Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 21, 2006

Hitguj » Views and Comments » General » Quit India, Be NRIs (& Help India!!) » Archive through September 21, 2006 « Previous Next »

Yogibear
Wednesday, September 20, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Daku: आशा आहे की आपण देशात इथल्या nickname प्रामाणे नसाल! म्हनजे डाकू नसाल ओ... ;o)

Jokes apart...

>> Pan IIT aani IIM che lok lokanchya paishatun shikatat aani baharata madhe job na karata pardeshat jaun paisa kamawtat yane nakkich bahrtache nuksan hote.

मलासुद्धा नेहेमी असेच वाटते की त्यांच्या कडुन NDA सारखा bond का नाही लिहुन घेतला जात!!!

Safaai
Wednesday, September 20, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोलट्रीप महाशय चुकले आहेत असं मला वाटत नाही, त्याहून त्यांनी भारताविषयी अनुदार उद्गार काढले आहेत असंही वाटत नाही

आणि ते quit india असंही सांगत नसावेत, त्यांच पोस्ट थोडं परदेशात राहणार्‍यांचं guilty feeling कमी करण्यासाठी आहे असं मला तरी वाटलं


Kedarjoshi
Wednesday, September 20, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर त्यांनी कुठलेही अनुदगार काढले नाहीतच उलट ते नेहमी भारत या विषयी मनातुन बोलतात असा माझाही अनुभव आहे.
माझे मत फक्त NRI financial help किती सत्य व किती खोटे यावरच आहे.

बी अरे याच कविने पाक वेगळा हवा ही हुल काढली व नंतर त्याला सर्वांची साथ मिळली. Just FYI


Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच कविने पाक वेगळा हवा ही हुल काढली व नंतर त्याला सर्वांची साथ मिळली. Just FYI
khar aahe...!!!manas kiti badalaat..

Peshawa
Wednesday, September 20, 2006 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=140970

... ... ... ...

Sahilshah
Wednesday, September 20, 2006 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kedar,

As per statistics NRI remits US$21.7B per year following is the link. . This is more tan 20% of the export. This figure is almost equal to our trade deficit
60% of the remittance come from middle east.
http://www.saag.org/%5Cpapers20%5Cpaper1903.html

Chyayla
Wednesday, September 20, 2006 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोउल्त्रिप, तुम्ही तुमची भारताविषयी प्रेम आणी मदत या बद्दल जी तळमळ दाखवली ते अभिनन्दनीय आहे, पण ह्या "BB" वर मागुन जे विचार आले की, भारतात Pollution, Population, corruption, system, work ethics. वैगेरे म्हणुन भारतात रहायला नको ते काहि पटले नाही. खरेच आपण ज्या प्रमाणे ईतर देशात वागतो ( भ्रष्टाचार न करता) त्याप्रमाणे आपणही भारतात वागलो तर, आज ना उद्या नक्किच चान्गला बदल घडुन येइल.

देशि आणी जोशीन्नी जो मदतीचा प्रश्न काढला त्यावर माहितीसाठी लिहित आहे.
मी माझ्या परिने मदत म्हणुन वनवासी कल्याण आश्रम, एकल विद्यालय जिथे गरीब आदिवासीन्च्या मुलान्ची शिक्शणाची व्यवश्था व छात्रावास आहेत, त्याना निधी पाठवतो, निदान एका मुलाचा तरी वर्ष भराचा खर्च उचलला तरी फ़ार मदत होते, ह्या अशा सन्स्था आहेत कि त्यान्नी अजुनही स्वता:ची विश्वासहर्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे एक समाधान वाटते की आपण केलेली मदत योग्य आणी गरजु व्यक्तिला पोहोचते. तिकडे हे सगळ साम्भाळायला पण सेवानिव्रुत्त जोडपे, जे साधारणता: मध्यम वर्गिय परीवारातुन किन्वा तुमच्या आमच्या सारख्याच परिवारातुनही आले आहेत, एक वानप्रस्थाश्रम ची सन्कल्पना साकार करत आहे, खरे म्हणजे अशा सेवाभावी भावनेतुन काम करणार्या व्यक्तिन्ची फ़ार गरज आहे, पण निदान आपण ईथुन धनाच्या रुपाने तरी मदत करु शकतो



Zakki
Thursday, September 21, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलेश, संदर्भ असा की 'Brain drain' हा काही महत्वाचा मुद्दा नाही. माझ्या वर्गात, B.Tech. ला माझा चौथा नंबर आला. पहिले तिघे भारतात राहिले. आमच्या मास्टर्स कोर्स ला Ind. Inst. of Sci., Bangalore इथे नऊजण होते. आठ तिथे राहिले, एकटा मी इथे आलो. माझा नंबर नक्कीच पहिल्या तिघात नव्हता.

त्या सर्वांनी भरपूर चांगल्या ठिकाणी नोकरी करून अत्त्युच्च करियर केले. कारण तेच खरे हुषार जे सर्व परिस्थितीतून मार्ग काढतात नि यशस्वी होतात. तुम्ही भारतात असा नाहीतर परदेशात! माझा एक मित्र इथे पंचवीस वर्षे राहून आता गेली पाच वर्षे भारतात रहातो आहे. त्याचे म्हणणे असे की, problems सगळ्या जगात असतात, जिथे तुम्हाला त्यातून मार्ग काढता येईल, तिथे राहावे, पण भारताला विसरू नये. प्रत्यक्ष काम करायला आला नाहीत तरी चांगल्या संस्थांना मदत करा, तुमच्या तेथील ओळखींचा, भारतातील धंदा वाढवणार्‍यांना फायदा करून द्या. म्हणून त्यांना मी फार मानतो.

त्या ऐवजी, मी! अत्यंत सोपा मार्ग स्वीकारला. अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळायला फारशी अडचण नव्हती, घेतले ग्रीन कार्ड, नि आलो इथे सुखाचे आयुष्य जगायला! इथले problems मला सोडवता आले, ते सोडवले, नि मजेत राहिलो. भारतातल्या गोष्टी, चांगल्या असो की वाईट, मला जमल्या नाहीत.





Kedarjoshi
Thursday, September 21, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sahil
सोल्ट्रीप नी RBI ची साईट दिली आहे. साग ही साईट RBI पेक्षा authentic आहे का?
शिवाय ते जे २२ b म्हनतायत ती फिगर आणी rbi च्या तक्तातील फिगर जुळत आहे. RBI ने जो तक्त दिला आहे तो १९९१ ते २००५ पर्यंत्चा आहे व साग पण २००५ साली २२ B आले असे सांगते. याचा अर्थ साग चा डेटा अर्धवट आहे असे वाटत आहे त्यांनी २२ b ही फिगर उचलली व २००५ हे साल उचलले असे वाटते.

बाकी काही माहीती असेल financial data वर तर मी पण शोधतो. पण RBI चा डेटाच सर्वात महत्वाचा ठरेल असे मला वाटते.
ह्या शिवाय काही NRI Personal financial help असेल तर मी माझे मत नक्की बदलेल हि खात्री देतो.

पेशवा सही माहीती.

च्यायला. हो मी पण एका मुलाला शैक्षनीक दृष्ट्या दत्तक घेतले आहे. Care चा मी सद्यस आहे. but the thing is whatever money you send legelly will again be part of total figure so its not much, per my earlier post 1.5b p.a.

आता कोणी म्हनेल की ही फिगर छोटी अस्ली तर काय काही तरी जात आहे, पण त्या साठी you dont have to quit, you can stey and help . मुद्दा असा की we, NRI personal funds are not huge, so it will not make any huge diff lifting Indias standard.

आणी सर्वात महत्वाचे म्हणजे बदल करायला माणस लागतात पैसे नाही. पैसे जमवता येतात.



Bee
Thursday, September 21, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर आहे केदार तुझे शेवटले वाक्य. पैसे मिळतात पण क्रान्ती घडवून आणायला माणसे लागतात.

अशिष, अगदी खरे आहे..

इक्बालबद्दल मला हे माहिती नव्हते..

अजुन मुद्दे येऊ द्या..

