|
भालजींच्या स्टुडिओ बद्दल वाचले आनि ऐकले इथे अजुनही कोनीच कसे काही लिहिले नाही असो मागिल काही दिवसापासुन हा विषय गाजतो आहे या संदर्भात एक पत्र लोकसत्ता च्या लोकमानस मधे आले होते लेखकाने असे सुचवले आहे कि भालजी चा स्टुडिओ वाचवन्यासाठी आता आपणच काहीतरी करायला हवे तमाम मराठी प्रेमी नी एकत्र येउन फ़ंड जमा करायचा या साठी रमेश देव सीमा देव चंद्रकांत गोखले विक्रम गोखले विनय आपटे तसेच चित्रपट आनी नाट्य स्रुष्टीतील मंडळीं नी या साठी मदत करायची आनी आजच्या बाजारभावा प्रमाणे जी किंमत होइल ती लता बाइ ना द्यायची कोल्हापुरातील काही बिल्डर ही या साठी मदत करु शकतील याच मंगेशकर भावंडानी सांगली तील दीनानाथ नाट्यग्रुह बंद करताना जो आव आनला होता तो आठवा सरकारने सुद्धा ते ऐकले आनी आता लताबाइंना जनतेच्या भावनापेक्शा आर्थिक व्यावसायीक ता जास्त महत्वाची वाटते आहे या वर सर्वानी विचार करावा या साठी नाट्यपरीशद नाट्यसंमेलनातुनही निधी जमवता येइल माझी ही शक्य ती मदत करयची तयारी आहे आपना सर्वाचे या विशयी चे मत जानुन घेन्यास मला आनंद वाटेल
|
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, ही म्हण ऐकुन ठावुक होती! प्रत्यक्षात ती कशी उतरते ते या स्टुडिओ प्रकरणावरुन कळते! जिथे जिथे थोर(?) मण्डळि जगली वावरली ते ते वाडे ठिकाणे म्हणे "ऐतिहासिक राष्ट्रिय स्मारके" म्हणुन जाहिर करुन त्या जागेच्या मूळ मालकास देशोधडीला लावायची खोड काही नवि नाही, पुण्यातल्या "भिडे" वाड्याचे उदाहरणही ताजेच हे! शिवाजी महाराज आणि त्यान्च्या आगिल मागिल कालखण्डाचा भव्य दिव्य यशोगाथा सान्गणारा डोन्गरी किल्ल्यान्चा प्रश्ण धसास लावायचे सोडुन शहरातील मोक्याच्या जागान्ची "स्मारके" करुन हादडण्याचा किन्वा लाटण्याचा डावच केवळ दिसत आलेला हे! आणि याच वेळेस अन्दमानातील स्मारकावरील सावरकरान्च्या काव्यपन्क्ती मणिशन्कर अय्यर ने काढायला लावल्या त्याचे दुःखही कुणाला न होता कोल्हापुरातील एक व्यावसायिक जागा जी लता बाईन्नी व्यवहार करुन घेतली तिच्यावर डोळा का? असली मागणि आरके स्ट्युडिओ बद्दल का बर केली जात नाही? तेवढी हिम्मत नाही म्हणुन? की बामणि लता झोडपायला सोपी अस वाटत म्हणुन? आणि स्टुडिओचे स्मारक करुन कसले दिवे पाजळणार हेत तिथे? समाजाच काय भल होणार हे?
