|
Zakki
| |
| Thursday, September 21, 2006 - 1:50 pm: |
| 
|
मला एक प्रश्न आहे. हे सगळे, म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे, क्यू न लावता घुसाघुसी करणे हे सर्व फक्त न शिकलेली, गरीब, ज्यांना माहीतच नाही की असे काही नियम असतात, असेच लोक करतात ना? नि त्यांची संख्या तर भारतात शिकलेल्या लोकांपेक्षा फारच जास्त आहे! शिवाय काही शिकलेले, श्रीमंत स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजतात नि त्यांना वाटते की त्यांना जिथे तिथे नियम मोडणे allowed आहे. म्हणून त्यांना शिस्त लावणे फार कठिण आहे. शिवाय लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य म्हंटल्यावर, 'तुम्ही कोण सांगणारे काय बरोबर, काय नाही' असा प्रश्न हि उद्भवतो. बरे, पोलीस तरी किती लोकांना पकडणार? नि कुणाला पकडणार नि कुणाला सोडणार? नि सगळे असेच वागत असतील तर मुलांनी काय शिकावे? बरे तर बरे, हे सगळे प्रश्न भारतातच आहेत. तिथे निदान उच्च संस्कृति, हुषार लोक, वगैरे असल्यामुळे काहीतरी मार्ग निघेल. अमेरिकेत बरे. कुणालाच फारशी अक्कल नाही नि यांची संस्कृति म्हणजे गंमतच आहे. म्हणून पहिल्यापासूनच त्यांनी ठरवले की सर्वांनी रहदारीचे कायदे पाळायचे, नि कुणि तोडले तर इथेहि पोलिस सगळ्यांनाच धरतात असे नाही, काळा, बाहेरच माणूस असला तर त्याला आधी धरतात. पण जज सुद्धा काही विचार न करता दंड भरा एव्हढेच म्हणतो. तो दंडहि असा जबरदस्त असतो की, खरे खोटे चांगले वाईट, लोकशाही इ. गेले खड्ड्यात, आपण आपले कायदे पाळावे, असे लोकांनी ठरवले! एकदा पोलीस ने पकडले नि जज ने निकाल दिला की लोकशाही, घटना सगळे पाळल्या गेले. त्याविरुद्ध तक्रार असेल तर बसा भांडत वरच्या कोर्टात, त्याच्या वरच्या कोर्टात इ. मग वकिलाच्या नि कोर्टाच्या फिया देण्यापेक्षा सरळ कायदा पाळणे सोपे!
|
Aschig
| |
| Thursday, September 21, 2006 - 9:11 pm: |
| 
|
झक्की, तुम्ही जरी एका प्रश्णाने सुरुवात केलीत तरी तुमचे नेमके म्हणणे काही कळले नाही. तुम्हाला असे सुचीत करायचे आहे का, की अमेरिकेत असाल तर कायदे पाळा, भारतात मात्र इतर लोक मोडतात म्हणुन आपणही मोडले तर हरकत नाही. सतीशनी काय समजावे? तुम्ही भारतात असता तेंव्हा काय करता?
|
Arch
| |
| Thursday, September 21, 2006 - 9:33 pm: |
| 
|
आमच्या एका मित्राचे वडिल middle class मधले. Typical middle class mentality वाले. म्हणजे मी कधी लाच देणार नाही ह्या तत्वाचे. flat विकत घेताना, black चा पैसा वगैरे देणार नाही कारण सगळा पैसा नोकरीत व्यवस्थीत tax वगैरे देऊन कमावलेला. दोन चार वर्षापूर्वी भेटले तेंव्हा म्हणाले माझ principle जरा modify करायला लागल आहे वयानुसार. मी लाच देणार नाही अस म्हणून चालत नाही आहे. मी लाच कधी घेणार नाही एवढच म्हणू शकतो. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी होत.
|
Lopamudraa
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:35 pm: |
| 
|
बरे तर बरे, हे सगळे प्रश्न भारतातच आहेत. तिथे निदान उच्च संस्कृति, हुषार लोक, वगैरे असल्यामुळे काहीतरी मार्ग निघेल. अमेरिकेत बरे. कुणालाच फारशी अक्कल >>>>>>>.. mhanaje kaay?
|
Zakki
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:46 pm: |
| 
|
म्हणजे उघड आहे! मी भारतात असताना मला असे सांगण्यात आले की आमची संस्कृति उच्च आहे, आमच्याएव्हढे हुषार लोक अमेरिकेत मिळत नाहीत, म्हणून तिकडचे लोक सर्व काही भारतात Outsource करतात वगैरे. म्हणून मी तसे म्हंटले! जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरच भारतीय लोक सोडवतीलच. अमेरिकेत जे चालते ते त्यांच्याकडे चालत नाही. म्हणून म्हंटले बरे झाले मी अमेरिकेत आलो. इथे माझ्यासारखे कमी बुद्धीचे लोक आहेत, मुकाट्याने कायदा पाळावा नि गप बसावे असा सोपा मार्ग त्यांनी काढला. भारतात हे असे चालणार नाही असे मला सांगण्यात आले.
|
Zakki
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:50 pm: |
| 
|
आस्चिग, तुझ्यासाठी परत लिहितो. मला दोन प्रश्न आहेत्: १. हे सगळे, म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे, क्यू न लावता घुसाघुसी करणे हे सर्व फक्त न शिकलेली, गरीब, ज्यांना माहीतच नाही की असे काही नियम असतात, असेच लोक करतात ना? नि त्यांची संख्या तर भारतात शिकलेल्या लोकांपेक्षा फारच जास्त आहे! 2. शिवाय काही शिकलेले, श्रीमंत, स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजतात नि त्यांना वाटते की त्यांना जिथे तिथे नियम मोडणे allowed आहे असे आहे ना? तर हे सोडून बाकीचे सगळे विसरून जा. ते खवचट पणे लिहीले होते. मला बाकी काही कळत नाही!
|
> > जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरच भारतीय लोक सोडवतीलच. आम्हा भारतीयांना ते सोडवू द्या हो... पण निदान 'वयाने' मोठ्या मंडळींनी 'वयाने' लहान मंडळींना असे mislead/misguide करू नये अशी माफ़क अपेक्षा!! एक दिवा मला आणि एक दिवा....
|
मी पूर्वी काही वेळा लाल सिग्नलला थांबायचा प्रयत्न केला होता. परंतु मागचे लोकं लालवरच जायला सांगतात आणि तुम्ही नाही गेलात तर घाण घाण शिव्या देतात. म्हणून मी शक्य असेल तरच थांबतो, नाही तर जावेच लागते. तुम्ही प्रयत्न करून बघा आणि अनुभव घ्या. Satish <<<< सतीश, अशाचवेळी teflon चा वापर करायचा असतो. शिव्या काही चिकटत नाहीत अंगाला. दिवा लाल असेपर्यंत त्याकडे बोट दाखवायचे आणी थांबायचे. Ashish <<<< tasech he paN baghaa, :-) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक (लोकजागृतीचा एखादा उपक्रम