झक्की, तुमची मते प्रान्जळ आहेत पण जमले नाही म्हणजे नक्की काय भावना होत्या तुमच्या त्या वेळी किंवा आत्ता उतारवयात :-)


Chyayla
Thursday, September 21, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार तुम्हीपण अश्या कार्यात सहभागी आहात, वाचुन आनन्द झाला.

माझ्या मुद्यामधे व्यक्तिन्ची आवश्यकता आहेच ते नमुद केले आहे, पण ईकडुन आपण नाही देउ शकत ती मदत मग निदान पैश्यानी तरी मदत करु शकतो ना, जेणे करुन जे या कार्यात आहेत त्यान्ना हातभार तरी लागेल असे माझे मत आहे.


Asami_asami
Thursday, September 21, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गेल्या ४ वर्षापासून जपान ला आहे आणि पुढील २ वर्षात भारतात परत जाणार आहे.(नक्कीच:-)). काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे मी पण सेवाभावी संस्थांना आर्थीक मदत करत असतो. पण परत गेलेच पाहिजे असे माझे ठाम मत आहे. मला Zakki ना विचारायचे आहे की त्यांच्यात असलेले "देशप्रेम" अथवा "देशाबद्दल असलेली आपुलकी" ही त्यांच्या मुलांमधे सुद्धा तेव्हढ्याच प्रमाणात उतरली आहे का? माफ़ करा प्रश्न Personal झाला पण समजदारांना मी हा प्रश्न का विचारला हे नक्की कळेल. तसेच त्यांनी अजून chyayla च्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.(why he himself could not/did not provide such a manager to India?)



Zakki
Thursday, September 21, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, कामाच्या ठिकाणी भावना वगैरे नसतात (नसाव्या). मला इथे राहून जी कामाची पद्धत असते त्याची सवय झाली होती, तश्या अपेक्षा होत्या, त्यासाठी मदत करायला तयार होतो, पण नेहेमी आपले 'तुम्ही अमेरिकेतून आला म्हणजे जास्त शहाणे झाला का?' 'तुमच्या अमेरिकेतले इथे चालत नाही, आमची पद्धत ही अशी आहे' बरेचदा 'डिग्निटी' चा प्रश्न उभा राही. 'मी का म्हणून तो कागद त्याला द्यायचा? प्यून येईल नि देईल, तोपर्यंत काम अडले तरी माझा दोष नाही, मला माझी डिग्निटी संभाळली पाहिजे' इ.

आमच्याकडे हे असे फार क्वचित्, आणि झाले तर मॅनेजर कडून काम करून घेता येते.
भारतात ते जमले नाही. त्यातून वर लिहिल्याप्रमाणे मी ना हुषार ना माझ्यात काही गुण! सहज जमेल तर बघायचे.
असे झाले त्याचे भारतात येऊन काम करण्याबद्दल.

असामी_असामी, तुझा प्रश्न चांगला आहे. माझ्या माहितीत जी मुले वारंवार भारतात गेली नाहीत त्यांच्यात भारताबद्दल काऽही विशेष आपुलकी दिसून येत नाही. पण काही मुले मोठी (१८, १९ ची) झाल्यावर जास्त दिवसांसाठी भारतात राहिली, ती (भारतीय) मराठी बोलायला शिकली, त्यांना भारत आवडला, पण ते इथले नागरिक झाले, त्यांनी इथल्या राष्ट्रांशी प्रामाणिक राहू अशी शपथ ( pledge ) शाळेत दररोज घेतली. त्यांच्या मते, आहेत की तिथे हुषार लोक, करतील त्यांचे ते. मी तिथे कशाला जाऊन रहायला पाहिजे?

जेंव्हा आमची मुले लहान असताना (१३, १४), भारतात जायला नाखूष असत, तेंव्हा मी माझ्या सर्व वीस पंचवीस मित्रांना पटवून दिले की त्याचे कारण आपण पालकच! आपण नेहेमी भारतातून परत आलो की तिथल्या लाचलुचपत, प्रदूषण, इ. फक्त वाईट गोष्टींचे वर्णन अगदी रंगवून रंगवून सांगतो. मुले ते ऐकतात, मग म्हणतात तिथे इतके वाईट आहे तर मी कशाला जाऊ तिथे?

अपवाद माझ्या भाचीचा. तिने येऊन सांगीतले की भारतातले लोक अतिशय प्रेमळ. मी चार वर्षानी गेले तरी माझ्या मैत्रिणि आवर्जून येऊन माझ्याशी बोलतात, मला फार बरे वाटते. त्याउलट इथल्या मुली, मुले! एका सेमेस्टरला बरोबर नसलो तर नंतर, 'कोण तू?' ती कॉलेजची चार वर्षे भारतात राहून आली. पण आता बाकी सगळे इथे, नि अस्सल भारतीय नवरा सुद्धा इथेच येऊन राहिला, म्हणून इथे आहे, पण ती स्वत:च्या मुलांना आवर्जून परत परत भारतात नेते, नि त्यांना चांगल्या गोष्टी सांगते!




Moodi
Thursday, September 21, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की एकदम बरोबर. उगाच कौतुक किंवा वेगळेपणा नाही तर हेच सांगायचे आहे की हे लोक काम, शिस्त, व्यवहार याला खरच महत्व देतातच. ऑफिसमध्ये गरज असेल तर बॉस सुद्धा टेबलपाशी स्वत येऊन सांगतो की मला अमुक अमुक काम करुन हवेय( मी नोकरी नाही करत हे माझ्या नवर्‍यानेच सांगीतलेय, कारण त्याचा बॉस अमेरीकन आहे, कदाचीत याचमुळे काही लोक भारतात परतायला नाखुष असतात, कारण इथे बॉस असो वा मॅनेजर आपली जबाबदारी ओळखुन वागतात आणि वागवतात. पण तरीही परतायचे आहेच कारण आपला देश आणि आपली माणसे)

दुसरे उदाहरण आपल्या भारतातले. माझे मोठे काका रेडीओ इंजीनीअर म्हणून मुंबईत कार्यरत होते, काही महत्वाच्या फाईल्स त्यांना दुसर्‍या ऑफिसमध्ये नेऊन द्यायच्या होत्या, त्याच वेळेस काही दुसरे लोक ऑफिसमध्ये त्यांना माहिती विचारायला आले म्हणून त्यांनी शिपायाकडे त्या दिल्या आणि पोचवायला सांगीतल्या, तो जागचा हलेना. म्हणाला माझे आत्ताच जेवण झालेय, नंतर पोहोचवेन. ते पाहुन ते स्वतःच त्या फाईल्स देऊन आले. ते युके मधल्या एअरपोर्ट्सवर १० वर्षे काम करत होते, नंतर परतले भारतात कायमचे पण मुळात संघाचे काम करत असल्याने जी शिस्त होती ती पण कायम राहिली.

परदेशात जी वागणूक मिळते, नेमकी तीच तुम्हाला भारतात मिळेलच अशी गॅरेंटी देता येत नाही. पण मला वाटत की भारत आय टी मध्ये बराच पुढे गेल्याने तिथे पण प्रोफेशनल वातावरण आलेय. बदल होईलच हळू हळू, पण आत्ता जे आहे त्याच मुळे असे प्रश्न आपण विचारतोय.



Sahilshah
Thursday, September 21, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

दोन्ही site ची माहीती बरोबर आहे. RBI is telling of NRI deposit मी दिलेली site is talking about total remittance
here is one more link of telling 2005 remittance is more than US20B. most of the money comes from middle east which will be spend by their families. Some people use it to purchase properties. NRI saving (NRE & FCNR) is in the range of US1~2B per year only.

http://www.hindu.com/2006/01/12/stories/2006011209261300.htm

Zakki
Thursday, September 21, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि अगदी बरोबर. आशा करू की IT नि बाहेरच्या जगाशी संबंध आल्याने भारतातहि प्रगति होईल.

पण तोपर्यंत आपण आपले आंबे खाण्यापुरते नि प्रेमळ माणसांना भेटायला नि गंमत करायला जावे. कामाचे नावहि काढू नये!


Robeenhood
Thursday, September 21, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा साधा भोळा आणि कदाचित हास्यास्पदही प्रश्न सगळ्याना आहे..

ज्या असोशीने लोक अमेरिकेत राहतात settle ही होतात त्या असोशीने अथवा आवडीने जपान, जर्मनी सिंगापूर किंवा ब्रिटन मध्ये का सेटल होत नाहीत किंवा तसे inclination दाखवित नाहीत यावर मतप्रदर्शन करावे..


Kedarjoshi
Thursday, September 21, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहील मी ती साईट वाचली नाही. पण तुझ्या पोस्ट वरुन वाटते की ६० टक्के पैसा हा मिडल ईस्ट मधुन येतो. मिडले ईस्ट मध्ये सहसा दक्षिन भारतातील लोक राहातात व त्यांचा बायका मुले भारतातच राहातात. म्हनजेच ते सेटल नाहीत तिथे. त्यांचा कुटुबीयांचा खर्चा साठीच ते पैसे खर्च होतात.
whereas अमेरिका किंवा ब्रिटन येथे लोक सेटल होतात व सेटल झालेले लोक दरवर्Sःई पैसे वापस पाठवत नाहीत. नेमके हेच मी तेव्हापासुन म्हनतोय.

शिवाय जर खरच अर्धे शिक्षीत भारतीय NRI झाले तर भारताचे काय होईल? भारत्च्या प्रगतीची रेषा उत्तरे ऐवजी दक्षिनेकडे जायला सुरु होईल.

माझे सर्व मुद्दे मांडुन झाले आहेत पण कोणी व्यवसिथ उत्तर देत नाहीये त्यामुळे मी रिड ओन्ली मोड मधे जायला हरकत नाही


Prashantl
Thursday, September 21, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आपल्या देशावर प्रेम करणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे पण ते प्रेम सीमारेषेपर्यंत येऊन थांबलेच पाहिजे असे आहे का?

out of context... but just give a thought...

Deshi
Thursday, September 21, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत एल. एका वाक्यात खुप मोठा प्रश्न विचारला तुम्ही.

उत्तर एका ओळीत देता येत नाही.

कसय की ज्या गोष्टीवर हक्क दाखविता येतो ति आपली व तिच्या वर मग आपण प्रेम करतो.
घरातील उदा. म्हणजे आई, बायको, वडील, भाउ ई.
शेज्यार्याची भांडन झाले की जरी भावाची बाजु चुकीची असली तर आपण त्याची बाजु घेतो. हे झाले प्रेम, पन त्याचा सोबत खेळात भांडतो व आईला तक्रार करतो हा झाला हक्क.
हेच उदाहरण मोठ्या स्वरुपात घेतले तर राज्य पातळी. आपली भाषा, आपला महाराष्ट्र, माझे पुणे, ई.
आणखी मोठ्या पातळी वर देश. पण ईथे सर्व सनंअप्ते कारण तुम्ही तुमच्या देशातच मतदान करु शकता, प्र्स्नाबद्दल ओरडु शकता, एखाद्याला पाडु शकता, एखाद्याला निवडुन देता.
दुस्रल्या कुठल्याही राष्ट्रात जाता तेव्ह्या ते तुमच्या प्रमाने वागत नाही तर तुम्हाला त्यांचा प्रमाने वागवे लागते.

तुमचा विचार खुप उच्च आहे पण तो कधीही अमलात आनल्या जानार नाही.
आता परत macro लेवल ला येउ. जर तुमच्या आईल कोणी भांडत असेल तर तुम्ही कोणाची बाजु घ्याल. शेजार्याची? मग तर तुम्ही पण आईला फसावाल.
micro लेव्ल वर देश आपली आई, राज्य, वेगवेCले घर्म, जाती आपले भाउ. भावा भावात भांडने होनार पण शेजार्याशी भांडन झाले की आपण एक.


उद्या जर हे ह्या planet चे दुसर्या planet शी युध्द होत असेल तर देशाची बाउन्ड्री सुटेल तो पर्यंत नाही.
तसे असले नसते तर २००३ मध्ये अमेरिकेन ईराक मध्य युध केले नसते. फर काय दोन वेळेस महायुध्द झाले नसते.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators