|
भाई, तुम्ही वर वर पाहीले. पाटीचा अर्थ आहे, मराठी येत नसल्यास आधी शिका मग ही पाटी वाचा व समजुन घ्या.
|
Salil
| |
| Friday, January 26, 2007 - 4:50 pm: |
| 
|
दक्षिणेकडील राज्यांचे त्यांच्या भाषेवरील प्रेम स्पृहणीयच आहे कि नहि मला महित नाही पान आपन एकाच देषात रहातो आनि क्रुप्य लोकन सार्खे करु नका तेथे बाकीच्या लोकाना रहाणे अश्क्य करुन टाकतात
|
Yogy
| |
| Friday, January 26, 2007 - 5:38 pm: |
| 
|
ही पाटी मराठी येणार्यांना जरी कळली तरी पुष्कळ आहे ज्यांना इथे राहायचं आहे त्यांनी इथली भाषा शिकणे आवश्यक नाही का?
|
Chyayla
| |
| Friday, January 26, 2007 - 6:24 pm: |
| 
|
मला तरी त्या दाक्षिणात्यान्च भाषाप्रेम स्पृहणीय वैगेरे नाही वाटत परप्रान्तियान्शी बोलताना. त्यान्चा स्वभाषेचा आग्रह ठीक आहे पण परप्रान्तियाना त्यान्ची भाषा कशी येणार. निदान त्यान्चाशी तर दुसर्या भाषेत बोलायला पाहिजे. हाच न्याय आपल्याकडे पण लागु होतो... पण निदान आपल्या कडे आपण आपल्याच लोकान्शी मराठीत बोलायला पाहिजे. नाहितर आपण सुरु होतो एकतर हिन्दीत किन्वा आजकाल तर चक्क इन्ग्लीशच. दुसर्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रभाषा हिन्दीच योग्य. त्या इन्ग्रजी पेक्षा तरी बरी. माझा कलकत्ताचा अनुभव सान्गतो माझा तो कलकत्त्याचा पहिलाच दिवस कम्पनीच्या गेस्ट हाउस मधे जायचे होते. पत्ता होता माझ्या जवळ ट्याक्सी ने त्या गेस्ट हाउस जवळ पोहोचलो होतो पण ठीकाण नव्हत सापडत. तेन्व्हा एका बस थाम्ब्याजवळ उतरुन एका बन्गाली माणसाला हिन्दीतुन पत्ता विचारला तो आपला एकदम ढिम्म बोलायलाच तयार नाही मला कसे तरीच वाटले आणी राग पण आला. निघताना तो मला म्हणतो See Mr. This is Bengal either Talk in bengali or talk in English मी तसाच फ़णकार्यानी ट्याक्सी मधे बसुन गेलो पुढे त्या ड्रायव्हरलाच म्हटले बाबा यापुढे तुच विचार पत्ता. जरी त्याना हिन्दी येत तरी इन्ग्लीशचा आग्रह का? ईकडे माझा मुद्दा हा की आपल्या लोकान्शी मातृभाषेत बोला पण ईतरान्शी राष्ट्रभाषेत बोलायला काय हरकत आहे. योगी म्हणतो तो ठीक आहे ज्याना ईथे रहायचे त्यानी मराठी शिकायला हरकत नाही.
|
Storvi
| |
| Friday, January 26, 2007 - 6:25 pm: |
| 
|
आपापसातल्या फ़ुटी मुळे ईंग्रजांनी आपल्यावर तब्बल दोनशे वर्ष राज्य केल तरी आमचे आपले पहिले पाढे पन्चावन्न... चालुद्यात तुमच. प्रत्येक राज्याला स्वतंत्र देष म्हणुन declare करूया आणि या वादातुन कायमचे मुक्त होऊया कसे?
|
Deshi
| |
| Friday, January 26, 2007 - 6:49 pm: |
| 
|
मराठी भाषेवर प्रेम करा म्हणने वा तिच राज्याची भाषा ठेवने यातुन द्वेश कशा वाढीला लागेल?
|
Zakki
| |
| Friday, January 26, 2007 - 10:58 pm: |
| 
|
See Mr. This is Bengal either Talk in bengali or talk in English तुम्हाला त्याचे बंगाली इंग्रजी कळले?!
|
Chyayla
| |
| Saturday, January 27, 2007 - 3:15 am: |
| 
|
"धीस इज बोन्गाल आयदोर टोक इन बोन्गोली ओर टोक इन ईन्ग्लोश" आयला तोन्डाचा मोठा ओ करावा लागतो.... तरी तेवढ सोमजोन जातो हो.
|
Yogy
| |
| Saturday, January 27, 2007 - 4:00 am: |
| 
|
च्यायला ईकडे माझा मुद्दा हा की आपल्या लोकान्शी मातृभाषेत बोला पण ईतरान्शी राष्ट्रभाषेत बोलायला काय हरकत आहे. १. पहिली गोष्ट म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. २. बंगालचा इतिहास पहा. उर्दूची सक्ती केल्यामुळे बांगलादेश वेगळा करावा लागला. बंगाली लोकांनी बंगाल मध्ये बंगालीचा आग्रह धरणे यात चुकीचे ते काय? ३. त्या बंगाली माणसाला जर हिंदी येत नसेल तर त्याने कोणत्या भाषेत बोलावे? एका अहिंदीभाषिक माणसाने दुसर्या अहिंदीभाषिक माणसाशी अहिंदीभाषिक राज्यामध्ये हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह धरणे हे बरोबर आहे का? मराठी माणसाइतके हिंदीचे लांगुलचालन दुसरीकडे कोणीही करत नाही. बंगाली माणसांनीही हिंदीत बोलावे अपेक्षा चुकीची आहे. देशींशी अगदी सहमत. मराठी भाषेवर प्रेम करा म्हणने वा तिच राज्याची भाषा ठेवने यातुन द्वेश कशा वाढीला लागेल? उलट मराठी भाषेवर प्रेम केल्याने देशाची प्रगतीच होईल. आज महाराष्ट्रात मराठीचा आग्रह ध्ररणे हा गुन्हा झाला आहे. हे वाचा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1142642.cms
|
Yogy
| |
| Saturday, January 27, 2007 - 4:05 am: |
| 
|
Storvi आपापसातल्या फ़ुटी मुळे ईंग्रजांनी आपल्यावर तब्बल दोनशे वर्ष राज्य केल तरी आमचे आपले पहिले पाढे पन्चावन्न... चालुद्यात तुमच. प्रत्येक राज्याला स्वतंत्र देष म्हणुन declare करूया आणि या वादातुन कायमचे मुक्त होऊया कसे? इथे फूट पाडण्याचा कोणीही आग्रह धरलेला नाही. इथे राष्ट्रप्रेम वगैरे चुकीचे मुद्दे आणू नका. मराठी (जी आपल्या संघराज्याची आणि आपल्या राज्याची अधिकृत भाषा आहे) तिचा आग्रह धरणे आणि वेगळा देश मागणे यात फरक आहे. सगळ्यांनी हिंदीत बोलायला सुरुवात केल्यावर सर्व जण देशप्रेमी होऊन आपले प्रश्न सुटतील अशी तुमची अपेक्षा असेल तर ते चुकीचे आहे.
|
Jo_s
| |
| Saturday, January 27, 2007 - 8:43 am: |
| 
|
मराठी असे आमूची माय बोली पहा तिची आम्ही दशा काय केली फ़ुका मारतो बात स्वतंत्रतेची गुलामी तरी आमुच्या मनीची न गेली चाले आटा पिटा आंग्ल भाषे साठी मराठी राहिली झाकोळलेली कुठे भेटता प्रतीष्ठीत दोघे मराठी विचारपूस चाले वापरुनी आंग्ल बोली सांगावया जरी मातृभाषा मराठी वृत्ती तरी आमची इंग्रजाळलेली सुधीर
|
Laalbhai
| |
| Saturday, January 27, 2007 - 10:11 am: |
| 
|
हिंदीचे लांगुलचालन >> जरा विषयांतर होतेय, पण ह्या लांगूलचालन शब्दाचे जरा जास्तच लांगूलचालन होतेय, असे वाटत नाही का? म्हणजे काहीही झाले की उठायचे आणि बोंब मारायची "लांगूलचालन" "लांगूलचालन"!! माझ्यामते भाषिक विकासाच्या दृष्टीने एकाच शब्दाचा इतका प्रमाणाबाहेर वापर हा इतर शब्दांवर अन्याय आहे. त्यामुळे भाषिक वाढ खुंटेल. आणि लवकरच भाषा मरणपंथालालागेल. (नाही की, विषयाला धरुनच बोलतोय मी!) तर मुद्दा असा की उठसुठ "लांगूलचालन" हा शब्द वापरणे मराठी भाषेवर प्रेम असणार्यांनी थांबवावे, असे मी आवाहन करतो. अन्यथा, दुसरा त्याच तोलामोलाचा वजनदार शब्द प्रचलित करावा. भाषेचा विकास, हाही भाषेच्या वापराइतकाच महत्वचा मुद्दा आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
|
मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असायलाच हवा. बरेच वेळा असे निदर्शनास येते कि अगदि अश्कलीत मराठी वाटणारया दोन व्यक्ति चक्क हिन्दि किन्वा इन्ग्लिश मधुन बोलत असतात आणि हे फक्त महाराष्ट्रातच आढळून येते. हे असे का? याचा मराठी माणसाने कधी विचार केलाय? का मराठी माणसाला आपली भाषा त्या प्रतिष्ठेची वाटत नाही? मराठीचा वापर करणे त्यास कमी प्रतिचे वाटते का? असे असेल तर मग त्याला शिवाजी महाराजान्च्या या भुमीत राहण्याचा हक्क नाही. निदान मराठी माणसाने तरी मातृभाषेचा अभिमान राखायलाच हवा आपली मातृभाषा टिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि हाच या मायबोली साइटचा उपक्रम आहे असे मला वाटते. म्हणूनच इथेतरी सर्वानी मराठीत लिहण्याचा अट्टाहास करावा. मातृभाषेचे रक्षण करण्याचा विडा आज प्रत्येक मराठी व्यक्ताने उचललाच पाहीजे. मायबोलीच्या सहयोगाने हे सहज साधता येईल म्हणुनच माझी आपल्या सर्वाना विनन्ति आहे कि सर्वानि भरपुर लिहा आणि असेच लिहित रहा.............
|
Yogy
| |
| Saturday, January 27, 2007 - 2:25 pm: |
| 
|
पण ह्या लांगूलचालन शब्दाचे जरा जास्तच लांगूलचालन होतेय, असे वाटत नाही का? म्हणजे काहीही झाले की उठायचे आणि बोंब मारायची "लांगूलचालन" "लांगूलचालन"!! तुमचा मुद्दा मान्य आहे. नवीन शब्द शोधण्याचा जरुर प्रयत्न करू. तुम्हीही आम्हाला मदत करा. धन्यवाद.
|
Chyayla
| |
| Saturday, January 27, 2007 - 3:28 pm: |
| 
|
योगी, अरे मी असे लोक पाहिले की ज्याना हिन्दी येत असुनही मुद्दामुन बोलत नाही. आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगळी भाषा आहेत, आपण काय सगळ्या भाषा शिकु शकणार आहे का? प्रादेशिक भाषेव्यतिरिक्त परप्रान्तियान्शी सन्वाद साधायला एक सर्वमान्य भाषा असायला काय हरकत आहे आणी त्यातल्या त्यात राष्ट्रभाषा ही सन्वादासाठी असायला काय हरकत आहे? आपण हिन्दी ला राष्ट्रभाषा म्हणुन सगळ्यानीच मान्यता दीली आहे ना, दाक्षिणात्यानी जरी विरोध केला तरी कोणत्या तरी एका भाषेवर एकमत होणे आवश्यकच होते ना. मग हिन्दी काय वाईट आहे. या लोकाना सन्वादासाठी ईन्ग्रजी चालते मग हिन्दी का नको. मला तरी वाटत की भारतातल्या जनतेला ईन्ग्रजीपेक्षा हिन्दी सोपी जाईल कारण आजही ईन्ग्रजी त्यामानानी अशिक्षीत जनतेला कमी प्रमाणात येते. आणी त्यासाठी प्रादेशिक भाषेला विरोध करायचा असे बिलकुल नाही. मागे देवेगौडा पन्तप्रधान झाले होते ज्याना हिन्दीसुधा बोलता येत नव्हत ही एक शरमेचीच गोष्ट होती. आजकाल तर बॉलीवुड मुळे हिन्दी दक्षिणेत पण लोकान्ना येते.
|
Yogy
| |
| Saturday, January 27, 2007 - 4:08 pm: |
| 
|
chyayalaa, तुम्हाला मराठीपेक्षा हिंदीचीच काळजी जास्त दिसते. योगी, अरे मी असे लोक पाहिले की ज्याना हिन्दी येत असुनही मुद्दामुन बोलत नाही. अहो मी पण आजकाल शक्य तिथे असेच करत आहे. आपली भाषा जगवण्यासाठी थोडे असहिष्णू होणे आवश्यकच आहे. मुंबईचे काय झाले? आता पुण्यातही तेच होत आहे. आणि पुण्यात जे पिकते तेच महाराष्ट्रात विकते असा शहराचा लौकिक आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगळी भाषा आहेत, आपण काय सगळ्या भाषा शिकु शकणार आहे का? आपल्याला भारतातल्या प्रत्येक राज्यात पोटापाण्यासाठी जाण्याचा प्रसंग येणार आहे का? आणि आपण जर दुसर्या राज्यात पोटापाण्यासाठी बरीच वर्षं किंवा कायमचे राहायला गेलो तर तिथली भाषा, संस्कृती यांचे प्रदूषण करण्याचा आपल्याला हक्क आहे का? आपण त्यांच्याशी मिळून मिसळून, त्यांची भाषा शिकून राहणे, आपल्या वागणुकीचा त्यांना त्रास होणार नाही हे पाहणे हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य नाही का? प्रादेशिक भाषेव्यतिरिक्त परप्रान्तियान्शी सन्वाद साधायला एक सर्वमान्य भाषा असायला काय हरकत आहे आणी त्यातल्या त्यात राष्ट्रभाषा ही सन्वादासाठी असायला काय हरकत आहे? पहिली गोष्ट म्हणजे जिथे भारतीय राज्यघटनेने देखील कोणतीही एकच एक भाषा ही राष्ट्रभाषा नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आपला हा मुद्दा काही पटला नाही. उद्या तुम्ही म्हणाल की भारतात हिंदूधर्मीय जास्त आहेत त्यामुळे इस्लाम व ख्रिश्चनधर्मीयांनी देखील तशाच उपासनापद्धतीचा अवलंब करायला काय हरकत आहे. (सर्वमान्य म्हणून) आपण हिन्दी ला राष्ट्रभाषा म्हणुन सगळ्यानीच मान्यता दीली आहे ना, आपण म्हणजे कोणी? आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा तशी मान्यता अद्याप दिलेली नाही. दाक्षिणात्यानी जरी विरोध केला तरी कोणत्या तरी एका भाषेवर एकमत होणे आवश्यकच होते ना. मग हिन्दी काय वाईट आहे. हिंदी भाषा वाईट नाही. हिंदी भाषिकांचा दुसरी भाषा न शिकण्याचा असलेला दुराग्रह व आपली भाषा जिथे तिथे वापरण्याचा हट्ट हा वाईट आहे. या लोकाना सन्वादासाठी ईन्ग्रजी चालते मग हिन्दी का नको. मला तरी वाटत की भारतातल्या जनतेला ईन्ग्रजीपेक्षा हिन्दी सोपी जाईल कारण आजही ईन्ग्रजी त्यामानानी अशिक्षीत जनतेला कमी प्रमाणात येते. आपण इथे महाराष्ट्र व इतर हिंदी राज्यांचाच विचार करत आहात . दक्षिणेकडील व ईशान्येकडील राज्यांना हिंदी आणि इंग्रजी दोन्हीही सारख्याच परक्या आहेत. मागे देवेगौडा पन्तप्रधान झाले होते ज्याना हिन्दीसुधा बोलता येत नव्हत ही एक शरमेचीच गोष्ट होती. यात शरम ती कसली. आज मला तमिळ, तेलुगु, कन्नड या भारताच्या राष्ट्रभाषा येत नाहीत म्हणून मी शरम वाटून घ्यावी का? आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनाही हिंदी येत नाही. त्यांनीही असेच वाटून घ्यावे का?
|
Yogy
| |
| Saturday, January 27, 2007 - 4:12 pm: |
| 
|
मागे मनोगत या संकेतस्थळावर या विषयावर एक चर्चा झाली होती. कृपया खाली वाचा. मॉडरेटर, काही कॉपीराईट वगैरे अडचण असेल तर पोस्ट उडवून टाका. (पोस्ट म्हणजे खाली लिहिलेले...) पहिली गोष्ट - हिंदी ही 'राष्ट्रभाषा' हा चुकीचा समज़ व चुकीचा शब्दप्रयोग आहे. भारतीय संविधानात कोणतीही एकच एक भाषा अशी राष्ट्रभाषा म्हणून दिलेली नाही. आठव्या अनुसूचीत मराठीसह बावीस भाषा या scheduled languages म्हणून आहेत त्या सर्व राष्ट्रभाषाच आहेत. इंग्रजी व हिंदी या फक्त संघराज्याच्या 'कार्यालयीन भाषा' (official languages) आहेत. दुसरी गोष्ट - तमिळनाडू व नागालँडमधील लोकांना इंग्रजी ही ज़र परकी भाषा असेल तर हिंदी हीही तितकीच परकी आहे. भारतातील पन्नास टक्क्यांहून कमी लोक हिंदी बोलतात. म्हणजे हिंदी ही तर बहुसंख्यांचीही भाषा नव्हे! केवळ निवडणुकीत मतदान करणाऱ्यांपैकी जास्ती लोकांचा पाठिंबा असल्याने जिंकून येण्यातला हा प्रकार आहे. आणि हे असे होण्याचे कारण जेव्हा कार्यालयीन भाषा ठरवली गेली तेव्हा अनेक उमेदवार भाषा होत्या. आज़ही ज़र केवळ हिंदी व इंग्रजी अशा भाषांमधून निवडायची वेळ आली, तर इंग्रजी सहज़पणे जिंकेल! (आणि इंग्रजी पंधरा वर्षेच वापरण्याची मूळची तरतूद सतत मुदतवाढ मिळवत आज़ अठ्ठावन्न वर्षे झाली तरी इंग्रजी ही अधिकृत कार्यालयीन भाषा म्हणून संविधानात आहे हे त्याचेच निर्देशक आहे!) तिसरी गोष्ट - इंग्रजी ही भारतासाठी परकी भाषा आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. (आणि मी इथे भारत म्हणून फक्त उत्तर भारताचा आणि महाराष्ट्राचा विचार मांडत नाही, तर दक्षिण व पूर्व भारताचाही समावेश करत आहे. अंदमान किंवा मिज़ोराम किंवा तमिळनाडू किंवा प. बंगाल यांच्यासाठी हिंदी अधिक परकी की इंग्रजी? हिंदी अधिक जुन्या परिचयाची की इंग्रजी?) चौथी गोष्ट - महाराष्ट्रासाठी हिंदीला प्रेमाने आलिंगन देत राहाणे हे ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच तोट्याचे ठरत आले आहे. केवळ मराठी हीच अशी भाषा आहे की जिची लिपी हिंदीशी ज़वळपास तंतोतंत ज़ुळते. त्यामुळे हिंदीभाषकांना महाराष्ट्रात व्यवहार करणे अत्यंत सोपे ज़ाते. परिणामतः त्यांना इथे राहाताना मराठी न शिकणेही सहज़ चालून ज़ाते, आणि त्यांना स्थलांतरे करण्यासाठी (अर्थातच पोटापाण्यासाठी) महाराष्ट्र हे सर्वांत सोयीस्कर राज्य बनते. त्यात पुन्हा आपण म्हणजे राष्ट्रप्रेमाचा उमाळा अति झालेले लोक! हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उदोउदो दिल्लीतही होत नाही तितका महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होतो. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्य कार्यालय अन्य कुठल्याही अहिंदीभाषक राज्याने स्वतःमध्ये स्थापन होवू दिले नसते, पण आलिंगने द्यायला आपण पुढे, त्यामुळे ते महाराष्ट्रात! शिवाय आपल्याकडे 'माय मरो पण मावशी ज़गो' अशी म्हण! त्यामुळे मायमराठी मेली तरी चालेल, पण आपली मावशी 'राष्ट्रभाषा' हिंदी ज़गली पाहिजे यासाठी आटापीटा! तिच्याविरुद्ध ज़रा कोणी काही शब्द काढले की तो 'राष्ट्रविरोधी' आणि मराठी वाचवण्यासाठी कुणी आवाज़ चढवला की तो 'पुराणमतवादी', 'ढोंगी', 'प्रादेशिकतावादी', 'फुटिरतावादी'! "मराठीचा आग्रह धरणाऱ्यांचे 'हाथ तोड देंगे'" अशी भाषणे अबू आज़मी वगैरे लोक जाहीर सभेत खुलेआम करतात, आणि आपण त्यांना खुशाल रस्त्यावरून फिरू देतो! तिकडे आसामात रेल्वे भरतीच्या मुद्द्यावरून बिहाऱ्यांना ज़गणे मुश्किल केले होते, रक्तपात झाला, पण इथे शिवसेनेने रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ज़ावून मोडतोड केली म्हणून आपणच तिला असंस्कृत, अराष्ट्रीय, संकुचित वृत्तीची म्हणून नावे ठेवणार! अगदी मंत्रिमंडळातही गृहराज्यमंत्रिपदासारखे पद उत्तर प्रदेशातून आयात केलेल्या हिंदी व्यक्तीला द्यावे लागावे इतकी त्यांची ताकद, पण आम्ही मात्र 'आओ, आओ, आपका ही घर समझो!' हिंदी भाषक लोक हे केवळ भाषा आणत नाहीत, तर त्यांची संस्कृतीही आणतात. (अर्थातच सर्वच भाषक लोकांनी हे केले आहे.) दाक्षिणात्य लोकांनीही त्यांची संस्कृती आणली, परंतु ती महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीच्या प्रकृतीशी काही थोडीफार तरी ज़ुळणारी, प्रगतिशील, पुरोगामी व सहिष्णू होती. मुख्य म्हणजे पूर्वीची जी स्थलांतरे झाली, त्यांतून आलेले लोक हे स्थानिक संस्कृतीविषयी काही किमान आदर बाळगणारे होते, तिच्यात सामावून ज़ाण्याचा प्रयत्न करणारे होते. (बटाट्याच्या चाळीतली दक्षिण भारतीय पात्रे परकी का वाटत नाहीत त्याचे हे कारण आहे.) आणि एकूणच आपण ज्या प्रांतांत स्थलांतर करून राहात आहोत, तिथे मिळून मिसळून राहाणे, तेथील स्थानिक प्रथापरंपरांविषयी आदर बाळगणे आणि तो दाखवणे, तेथील लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करणे ही सुसंस्कृतपणाची लक्षणे आहेत. सुसंस्कृतपणा सोडून द्या हवे तर, पण व्यवहार म्हणून तरी तो शहाणपणा आहे. तसे न केल्यास स्थानिकांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागतेच, मग तो देश अगदी बहुसांस्कृतिकतेचा टेंभा मिरवणारा ब्रिटन असो, किंवा आपल्या संस्कृतीविषयी आग्रही असणारा फ्रान्स असो, किंवा आपली म्हणून काही संस्कृती निर्माण करायचा प्रयत्न करणारा अमेरिका असो. (फक्त महाराष्ट्र वगळून. कारण आम्ही भारतीय आधी, आणि मराठी नंतर! - उद्या भारताचे तुकडे होवून सर्व राज्ये ज़र स्वतंत्र झाली, तर महाराष्ट्राची जाज्ज्वल्य दिल्लीनिष्ठा इतकी आहे, की आपण आपलेच नामकरण 'भारत' असे करून घेवू आणि दिल्लीतील ज़ो कोणी राज्यकर्ता असेल त्याच्या पायी आपल्या निष्ठा विनाअट अर्पण करू! - ऐतिहासिक परंपरा! शिवाजीमहाराज, थोरले बाजीराव, लोकमान्य आणि थोड्याफार प्रमाणात शरद पवार सोडले, तर आमचे सगळे नेते हे शाहू महाराज (सातारचे) किंवा यशवंतरावांच्या पठडीतलेच - दिल्लीपती म्हणजे वैकुंठापतीचा अवतार मानणारे!) महाराष्ट्रात दोनचारच वर्षे राहायला आलेले, नोकरीनिमित्त, बदली होवून तात्पुरते राहाण्याचा उद्देश असणारे लोक येथील भाषा बोलू इच्छित नाहीत, शिकत नाहीत हे एक वेळ समज़ण्यासारखे आहे; पण पाचपाच, दहादहा वर्षे इथे राहाणारे लोकही मराठी शिकत नाहीत हे त्यांना, आणि ते तसे न बोलता सहज़ सन्मानाने इथे राहू शकतात, समृद्धी मिळवू शकतात हे आपल्याला लज्जास्पद आहे! पाचवी गोष्ट - महाराष्ट्राचा, विशेषतः मुंबईचा (परंतु केवळ मुंबईचा नव्हे) गेल्या काही वर्षांचा घटना-आलेख पाहिला की महाराष्ट्रातील समाजजीवनात व राजकारणात होत असलेली घसरण आणि तेथे होत असलेले हिंदी भाषकांचे स्थलांतर यांतील संबंध सहज़ उघड होतो. हिंदी प्रांतांतील लोकांची संस्कृती ही लाठीची आहे. कायद्याविषयी, व्यवस्थेविषयी तुच्छता, पुराणमतवाद, समाजव्यवस्थेच्या उतरंडीतील आपल्या खालच्या पायऱ्यांवरील लोकांवर अन्याय करण्याचा हक्क इ. तिची वैशिष्ट्ये आहेत (ही काही केवळ ढोबळ सामान्यीकरणे नाहीत, पुढे यांचे स्पष्टीकरण आहे - ) आणि ती तेथील प्रांतांत व तेथील प्रगतिदरात दिसून येतातच. आर्थिक प्रगती ही सामाजिक घटकांवर अवलंबून असते, ज़ातिविषमता, स्त्रीस्वातंत्र्य, साक्षरता, लिंग गुणोत्तर इ. बाबी आर्थिक प्रगतीवर थेट परिणाम करतात हे आता पूर्णतः मान्य केले गेलेले आहे. किंबहुना सामाजिक प्रगतीचे निर्देशांक हे आर्थिक प्रगतीच्या निर्देशांकांची चाल ठरवतात. आणि उत्तर भारतीय राज्यांमध्ये या दोन्ही आघाड्यांवर उजेड आहे. त्याचे खापर केवळ दिवट्या राज्यकर्त्यांवर फोडण्यात अर्थ नाही. तसे राज्यकर्ते तिथे वर्षानुवर्षे का निवडून येत राहातात आणि महाराष्ट्रासह दक्षिणी राज्यांवर तशी पाळी का येत नाही, केवळ त्या विशिष्ट राज्यांवरच का येते याचा विचार करायची गरज़ आहे. उदा. केवळ दक्षिण भारताचा (महाराष्ट्रासह) आर्थिक विकासदर घेतला तर तो दहा टक्क्यांच्याही वर ज़ातो, परंतु उत्तरेकडील राज्यांमुळे तो सहापर्यंत खाली खेचला ज़ातो. आणखी शिवाय वर ती राज्ये आर्थिक व सामाजिकदृष्या मागास आहेत म्हणून योजना आयोग त्यांना अधिक साह्य देतो आणि आं.प्र., महाराष्ट्र, कर्नाटक अशा राज्यांना मात्र त्यांच्या प्रगत असण्याबाबत शिक्षा केली ज़ाते. तर या अशा मागासलेपणामागची एक संस्कृती हिंदी लोकांच्या प्रभावासोबत महाराष्ट्रात आणली ज़ाते. सहावी गोष्ट - मराठी लोकांच्या आळशीपणाबाबत, त्यांच्या हलकी कामे करायला तयार नसण्याच्या वृत्तीबाबत, त्यांच्या अंतर्दृष्टीबाबत भरपूर तक्रारी करता येतील, पण त्यासाठी बाहेरून असे स्थानिक संस्कृतीविषयी कणभरही आदर नसणारे लोक आणणे हे उत्तर नव्हे. महाराष्ट्रातील लोक कसे महाराष्ट्राबाहेर पडत नाहीत आणि उत्तर भारतीय लोक कसे शिकायला कुठेही ज़ातात, नोकरीसाठी फिरायला तयार असतात, म्हणून खूप कावकाव केली ज़ाते. पण याचे कारण हे की मराठी माणसाने महाराष्ट्रातच अशी व्यवस्था निर्माण केली आहे की त्यात तो प्रगती करू शकतो. आम्ही उत्तम शिक्षणसंस्था उभारल्या आहेत, उद्योगधंदे इथे यायला उत्सुक असतात, इथले सामाजिक व राजकीय वातावरण नवीन उद्योग उभारायला पोषक आहे त्यामुळे इथे कारखाने व सेवाउद्योग भरभराटीला येतात, इथे स्त्रियांना सन्मान मिळतो, त्या रस्त्यावरून एकट्या फिरू शकतात, संपत्तीचे कमालीचे विषम वाटप इथे नाही, सरंजामशाही नाही, मग आम्ही महाराष्ट्र सोडून कुठल्या तरी बुरसटलेल्या भागात ज़ायची गरज़च काय? जेव्हा गरज़ भासली तेव्हा ती मराठी माणसाला स्वतःला भासली, इतरांनी त्याला उपदेश करायची गरज़ पडली नाही. अमेरिकेत काय किंवा बेंगलोर, हैद्राबादेत काय नव्या अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यांत कामे करण्यासाठी ज़ाताना मराठी माणसाने कांकू केले नाही. आणि मुळातच, इथले मराठी लोक हलकी कामे करायला तयार नाहीत, याचे उत्तर परके, समाजविघातक, प्रगतिविरोधी दृष्टिकोन असणारे लोक बाहेरून आणून मिळणार नाही. उपलब्ध मनुष्यबळ हेच आपला नोकरीबाज़ार (job-market) आहे असे समज़ून त्यातील जे काही बाज़ारदर आहेत ते मान्य करायची आपण तयारी दाखवली पाहिजे. म्हणजे मग मराठी लोकही मिळतील. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती कामे हलकी न राहाता मनुष्यश्रमांची योग्य ती किंमत करायला लागल्याचे श्रेय आपल्याला मिळेल! जगात सर्व अप्रगत राष्ट्रांत ही 'हलकी' कामे स्वस्तात होतात, तर प्रगत राष्ट्रांत ती कामे स्वतः करावी लागतात किंवा मोलाने करून घ्यायची तर चांगलेच मोल करावे लागते! सातवी गोष्ट - भारतासाठी एक व्यवहार करायला समाईक भाषा असणे गरज़ेचे आहेच. पण मग ती हिंदी का म्हणून? म्हणजे आधी हिंदी या समान पायावर सर्व राज्ये आणायची, त्यात एक अर्धे शतक घालवायचे, आणि मग जागतिक व्यवहारांना सोयीचे म्हणून इंग्रजीकडे वळायचे हा द्राविडी प्राणायाम कशाला? (इथे हा 'द्राविडी' प्राणायाम हा शब्द कसा विशेष मजा आणतो!) जी जागतिक व्यवहाराची आणि प्रगतीची भाषा इंग्रजी तिचाच आधीपासून स्वीकार का नको? आपण हिंदीचा पुरता स्वीकार करेपर्यंत स्पर्धात्मक जग काय स्वस्थ वाट पाहात बसणार आहे काय? तिकडे चीन आणि जपान इंग्रजीचा स्वीकार करत आहेत, युरोपियन युनियनने इंग्रजी स्वीकारली आहे आणि आपण मात्र आधी अख्ख्या भारतासाठी एक भाषेच्या बाता करत आहोत. आठवी गोष्ट - तमिळनाडू, कर्नाटक अशी राज्ये व ईशान्य भारत नजीकच्या कित्येक वर्षांत हिंदी स्वीकारणार नाहीत हे स्पष्ट आहे. दक्षिण भारताची आर्थिक प्रगती ही भारतातील (महाराष्ट्र वगळता) अन्य राज्यांच्या तुलनेत नेत्रदीपक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रानेच एकट्याने हिंदीचा पुरस्कार करून बिहार, म.प्र., राजस्थान, उ.प्र. अशा बिमारू हिंदीभाषक राज्यांच्या मार्गाला ज़ायचे आहे की कर्नाटक, तमिळनाडू, आं.प्र अशा विकसनशील राज्यांप्रमाणे स्वभाषा व इंग्रजी यांचा पुरस्कार करून स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण करून, दिल्लीच्या दारातले कुत्रे व्हायचे नाकारून जागतिक दर्जाचा विकास साधायचा आहे हा प्रश्नही उद्भवता कामा नये. अन्यथा सध्याचे आपले पुरोगामी स्थान आपल्याला दक्षिण भारतीय राज्यांकडे द्यावे लागेल. तेव्हा 'राजापेक्षा राजनिष्ठ' अशा न्यायाने हिंदीचा पुरस्कार करायचे आपण थांबवले पाहिजे, अन्यथा ते महाराष्ट्राच्या व मराठी संस्कृतीच्या मुळावर येईल. नववी गोष्ट - यात काहीही अराष्ट्रीयता किंवा फुटिरतावाद नाही. भारताचे स्वरूपच असे आहे की इथे अमुक एकच भाषा, धर्म, संस्कृती असा हट्ट धरणे म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये खीळ घालणे आहे. त्यापेक्षा आहेत त्या विभिन्नतांसह एकत्र राहाणे हे हितावह आहे. उलट हिंदीचा पुरस्कार करून, उत्तर भारतीय हिंदीभाषक राज्यांच्या मागे वाहात ज़ाण्याने भारतातील एका मोठ्या विकसित राज्याचे नुकसान होणार आहे, आणि पर्यायाने ते भारताचेही नुकसान असणार आहे. सध्या किमान महाराष्ट्राचा विकास हा बिमारू राज्यांना उठते करण्यासाठी उपयोगी पडत आहे; उद्या महाराष्ट्रही आज़ारी पडला तर भारताचा एक कमावता सदस्य कमी होईल व नुसतीच खाती तोंडे वाढतील. त्यापेक्षा दक्षिण भारतीय राज्यांच्या मार्गाने ज़ाऊन महाराष्ट्र भारताला अधिक विकसित करण्यातच मदत करू शकेल. तेव्हा एक मराठी महाराष्ट्र, समर्थ महाराष्ट्र हा भारताला समर्थ करायला हातभारच लावू शकतो. आपल्यायेथील कार्यसंस्कृती (work culture), सामाजिक व आर्थिक प्रगती आपण टिकवून धरली, तर भविष्यात कधी तरी आपण त्या उत्तर भारतीय राज्यांना देण्याची, शिकवण्याची आशा तरी बाळगू शकतो. आपणच ज़र उत्तर भारतीयांच्या नादाला लागून त्या गोष्टी आज़च सोडून दिल्या, तर भारताला वाचवायला मग इंग्रजीभाषक व स्वभाषाभिमानी दाक्षिणात्य राज्येच फक्त शिल्लक राहातील! दहावी गोष्ट - आपला देश म्हणजे एकच संघराज्य आहे, आणि सर्वांना सर्वत्र ज़ावून राहायचा अधिकार आहे वगैरे सर्व बडबड सभेत किंवा संसदेत ठीक आहे. वास्तव असे आहे की या धोरणाचा सर्वाधिक तोटा हा केवळ महाराष्ट्रालाच होतो. अन्य कुठल्या राज्याला नव्हे. नोकरीच्या शोधात रानोमाळ भटकणारे थवे येवून थडकतात ते महाराष्ट्रात! कारण महाराष्ट्र हा एकदम स्वागततत्पर असतो. तो प्रथम हिंदीतूनच बोलायला सुरुवात करतो. शिवाय देवनागरी लिपीही वापरतो. मग या थव्यांना त्यांची भाषा बदलायची किंवा इथल्या स्थानिक संस्कृतीत मिसळण्याची काहीच गरज़ नसते. उलट आपली संस्कृतीच त्यांना ठासून मांडता येते. (हल्ली महाराष्ट्रात रंगपंचमी साज़री होत नाही, होळी होते. इतकेच काय, आता काही ठिकाणी करवा चौथही साज़री केली ज़ाते! कुणी म्हणेल हे फक्त पुणे, मुंबई, नाशिक इथले चित्र आहे, अन्यत्र नाही. - तर लक्षात घ्या, आधी ते फक्त मुंबईत होते, आता इतर शहरांत पसरते आहे. जसे जसे हिंदी भाषक अन्य शहरांत घुसत ज़ातील तसे तसे अन्यत्रही हे वाढेल!) तर अशा प्रकारे महाराष्ट्रात राहाणे हे हिंदीभाषकांना एकदम सोयीचे, सुखाचे असते. फार काय, अगदी महाराष्ट्रीय लोकही - ज़से विदर्भातले, नागपूरकडचे - हिंदीचाच वाढता वापर करतात तेव्हा ते 'पूर्वी मध्यप्रांतात होते' असे म्हणून आपण त्यांना 'समज़ून' घेतो! तिथल्या हिंदी लॉबीचे नेतृत्व असलेली स्वतंत्र विदर्भ चळवळ आपल्याला अहितकारी वाटत नाही! (आणि त्याउलट एकदा महाजन आयोगाने बेळगाव, धारवाड, कारवारबद्दलचा निर्णय अंतिम करून टाकला, की तो तेथील लोकांवर कितीही अन्यायकारक असला, तरी कर्नाटक त्याची अगदी मनापासून अंमलबजावणी करते, आणि तिथला कन्नड टक्का कसा वाढेल याचे पद्धतशीर प्रयत्न करते! महाराष्ट्र मोठाच उदार ना! उदार की बिनकण्याचा?!) याउलट चेन्नई किंवा बेंगलोर अशा शहरांत राहायचे म्हणजे वैताग! तिथे व्यवहार करायचे तर तिथली भाषा/लिपी यायला पाहिजे, नाही तर इंग्रजी थोडीशी तरी यायला पाहिजे. हिंदीवरही काम भागू शकते, पण मग सतत "तुम्ही परके आहात" असे दर्शवणारी स्थानिक लोकांची नज़र बोचत राहाते. त्यापेक्षा मुंबई, नाशिक, पुणे बरी.. आणि उद्या अशीच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, औरंगाबाद हीही! तेव्हा अशा सर्व कारणांमुळे महाराष्ट्रात हट्ट हवा तो मराठीचा. आणि परभाषिकांशी बोलताना इंग्रजीचा. महाराष्ट्राने स्वतःला उंबरठ्यावरचे न समज़ता दक्षिण भारतीय समज़ले पाहिजे आणि संघराज्यासंदर्भातल्या सर्व आर्थिक, भाषिक व राजकीय बाबींत त्या राज्यांप्रमाणेच आचरण ठेवले पाहिजे. अर्थातच यात ढोंगीपणा काहीही न दाखवता, परप्रांतांत/परदेशांत राहाणाऱ्या मराठी लोकांनीही तेथील स्थानिक संस्कृतीचा आदर केला पाहिजे, तेथील भाषा शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हे ओघाने आलेच. कारण एकूणच स्थानिकांच्या असंतोषाला (backlash) आपण कारणीभूत होवू नये असे वागण्यात शहाणपणा, सुसंस्कृतपणा व ज़बाबदारपणा आहे. (वरील सर्व स्पष्टीकरणात मुंबईला महाराष्ट्राचा भाग मानलेले नाही. मुंबई ही आता दुर्दैवाने मराठी नाही. तेव्हा तिला विसराच. पण उर्वरित महाराष्ट्राला तरी वाचवण्यासाठी हिंदी टाळायला हवी!) आपण हा प्रश्न माझा व्यक्तिगत परिचय वाचून विचारला आहेत हे स्पष्ट आहे. मी तिथे काही दुवे दिले आहेत, तर आपण ते वाचलेत आणि तेवढेच दुवे न वाचता तेथील संपूर्ण चर्चासूत्रे वाचलीत तर अधिक बरे होईल. धन्यवाद!
|
एक व्यावहारिक मुद्दा. हिंदी भाषेत असणारे साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान हे भारतातील एखाद्या प्रादेशिक भाषेच्या तोडीचे आहे. इंग्रजीसारखा तो ज्ञानाचा अथांग स्रोत वगैरे आजिबात नाही. त्यामुळे हिंदीची कास धरण्याचा तोही काही फायदा नाही. इंग्रजीच्या बाबतीत दुसरे टोक आहे. हिंदी ही राष्ट्रीय स्ट्रीट ल्यांग्वेज आहे. ती जरूर पडल्यास रस्त्यावर शिकावी आणि तिथेच वापरावी. पुस्तके शिकायची गरज नाही. ह्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया येतील. पण भावनेच्या आहारी न जाता मुद्द्याला धरून टीका करावी ही विनंती.
|
Chyayla
| |
| Sunday, January 28, 2007 - 8:58 pm: |
| 
|
योगी तुम्ही एकदम शीवसैनिकासारखे लिहित आहात. बाळ ठाकरे यान्नी मराठी अस्मिता या मुद्यावरच शीवसेनेची स्थापना केली होती. मराठी भाषेचा आग्रह माझा पण आहे. हिन्दी बद्दल मी वेगळ्या सन्दर्भात बोललो कारण मला जो कोलकात्याला अनुभव आला त्यावरुन नवीन व्यक्तिला कसा त्रास होतो आणी त्यासाठी काय करता येइल या सन्दर्भात मी हीन्दी बद्दल लिहिले. तरी हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही हे माझ्या साठी नवीनच आहे, हे खरे का? ऐकावे ते नवलच म्हणायच. आजकाल तर मराठी भाषेची चिरफ़ाड बघवत नाही. बसच्या प्रवासात एका गरीब कुटुम्बातला मुलगा आपल्या आईला म्हणत होता. "मम्मी मले स्कुल मन्दी शुज पायजेत, तु पप्पाला सान्ग ना व". आणी हे इन्ग्राजाळलेले मराठी ऐकुन ती माता सुधा अगदी धन्य झाली व कौतुकानी त्याला म्हणत होती "व्हय माह्या राजा सान्गीन व पप्पाले" जीथे आपण आपल्या आइलाच मम्मी (इजिप्त वाली नव्हे) व वडीलाना पप्पा बनवतो तिथे मायबोलीच काही खर नाही.
|
Kalpak
| |
| Monday, January 29, 2007 - 6:24 am: |
| 
|
अहो हे असले मम्मी पप्पा अट्टाहासाने पोरांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात.(मराठीचा कमीपणा वाटणारेही दिसतात.) आणि पोरं चुकून मराठीत बोलतील म्हणून ओढाताण करून स्वतःलाही नीट येत नसताना त्यांच्याशी इंग्रजीत बोलत असतात. बागेत, दुकानात, रस्त्याने चालताना अशा अनेक ठिकाणी असे धेडगुजरी पालक दिसतात. आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. ज्या चालू आहेत त्यांच्या तुकड्या कमी होऊ लागल्या आहेत. मुलांच खाणं इंग्लीश, रहाणं इंग्लीश, शिक्षण इंग्लीश, बोलणं तर पहायलाच नको...बालपण आता बालपण न रहाता चाईल्डहूड झालय यातली बरीच मुलं हूडपणा करतानाही दिसतात, त्यामूळे मराठीत जगणारी बिचारी स्वतःला कमी समजू लागतात. या ऊलट काही मराठीतून शिकलेले व आज उच्च पदस्थ असलेले काही भेटतात व अभिमानाने सांगतात आम्ही मराठीतून शिकलो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|