|
Zakki
| |
| Friday, October 06, 2006 - 8:27 pm: |
| 
|
अर्थ काही नाही. खवचटपणा, जमल्यास दुसर्याची टिंगल इ. कारण कुणिही काऽहीहि करणार नाही. ज्याला functionally illiterate म्हणतात तसे नि सामाजिक जबाबदारीचे अजिबात ज्ञान नसलेले लोक चांगल्या लोकांपेक्षा दसपटीनी जास्त आहेत तिथे. इथे तसले लोक फार कमी आहेत म्हणून जरा बरे चालले आहे एव्हढेच. माझी खात्री आहे इथे त्यांचे प्रमाण ३५ वर्षांपूर्वी फार फार कमी होते, आता जरा वाढले आहे, असे जाणवते.
|
Prajaktad
| |
| Monday, October 30, 2006 - 7:16 pm: |
| 
|
भारतिय पोस्टल गैरव्यवहाराचा मला नुकताच आलेला अनुभव... दिवाळीनिम्मित भेट म्हणुन भारतातुन usa मधे पाठवलेल्या कपड्यापैकी पार्सल पाकिट फ़ोडुन त्यातिल काही कपडे काढुन घेण्यात आले. माझ्यापर्यत आलेले पाकिट फ़ाटलेले होते... एवढच नाहि तर पाकिटावरिल रुपये ४०० किमतिची टिकिटे सुद्धा काढुन घेण्यात आली.फ़क़्त एक शर्ट ठेवला होता.मुलिचे आणी माझे असे मिळुन २००० रु किमतिचे कपडे त्यातुन काढुन घेण्यात आलेले आहे. पाकिटावर us पोस्टाने damage in handling in the postal service असा शिक्का मारला आहे.. बचकुच तरि व्यव्स्थित मिलाव म्हणुन एका प्लास्टिक bag मधे निट pak करुन पाठवले आहे.. असा अनुभव कुणाला आला आहे का?भारतात प्रत्येक खात्यात भ्रस्टाचार असाच बोकाळला आहे का?
|
Yogibear
| |
| Monday, October 30, 2006 - 8:11 pm: |
| 
|
Prajaktad: तु जर private किंवा courier बद्दल म्हणत नसुन government post office बद्दल म्हणत अशिल तर त्यात काहिच आशर्य नाहिये..... 
|
Boli
| |
| Monday, October 30, 2006 - 8:12 pm: |
| 
|
I had a similar experience couple of years back with a parcel containing clothes and photos. We registered a complaint with GPO along with proof of the torn envelope. No result yet. Best thing is to switch to Blue Dart or some courier service, which is prompt.
|
Zakki
| |
| Monday, October 30, 2006 - 9:42 pm: |
| 
|
पाकिटावर us पोस्टाने damage in handling in the postal service याचा अर्थ भारतातच handling करताना ते पार्सल फाटले असे नाही, तर वाटेत, किंवा अमेरिकेत सुद्धा तसे झाले असेल. अमेरिकेतल्या अमेरिकेत सुद्धा असा अनुभव मला बरेचदा आलेला आहे. पार्सल जर, पैसे वाचवण्यासाठी, पूर्व युरोपियन किंवा अफ्रिकेतल्या देशातून handle केले असेल तर तिथले लोकहि असल्या चोर्या करण्यात जगप्रसिद्ध आहेत. पण पार्सल जर insured किंवा registered नसेल तर कुठलेच पोस्ट ऑफिस त्याबद्दल काहीच करू शकत नाही. अर्थात् भारतात कदाचित् असे अनेकदा होत असेल. भारत सर्वच बाबतीत आघाडीवर आहे आजकाल, म्हणूनच भारताबद्दल संशय येणे सहाजिकच आहे!