|
वा लताबाइंचा व्यवहार इतर स्मारका.बद्दल मला माहित नाही मी फक्त ज्यांना अशी स्मारके व वास्तु वाचाव्या असे वाटते अशा लोकांना या विशयी विचार करावा असे म्हंटले आहे जे स्मारक वा इतिहासापासुन समाजाचे काय भले होनार असा विचार करतात त्यांनी याचाही विचार करु नये आनी या जागेच्या व्यवहारामुळे बामनी लताबाइ देशोधडिला नक्किच लागनार नाहीत कारन योग्य मोबदला द्यायचा आहे फुकट तर जागा बळकावनार नाही हे खरे आज पर्यंत सरकारनेही काही कमी मेहेरनजर केली नाही लताबाइंवर त्यामुळेच पेडर रोड चा फ्लाय ओव्हर अजुनही होत नाही पन हे असेच चालु राहिले तर पुढच्या पिढिला आज ज्या काही थोड्या ऐतिहासीक वास्तु शिल्लक राहील्या आहेत त्यांची फक्त वर्णने वाचावी लागतील कारन हळुहळु अशी एक एक मोक्याची जागा मोठ मोठे बिल्डर बळकाउ लागले आहेत कि अशी वर्णने ही पुस्तकातील जागा अडवतात तसेच मागील लोक आनी त्या भव्य दिव्य वास्तु या कशा होत्या याच्याशी आम्हाला काय करायचे आहे आज त्याचा काय उपयोग म्हनुन ते ही पुस्तकात दिसनार नाही अशी अनेक स्मारके ही कोनत्याही व्यवहाराच्या तराजुत न तोलता ती वाचवन्याचा प्रयत्न नक्किच केला पाहीजे समाजाचे काय भले होनार हे कोनत्या मापदंडाने मोजनार आनी या व्यावहाराबद्दल च जर बोलायचे तर एकटा जिव ( दादा कोंडके ) अवश्य वाचावे
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 06, 2006 - 12:53 pm: |
| 
|
की बामणि लता झोडपायला सोपी अस वाटत म्हणुन? >>> जातीपातीने कर्तृत्वात काही फरक पडत नाही, पण तपशिलातली चूक दाखवून द्यायची तर मंगेशकर कुटुंब ब्राह्मण नाहीत. तुमचा जिथे तिथे जातीपातीचा विषय आणण्याचा हातखंडा मात्र वाखाणण्यासारखा आहे!!! RK studio मधे अजुनही चित्रपटाची चित्रिकरणे होतात. भालजींच्या studio चे गाळे पाडून तिथे apartments बांधण्याचा plan आहे. म्हणजे काही दिवसांनी भालजींचा studi ही नष्ट झालेली आणि पुरावा नसलेली इतिहासकालिन गोष्ट होईल. जसे की इतिहासात भारताने उडवलेले विमान! विरोध आहे तो ह्याला. मंगेशकरांकडेच तो studio राहिला तर कुणाची हरकत नसावी. studio चे गृहसंकूल होतेय, हे विरोधाचे कारण आहे. बाकी तुम्ही ब्राह्मण - अब्राह्मण, सवर्ण - अवर्ण अशी बडबड चालू ठेवा. पण चर्चेचा रोख बदलू नये यासाठी माझ्याकडून छोटासा प्रयत्न!
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 06, 2006 - 12:56 pm: |
| 
|
स्टुडिओचे स्मारक करुन कसले दिवे पाजळणार हेत तिथे? समाजाच काय भल होणार हे? >>> अरे वा, हे तर सुटलेच होते की नजरेतून! जिथे तिथे गतवैभवाची उदाहरणे देऊन वर्तमानात स्वतःची पोळी भाजून घेणार्यांकडून हे विधान, म्हणजे जरा विनोदीच होतेय! 
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 06, 2006 - 1:27 pm: |
| 
|
काय लालभाई? आज सहा डिसेम्बर, व्यस्त होतात ना दिवसभर? DDD चालुद्या, तुमच पण चालुद्या! मला वेळ झाला की देइन उत्तर!
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 06, 2006 - 2:32 pm: |
| 
|
विनोद बाजूला राहू द्या जरा, पण जिथे तिथे जातीयवाद आणून आपण काय साधतो आहोत ह्याचा विचार करावा. (आणि हा जातीचा उल्लेख केवळ द्वेष आणि अविश्वास यांनी भरलेला असतो!) संबंध नसलेल्या विषयात जातीचा मुद्दा आणून तुम्ही जातीय अस्मितेला खतपाणी घालत आहात. मग तुम्हाला इतरांवर टिका करण्याचा कोणता नैतिक अधिकार उरतो? (अर्थात, नैतिकता मानत असाल तरच हा प्रश्न तुम्हाला लागू आहे!) त्यामुळे दलित नेते आणि तुम्ही यांच्या कोणताही गुणात्मक फरक मला दिसत नाही. उलट क्षमता असूनही व्यापक दृष्टीकोनाचा अभाव तुमच्यात आहे, हा तुमचा मोठाच दोष आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विषयांतर होते आहे, पण मूळ विषयापेक्षा हे जास्त महत्वचे आहे असे वाटते. ह्याला दिवे बिवे घेऊ नका. मी काय म्हणतो त्याचा गांभिर्याने विचार करा. उत्तर मला द्याच, असा आग्रह नाही.
|
Asami
| |
| Wednesday, December 06, 2006 - 4:32 pm: |
| 
|
उलट क्षमता असूनही व्यापक दृष्टीकोनाचा अभाव तुमच्यात आहे, >> लालभाईला पूर्ण अनुमोदन. लिंब्या आत्ता तू यावर एक मस्तपैकी तुझा reference आजच्या undercurrent च्या संदर्भात कसा बरोबरच होता ह्याची भलावण करणारे एक post लिहिशीलच म्हणा. असो , अगदीच राहवले नाही म्हणून लिहिलेय. दुर्लक्श कर.
|
Chyayla
| |
| Thursday, December 07, 2006 - 2:25 am: |
| 
|
या प्रकरणात खर खोट काय राजकारण सुरु आहे नक्की काही माहित नाही पण जाती-पाती वर विषय जाणे हे दुर्दैव आहे. हे बाजुला ठेवुन मुळ विषयावर लिहिल्यास सगळ्यानाच योग्य ती माहिती उपलब्ध होईल.
|
Ajjuka
| |
| Thursday, December 07, 2006 - 4:15 am: |
| 
|
गृहसंकुल किंवा मॉल नकोच व्हायला. पण स्मारक म्हणजे काय? असे ग्रेट होते अमुक तमुक याचे छायाचित्रे आणि लेखातले पुरावे? तेवढेच? जिथे चित्रिकरण होत असे त्या कामासाठीच ती जागा वापरली गेली तर जास्त योग्य नाही का? प्रभात ची पुण्यातली जागा FTII साठी उपयोगात आणली त्या धर्तीवर काही करणे मला वाटते जास्त योग्य स्मारक ठरेल. म्हणजे एक संग्रहालय, जिथे भालजिंच्या चित्रपटांचा आलेख असेल हे हवेच पण त्याबरोबरच.. चित्रिकरणाच्या सोयीसुविधा, पोस्ट चे स्टुडीओ, जनसामान्यांच्यात चित्रपट साक्षरता (Film literacy चे शब्दशः भाषांतर) जी आपल्याकडे अस्तित्वातच नाही ती वाढीस लावण्यासाठी काही उपक्रम असे काही असायला हवे. तर ती खरी आदरांजली ठरेल भालजींना. नुसते पुतळे आणि फोटो लावून नाही.
|
Tulip
| |
| Thursday, December 07, 2006 - 6:21 am: |
| 
|
अज्जुकाचे म्हणणे योग्य वाटते. नुसती नामधारी, पुतळाधारी स्मारके काही कामाची नाहीत. उलट भूईला भार दंग्यांना आमंत्रण असा प्रकारच होण्याची शक्यता. कर्तृत्वाचा सन्मान तेथे त्याच तोडीचे कर्तृत्व गाजवायची संधी देऊन करायला हवा. लताबाईंनी गृहसंकुला ऐवजी तिथे सुसज्ज स्टुडीओ, दुर्मिळ फोटो, स्क्रीप्ट्स असलेले संग्रहालय, film archive उभारले तर कुणाचाच विरोध रहाणार नाही. LT चे पोस्ट आणि त्याचा नंतरचा लालभाईंना उद्देशून केलेला विनोद मलाही अतिशय अप्रस्तुत आणि अयोग्य वाटला. जातींचे उल्लेख असे विनाकारण घुसडून भरकटत जाणे नेहमीचेच झालेय.
|
यामधे RK चा विषय आला म्हणून मी लिहितेय.. राज कपूरच्या मुलानी त्याची सगळी property विकली. फ़क्त RK सोडून. कारण राजने एकदा म्हटले होते की जर मी मेलो तर माझे प्रेत स्टुडिओत आणून ठेवा.. कदाचित lights, camera पाहून मी परत उठेन... त्याच्या मुलानी वडीलाच्या या भावनेला किम्मत दिली.. आजही RK तिथे मानाने उभा आहे.. सोन्यापेक्षा जास्त किम्मत असलेली जागा विकण्याचा विचार राजच्या नातवाच्यासुद्धा मनात नाही. तो तर studio सुधारायचा विचार करतोय. भालजी तर फ़िल्म industry तले अढळ स्थान.. त्याचे स्मारक नको.. पण त्याच्या कर्तुत्वाची कुठेतरी आठवण ठेवायला हवी... residential complex न बान्धता तिथे शाळा, कोलेज, मल्टिप्लेक्स असे बनवावे.. जर व्यवहारीपणाचा विचार केला तर अशा गोष्टीतच पैसा जास्त आहे आणि वर समाजसेवा केल्याचा मान ही मिळेल,, लताबाईच्या सुरावर आजवर आम्ही खूप प्रेम केलय. पण आता शेवटच्या दिअवसात त्यानी असे वागू नये..
|
Madya
| |
| Thursday, December 07, 2006 - 7:21 am: |
| 
|
आता studio ची जागा दुसर.या कश्यासाठी तरी वापरणार म्हणुन भालजींची सर्वाना आठवन येते आहे, इतकी वष्रे कुठे होते हे सर्व. जावुद्या हो.
|
Asami
| |
| Thursday, December 07, 2006 - 1:43 pm: |
| 
|
त्या निमित्ताने का होइना आठवण आली हे जास्त मह्त्वाचे नाही वाटत का ?
|
ह्य विषया ला असे जाती चे आनि वेगळेवळन लागेल असे वाटले नव्हते लालभाइ अगदी बरोबर आहे तुमचे इथे मुळ मुद्दा बाजुलाच राहीला असो खरोखरच भालजींच्या स्म्रुती या स्टुडिओ वाचाउनच जागवल्या पाहीजेत म्हनजे तुलिप ने सान्गितल्या प्रमाने हा स्टुदिओ सन्ग्राहालय म्हनुन वाचवयला हवा पन लताबाइ या आता व्यवहाराच्या गोष्टी करतात त्यांचे म्हनहे मी बाबांना त्या काळात मदत केली वगैरे वगैरे आता मुळ प्रश्न आहे तो की जर लताबाइ आपला हट्ट सोडनार नसतील तर सर्वांनी या साठी थोडी थोडी मदत करायची आनी लताबाइना स्टुडिओ च्या जागेची बाजारभावा प्रमाणे किमत द्यायची आनी कोल्हापुरातील बिल्डर लोकानी स्टुदिओ वाचवुन बाजुच्या जागेचा व्यावसायीक उपयोग करायचा यातुनही काही रक्कम जमा होइन लालभाइ अज्जुका तुलिप नंदीनी सर्वांचे आभार
|
>>> उलट क्षमता असूनही व्यापक दृष्टीकोनाचा अभाव तुमच्यात आहे, >> लालभाई आणि असामी, माझ्या पोस्ट बद्दल मी ठाम हे! आणि त्यात तसुभरही बदल करण्याची माझी इच्छा नाही येता काळच ठरवेल आणि दाखवुन देइल की नेमके काय कस हे बाकी तुमच चालुद्या! तिथ स्टुडिओ उभारा की सन्ग्रहालय की स्मारक(?) की अजुन काही, मी बापडा काय करणार? पुण्याच नेहेरू स्टेडियम जाणार अशी बातमी आजच्याच पेपर मधे आहे स्टेडियमच्या बाजुला असलेल्या बालभवनावर त्यान्ना हलविण्याच्या हालचाली चालुच हेत, असे प्रत्येक शहरातील मोक्याच्या जागान्च चालल हे त्याच बरोबर निरनिराळ्या शिक्षण सम्राट्टान्ना खिरापती सारख्या अत्यल्प मोबदल्यात शेकडो एकर जागा वाटणे चालुच हे जे सम्राट शिक्षन शब्दश विकताहेत मी बापडा काय करणार? माझ्या लिम्बोणीला नुस्त डीएड किन्वा बीएड करायच तर द्याव्या लागणार्या दोन अडिच लाख रुपये कॅपिटेशन फीच्या (किन्वा टेबला खालुन म्हणा हव तर) तजवीजी मधे असणार! जमल तर ठीक हे, नाहीच जमल तर नशिब तीच! देव अन दैवावर हवाला! पण नाही देव अन दैवा वर हवाला ठेवायला गेलो तर तिथे देखिल अन्धश्रद्धा निर्मुलन वाले माझी निर्भत्सना करायला हजर असतील. आजच रेडिओ वर कुठल्याश्या अजुन २७ टक्के रिझर्वेशनची बातमी ऐकली अन सक्काळि सक्काळिच लिम्बी नी बीऍडचा विषय लावुन धरला! तुम्हाला मान्य असेल वा नसेल पण आख्ख राजकारण जातीपातीन्वर आधारीत असताना, कोटी कोटी रुपयान्च्या पुरस्काराच्या खिरापतीच्या घोषणा होत असताना निव्वळ समाजकारणात मी एकट्याने माझी बामण जात लपवुन वा झाकुन वा नाकारुन काहीच साध्य होणार नाहीये, उलट पडला तर माझ्या पावला वर धोन्डा पडेल! हे सत्य जिथे तिथे अस्तित्वात हे, लताबाईही त्याला अपवाद नाहीत! >>>>>>><पण तपशिलातली चूक दाखवून द्यायची तर मंगेशकर कुटुंब ब्राह्मण नाहीत.> लालभाई, हा अगम्य शोध कुठुन लावलात? की बामण म्हन्जे फक्त पुणेरी सदाशिव पेठी कोब्राच अशी तुमची व्याख्ख्या हे? 
|
Peshawa
| |
| Friday, December 08, 2006 - 4:43 am: |
| 
|
तेलात आग http://en.wikipedia.org/wiki/Lata_Mangeshkar लाल्जी बोआ हेला हात दाखवून अवल्क्शन म्हनतात का हो? मन्गेश्कर म्हन्जी सारस्वत बामण!... अन अभिशेकी म्हन्जी क्र्हाडे बामन... तसेच पेंढार्कर म्हन्जी बी कर्हाडेच... म्हनुन लता बाइ अस वागत असतील का
|
Mahesh
| |
| Friday, December 08, 2006 - 5:56 am: |
| 
|
ती एक सुचना खरोखर फारच छान आहे. भालजींचे स्मारक म्हणुन एक वास्तु उभी करून, त्यामधे एका भागात संग्रहालय, आणी एका भागात छोटेसे चित्रपटगृह उभारावे. त्यामधे त्यांनी तसेच त्यांच्या समकालीनांनी बनविलेल्या कलाकृती दाखवाव्यात. तरच नविन पिढ्यांना काही कळू शकेल. जेव्हा पुल, गदिमा, सुरेश भट, ई. माहीती नसणारी मराठी बाळे (शब्दश्: नाही तर अगदी विशी तिशीतली) दिसतात तेव्हा काय वाटते हे सांगणे..... मंगेशकरांनी असे निर्णय का घेतले असतील हे त्या मंगेशालाच ठाऊक. कदाचीत आजकालच्या लोकांच्या आवडी पाहून आलेली उद्विग्नतादेखिल असेल. मला नाही वाटत की लताबाईंसारखी व्यक्ती आता पैशासाठी असे काही करेल.
|
>>>> मला नाही वाटत की लताबाईंसारखी व्यक्ती आता पैशासाठी असे काही करेल. एक्झॅटली महेश! पण ते सिद्ध करत बसायची गरज नाही प्रश्ण हा हे की अशा प्रकारच्या जागा "स्मारका" साठि सरकारच्या ताब्यात दिल्यानन्तर त्यातुन अस काय भरीव निष्पन्न होत? उलट लताबाईन्च्या हातीच ती जागा जास्त सुरक्षित रहाणार नाही का? त्यान्चे स्वतःचे काही प्लान असणार नाहीत का? की शेवटी मोक्याच्या ठिकाणावर लताजीन्च्या ताब्यात असलेल्या जागेच्या तुकड्याचा कुणाला मोह झाला हे असे समजले तर चूक काय? अन जे दादा कोन्डके व्यवहाराबद्दल काही एक आक्षेप पुस्तकातुन घेतात, त्यान्च्या स्वतःच्या "इश्टेटीची" सद्यस्थिती काय हे? ती जशी हे तसच भालजीन्च्या स्टुडिओच व्हाव अस वाटत असेल तर जरुर तो स्टुडिओ विधानसभेत ठराव पास करुन ताभ्यात घ्यावा!
|
Laalbhai
| |
| Friday, December 08, 2006 - 11:17 am: |
| 
|
ओह.. सारस्वत ब्राह्मण काय? मी समजत होतो की ती लोकं कोकणी. असो. क्षमा असावी. अर्थात, तरीही माझ्या मुद्द्यांमधे फरक पडत नाही. जात लपवून, झाकून ठेवावी असे कोणाचेच म्हणणे नाही. फक्त जातीच्या पलिकडे जाऊनही काही असते, याचे भान ठेवले तरी बरेच बरे होईल. अर्थात, व्यक्तीगत इछा आक्षांक्षा पूर्ण करताना आलेल्या frustration मुळे "व्यापक" विचारक्षमतेवर परिणाम झाला असेल तर कोण काय करणार? असो. चालू द्या तुमचेच! (अस्मानी म्हणाले ते शेवटी खरे.) तुमची तपशिलातली चूक काढण्याचा चुकीचा प्रयत्न केल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|