असावा) जाहिरात मालिका प्रसिद्ध झाली होती. यामध्ये, वर्तमानपत्रातील दुसर्या-तिसर्या पानावर- "तुम्ही रस्त्यावरचे भटके श्वान आहात काय?" असा प्रश्न ठसठशीत अक्षरांत विचारलेला असायचा. खाली "पहा: पान क्रमांक --- वर" असे लिहिलेले असायचे. आणि त्या सांगितलेल्या पानावर गेल्यावर, तिथे कृष्णधवल रंगात, विजेच्या एखाद्या खांबावर टांग वर करणार्या कुत्र्याचे छायाचित्र छापलेले असायचे. "आमची खात्री आहे, तुम्ही असे नक्कीच करत नसाल. जे करतात, त्यांना हा प्रश्न जरूर विचारा. आपले शहर स्वच्छ ठेवा आणि इतरांना तसे करायला भाग पाडा." अशा आशयाचा संदेश असायचा. या मालिकेत भरचौकात मोकाट ओरडणार्या गाढवाचे, किंवा सार्वजनिक ठिकाणी उलटी करणार्या मांजराचे वगैरे छायाचित्रे छापली होती. ही भाषा झणझणीत वाटते, पण शहाण्याला चांगलेच खजील करते. तुम्हीही करून बघा. एखादा ट्रेनमधून, बसमधून थुंकला किंवा कचरा टाकला, तर त्याच्याकडे त्याच्या आणि इतरांच्या लक्षात येईल असा जळजळीत कटाक्ष टाकून बघा. तसेच, एखादा स्वच्छतेचं / नियमांचं पालन करताना दिसला(चॉकलेट खाऊन कागद कुठेही फेकून न देता, स्वतःजवळ ठेवला, किंवा जाऊन कचर्याच्या कुंडीतच टाकला) तर जमल्यास त्याच्याकडे पाहून स्मित करायला काय हरकत आहे?
|
गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या सोसायटीतले ५-६ श्वान मालक आपल्या प्रिय श्वानांना इतरांच्या घरासमोर घाण करायला बसवतात. अनेक वेळा समजावून सांगून, भांडण करून देखील ते ऐकत नाहीत. आता तर ते भल्या पहाटे श्वानाला घेऊन येतात जेव्हा कुणीही जागे नसते. त्यामुळे नक्की कुणाच्या श्वानाने पोट साफ़ केले ते समजत नाही. रोज पहाटे उठून लक्ष ठेवणे अवघड आहे. ही सर्व सुशिक्षित मंडळी आहेत. पण हा तर बेजवाबदारपणाचा कळस आहे. अशा नालायकपणावर काहीही करता येत नाही.
|
Bee
| |
| Friday, September 22, 2006 - 7:09 am: |
| 
|
सिंगापूरमध्ये जेंव्हा रस्त्यावर अगदी चिटपाखरू नसताना जेंव्हा लाल लाईट लागतो तेंव्हा इथली लोक वाहणं येतं जातं नसताना counter 30 पर्यंत होऊ देतात आणि मग हिरवा दिवा लागला की हळूच रस्ता ओलांडतात. कार चालविणारेही योग्य वेळी आपल्या कारचा वेग कमी करतात आणि गाडी थांबवितात. पण इथे जे भारतीय आहेत, ते मात्र सर्रास ह्या नियमांच उल्लंघन करतात. कित्येक वेळा मीही असा लाल सिग्नल सुरू असताना परंतू एकही व्हेहीकल रस्त्यावर नसताना रस्ता ओलांडतो. तसे करण्यात मला कधी चूक किंवा आपण बेशिस्त आहोत असे वाटले नाही. पण इथली जनता हा नियम पाळतात, इतकेच नाहीतर गोरे लोकही तो नियम पाळतात. ह्याचे कोण कौतूक वाटते. मला वाटते, नियम न पाळणे ही आमच्या भारत देशात शिकवण आहे. काही जण पाळतात ते अपवाद आहेत.
|
Moodi
| |
| Friday, September 22, 2006 - 10:35 am: |
| 
|
हा किस्सा कदचीत मी कुठेतरी सांगीतला असेल. नगरला मी पुण्याला जाण्याकरता म्हणून थांबले होते. बस डेपोतुन नुकतीच स्वच्छ धुवुन आलेली. त्यात माझ्यासकट साधारण १० ते १५ माणसे, बायका. दोन मुलांनी(लहान नाही हं, चांगले मोठे ३० वर्षापर्यंतचे) शेंगा खाऊन खाली कचरा करायला सुरुवात केली, ते बघून कंडक्टर भडकला(साहजीकच आहे) तो म्हणाला आत्ताच बस साफ होऊन आलीय, तुम्ही ती टरफले तुमच्या पिशवीत ठेवुन बाहेर कचर्याच्या डब्यात का नाही टाकत? तुमच्यासारखे लोक कचरा करतात आणि वर बस साफ नाही, एस टी महामंडळ घाणेरडे असे ताशेरे मारता, काय करायचे मग आम्ही? तर ते दोन भामटे सरळ त्याच्याशी भांडायलाच उठले, आम्ही काहीही करु, तू कोण विचारणारा अशी उर्मट भाषा. वर कळस म्हणजे त्या मुलांचे कुणीही लागत नाहीत असे २ वयस्कर गृहस्थ आणि त्यांच्या बायका कंडक्टरशीच भांडायला लागले की तू कोण शिस्त लावणारा म्हणून. आधी याच लोकांचे त्या मुलांशी जागेवरुन वाजले होते. मी हा प्रकार खिन्नपणे बघत होते, एकतर दुपारचे ४ वाजलेले, माझ्याबरोबर मोठे कुणीच नाही. त्यावेळेस खरे तर मी कंडक्टरची बाजू घेऊन त्यांच्याशी भांडायला हवे होते, पण घाबरुन गप्प राहिले. आजही मला तो प्रसंग आठवला तर स्वतःची लाज वाटते. का नाही मी त्या लोकांना डाफरु शकले? स्त्री म्हणून शांत बसणे का पसंत केले? वास्तवीक लहानांनी चूका केल्या तर मोठ्यांनी समज द्यायला हवी पण शिस्त पाळणे, स्वच्छता राखणे आपले भारतीय लोक गुन्हा का समजतात?
|
Moodi
| |
| Friday, September 22, 2006 - 10:50 am: |
| 
|
दुसरा प्रसंग. मी ३ वर्षापूर्वी जुलैत युकेत आले. आमच्या शहरात कमालीची शांतता( अर्थात ती परदेशात सर्वत्र आहे) अनुभवुन आम्ही आपल्या काही भारतीय वस्तुंकरता म्हणून इथले साऊथॉल म्हणून जे भारतीय आणि बाकी एशियन वस्तीचे शहर आहे, तिथे गेलो. एकतर २ महिने शांत वातावरणाची सवय आणि तिथे गेल्यावर सगळ्या रस्त्याने पंजाब्यांचे भांगडा संगीत, कर्णकर्कश्य स्वरात लावलेल्या टेप्स, तेवढ्याच वेगाने जाऊन कर्रकच्च असा आवाज करणार्या गाड्या, त्यांचे भयाण हॉर्न्स, रस्त्याने समोरुन बस येतीय तरी पळापळी, पकडापकडी अरे देवा! माझे डोके भणाणून गेले. भारतात आपण असे आवाज, संगीत आणि बरेच काही अनुभवतो, पण आपलेच वातावरण, उत्साह, सोहळे त्यातुन आपल्याला ती सवय झालेली असते. इथे ते सहन होत नाही. मी नंतरही गेले होते तिकडे पण आता जरा धसकाच बसलाय. अरे परदेशात व्हा ना स्थायीक, कोण नको म्हणते, पण त्यांच्या देशानुसार, शिस्तीनुसार वागा ना, कशाला आपण भारतीय, संगीताचे रसिक म्हणून डांगोरा पिटवायचा? त्यांनी जर आपल्या गोव्याच्या किनार्यावर असे हिप्पी डान्स केले तर आपण ओरडतो की आपली संस्कृती खराब होते, मग आपण नाही का तितकेच जबाबदार? आपल्या इथे पण गणपती नवरात्र यात ध्वनी प्रदुषणामुळे मर्यादा घालुन दिलीय, तरीही लोक ओरडतातच, की अजून ती वेळ वढवा म्हणून. कशाला? त्या हिमेशाच्या तालावर आणि भसाड्या आवाजावर नाचायला सांगीतले का तुम्हाला देवी देवतांनी? पण नाही, हम करे सो कायदा..
|
परग्रहावरुन आल्यासारखे वागणे.. आमची पृथ्वी कोणिच लागत नाही असे वागणे... आणि वटेल ते करणे.. भारतात हे इतके रुजलेय की लोक्शाही चा तोच अर्थ घेतलाय सगळ्यानी... अगदी पॉश होटेल असले तरी त्याचे kitchen अस्वच्छ असते.. सार्वजानिक जीवनातुन.. ठिकाणातुन त्या त्या समाजाची संस्क्रुती दिसते म्हणतात.. संस्कृतीक मंत्र्याच्या भाषणातुन नाही..!!! या लोकांशी डोके लावणे महा कठिन काम असते...
|
भारतात बसच्या प्रवासात पान खाउन थुंकणार्य आची मी तक्रार केली नाही आणी त्याच्याशी भांडली नाहीइ असा एकही प्रवास गेला.. नाही मग मी बसने प्रवास करणेच सोडले..
|
Soultrip
| |
| Friday, September 22, 2006 - 12:52 pm: |
| 
|
माझ्या मते, हा प्रश्न civic education चा आहे. वाहतुकीचे नियम समजुन घेणे व ते पाळणे, रस्त्यात, चालत्या बस्-रिक्षामधुन न थुंकणे, जिन्याच्या कोपर्यात न थुंकणे, public place मधे defecation न करणे वगैरे गोष्टी (आपण ज्याला basic things or common-sense or civic sense म्हणतो) बर्याच जनतेला माहितच नसतात! PMC, RTO आणी NGO नी या बाबतीत पुढाकार घेतला तर बरेच काही करता येईल. उदा: १. प्रत्येक दोन वर्षांनी traffic-rules ची परिक्षा सर्व चालकांना mandatory करणे. ( assumption- there is no corruption here, no agents so all will study traffic rules thoroughly ) २. नागरी-शिक्षणाचे ( i.e. civic education ) चे वर्ग वॉर्डा-वॉर्डातुन दर वर्षी घेणे. ( at least those slum areas where we know illeteracy is more ) त्यासाठी त्या वॉर्डातील नगरसेवक पुढाकार घेतील. (तेवढंच एक तरी नेक काम ते करतील अशी वेडी आशा!) ३. Slums शेजारी, तसेच गर्दीच्या रस्त्यांच्या आसपास सुलभ शौचालये ( pay & use )बांधणे.
|
Zakki
| |
| Friday, September 22, 2006 - 2:43 pm: |
| 
|
पण निदान 'वयाने' मोठ्या मंडळींनी 'वयाने' लहान मंडळींना असे mislead/misguide करू नये अशी माफ़क अपेक्षा!! अरे असे कुणाचे सांगून भारतीय लोक ऐकतात का? वांदा असा की कुणिच काऽही ऐकत नाही. ज्याला त्याला लोकशाही, तुम्ही कोण सांगणारे हे म्हणता येते, पण तरी घाण करतच रहातात! तिथे guide/misguide होण्याचा प्रश्नच येत नाही!
|
खरच भारताबाहेर गेल्यावर... आपल्या देशाचा ( आणि देशांतर्गत गोष्टींचा ) इतका त्रास होतो ?? आणि होतच असेल तर का व्हावा हा प्रश्न आहे.. म्हणजे कालौघामधे देशासमोर असलेले महत्वाचे प्रश्न अजूनही ठाण मांडून आहेतच... नाही म्हणजे इथल्यां सारखे कित्येक लोक परदेशात जायच्या आधी इथेच वाढले न.. तेव्हाही होतेच कि प्रश्न.. पण आता प्रश्न जास्त पोटतिडकीने मांडले जातात NRI मंडळींकडून !! मला एवढेच म्हणायचे आहे परदेशातील सुख सोयींच्या आपण इतके आधीन झालो आहोत का कि आता.. जे प्रश्न खुद्द आपण अनुभवले देशात असताना.. ते आत्ता जरा जास्तच बोचायला लागले आहेत ??
|
Moodi
| |
| Friday, September 22, 2006 - 3:13 pm: |
| 
|
ते आत्ता बोचायला लागलेत असे नव्हे तर तेव्हाही बोचतच होते. त्याच्या तक्रारीही संबंधीत अधिकार्यांकडे नंतर करुन झाल्या होत्या, पण उपयोग झाला नाऽऽऽही. आपल्या पुण्यातच एका बिल्डिंगमध्ये मी पाहीलय की लोक येता जाता थुंकतात, तंबाखू, गुटखा आणि पानाच्या पिचकार्या मारतात, नाक शिंकरतात( किळस वाटते ना हे वाचायला सुद्धा?) म्हणून अक्षरशः जिन्यात देवी देवतांचे फोटो लावले पण उपयोग? शुन्य!!
|
Moodi
| |
| Friday, September 22, 2006 - 3:21 pm: |
| 
|
आमच्याच सोसायटीत(भारतात) एक प्रचंड श्रीमंत व्यापारी कुटुंब( कट्टर शाकाहारी हं) रहातं. घर बायकांनी आरशासारखे लखलखीत ठेवायचे आणि बाहेर बाल्कनीतुन खाली खरकटे,कचरा फेकायचा आणि त्यांचे मालक( पक्षी : नवरा, सासरा), मी वर आधीच्या पोस्टमध्ये लिहीलेले उद्योग करतात, त्यांना कसलीच लाज, शरम, संकोच वाटत नाही. आणि दुसर्यांना धडे देणार चातुर्मासाचे. परदेशातच गेल्यावर हे लोक जरा गप्प असतात, कारण मग असे काही केले तर इथले अधिकारी त्यांची चार लोकांसमोर काढतील ना. एकदा बोलुन झालेय, पण सोसायटी अजून रजीस्टर्ड न झाल्याने कुणाला सांगायचे हा प्रश्न असतो. लोक ब्लॉक सिस्टीम पसंत न करता बंगले का बांधतात, ते मला तेव्हा कळले.
|
अगदी बरोबर आहे तुमचे !! माझा मुद्दा बहुदा तुमच्या लक्षात नाही आला ह्याच BB वर मधे एक लाचलुचपतीचा विषय होता.. तसाच नियम तोडण्याचा... भारतात असताना.. इथल्या so called System मधे असताना आपल्या हातून अशा व अनेकविध चुका झाल्या असतील... with utmost respect to honest intentions तरी सुद्धा आपण.. असल्या प्रकारांना बळी पडतोच... मला सांगा इथे बोलणार्या किती लोकांनी घराचा सातबाराचा उतारा out of the way न जाऊन करून आणला... तसेच किती लोकांनी घराचे registration लवकर व्हावे म्हणून Muncipal Corp मधे जाऊन चिरीमिरी नाही दिली ??? काही सन्माननीय अपवाद असतीलच... मी तर म्हणतो ज्यांनी ( नाईलाजाने ) दिली त्यांचाही सहसा दोष नसावा.. पण मग म्हणून त्यांनी इथली system अशी खराब आहे आणि तशी वाईट आहे, अशी खडाजंगी करू नये... जे परदेशस्थ लोक आहेत त्यांच्यातील बहुतांश लोक भारतात आल्यावर ह्या आपल्या system ल बळी पडले असतील / आहेत / पडतील ते सद्ध्या ह्या system मधे नाहीत म्हणून system वर comment करणे कितपत योग्य आहे
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|