|
Dinesh77
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:21 pm: |
| 
|
झक्की, तुमचे म्हणणे पटले. भारतीय पोस्ट खात्याबद्दल संशय येणे स्वाभाविक असले तरी आजकाल सेक्युरिटीच्या नावाखाली अमेरिकेतच असला प्रकार होणे असंभव नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:51 pm: |
| 
|
मला पण असेच वाटले होते. पण बहुधा त्यांनी काही चोरले नसते. नि त्यांनी सांगीतले असते, सेक्युरिटि साठी उघडले होते. त्यांना काय भीति आहे? नि संशय असता तर त्यांनी माणसांची निदान चौकशी तरी केली असती! तेव्हढा विश्वास आहे माझा अमेरिकनांवर, अजूनतरी!
|
Supermom
| |
| Tuesday, October 31, 2006 - 3:22 pm: |
| 
|
प्राजक्ता, मला या बाबतीत अत्यन्त वाईट अनुभव आलेला आहे. ५ वर्षांपूर्वी भारतात जायला निघालो असताना माझ्या नवर्याच्या एका मित्राने त्याच्या आई व बहिणीसाठी काही सामान दिले.त्यात दोन घड्याळे व काही ज्वेलरी,अगदी सोन्याची नाही पण किमती अशी दिली. आम्ही अर्थातच महाराष्ट्रात जाणार,म्हणून पोचल्याबरोबर तिथून साउथमधे आईला पार्सल करायला सांगितले. कुरियरवाल्याने ज्वेलरी नाही म्हणून सांगितल्याने आम्ही ते पोस्टाने पार्सल केले. चारच दिवसांनी त्याच्या वडिलांचा फोन की पार्सल मधे छोटे दगड आलेत. ज्वेलरीचा तुकडाही नाही. नंतर रीतसर तक्रार वगैरे केली. चौकशी करून कळवू असे उत्तर मिळाले. ५ वर्षात काहीही उत्तर नाही हे सांगणे न लगे. कानाला खडा लावला. तेव्हापासून कोणाकडूनही सामान घेऊन जात नाही.
|
Asami
| |
| Tuesday, October 31, 2006 - 4:58 pm: |
| 
|
झक्कींना अनुमोद, USPS मधे जर security साठी काही उघडले तर नीट परत pack करून तशी note attach करून दिली जाते. हे मी तरी बरेचदा अनुभवले आहे.
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 31, 2006 - 7:23 pm: |
| 
|
अरे म्हणजे मी एकटिच नाही तर! us मधे हे फ़ोडले नसावे कारण पाकिट वाकडे तिकडे कसेही फ़ाटले होते.शिवाय stamp काढुन घेताना हि फ़ाटले होते. पुर्वी माझे वडिल इथे आले असताना काही जरुरि वस्तु India तुन मागवल्या होत्या तेव्हा security check साठी पार्सल ओपन केले होते पण,तशी रितसर नोट त्यावर होती आणी सर्व वस्तु मिळाल्याही होत्या. तात्पर्य... आता भारतिय टपालाने काही मागवणार नाही. भारतात राहणार्या लोकांना आम्हा us मधे राहणार्या लोकांचा सुर तक्रारिचा वाटेल पण, usa postal service इतकी विनम्र सेवा मी कुठेही पाहिली नाही अगदी घरचा व्यवसाय असल्यासारखे अगत्याने विचारतात. stamp हवे का?हे नको ते पाकिट वापरा.
|
Atul
| |
| Tuesday, October 31, 2006 - 8:14 pm: |
| 
|
US मधुन भरतात पाठवलेले पार्सल मग ते पोस्टाने असो की कुरियरने, बरेचदा भारतीय कस्टमवाले उघडुन बघतात. आणि मग त्या सामानाचे काय होइल याचा काही भरवसा नाही भारतातून US ला पाठवलेले सामान व्यवस्थित येते असा माझा अनुभव आहे, कापडाचे अस्तर असणारे कागदी पाकीट वापरावे
|
Priyab
| |
| Tuesday, October 31, 2006 - 9:28 pm: |
| 
|
मागच्या वेळि india त गेले त्या वेळी २-३ flights change कराव्या लागल्या होत्या..शेवटी Mumbai ल पोहोचले तेंव्हा luggage आले नव्हते.. airline वाले लोक म्हटले कि घरी पाठवुन देवु घरी जेंव्हा bags आल्या त्यातले cellphone , chocolates अशा बर्याच गोष्टि गायब झालेल्या होत्या मला परत पुण्याहुन Mumbai ला एवढ्यासाठि जायचे नव्हते म्हणुन सोडुन दिले
|
Yogy
| |
| Tuesday, October 31, 2006 - 9:33 pm: |
| 
|
मागच्या वेळी US ला आलो त्या वेळी माझ्या मित्राला शिकागो एयरपोर्ट वर कस्टम नी खूप त्रास दिला. त्याच्या बगेत लोणच्याची बरणी होती ती उघडून पाहिली आणि झाकण नीट न लावताच बॅगेत ठेवून बॅग परत चेक इन केली. सगळे कपडे कचर्यात गेले त्याचे. आता तो घरी पण जेवताना कधी लोणचं घेत नाही
|
Yogy
| |
| Tuesday, October 31, 2006 - 9:47 pm: |
| 
|
सध्या US मध्येच आहे. मात्र एक प्रश्न राहून राहून सतावतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही दुकानात गेलो आणि अगदी छोटासा पेन देखील घेतला तरी भल्यामोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत देतात. असा कचराच कचरा सारखा निर्माण होतो. हा dump कुठे करतात हो? कारण शहराच्या बाहेर वगैरे कुठेच dumping ground वगैरे दिसले नाही. तशीच system भारतात परत गेल्यावर राबवण्यासाठि मनपाला सूचना करीन
|
Priyab
| |
| Tuesday, October 31, 2006 - 10:32 pm: |
| 
|
Yogy इथे almost सगळ्या शहरांमधे waste Management - green WM che dumpster दिसतिल तेच तुम्हाला बारयाच manufacturing company च्या आवारात सुद्धा दिसतिल हि लोक इथे सगळा कचरा वेगवेगळ्या type मधे divide करतात आणि मग काहि recycle करतात तर काहि landfill करतात... काहि शहरांच्या बाहेर तुम्हाला landfill disposal sites दिसतिल... आणि बारयाच शहरांमधे तुम्हाला water purification plants सुद्धा दिसतिल waste management landfill करायचे charge लावतात company ना... and depending on the type of waste that amount changes..like hazardous waste will have different charge and non-hazardous waste will have different charge
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:05 am: |
| 
|
१)कापडाचे अस्तर असलेले पाकीट जरी वापरले तरी ते फ़ाडून येते. त्याच्या आत मेणकापडाचे आणखी एक पाकीट घालावे आणि मेणकापडावर देखील आपला पत्ता stapel करुन घ्यावा. इतक्या दूरवरून तुम्ही सामान मागवता थोडेफ़ार कटू अनुभव येतीलच की. मला अद्याप पुस्तके वगैरे चांगली आलेली आहेत. माझी बहिण उटणे, राख्या वगैरे पाठविते तेही छान अवस्थेत मिळतात कारण मी आधीच सुचना केलेल्या असतात की अशी packing कर म्हणून. २)पाकीटावर घट्ट शाईच्या पेनाने छान सुबक अक्षरात ताई लिहिते Please handle this mail with care. Don't tear it of. Thanks . हेच वाक्य ती मराठीत लिहिते 'कृपया हे पत्र जपून हाताळा. पत्र फ़ाटणार नाही ह्याची दक्षता बाळगा. धन्यवाद' त्यामुळे त्याचा एक फ़ायदा होतो. पत्रावर देखील तुम्ही सुचना करु शकता. दोन्ही तिन्ही भाषांमधे. मीही करतो. इथे परदेशात आल्यानंतर कळले की साधेसाधे packing करायला किती छानछान सुविधा असतात. त्या सुविधा भारतात असतील नसतील माहिती नाही. शिवाय त्यांची किंमत झेपते का हाही एक प्रश्न आहेच. वर सामान पाठविणया व्यक्तीने जर व्यवस्थितपणा बघितलाच नसेल तर ती आपल्या मर्जीने सामान pack करीन. मी तरी बघुन बघुनच गोष्टी शिकलो आहे म्हणून हे लिहितो आहे. मी देखील एक भारतीयच आहे. why we are like this हे वाक्य कससचं वाटतं.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:09 am: |
| 
|
कारण शहराच्या बाहेर वगैरे कुठेच dumping ground वगैरे दिसले नाही.>>... तुमच्या डोळ्यासमोर आणि(नाकासमोर) पुण्याचा कचराडेपो आला की काय?
|
Zakki
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:20 pm: |
| 
|
शिवाय किनार्यावरील लोकवस्तीने गजबजलेले भाग सोडले तर अमेरिकेच्या मध्य भागात भरपूर मोठ्ठा भूप्रदेश पडला आहे. त्यात (पैसे देऊन) लॅंडफिल्स करता येतात. लोकांच्यात शिस्त प्रचंड. रिसायकल चा माल आवर्जून रिसायकल साठी ठेवतात. प्लास्टिक बहुतेक ठिकाणी रीसायकल करतात. बाकीचा बराचसा माल Bio-degradable असल्याने जमिनीत मिसळून त्याची पण माती होते. हे सर्व करायला पैसा कुठून येतो बरे? अहो जनतेवर नाना कर बसवले आहेत. शिवाय लोकांना सार्वजनिक स्वच्छतेची आवड. लोक देतात. नि मुख्य म्हणजे अहो आश्चर्यम्! ते पैसे त्याच कामाला वापरतात, 'खायला' नाही! तर हे भारतात साध्य व्हायला शिस्त हवी ना! नि पैशाची रड तर नेहेमीचीच आहे ना! शिवाय प्रामाणिकपणा, खरेपणा, कामाची आवड ह्या सगळ्या जुन्या समजुती आताच्या काळात चालत नाहीत भारतात! आता महाराष्ट्र तर 'टेक ऑफ स्टेज' ला पोचल्याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजच जाहीर केले आहे. मग काय विचारता राव? पैसाच पैसा! 'खाता किती खाशील एका मुखाने!
|
Zakki
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:48 pm: |
| 
|
इथे मी भारतीयांना बरीच नावे ठेवतो. बहुधा अमेरिकेशी भारताशी तुलना करण्यात येते. ते बरोबर नाही. माणसे ही माणसेच. आता अमेरिकेतील फसवाफसवीची उदाहरणे, काही वाईट गोष्टी, धंद्यातल्या, खेळातल्या, शाळेतल्या नि एरवीच्या जीवनातल्या हे सर्व इथे वारंवार प्रसिद्ध होत असते. विशेषत: राजकारणी लोक स्वत:च्या नातेवाईकांना जनतेच्या पैशावर कसे पोसतात याची काही उदाहरणे मी इथे प्रत्यक्ष अनुभवली आहेत. तेंव्हा असे काही नाही की भारतीयच वाईट आहेत, अमेरिकेतहि भरपूर लाचलुचपत, फसवणूक इ. चालू आहे, पण ती रोजच्या आयुष्यात कमी दिसते. माझा शेजारी, माझ्या आजूबाजूचे दुकानदार मला फसवणार नाहीत, माझी कामे व्हायला सरकार दरबारी, आयकर विभाग, मोटर लायसन इ. ठिकाणि मला लाच द्यावी लागत नाही. अर्थात् कायदेच असे केले आहेत की जबरदस्ती सर्वांनाच नसते भुर्दंड, जसे रस्त्यावरचे टोल, शिक्षक होण्यासाठी द्याव्या लागणार्या जबरदस्त फिया असतातच. कारण त्यातून कुणा तरी राजकारणी लोकांच्या कंपनीचा किंवा त्यांच्या नातेवाइकांना गैर फायदा असतो. तेही वाईटच!
|
India is a DEAD country.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|