Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 16, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Bhalajee studio .... » Archive through December 16, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Friday, December 08, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> अर्थात, व्यक्तीगत इछा आक्षांक्षा पूर्ण करताना आलेल्या frustration मुळे "व्यापक" विचारक्षमतेवर परिणाम झाला असेल तर कोण काय करणार?
अहो लालभाई, माझ काय व्यक्तिगत आयुष्य तुम्हाला माहित आहे हो? काहीच नाही
म्हणजेच तुम्ही माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काडीचीही माहिती नसताना, (मी केवळ बामण हे येवढच माहीत असेल असल तर अन वरल्या पोस्ट मधिल काही उल्लेख जे त्या आधीच्या सन्दर्भात केलेत की का मला माझी जात "टाकुन" देता येत नाही), "काही एक" "गृहीत" मनाशी धरुन मला व्यक्तिगत रित्या "फ्रस्टेटेड" कशावरुन धरता? गोड मधाळ भाषेतही, हा एक प्रकारचा व्यक्तिगत आरोप किन्वा हेटाळणीच नाही का? काळजी घ्या पोस्टताना! :-) आणि "मी तुमच नाव घेवुन ते वाक्य लिहिल नाही हे, त्याचा सन्दर्भ वेगळा हे" असल भन्कस स्पष्टीकरण देवु नका प्लिज! (नावानिशी लिहिल असतत तरी मी चिडायच नाही अस ठरवल की "आकाशीचा बापही" मला चिडवु शकणार नाही, त्यामुळे तुमचे वाक्य हलकेच गम्मतीत घेतो हे, ही पोस्ट केवळ विरोधाभास दाखविण्यासाठी.... श्श्याऽऽऽ, हल्ली हल्लीच ही केवढी लाम्बलचक स्पष्टीकरणे द्यावी लागतात ना? पुर्वी आमच्या वेळी नव्हत हो असल काही हितगुजवर!)
(जाओ जाओ, फ्रस्टेटेड होयेन्गे मेरे दुष्मन! DDD
अब जाओ और खुशीसे घर जाके चैनकी निन्द लेओ, चलो हमने तुम्हे कर दिया "क्षमा" !
कभी कभी पोस्टनेके गडबडिमे ऐसाभी होता है, चलता है! समझते है हम भी!:-)


Laalbhai
Friday, December 08, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय निघालाच आहे म्हणून काही लिहितो. पटले नाही तर सोडून द्या.

शहरातल्या अशा मोक्याच्या जागा बळकावून त्यावर apartments/malls करण्याची फशनच आलेली आहे. BJ महाविद्यालयाचे पटांगण व्यापून त्यावर बिल्डिंगा उभारण्याचा प्रस्ताव आहे, असे कळते. (कालच बातमी होती.)

नेहरु स्टेडिअम सारखे मैदानही हलवणार, अशी लिंबूटिंबू यांची बातमी आहे.

मला वाटते देशाचे सगळी सुत्रेच मद्दड आणि कमी बुद्धीमत्तेच्या लोकांकडे गेलेली आहेत. त्यातून ही लोकं कमालीची स्वार्थी निपजलेली आहेत. हे समिकरण तर फारच घातक आहे. विकास विकास अशी बोंब मारत किती धिंगाणा घालायचा ह्याला काहीही मर्यादाच नाहीये.

मोठी पटांगणे शहराच्या मध्यवर्ती असणे हे शहराच्या प्रकृतीसाठी चांगले असते, हे सांगायला काय शास्त्रज्ञ लागतो? मुंबईमधे अतिक्रमणाने मिठी नदीची वाट लावली, शेकडो माणसे मेली. (हे आपले पुन्हा पुन्हा उगाळायचे!)

असमतोल विकास आणि पर्यावरणाची हानी करणारी शहराची पुनर्रचना, ह्याचे मोल एक ना एक दिवस आपणास द्यावे लागणार आहे, हे जेंव्हा कळेल तो सुदिन! मुम्बई मधे ह्याची झलक दिसलेलीच आहे.

त्यामुळे जिथे मोकळी जागा तिथे मोठी बिल्डिंग, असे जे खाबू लोकांचे सूत्र आहे, केवळ त्याला विरोध म्हणून भालजींच्या studio चे mall अथवा apartment मधे conversion करण्याला माझा विरोध आहे. ती जागा कायद्याने कुणाच्याही मालकीची असो, वेळ पडल्यास बळाचा वापर करून हे अनैतिक कृत्य थांबवले पाहिजे.

हे कवेळ studio बाबतच नाही तर प्रत्येक मोकळ्या जागेवर इमारती चढवण्याच्या कृत्याबाबत माझे असेच मत आहे. इथे कोणत्याही शहरात पाणी नाही, रस्ते नाही, शुद्ध हवा नाही. रोजच्या रोज रस्त्यांवरच्या अप्घातात शेकडो माणसे मरताहेत. १० किलोमिटरचे अंतर पार करायला किमान एक तास (कोठूनही कसेही मोजा!)लागतो! अरे, हे शहरीकरण नाही तर बकालीकरण आहे, हे कुणालाच कसे कळत नाही?

प्रत्येक शहाण्या माणसाने शहरे आणखी फुगवण्याच्या ह्या अनैतिक कृत्याला विरोध करावा, अशी माझी विनंती आहे.



Laalbhai
Friday, December 08, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well, you believe it or not, it was not personal!

मी जो काही समाजात मिसळतो आणि लोकांची एकंदरितच जातीविषयी जी काही मते आहेत (जी मला माहिती आहेत), ते पाहूनच माझे असे मत झालेले आहे.

विषय वाढवायचा नाही पण "आम्हाला अमुक अमुक इतके मार्क मिळूनही हव्या त्या कॉलेजात जाता येत नाही" म्हणून सगळे सवर्णेतर नालायक आहेत, असा सार्वत्रिक समज आहे, त्याला उद्देशून मी म्हणालो होतो. दुर्दैवाने, असा समज करून घेताना "दुसरी बाजू" पहाण्याचे कष्ट घेण्याचे कोणालाही सुचत नाही.


Rest, I can not help. I did not ask for apology. :-)

जात ह्या विषयावर ह्या BB वर मी आता लिहिणार नाही.

Laalbhai
Friday, December 08, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कभी कभी पोस्टनेके गडबडिमे ऐसाभी होता है, चलता है! समझते है हम भी!

>>>

हा जो माझ्याबद्दल समजूतदारपना दाखवताय तो अखिल समाजाबद्दलच दाखवला, ठेवला तर फारच मोठा फरक पडेल. शेवटी कुठेही जा, उडदामाजी काळे गोरे असायचेच. संपूर्ण जातीला लेबले न लावायण्याचा समजूतदारपणा दाखवलात तर मीच तुमचा आजन्म उपकृत राहीन. :-)

Santu
Friday, December 08, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तस कायदेशीर पणे लताबाईंच बरोबर आहे.
पण त्यांनी स्वत: मोठे पणा दाखवुन त्यात व्यवहार न पाहता.त्याचे उचीत स्मारक होईल हे पाहावे. मंगेशकर घराण्या साठि भालजी नी भालजीनी पण (लताबाईंच्या वाईट काळात)बरिच मदत केली होते.

भालजी हे सीनेमा जगतातिल वेगळेच रसायन होते.एकदा रुबि मायर्स उशिरा आली म्हणुन जवळ जवळ पुर्ण होत आलेला सिनेमा रद्द करायला निघाले होते.प्रुथ्विराज कपूर सारखा दिग्गज नट सुध्दा त्याना दबकुन असे.

भालजी चा आधार नसता तर दादा कोन्डके पण विच्छा..... नंतर थांबले असते.

भालजिंचा आणखी एक पैलु म्हणजे ते हिन्दु महासभे चे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते.कट्टर हिन्दुत्व्वादि होते.
तसेच त्यांचे भगतसिन्ग व आझाद यांच्याशी
संबन्ध होते.


Asami
Friday, December 08, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

की शेवटी मोक्याच्या ठिकाणावर लताजीन्च्या ताब्यात असलेल्या जागेच्या तुकड्याचा कुणाला मोह झाला हे असे समजले तर चूक काय?
>>
लिंब्या हे फ़क्त ब्र्हमसत्य. पण ह्यात लताच्या जातीचा काय संबंध ? सगळे समाजकारण फक्त जातीवर चालते हे तात्पुरते मान्य करुनही भालजी आणी लता ह्यांची जात इथे का आणतोयस ? २७ % reservation etc सगळे तुझ्या post मधले बरोबर असले तरी त्याचा इथे काय संबंध ? तुला काही अधिक माहिती आहे का जी बाकी कोणालाच माहित नाहि ? तसे नसेल तर उगाच आत्याबाईला मिशा असत्या तरचा प्रकार कशाला ?

मी तरी तुला का विचारतोय देव जाणे. बाकी कुजबुज तर वाचलेले दिस्तेच आहेस :-)



Peshawa
Friday, December 08, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाइ हा खालचा para सोडला तर तुमच्या post शी सहमत

त्यामुळे जिथे मोकळी जागा तिथे मोठी बिल्डिंग, असे जे खाबू लोकांचे सूत्र आहे, केवळ त्याला विरोध म्हणून भालजींच्या studio चे mall अथवा apartment मधे conversion करण्याला माझा विरोध आहे. ती जागा कायद्याने कुणाच्याही मालकीची असो, वेळ पडल्यास बळाचा वापर करून हे अनैतिक कृत्य थांबवले पाहिजे.


नक्किच भालजी हे मरठी चित्रपटातले एक पर्व आहे. ते जपायला हवे पण ज्यानी जमिन लताला विकलि त्यानि हा विचार केला नाही असे का? त्यावेळि शासन झोपले होते? लोक झोपले होते? खरच अस अक्शम्य दुर्लक्ष कस होउ शकत? सन्तू आता लताबाइना सुबुद्धी येओ हिच सदिछा!

कायद्याने मालकीची जागेवर कोणि काय करावे हा ज्याचा त्याचा प्रष्ण... कायद्यालाच मानायचे नसेल तर ती गोष्ट वेगळी... लताबाइनी ह्या studio ची वाट लवू नये असे वाटत असेल तर तो studio विकत घ्या.. सरकारला सांगून त्याना योग्य मोबदला देऊन विकत घ्यायला सांगा... त्या नाहि म्हणाल्या तर मग court आहेच अणि तरि नाहीच झाले तर डावे उजवे आंदोलक आहेचेत! आमरण उपोशण करणारे(र्या) नेत्या आहेत, bookar waale तोंडाचे ढोल आहेत... झालेच तर दन्गे करा, माल्मत्त जाळा बंद घाला, लताचा चेहरा डाम्बराने काळा करा... issue मह्त्वाचा बकी भलजीम्चे सगळे pictures भले बघायला मिळायची मारामार! ... पण issue महत्वाचा! नैतिकता मह्त्वाची! ते(डावे नाही हो भालजी ) वापरत असलेला पंचा, धोतर चश्मा, सगळे कुणाकडे असेल हे पण शोधायला हवे....

सरकारने गेल्या पन्नसेक वर्शात व पुढच्या पनास एक वर्शात जे जे लोक अविस्मरणिय काम करून गेले जाणार असे वाटतय त्या सगळ्यांची स्थवर मालमता वाली असेल / नसेल तरी ताब्यात घ्यावी व त्यांची स्म्रुति मण्दिरे बांधवि * ना रहेगा बास न बजेगी बंसुरी! इतिहासाची धोंड झाली आहे कुठेही मान सोडत नाही!

लिंबाभाव असामी म्हणतो तसे जातीचा काय संबंध? तुला आतली माहीति असेल तर जरा कळुदे की!

* अज्जुके आजपासुनच घरातल सगळ जपून ठेव ग... तु जाशील तर तुझ्यामगे ह्याच गोष्टिवर महराश्ट्रात युद्धे होतिल... हा आपला माझा तुझ्या वरचा विश्वास हो!




Limbutimbu
Saturday, December 09, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी आणि पेशवा, स्वतन्त्र बीबी वर, जेव्हा जमेल तेव्हा, जातीन्चाच सम्बन्ध जिथे तिथे कसा येतो ते विशद करिन!
सन्तू पेशवा, पटल
लालभाई, शहरान्च्या बकालीकरणाची पोस्ट पटली, अर्थात एक्सेप्ट, त्यात भालजीन्चा स्टुडिओ न घुसडता!
परवा सहज आठवल, फार पुर्वीन्चा एक B&W सिनेमा होता ज्यात इन्स्पेक्टर, हिरोचा (दोघात कोण तरी एक बहुदा बलराज)पाठलाग करत असतो, ते करताना ते भुमिगत गटारातुन जातात!
इन्ग्रजान्च्या काळातली ही गटार सिस्तीम आज कुठ हे बरे? एनिवे तो विषय नाही
पण विषय निघालाच तर पेडर रोडच्या पुलाला विरोध का बर असावा याचा विचार दुसर्‍या बाजुने कुणि केला हे?
रेक्लमेशन एरिया विकसित करताना येणार्‍या वहातुकीच्या ताणाच, पार्किन्गच कसलच नियोजन कुणालाच सुचल नाही? का? आणि आत्ता पुण्यात जे सुचत हे ते बी. आर. टी च्या भोन्गळ रुपात आम्ही बघतोच हे! असे असन्ख्य प्रश्ण असताना, नेमके वेचक वेचक अन दिल खेचक "लताजिन्च्या" ताब्यातील "भालजिन्च्या" स्टुडिओचेच विषय सर्वदूर कसे काय प्रसारीत केले जातात? असे कितिक विषय हेत याचा डाटाबेस याक्षणी माझ्याकडे तयार नाही, पण मी तो जरुर तयार करीन वा तयार रुपात मिळविन.
पेशवा, आतली वगैरे अशी काही माहिती मला तरी नाही. तरीही, माझ्या कडे सन्दर्भान्चा डाटाबेस जसा कधी तयार होईल, वा कुणि केलेला मला तयार मिळेल, तर महाराष्ट्राच गेल्या पन्नास आणि येत्या पन्नास वर्षातील राजकारण कस होत व असेल यावर नक्कीच भाष्य करु इच्छिन! थोडी वाट बघा!


Asami
Saturday, December 09, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर , मला तोच प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारू दे. समजा असे मान्य करू कि भ्रष्ट राजकारणी , नोकरशहा नी industrialist ह्यांनी संगनमत करून जातीपातीचा मुद्दा वापरत अहेत , पण भालजींचे स्मारक होणे ( कुठल्या स्वरूपामधे हा प्रश्न अलहिदा ) तुला का चूकीचे वाटतेय ?

Laalbhai
Monday, December 11, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा खालचा para सोडला तर

>>

खरंय, माझे मलाच ते फारसे पटले नाही नंतर पण लिहिण्याच्या ओघात लिहून गेलो.


ज्यानी जमिन लताला विकलि त्यानि हा विचार केला नाही असे का? त्यावेळि शासन झोपले होते? लोक झोपले होते? खरच अस अक्शम्य दुर्लक्ष कस होउ शकत?

>>>>

मला माहिती असलेला इतिहास असा की भालजी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत असताना लताबाईंनी त्यांना आर्थिक मदत केली. त्याबदल्यात लताबाईंनी हा studio स्वतःच्या नावावर करून घेतला.

ह्या व्यवहारात तसे काहीही चूक नाही. परस्परांचा आपापसातला व्यवहार आहे. त्यामुळे कुणी झोपले असण्याचा प्रश्न नाही.

पण आता इतक्या वरषानंतर भालजी त्यांच्या चित्रपटाच्या योगदानासाठी जेंव्हा legend ह्या सदरात मोडतात, तेंव्हा त्यांनी जिथे जिथे चित्र निर्मिती केली त्या जागा जपल्या तर बिघडले कुठे? तिथल्या अनेक जागी चित्रपट निर्मितीचा रोमांचकारी इतिहास असू शकतो. झपाटलेल्या लोकांच्या वेडेपणाने अपूर्या साधनांनी कशी अभिजात निर्मिती होऊ शकते, ह्याची साक्ष तिथे मिळू शकते. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकते.

hollywood ने काही केले की त्याचे भरभरून कौतून करायचे, मग आपला इतिहासही तितकाच गौरवशाली असताना तो जपायचा का नाही? (की फक्त इतिहसाचे दाखले मतं cash करायला वापरायचे?)

आणि लताबाई ह्या कुणी अजाण नाहीत. त्यांचे अवघे आयुष्य मराठी चित्रपटसृष्टीचे बरे वाईट दिवस पहाण्यात गेले आहे. मग अशावेळेस त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काय चूक आहे?

बर, असेही नाही की त्यांना ती जागा कुणी फुकट मागतेय. मुख्यमंत्री विलासरावांनी स्वतः फोन करून त्यांना योग्य बाजारभाव देतोअसे सांगितले होते. तरीही लताबाईंकडून काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळी सरकारने त्यांच्याकडून करायचे होते ते करून झालेले आहे. कायद्याने जागा मेंगेशकरांच्या मालकीची असल्याने सरकारला कोणतीही बळजबरी करता येत नाहीये. जनमताचा दबाव हा एकच उपाय आहे.

(चीनची कम्युनिस्ट राजवट इथे उपयोगी पडली असती. :-) ~D )


बरं का पेशवे, पैशाचा लोभ हाही एक "माणूस" पणाचा नमुना आहे, हे तुम्हालाही माहिती असेलच. :-)



Santu
Monday, December 11, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पैश्याचा लोभ असणे यात गैर काय?
फ़क्त योग्य मार्गाने मिळवावा एवढेच
सगळ्यानी "समाजसेवा" करावि असा हेका धरण्यात काय अर्थ आहे


Vinaydesai
Monday, December 11, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या स्टुडियोच्या जागेचा इतिहास वाचायचा असेल तर 'दादा कोंडके' यांचं आत्मचरित्र वाचणं आवश्यक आहे...
(वरती कुणीतरी याचा उल्लेख केलेला आहेच).




Peshawa
Monday, December 11, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> बरं का पेशवे, पैशाचा लोभ हाही एक "माणूस" पणाचा नमुना आहे, हे तुम्हालाही माहिती असेलच.

पैशाचा का कसलाहि लोभ हा माणुस पणाचानमुना आहेच की! तुम्हि इतीहास जपायचा जो आग्रह करताय तोही एक्प्रकारचा लोभच आहे! लताला जमिन हवी आहे आणि त्यावर त्याना apartments उभारायच्या आहेत. ह्यात काहिहि चूक नाही...

studio वाचवायचा असेल तर तो तिकडुन हलवून दुसरीकडे उभारता येइल... (मस्तानी महाला सारखा) ... त्या करता cummmunist राजवट हवी होती म्हणणे म्हणजे...

असो मुर्खपणा हा पण "माणुस" पणाचाच नमुना आहे. हे तुम्हाला इतक्या वर्शाच्या सरावाने आत्मगत असेलच ... :-)


Laalbhai
Wednesday, December 13, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षांचा नाही पण इतके दिवस तुमच्याशी बोलतोय त्यामुळे गेल्या काही दिवसात चांगलेच कळले आहे. :-)

studio हलवला की त्या जागेचा इतिहासही एका जागेवरून दुसरी कडे हलवता येईल का? उद्या अजिंठा वेरुळच्या लेण्या दुसरीकडे हलवून तिथे apartments करा म्हणाल. वादासाठी वाद तुम्ही नेहमीच घालता. पण मुद्दा तरी मांडा की नीट! :-)


Peshawa
Wednesday, December 13, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मी केवळ निमित्त मात्र ... तुम्हाला तुमचे रुप कळो आले हयातच पामरास आनंद आहे :-)

>>>studio हलवला की त्या जागेचा इतिहासही एका जागेवरून दुसरी कडे हलवता येईल का? उद्या अजिंठा वेरुळच्या लेण्या....

you disappoint me ... तरि प्रयत्न करतो ...

१. तो studio हा कलात्मक रचनाशात्राचा आविश्कार नाही त्यामुळे आजुबाजुची "जागा" व तो ज्यावर उभा आहे ती जागा ह्यालाही फ़रसे महत्व नाही (अर्थात politics नसेल तर)

२. त्यामुळे त्याला एकत्र जसा तो अत्ता आहे तसा पुन्हा दुरीकडे उभारणे तुलनात्मक दृश्ट्या सोपे आहे... तो studio वापरात आहे की नाही मला माहीत नाही त्यामुळे ते भलजीचे स्मरक ह्याच अर्थी असणे अपेक्षित आहे. जर तो वापरात असावा असे वाटत असेल तर त्याला अधुनिक बनवणे आले म्हणजे इतिहासाची मोडतोड करणे अपरिहार्यच आहे...

३. त्या जागेला त्या studio मुळे इतिहास आहे. तो studio आणि त्याच्याशि सलग्न असलेल्या गोष्टि जिथे हलवल्या जातील त्या जागेतही तोच इतिहास उभा राहील असे वाटते (शिवाजीची तलवार england मधे असलि काय किंवा विजय मल्ल्यच्या घरी तीचा इतीहास ती स्वत:बरोबर घेउन जाते)

आता "जागेचा इतीहास" आणि भलजीम्चा studio ह्याचे नाते स्पष्ट करा म्ह्णजे म्या अल्पमतीलाही कळण्यास मदत होइल...म्हण्जे भालजि ह्या झाडाखाली बसायचे... ह्य दगडावर त्यानी पाय दिला असे का :-)

Lopamudraa
Thursday, December 14, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यानी "समाजसेवा" करावि असा हेका धरण्यात काय अर्थ आहे>>... अगदी.. काहितरीच काय लोक पण ना.. आणि इथले id पण..कायीतरीच अपेक्षा राव तुमची
जसे.. आडानाव वेगळच कृती वेगळीच अशे नेभळट आहेत की इथे ( आपल्या जातभाईचे नाव घे आणी उधळ ना काय उधळायची ती मुक्ताफ़ळे.. ती हिम्मत नाही .)..
निरथक poSt टाकणार्‍या.. (अ)विचारि लोकांकडुन कडुन ( btw काही वाचुन येतो म्हणला आणि कुठे गायबला तो विचारी दुसर्‍या id ने लिहितोय वाट्टे आजकाल
त्यांच्याकडुन आम्ही ठेवतु का चांगल्या post ची अपेक्षा..
आणि बामणी लताबाई बाई लिंबुटिंबु मला वाटत होत तुम्ही जरा बरे आहात लिखाणात( अगदी तुमच्या काही अविचारी post वाचुनही माझे हे आजपर्यन्तचे मत होते)तुम्ही त्या संतु च्या लायनीतले निघालात शेवटी.. शिव शिव शिव...
अज्जुका आणी टुलिप ला.ऽनुमोदन...
btw बामनी लताबाइंची गाणी ती बामण म्हणुन कोणि ऐकत नायी वाट्टे आणी भालजी ंची जात कोणती (खरच माहित नाही म्हणुन विचारते)..


Ajjuka
Thursday, December 14, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं लोपे.. तेही बामणच होते.
पण मला एवढा वरचा काथ्याकूट वाचूनही बामणीपणाचा आणि स्टुडीओ चा संबंध कळला नाही. कुणी समजावून सांगेल काय!
बाकी तुमचं चालू द्या..


Ajjuka
Thursday, December 14, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* अज्जुके आजपासुनच घरातल सगळ जपून ठेव ग... तु जाशील तर तुझ्यामगे ह्याच गोष्टिवर महराश्ट्रात युद्धे होतिल... हा आपला माझा तुझ्या वरचा विश्वास हो!

जया, विश्वासाबद्दल धन्यवाद रे... चुकून मी खरंच एवढी मोठी झाले तरी युद्ध बिद्ध काही होणार नाहीत.. मी जन्माने ब्राह्मण आणि लग्नाने ९६ कुळी म्हणजे मरणोत्तर नक्की कोण यावर वाद होत रहातील निरंतर.. बाकी घरातल्या वस्तू म्हणशील तर आत्ताच जपता येत नाहीत.. नंतरचं काय घेऊन बसलास...


Laalbhai
Friday, December 15, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवे उदाहरणे मीही देऊ शकतो हो...

लंडनात शेक्स्पिअरचे घर अजुनही फार चांगले जपून ठेवले आहे. (जर शेक्सपिअरचे साहित्य फक्त महत्वचे आहे तर त्याचे घर का जपायचे?)

आळंदीला ज्ञानेशरांचा खांब अजुनही जपला गेला आहे. (जर ज्ञानेश्वरी ज्ञान देते तर इतर खांबाबिंबाची गरज काय? पाडून टाका ना राव!)

अशी अनेक उदाहरणे...

तर ह्या प्रश्नांची उत्तर असे असते की जिथे जिथे अशा इतिहास घडवणार्‍या घटना घडवल्या गेल्या, त्या त्या जागा ऐतिहासिक महत्वच्या असतात.

तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण गांधीवधानंतरच्या हल्ल्यांमधे भालजींचा studio संपूर्ण जळाला होता. भालजींना न खचून जाता पुन्हा तो तेवढ्याच ताकदीवर उभा केला आणि पुन्हा चित्रनिर्मिती सुरु केली.

अर्थात, हा सगळा इतिहास जाणून घ्यायचे कष्ट तुम्ही घ्याल अशी कोणतीही आशा नाही. केवळ वादासाठी वाद घालत आहात, त्यामुळे ह्याविषयावर तुमच्याशी बोलणे थांबवतो. :-)


Santu
Saturday, December 16, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमी................त्या....,,सन्तु च्या;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;.........................लायनितले................... नीघालात................................शेवटि..............................;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;दमलो बाबा आता लिहुन जातो आता वाइच टाकायला...ज्योतिबाच्या नावान..... चांगभल

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators