Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Smoking

Hitguj » Views and Comments » General » Smoking « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 21, 200720 01-21-07  4:16 pm
Archive through January 23, 200720 01-23-07  2:50 pm
Archive through January 24, 200720 01-25-07  4:32 am
Archive through January 26, 200720 01-26-07  11:57 am
Archive through February 01, 200720 02-01-07  7:27 am
Archive through April 06, 200720 04-06-07  6:21 am
Archive through June 06, 200720 06-06-07  6:39 am
Archive through June 06, 200720 06-07-07  1:27 am

Bee
Thursday, June 07, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनहूड, व्यसनाधिन होण्याची आणखी काही कारणं म्हणजे प्रेमभंग होणे, अकस्मात कुठल्यातरी दुःखाला सामोरे जाणे, अपयश आणि दारिद्र्य पदरी पडल्यामुळे. ही कारणे मी अति जास्त प्रमाणात बघितली आहेत. दुःख पेलले नाहीतर ते दारूच्या बाटलीत ओतून देणारे बरेच जण आहेत.. विडीच्या झुरक्यात वाहून देणारेही पाहिले आहेत. मटणाच्या रस्शात डुबवणारेही पाहिले आहेत. बाईच्या नादी लागून घरादाराला विसरणारेही पाहिले आहेत.

Nandini2911
Thursday, June 07, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच शिकून आले. माणूस व्यसनाधीन होतो कारण त्याच्यात परिस्थितीला सामोरी जाण्याची हिंमत नसते. बाकी सगळी कारणं खोटी आहेत.


Abmin
Thursday, June 07, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

he paha ani kahi tari shika

Robeenhood
Friday, June 08, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय आहे कळत नाही...

Ameyadeshpande
Friday, June 08, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहो वरती घार उडते आहे आणि बहुतेक ती त्या झाडावरती येऊन बसणार असं वाटतंय. बाकी सगळी लोकं पण त्याची वाट पहात आहेत. घारीला उतरण्यासाठी काहीतरी आमीष दाखवावं म्हणुन एका खड्ड्यातून धूर काढतायत


खरंतर चर्चा छान चालुये, सगळे जण स्वानुभव सांगत आहेत. पण खूपच सिरियस झाल्यासारखं वाटलं त्यामुळे रहावलं नाही. :-) मॉड नं १० पोस्ट उडवू शकता :-)


Limbutimbu
Friday, June 08, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> माणूस व्यसनाधीन होतो कारण त्याच्यात परिस्थितीला सामोरी जाण्याची हिंमत नसते. बाकी सगळी कारणं खोटी आहेत
हे विश्लेषण अपुर तरी किन्वा चूकीच्या शब्दात तरी आहे!
माणसात हिम्मत नस्ते असे नाही.
तसेच तो आल्या बिकट परिस्थितीला सामोराजात नस्तो असेही नाही.
प्रश्ण अस्तो सातत्याने येणार्‍या सन्कटान्चा आणि अपयशाच्या मालिकेचा! आणि अपयशातील यश समजावुन सान्गणार कुणी भेटल नाही किवा स्वतःच स्वतःला समजल नाही तर माणुस निराशेच्या गर्तेत जाऊन कोणत्यातरी "चाळ्यात" मन गुन्तवुन घेऊ पहातो जेणेकरुन अपयश, आगामी सन्कटान्ची अस्वस्थ करणारी जाणिव विसरता येइल. आता चाळा म्हणल की तो कसलाही असू शकतो, अन जेव्हा त्यात सिगारेट दारु सारखे पदार्थ समाविष्ट होतात तेव्हा त्या व्यक्ती व्यसनाकडे वाटचाल करू लागतात!

फार कमी माणसे "शौक" म्हणुन किन्वा "चैन वा चेन्ज" म्हणुन व्यसनाकडे वळलेली असतात! बहुसन्ख्य व्यसनाधीन व्यक्तीन्ची पार्श्वभुमी नीट तपास्ली तर अत्याधिक अपेक्षाभन्गाचे, अनपेक्षित सन्कटान्चे, अपयशाचे चटके बसलेले दिसुन येतिल.
दुर्दैवाने, या जगातील "यशस्वी" माणसे स्वतःच्या "यशाच्या" "स्वकर्तुत्वाच्या" एकप्रकारच्या "धुन्दीतच" असतात ज्यान्ना या दुर्दैवी व्यक्ती तिरस्करणीय घृणास्पद वाटतात!
माझ्या मते तर यशाच्या धुन्दीत जगण्याची सवय हे देखिल एक व्यसनच आहे! स्वकर्तुत्वाच्या अहन्कारी व्यसनात अडकलेल्यान्च्या कुटुम्बियान्ना किती मनस्ताप होतो ते मी जवळुन अनुभवलय!
शेवटी तात्पर्य काय की, सिगारेट दारू काय की अजुन काय, त्याचे व्यसन वाईटच याबद्दल दुमत नाही :-)

बायदीवे, इथे येवुन कोणत्याही विषयावरती काहीबाही पोस्टत रहाण हा देखिल माझा चाळाच तर नव्हे ना???


Karadkar
Friday, June 08, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या दोन्ही अजोबाना अनुक्रमे सिगरेट आणि बिडी चे व्यसन होते. एक अजोबा कोयनेच्या जंगलात रात्रंदिवस कोयना धरणासाठीच्या साईटसाठी जागा aquire करण्यापासुन ते तिथे वस्ती होईपर्यंत तिथे तंबु वगैरे टाकुन रहायचे. त्या काळात रात्री त्या कडाक्याच्या थंडीत उब मिळण्यासाठी म्हणुन त्यांना सिगरेटची सवय लागली. दुसरे अजोबा कोयनेच्याच जंगलात रात्रंदिवस भातकुन मध, हिरडा, बेहडा, औषधे गोळा करत तेव्हा त्यांनी पण उब यावी किंवा थंदी जाणवु नये म्हणुन बिडी ओढायला चालु केले. मी ह्या व्यसनांचे समर्थन अज्जिबात करणार नाही. पण वर जे वाक्य लिहिलेय ना 'माणूस व्यसनाधीन होतो कारण त्याच्यात परिस्थितीला सामोरी जाण्याची हिंमत नसते. बाकी सगळी कारणं खोटी आहेत ' ते काहीसे अर्धवट आहे असे वाटते.
एका अजोबानी माझा जन्म होण्या आधी सिगरेट सोडली पण दुसर्यांना ते शक्य नाही झाले.

लिंबु म्हणतो ते पण तितकेच खरे. खुप लोक मानसीक ताणाखाली सतत खात असतात ते पण एक व्यसनच की. त्याचेही शरीरावर वाईट परीणाम होतात्च.


Limbutimbu
Friday, June 08, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> मी ह्या व्यसनांचे समर्थन अज्जिबात करणार नाही.
कदाचीत माझ्या पोस्ट मधे देखिल "व्यसनान्च समर्थन" करीत अस्लयाचा सूर जाणवेल, पण मी देखिल समर्थन करीत नसुन केवळ कारणमिमान्सा करायचा प्रयत्न करतो हे! :-)

Cool
Friday, June 08, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय आहे कळत नाही...
>>

रॉबीनहुड, अहो ते चित्र एका कंपनीच्या Smoking Zone मधे छतावर लावलेले आहे. त्याचा अर्थ होतो की Smoking कराल तर वरचे पाद्री आणि इतर मंडळी तयार आहेत अंतिमकर्म करायला.

तसे तुम्हाला ते समजले असेलच पण आपल उगिचच


Robeenhood
Saturday, June 09, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही कूल, मला ते खरेच कळले नाही. मॉडर्न आर्ट असेल कदाचित. इथल्या सुप्रसिद्ध स्वयंघोषित समीक्षक विदुषीकडून मला समजून घ्यावे लागेल कदाचित. असो:-)

एकटेपणा आणि व्यसने यांचे नाते असतेच पण कधी कधी

हम भरे शहरोमेभी तनहा है
न जाने लोग कैसे कर लेते है वीरानेमेभी आशियाना...

असाही प्रकार असतो..

मानसशास्त्रात Conflict of motives म्हणून एक सेक्शन आहे. त्यात defence mechanism असा एक प्रकार आहे. त्यात निर्माण होणार्‍या मानसिक तणावाला सामोरे जाण्याची जी विधायक व विघातक उपाय योजना माणूस करतो त्याचा अभ्यास आहे कदाचित नेटवरही असेल. त्यातल्या व्यसने ही, या परिस्थितीला सामोरे जाण्याची ( when there is conflict of motives or emotional crisis )विघातक defence mechanisms आहेत.

यात sublimation म्हणजे भावनांचे उदात्तीकरण हा एक विधायक प्रकार आहे.


Upas
Sunday, June 10, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हूड साहेब.. रचनाच्या ब्लॉग वर
इथे टिचकी मारलीत तर 23-Aug च्या उतार्‍यात तिने tromp L'Oeil आणि त्याच्या कलेबद्दल सविस्तर लिहीले आहे. 3-D effect असलेली 2-D चित्रपद्धती..

Ramani
Friday, June 15, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिक्चर कसे अपलोड करायचे ते मला कुणी सांगेल काय? मला एका अमली पदार्थविरोधी जाहीरातीला इथे टाकायचे आहे.

Gobu
Friday, June 15, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो, दररोज १ पाकीट सिगरेट ओढतो मी!
सोडायची फार ईच्छा आहे
मागच्या पोस्ट वाचल्या मी
कोणी नेमका ऊपाय सान्गेल का?


Robeenhood
Friday, June 15, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमका उपाय कसा सांगता येईल? हे म्हणजे मी कोणती बायको करू असला भोंगळ प्रश्न झाला....
ज्याची त्याची मनोरचना बॉडी केमिस्ट्री वेगवेगळी असते. त्यात कमी ऑक्सीजन इनटेक हे मला वाटलेले कारण मी वर नमूद केले आहे. ते वाचले नाही का? प्रयत्न करून पहा....


Imtushar
Friday, June 15, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू, मी दिवसाच्या ५ वरून ५ दिवसातून १ वर आलो आहे...

आपल्याला काही ठरावीक वेळी smoke करण्याची सवय असते.. उदा दुपारच्या जेवणानंतर, सकाळच्या, दुपारच्या चहाबरोबर, वगैरे. मी या वेळांपैकी एक एक वेळ हळू हळू बंद करत गेलो मग त्या त्या वेळेला smoke करण्याची तल्लफ़ हळू हळू कमी होत गेली. असे करता करता शेवटी फक्त संध्याकाळच्या १ सिगारेट वर आलो. याला जवळपास ४ - ६ महिने लागले. या stage ला आल्यानंतर मी ठरवूनही दिवसातून २ - ३ पेक्शा जास्त ओढू शकत नव्हतो... जसे आपल्या शरीराला सिगारेट अचानक कमी केल्याचा त्रास होतो, तसेच आपण अचानक वाढवायचे ठरविले तरी शरीर ते accept करत नाही. मग जेव्हा दिवसातून एक वर आलो, त्यानंतर एखादा दिवस दांडी मारणेही अवघड नव्हते... आता ही गोष्ट सुरू केल्याला २ वर्षे झाली, आणि आता मी आठवड्यातून एखाद दुसरी सिगरेट ओढतो, पण ती बंद करावी असे नाही वाटत :-)

अर्थात हा झाला माझा अनुभव... माझी इच्छाशक्ती एव्हढी दांडगी नव्हती की एका झटक्यात मी सोडू शकेल, त्यामूळे मी हा approach निवडला. त्यात अर्थात मधूनच प्रमाण थोडे वाढण्याचा धोका होताच, आणि एखाद्या आठवड्यात वाढायचेही, पण मी जाणिवपूर्वक trend downward राहील असे बघितले. पण RH ने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची मानसिक, भावनिक आणि शारीरिक जडणघडण वेगवेगळी असते. त्यामुळी हा मार्ग सगळ्यांआच लागू पडेल असे नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators