Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 26, 2007

Hitguj » Views and Comments » General » मराठी असे आमुची मायबोली » Archive through January 26, 2007 « Previous Next »

Nvgole
Friday, June 11, 2004 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ivajayaÊ Ja@kI tuJao AajaÜbaahI XaÜBaU XaktIla kdaicat² naava mhNaXaIla tr ‘naagapurI’ Gaotat.

btw tulaa hLU hLU kLolaca m*Naa.


Savyasachi
Friday, June 11, 2004 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

%yaaMnaa Ja@kI mhNavaUna Gyaayalaa kahI vaaTt naahI ro... :-)

Vaatsaru
Friday, June 11, 2004 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AhÜ %yaaMnaa Ja@kIMsaarKo vaagaayalaahI ijaqao kahI vaaTt naahI itqao mhNavaUna Gyaayacao kaya evaZo Æ :-)

Moodi
Saturday, August 05, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे झक्की अन बाकी काही ठरावीक लोक सोडले तर सगळ्यांनी English/Minglish मध्येच लिहीलेले दिसते. मज्जाय!! ~DDD

Zakki
Sunday, August 06, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात मराठीसाठी मायबोलीचा उपद्व्याप. थोड्याशा प्रयत्नाने जमते तर मराठीतच का लिहू नये? नि नसते जमले तर इथे आलोच कशाला असतो?

मला इंग्रजीतून लिहायचा शौक नाही.

आता जे मराठीतून लिहित नाहीत त्यांना कारणे असतात. पण इथे येण्याची नि आपले विचार मांडण्याची हौस जबरदस्त!

काहीजण अट्टाहासाने मराठीत लिहित नाहीत, त्यांना असे वाटते की मराठीचाच आग्रह का? नि आम्ही म्हंटले की निदान इथे तरी मराठीतून लिहा, पण नाही. 'आम्ही वाट्टेल तिथे आम्हाला वाट्टेल तसे लिहू, तुम्ही कोण शिकवणारे? मराठी लिहिले, बोलले नाही याचा अर्थ आमचे मराठीवर प्रेम नाही असा नाही!'

तर कुणिही कुठल्याही भाषेत कुठेहि काऽहीहि लिहावे! भले मग इंग्रजी विनोद का असेनात! जणू इंग्रजी विनोद कुठे इतरत्र वाचायलाच मिळत नाहीत असे काही लोकांना वाटते!

वगैरे, वगैरे, सगळे गेल्या पाच सहा वर्षात वाचलेले आहे, आता हा प्रश्न पूर्णपणे निकालात निघाला आहे.

हटकेश्वर, हटकेश्वर!!


Robeenhood
Sunday, August 06, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही लोकाना काही लोकाना असे नथीतून तीर काय मारताय? सरळ नावे घेऊन सांगा की.
आता माझेच म्हणाल तर मला इन्ग्रजी येत नसल्याने नाईलाजाने मराठीतच लिहावे लागते....


Moodi
Sunday, August 06, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की मागे काही लोकांना मी चक्क रागवले मराठीतुन का लिहीत नाही म्हणून. पण या लोकांचे पहिले पाढे पंचावन.

Satishmadhekar
Wednesday, January 24, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सिटी बँक, एचएसबीसी, आयसीआयसीआय इं. चे विक्रेते रोज एकदा तरी दूरभाष करून पतपत्र घ्यायची गळ घालतात. सर्व विक्रेते संभाषणाची सुरुवात इंग्लिश किंवा हिंदीत करतात. परंतु मी पहिल्या वाक्यापासून मराठीतच बोलायला सुरुवात करतो. पहिल्या एक-दोन मराठी वाक्यानंतर सर्वजण मराठीत बोलायला लागतात. काहीजण शुद्ध मराठीत बोलतात तर काही जण मोडक्यातोडक्या मराठीत बोलतात.

आपली भाषा टिकविण्याचा आणि तिचा वापर व उपयुक्तता वाढविण्याचा हा एक मार्ग आहे. निदान महाराष्ट्रात तरी हिंदी किंवा इंग्लिश संभाषणाला मराठीत उत्तर देउया.


Zakki
Wednesday, January 24, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे. मागे मी पुण्यात एका बॅंकेत गेलो नि खाते उघडण्याबाबत चौकशी करत होतो. तिथल्या माणसाने मला सांगीतले, 'आप हिंदी मे बोलेंगे तो मेरे लिये अच्छा होगा!'. मी कपाळावर हात मारला. पुण्यामधे जनसंपर्क अधिकारी, नि त्याला मराठी येत नाही! त्याची नोकरी टिकत असेल तर धन्य ते पुणे!

Satishmadhekar
Wednesday, January 24, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,

अशा प्रसंगी मी मला हिंदी येतच नाही असे सांगतो. बहुतेक वेळा तो माणूस (मोडक्यातोडक्या का होईना) मराठीत बोलायला सुरुवात करतो किंवा मराठी बोलता येणार्‍या माणसाला पाठवितो.

आपली समस्या अशी आहे की, आपण आपल्या भाषेचा अभिमान न बाळगता समोरच्या माणसाच्या भाषेत बोलायला लागतो (महाराष्ट्रात सुद्धा). मग ते कशाला तुमच्याशी मराठीत बोलतील?

खूप पूर्वी मुंबई दूरदर्शनवर मराठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरता एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम व्हायचा. फर्ग्युसन महाविद्यालयाने त्यासाठी चक्क इंग्लिश बोलणार्‍या विद्यार्थ्यांचा संघ पाठविला होता. अशा संघाला भाग घेण्याची परवानगी नाकारायला पाहिजे होती. पण त्या कार्यक्रमाचे संचालक शरद (किंवा सुभाष) अवस्थी हे त्यांना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत होते आणि सर्व उत्तरे इंग्लिश मध्ये मिळत होती. मग कशाला मराठीत कार्यक्रम ठेवला? बहुतेक अवस्थींना आपल्याला फाडफाड इंग्लिश बोलता येतं हे अडाणी मराठी प्रेक्षकांना दाखवायचं असेल!


Yogy
Thursday, January 25, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पाटी वाचा व त्याप्रमाणे आपले आचरण ठेवा

marathi

Runi
Thursday, January 25, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही????
योगी मला वाटते त्यांना महाराष्ट्रभाषा म्हणायचे असेल , मला वाटते इथे राष्ट्रभाषा ऐवजी मातृभाषा म्हणणे जास्त योग्य असेल.
पण शक्य असेल तिथे प्रत्येक वेळी मराठी वापरायचा माझा प्रयत्न असतो.


Yogy
Friday, January 26, 2007 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://en.wikipedia.org/wiki/List_of_national_languages_of_India
हा दुवा पहा. भारताची एकच एक अशी कोणतीही भाषा राष्ट्रभाषा नाही. हिंदी (आणि इंग्रजी) या केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.


Neither the constitution nor the laws of India accord the status of "National Language" to any language in India. Indian law states that no language will be made the National Language unless and until all the constituent states of the Union of India accept it. Out of the 28 states and 7 union territories, only 10 states and 3 union territories have Hindi as the principal official language.

आपली मायमराठी देखील एक अधिकृत भाषाच आहे. तुम्हाला हिंदीत बोलण्याची कोणीही सक्ती करू शकत नाही.

जिज्ञासूंनी मनोगतावरील http://www.manogat.com/node/2839 या दुव्याचा लाभ घ्यावा.


Kashi
Friday, January 26, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

Mahesh
Friday, January 26, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणतंत्रदिन पर हार्दिक शुभकामनाऐं

Yogy
Friday, January 26, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Milindaa
Friday, January 26, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robeenhood, कोठे आहात? इतरत्र चालवलेला पांचटपणा पुरे करा आणि या बीबीवर येऊन हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही ते नीट सांगा :-)

Vinaydesai
Friday, January 26, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आठवतंय की दक्षिणेच्या (झक्की मागतात ती दक्षिणा नव्हे) चार राज्यानी मान्यता न दिल्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली नाही..

(चु. भु. ध्या. घ्या)


Yogy
Friday, January 26, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणेकडील राज्यांचे त्यांच्या भाषेवरील प्रेम स्पृहणीयच आहे. मराठी माणूस कधी त्या पातळीवर पोचेल असे वाटत नाही.
महाराष्ट्र मात्र हिंदीचे शेपूट धरून हळूहळू बिमारू राज्यांची वाट धरत आहे.

ही पाटी पहा. :-)



Laalbhai
Friday, January 26, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पाटी मराठी न येणार्‍यांना कशी कळावी?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators