|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 3:48 am: |
| 
|
जाऊबाईंनी केलेल्या मासवड्यात आणि पातोळ्यात खरच फ़रक आहे. मला तर ह्याचा आकार french fries सारखा दिसतो आहे. मिलिंदा : वर राहूल, च्यायला ह्यांनाही तोच गैरसमज झाला जो मला झाला. मी लिंक वाचली नव्हती पुर्वी आणि दरवेळी मी बहुद्या त्या लिंकवरचे फ़क्त नविन पोष्ट वाचतो. पुर्वीच्या पोष्टवर नजर जात नाही. असो. आता कटाक्षाने वाचत जाईन. प्रतिभा, एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तू पदर खोचून मारे तावातावाने भांडून गेली. हीच का ती मासवड्यांची शक्ती होती :-) इथे चिनी लोकांमधे मासाहरी पदार्थ इतके खातात की त्यांचे शाकाहारी पदार्थ दिसायला हुबेहुब मासाहारी पदार्थांसारखे दिसतात की एखादा शु. शा. मनुष्य ढुंकुनही तिकडे बघणार नाही. तशी ह्या मासवड्या नावाची गम्मत असेल.
|
Zpratibha
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:19 am: |
| 
|
बी मी भांडत वैगेरे नव्हते. पण तुझा बोलण्याचा रोख खरच मला कळत नव्हता, जाऊ दे, तुझे सगळे doubts clear झाले ना?
|
रोबिन्हूड.. मला मास वड्यांना.. काहीही म्हटले तरी त्या खुप आवडतात.. आणि पाहुणचार करणे आणि दुसर्यांना खाउ घालणे हा माझा आवडता छंद आहे.... आमच्या घरी येउन गेलेल्ल्यांना विचारा..!!!(किंवा येउन खात्री करुन घ्या..) आज काल काय खाष्ट सासुचे काम करताय की काय?
|
Mrudultai
| |
| Saturday, December 23, 2006 - 10:49 am: |
| 
|
mala majhya aaichya hatachi puranpoli,tasech Methichi rassa bhaji peeth lavun aani tyachyavar tel aani moharichi fodani. pan ti fodani dishmadhe ghetalyavar churrr asa ticha aavaz vhayala hava. aani maajhi aai gajaracha halava farrach chan karate---------- are baapre khupach bhook lagli
|
Santu
| |
| Wednesday, September 19, 2007 - 8:01 am: |
| 
|
चांभार्या ( माशाचे नाव) मासा नदित पकडुन लगेच तिथेच शेकोटिवर (नदिकाठिच) भाजुन नुस्ता मिठ लावुन खावा. मस्त लागतो बरोबर हुराक (एक हंगामी फ़ेणिचा प्रकार) असल्यास दिवसा तारे दिसतिल.
|
Zpratibha
| |
| Thursday, September 20, 2007 - 11:28 am: |
| 
|
बाहेर जोरदार पाऊस चालु असताना गरमागरम शेंगोळ्या आणि भाकर. कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या करतात. शेंगोळित वरुन थोडे कच्चे तेल घातले कि विचारुच नका.तोंडाला अगदि पाणी सुटलय.
|
Prajaktad
| |
| Thursday, September 20, 2007 - 7:51 pm: |
| 
|
अगदी ! अगदी ! एकदम जमेश बेत असतो तो...शेंगोळ्यांना तिखट जिलबी असही नाव आहे... भरपुर लसुण घालुन गरम शेंगोळ्या आणी गरम बाजरीची (पापुद्रेवाली) भाकरी त्यावर नुकतच केलेल लोणी.यंदाच्या भारतवारीत एका माऊलीने हा पदार्थ खावु घालुन जिभ तुर्प्त केली होती.
|
Zpratibha
| |
| Friday, September 21, 2007 - 4:48 am: |
| 
|
प्राजक्ता, आईला सांगुन इतक्या शेंगोळ्या बनवायला सांगायचो कि दुसर्या दिवशी परत तव्यावर तेल टाकुन गरम करुन नुसत्याच खायला पुरल्या पाहिजेत.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|