|
Chyayla
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:02 pm: |
| 
|
योगी, तुम्ही बरीच ओढाताण करुन पेशव्यान्ना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहेत पण तुमचे सगळे मुद्दे द्वेष्मुलक वाटतात तुम्ही या द्वेशाचे खरे कारण सान्गाल काय? पेशव्यान्चे राज्य काही जुलमी नव्हते. शिवाजी महाराज त्यान्च्या जागेवर श्रेश्ठच आहेत, शिवाजीन्ना गुन्ड म्हणणारे तुम्हीच आता ते तुम्हाला चान्गले वाटायला लागले, आता साक्षात्कार झाला की पेशवे वाईट काय म्हणाव आता. "हिन्दु स्वराज्य" स्थापन करण्याचा पराक्रम शिवाजीन्नी केला तोच आदर्श ठेवुन आम्ही पुढे जात आहोत, तुम्ही या कारण तुम्हाला शिवाजी महाराज चान्गले याची कमीत कमी आता तरी उपरती झाली म्हणजे कुठे तरी राष्ट्रवादी (पार्टी नव्हे) विचारान्चा प्रभाव पडत आहे, हे चान्गले लक्षण आहे. स्वराज्य टिकवुन ठेवणे शिवाय त्याचा विस्तार करणे त्यापेक्शा जिकरीचे काम, ते मह्त्कार्य पेशव्यान्नी केले, त्यामुळे त्यान्च महत्व तसुभरही कमी होत नाही. जोपर्यन्त मराठ्यान्च राज्य होत तोपर्यन्त ईन्ग्रजान्ना, आणी ईतर परकिय आक्रमकाना त्यान्चा धाक होता. ही आपल्या देशाला अभिमानास्पद बाब आहे. सेक्युलर (तुमच्या अर्थाने ) आणी जिहादीन्चा हा एक पेटन्ट प्रश्न की एल.टी.टी.ई ला हिन्दु दहशतवादी म्हणावे काय त्याच उत्तर कोणिही प्रामाणिकपणे देवु शकतो साधी गोष्ट आहे एल. टी.टी.ई. च्या मार्ग दहशत्वादी खरा पण त्यामागे जिहादीन्सारखी धार्मिक भावना नाही, किन्वा मुसल्मानान्ना सम्पवण्यासाठी तर नाहीच नाही, असो ईकडे कोणी त्यान्ना समर्थन पण देत नाही. गान्धी बद्दल आदर आहेच, त्याची व्यवस्थीत चर्चा झाली आहे, लगे रहो मुन्नाभाई च्या निमित्याने... या BB वर, तुमचे गान्धी बद्दल चे विचार तिथे द्या ईकडे अपव्यय होणार नाही. ही एक नेहमीची तर्हा आहे तथाकथीत सेक्युलरवाद्यान्ची, की मुद्दा न मान्डता उगीच प्रश्न निर्माण करायचा, आणी उत्तराची जबाबदारी समोरच्या वर. त्याचे सडेतोड उत्तर मिळाले की अजुन काही खुसपट शोधायचे, तुम्ही पण तेच करणार काय? तुम्ही या BB वर आता आलात, तरी तुमच्याकडुन मुद्याची आणी प्रामाणीक चर्चेची अपेक्षा करावी काय? लोपमुद्रा मुद्दे न मान्डता आन्धळेपणे हे गुड अन ते गुड म्हणताय. दुसर्याला म्हणन्याआधी तुम्ही स्वता:तर ऑफ़िस मधे बसुन शिव्याच देत आहात त्याबद्दल बोला, आणी तुम्हाला नेहमी स्वता:चे मुद्दे पराभुत झाले कि ते शिव्या वाटतात काय? मला वैयक्तिक काही बोलायचे नाही पण याचा तुम्ही प्रामाणिक पणे विचार करावा.
|
Dinesh77
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:24 pm: |
| 
|
अरेच्च्या, जर ५५ कोटी हक्काचे होते, तर त्यावेळी असणारे काही कोटी मुस्लिम पण हक्काचेच होते, ते देण्यासाठी नाही गांधीने हट्ट धरला. खबरदार जर नथुराम गोडसेंबद्दल अपशब्द वापराल तर!! आणि निःशस्त्र म्हातार्याचा खून करणे ह्यात कर्तृत्व नसेल तर तुम्ही जाउन मारा ना त्या माजी मंत्र्याना, बघुया हिम्मत होते का?
|
योगी sorry ह.. मी बलिदान शब्द वापरला..!!! आणि शिव्या शब्द लागला.. का.. Mr.chyaayalaa .. माझ्या कुठल्या post मध्ये तुम्हाला.. शिव्या दिसल्या... च्यायला तुम्हाला..(ह शिव्यांना शिव्या न म्हणता दुसरा शब्द असेल तर सांगा..) btw मी off मध्ये नाहिये.. आणि आमच सरकार अजुन इतक स्रिमनंत नाही झालेल की.. फ़ुकटात लोकांना internet वापरायला देइल..आणि नाव घेउन लिहितांना यापुढे विचार करत जा.!! ...
|
Yogy
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:48 pm: |
| 
|
भारतातील मुसलमानांना सुशिक्षित करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन देणे. त्यांच्यात अलगतेची भावना निर्माण न होऊ देणे. जातीयवादी शक्तींवर नजर ठेवणे हे काही मार्ग होऊ शकतात. सुशिक्षित नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की कोणी धर्माच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना शासन होण्यासाठी प्रयत्न करणे. सुदैवाने कॉंग्रेसचे धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेवर असल्यामुळे "पोटा" वगैरे जुलमी कायदे करून पुन्हा ते देशात अस्थिरता निर्माण करणार नाहीत. येथे चालू असलेल्या चर्चेचा स्तर फारच घसरला होता. दहशतवादाचे उच्चाटन म्हणजे मुसलमानांना नष्ट करणे अशी काही जणांची समजूत दिसली. जेवढे आपण या देशाचे नागरिक आहोत तेवढेच मुसलमानही देशाचे नागरिक आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांचेही प्रयत्न झालेले आहेत आणि होत राहतील. वर्षानुवर्षे दारिद्र्यात खितपत पडलेल्या या समाजाकडुन अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. "आपण" "त्यांच्या"साठी किती केले आहे हा मोठा प्रश्न आहे. गावांमध्ये कोणतीही चोरी झाली की जसे फासेपरध्यांना धोपटण्यात येते तसे आजकाल कुठेही खुट्ट झाले की मुसलमानांना जबाबदार धरण्यात येते. अशी संशयी वृत्ती सोडुन देणे आवश्यक आहे. आपण गांधींविषयी आदर व्यक्त केलात हे वाचून आनंद झाला
|
Yogy
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:59 pm: |
| 
|
Dinesh77 , नथुरामने केलेले कृत्य हीन दर्जाचेच होते यात शंका नाही. असे कर्तृत्व दखवून देण्याची काहीही गरज नाही. आणि ती आमची संस्कृतीही नाही. य दि फडके म्हणतात त्याप्रमाणे नथुरामचा होणारा गौरव हा सद्यस्थितीतील भारताच्या राजकारणातील गुन्हेगारीच्या शिरकावाशी सुसंगतच आहे. त्याविषयी अधिक काय बोलायचे.
|
Deshi
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:08 pm: |
| 
|
लगे रहो योगी. दारिद्र्याने खितपत पडलेला समाज, आपण त्यांचा साठी काय केले. वा वा वा. जरा ईतीहास वाचुन पाहा की राव कोणी कोणावर अत्याचार केले ते. आणी हो तुम्ही ही जातीयवादीच आहात. पेशवे म्हणले की ब्राम्हण मग काय शिव्या देन्याच्याच लायकीचे का? त्यांनी जे चांगले काम केले ते तर ईथे उगीच त्यांचा विरोधात लिहीन्यार्यांन्ना माहीती दिसत नाही. असो तो मुद्दा नाही. काय करनार. प्रत्येक वेळी हे मल्हार बाबा सारखे लोक आडवे येतात त्यामुळेच नजीबखानाला जोर चढतो व दत्ताजी त्याला बळी पडतात. हा घरभेद कधी संपनार काय माहीती. BTW मी मुस्लीम द्वेष्टा किंवा अति भगवापण नाही पण लोकांची व विधाने पाहीली की सत्य सांगावे वाटते. आणी LTTE ला तुम्ही हिंदु अतिरेकी म्हणता. क्या बात है. लगे रहो.
|
Deshi
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:12 pm: |
| 
|
सद्यस्थितीतील भारताच्या राजकारणातील गुन्हेगारीच्या शिरकावाशी सुसंगतच आहे. परत एकदा तुम्ही चुकीचे लिहीले. मोतीलाल नेहरुनी जवाहरलाल ला अध्यक्ष बनविन्यासाठी पैसे चारले होते. नंतरचे उदाहरण. गांधीना वापरुन सुभाषबाबुंना बाहेर पडायला लावले. ही गुन्हेगारी नाही तर काय आहे. सुरुवात तेथुनच आहे रे भाऊ.
|
Saurabh
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:31 pm: |
| 
|
hya characheche gade nehemichya rulawar alela disate ahe. Yogy :Tuesday, October 17, 2006 - 1:48 pm: hya post madhe mala muslimetar samajane tyanna 'samil karun ghenya' sathi kay karave hyache sundar margadarshan disate ahe. pan muslim samajane 'samil honya' sathi kay kartavye paar padavi hyabaddal koni bolu ichchit nahi? arthat te dekhil prathela dharunach ahe. bharateey lokashahi bahusankhyankapeksha aplasankhyankanmule chalate he bharatache ani tya lokasahahiche durdaiv!
|
Yogy
| |
| Tuesday, October 17, 2006 - 7:14 pm: |
| 
|
पेशवे ब्राह्मण म्हणून त्यांना शिव्या द्यायच्या वगैरे संकुचित विचारांचा मी नाही. माझे म्हणणे एवढेच होते की शिवाजी महाराजांना पेशव्यांच्या रांगेत उभे करून आपण शिवरायांना छोटे करत आहोत. पेशव्यांचे कार्य त्यांच्या जागी आणि त्यावेळच्या परिस्थितीत योग्य असेलही पण ते सर्वमान्य नाही आणि वादग्रस्त आहे. मात्र शिवरायांचे कार्य अतुलनीयच आहे यात शंका नाही. मुसलमानांनी काय करावे हे इथे सांगितले तरी ते वाचण्यासाठी आवश्यक असलेली साधने (उदा. महाजाल वगैरे) मला अभिप्रेत असलेल्या मुसलमानांच्याकडे नाहीत. ज्याना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्याना हे चोचले परवडणारे नाहीत. त्यामुळे त्याचा उपयोग नाही तथाकथित सुशिक्षित आणि tech savvy समाज त्यांना अलग पडू न देण्यासाठी काय करू शकतो ते सांगण्याचा मी प्रयत्न केला इतकेच. @ Deshi गांधीना वापरुन सुभाषबाबुंना बाहेर पडायला लावले>> याला राजकीय मुत्सद्देगिरी वगैरे म्हणता येइल, या गोष्टीची तुलना एका खुनाशी करणे म्हणजे अतीच झाले.
|
Chyayla
| |
| Tuesday, October 17, 2006 - 7:23 pm: |
| 
|
योगी, आमची तीच ईछा: आहे की मुसल्मान राष्टीय प्रवाहामधे सामिल व्हावे, म्हणुन तर हा सगळा खटाटोप आहे. पण त्यासोबत तुम्ही जिहादी दहशतवाद्यान्ना जी सहानुभुती दाखवता आहात, त्याला आमचा विरोध आहे, सीमेवरचे जवान स्वता:चे बलिदान देउन कित्येक वर्ष त्यान्ना शोधण्यासाठी महतप्रयासासाने सापडणारे अतिरेक्यान्ना पोकळ कायद्यामुळे सोडुन द्यावे जेणेकरुन ते परत हिन्साचार चालु ठेवतील. त्यासाठी पोटा सारख्या कायद्याची काय आवश्यकता आहे ते तुम्हाला ईथे नाही समजणार. दहशतवाद कसा सम्पवावा हे तुम्हाला शिवाजी महाराजान्नी अफ़जलखानाचा वध करुन जो आदर्श ठेवला त्याचेच उदाहरण देतोय कारण तुम्हाला आता शिवाजी महाराज चान्गले वाटत आहे. तुम्ही जर त्यान्ना गान्धीवाद शिकवलात तर पोटाची खरच आवश्यकता राहणार नाही, तेन्व्हा पोटा रद्द करु एकदम कबुल. सौरभच्या प्रश्नाचे उत्तर पण तुमच्याकडुन अपेक्शित आहे, आम्ही हे सगळे करु पण जिहादी मुसल्मानान्नी पण काय करावे ते सान्गाल काय? तुम्ही त्याना समजवयाची धमक ठेवता काय? विश्वास निर्माण करायला आज त्यान्च्याकडुन सुर्वात होणे आवश्यक आहे आणी पहिले त्यान्ची जबाबदारी आहे. काश्मिर मधे हिन्दु अल्पसन्ख्यक होते आता नाहीच्या बरोबर, तिथे कोण हिन्दु अत्याचार करायला किन्वा गरीब बनवायला गेले, मग ते का वेगळे होण्याची मागणी करतात? तुम्ही तुमच्या द्वेशाचे कारण नाही सान्गितले, राजकारणात मतभेत असु शकतात त्यात काही गैर नाही, पण जिथे राष्ट्राचा प्रष्ण येतो तिथे पेशवे हे इतिहासामधे अभिमानास्पद आहे. माझ्या कोणत्या पोस्ट मधे शिव्या होत्या ते सान्गावे, हा शब्द काढणारे तुम्हीच, परत विचारतो आमचे मुद्देसुद उत्तर तुम्हाला शिव्या वाटतात काय? मी पण ऑफ़िस मधे नाही.
|
Yogy
| |
| Tuesday, October 17, 2006 - 7:43 pm: |
| 
|
@chyayala शिव्या हा शब्द Deshi यांनी वापरला आहे मी आपला उल्लेख केला नाही. पहिल्या प्रथम "इस्लामिक दहशतवाद" ही phrase वापरणे आपण बंद केले पाहिजे. आज निर्माण झालेले बहुतेक प्रश्न हे अमेरिका आणि इस्रायल यांच्या धोरणांमुळे निर्माण झाले आहेत. दहशतवादावर उत्तर शोढण्यासाठी त्या प्रश्नाचे मूळ हे शिक्षणाचा अभाव हे आहे हे जाणणे आवश्यक आहे. येथे काही जणांनी मुसलमानांना हाकलून द्यावे, नष्ट करावे वगैरे "धाडसी" विधाने केली हे पाहून दु:ख झाले. मुसलमानांनीही या प्रयत्नात स्वत: होऊन सहभागी व्हावे. दुर्दैवाने मौलाना आझाद, किन्वा गांधीजींसारखा मुसलमानांचे प्रश्न कळकळीने समजावून घेणारा नेता आज आपल्याकडे नाही. सर्वाना त्यांची मते हवी आहेत पण सुधारणेची कोणाचीही इच्छा नाही. आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेउन कोणी देशात घातपाती कृत्ये करत असेल तर त्याला मदत न करणे व रोखण्यासाठी पुढाकार घेणे मुसलमानांनी प्राधान्याने केले पाहिजे. प्रसार माध्यमांनीही ह्या गोष्टि ठळकपणे पुढे आणुन दाखवल्या पाहिजेत. "प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो पण प्रत्येक दहशतवादी मुसलमानच असतो" वगैरे खोडसाळ SMS पाठवणे आपण बंद केले पाहिजे. उपाय खूप करता येतील हो. पण प्रश्न जाणुन घेण्याची आणि सोडवण्याची इच्छा पाहिजे.
|
Peshawa
| |
| Tuesday, October 17, 2006 - 8:14 pm: |
| 
|
माझे म्हणणे एवढेच होते की शिवाजी महाराजांना पेशव्यांच्या रांगेत उभे करून आपण शिवरायांना छोटे करत आहोत>>> नक्कीच मी आपल्या मताशी सहमत आहे. पहिला बाजी सोडला तर पेशव्यांचे राज्य हे सामाजीक न्यायाच्या बाब्तीत मोठा आंधारच होते. सगळ्याच आघाड्यांवर ते निश्प्रभ ठरले. केवळ राज्यविस्तार केला ही जमेचि बाजू होवू शकत नाही. स्वराज्य हे मोरोपंतानी शाहुला राजा केले तेंव्हाच संपले. त्यानंतर आलेले मराठा राज्य हे इतर अनेक शाह्यांसारखेच होते आणि इथेच औरंग जिंकला असे मला वाटते. कौटिल्य का गांधी? कृष्ण का बुद्ध? हा नसंपणारा वाद आहे...
|
Yogy
| |
| Tuesday, October 17, 2006 - 8:26 pm: |
| 
|
peshawa यांनी पेशव्यांच्या विरोधात लिहिणे म्हणजेच "मल्हार बाबा" की काय? दिवे घ्या हो
|
अहो योगी त्यांना जे खरे वाटले, ते त्यांनी लिहिले, उगाच विरोधाला विरोध करण्यात काहीच अर्थ नाहि.......... ईथ विरोध करणारे आणि दुसर्यांच्या चुका काढणारे भरपुर आहेत,पण मुद्देसुद उपाय सुचविणारे फ़ार कमी. मुसलमानां ना बाहेर हाकला असे सांगणार्र्यांनी, त्यांच्या मनातिल एखादा Plan तरि सांगायला पाहिजे, कि त्यांना कुठे आणि कसे हाकलले पाहिजे, व त्यानंतर उधभवणारी परिस्थिती कसी सांभाळायला पाहिजे............... काही लिखाण फ़क्त लिहायला आणि वाचायला चांगली वाटतात.......
|
Deshi
| |
| Tuesday, October 17, 2006 - 9:25 pm: |
| 
|
अरे ईथली लोपाची पोस्ट होती. refresh केल्यावर गेली.
|
Chyayla
| |
| Tuesday, October 17, 2006 - 9:49 pm: |
| 
|
शिव्या म्हणजे लोपमुद्राच्या पोस्ट बद्दल बोललो होतो... चला ठिक आहे अमेरिका आणी इस्रायल मुळे इस्लामी दहशतवाद आहे म्हणता... पुन्हा चुकलात, हा दहशतवाद आपल्यासाठी कैक शतके जुना आहे. काश्मिर तर या घटनान्च्या आधी पासुनच जळत आहे. शिक्षणाचा अभाव... तुमचा हा मुद्दा तर कित्येक वेळा चुकीचा आहे म्हणुन सिद्ध झाला आहे. ओसामा बीन, 9 / 11, 11 / 7 चे दहशतवादी हे सगळे उच्च शिक्षित आणी सधन आहेत. देशप्रेमी मुस्लिमान्ना कोणी विरोध करत नाही, कलामान्ना उगिच राष्ट्रपती केले नाही. तथाकथित सेक्युलर पिल्लावळच त्यान्च्यामधे भिती निर्माण करीत आहे अनुनयासाठी तर स्पर्धा लागली आहे व्होट ब्यान्केच्या राजकारणापुढे देश काय चीज आहे. तुम्ही मुळ न छाटता फ़ान्द्याच छाटत रहाल तर ह्या चुका होणारच. यावरही Root cause Analysis of Islamic terrorism च्या BB वर चर्चा झाली आहे. त्यान्ना राष्ट्रिय प्रवाहात आणन्याचा गान्धीन्चा प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरला व देशाचे २ तुकडे झालेच, तुम्हाला अजुन किती करायचे आहेत?
|
च्यायला तुम्ही परत नाव घेउन रवंथ सुरु केल का?तुमच द्विअर्थी post कळते बर.. तुम्ही गेला नाहि अजुन..?(मालेगावला हो ..) देशी मी चुकुन delet केली ती posT.... आणि ती इतकी मोठ्ठि होति परत लिहिने कंटाळा केला.. आणि आज फ़ाळणी झाली नसती तर तो general मुशर्फ़. सहित आज सगळे भारतात असते त्याच काय???
|
Pooh
| |
| Tuesday, October 17, 2006 - 10:47 pm: |
| 
|
राजकीय नेते (भाजप असो किन्वा कोॅन्ग्रेस) स्वत:च्या स्वार्थासाठी आणि मतांसाठी हे सगळे खेळ करतात ते याबब्तीत सगळ्यात दोषी अहेत. आणि आपल्या देशाचे हे दुर्दैव की सामान्य जनता आपपसात भांडत राहतात आणि यात फायदा फक्त राजकारण्यांचा होतो.
|
मुसलमानां ना बाहेर हाकला असे सांगणार्र्यांनी, त्यांच्या मनातिल एखादा Plan तरि सांगायला पाहिजे, कि त्यांना कुठे आणि कसे हाकलले पाहिजे, व त्यानंतर उधभवणारी परिस्थिती कसी सांभाळायला पाहिजे...............>>>.. upaay suchavaa kase kaadhaayche baaher.. गणेश ह खरय...... सांगतीलच आता सगळे.. उपाय..धीर धरु आपण थोडा वेळ..!!!
|
योगी...तुमच भारतातील मुस्लिमांबद्दल मत पटल..!!! माझा काही फ़ार अभ्यास वैगैरे नाहिये.. (तुमचा बराच दिसतोय, मला माहिति मिळेल म्हणुन.. काही शन्का..) सहज वाटले ते मुद्दे लिहिलेत.ॅहु.भु.द्या.घ्या. १.जगभर मुस्लिम दहशत वादाचा त्रास होतोय.. शिक्षणाचा अभाव हे कारण तर आहेच.. पण धर्माच्या आडुन चाललेय सगळे.. जो जास्त धर्मिक पणा दाखवतो तो.. त्यांच्यात great ठरतो.. मग समाजत चांगल म्हणवण्यासाठी. सगळे धार्मिक बाबित चढाओढ करतात..!!! २.जगात खुप श्रिमन्त मुस्लिम आहेत.. ते सुध्दा धार्मिक बाब्तीत उघड विरोध(?) करत नाहित. आणि मशिदिचा उपयोग कसा होउ लागलाय हे आता सगळ्याना माहित झालेय!!! ३.लादेन अजुन ही का सापडत नाहिये..? जर काही देश त्याला पाठिशी घालत आहेत तर आज जे अमेरिका सर्व श्रेश्ठ म्हणुन जगाला आपले निर्णय घ्यायला लावते..म्हणुन.. आपण ओरडतो तो आपला गैर्समज आहे. ४.मुस्लिम दहशत्वादाला रोखण्यासाठी.. त्यांआ शिक्षणातुन समज आली पाहिजे.. त्यंच्यापर्यन्त जागचे ड्नान पोहचत नाही असे नाही पण धर्मिक रीत्या त्यावर बन्दी आणुन.त्याना त्यापासुन दुर केले जाते..!!! मी इथे interview बघितला.. just want to share with you .. सुशिक्षित मुस्लिम family तल्या कर्त्या पुरुषाला.. अक्षरशा जबर्दस्तीने पळवुन नेले जाते आणी तो आणि पोलिस सुध्दा काहिही करु शक्त नाही.. तसेचेका हुशार विद्यार्थ्याला.. आनी त्याच पध्दतीने भेटायला बोलावुन पळवुन नेले जाते.. आणि असे खुप जण आहेत ज्याना जबर्दस्तीने त्या मर्गाला लावले जाते.. एके दिवशी फोन येतो.. आम्हाला भेटायला या.. दुसर्या दिअव्शी ती व्यक्ती गायब होते परत कुणालाही दिसत नाही.. त्या मुलाच्या british मैत्रिणिने खुप प्रयत्न केला फोन चा ट्रेस काढायच तर तो फोन कधी इराण मधुन कधी अफ़गाणिसतान मधुन असायचा.. हळु हळु फोन येणे कायम्चे बन्द झाले... हा कर्यक्रम bbc वर पाहिलाय.. !!! एक चर्चा म्हणुन सांगितलेय.. वाद न घालता चर्चा झाली तर उत्तम..!!! माझे काही मुद्दे चुक. भु.द्या.घ्या.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|