Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2007

Hitguj » Views and Comments » General » Smoking » Archive through February 01, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Friday, January 26, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी सख्खी मोठी बहीण, आयुष्यात एकही सिगरेट न ओढता, वयाच्या 27 व्या वर्षी, Passive Smoking मुळे, Lung Cancer ने Detect झाल्यापासून तिसर्‍या दिवशी वारली..

I am logging of this BB.
जेव्हा खरोकर काही मुद्दा असेल तेव्हा बघू...

It's like a Puppy Chasing it's own Tail...


Adtvtk
Friday, January 26, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवरजशेखर वरची comment वचुन लिहिते आहे. माझी मुलगी ४ वर्षे. आत्तापर्यन्त २-३ वेळा asthma attack आले. सगळ्या वेळी she was exposed to second hand smoke . तुम्हाला स्वतला काही चुकीचे करत अहात असे वाटत नाही आहे त्यामुळे काही सांगण्यात काही अर्थ नाही
तुमच्या (आणि दुसर्‍यांच्या) मुलांना असे काही होणार नाही असे बघा.


Yuvrajshekhar
Friday, January 26, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रश्मीजी माझ्या घरी मी पूर्णपणे कल्पना देऊन ठेवलेली आहे की मी स्मोकिंग करतो त्यामुळे उद्या मला काहीही झालं तर त्याला मीच जबाबदार असेन राहिलं माझ्या घरच्यांना होणारा त्रास तर इथे मला माझी कौटुंबिक चर्चा करायची नाहीये.
आणि उद्या जेव्हा मला मुलगा\मुलगी होईल तेव्हा मी त्याला स्मोकिंगचे दुष्परिणाम सांगेन पण त्यानंतर काय करायचं हे तो\ती ठरवेल मी नाही.
विनय साहेब चर्चा करताना भावनिक व्ह्यायचं नसतं असो तुमची मर्जी

सौरभ असे फालतू सल्ले तुझ्याकडेच ठेव.तुम्ही सर्वांनी सुचवलेले उपाय हे ब-यापैकी भारतात कधीच अंमलात न येणारे आहेत.

मुळात तुम्ही सर्वजण या गोष्टीकडे एकांगीपणे बघताय
स्मोकिंग हे
lung cancer होण्याचं सर्वात मोठं कारण आहे हे मान्य म्हणून तुमचा स्मोकिंगला विरोध आहे हे पण मान्य पण त्याची दुसरी बाजू जी तुम्ही लक्षात नाही घेत आहात ती म्हणजे हे सर्व माहिती असूनही लोकांना स्मोकिंगचा आनंद हवा आहे आणि तो व्यक्तीनिष्ठ आहे आज नाक्या नाक्यावर सिगारेटच्या टप-या आहेत निम्म्यापेक्षा अधिक तरूणपिढी आज खुले आम स्मोक करत आहेत, त्या सर्वांना स्मोकिंगचे दुष्परिणाम माहित आहेत आणि तरीही त्यांनी तो पर्याय आवडीने निवडलाय आणि तेवढं व्यक्तीस्वातंत्र्य त्यांना आहे.
स्मोकिंग न करण्याचं व्यक्तीस्वातंत्र्य जसं तुम्हाला आहेतसंच स्मोकिंग करण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य त्यांनाही आहेच की आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही अथवा त्यांच्यावर जबरदस्तीही करू शकत नाही.


Ekrasik
Friday, January 26, 2007 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यक्ति स्वातन्त्र्या बरोबरच इतरान्ना त्रास होणार नाही ही जबबदारी पण आहे त्याच काय?

Fulpakhru
Friday, January 26, 2007 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

asking this quistion "Is it ok if I smoke here?" before smoking and if the ans comes no from anyone then going some other place to smoke was sourabh's suggestion
and i think it is called "good manners"...

not a "फ़ालतु " suggestion
and i dont see any reason why it is not possible in India???

may be because we indians are rude ???
If yes it is time to change ourselfs

Saurabh
Friday, January 26, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


युवराजशेखर, तुम्हाला तो सल्ला फ़ालतु वाटला ह्यात काहीही अनपेक्षीत नाही. मुळात तुम्ही 'कुठे करावे आम्ही स्मोक?' हाच प्रश्न पुरेशा प्रामाणिकपणे विचारलेला नाही. असं म्हणण्याचं कारण असं की कोणीही कोणतीही जागा तुम्हाला सुचविली स्मोकिंगसाठी तरी तुम्हाला ती गैरसोयीचीच वाटणार आहे! कारण मुळात तुम्हाला अपेक्शीत ते उत्तर 'जेंव्हा तल्लफ येईल तेन्व्हा असाल तिथे मोक करा' असे आहे. असो.

मला वाटते नाक्या नाक्यावर जी सिगरेटची दुकाने झाली आहेत त्यांनाच लायसन्स देताना शेजारी अजुन एक छोटी पत्र्याची टपरी 'स्मोकिंग झोन' म्हणून बांधण्याची सक्ती करावी. कसे? अर्थात ते त्यांच्या आणि तुमच्या सोयिचे नसणारच आहे.
निर्मनुष्य अशा अनेक जागा मी तुम्हाला सुचवू शकतो. तुम्ही सामाजिक सभ्यतेखातर तिथे'च' जाऊन स्मोक करणार का हा तुमचा प्रश्न आहे.

खरेतर ह्यावर एक उपाय आहे. दुसर्‍याच्या इनकन्व्हिनियन्सची (आरोग्याची) पर्वा न करता चारचौघात स्मोक करणार्‍या माणसांना ऍंटी स्मोक वाल्या सर्वांनी अत्यंत अपमानास्पद वागणुक द्यायला सुरुवात करणे. नाहीतरी बर्‍याच रुढार्थाने बेकायदेशीर नसलेल्या गोष्टी माणसे अशा सार्वजनिक अवहेलनेच्या भितीपोटीच चार चैघात करत नाहीत.


Storvi
Friday, January 26, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अधिक तरूणपिढी आज खुले आम स्मोक करत आहेत, त्या सर्वांना स्मोकिंगचे दुष्परिणाम माहित आहेत आणि तरीही त्यांनी तो पर्याय आवडीने निवडलाय आणि तेवढं व्यक्तीस्वातंत्र्य त्यांना आहे.>> how can this be a justification to smoke where you want when you want? This is a travesty. we need to change this. उद्या तुम्ही हाच तर्क Drugs ना पण लागू कराल आम्हाला drugs चे दुष्परिणाम माहित आहेत पण तरीही आम्ही ते वापरणारच.. अक्खी पिढी अशी वाया जाणार असेल तर आम्ही काय गप्प बसुन तमाशा बघायचा?
आणि दुसरा मुद्दा तुम्ही म्हणालात

>>आणि उद्या जेव्हा मला मुलगा\मुलगी होईल तेव्हा मी त्याला स्मोकिंगचे दुष्परिणाम सांगेन पण त्यानंतर काय करायचं हे तो\ती ठरवेल मी नाही.>> 'Road Less Travelled' नावाचे पुस्तक आहे ते वाचा आणि मग ठरवा आपल्या मुलांना सांगुन शिकवणार आहत की आचरणातुन.. तसे तुम्ही आचरण बदलावे किंवा नाही ह्यावर आमचे काहीच बंधन नाही, पण सहज त्या पुस्तकातले एक वक्य आठवले.. "we tell our kids 'do as I say not as I do'.." तसे तुमचे होईल... अर्थात तसे होउ द्यायचे कि नाही हाही तुमचा प्रश्न आहे..

Yogy
Saturday, January 27, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज,
तुम्हाला जसे सिगारेट ओढण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे तसे इतरांना तो धूर आत न घेण्याचे स्वातंत्र्य नाही का?

Saavat
Saturday, January 27, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा विनय,
मला माफ़ कर!


Shree_tirthe
Saturday, January 27, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे कोणी स्मोकींग करतात त्यांच्यासाठी एक सांगू ईच्छितो कि , "स्वत:साठी जगताना दुसर्‍याचा पण विचार करावा माणसाने"
तुम्ही स्मोकींग करत असल्यामुळे दुसर्‍यांना त्रास होतो याची कल्पना असून देखील असं का वागतात?


Yuvrajshekhar
Sunday, January 28, 2007 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सौरभजी,माझं अपेक्षित उत्तर तुम्ही आधीच गृहीत धरलंत अर्थातमी तुम्हाला सरळ प्रश्न केला होता तुम्ही दिलेल्या पर्यायांपैकी

नाक्या नाक्यावर जी सिगरेटची दुकाने झाली आहेत त्यांनाच लायसन्स देताना शेजारी अजुन एक छोटी पत्र्याची टपरी 'स्मोकिंग झोन' म्हणून बांधण्याची सक्ती करावी.

हा पर्याय निश्चितपणे योग्य आहे पण दुर्दैवाने तो आपल्याकडे अस्तित्वात नाहीये नाहीतर आतापर्यन्त इतके वाद कदाचित झालेही नसते,बाकी दुसरा मुद्दा हा की तुम्हाला माहित असलेल्या निर्मनुष्य जागा, तर मी दादरला असतो रुईया कॉलेजजवळ जर तुम्ही आसपासची निर्मनुष्य जागा सांगितलीत तर मी नक्कीच तिथे जाऊन स्मोक करेन आणि इतर मित्रांनाही सांगेन.


storvi drugs बाळगणे आणि त्याचे सेवन करणे कायदेशीर गुन्हा आहे,स्मोकिंग करणे नाही
आणि तुम्ही टाकलेलं पुस्तकातलं वाक्य हे फारच टिपीकल आहे त्यापेक्षा मी मुलांना सॉक्रेटीसचं वाक्य सांगेन 'बुद्धीला पटेल तेच करा' तुम्ही तुमच्या मुलांना तुम्हाला पहिजे तशी शिकवण द्या.

आणि योगी आम्ही तुम्हाला धूर आत घेण्याची जबरदस्ती केली नाहीये.
त्यापेक्षा असं करा पाठीला ऑक्सिजनचं सिलेंडर लावून फिरा ना,कुठलाच धूर आत जाण्याचा मग प्रश्न नाही फक्त शुद्ध ऑक्सिजनच आत घ्यायचा काय?


Sunidhee
Monday, January 29, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, आदीती Im sorry वाईट वाटले :-(

इथे लिहिण्यार्‍या सर्व लोकांचे (१ सोडुन) एकमत झाले आहे.. युवराज तुम्ही काड्या तर लावत नाहीयेत ना? नसाल तर :-( मग लोक हो, कशाला त्यांना सांगायचा वृथा प्रयत्त्न करताय?


Yuvrajshekhar
Monday, January 29, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी बाई मी फक्त माझी मतं मांडतोय,मला न पटलेल्या गोष्टींचा मी विरोध करतोय इतकंच आणि तुमच्या सगळ्यांचं जर इथे एकमत झालं असेल आणि मी काड्या घालतो आहे असं वाटत असेल तर ठीक आहे मी या BB मधून Log Out करतो माझ्यापरीने मी माझे मुद्दे मांडले जमतील तशी प्रत्येकाला उत्तरे दिली चुकून कुणी दुखावला असेल तर माफ करा कुणाबद्दलही वैयक्तिक मतभेद वा द्वेष नव्हता.

विनयसाहेब ३ वर्षांपूर्वीच माझी छोटी बहीण वय १३ वर्षे
lung cancer ने गेली ज्यावेळी मी स्वत: स्मोक करत नव्हतो
आणि महिन्याभरापूर्वीच आईदेखील, पण त्याचा दोष मी
passive smokingला नाही दिला
इथे प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव आहेत प्रत्येकजण स्वत:च्यापरीने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो.
एखादा तणावाखाली स्मोक करतो अशावेळी त्याला हटकणं कितपत योग्य आहे? आणि अशावेळी त्याला आजूबाजूला कोणाला त्रास होतोय याची जाणीव ठेवणं शक्यही नसतं

जाऊन दे शेवटी तुम्ही सगळे तुमच्या मतांवर आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे. अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या मतानुसार वागालदेखील

बाकी जर चुकलो असेन तर एक छोटा मित्र समजून माफ़ करा


Bee
Tuesday, January 30, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदी, ती पाटी अतिव सुंदर आहे. ह्याला म्हणतात भाषासौंदर्य :-)

Sunidhee
Tuesday, January 30, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज, शांत व्हा. logout कशाला होताय? मला आपले वाटले ते लिहीले..
कोणी तुमचे किंवा ईतरांचे वाईट व्हावे अशी इछ्छा करुन तर लिहिले नाही ना? तुमचे दु:ख समजले.. ताण-तणाव, दु:खे सर्वांना असतातच. ती कमी करायला.. व्यक्ती-स्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य कितीही असले तरी स्वत:चा नाश करेल अश्या गोष्टी करु नयेत, अगदी आपल्याला समाधान मिळाले तरी, असं मला वाटते. हे माझे विचारस्वातंत्र्य असं समजा, तुम्ही 'करा' असे नाही...


Arch
Tuesday, January 30, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज, मी इथे लिहिणार नव्हते. पण तुझ शेवटच posting वाचून लिहावस वाटल.

तुझ्या post वरून गेली २ - ४ वर्षे तू काही family crisis मधून गेलेला दिसतो आहेस. त्या सगळ्यांना face करायला म्हणून smoking सुरु केल असलस आणि smoking चे दुष्परिणाम पटत असूनही cover up करायचे प्रयत्न चालू असतील, तर एक छोटा भाऊ म्हणून मनापासून सांगते, smoking करायच थांबव. वेळ निघून गेली तर वाईट वाटूनही उपयोग होत नाही.

मी तुझापेक्षा बरीच मोठी आहे त्यामुळे हे लिहावस वाटल आणि आपलेपणाने लिहिल आहे.


Sunidhee
Tuesday, January 30, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मला त्याला हेच सांगावेसे वाटले पण त्याचे ठाम विचार वाचुन धीर नाही केला. बर झाल तु लिहिलेस.

Dineshvs
Wednesday, January 31, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च सारखे सभासद, ईथे आहेत म्हणुन मायबोलीचा जिव्हाळा टिकुन आहे. युवराज खोटे कशाला लिहु ? मला मनस्वी चीड आली होती, ईथले लटके समर्थन बघुन.
कुठल्याहि तणावाला कुठलेहि व्यसन कसे उपाय ठरु शकते ?
प्रॉब्लेम्स हे भिडुनच सोडवायचे असतात. क्षणभर जर वास्तवाला विसरायचेच असेल, तर मन गुंतवण्यासाठी ईतर अनेक गोष्टी आहेत कि.
मला खात्री आहे, आत मनात कुठेतरी व्यसन सोडायची ईच्छा आहेच. फक्त निर्धार कमी पडतोय.
पण तो तर स्वःतालाच करायचा असतो ना ?


Nandini2911
Thursday, February 01, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज, तुला एक उदाहरण देऊ.. बघ पटतय का? वयाच्या सतराव्या वर्षी ग्रूपमधे शाइनिंग मारायला पहिली सिगरेट ओढली. थोड्याच दिवसात perfect smoker . त्यानंतर अभ्यास करताना रात्रभर जागता यावं म्हणून तीन चर सिगरेट्स... कामाला लागल्यानंतर tension stress साठी दिवसातून एकतरी सिगरेट.. या दरम्यान सगळ्याची ती तिरस्कार युक्त नजर.. (जे वरती बर्‍याच जणानी लिहिलय त्याच पद्धतीने) काहीचं समजावणं.. अगदी cencer झालेल्या मुलाचे फ़ोटो दाखवणं..
पण परिणाम शून्य.

एके दिवशी सकाळी विचार केला.. का आपल्या जगण्यासाठी एखादी गोष्ट जरूरी ठरावी? आपण का आपले प्रॉब्लेम फ़ेस करू शकत नाही? कसल्याही गोष्टीचा का आधार घ्यावा? बास.... त्या क्षणापासून आजपर्यंत एकही सिगरेट नाही...

याचा अर्थ आयुष्यात कधी स्मोक करणार नाही असा नाही पण त्याच्यावर depend राहणार नाही हे मात्र खरे...





Bee
Thursday, February 01, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini :-) तुझ्याकडून काय वाचतोय मी हे :-) तू वर लिहिलस छान पण ते शेवटच वाक्य एकदम खटकलं. तुलाही युवराज सारखे डोस देण्याची वेळ येईल तेंव्हा इथेच सतर्क हो...

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators