Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Quit India, Be NRIs (& Help India!!)...

Hitguj » Views and Comments » General » Quit India, Be NRIs (& Help India!!) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 20, 200620 09-20-06  2:18 pm
Archive through September 21, 200620 09-21-06  3:53 pm

Robeenhood
Thursday, September 21, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वरील ११:०९ च्या पोस्टला उत्तर मूडी यांनी दिल्याचे सर्च रिझल्ट मध्ये दिसते (११:२२).. प्रत्यक्ष या बी बी वर हे पोस्ट नाही. त्यानन्तर केदारचे ११:२४ चे पोस्ट त्याखाली आहे. मग मूडीचे ११:२२ चे पोस्ट कुठे गेले?
मॉडरेटरनी त्यांची"कला" इथेही दाखविलेली दिसते....


Zakki
Thursday, September 21, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिन, अमेरिका हा land of opportunity समजला जातो. माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या, कमी गुणवान माणसाचा भारतातील competition पुढे टिकाव लागायचा नाही. शिवाय गुजराती लोक, जे इथे येऊन सहज धंदा उघडतात, त्यांचा धंदा पण जोरात चालतो. कारण या देशावर ९ ट्रिलिअन चे कर्ज झाले तरी लोक पैसे उधळतच असतात. अमेरिकेतल्या मध्यम वर्गातल्या लोकांवर सरासरी ८००० डॉ. चे कर्ज फक्त क्रेडिट कार्डावर असते. गाडीसाठी घेतलेले कर्ज (१५००० डॉ. नि घरासाठी घेतलेले कर्ज (२००,००० डॉ.) वेगळेच. असे माझा मुलगा, जो क्रेडिट कार्ड कं मधे काम करतो त्याने सांगीतले. सबंध देशच मुळी deficit मधे चालतो!
शिवाय निरनिराळ्या, लहान, मोठ्या सर्व कंपन्यांमधे काँप्युटर वापरण्याचे प्रमाण कमालीच्या बाहेर जास्त आहे. त्यामुळे अनेक development projects जोरात चालू असतात. पुन: थोड्याच दिवसात नवीन technology बाजारात आल्यावर लगेच, 'जुने जाऊ द्या मरणालागुनि' हा मंत्र बायबलपेक्षा जास्त श्रद्धेने पाळला जातो. इतरहि क्षेत्रातहि सतत बदल चालू असतात. मग पैसे वाया गेले तरी हरकत नाही. त्यामुळे इथे सर्वांना अनेक कामे मिळत असतात.

चितळे म्हणतात, मोठ्या प्रमाणात पदार्थ केले तर Quality बिघडते. इथे त्यावरहि उपाय शोधून काढले आहेत. चितळे किंवा त्यांच्यासारखे लोक असे का करू शकत नाहीत? मी म्हंटले मला अनुभव आहे, हे कसे करायचे त्याचा तर देतील का मला ते पैसे?
भारतात एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर अशी संधि उपलब्ध नाही असे म्हणतात. पण आता हळूहळू अगदी बरेचसे महाराष्ट्रीय ब्राम्हणसुद्धा नवनविन धंदे सुरु करून यशस्वी होतात असे दिसते. तेंव्हा तिथून इथे येणार्‍यांचे प्रमाण कमी होईल असे वाटते. Already , इथून कायमचे परत जाणार्‍यांची संख्या वाढते आहे असे म्हणतात.




Arch
Thursday, September 21, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे जर परत भारतात गेले तर काय परिस्तिथी होईल भारताची?

Kedarjoshi
Thursday, September 21, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च. काहीही बदल पडनार नाही. ११० करोड तेथे आणखी ३०-४० लाख. शिवाय हे ३०-४० लाख पैसेवाले म्हणजे परत एकदा थोडाफार हाथभार परकीय गंगाजळी व ईतर बिसनेसला.
३० ४० लाख लोकांनी संधी नाहीशा होनार नाहीत. संधी मिळने नाहीशा होने, हे झक्की म्हणतात तसे आहे. काढनारा माणुस कसाही नाव काढतो.
१९७१ ला असेच ५० ६० लोक भारतात आले आहेत. अगदी गरीब, त्यांनी काही फरक पडला नाही तर स्रिमंअतानी काय पडेल.


Moodi
Thursday, September 21, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रॉबीन मॉडरेटरना नका बोलु, मीच उडवली ती पोस्ट, मलाच ती माहिती जरा अपुरी वाटली.

कारण हेच आहे की अमेरीकेत ब्रिटनपेक्षा स्वस्ताई आहे, तिथे मराठी समाज ब्रिटनच्या चौपटीने आहे, मोठ्या संस्था आहेत. जर्मनीत भाषेचा(जर ती शिकलीच नाही तर) प्रॉब्लेम येऊ शकतो.
युकेत मार्गारेट थॅचर आणि जॉन मेजरच्या काळात( कॉंझर्व्हेटिव्ह पक्ष) आणि खाण कामगारांच्या संपाने इथली अर्थव्यवस्था खूप धक्के पचवत राहिली. तसे ब्लेअरने पुष्कळ हाताशी आणले पण अजुनही सामान्य माणूस होरपळलाय. ते ही महायुद्धामुळे पण.

आपल्या भारतात टिव्ही(केबल आणि वीज बील सोडले तर) फुकट आहे, इथे मात्र लायसन्स आहे. युकेत आय टी आणि काही ठरावीक क्षेत्रे सोडली तर इतरांचे पगार चांगले नाहीत. टॅक्सचे प्रमाण प्रचंड आहे. किती लिहीले तरी कमीच.


Moodi
Thursday, September 21, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखीन एक ब्लेअर जर बुशच्या मागे गेला नसता आणि इराक युद्धात जर त्याने बुशची साथ दिली नसती तर अजून आशादायक चित्र दिसले असते. त्याच्या या फाजील निर्णयाने इथे हीच भावना झालीय की ब्रिटिशांना अमेकीकन्स पुढे टाचा घासाव्या लागतायत. इराक युद्धाने पार वाट लावलीय, खूप प्रमाणावर मनुष्य हानी तर झालीच पण आर्थिक बाबींवर पण बोजा पडलाय.

Chyayla
Thursday, September 21, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि एवढ कर्ज घेउन हे लोक राहतात तरि कसे, आणी परतफ़ेड करण्याबद्दल काय?, मी इकडे नवीनच आलो आहे, आणी हे सगळे प्रकार पहात आहे, उलट कर्ज नाहे घेतले तर तुमची क्रेडिट हिस्ट्रीच होत नाही, आणी तुम्ही काही मोठी खरेदी करायला जा तुमची हिस्ट्री आधी तपासल्या जाते.

Moodi UK बद्दल ही नवीनच माहिती मिळाली तुमच्याकडुन. च्यायला टिव्ही साठी लायसन म्हणजे विचारच नव्हता केला.

भारतात अजुनही कामाची शिस्त नाही, मुजोरीपणा, बाबुगिरी, भ्रष्टाचार चा प्रकार अजुनही आहे मान्य. मागे देशी नी म्हटल्या प्रमाणे
Be the part of system to change it

माझे स्वता:चे अनुभव एकदा
"ICICI" ब्यान्केत गेलो होतो तर कुठे खास विचारायचे काम नाही पडले रिसेप्शनिस्ट समोरच हजर, आणी त्यानी पण व्यवस्थित माहिती दीली कुठे आव नाही कि माहिती दिली म्हणुन उपकार केल्याचा, सगळे व्यवहार सुरळित सुरु, मला खाते उघाडतान्ना पण छान अनुभव आला, कामे पटापट होत होती. पण याच्या उलट दुसर्या एका राष्ट्रियक्रुत ब्यान्केत मात्र भयन्कर अनुभव, कोणाला आणी काय विचारु पहिला प्रश्न नुसता गोन्धळ, पुश्कळ गर्दी त्यातल्या त्यात काम होण्यासाठी वाट पहाणार्यान्ची जास्त गर्दी, मग विचारले तर मेहेरबानी केल्यासारखे, बर्याच वेळने उत्तर देणे ड्राफ़्ट मिळवायला कमित कमी २ तास वाया.
दोन्ही ब्यान्कान्मधे जमिन अस्मानाचा फ़रक, हा फ़रक का पडला?, म्हणजे कुठे तरी सुरुवात होत आहे, आज जर त्यान्नी ग्राहकान्ना चान्गली सेवा नाही दिली तर व्यापारच करता येत नाही, तुम्हाला सान्गतो कितीतरी ब्यान्कान्च्या व्यव्हारामधे चान्गला फ़रक पडत आहे. कदाचीत अजुन बरेच काही व्हायचे आहे, वेळ पण लागेलच. पण हे एक आशादायक चित्र नाही का? खास करुन खाजगीकरणाचा हा एक चान्गला फ़ायदा दिसत आहे.

मला अजुन एक वाटत बघा तुम्हाला पटतय का?

War makes Nation perfect.... ज्या राष्ट्रान्नी महायुद्धामधे प्रत्यक्ष भाग घेतला होता त्यान्ची System, management, technology छान प्रगत झाली आहे, जे हारले ते पण जे जिन्कले ते पण, कारण युधाच्या वेळेस सगळ हातघाईवर असत, तुम्ही जर "Perfect" नसाल तर तुम्ही हरले, सगळी जनता एका ध्येयानी झपाटलेली असते व एक्दिलाने काम करते, नवीन शोध लावल्या जातात दोन्ही महायुद्धापासुन बरेच नवीन तन्त्रज्ञान उदयास आले आहे ह्या सगळ्या कारणान्मुळे आपसुकच एक छान व्यवश्था निर्माण होत असते, अर्थात युद्ध नेहमी चान्गले असे म्हणायचे नाही, पण ह्याप्रकारे वाइटातुनही काही चान्गल बाहेर येतच.

Zakki
Friday, September 22, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, एव्हढे सगळे कर्ज घेऊन अगदी मजेत, चैनीत रहातात! त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्यामुळे जिवंत आहोत, तोपर्यंत चैन करू, मेल्यावर काय होते ते कुणि बघितलय्! शिवाय कर्ज घेण्यात त्यांना लाज, अपमान काहीहि वाटत नाही! It's just business! .

डॉनाल्ड ट्रंप ने एकदा बिलियन्स ऑफ डोलर्स चे कर्ज काढले नि ते त्याला फेडता आले नाही, तो जवळ जवळ भिकारी झाला. मग त्याने बॅंकेशी वाटाघाटी करून पुन: अनेक बिलियन डॉलर्सचे कर्ज मिळविले नि मग सर्व कर्ज हळू हळू फेडले. त्यातहि सगळे देणार नाही, एव्हढेच देतो, घ्यायचे तर घ्या! असे म्हणून गप बसला!

मला दोन लाख डॉलरपर्यंत कर्ज द्यायला बॅंका तयार आहेत, पण मी डॉनाल्ड ट्रंप सारखा वाटाघाटी करू शकत नाही, फुकट मला जेल मधे जावे लागेल!

माझी अशी एक थेअरी आहे की, भारतात पूर्वी चार्वाक नावाचा ऋषी होत. तो म्हणाला:

यावज्जीवेत, सुखं जीवेत, ऋणं क्रुत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:!

तेंव्हा त्याला नि त्याच्या शिष्यांना भारताबाहेर हाकलून दिले. त्यांचेच वंशज अमेरिकेत येऊन राहिलेत!


Zakki
Friday, September 22, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

War makes Nation perfect.... ,
हे काही पटत नाही. तशी भारताची सुद्धा तीन युद्धे झाली पाकिस्तानबरोबर. त्यातून काय शिकलो? शून्य!
नि युद्धातून काय शिकायचे ते आता पुस्तकात नि इंटरनेट वर आहे की. त्यासाठी युद्धच करायला नको!

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे! सुधारणा करायच्या तर पाऽर एम. डी. पासून प्यूनपर्यंत सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे, तर ते काम होइल. असे सगळे आम्ही बर्‍याच ठिकाणि करून आम्हाला अनुभव आहे, पण भारतातील कं त्यात interested दिसत नाहीत!



Asami_asami
Friday, September 22, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BB चा मूळ विषय म्हणजे आपल्या हातून आपल्या "स्वदेशा"साठी काहितरी घडले पाहीजे. पण "असे" NRI होवुन आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी काहितरी करतो आहोत. शिवाय आपल्या ह्या Feelings आपल्या पुढील पिढीत रुजु होतील ह्याची जबाबदारी पण आपलीच नाही का?

आणि ही तर obvious गोष्ट आहे की जे वातावरण आपल्या सगळ्यांना इथे बाहेर मिळते आहे ते भारतात मिळणार नाहिये आत्ता लगेच. तशी अपेक्षा आत्ता करणे हे माझ्या मते चुकीचे आहे. तसे वातावरण तयार करण्यात जर माझा वाटा नाही तर त्याला नावे ठेवण्याचा हक्क तरी मला कोणी दिला बरे? हे Americans अथवा Japanese लोक तर तिथे जावुन बदल घडवणार नाहीत ना. निदान बाहेर राहुन ह्यांची शिस्त बघितल्यावर तरी आपल्यासारख्यांनी ती आपल्या देशात जावुन implement करावी असे वाटते. उगाच ideal वगैरे नाही पण ही माझी जबाददारी आहे असे मला वाटते. आणि जबाददारीतून (कितीही वाक्चातूर्याने कारणे सांगितली तरीहि) हळूच पाय काढून घेणे कितपत योग्य आहे हे fortunately/unfortunately ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.

आपण जर परत नाही गेलो तर आपल्या पुढील पिढ्यांचे.......... आणि एक वेळ अशी येइल की..........

केदार, read only मोड मधून बाहेर यावेस असे वाटते, की कदाचित मीच आता शांत राहिलेले बरे...

Again, आपल्यासारख्यांचे वेळोवेळी असे शांत रहाणे सुद्धा कितपत बरोबर आहे हा वेगळा मुद्दा:-)


Prashantkhapane
Wednesday, October 31, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहुड,
मि जर्मनी ला येउन ९ वर्शे झाली. एथे येणे हा चॉइस होता, आणि जर्मनीचे आकर्षण. मला असे वाटते भाषा ही मोठी अडचण आहे इथे आणि अश्या इतर देशामधे.

आज ना उद्या मात्र एथे येणार्या प्रत्येकाला हा प्रश्न पडणार असतोच. मला वाटते, असामी-असामी शी मी सहमत आहे.


Maanus
Thursday, November 01, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yeah sure...

http://www.sasi.group.shef.ac.uk/worldmapper/images/largepng/2.png

World map with countries distorted to represent relative population.

check more images at http://www.sasi.group.shef.ac.uk/worldmapper/

also this http://www.sasi.group.shef.ac.uk/worldmapper/textindex/text_index.html

Maanus
Thursday, November 01, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.sasi.group.shef.ac.uk/worldmapper/textindex/text_resources.html check this one too

Hkumar
Saturday, November 03, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात नोकरीत असलेला माझा एक परिचीत येता जाता भारताला दूषणे देत असतो. 'भारत म्हणजे अगदी नरक आहे..वगैरे''. मी त्याला नेहमी सांगतो की आपला देश जो काही आहे त्याला आपण( आपण हा शब्द १० वेळा अधोरेखीत ) सगळेच जबाबदार आहोत.
तसेच मी त्याला हेही विचारतो की देश सुधारण्यासाठी तू काय प्रयत्न करतोस? त्यावर त्याच्याकडे उत्तर नसते.


Vinaydesai
Wednesday, January 30, 2008 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन वाचण्यालायक लेख.. ....


http://www.loksatta.com/daily/20071223/lr01.htm

http://www.loksatta.com/daily/20080106/lr07.htm

Zakki
Wednesday, January 30, 2008 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक वर्षांपूर्वी इथल्या क्रॉसफायर या कार्यक्रमावर दोघेजण आले होते. विषय होता महात्मा गांधी.

एकाने गांधींजींचे सगळे दोष काढले होते. त्यांच्या लिखाणात विचारांची उलट सुलट, बोलणे नि कृति यातील तफावत, इ. इ. पुराव्यानुसार त्याने ते दाखवले..

दुसर्‍याने त्यांचे फक्त गुण दाखवले.
शेवटी कार्यक्रमाच्या चालकांनी विचारले की खरे काय? तेंव्हा दुसर्‍याने उत्तर दिले की एखाद्या उद्यानात गेल्यावर कुणि फुले पाने यांचे सौंदर्य पहातो, तर कुणि चिखल नि किडे पहातो.

एका प्रथितयश लेखकानी तीसेक वर्षांपूर्वी असाच इथल्या भारतीयांबद्दल लिहीले होते की हे लोक स्वस्तातली दारू पितात. माझ्या इथल्या मित्राने सांगितले की त्या लेखकाच्या यजमानांनी सांगितले की ते लेखक, दारू दिसल्यावर पाण्यासारखी ढोसू लागले. मग स्वस्त दारूआणली तरी ढोसतच होते. मग तेंव्हाच का नाही म्हणाले, ही स्वस्त दारू आहे, मला नको!

याच लेखक महाशयांनी लिहीले होते, की नूवर्क सारख्या शहरात रहायचे सोडून, भारतीय लोक, परवडत नाही म्हणून शरापासून दूर, लाकडाच्या घरात रहातात!!

सगळे प्रकार सगळीकडे असतात, जे पहायला जाल ते सापडेल. भारतातहि वाईट गोष्टी आहेत, तश्या चांगल्या पण आहेत. नि इथे काही चांगल्या तर काही वाईटहि आहेत.

याला उत्तर माझ्या एका मित्राने सांगितले. तो इथे २५ वर्षे राहून भारतात परत गेला. तो म्हणाला मला तिथेही अडचणी आल्या, इथेहि येतात. पण इथल्या अडचणींतून मी मार्ग काढू शकतो, तिथे नाही. तर कुठल्या अडचणी तुम्हाला कमी त्रास देतील तिथे रहा!


Shendenaxatra
Thursday, January 31, 2008 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक क्रूर हुकुमशहा होता. तो एक उत्तम चित्रकार होता. तो उत्कृष्ट चित्रे काढायचा. एकदा काही सन्माननीय परदेशी पाहुणे आले असता त्याने आपली नवी चित्रे त्यांना दाखवली. ती बघून पाहुण्यांनी कौतुक केले. त्यांच्याबरोबर त्या राज्याचा एक प्रतिष्टितही होता. त्याला ही चित्रे फारशी आवडली नाही हे लोकांन जाणवले. एका पाहुण्याने त्याला विचारले की इतकी चांगली चित्रे का नाही आवडली तुम्हाला? तो नागरिक म्हणाला अहो ती चित्रे चांगली असतील पण ह्या राजाने ती आमच्या लोकांच्या रक्ताने काढली आहेत. हा राजा अत्यंत विकृत आहे. त्याला आव्हान देणार्‍या, न आवडणार्‍या आणि बाकी मनात येईल त्या लोकांना हा ठार मारतो आणि त्यांच्या रक्ताने अशी चित्रे काढतो.

तुम्हाला नुसती छान छान चित्रे दिसत आहेत. आम्हाला त्याकरता किती लोक हकनाक बळी गेले ते माहित आहे.

आता सांगा आम्ही ह्या चित्रांचे कौतुक का करावे?



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators