Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Bhalajee studio ....

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Bhalajee studio .... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 08, 200620 12-08-06  11:17 am
Archive through December 16, 200620 12-16-06  1:58 pm

Mahesh
Thursday, December 21, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा विषयांतर होते आहे, पण मला एक प्रश्न पडला आहे या ऐतिहासिक वास्तु बिस्तुंच्या बाबत.
पन्हाळ्यावर म्हणे लताबाईंचा बंगला आहे.
सिंहगडावर लोकमान्यांचा बंगला आहे.
हे असे किल्ल्यांवर बंगले कसे काय बांधता येतात ?


Lopamudraa
Thursday, December 21, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंडनात शेक्स्पिअरचे घर अजुनही फार चांगले जपून ठेवले आहे>>>>. ते घर london मध्ये नाहिये...

Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय निघालाच हे तर असे स्टुडिओ वा चित्रनगर्‍यान्चा नन्तर कसा बोजवारा उडतो ते कळेल :-)


Ajjuka
Thursday, December 21, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग तुझं यावर काय म्हणणं आहे एल्ट्या? भारतात स्टुडीओज असू नयेत?
अरे तू १०० रूपये चारतोस काही निर्माते लाखाच्या घरात चारतात.. गुन्ह्याच्या किंवा चूकीच्या प्रमाणात चार्‍याचा आकार... तू एवढी बोंब कशाला ठोकतोयस?

अनेक 'विकासाच्या' नावाखाली अनेक गरीब आदिवासी, शेतकर्‍यांना देशोधडीला लावले जाते ते योग्य का? तिथे तरी काय असे दिवे लागतात? हिंजवडीच्या IT park च उदाहरण काही जुन नाहीये. की ते IT म्हणून रास्त आहे?
लताबाईंची देशोधडीला लागायची तर पाळी नाहीये ना? मग?
का आता वाहतुकीचे नियम पाळता येत नाहीत म्हणून नियम असणे चूक तसे हे निर्माते योग्य ते करत नाहीत म्हणून भारतात चित्रपटांचे बनणेच चूक की काय?


Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> हे निर्माते योग्य ते करत नाहीत म्हणून
अज्जुके अज्जुके कित्ती तो सन्ताप? अग मी बातमी दिली ती निर्मात्यान्ना काय कराव लागत हे दाखविण्यासाठि नाही!
वास्तवात, अशा प्रकारे स्मारकान्च्या नावाखाली जमिनि वगैरे घेवुन जे काही उभे रहाते त्याची "सिस्टिम" कशी वाट लावते ते दाखविण्याचा उद्देश हे! समजला तर घ्या समजुन! :-)
बाकी विकासाच्या सद्ध्याच्या सर्वच योजना बघता अत्यन्त निराशेने का होइना पण "एकवेळ कम्युनिझम परवडला पण ही लोकशाही नको" असे म्हणायची वेळ येते आहे की काय असे वाटते!
बाकी माझे १०० रुपये काय की निर्मात्यान्चे लाखो रुपये काय, कोणिही भाग पडल्याशिवाय किन्वा भाग पाडल्याशिवाय उगिचच आपल वाटल म्हणुन देत नाही! साध भिकार्‍यालाच काय देवासमोर वहाण्यासाठी पैशे काढताना देखिल आम्ही पॅण्टीच्या मागल्या खिशात हात घालुन खिशातल्याखिशात कमी रक्कमेच नाण शोधतो, तिथे लाच तरी कोण सुखासुखी व मनातल्या मनात शिव्या न घालता देत असेल यावर माझा विश्वास बसत नाही!


Kedarjoshi
Thursday, December 21, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्हाळ्यावर म्हणे लताबाईंचा बंगला आहे.>>>
पन्हाळ्यावर आख्खे गाव वसले आहे. तो किल्ला तालुका आहे.

लोकमान्यांनी तो बंगला जेव्हा विकत घेतला तेव्हा ब्रीटीश राज होते. पण बहुतेक तो बंगला आता त्यांचा मालकीचा नाही. पण गाईड लोक लोकमान्यांचा बंगला असे म्हनुन तो दाखवितात.

पण तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. संगमेश्वर या गावात जिथे संभाजीराज्यांना पकडले तिथे एक त्यांचे संग्राहलय आहे अशी पाटी नाक्या वर आहे. खास तिकडे जाउन बघीतले तर तिथे एक अतिशय घान अवस्थेत असनरा त्यांचा पुतळा व त्या भोवती लहान मुलांसाठी त्यांनी निर्मान केलेले शोचालय आहे. ( संभाजी बिग्रेड वाल्याना गेल्या अनेक वर्षात अजुनही कळालेले दिसत नाही नाहीतर त्यांनी यावेळेस जयकर ग्रंथालय फोडले असते). त्यांना जिथे मोगलांनी पकडले त्या जागेवर तो ईतिहास असेल असे वाटले म्हणुन खास पुण्याहुन तिकडे गेलो होतो तर तिथे अशी अवस्था. गावकर्यांना विचारले तर ते म्हणाले ईथे असेच असते कोणी येत नाही ईकडे. (त्या गावी मी माझ्या बायकोला घेऊन गेलो तर वर ते पाहुन ति ही खेकसली म्हणे ईतीहासाच्या नादात माझीही पायपिट करतोस ते ही भारतात असलेल्या कमी वेळेत. मग काय खाल्या शिव्या अन वर नाक्यावरची मिसळ).

पत्र पाठवुन ही त्यांची नोंद नाही. रायगडावर महाराजांच्या समाधीची रोजची विटंबना पण पाहीली.
बाबासाहेब पुरंदर्यांनी अनेक सुचना केल्या होत्या त्या ही अंमलात आनल्या गेल्या नाहीत.

हां पण एक जागा आहे ती म्हणजे प्रताप गड्याच्या पायथ्याची असनार्या अफझल खाणाच्या शिर्काणाची जागा. माहा. सरकार ते निट ठेवायला मात्र पैशानी मदत करते पण त्यांना त्यांना संभाजी वा शिवाजी महाराजाच्या समाधीकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

विषयांतराबदल क्षमस्व पण महेश चा मुद्दा पुढे न्यावा वाटला.


Limbutimbu
Friday, December 22, 2006 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> मग काय खाल्या शिव्या अन वर नाक्यावरची मिसळ
शिव्यान्च काय विशेष, ते नेहेमीचच हे! आपल्या पाचवीला पुजलेल! :-)
मिसळ कशी होती? हरबर्‍याची उसळ होती का तीत? टेस्टी होती का?
(विषयान्तराबद्दल माफी असावी)
पण तू उदाहरण देतोहेस ती अगदी बरोबर हेत! आहे ते साम्भाळत नाहीत अन माझ्या पहिल्याच पोस्ट मधे म्हणल्याप्रमाणे "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र" ठेवण्याचे धन्दे तेव्हडे लोकान्ना भावनिक आवाहने करुन केले जातात


Mahesh
Friday, December 22, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, धन्यवाद
तुम्ही दिलेली उदाहरणे खरोखरच खिन्न करणारी आहेत.
जो समाज ईतिहास विसरतो, तो भविष्य तरी काय चांगले घडवू शकेल ?
कधी कधी वाटते, मराठी स्वाभिमान पानिपतावर गेला तो गेलाच.


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते घर london मध्ये नाहिये...

>>

Sorry.. पण आहे ना इंग्लंडात कुठेतरी? स्थानाचे नाव चुकले असेल.

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टुडिओ वा चित्रनगर्‍यान्चा नन्तर कसा बोजवारा उडतो ते कळेल

>>>

गेले काहीवर्षे अशीही चर्चा आहे कुटुंब व्यवस्थेचाही बोजवारा उडतोय. लग्नाचे रुपांतर घटस्फोटात होते. तिथेही तुमचे हेच logic वापरायचे का?

Limbutimbu
Friday, December 22, 2006 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>. गेले काहीवर्षे अशीही चर्चा आहे कुटुंब व्यवस्थेचाही बोजवारा उडतोय. लग्नाचे रुपांतर घटस्फोटात होते. तिथेही तुमचे हेच logic वापरायचे का?
लालभाई, कोणत्या सरकारची "कुणाकुणाच्या" "कुटुम्बान्च" "स्मारक" करुन साम्भाळायची कोणती योजना हे ते सान्गाल का?
तेवढीच आमच्या ज्ञानात भर!


Kedarjoshi
Friday, December 22, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु भो मिसळ झ्याक होती एकदम बेसट.
पण त्या शेवटच्या उदा.तील गोम लक्षात नाही आली कोणाच्या. तर ति अशी आहे

अफझलखाणाचा जिथे वध केला तिथे मात्र दर शुक्रवारी मेळावा भरतो. लोका चादरी चढवतात, आणी ह्या खास मेळाव्यांसाठी महा. सरकार पैसे देते. ह्या विरुध्द भाज्पा व शिवसेनेने आंदोलन केले पण कुछ चल्या नही काराण सर्वधर्म समभाव. अफझल मेला त्या जागेवर दिवे पण महराज गेले तिथे अंधार नी वर दारुच्या बाटल्यांचे साम्राज्य) चलनेदो. but this fact.


Limbutimbu
Friday, December 21, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Friday, December 15, 2006 - 8:04 am:
>>>>>>> तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण गांधीवधानंतरच्या हल्ल्यांमधे भालजींचा studio संपूर्ण जळाला होता. भालजींना न खचून जाता पुन्हा तो तेवढ्याच ताकदीवर उभा केला आणि पुन्हा चित्रनिर्मिती सुरु केली.

लालभाईन्च्या वरील दिनान्क वेळेच्या पोस्ट मधे हे वाक्य वाचले!
सहज विचारतो, काहो? का हो "हल्ल्यामधे जळाला" की "जाळण्याकरता हल्ला केला गेला"? कुणी जाळला होता स्टूडीओ? का? अन मग "पेन्ढारकरान्चाच" स्टुडीओच का?
(वाळवण्टात उन्ट वाळुन तोन्ड खुपसुन बसला की बाख़िच्या वादळापासुन त्याच सन्रक्षण होत अस त्याला वाटत अस्त)

अन तेव्हान्चे स्टुडिओ जाळणार्‍यान्चे वन्शजच आज स्मारकाबद्दल बोम्बाबोम्ब करत नसतील कशावरून?
या स्मारकान्च्या बाता मारणार्‍यान्नी आधी एक कराव, पुण्याच्या फिल्म इन्स्टीट्युशन मधले जुन्या चित्रपटान्चे काही तरी करा....... नव धड बनवता येत नाही अन जुन राखता येत नाही.... दोनच वर्षान्मागे आगित बर्‍याच दुर्मिळ फिल्म जळाल्याच पुसटस आठवत हे!
अन म्हणे लता कडुन स्टुडिओ काढून घेवुन त्याच स्मारक करा! स्मारक म्हन्जे काय करा???? डोम्बल! आयजीच्या जीवावर बायजी उदार अन हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!


Ajjuka
Friday, December 21, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोब्बर एक वर्षानी या बीबी ला जाग आली!
स्मारक करा म्हणजे काय या बद्दल पहिल्याच पोस्ट मधे लिहिलंय मी.
आणि लिंब्या,
FTII बद्दल... जी आग लागली होती ती Archives मधे. FTII मधे नाही.
NFAI(National Film Archives of India) ची fascility खूप व्यवस्थित मी पाह्यलीये. फार चांगल्या पद्धतीने सगळं ठेवलेलं असतं तिथे. खूप चांगले उपक्रम असतात. सुदैवाने महाराष्ट्र शासनाशी त्यांचा काही संबंध नाही. केंद्राच्या अखत्यारीतली गोष्ट आहे त्यामुळे मुंबईतल्या अनेकांची कुळं पोसली जात नाहीत तिथे.. Saturday Screening हा खूप चांगला उपक्रम आहे. FTII च्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ रोज screenings असतात. तिथे २ Auditoriums आहेत. एक खालचे मोठे आणि एक वरचे preview . दोन्ही Auditoriums तांत्रिकदृष्ट्या उच्च दर्जाची आहेत. प्रोजेक्शन रूम सुद्धा फार मस्त आहे. प्रोजेक्शनिस्टही अत्यंत अनुभवी आहेत. ही दोन्हीही Audis कुणालाही माफक खर्चात screening साठी उपलब्ध होऊ शकतात. तसेच तुमचा film club/ film society असेल तर तुमच्या ग्रुपसाठी archives मधल्या prints सुद्धा screening साठी उपलब्ध होऊ शकतात. ठराविक कागदपत्रे व माफक मूल्य त्यासाठी घेतले जाते.
आग लागणं ही एक दुर्घटना आहे जी कुठल्याही कमाल सुरक्षित ठिकाणी सुद्धा घडू शकते. पण ती घडली म्हणून संपूर्ण NFAI हे failure ठरत नाही. थोडी माहिती करून घ्यावी या सगळ्या गोष्टींची.
FTII ही आशिया खंडातली प्रथम क्रमांकाची चित्रपट शिक्षणाची संस्था समजली जाते. अद्ययावत तंत्रज्ञान तिथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. अर्थात काही प्राध्यापक आणि प्रवेश मिळताच स्वतःला नामचीन filmmakers समजू लागणारे विद्यार्थी (trust me! seen a good lot of these kind!!) यांच्यामुळे नाव बदनाम होतेय.
with all things taken into consideration, I still feel that FTII and archives is a success story! and same can be done at kolhapur.


Limbutimbu
Friday, December 21, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> पण ती घडली म्हणून संपूर्ण NFAI हे failure ठरत नाही.
थोड विषयान्तर झालय माझ्याकडून, अन अज्जूका, तू म्हणते ते खर हे, ते मान्य, पण असलेल्या फिल्म्स चे डिजिटल मधे रुपान्तराचे काम अडून राहिल्याच मी पेपरमधेच वाचल होत, आता माझ्या सारख्याचा प्रत्यक्ष सम्बन्ध येत नाही अशा सन्स्थान्शी, पण कोल्हापुरात स्मारक करण्यापेक्षा, जुने अप्रतिम चित्रपट डिजिटल मधे केले गेले तर चान्गले नाही का?
त्या जुन्या फिल्म्स सहज पेट घेवु शकतात, त्यान्च्या प्रती बनवणे वगैरे अनेक खर्चिक कामे करायचे सोडुन ही लोक "भालजीन्चे" स्मारका करता "स्टुडीओ"च्या मागे का लागली हेत असे विचारण्याचा माझा हेतु होता म्हणुन त्या आगीचा उल्लेख केला! :-)
या लोकान्ना खरच काही भरीव करायच असेल तर केन्द्रशासित वा राज्य शासित वा स्वतन्त्र सन्स्था असल्या भेदान्वर मात करुन यान्ना काहीच करता येणार नाहीये का?


Ajjuka
Friday, December 21, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता उत्तरं द्यायची तर खूपच विषयांतर...
१. रिळं आणि डिजिटल याच्या दर्जामधे जमीन अस्मानाचा फरक असतो. डिजिटल हे documentation पुरतेच ठिक आहे पण Archival purpose साठी रिळेच हवीत.
२. कोल्हापुरात चित्रिकरणाच्या सुविधा होत्या त्या आता नाहीत. त्या परत उपलब्ध झाल्या तर उत्तमच आहे. आणि त्याच ठिकाणी झाल्या तर भालजींन जास्त योग्य आदरांजली होईल नाही का?

तिसर्‍या प्रश्नाबद्दलच संभ्रम आहे..
|या लोकान्ना खरच काही भरीव करायच असेल तर केन्द्रशासित वा राज्य शासित वा स्वतन्त्र सन्स्था असल्या भेदान्वर मात करुन यान्ना काहीच करता येणार नाहीये का?|
हे लोक म्हणजे नक्की कोण? या भेदांवर तर प्रत्येक संस्थेचे स्वरूप अवलंबून आहे. त्यातून सुटका नाही. आणि मला (पक्षी माझ्यासारख्या अनेकाम्ना) कितीही इच्छा असली तरी माझ्या खिशात साधा स्टिल कॅमेरा घ्यायला पैसे नाहीत अशी अवस्था.. स्टुडिओ काय उभा करणार.

वर कोणीतरी दादा कोंडकेंचा उल्लेख केला होता. खरं सांगायचं तर जुन्या लोकांच्यानंतर तो एकच visionary असं म्हणायला हवं. एकदा पानशेत आणि आळंदचे DK Studio पहा. त्या माणसाने चांगला पाया घातलाय. दुर्दैव त्यांचं आणि आपलं की त्यांचे वारस जे कोण आहेत, ते काम पुढे न नेता केवळ मलाई खाण्यातच interested आहेत.


Gajanandesai
Saturday, December 22, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिजिटल हे documentation पुरतेच ठिक आहे पण Archival purpose साठी रिळेच हवीत.
<<<
थोडं विषयांतर, पण रिळं वगैरे सारख्या जुन्या साधनांपेक्षा डिजिटल साधनं ही साठवणूक करायला, हाताळायला, ने-आण करायला जास्त सोयीस्कर असं मला वाटत होतं. अज्जुका हे जरा स्पष्ट सांगशील का? की दर्जासंबंधी जे वाक्य लिहिलं आहेस त्यातून रिळांचा दर्जा चांगला असं म्हणायचं आहे? पडद्यामागच्या या प्रक्रियेतल्या तांत्रिक बाजूंविषयीचं माझं ज्ञान यथातथाच आहे म्हणून विचारतोय.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators