Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 08, 2007

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through January 08, 2007 « Previous Next »

Laalbhai
Wednesday, December 27, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याशिवाय ISRO संस्थेतर्फे अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्याचा व्यापारी तत्वावर वापर करून हवामानाच्या पूर्वसूचना, telecommunication अशा अनेक गोष्टी इतर देशांना देण्यात आपल्या शास्त्रज्ञांनी मोठी मजल मारलेली आहे.

Upas
Friday, December 29, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या गोष्टीकडे एखादी व्यक्ती समस्या म्हणून पहाते त्याकडेच दुसरी व्यक्ती सुसंधी म्हणून पाहू शकते!..
कुरीयनसाहेब
*Anand Pattern* is proven and working!!

Marhatmoli
Wednesday, January 03, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Everyone,

I am new here. I want to express few things.

"हुकूमशाहीने आणि सक्तीने काही प्रश्न, काही प्रमाणात सुटू शकतील असे मला वाटते. " हा विचारच मला भयानक वाटतो. वैय्यत्तिक टिका करण्याचा हेतु नाहि पण हे काहिसे 'Plauge घालवण्यासाठि उन्दिर मारण्यासारख' वाटतय. हुकुमशाहि असलेल्या देशाने प्रगति केल्याच एक तरि उदाहरण वर्तमान काळ/ इतिहासात आहे का? फ़ार दुर कशाला हुकुमशाहि आणि अमेरिकेचा पाठिम्बा असुनहि आज पाकिस्तान चि अवस्था आपल्यापेक्शा वाईट का?

आपल्या देशात सार काहि आलबेल आहे अस कुणिच म्हणणार नाहि. पण परिस्थितित बदल होतो आहे ना? आपण सगळ्यानि आपला खारिचा वाटा उचलला (जे एक भारतिय म्हणुन आपले सगळ्यान्चे कर्तव्य आहे), तर आहे त्या पेक्शा नक्किच वेगाने बदल होतिल.

मला वाटत सकारात्मक द्रुष्टिकोनाचि सध्या आपल्या देशाला फ़ार गरज आहे. शेवटि पेला अर्धा भरला आहे कि रिकामा हे आपल्या मानण्यावर आहे नाहि का?

नविन वर्षाच्या तुम्हा सर्वान्ना हार्दिक शुभेच्छा.

Ganeshbehere
Thursday, January 04, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या देशात सार काहि आलबेल आहे अस कुणिच म्हणणार नाहि. पण परिस्थितित बदल होतो आहे ना? आपण सगळ्यानि आपला खारिचा वाटा उचलला (जे एक भारतिय म्हणुन आपले सगळ्यान्चे कर्तव्य आहे), तर आहे त्या पेक्शा नक्किच वेगाने बदल होतिल.>>>>>>>>>>>>>>>

मराठमोळी,
बरोबर आहे तुमचे, ज्यांना आपल्या देशा साठी काही करायचे आहे, त्यांनी त्या दिशेने सुरुवात पण केली आहे.......... ही बघा सकाळ मधली बातमी.
"पॅन आयआयटी' बनविणार रहिमतपूर "रोल मॉडेल'






Marhatmoli
Thursday, January 04, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks गणेश,

मी सकाळ मधलि बातमि वाचलि. माझा नवरा पण IIT चा माजि विद्यार्थि, तो हि या उपक्रमात सहभागि होणार आहे लवकरच.

Saavat
Friday, January 05, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mr. Peshawa,
Good evening !

तुमच्या वरील सगळ्या पोष्ट वाचून, तुंम्हाला नक्की काय अपेक्षित आहे, याविषयी माझ्या मनात विचारांच थैमान उडालय. तरीपण मला अपेक्षित उत्तर न मिळाल्याने, हा

पत्र प्रपंच...

माझा गोंधळ उडालाय तो खाली,

१) तुंम्हाला इतिहासातला दाखला दिलेला चालत नाही, तुंम्हाला ज्ञानेश्वारादि तत्वचिंतकानी मांडलेले विचार चुकीचे वाटतात,

२) धर्म, अर्थ,काम, आणि महत्त्वाचा मोक्ष; ह्याऐवजी अर्थ आणि काम हेच विचार, जगाला, पुढच्या येणार्‍या १०० वर्षात तारणार आहेत; अस काहीस तुमच म्हणन असाव, अस माझ एक प्रामाणिक मत झाल आहे,

३) चकाचक रस्ते, आलेशान वातानुकुलीत इमारती, जगावर आधिराज्य गाजवण्याच्या जबरदस्त महत्त्वाकांशा मनाशी बाळगून;यंत्रासारखी output देणारी माणस(ही माणस भावनेच्या आहारी जाणारी नसावीत. म्हणजे नक्की काय करायच हे मला अज्जुका, आणि मेढेकरसाहेबांनी वारंवार सांगूनही कळत नाही.)

अस तुम्हाला काहीस वाटत असाव, अशी मला अंधूक-अंधूक शक्यता वाटत आहे, पण नक्की अजून कळाल नाही.
तुम्हाला तुमच्या पुढील व्यक्तीगत आयुष्याची दिशा सापडली आहे,अस तुमच्या म्हणण्यावरून अर्थ काढायला बराच वाव आहे, त्यामूळेच तुम्हाला लगेच 'पत्र' पाठवायचा एकतर्फ़ी निर्णय घेतला.

तात्पुरत आपण जगाच काय होणार? यापेक्षा, मेढेकरसाहेबांनी सांगीतलेला भारताच काय होणार? हा दूरगामी विचार पटल्यामूळेच, मी त्याच्याही पुढे जाऊन आपल स्वत्:च काय होणार ह्या विचाराला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.
त्यामूळेच माझ्या डोळ्यासमोर 'आदर्श ' म्हणून तुम्हींच आहात हे माझ्या लक्षात आले. म्हणूनच मला माझ पुढिल आयुष्य तुमच्या पावलावर पाऊल टाकून जगायचे आहे, त्याकरिताच तुंम्हाला काही व्यक्तिगत प्रश्न, भावनेच्या आहारी न जाता(?) विचारायच धाडस करतो आहे,

१) तुमचे 'आदर्श' कोण आहेत?
२)तुम्हाला आयुष्याच्या ह्या वळणावर मागे वळून पाहू वाटतय का? जर हो असेल तर काय वाटतय?
३) माणसान १०० वर्षाच आयूष्य जगताना, प्रत्येक दिवस कसा जगायला पाहीजे, असतुमच मत आहे?
४) अजुन पुढील किमान ५० वर्षानंतर तुंम्हाला स्वत्:ला कोणत्या स्थितीत पहायला आवडेल?
५) तुम्हाला सध्या जगाच्या कोणत्या प्रदेशात रहाण आवडते आणि का?
६) तुमच्या सध्या मनात असणारी मत कितपत आढळ आहेत?
७) आयुष्य जगण म्हणजे नेमक काय असाव? ते जगताना समोर goal काय असायला पाहीजे?तुमच मत काय आहे.
८) आणि सगळ्यात शेवटी, जर तुम्हाला तुमच्या मृत्यूचा दिवस उद्या आहे, अस जर कोणी छातीठोकपणे सांगीतल, तर तुमची reaction काय असेल? किंवा राहीलेल्या एका दिवसात तुंम्ही काय कराल?
९) आपल्या मृत्यूनंतर राहीलेल्या जगाच काय होईल?किंवा काय व्हायला पाहीजे?

माझे प्रश्न प्रामाणिक आहेत, त्यामूळे उत्तरही तशीच असावित अशी माझी नम्र विनंती आहे.

Thanks a lot , for your precious time! Good night, have sweet dreams!!

कळावे, लोभ असावा!

ता.क.-
मी भारताबद्दल काहीही विचारलेल नाही, त्यामूळे "भारत" वगळून कृपया उत्तर असावे, ही विंनती.


आपलाच,
सावट.


Patilchintaman
Saturday, January 06, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावटबंधू ते पेशवे काय उत्तर देतील ते देवोत पण तुमच्या आठव्या प्रश्नाचं उत्तर मराठी चित्रपट श्वास सारखंच देता ये ईल. फरक ईतकाच आहे की येथे प्रश्न मरणाचा आहे.
आपण मरताना सोबत काही येत नाही असं समजतो. पेशवे कंपनीचा वेगळा अनुभव असावा.


Limbutimbu
Saturday, January 06, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला झक्की, (दुसरा नव्हे, तिसरा बाजीराव) पेशवा ( DDD ) यान्चे पटते! :-)
आम्ही ढोन्गी होत!
ज्ञानेश्वर तुकारामादी सन्तान्चे केवळ दाखले..... जोडीला तोन्डी लावण्यापुरत स्वामी विवेकानन्दान्च नाव!
झालच तर हल्लीचे गल्ली ते दिल्ली पर्यन्तचे झाडुन सगळे दादाजी, भाईजी, माताजी, आणि हो महत्वाच म्हणजे "महात्माजी" वगैरेन्च्या आरत्या ओवाळणारे.....!
त्यान्ची नाव घेवुन चार नितीतत्वाच्या बाता समोरच्याच्या तोन्डावर फेकल्या की समोरचा चुप्प!
पण शब्दश मुठभर समाज सोडला तर काय दिसते?
आजच्या पेपरमधिल बातमी.... नियम हे की मोबाईल वर बोलताना गाडी चालवु नये...! चाकण रस्त्यावर कुठेतरी दोन जण मोबाईलवर बोलता बोलता गाडी चालविल्याने तोल जावुन मोठ्या गाडीखाली येवुन जागीच गतप्रान!.....!
कसली शिस्त?.......
तीस की एकतीस डिसेम्बरला पुणे मुम्बई मार्गावर एक ट्रक उलटला आणि पेटला.....! त्यात अडकलेल्यान्ची सुटका करण्या ऐवजी, आजुबाजुचे तमाम पब्लिकच नव्हे तर भन्गारवालेच नव्हे तर वाटेने चारचाकीने जाणारे देखिल ट्रक मधुन बाहेर उडुन पडलेल्या दारूच्या बाटल्या शोधुन गोळा करण्यात मग्न.....! भन्गारवाल्यान्ना तर काय? पर्वणीच......!
दररोजचा पेपर उघडला की अक्शरष असे शेकड्यान्नी उदाहरणे दिसतात, आजुबाजुला घडताना दिसतात, गुन्हेगारीचे मग ती सफेद पोशाखातील असो की उघड उघद, पण तिचे सरळ सरळ उदात्तीकरण करण्याचे ढोन्ग जिकडे तिकडे दिसत असताना आमच्या आजुबाजुला सर्वत्र आलबेल हे अन आम्ही भारतीय तिसरी शक्ती म्हणुन उदयास येतोत असे XXXX न्च्या नन्दनवनातील विचार ज्या कुणाला करायचे असतील त्यान्नी जरुर करावेत..... मी करु शकत नाही.
केवळ देवळात गर्दी करुन तिथे नारळ अन स्वतःचे डोके आपटुन घेतले म्हणजे भारतातली "अद्ध्यात्मिक" वृत्ती अन्गी बाणवली गेली असा कुणाचा गैरसमज असेल तर राहुदेत बापडे त्या समजात!
आठवडाभर पापे करायची अन आकाशीच्या बाप्पाच्या देवळात जावुन त्याचा पाढा वाचुन पापक्षालन करुन घ्यायचे अशीच हे का आमची सन्स्कृती?
पण दिसते तर तसेच.......!
लोक म्हणतात.... पेपरवाले म्हणतात..... म्हणे भारत तिसरी महासत्ता होणार.....!!!!?????? आमच्या सारख्यान्ना वाटते, तिसरी महासत्ता राहुदे बाजुला, असलेले स्वातन्त्र्य तरी आम्ही भारतीय टिकविणार होत की नाही?
असे का वाटते त्याचे कोळशाचे खडे उगाळित बसण्यात अर्थ नाही.......!
जेव्हा मी आरशात पहातो तेव्हा मी कसा दिसतो या पेक्षा, मी जसा दिसतो तसे दिसण्या लायक हे की नाही हाच विचार मनात असतो..... तसेच मी योग्य वगतो की नाही याचा विचारही मनात येतोच येतो!
पण कितीकान्च्या??? आणि ते बाजुला ठेवले आणि वैयक्तीक रित्या जरी येथिल प्रत्येकजण सुसन्स्कृत आहेच, तरीही जेव्हा जेव्हा आम्ही "आम्ही भारतीय" म्हणुन विचार करु लागतो तेव्हा एकन्दरीत परिस्थितीची लाज आम्हांस वाटत नसेल तर एकतर आमची, पक्षी माझी स्वतःची कातडीच नव्हे तर मन देखिल गेण्ड्याच्या कातडी सारखे जाह्ले असे मानावे लागेल.
एनीवे.....!
वाद सम्पले असतील तर मुद्द्याच काही बोलुयात का?
वर च्यायला ने एक उदाहरण दिल हे, चिखलात कमळ उगवते.... वगैरे वगैरे..ऽरे बाबाऽऽऽऽ! भान्गेत पण कधी मधी तुळस उगवत अस्ती......! पण भान्गेत उगवली म्हणुन भान्गेला कुणि डोक्यावर घेत नाही तद्वतच चिखलाच्या अस्तित्वाला नाकारण्यात अर्थ नाही.....! आणि कमळान्ना उगवायला जर सुपिक गाळा ऐवजी "चिखलाचीच" गरज असेल तर असली कमळ उगवु द्यावित का???????

एकतर "आम्ही", (नो पर्सनल इश्यू......) बर्‍याच ठिकाणी कमी पडतोत हे जोवर मान्य करीत नाही तोवर कुठे कमी पडतो, का कमी पडतो याची चर्चाच होऊ शकत नाही, वरील सगळ्या अर्काइव्ह मधे तेच दिसतय.....! सॉरि पण मला तरी तसच वाटतय....!
तेव्हा रोख ठोक, हे बरोबर चाललय नि हे चूक चाललय अशी यादी जोवर बनली जात नाही तोवर उपाययोजनान्चा प्रश्णच उद्भवत नाही
सो लेट अस, प्लिज, प्लीऽऽऽज कम टु दी पॉईण्ट.....!


Ajjuka
Saturday, January 06, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषयांतर... विषयांतर...

|सावटबंधू ते पेशवे काय उत्तर देतील ते देवोत पण तुमच्या आठव्या प्रश्नाचं उत्तर मराठी चित्रपट श्वास सारखंच देता ये ईल. फरक ईतकाच आहे की येथे प्रश्न मरणाचा आहे. |

आईशप्पथ... सही.. कॉलर ताठ...


Aschig
Saturday, January 06, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* This post deleted by Moderater

Chyayla
Saturday, January 06, 2007 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बुटिम्बु मला पण माहिती आहे की भारतिय कसे आहेत, तुम्ही जी उदाहरणे दीलित ती पण खरीच आहे. जर माझे सुरुवातीचे पोस्ट वाचाल तर लक्षात येइल तुमच्या. मी तर भारतियाना सुधरायला हन्टरच पाहिजे ईथपर्यन्त लिहिले आहे. पण जेन्व्हा सरसकट भारतालाच Dead Country म्हटल्या जाते तिथे माझे आक्षेप आहे. तुम्हाला तरी ते पटतय का? प्रामाणिकपणे सान्गावे हे कबुल करणे म्हणजे तुमचा मुद्दा खोडुन काढला असे समजु नये.

सरोवराकाठी चिखलही असतो व कमळ ही असतात आता तुम्हालाच बेडकी होउन चिखलातले किटक खायचे की भ्रमराप्रमाणे फ़ुलातला मकरन्द चाखायचा हे ठरवायचे.

देवळातली गर्दी, नारळ आपटणे... भाईजी, दादाजी व महात्मे म्हणजे अध्यात्म हे माझ्या साठी नवीनच आहे. त्याचा तुम्ही ईथे मुळात कसला सम्बन्ध जोडलाय ते मला नाही कळाले.

माझा मुळ मुद्दा तुम्ही लक्षात घेतला नाही मीही म्हणालो आहे की Indian may be personaly best but socially worst शिवाय स्वामी विवेकानन्द सुद्धा हेच म्हणाले की पुर्वेकडचे अध्यात्म व पश्चिमेकडची भौतिक प्रगती यान्चा जगत्कल्याणासाठी समन्वय होणे आवश्यक आहे.

प्रत्येक मनुश्याला भौतिक, जैविक व अध्यात्मिक भुक ही असतेच. केवळ भारतिय तत्वज्ञान ह्या सगळ्यान्चा योग्य ताळमेळ घालुन धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थाद्वारे आनन्दी जीवन कसे जगावे हे सान्गते. आज दुर्दैवाने हा मुळ भारतिय आत्माच हरवल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. हिन्दुत्वाला आन्धळेपणे नावे ठेवणारे व तुम्ही यात फ़रक काय राहिला?

ह्युआन श्वान्ग ने भारतियान्चे वर्णन केले होते की जीथे कुणी चोरी करत नाही, कुणीच गरीब नाही, व्याभिचार करत नाही सगळेच आनन्दी असणारे लोक म्हणजे भारतिय. आज याविरुद्ध परिस्थिती झाली आहे भारताची, काळाचा व कलीचा महिमा. एके काळी जगाला मार्गदर्शन करणार्या भारताला आज जगाकडुनच शिकावे लागत आहे.

परम सन्गणक जरी आपण बनवला तरी मुळ सन्गणक ही सन्कल्पना आपण नाही शोधला आपण फ़क्त जगाला शुन्य ही सन्कल्पना दीली त्याचही महत्व कमी नाही पण हे जुने सन्शोधन झाले नवीन ते काय आपण ईतर जगाकडुनच घेत आहोत.

स्वामी विवेकानन्द तसेच सन्त महात्मे, थोर रुशी मुनी यान्चे ज्ञान हे वैश्विक व उच्च कोटीचे आहे. तुम्ही जो त्यान्चा दुस्वास करत आहे त्यावरुन असे वाटत की हे सगळे फ़ालतु आहेत व आपणच काय ते शहाणे आहोत. असेच तुम्हाला म्हणायचे आहे का?

मला तुमच्या बद्दल वैयक्तिक आदरच आहे पण या प्रश्नान्ची प्रामाणिक उत्तरे द्यावित ही अपेक्षा.



Chyayla
Sunday, January 07, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेच्या प्रगतीमधी भारतियान्चे योगदान ही घ्या एक माहितीवर्धक बातमी.

तसे भारतिय म्हटले तर जे भारताला केवळ नावेच ठेवतात तेपण आलेत मला प्रश्न पडतो NRI भारतिय असे का? यावरही चर्चा होणे आवश्यक आहे.
application/pdf
Indians in US.pdf (26.4 k)


Marhatmoli
Sunday, January 07, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण सगळे अनिवासि हे भारताला उठ्सुठ नावेच ठेवतात असा रोख का? मी पण सध्या अनिवासिच आहे पण मी अस काहि लिहिल्याच स्मरत नाहि.

Chyayla
Sunday, January 07, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी मी पण अनिवासी भारतियच आहे, अर्थातच माझा रोख सगळ्याच अनिवासी भारतियान्कडे नाही.

Patilchintaman
Monday, January 08, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या अनिवासी बंधू-भगिनींनो, तुम्ही भारतियांवर टिकाच करीत असला तरी तुम्ही भारताची चिंताच वहात आहात. ही चांगली गोष्ट आहे. फक्त भारत एकदम पोकळ देश आहे असं काही समजू आणि समजवू नका. हा देश घडवायचा आणि टिकवायचा असेल तर सगळ्यांनाच कमी अधिक सोसावं लागणार आहे. आणि हे नुसत्या बाता मारुन होणार नाही. त्यासाठी कष्टावं लागेल. चित्रकुटमधल्या नानाजी देशमुखांसारखं, अलवरच्या राजेन्द्रसिंह यांच्या सारखं, अण्णा हजारेंसारख. मेळघाटात राणी आणि अभय बन्ग बाबा आमटे आणखी अनेकांनी या देशाच्या उत्थानासाठी गाडून घेतलय. पाहूया उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी काय काय करता ये ईल ते!!!

Zakki
Monday, January 08, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, भारतात न रहाणारे अनिवासि असे का या विषयावरहि एकदा धुमाकुळ होऊन जाउ दे! फक्त एक सूचना, काहीतरी नियम ठरवा, म्हणजे परत BJP , काँग्रेस, कम्युनिस्ट, सवर्ण, इतर जाति, इ. विषय बाद, असे. म्हणजे मग उगीचच भांडणार्‍यांना इथे संधि नको. शिवाय अनिवासि भारतीय असे आहेत, नि तसे आहेत असे म्हणताना एकट्या दुकट्या उदाहरणावरून असले काहीतरी बोलू नये.

'एकंदरीत १९९० पूर्वी इथे आलेले भारतीय, भारताच्या नावाने बोंब मारत असतात, भारताला पोकळच काय, अगदीच फालतू देश मानतात' हे मत सत्य आहे असे मी मानतो. कारण तसे अनेऽक अनेऽक लोक मी नेहेमीच बघतो. विधान खरे की खोटे हे ज्याचे त्याचे स्वतंत्र मत. तर होऊन जाउ द्या. यात भारतच काय स्वत:चे गाव सोडून कुठेहि बाहेर न गेलेले लोक, यांचीहि मते येऊ द्यात, तेव्हढीच करमणूक.


Svsameer
Monday, January 08, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


quote:

"We, Indians, are a funny lot. We feel happy patting our backs for imaginary achievements. If there is a molehill, we instantly create a mountain out of it and start praising ourselves. It's a sad thing to do. I wish we were mature enough to accept the reality."
Sam Pitroda - Chairman of National Knowledge commission




India a global power? Tall claim, says Pitroda

Svsameer
Monday, January 08, 2007 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


quote:

We may be proud of our thriving economy and prosperity or our increasingly successful race to join the gallery of the top nations of the world. But it is really high time all of us became responsible citizens with some civic sense and courtesy.




The fun has gone out of flying

Chyayla
Tuesday, January 09, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीजी एकदम मान्य, ते उगीच भान्डण मला पण नाही पटत. एक स्वस्थ चर्चा होणे सगळ्यान्च्याच हिताचे, उलट चान्गली माहिती व इतर मुद्दे, द्रुष्टीकोण कळतो.

मला वाटत तुमच्या म्हणण्यानुसार १९९० च्या पुर्वीचा कालखण्डा मधे अनिवासी झालेल्या भारतियानमधे असा भारताबद्दल न्युनगन्ड निर्माण झाला आहे ते खरेही असु शकेल. कारण...

१)बरेच दीवस भारतापासुन वेगळे राहिल्याने चालु परिस्थिती न समजणे.

२)विदेशातील चकाचक सन्स्क्रुती, राहणीमान पाहुन भारताकडुनही तशीच अपेक्षा व त्यामुळे होणारा अपेक्षाभन्ग.

३)मुख्य कारण पैसा, सन्मान ईतका भारतात मीळणे कठीण. त्यामुळे परत जाण्याची कीन्वा भारतात काम करण्याची नसलेली ईछा:

४)शेवटी कदाचित ईतके वर्ष दुर रहिल्या मुळे आलेला दुरावा.

५)तुम्ही काय भारत पाहिला आहे, किन्वा जन्म झाला आहे म्हणुन तुम्हाला सध्या भारताबद्दल, तिथल्या नातेवाईकानबद्दल थोडा काही सम्बन्ध उरला आहे.

६)तुमच्या पुढच्या पीढीमधे हे पण नाही मग त्यामुळे त्याना भारताबद्दल काही वाटाव ही अपेक्षाच व्यर्थ उलट शिकवायला गेला तर ABCD - American Borned Confused Desis) a अशी काहीशी परिस्थिती व्हायची. कधी काळी भारत पाहिलाच तर Dirty Country म्हणुन नाक मुरडणार, शिवाय कायम Mineral Water ची बाटली लागणार.

कदाचित अशीच अजुन एखादी पीढी गेली तर भारताशी कधी सम्बन्ध पण राहणार नाही. किन्वा येणार नाही... एक दुख्: कदाचित राहील तुमचे नातु पणतु कधीच मायबोलीवर येणार नाहीत.

असो मला या बद्दल काही वैष्यम्य नाही. "कालाय तस्मे: नमा: " आणी बदलणे हाच जगाचा नियम. मी आपले काही मुद्दे ईथे मान्डायचा प्रयत्न केला बस.

पण मला असे वाटत की एवढे झाले तरी आपली सन्स्क्रुती जपली तरी मिळवले कारण तुमच्या चेहरेपट्टीवरुन अमेरिकन तुम्हाला भारतियच समजणार व काही भारतिय मुल्यान्ची अपेक्षा पण करणार.
माझा रुम पार्टनर तर ख्रिश्चन आहे तरीपण जेन्व्हा त्याला एका अमेरिकनन म्यानेजर ने सहज भारताबद्दल, योग, ध्यान याची स्तुति करुन त्याबद्दल विचारले तर त्याला काहीच बोलता आले नव्हते तो एवढेच म्हणाला की We are Christian तेन्व्हा त्या म्यानेजरला आश्चर्यच वाटल की ख्रिश्चन असणे व भारतिय असणे यामधे फ़रक आहे की काय?

माझा या मुद्द्याचा गैर अर्थ काढुन वाद करु नका, माझा मुद्दा हाच की ख्रिस्चन असुनही त्याच्याकडुन भारतियत्वाची अपेक्षा जेन्व्हा ईतर लोक करतात. त्यावरुन परक्यान्साठी तुमची ओळख भारतियच राहणार व त्यामुळेच तुम्हाला एक मान, सन्मान व मान्यता राहील तेन्व्हा एवढ्या सगळ्या गदारोळात पहिल्यापासुन माझा सन्स्क्रुतीवरच भर आहे भारत, भारतिय कसेही असो पण वर एवढे सगळे पोस्ट लिहिले ते मुळ अस्सल शम्भर नम्बरी सोन्यासार्ख्या खर्या भारतियत्वासाठी त्याकडे दुर्लक्ष करु नये असे वाटते, यालाच हिन्दुत्व म्हटल्या जात. यात जगातल्या चान्गल्या गोष्टी मिळवुन अजुन सम्रुद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सारख्यान्चीच आहे ना. आपल्याला परिवर्तनाचे कधीच वावडे नव्हते व अजुनही नाही. उलट वेदही तेच म्हणतात "चहु बाजुनी चान्गले विचार कानी पडो".


Zakki
Tuesday, January 09, 2007 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chyayala, Amen!
तर आता BB उघडण्याची गरज नाही!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators