Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 27, 2006

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through December 27, 2006 « Previous Next »

Chyayla
Monday, December 25, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अज्जुका... पण मला पण काही विचार मान्डायचे आहेत.

आकाशात भरारी मारणार्या पाखराला पण परतण्यासाठी एक घरट असाव काड्या काटक्याच का होईना पण घरट असाव... त्याप्रमाणे हा देश तुम्ही कितीही भम्पक म्हणालात तरी आईच्या मायेने तुम्हाला परत सामावुन घेईल तुमच्यासाठी हे घरट राहिलच.

ती काय चीज होती की बोटीतुन भारताचा सागर किनारा दिसताच स्वातन्त्र्यवीर सावरकर आईपासुन दुरावलेल्या अबोध बाळाप्रमाणे... एकिकडे डोळ्यातुन घळाघळा अश्रु वाहत आहेत आणी दुसरीकडे ते आर्तपणे गात आहेत " ने मजसी ने.. परत मात्रुभुमीला.. सागरा प्राण तळमळला सागरा..." खरच मी जेन्व्हा जेन्व्हा हे गाण ऐकतो ना मला पण खुप रडायला येत.
त्यान्च जीवन बघा काय दिले या देशाने उलट अजुनही उपेक्षा, क्रुतघ्नताच (अन्दमानातले मणिशन्करचे प्रताप) काय होते या देशात गरीबी, गुलामी, अज्ञान तरीही केवळ मात्रुभुमीच्या प्रेमासाठी सारे जीवन अर्पण केले एवढेच काय कोवळा सन्सार ही राष्ट्रकुन्डात स्वहा: केला. ईन्ग्लन्ड मधे ते पण सुखात राहीले असते कशाला परत आले. आपण त्यान्च्या एवढे महान नाही पण ती भावना थोड्या प्रमाणात आपल्यातही येउ नये काय? ईतके का आपण दगड आहोत? क्रुतघ्न आहोत?

स्वामी विवेकानन्दान्च एक उदाहरण आहे. ते जेन्व्हा सर्वधर्म परिषद जिन्कुन मद्रासला सागर किनार्यावर पोहोचले तर त्यानी काय कराव. तर मात्रुभुमीला साष्टान्ग दन्डवत घालुन चक्क वाळु मधे लोळलेत, समोर मोठा जन समुदाय त्यान्चे स्वागत करायला होता तरी त्याना लाज वाटली नाही. विचारले असता त्यान्नी उत्तर दिले की सार्या जगातली भुमी म्हणजे भोगभुमी आहे पण जन्म्भुमी, कर्मभुमी व तपोभुमी ही भारतच याच्या मातीचा कणन कण अत्यन्त पवित्र आहे.
यापुढे ते म्हणतात भारतातली अज्ञानी, अडानी, गरीब जनता माझे दैवत आहे त्यान्ची सेवा करणे हीच माझ्यासाठी ईश्वरसेवा "नर सेवा हीच नारायण सेवा"

खर म्हणजे आपण अशा देशात जन्माला आलो, जगात कुठेही गेलो तरी या देशाचे अमुल्य तत्व, सन्स्क्रुतीचे वारसदार आहोत याचा अभिमान ठेवावा व परमेश्वराचे आभार मानावे, या जीवाला मुक्ती मिळेपर्यन्त प्रत्येक जन्म याच देशात मिळो हीच ईछा. फ़ारच अध्यात्मिक झाले का? पण मन मोकळे करुन बोललो.

तरी भारतातली मर्यादीत जमीन व अफ़ाट लोकसन्ख्या त्यामुळे असलेले प्रचन्ड तरुण मनुश्यबळ व दुसरीकडे सम्पन्न अश्या पाश्चात्य राष्ट्रातील सुख, सुविधा, ऐश्वर्य व कमी लोकसन्ख्या शिवाय एवढा अफ़ाट देश साम्भाळायला तरुण मनुश्यबळाची कमतरता. यान्चात समतोलाची आवश्यकता आहेच व ती या स्थलान्ताराने होत आहे. त्यामुळे NRI होणे किन्वा तिथेच स्थाईक होणे अगदी नैसर्गिक व असमतोल दुर करण्यासाठी आवश्यक आहे.

आतापर्यन्त भारतिय कसे आहेत ते आपण पाहिलेच व सुधारणे किती कठीण आहे ते पण पाहिले.
तरी आता या BB च्या मुळ विशयाकडे वळु या की भारतिय असे का? त्यासाठी थोडा ईतिहास पण पहावा लागेल.

मला वाटत ईतके सहस्त्रक भारतावर आक्रमण, गुलामी, असन्घटीत हिन्दुन्चे अन्तर्गत युद्धे त्यामुळे आलेला न्युनगन्ड व भयगन्ड यामुळे भारताचे सामाजिक जीवन फ़ार बदलले, "मला काय त्याचे" व स्वार्थीपणाची व्रुती बोकाळली. पण अध्यात्मिक ज्योती मात्र सन्त, महात्म्यानी तेवत ठेवली.
परिणाम ईथला नागरिक Personally best but Socially worst म्हणावा असा तयार झाला. याविरुद्ध पाश्चात्य त्यान्चे वैयक्तिक जीवन कसे ही असो पण सामाजिक एकता ठेवुन होते. Personally worst but Socially best असे घडलेत असे वाटते तरी आज सभ्यतेचे दर्शन घडवणारे काही कमी क्रुर नव्हते अमेरिका, ऑस्ट्रेलिया व ईतर ठिकाणी त्यानी स्थानिक लोकान्चा वन्शसन्हार करुन स्वता:च्या वसाहती उभारल्यात जाउ द्या सध्या ही बाजु बाजुला ठेवु या, तसा बराच फ़रक दोन सन्स्क्रुतीमधे दाखवता येईल.

अजुन तुम्हाला काय वाटत ते सान्गा माझा हा अगदीच प्राथमिक विचार आहे.





Bhagya
Monday, December 25, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, च्यायला मते पटलीत.
च्यायला, शेवटचा परिच्छेद अगदी बरोबर. आपण personally best & socially worst हे पण बरोबर. आणि बाकीच्या महासत्तांनी निंदनीय अशी बरीच कृत्ये केलीत, अजूनही करताहेत.

मला इथे एक छोटासा अनुभव अगदी लिहावासा वाटतो. माझे वडील अगदी आजारी होते, आणि आई वयस्क. आम्ही परदेशात. अडचणीच अशा होत्या की आम्ही भेटून गेलो, पण त्यांच्याजवळ राहू शकलो नाही.
वडिलांचे आजारपण अडीच वर्षे चालले. या कालावधीत, आईला सगळ्या शेजार्‍या पाजार्‍यांनी इतकी मदत केली, की आम्ही त्यांचे उतराई होणे कठीण आहे. वेळप्रसंगी आइला डॉ. कडे घेऊन जाणे, बाबांच्या उशाशी बसणे अशा अनेक गोष्टी त्यांनी न कंटाळता केल्या. धोबी, वाणी, न्हावी, medicine shop वाला घरी सगळे आणून देत होते. कोणी म्हणेल की त्यांना पैसे मिळत होते, पण त्यांनी पण अगदी सहृदयतेने, बाबांची विचारपूस करत केले. अशी माणूसकी मला इतके जग फ़िरुनही कुठेही दिसली नाही.

मला तरी असे वाटते, की उगीच नावे ठेवण्यापेक्षा आपण काय होतो हे माहीत असणे आवश्यक आहे- जसे की एक प्राचीन, सधन संस्कृती.
आणि असे का झालो ह्याचा root cause analysis करुन, परत समृद्ध आणि सुंदर कसे होउ शकू याचा विचार करणे आवश्यक आहे.

आपल्या समस्या आहेत हे मान्य, पण ज्या देशाने इतकी परकी आक्रमणे आणि खडतर परिस्थीतीला तोंड दिले, त्याला या समस्या तून बाहेर येणे अशक्य नाही.


Patilchintaman
Monday, December 25, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नर सेवा हीच नारायण सेवा"
हेच महत्वाचे आहे. झक्की & comany ला येथे स्थान कोठून असणार. त्यांना या मातीत घाण आणि उकिरडेच दिसतात. सगळ्या जगाला भारत हाच शेवटचा आधार उरला आहे. हाच देश आता जगाला वाचवू शकेल. अन्यथा कुरापत्या काढून एकेका देशाचा नामोनिशान मिटवायला निघालेल्या अमेरिकेकडून ती आशा नक्कीच कोणी धरणार नाही.

अज्जुकाचे म्हणणे शम्भर टक्के पटले. या bb वर आणखी काही चर्चा करण्यासारखे नाही. झक्की आणि लालभाईंना झगडायपुरते बरं आहे.


Ganeshbehere
Monday, December 25, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर, अज्जुका, भाग्या, पाटिल साहेब,
खुपच छान लिहिलं हो संगळ्यानी...........

Patilchintaman
Monday, December 25, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो आपण एकच करु शकतो. प्रयत्न. भारत आणि भारतीयांमध्ये सुधारणा होण्यासाठी हा एकमेव मार्ग दिसतो. आपल्या देशाबद्दल भक्ती ज्याला आहे त्या सगळ्यांनीच हे प्रयत्न करायचे आहेत.
या कविते प्रमाणे
Lehron se Darkar nauka par nahin hoti,
koshish karne walon ki haar nahin hoti

Nanhi cheenti jab daana lekar chalti hai,
chadhti deewaron par, sau bar phisalti hai.
Man ka vishwas ragon mein saahas bharta hai,
chadhkar girna, girkar chadhna na akharta hai.
Akhir uski mehnat bekar nahin hoti,
koshish karne walon ki haar nahin hoti.

Dubkiyan sindhu mein gotakhor lagata hai,
ja ja kar khali haath lautkar aata hai
Milte nahi sahaj hi moti gehre paani mein,
badhta dugna utsah isi hairani mein.
Muthi uski khali har bar nahin hoti,
koshish karne walon ki haar nahi hoti.

Asaflta ek chunauti hai, ise sweekar karo,
kya kami reh gayi, dekho aur sudhar karo.

Jab tak na safal ho, neend chain ko tyago tum,
Sangharsh ka maidan chhodkar mat bhago tum.
Kuch kiye bina hi jai jaikar nahin hoti,
koshish karne walon ki haar nahin hoti.

- Harivansh Rai Bacchan



Satishmadhekar
Tuesday, December 26, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सगळ्या जगाला भारत हाच शेवटचा आधार उरला आहे. हाच देश आता जगाला वाचवू शकेल.

पाटीलसाहेब, आपल्या भावना समजल्या. परंतु वरील विचार अजिबात पटले नाहीत. भारतावर सध्या चहूबाजूंनी आक्रमणे होत आहेत. पाजीस्तानसारखा एक अत्यंत फालतू देश भारताचे लचके तोडत आहे. आपण भारतातल्या मुस्लिमांची मने दुखवू नयेत, म्हणून कोणतीही कठोर कारवाई करण्याचे टाळत आहोत. चीनचा राजदूत भारताच्या भूमीवर उभा राहून, अरूणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे सांगतो आणि आपले तथाकथित माननीय पंतप्रधान चीनला सडेतोड उत्तर देण्याच्याऐवजी भारतातल्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे सांगत आहेत. चारही बाजूने घुसखोर भारतात घुसून अतिरेकी कृत्ये करत आहेत आणि आपण मात्र "अतिरेकी सुद्धा माणसेच असतात, त्यांना दया दाखविली पाहिजे", असा प्रचार करत आहोत. देशाची सूत्रे एका परकीय महिलेच्या हातात असून, मंत्रिमंडळ गुन्हेगारांनी भरलेले आहे. या देशाची लोकसंख्या भरमसाठ वाढलेली असून सुद्धा प्रचंड वेगाने नवीन मुले जन्माला येत आहेत.

जगाला वाचविण्याचे सध्या राहू देत, भारताला स्वत:ला वाचविता आले तरी पुष्कळ मिळविले म्हणायचे! जो कमकुवत देश स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करू शकत नाही; त्यांना चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण देऊ शकत नाही; जो देश भ्रष्टाचार कमी करू शकत नाही; ज्या देशात गुन्हेगारांना प्रतिष्ठा आहे; ज्या देशाला शेजारची छोटी छोटी राष्ट्रे सुद्धा धूप घालत नाहीत तो जगाला काय आधार देणार?
भावनेच्या भरात वाहून न जाता जरा वस्तुस्थिती समजून घ्या!


Patilchintaman
Tuesday, December 26, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विज्ञान्-तन्त्रज्ञानामुळे कुठे जग सुरक्शीत राहिले आहे? तेव्हा जगात शान्तीचा मन्त्र भारतच देऊ शकतो.
तो मार्ग आहे अध्यात्म. त्या अर्थाने भारत जगाला वाचवू शकेल असे मला म्हणायचे होते. बाकी तुमचं म्हणण बरोबर आहे. आपणच चारही बाजूंनी असुरक्शीत आहोत हे खरे आहे. आपल्याकडे जगाला अध्यात्मच फक्त देण्यासारखे आहे.


Yog
Tuesday, December 26, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

absolutely agree....
सत्त्य हे कटू आहे आणि म्हणूनच बोचते आहे. लाल, हिरवा, भगवा, सगळे नुसतेच "रन्गारी". मूळ मुद्दा राहिला बाजूला. :-(


Patilchintaman
Tuesday, December 26, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग जरा details योग जरा details . अध्यात्मच ना!

Zakki
Wednesday, December 27, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे वर सतिश मढेकर यांना जसा भारत दिसतो, किंवा आजच्या लोकसत्तेत भारताबद्दल जे म्हंटले आहे: 'भारताचा वर्तमानकाळ मात्र भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगारी, जातीयवाद इ. अनेक समस्यांनी झाकोळलेला आहे' तेच आपण निरनिराळ्या शब्दात उगाळत बसलो आहोत.

वास्तविक विषयाशी संबंधित म्हंटले तर सर्व टीकेला इथे एकच उत्तर मी पाहिले, नि त्यात म्हंटले होते, सुधारण्याची जबाबदारी वैयक्तिक रीत्या प्रत्येक व्यक्तिने घेतली पाहिजे. तेच फक्त खरे आहे. तिथेच हा BB संपतो.

बाकी भारताबद्दल बोलताना इतक्या लोकांना भारताचे फक्त दोषच का दिसतात हाहि मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. पण त्यालाहि उपाय एकच नि तो म्हणजे वैयक्तिक जबाबदारी.

बाकी सर्व वितंडवाद!

*Post Edited by Moderator




Chyayla
Wednesday, December 27, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटीलजी एकदम बरोबर मला सुद्धा तेच म्हणायचे आहे की भारत जगाला अध्यात्म देउ शकतो.
देश असुरक्षीत आहे एकदम मान्य, बाहेरुन प्रत्यक्ष शत्रु, आतन्कवादी, तर दुसरीकडे अन्तर्गत नाकर्ते षन्ढ सरकार सोबतीला सेक्युलर पिल्लावळ दोघही देश पोखरुन काढत आहेत. त्यासाठी काही वेडे हिन्दु लढा लढतात आहे दुर्दैवाने तेही आपल्याच देशाला, समाजाला जाग्रुत करण्यासाठी त्याबद्दल आपण नेहमीच बोलत असतो ईथे त्यामुळे विषयान्तर होइल.

स्वामी विवेकानन्दानी भारतिय व पाश्चात्य दोन्ही सन्स्क्रुतीचा चान्गला अभ्यास केला त्यान्चे विचार खरेच पटतात मला त्यान्चे वाचलेले नेमके शब्द नाही आठवत पण मला जसे समजले त्या शब्दात ईथे लिहित आहे.

ते म्हणतात की जर अमेरिकेत ५ जणान्नी मिळुन एक उद्योग सुरु केला तर, शिस्त, नियम, सचोटी, प्रामाणिकपणा याद्वारे ते अल्पावधीतच त्याचा विस्तार करु शकतात तर तेच करायला भारतियाना कित्येक वर्श लागतील. त्याऐवजी जर कुणी म्हटले की एका पायावर उभे राहुन देव मिळतो किन्वा कितिही मुर्ख प्रकार सान्गितला तरी त्याला ५० एक अनुयायी सहज मिळतील.
भारतात तुम्ही खेड्यातही जा कितीही अशिक्षित असो तो भगवन्ताबद्दल नक्कीच बोलु शकतो तर पाश्च्याताना ईश्वर,अध्यात्म वैगेरे सगळ समजण्यापलीकडे आहे त्यान्चा साठी तो एक व्यापार आहे. आजही ईकडे मी चर्च ची व्यावसायिक जाहिरात पहातो तेन्व्हा आश्चर्य वाटत.

शेवटी स्वामी विवेकानन्दान्चा हाच सन्देश आहे की अध्यात्माचा खरा अर्थ व भैतिकवाद याची योग्य सान्गड घालायला आपण विसरलो किन्वा दुर्लक्ष झाले. म्हणुनच एकेकाळी सधन सम्पन्न असलेल्या देशाची ही दुर्दशा झाली कारण आपण आपल्या राष्ट्राचा आत्माच हरवला आहे.
आज गरज आहे भारतियानी पाश्चात्यान्कडुन भौतिकवाद शिकायची व पाश्चात्यानी भारताकडुन अध्यात्म, दोघेही एकामेकाला काही देउ शकतात व एकमेकाला परस्परपुरक आहेत. जर या दोन्ही गोष्टीन्चा योग्य समन्वय झाला तर हे जग नक्किच सुखी होइल.

कदाचित स्वामी अरविन्दानी पण असेच विचार प्रगट केले आहे नक्की नाही माहिती कुणाला माहिती असल्यास सान्गावे.



Ajjuka
Wednesday, December 27, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, आवर! I can't see you stooping to such level. so please!!

जर वैयक्तिक जबाबदारी ह्या मुद्याशी बीबी संपतोय तर मग एवढा वितंडवाद आणि दोन्ही बाजूंनी अतिशय तीव्र शब्दात, प्रसंगी वैयक्तिक पातळीवर उतरून टीका हे का होतेय?


Yog
Wednesday, December 27, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Patil,
I was aggreeing with Satishmadhekar.. (For some reason our posts crossed.) अध्यात्म वगैरे मला कळत नाही आणि स्वताचा वर्तमान सुरक्षित नसताना दुसर्‍याना आपल्या अध्यात्माची काय शिकवण देणार? शिवरायान्च्या वेळी काय वेगळ होत? परकीय आक्रमणे आणि स्वकीय अराजक यात होरपळून निघालेल्या जनतेला अध्यात्म कसलिही मदत करणार नव्हत. शेवटी आई भवानीला साकड घातल अन महाराष्ट्राची पुण्याई थोर म्हणून शिवबा अन त्यान्च्यामागे श्री समर्थ यान्च्या आधारावर हिन्दवी स्वराज्य अस्तित्वात आल. दुर्दैव पहा, शिवबान्पेक्षा कदाचित कणभर जास्त पराक्रमी असलेल्या सम्भाजीला घरच्याच लोकानी दगा दिला अन पुढील औरन्गजेबी इतीहास सर्वज्ञात आहे. मूठभर ब्रिटीशान्नी करोडोन्वर राज्य केल, अन आता मूठभर राजकारणी पुन्हा करोडोन्च्या उरावर नाचत आहेत. जन्मापासून ते मृत्त्यूपर्यन्त प्रत्त्येक गोष्टीच राजकारण तेही भ्रष्ट करून ठेवलय, अगदी तुम्ही म्हणता ते अध्यात्मही त्यातून सुटल नाही. ब्रिटीश तरी बाहेरचे होते, हे आपलेच लोक.
तेव्हा इतिहासातून आपण काहीच शिकत नाही याचीच खन्त आहे. पेशवा, झक्की यान्च्या पोस्ट्स तीव्र, अतीरेकी स्वरूपच्या असतीलही पण हातात मोबाईल, दर मिनिटाला sms पण घरात वीज आणि पाणी नाही (शुद्ध पाणि हा वेगळा विषय आहे) अशी भलतीच विषमता पाहिल्यावर आम्ही जगाला दिशा दाखवणार आहोत असे कुणी म्हटले तर चकित व्हायला होते. असो. शेवटी सुबत्ता, सम्पन्नता, समाधान सर्वच relative किव्वा व्यक्तीसापेक्ष आहे ना? पण
अध्यात्माचा दिवा पेटवून "आपल्याच" बूडाखालचा अन्धार दूर झाला असे आजवर घडलेले नाही. असो. बाकी चालू द्या...


Peshawa
Wednesday, December 27, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अज्जुके मी गप बसतो झाल... पण कधीही paper उघडा india & super power ह्या विशयाची news वाचुन टक्कुर हालत नाही असा एक दिवस सरत नाही... साला सगळा पोरकट्पणा... वर हे "आमची संस्क्रुती आमचा समाज" ह्याच्या टिमक्या मग शिवजी असे होते नी द्यनेश्वर तसे होते नी हे आम्ही शोधल आणि हे आम्ही केल... हे ऐकायच. ह्यातल आम्ही म्हणजे शेकड्यात १०१% आमचे पुर्वज पण ह्याच भान नाही नव काही करायची कुवत नाही... गेल्या १०० वर्शात भारताने केलल योगदान काय? शुन्य! गल्ली सांभळता येत नाही पण इकडे bush महाशयांच पोट बिघडल तर त्यांनी असा वारा का सोडला ह्यावर कलकत्त बंद ह्या असल्या अकला!

जे लोक योगदान द्यायला तयार आहेत त्यांनाच हिणवण्याचे पुरुशार्थ वर गोष्टि सांगणार त्या रामाच्या सेतु निर्माणातील खारिच्या! मग बये तु सांग स्टुपू नये तर काय करू? ह्यानी कमरेच काढुन डोक्याला गुंडाळलय मी म्हटल साला आपल्याला तर ते डोक पण नाय मग ते गुंडाळण्याचे कष्टा तरी का करा? ... असो मे गप बसतो आता!

बकी "आम्हि" असेच :-)
अर्ध्या हळकुंडाने पिवळे... कारण आमचा देशही असाच... त्याला काहीच इलाज नाही



Satishmadhekar
Wednesday, December 27, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,

हुकूमशाहीने आणि सक्तीने काही प्रश्न, काही प्रमाणात सुटू शकतील असे मला वाटते.

उदा. बॅंड, पानपट्टीच्या टपर्‍या, फटाक्यांचे उत्पादन ईं.वर बंदी घातली तर स्वच्छतेचे आणि प्रदुषणाचे प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतील. १९७५ मध्ये आणिबाणीच्या काळात सरकारी कर्मचारी वेळेवर कामाला जात होते म्हणे! हा तर हुकूमशाहीचाच चांगला परिणाम!

त्याचप्रमाणे कर चुकविणार्‍यांना, वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना, लाच घेणार्‍यांना कठोर शिक्षा केली तरच या वाईट गोष्टींचे प्रमाण कमी होईल. पण हे करणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी?

प्रत्येकाने स्वत:ला सुधारावे असे म्हणणे खूप सोपे आहे, परंतु याची अंमलबजावणी करणे अत्यंत अवघड आहे. मुळात भारतीयांना आपले काही चुकत आहे हेच मान्य नाही, मग ते स्वत:त कसा बदल घडवून आणणार?

एखाद्या वर्गात मुले खूप दंगा करत असतील, तर शिक्षकांनाच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यांना प्रेमाने समजावून किंवा प्रसंगी शिक्षा करून शिक्षक सुधारणा घडवून आणू शकतात. परंतु मुले स्वत:हून सुधारण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्याचप्रमाणे भारतीयांना एखाद्या कडक हेडमास्तरची गरज आहे!


Laalbhai
Wednesday, December 27, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*Post Edited by Moderator
भारत म्हणजे लाल logic आणि कलकत्ता ह्याव्यतिरिक्त त्यांना दुसरे काहीही दिसत नाही. त्यामुळे कम्युनिझम आणि कम्युनिस्टांना शिव्या देण्याच्या नादात ते संपूर्ण भारताला शिव्या देण्याचा आततायीपणा करत आहेत! पण नुसती वर्तमानपत्रे वाचून मते बनवणार्‍या लोकांना स्वतःचा आततायीपणा कसा कळायचा? असो.

:-)

Laalbhai
Wednesday, December 27, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही बाजूंनी अतिशय तीव्र शब्दात, प्रसंगी वैयक्तिक पातळीवर उतरून टीका हे का होतेय?


>>>

अज्जुका, तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापरिने मी देण्याचा प्रयत्न करतो.

प्रस्तुत वादात मी अतिशय सभ्यपणे, संसदिय शब्द वापरून सुरवात केली होती. माझे पहिले पोस्ट पहावे. Wednesday, December 13, 2006 - 9:58 am: झक्कींचे काही शब्द आणि वाक्ये मला खटकली त्याचा मी अतिशय संयमित स्वरूपात विरोध केला होता. पुढे आमचा वाद चालू असताना, (दुसरे बाजीराव) पेशवे अवतरले. आणि वादाची जागा भांडणाने घेतली!

मी जेंव्हापासून राखीव जागांबद्दल माझी मते व्यक्त केली तेंव्हापासून (दुसरे बाजीराव) पेशवे माझ्यावर खार खाऊनच आहेत. मी जिथे जिथे काही बोलेल, तिथे तिथे येऊन मी म्हणेल त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणे, ह्यात त्यांनी त्यांचा बराचसा वेळ दवडलेला आहे. ताजे उदाहरण म्हणजे "भालजींचा स्टुडिओ" विषयावरची त्यांची मुक्ताफळे! त्यांच्या दुर्दैवाने, मी कुठेही वादासाठी वाद घालत नसल्याने ते प्रत्येक ठिकाणी उताणे पडले! ( multiple id ह्या विषयावरही मला "हरवण्याचा" त्यांचा प्रयत्न असाच अपयशी ठरला.)

मी विचारांनी कम्युनिस्ट आहे, पण इतरांसारखी माझी विचारधारा इतरांवर थोपवण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. पण का कुणास ठाऊन (दुसरे बाजीराव) पेशवे यांचा मी कम्युनिस्ट आहे, म्हणून फारच जळफळाट होतो. त्यांनी मला मेल पाठवऊन मी "कम्युनिस्ट का आहे?" असा मूर्ख प्रश्न विचारला होता. त्यात जिज्ञासा असती तर मी त्यांना सविस्तर उत्तर दिलेली असते, पण मेलमधेही मला खिजवण्याच्या आविर्भावात त्यांनी विचारले. त्यांचे शब्द होते .. bakI tumachyaa laal chaDdichaa itihaas (mhanjI personal e-stroty) aikaayalaa jaroor aawaDel... kaay aawaDala itaka hyaa ism madhala ki shuddha nirpeksha shodhaachyaa naaMgyaa moDuna meMdharu whaawase waaTale tumhaalaa?

आता असल्या प्रश्नांना कोण उत्तर देणार? तेंव्हा मीही curtly उत्तर देऊन त्यांच्याशी मेलमार्फत संवाद थांबवला. हा कदाचित त्यांनी त्यांचा वैयक्तिक अपमान समजला असावा.

वरील वादात माझा (आणि तुमचाही) मुद्दा अतिशय सरळ आहे की भारत देशात समाज म्हणून अनेक दोष आहेत, त्याचे विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण "भिकारी, निकम्मा, रद्दड डोकी" असले शब्द वापरून संपूर्ण देशाला अपमानित करण्याचा कुणालाही हक्क नाही. भावनेच्या ओघात तसे झाल्यास शब्द परत घेता येतात. पण झक्की आणि (दुसरे बाजीराव) पेशवे ह्यांनी स्वतःची चूक लक्षात न घेता "आमचेच खरे" ह्या सुरात वाद चालू ठेवला.

वर मी जी भुमिका घेतली (किंवा ज्या भुमिका वारंवार घेतो) त्या holier than thou आविर्भावाच्या असतात, असा एक आरोप दुसर्‍या बाजीरावांनी मेलमधून केला होता. आता माझ्या प्रस्तुत वादात किंवा इतरत्रही कुणाला हेतूपूर्वक खिजवण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही.

पण मी वादासाठी वाद घालत नाही, त्यामुळे आपले दुसरे बाजीराव, जे मुख्यतः वादासाठीच वाद घालतात, त्यांना माझ्यावर कुरघोडी करणे कधी जमले नाही. (कुरघोडी करणे जमले नाही म्हणून कुरापती काढणे सुरु आहे. बाजीरावांनी ह्या विषयावर जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती कोणताही balanced मनुष्य बोलू शकणार नाही.)

ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे बाजीराव माझा व्यक्तीगत द्वेष करायला लागले. आणि लालभाईला शिव्या द्यायच्या म्हणजे संपूर्ण कम्युनिझमला शिव्या द्यायच्या, संपूर्ण समाजाला शिव्या द्यायच्या, संपूर्ण देशाला शिव्या द्यायच्या.. असा त्यांनी ग्रह करून घेतला.

वैयक्तिक वादाची पार्श्वभूमी ही अशी आहे. वैचारिक मतभेदांचे रुपांतर बाजीरावांनी व्यक्तीद्वेशात कसे केले, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.


Laalbhai
Wednesday, December 27, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वास्तविक कम्युनिझमचा पराकोटीचा द्वेष कराणार्‍या ९९.९९ % लोकांना मार्क्सने Das Kapital मधे भांदवलवादाचे जे analysis केले त्यातले ५ मुद्दे सलग खोडून काढता येणार नाहीत. पण आपल्याकडे राष्ट्रभक्ती "दाखवणे" म्हणजे कम्युनिझमचा द्वेश करणारी मुक्ताफळे उधळणे, असे समिकरण झालेले आहे. त्यातून सध्याचे राजकारण द्वेशावर पोसले जात असल्याने कम्युनिझम आणि कम्युनिस्टांचा द्वेश करणे ही in-thing बाब झालेली आहे.

असो. ह्याने व्यक्तीगत मला काही फरक पडत नाही. कुणी मायबोलीवर कमुन्यिझमवर टिका करणारे लेख लिहिले म्हणून त्याला बाधा येत नाही.किंवा मी कम्युनिझम कसा चांगला हे लिहिल्याने त्याची व्याप्ती वाढत नाही.

वैचारिक मतभेदाचे रुपांतर व्यक्तीद्वेशात कसे होते, ह्याचे हे उदाहरण आहे, इतकाच ह्याचा परिपाक!


Zakki
Wednesday, December 27, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुकुमशाहीने नि सक्तिने प्रश्न थोड्या वेळापुरते सुटतात.
लोकशाहीच खरी. भारतीयांनी गेली ५९ वर्षांहून अधिक वेळ लोकशाही अनुभवली आहे. आता हुकुमशाही चालणार नाही.

भारताला कुणा चांगल्या नेत्याची गरज आहे. पण आजकाल सगळेच (सगळ्या जगात) राजकारणी किंवा स्वार्थी! काही सन्माननीय, (अगदी थोडे) अपवाद सोडले तर. शिवाय भारतीय लोक स्वाभिमानी. बरेचदा केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करणार. दुसर्‍या कुणाचे गुण कबूल करायला कुणिच तयार नाही. तेंव्हा माझे सासरे म्हणत त्याप्रमाणे 'मोठी कठिण परिस्थिती आहे'.

एक नक्की चालेल असा उपाय म्हणजे जेंव्हा सर्व जण आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखतील तेंव्हाच. पण ते बोलणे सोपे आहे, करणे कठिण.




Laalbhai
Wednesday, December 27, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या १०० वर्शात भारताने केलल योगदान काय? शुन्य! गल्ली सांभळता येत नाही पण

>>>

पूर्वग्रह सोडून या प्रश्नाकडे बघायचे ठरवले आणि "नेहरुपुरस्कृत अलिप्ततावादी चळवळ" याशिवाय बाकी काय योगदान आहे, ह्याचे पुरावे शोधायचे ठरवले.

फार काही नाही, गूगलवर सर्च दिला India's contribution to the world in last 100 years आणि खालची लिंक मिळाली.

http://www.stephen-knapp.com/indian_contributions_to_american_progress.htm

ह्यात बरीच वाढ झाली असण्याची शक्यता आहे.

१. ह्याशिवाय "कुणाच्याही मदतीशिवाय" पुण्याच्या CDAC ने परम हा महासंगणक बनवलाय. जो की अमेरिकेच्या deep blue च्या तोडीस तोड आहे.

२. "बचत" "सहकार योजना" ह्या संकल्पनाच भारतीय आहेत.

३. nuclear power असलो तरी जगातली "सगळी" nuclear weapons नष्ट करावीत, असा आग्रह आपण उरवातीपासूनच धरला आहे. त्यामुळेच अणूप्रसार रोखण्याच्या करारावर आपण अजुनही सही केलेली नाही. जागतिक शांततेचा आणि सहयोगाचा पुरस्कार करण्याच्या वचनाशी सुसंबद्ध भुमिका आहे ही.

४. इतके धर्म, पंथ, जात, प्रांत असूनही यशस्वी लोकशाही व्यवस्था दुसरी नाही.

५. आपल्याच बरोबर जन्मलेल्या अनेक राष्ट्रांपैकी प्रगतीच्या बाबतीत आपला नंबर बराच वरचा लागतो. (पहिला नाही हे मान्य. पण आपण लोकशाहीही टिकवली आहे.) हे अनेक राष्ट्रांसाठी मार्गदर्शक आहे.

--------------------------------------------

ह्याचा अर्थ असा नाही की सर्व काही आलबेल आहे. खुप सुधारणेची आवश्यकता आहेच. पण अमेरिकेची प्रत्येक बाबतीत तुलना करत "आपण कित्ती वाईट" ह्याचे रडगाणे गाणार्‍यांची चीडच यायला लागली आहे.

का आणि कसा येतो इतका न्युनगंड हा मानसशास्त्रिय अभ्यासाचा भाग होईल. :-) तुम्ही कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार करता आणि द्वेश करता यावर तुम्ही काय योगदान देऊ शकता, हे अवलंबून नसते. तर तुमची मानसिकता कशी आहे, यावर तुमचे योगदान अवलंबून असते. मानसिकताच जर वरच्या लोकांSआरखी पराभूताची असेल, तर कसले योगदान देणार ही लोकं? फक्त चूका काढत बसण्याचा छिद्रान्वेषीपणा करणार झाले! मग ते गल्लीत असोत नाहीतर दिल्लीत. :-)




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators