्ष महत्वाचा. मूळात GHE आणी गंगा शुद्धीकरण ह्या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत हेच तुझ्या लक्षात येत नाहित तोवर काहिही बोलणे निरुपयोगी आहे. तुझे बाकीचे चर्वण निवांत चालू दे. <Please kindly note that I have no authority to move posts to separate BB>
|
Chyayla
| |
| Monday, June 25, 2007 - 4:20 pm: |
| 
|
असामी प्लिज अश्या प्रकारे माझ्या प्रश्नान्ची उत्तरे टाळु नकोस. कारण हे सगळे प्रश्न तुम्हीच दोघानी उपस्थित केले होते. गन्गा शुद्धीकरण राहु दे ते फ़क्त उदाहरणासाठी दीले होते मुख्य मुद्दा नाहीच. (तुच त्याची सरमिसळ करतोय) त्यातल्या त्यात गन्गा प्रदुषणाचा मुद्दा हा स्लार्तीनी काढला होता मागच्या पोस्ट मधे ते मी पुराव्याने दाखवुन दीले आहे आणी मी त्यालाच उत्तर दीले आहे, अर्थात हा मुद्दा स्लार्तीनी आधी काढल्यामुळे तु त्याला बोल मला वाटत स्लार्तीनीही प्रामाणिकपणे ते कबुल केले आहे.. असो बाकिच्या मुद्याबद्दल बोल नसेल जमत तर राहु दे पुन्हा पुर्वग्रह ठेवुन अशी दीशाभुल करु नकोस.. वाटल्यास फ़क्त GHE बद्दल बोल. त्यावर चर्चा चालु ठेवावी ही ईछा: असो गन्गोत्री वितळण्याचे कारण Global Warming आहे म्हणजे हा विषयच Global आहे तेन्व्हा यात देशान्तर्गत तेही सामाजिक सन्घटनाना उगाच ओढु नकोस ते त्याना जे काही त्यान्च्या पातळीवर करता येत आहे ते करतच आहेत. तरीही... तुझ्या जवळ हा विषय सामाजिक सन्घटनान्नी Global Politics वर मात करुन कसा हातळावा या बद्दल कल्पना असतील तर मी ऐकायला उत्सुक आहे, बाकी निरर्थक मुद्द्याची चर्चा आता काढु नकोस.
|
Slarti
| |
| Monday, June 25, 2007 - 4:55 pm: |
| 
|
एक तर तुम्ही मी जे लिहिले आहे आणि असामीने लिहिले आहे त्यात गल्लत करत आहात. दुसरे म्हणजे जबाबदारीची जाणीव आहे म्हणूनच ही चर्चा घडत आहे. काहीच घेणेदेणे नसते तर काहीच बोललो नसतो. तुम्हाला केवळ हिंदूताडन दिसले. पण तो उद्देश नाहीच. (तसे करायचे असते तर बाकीचेही issues परत उकरून काढले असते.)उद्देश हा की हरितगृह परिणामाचे गांभीर्य गंगोत्रीच्या निमित्ताने पटवून देणे. इतकी वर्षे आरडाओरड चालली आहे, कुठल्याच पक्षाला रस नाही. पण गंगोत्री महत्वाची आहे, म्हणून तरी हे पक्ष काही करतील... आणि जर गंगोत्रीला धोका निर्माण होउनसुद्धा हे लोक गप्प बसले तर त्यांच्या हिंदूंविषयीच्या कळवळ्याबद्दल शंका तुम्हाला येणार नाही ? म्हणून माझे ते post . ते अस्थानी असेलही, पण खरोखर या प्रश्नांबद्दल मनापासून वाटते त्यातून तो उद्वेग आला. या प्रश्नांबाबत तीव्रता कमी आहे हे खरे. ज्याप्रमाणात रामसेतू इ.संबंधी आंदोलन झाले, त्या प्रमाणात गंगोत्रीबाबतीत होत नाही. तो राष्ट्रीय प्रश्न केला जात नाही. यासंदर्भात मी लिहिले. ठिक आहे, ते गंगाप्रदूषणावर काम करत आहेत हे मान्य केलेच आहे मी (तुम्ही खरेच posts वाचत नाही का ? ), पण ज्या असोशीने बाकीच्या हिंदूविषयक गोष्टी करतात ती असोशी दिसत नाही. शेवटी गंगोत्रीच्या रक्षणासाठी याच संघटनांकडे बघावे लागणार आहे, त्याच जर उदासीन असतील तर वाईट वाटणारच. गंगेसंबंधीच ते रामसेतू, रामजन्मभूमी इ. सारखे आंदोलन करत नाहीत, त्यामुळे गंगोत्रीवरून करतील याची खात्री नाही. (काम नाकारत नाही, पण त्यांना महत्वाचे वाटत नाही असेही वाटते). या मुद्द्यावर मी यापुढे काही लिहीणार नाही. धन्यवाद. संघटनेकडून का अपेक्षा ठेवायच्या हे मी आधीच विशद केले आहे पण तरी परत एकदा (आणि शेवटचे) सांगतो. मी स्वतः पर्यावरणरक्षणासाठी जागरुक आहे. पण मी जे करतो ते मर्यादित राहते. समाजाला हे पटवून देण्यासाठी मला चळवळ उभारता येईलसुद्धा (असे गृहीत धरू). पण ते करण्यात काळ जाईल. त्यापेक्षा आहे त्या संघटनेच्या मदतीने हे काम करणे हाच "common sense" नाही काय ? आधी करत आहे म्हणूनच सांगत आहे, लोका सांगे करत नाही आणि उंटावरून शेळ्याही हाकत नाही. परत "आधी करावे मग सांगावे" हा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून सांगत आहे. हिंदू संघटनांची सरसकट निंदा करण्याचा उद्देश नाही (इथे सर्वजण त्यांच्यावर टपून बसले आहेत असा ग्रह कृपया करून घेऊ नका), तर केवळ या बाबतीत मला जो दोष जाणवला तो लिहिला. का लिहिला ? तर हरितगृह परिणाम आणि गंगा - गंगोत्री दोन्ही मला अतिशय महत्वाचे आणि जवळचे (वेगवेगळ्या कारणांसाठी) वाटतात म्हणून. हरितगृह परिणाम कोणत्याच संघटनेस महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे माझ्या होर्याप्रमाणे माझ्यासारखेच गंगोत्रीचे भावनिक महत्व ज्यांना आहे त्यांच्याकडे बघितले... तर असे दिसते की बहुधा होरा चुकला.
|
Chyayla
| |
| Monday, June 25, 2007 - 8:30 pm: |
| 
|
स्लार्ती तुच पोस्ट नीट वाचत नाही असे दीसते म्हणुन खास तुझ्याचसाठी परत ईथे लिहिले, आता अजुन कोणत्या शब्दात सान्गु म्हणजे कळेल?... असो आता हे सगळ सोडा आणी मुळ विषयाला धरुन लिहा अशी विनन्ती करतो, आधीच या विषयाला फ़ाटे फ़ोडले नसते तर हा विषय ईतका भरकटला नसता. असो झाले गेले ते विसरा व या BB च्या Title ला न्याय द्यावा हिन्दुत्ववादी सन्घटना कोणाच्या अपेक्षेवर काम करत नाहे हा माझा अनुभव आहे तर ईथे प्रत्यक्ष कार्य करणार्याला (यालाच स्वयमसेवक म्हणावे ना) प्रेरणा व सहकार्य देतो. त्याच प्रेरणेतुन आज देशभरात समाजोपयोगी व अगदी प्रदुषणासारख्या विषयावरही प्रकल्प स्वता:च्या नावाच्या उदो उदो न करता चालतात. त्यातलेच एक उदाहरण गन्गा रक्षा समितीचे म्हणुन दीले. याचप्रमाणे कोणीही यावे त्याचे स्वागतच आहे. कारण Core values च्या भल्याची निगराण करायला नेहमीच तयार असतो.
|
Slarti
| |
| Monday, June 25, 2007 - 9:06 pm: |
| 
|
गंगोत्री वितळत आहे ही बातमी प्रसिद्ध होऊन महिने झाले, तीदेखिल कैक राष्ट्रीय वर्तमानपत्रांत. मुळात हे कळाले कोठून तर विज्ञान तंत्रज्ञान खात्याच्या अभ्यासातून. आता याउपर कोणी कसे या पक्षांच्या लक्षात आणून द्यायचे ? कोणी पुढे आले तरच हे या प्रश्नाला हात घालणार आहेत का ? त्यांना गंगोत्रीची चिंता नाही का ? कोणालाही प्रश्न विचारत नाही, हे माझे प्रकट स्वगत समजा. ज्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा तेच इतरांच्या पुढाकाराची अपेक्षा करत आहेत. प्रयत्नांत / विचारांत उणीव "जर" असेल व ती मान्य करायची तयारीच नसेल तर त्यावर कृती काय करणार ? 'आमचे कार्य तुम्ही मान्य करा' यामागील भूमिका समजते, आता यापुढे 'आमच्या उणीवा आम्ही मान्य करणार नाही' यामागील भूमिका समजून घेण्याच प्रयत्न करेन. याची सवय अजून नाही. तस्मात्, हरितगृह परिणाम आणि गंगोत्री यांचा काही संबंध आहे, गंगोत्री आणि हिंदूधर्म यांचा काही संबंध आहे आणि शेवटी हिंदुधर्म आणि हिंदुत्ववादी संघटना यांचाही काही संबंध आहे असे माझे गैरसमज झाले, त्यातून काहीबाही लिहिले गेले. चुकलो. माफ करा. तुमची लढाई आणि जागता पहारा चालू द्या. धन्यवाद.
|
Slarti
| |
| Tuesday, June 26, 2007 - 10:21 pm: |
| 
|
जणू काय आपण पुरेसे नाही... http://in.rediff.com/news/2007/jun/26earth.htm http://viewzone.com/milkyway.html अर्थात, ही शक्यता खरी जरी असली तरी आपण बिनघोर रहायचे कारण नाही. किंबहुना, हा आपल्या ताब्याबाहेरील घटक असल्याने आपण त्यात अजून भर न घालणे अधिकच महत्वाचे ठरते.
|
Mukund
| |
| Wednesday, November 14, 2007 - 12:16 pm: |
| 
|
ही लिंक पहा... http://news.yahoo.com/s/afp/20071114/sc_afp/chinaenvironmentpollutionyangtze असामी तुझ्या सगळ्या पोस्टींग्सना अनुमोदन... हा विषय धर्मनिरपेक्ष असु द्यावा यातच शहाणपणा आहे. च्यायला तुझा असामीच्या विधानांतुन काहीतरी गैरसमज झालेला वाटत आहे. असो. मुळ मुद्दा वाचुन खरच सगळ्यांनी अंतर्मुख होउन विचार केला पाहीजे. अमेरिकेत राहत असल्यामुळे या प्रॉब्लेमचे उत्तरदायीत्व मलाही स्विकारले पाहीजे. मलाही असामी सारखेच वाटते की चीन व भारताला ही गोष्ट हाताबाहेर जायच्या आधी काहीतरी करायची संधी आहे(का होती? ) अमेरिकेने हात झटकले क्योटो करारातुन म्हणुन आम्हीसुद्धा तसेच करणार हा प्रकार म्हणजे दुसयाने खड्ड्यात उडी घेतली म्हणुन आम्हीपण विचार न करता त्याचेच अनुकरण करणार अशातला प्रकार झाला.... औद्योगीक विकास महत्वाचा आहे पण त्यामुळे पर्यावरणावरती होणारा दुष्परिणाम हाही तितकाच महत्वाचा आहे. Our existance as a human being is on the line... one must see the documentary/movie..The inconvenient truth... अमेरिकेत सार्वजनीक स्वच्छतेला जितके महत्व देतात तसेच पर्यावरणाच्या स्वच्छतेला पण तितकेच महत्व त्यांनी दिले तर बराच फरक पडु शकेल कारण जगातल्या उर्जा उत्पादनातली ७० टक्के उर्जा अमेरिका एकटी वापरते. त्यांची कार इंडस्ट्री कोलमडु नये याकरता व घरोघरी असलेल्या सेंट्रल एअर कंडीशन व हिवाळ्यात लागणार्या हीटींग ऑइल व गॅस मुळे ते क्योटो कराराला बांधील राहु इच्छीत नाही हे उघड आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता असे वाटते की मानव आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेउन स्वत्:च्या विनाशाला कारणीभुत ठरणार आहे. आपल्याच हातांनी आपण हळुहळु(की वेगात!)कबर खणत आहोत असेच असामीच्या लिंकमधुन व मी वर दिलेल्या लिंकवरुन वाटत आहे. पण मला असेही वाटते की माणसाच्या मेंदुतुन बर्याच अगाध कल्पना (विचार व प्रयत्न केला तर) निघु शकतात व जगातली काही जीनीअस डोकी एकत्र आली तर यातुन काही मार्ग निघु शकेल. पण प्रॉब्लेम असा आहे की ही चार टाळकी एकत्र येण्यासाठी पुढाकार कोण घेणार व त्यांच्या सोल्युशनची अंमलबजावणी करण्याचा शहाणपणा व दुरद्रुष्टी कोणी दाखवील का?
|
गंगोत्री वितळण थांबवण्यासाठी आपल्याहुन जास्त प्रयत्न जगाने करायला हवेत. it's a global phenomenon . आपण पुर्ण deindustrialisation जरी केल तरी काही उपयोग नाही. पाश्चिमात्य देशांनी काही ठोस पावले उचलायला हवीत. वाचा As Deputy Chairman of the Planning Commission, Dr Montek Singh Ahluwalia has been a prime mover of economic policy. He was recently in the news for questioning the UNDP report on climate change. In an interview with The Indian Express Editor-in-Chief Shekhar Gupta on NDTV 24x7’s Walk the Talk, Dr Ahluwalia explains why the world should rethink the principle behind how industrialised countries and developing countries could equitably share the burden of checking carbon emission. Dr Montek Singh Ahluwalia, Deputy Chairman of Planning Commission • My guest today is a Walk the Talk favourite of all time, in fact, an all-weather friend of Walk the Talk, if I may call you that, Montek? You certainly may. • The weather's what's been getting you excited these days. That's true. Climate, rather than the weather. • What has been happening? Montek Singh Ahluwalia ko gussa kyun aata hai? You are known to be one of the coolest, calmest customers in the policy machine. Well, if you are referring to the news reports on my views on the UNDP report, actually I think maybe the press exaggerated the extent of my anger. • When was the last time you had a headline saying 'Montek rubbishes something'. Well, that's true. That was the first time I got that. I guess because they were a little surprised that on an important issue like that, I was releasing the report but I did tell them in advance that I did not agree on one of the key elements. I think I also said that it was a good report. It has a lot of very interesting things but, of course, the press only picked up the things that are different and newsy. • But why? Well, the key issue I raised was basically that climate change is a very important issue. Let's be clear about that. It's not a conspiracy that someone else is thrusting on us. There is a huge amount of empirical evidence now that all the carbon burning that has been going on for 200 years, mainly in the western world, has led to an accumulation of greenhouse gases, and that raises the temperature. What is now becoming clear is the extent to which that has happened and the continuing rate at which we are adding to these emissions is going to raise temperature around the world maybe by two degrees Centigrade, maybe more. And actually that can have very disastrous consequences. Glaciers can melt, we have seen some of that in the Himalayas, sea levels rise, monsoons become uncertain, crops go down. It's a very important issue. • We've all been educated by Mr Al Gore. Not only Mr Gore but also Mr R.K. Pachauri and all his 2500 scientists. So there's now a change. Here's what I objected to. The report makes a very sensible suggestion that you have to reduce the rate of emissions. My problem with the report is that it throws out a number: if industrialised countries can reduce emissions by 80 per cent up to 2050 and if developing countries can cut it down by only 20 per cent, things will be all right. Now, the issue is how much should they cut and how much should we cut. My feeling is that they have produced a totally arbitrary combination, which is not actually equal, because even after these cuts, industrialised countries will have emissions per capita that are four times as high as that of developing countries. My point was, if you first want to decide what we should cut, I don't think that's the problem. • So even 20 per cent of what they are emitting now will be more than 80 per cent of what we will be emitting in future. No, no. • Because we reduce by 20 per cent and they reduce by 80 per cent, and yet they are four times higher (in emission rates per capita). Yes, that's because at the moment, for example, if you look at the United States, the carbon emission per capita in tonnes of carbon dioxide is roughly 20. In Europe it's about 12, in China about four, and India about one. Take the average of the United States and Europe as, say, 15. If they reduce that by 80 per cent, they will be at three, assuming population remains the same. If we reduce by 20 per cent, we will be 0.8 tonnes per capita. And that's 45 years later. My point was that it cannot be fair that you are projecting a reduction that leaves us on a per capita basis much below the rest of the world. • And maybe to get there, we have to almost de-industrialise. That we won't. Let's put it this way. How effectively you can cut down emissions can't be predicted now with the present technology. With present technology, it will definitely mean de-industrialisation. But the assumption is that if the industrialised nations were to decide that we are going to reduce emissions, billions of dollars would go into new research, new technologies, and we would be able to benefit from them, though there is an issue of how much it would cost us. My point really was that you should all start with a principle, and the principle is that we are all on one planet and the world needs to cut emission. You should first ask, what's a fair way of deciding the cuts? My point is that deciding cuts from a base level is not a fair way. One way is that everybody in the world should have an equal carbon footprint: how much pollution there is per person should be equalised. I mean there is a kind of simplicity about that. You could think of other principles. You could say, for example, that the West has done most of the emissions for the last 140 years and the problem that we have is because of the total emissions that have been done in the last 140 years, so actually it shouldn't be per capita. We should be a little higher and they should be a little low because of all the damage that they have done. Another view could be that richer people should be put under greater stress than poorer people. And let me say that this is relevant even within the country. I mean, within India, if we have to cut emissions, the burden should be more on the rich and less on the poor, and indeed in any normal society that would happen. So my point is that if it's a global society and you want a global decision, you have got to reflect that in the principle. The UNDP report does not mention any reason why . . . • Now why does that happen? Is it motivated? Is it in haste? No, I wouldn't attribute. They didn't do the study themselves; they quoted a study. It's quite possible that the study thinks that if we cut by 20 per cent and they cut by 80 per cent, that's fair. It's certainly fairer than if they cut by 50 per cent and we cut by 50 per cent. But it's not really fair because 45 years later, when we will be a developed country almost, it is not acceptable that we have a global regime. • So you think it would have been better if they would have consulted experts on this side as well? Well, they didn't have to consult experts even. Our own Prime Minister, Dr Manmohan Singh, at the G8 meeting in Halligandam had made a proposal. Let me step back a little. When the first Kyoto protocol was negotiated, everybody knew that industrialised countries bear the major burden, so it was decided that they will cut and the developing countries will not cut at all. Actually what happened was, in the industrialised world, some countries didn't join. The United States didn't join, Australia didn't join. The countries that did, the United Kingdom and Europe, they never actually delivered on the cuts they promised. Of course, we didn't promise anything and nothing was imposed on us. So it's an arrangement that doesn't seem to have a very good background. Now, what has happened is that, first of all, we know that this hasn't worked well and secondly we know that the problem is more serious than we thought it was. I mean, all this work that Dr Pachauri and his 2500 colleagues have done suggests that in 20 years you could be running into real problems, so everybody has to do something. Now what Dr Manmohan Singh said was that we cannot say that because we weren't responsible in the past, we have no obligations. He said we must decide what is a reasonable obligation and in that context he made a suggestion this July, I think in the first week of July, that developing countries could agree never to exceed the per capita emissions of the industrialised countries and that's a kind of a challenge to them. What we are saying is, look, we'll never be worse than you per capita. • So you set the benchmark. You set the benchmark, you do what has to be done, you cut down your per capita emissions, and we'll stay within that. What I said to UNDP was, why didn't they adopt the per capita approach, why didn't they adopt the approach that, suppose the world were to accept this offer, how much per capita would the industrialised world have to cut in order to reach a sensible equilibrium? • But you are not saying that they are exaggerating the threat or the crisis? No, I believe that there's a crisis. (But) . . . there's never certainty and all scientists will tell you there's a range. I think the UNDP report correctly summarises the range of outcomes. What I think that most people don't realise is if we have a two degrees Centigrade rise in temperature, what does it do? Now the facts are, Himalayan glaciers melting faster, sea levels rising because of the melting of icebergs and so on, monsoons could be seriously affected, the water flow in our rivers initially would go up and then dry out. • Yes, because glaciers would melt and then disappear. Now, on the other hand, you have technology. Maybe, our water conservation technology would improve, maybe we'll be able to discover the kind of wheat that can tolerate temperature stress. But actually, when faced with this, there are two things that you have to do. One is adaptation, you accept. • You prepare for climate change. Yes, now whether you can reduce it or not? I mean, if you make some assumption, we have to do a lot of those things. I think it would be foolish if we thought that we don't (have to). And actually we are doing things. The prime minister's advisory council on climate change met only four days ago, and it was decided that we will prepare an action plan on climate change. What would we have to do, given that this thing is likely to happen? Second thing is, can we mitigate it? I mean, instead of the worst outcome, can we have the best outcome? The problem with that is that it cannot be done by one country; it has to be a collaborative game. • Yes, so if we de-industrialise completely, glaciers will still melt. Correct. You see, the thing is that there's a big difference between, let us say, urban overcrowding -- I mean if you have a public transportation system, and you reduce overcrowding, the benefits come to your city. But that's not true of climate change, because if you can do whatever you like and the rest of the world doesn't change . . .
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|