Santu
| |
| Tuesday, May 16, 2006 - 2:46 pm: |
| 
|
हुराक म्हण्जे फ़ेणी च्या अधिची stage
|
म्रुण्मयी... great असच वाटते!!! .. .. .. .. . .. . ..
|
मला शाकाहारी जेवनापेक्षा मासाहारी जेवण जास्त आवड्ते. ही घ्या मला आवडणार्या पदार्थांची यादी: १) चिकन मसाला आणि गरम गरम वडे.सोबत लिम्बू आणी कान्दा मीठ लावून. २) ओल्या बोबलाचं हिरवे कालवण आणी तळलेले कुरकुरीत बोबील, बरोबर गरम गरम पोळ्या. ३) तिसर्याचे शेन्गा आणि बटाटा घालून केलेले सुखे कालवण आणि भात. ४) काद्याची हूल घलून केलेला सुखा जवळा. वा आहाहा काय मस्त लागते म्हणुन सागु आणि सोबत नाचणी ची भाकरी. ह्यापेक्षा जास्त लिहिवत नाही भूख लागली.
|
Maudee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 7:23 am: |
| 
|
वालाच बिर्ड आणि भात..... घरी गेल्यावर लगेच वाल भिजत टाकायला हवेत
|
Gondhali
| |
| Friday, May 19, 2006 - 7:46 pm: |
| 
|
अरे काय तुम्ही मराठी ँमडळी, आपल्या मिसळ ह्या ऊच्च प्रकाराल विसरलात.. पुण्याची जोशी मिसळ (तुळशिबाग), नासिक ला साहेबा ची मिसळ, अम्बीका अनि तुषारची मिसळ म्हणजे फारच तोँडाला पानी सुटते
|
१. वालाच बिरडं-भात आणि तूप, नंतर परत बिरडं भात आणि दही, बरोबर ताजं ताजं कैरीचं लोणचं २. वरण भात तूप आणि बरोबर तळलेले सोडे किंवा सुकट,भरपूर तेल व कांदा घातलेली ३.भरली वांगी सोडे घालून व दही भात ४. कुरकुरीत भेंडीची भाजी,पोळी, वरण भात
|
Shonoo
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:17 pm: |
| 
|
भरली वांगी सोडे घालून? कृती लिहिणार का? नेहेमी आपली गोडा मसाला आणि कांदा भरून नाहीतर भगोरा बैंगन करून कन्टाळा आलाय
|
Bee
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:28 am: |
| 
|
सोडे म्हणजे काय पण..
|
Tanya
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:54 am: |
| 
|
शर्मिला..भरलि वांगी सोडे घालुन मस्तच! बी... सोडे म्हणजे छान वाळवलेली आणि साफ केलेली कोलंबी. इथे मिळते. dired section मध्ये.
|
Arch
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:16 pm: |
| 
|
मला, भरल्या वांग्याच्या भाजीच्या पातेल्याला पुसून घेतलेला भात, तसच तळली कोलंबीच्या (भरपूर लसूण,कांदा घालून परतलेली कोलंबी) किंवा तळले सोड्याच्या (कोलंबी सारखेच) पातेल्याला पुसून घेतलेला भात खूप आवडतो.
|
Chioo
| |
| Friday, June 02, 2006 - 7:37 am: |
| 
|
sharmila aani arch.. aata patkan ya kruti dya bar. bharalya vangyachi ani talali kolambichipan. nusata vachunch bhook lagate aahe. 
|
Nayana
| |
| Friday, June 02, 2006 - 12:13 pm: |
| 
|
मला watermelon वर चाट मसाला खुप आवडतो.
|
Nayana
| |
| Friday, June 02, 2006 - 12:15 pm: |
| 
|
Tanya पण इकड्च्या सोड्याला खूप घाण वास येतो.
|
Priyab
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:29 pm: |
| 
|
हे सोडे काय प्रकार आहे?
|
सोडे सोलून वाळवलेली कोलंबी... गोव्याकडे आणि सीकेपी (चांगलं खाणारे पिणारे) लोकांमध्ये खूप आवडीने खाल्ले जातात... 
|
Sayuri
| |
| Friday, September 22, 2006 - 10:09 pm: |
| 
|
गरम गरम मऊभाताचा एक थर थाळीत पसरायचा. त्यावर एक कच्चा पापड ठेवायचा. आता पापड दिसेनासा होईपर्यंत वरुन परत मऊभाताचा थर द्यायचा. वरुन साजूक तूप. सोबत मेथांबा आणि घट्ट दही. श्रीखंडावर topping म्हणून थोडासा आमरस घालायचा, मस्त लागतं हे combination !
|
Aditih
| |
| Wednesday, September 27, 2006 - 12:16 pm: |
| 
|
आज प्रथमच ह्या बीबी वर आले... काय झकास वर्णनं आहेत पदार्थांची..भारताबाहेर असल्याने हे सर्व वाचुन जाम खुष न होता उदास झाले... कुठे आलो आपला देश सोडुन असं वाटतंय.. किती गोष्टींना मुकतो आहोत.. असो..आलिया भोगासी... सर्वांनी खरंच खुप छान लिहीलं आहे.
|
Aditih
| |
| Wednesday, September 27, 2006 - 12:21 pm: |
| 
|
अरे .. माझ्या आवडीचा पदार्थ लिहायचा राहुनच गेला.. मला सर्वात जास्त काय आवडतं तर..माझ्या आईच्या किंवा आजीच्या हातचं डाळ्वांगं आणि भात .. त्यावर छान साजुक तूप...कधी मिळेल पुन्हा खायला ....
|
अगं आदिती इथे लिहिणार्यांपैकी कुणीच भारतात नाहीये. इथे आपणच बनवायचं आपल्याला आवडंतं ते. बाकी माझ्या आवडीचं जेवण.. वरण भात, बटाट्याची उकडून केलेली झणझणीत भाजी, पुरी किवा पोळी, आम्रखंड आणि पोह्याचा पापड.कैरीचं लोणचं असेल तर अजून छान!
|
Mrinmayee
| |
| Friday, September 29, 2006 - 10:21 pm: |
| 
|
वरदा, याला म्हणतात योगायोग!! आज रात्रीचा हाच स्वयंपाक आहे! साधं वरण तुप भात(भात पिवळा, जीरं हळदीची फोडणी घातलेला), पुर्या आणि बटाट्याची भाजी. फक्त आम्रखंडा ऐवजी श्रीखंड केलय. आणि पोह्याच्या पापडाऐवजी कुरडया आणि सांडगे तळलेत. मुगाचं बिरडं पण आहे आवडत असेल तर. येणार जेवायला?
|