|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through September 21, 2006 | 20 | 09-21-06 12:57 pm |
  | Archive through September 22, 2006 | 20 | 09-22-06 3:36 pm |
  | Archive through October 06, 2006 | 20 | 10-06-06 5:16 pm |
  | Archive through November 11, 2006 | 20 | 11-11-06 8:31 pm |
  | Archive through December 15, 2006 | 20 | 12-16-06 1:50 am |
  | Archive through December 18, 2006 | 20 | 12-18-06 6:25 am |
  | Archive through December 19, 2006 | 20 | 12-19-06 9:38 pm |
  | Archive through December 20, 2006 | 20 | 12-20-06 2:52 pm |
  | Archive through December 21, 2006 | 20 | 12-21-06 9:39 am |
  | Archive through December 22, 2006 | 20 | 12-22-06 3:03 pm |
  | Archive through December 24, 2006 | 20 | 12-24-06 12:15 pm |
  | Archive through December 27, 2006 | 20 | 12-27-06 2:41 pm |
  | Archive through January 08, 2007 | 20 | 01-09-07 3:34 am |
  | Archive through January 18, 2007 | 20 | 01-18-07 10:21 am |
  | Archive through April 21, 2007 | 20 | 04-21-07 2:34 pm |
Zakki
| |
| Sunday, April 22, 2007 - 2:12 am: |
| 
|
सकाळमधली बातमी वाचून फार वाईट वाटले. मुख्यत: त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सगळीकडेच वाईट अनुभव आले. हे वाईट. या देशातहि कधी कधी वाईट अनुभव येतात, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर नि इतके सर्वत्र येत नाहीत. पूर्वी माझेहि टाळके असेच रजनकूलसारखे घसरायचे. वयोमानाप्रमाणे नि नामस्मरणाच्या सवयीने मनावर थोडा काबू रहातो. पेशवा यांनी त्यांच्या प्रोफाईलमधे लिहील्याप्रमाणे Completeness किंवा perfection शक्य नाहीये. फक्त प्रश्न टक्केवारीचा आहे. इथे १० टक्के वाईट पण ९० टक्के चांगले असतील तर तिथे कदाचित् ७० टक्के वाईट असतील. पण ३० टक्के चांगलेहि आहेत. म्हणून मंदार सारखे रागावतात, ते चांगल्यातले असतील. पण एक मात्र खरे, असे 'तुमचेच घर आधी जाळू का' असे म्हणणे याला काहीच अर्थ नाही. भारतातात जास्त प्रमाणावर लोक शेळपट, नाकर्ते आहेत. त्यांना मदत करावी असे वाटले तरी ते करणार नाहीत. खूप राग आला तरी ते काही करत नाहीत, त्यामुळे नुसतेच घर जाळायला पाहिजे म्हणणारे लोक, तुमच्या केसाचेहि वाकडे करणार नाहीत. नाहीतर गुन्हेगारी नि अतिरेक केंव्हाच थांबले असते. डोळ्यादेखत गुम्हा घडत असून त्या विरुद्ध काही न करणारे लोक भारतात जास्त. लाच खाणार्यांची, फसवाफसवी करणार्यांची, स्वार्थापुढे कशाचाहि विचार न करणार्या लोकांची संख्या भारतात जास्त असावी. म्हणून पकडलेले लोकहि सुटतात. उगाच चांगले करायला गेलो तरी कुठून तरी शिव्या पडून नोकरी गेली तर काय घ्या. कुणिही वरिष्ठ अधिकारी तुम्हाला नियमांचा गैरवापर करून, वैयक्तिक कारणांवरून नोकरीवरून काढून टाकू शकतो. त्यामुळे उगीचच चांगले करायला जावे नि अंगाशी यावे असे होते. इथे सुद्धा असे वैयक्तिक कारणावरून चांगल्या माणसाला गोत्यात आणल्याची उदाहरणे मी पाहिली आहेत व एकदोनदा अनुभवली आहेत. पण परत प्रश्न फक्त टक्केवारीचा. म्हणून इथले जीवन सुसह्य होते, तिथे वैताग येतो. फक्त बक्कळ पैसा घेऊन पुण्यास जावे, काऽही करू नये, फक्त आपल्याला आवडणार्या लोकांना भेटावे, चांगल्या कार्यक्रमांना जावे येवढेच करावे. भारत कसा आहे, त्याला चांगला कसा करावा, "ये अपने बसमेकी बात नही". आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे सांसारिक गोष्टींचा लोभ सोड, त्यावर तुझे दु:ख किंवा सुख अवलंबून ठेवू नकोस, अन्तर्मुख हो, तू नि तुझा देव एव्हढेच खरे, पत्नि पासून सर्व नातेवाईक यांच्यात जीव अडकवू नको, असले तत्वज्ञान " practice " करायला मी भारतात कधीतरी येऊ इच्छितो. आता यावर लोक मला म्हणतील तुम्ही पण नाकर्ते आहात, नुसते बोलता, करत काही नाही. खरेच आहे ना. परत मी पण काही perfect नाही. टक्केवारीने माझे बरे चालले आहे.
|
Uday123
| |
| Sunday, April 22, 2007 - 5:17 am: |
| 
|
सकाळ मधील बातमी धक्कादायक आहे, वाईट वाटले. दहा वर्षा पुर्वीची पुण्यातीलच घटना, अचानक मोठा आवाज झाला म्हणुन बाहेर आलो, अपघात झाला होता व एका व्याक्तीला गाडीने उडवले होते. नेहेमी प्रमाणे वाहन चालक (मार चुकवण्यासाठी) पसार, बरेच बघे जमले होते. मी आणि मझा रूम्-मेट्मीत्राने क्षणाचाही विचार न करता, त्या व्यक्तिला रिक्षात टाकले, आणि जवळ च्या दवाखन्यात नेले. वाटेत पोलिस चौकी वर १ मीनीटासाठी रिक्षा थांबविली, मोजक्या शब्दात परिस्थिती समजावली, आणि एका पोलिसाला सोबत घेतले (रिक्षेत कोंबले). आमचे प्रयत्न निश्फ़ळ ठरले, दोन दिवसा नंतर सकाळ मधे ती व्याक्ती गेल्याची बातमी वाचली. मला/ मित्राला त्या अनोळखी व्यक्तिचे नाव्गाव्पत्ता काहीच माहीत नव्हते. पण पोलीसांनी कुठलाही (चौकशीचा) त्रास दिला नाही, अर्थात (खेपा घालायची) तयारी होतीच. पोलीस त्रास देतील, म्हणुन काहीच करायचे नाही, असे नको. मी जर त्या दिवशी, मदत नसती केली, तर आज मला पस्चाताप झाला असता. अशा कसोटीच्या वेळी जनावरातीलही (!) माणुसपण जागे होते अशी माझी समजुत होतीआहे, त्या समजुतीला सकाळ मधील लेख वाचुन धक्का बसला.
|
उदय बरोबर आहे तुमचे.......... कारण ज्याला खरच मदत करायची असते ते असे फ़ालतु निमित्त देत नाही.... तुमचाच अनुभव बघा, ते काम करतांना तुम्हि आदिच मनाची तयारी केली होति की पोलिस चौकित चक्कर मारावे लगतिल म्हणुन....... आपल्या मुळे कोणाचा जिव वाचत असेल तर थोडा पार त्रास झाल्याने फ़ार मोठा फ़रक पडत नाही. माझा स्वताचा अनुभव पण उदय सारखाच आहे, फ़क्त दोन वेळा पोलिस स्टेशन मधे जावे लागले होते. केस कोर्टाच्या बाहेर मिटवण्यात आली आणि त्या गरिब कामगाराला संपुर्ण भरपाई मिळाली.... मिडियात वाचायचे/एकायचे आणि प्रतिक्रिया देयायच्या........ म्हन्जे झांल...... देश जाळणे, सुधरविणे एवढ्या मोठ मोठ्या गोस्टी करण्या पेक्षा, सुरुवात आपल्या स्वता पासुन करायला पाहिजे.....
|
Mahaguru
| |
| Sunday, April 22, 2007 - 6:33 am: |
| 
|
शाळा/ कॉलेजात गोळीबारकरण्याचे कृत्य भारतात पण? http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-9-22-04-2007-22c35&ndate=2007-04-22
|
Rajankul
| |
| Sunday, April 22, 2007 - 1:13 pm: |
| 
|
super mom tumachaa bhabadaa aashaavad aahe haa. he pahaa gurunee dileli link kasali sanskrutee gheun basalaat!
|
Mandard
| |
| Tuesday, April 24, 2007 - 10:44 am: |
| 
|
राजनकुल, सुपरमाॅम,झक्की, सकाळमधील आदित्यच्या बातमीची दुसरी बाजु वाचा. आजच्या मुक्तपिठ मधे आहे. मला लिन्क कशी द्यायची ते माहित नाही
|
>>> सकाळमधील आदित्यच्या बातमीची दुसरी बाजु वाचा. मी हे कालच वाचलं. तात्पर्य काय, तर भारतात कोणावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
|
Santoshi
| |
| Tuesday, April 24, 2007 - 1:01 pm: |
| 
|
>>>>सकाळमधील आदित्यच्या बातमीची दुसरी बाजु वाचा. आजच्या मुक्तपिठ मधे आहे. मला लिन्क कशी द्यायची ते माहित नाही http://www.esakal.com/esakal/04242007/MuktapithB429056001.htm
|
सतिष माढेकर, तुम्ही कालची वा आजची बातमि बद्दल म्हणत आहात.... चांगले लोक आहेत हो अजुन या जगात....फ़क्त त्यांच प्रमाण कमी आहे एवढच...... एका गोस्टी वरुन संपुर्ण देशाला शिव्या देणं चुकिच आहे....
|
भारत देश मागे का पडलाय?... ... आपली लोकसंख्या आहे १०० कोटी त्यातले ७.९० कोटी लोक रिटायर्ड आहेत ३० कोटी राज्य सरकारी नोकरीत १७ कोटी केंद सरकारच्या चाकरीत ( दोन्हीही काम करत नाहीत) एक कोटी लोक आयटी उद्योगात आहेत ( ते काम करतात, पण भारतासाठी नव्हे) २५ कोटी शाळकरी मुले आहेत दोन कोटी तर पाच वर्षांखालची बालके आहेत १५ कोटी बेरोजगार आहेत १.२ कोटी हॉस्पिटलात अॅडमिट असतात ७९,९९,९९८जण तुरुंगात आहेत उरले दोघे... म्हणजे तुम्ही आणि मी... तुम्ही HITGUJ madhye वेळ घालवताय... मीच देशाचा गाडा कसा हाकू?!!!!!
|
Zakki
| |
| Thursday, May 10, 2007 - 4:51 pm: |
| 
|
हाकू नका. आता गाड्याला जुंपून घ्या. मी हाकेन!
|
Farend
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:16 pm: |
| 
|
हे प्रत्यक्ष जीवनातील अचाट व अतर्क्य, ही लिंक पाहा
|
Malavika
| |
| Friday, September 07, 2007 - 2:04 pm: |
| 
|
खरोखरी अचाट आणि अतर्क्य आहे. बापरे! बघितल्यावर १ मिनीट आ वासला होता. महामूर्ख लोकं आहेत.
|
Amruta
| |
| Friday, September 07, 2007 - 4:13 pm: |
| 
|
बापरे!! अजुनहि धडधड होत्ये.
|
Aschig
| |
| Friday, September 07, 2007 - 6:24 pm: |
| 
|
शेतकरी आणी बायका कुठे गेल्या, Robeen ? खरे आकडे आहेत का तुमच्याजवळ? ३० आणी १७ कोटी अधिक वाटतात.
|
Hkumar
| |
| Friday, October 12, 2007 - 3:38 pm: |
| 
|
चर्चिल यांचे पुढील विधान किती मर्मिक आहे: India is not a nation, it is only population.
|
Hkumar
| |
| Saturday, October 13, 2007 - 1:47 pm: |
| 
|
एकदा माझी Zimbabwe च्या एका सहकार्यांबरोबर 'रस्त्यांवर थुंकणे' यावर चर्चा झाली. ते म्हणाले की या गोष्टीचा आणि गरिबीचा अजिबात संबंध नाही. अन्यथा ते आफ़्रिकेत खूपच दिसायला हवे होते. ही गोष्ट भारतीय वृती व बेशिस्तीचाच एक भाग आहे.
|
तो चर्चिल दिडशहाणा होता. त्याच सोडुन द्या. तो म्हणाला होता भारताला स्वातंत्र्य मिळाले तर भारत देशाला लुच्चे चालवतिल. अरे बाबा जगातला सर्वात मोठा लुच्चा तुच होतास की. गांधी,नेहरु,पटेल हे देश चालवणारे लुच्चे होते काय?? रस्त्यावर थुंकणे- भारतिय लोकांसारखे तंबाखु,गुठखा,पान खाणारे इतर ठिकाणी नाहित त्यामुळे इतर ठिकाणी थुंकणे हा मोठा प्रश्न नाहि.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|