|
Bsk
| |
| Tuesday, September 05, 2006 - 9:28 am: |
| 
|
कालच डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे 'पृथ्वीवर माणुस उपराच' (परत) वाचले.मोकळा वेळ मिळाला की मी हे पुस्तक वाचतेच. जेव्हा जेव्हा मी हे पुस्तक वाचते, मला खुप प्रश्न पडतात. बर्याच जणांनी हे पुस्तक वाचलेही असेल.त्यामुळे या विषयावर लिहायचे ठरवले. ज्यांनी हे पुस्तक वाचले नाही त्यांच्यासाठी ही थोडी माहीती.. खूप वर्षांपुर्वी ( साल नक्की ठाऊक नाही, परंतु साधारण पणे १९९३ च्या आसपास असावे.) डॉ.नाडकर्णींनी सकाळ मधे ही लेखमाला लिहीली होती. त्या लेखमालेचे हे पुस्तकरुप. एरीक व्हॉन डॅनिकेन या स्विस संशोधकाचे आगळे-वेगळे संशोधन आणि त्यावरील त्यांचे लेख ही नाडकर्णींच्या लेखमालेची( आणि पुस्तकाची) प्रेरणा असावी. डॅनिकेन यांच्या संशोधनाप्रमाणे माणुस हा पृथ्वीवरचा नाहीच. खुप पुर्वी या पृथ्वीवर UFO (उडत्या तबकड्या) मधुन extra-terrestrials (कदाचित देव ?)इथे आले. जे खुप प्रगत होते. त्यांनी Genetics Engg सारखे तंत्र वापरुन मानव निर्माण केला (असावा). हे सर्व 'काहीही' वाटण्याचा खुप संभव आहे. परंतु डॅनिकेन नी जे पुरावे दाखवले ते पाहील्यावर मात्र यावर थोडा-बहुत विश्वास बसायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे, मानवाची उत्पत्ती. डार्वीनच्या सिद्धांताप्रमाणे ड्रायोपिथेकस या सस्तन प्राण्याच्या ३ उपजाती निर्माण झाल्या. ड्रायोपिथेकस पंजाबाय पासून गोरिला , ड्रायोपिथेकस जर्मनाय पासून चिंपांझी आणि ड्रायोपिथेकस डार्विनाय पासून मानव निर्माण झाला.ड्रायोपिथेकस हा २-२.५ फूटी, चतुष्पाद, आणि सुमारे दीड-दोनशे सेमी चा मेंदू असलेला प्राणी.याच्या एका उपजातीपासून जो मानव झाला तो मात्र, ५.३-६ फूटी,द्विपाद, आणि २००० घनसेमी आकाराचा प्रचंड मेंदू असलेला असा.या नाट्यपुर्ण स्थित्यंतराबद्दल (डार्विनसह) सर्वच शास्त्रज्ञ मौन बाळगतात.विकाससिद्धांताप्रमाणे हया सर्व बदलांचे अवशेष सापडले पाहीजेत, परंतु या स्थित्यंतराचे एकही अवशेष सापडत नाहीत. 1. मांसाहारी प्राणी निर्माण होताना मांजर,रानमांजर,वाघ ( तॄणाहारी मधे झेब्रा,घोडा,गाढव )ई. एकमेकांसदृश अनेक प्राणी निर्माण झाले. परंतू मानव निर्माण होताना मानवाला समांतर प्राणी नाही झाला. 2. जगातील सर्व प्राणी निशाचर अथवा दिनचर अशी वैशिष्ट्ये घेउन येतात. मानवाला तेही नाही. 3. आहाराच्या बाबतीत मांसाहारी,शाकाहारी,तॄणाहारी,कीटकाहारी ई. वैशिष्ट्ये आहेत. मानवाला नाहीत. 4. संरक्षणासाठी प्राण्य़ांना शिंगे,दात,नखे, अशी आयुधे जन्मतः लाभली आहेत. मानवाला नाहीत. 5. कोणत्याही प्राण्याचे अपत्य अल्पकाळात स्वतंत्रपणे जगू लागते. मानवाचे मात्र वर्षानुवर्षे आई-बापांवरच अवलंबुन पराधीन जिणे जगत असते. 6. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व प्राणी फ़क्त वर्तमानकाळात जगत असताना मानव हा एकच प्राणी असा आहे, की जो कोणतीही शारीरिक कुवत नसताना भूत-भविष्याचा विचार करीत सर्व जगावर स्वामित्व मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. मानवाची उत्पत्ती जरा बाजुला ठेवली तरी काही प्रश्न पडतातच, ज्या काळात मानवाला चाकाचा शोधही लागला नव्हता त्या काळात सापडलेले बांधकाम किंवा चित्रे, शिल्पे पाहील्यावर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येते. उदा. 1. ईजिप्तमधले पिरॅमिडस, त्यांची शास्त्रीय रचना,पायाची अशी बांधणी की ज्यामुळे पृथ्वीवरील जमिन आणि पाणी यांची समान भागणी व्हावी,त्यांचा 'पाय' या गणितातील सर्वात स्थिर संख्येशी असलेला संबंध, पिरॅमिडच्या आतुन वर पाहीले तर एखाद्या नक्षत्रावर अथवा तार्यावर केंद्रीत होणे,पिरॅमिडमधुन किरणोत्सर्ग बाहेर पडणे...... ई. 2. ऍडमिरल पिरी रीस याने तयार केलेला जगाचा नकाशा. त्यात आत्ता आत्ता ज्याचा आकार नीट कळला आहे अशा अंटार्क्टीका चा आकार अगदी तंतोतंत आहे. खुप उंचीवर गेल्याखेरीज हे जमणार नाही. चाकाचा शोध लागला नव्हता त्या काळात या लोकांना खगोलशास्त्र आणि विमानविद्द्या अवगत होती? 3. नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणुन काढलेल्या खुणा. 4. अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ. 5. ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही. 6. ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती ब्राझीलमधील रिओ डि जानेरो मधे एका डोंगरावर आढळते. ह्या शिल्पाची मर्यादारेषा स्पष्ट करण्यासाठी जी फिनिशियन चित्रलिपी वापरण्यात आली आहे ती फिनिशियन जमात मध्यपुर्वेत नांदत होती.फिनिशियन लोक मध्यपुर्वेतुन येथे कसे पोचले असावेत ? 7. तसेच ईजिप्तसारखेच पिरॅमिडस मेक्सिको मधे आहेत.आणि काश्मीर मधील परिहासपुर येथील मंदीराचे भग्नावशेष पिरॅमिडस ची आठवण करुन देते. ( सर्व ठिकाणी किरणोत्सर्ग आहेच.) या आणि अशा अनेक गोष्टी या पुस्तकात नमुद केल्या आहेत. सर्वकाही इथे मी जागेअभावी नाही लिहू शकत. आणि तसे हे पुस्तक बर्याच जणांनी वाचलेही असेल. तर मायबोलीकरांना याबद्दल काय वाटते हे जाणुन घ्यायला खुप आवडेल. मला तरी हे सर्व वाचल्यावर क्षणभर विश्वास बसतो, की असे काहीतरी घडलेही असेल. तुम्हाला काय वाटते? * यासंदर्भातील मला जाळावर मिळालेले काही फोटो इथे टाकले आहेत: http://www.flickr.com/photos/35908980@N00/
|
Moodi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 9:33 am: |
| 
|
bsk अगदी अगदी माझ्या मनातला विषय काढलास. तू अजून काय लिहीलेस ते पूर्ण नाही वाचले मी, दूपारी वाचते. पण आत्ताच बातम्यांमध्ये ते मेक्सीकोतील पिरॅमिडस बद्दल बघीतले. तेच शोधतेय मी. अद्भुत आहे ते. चल नंतर बोलते. पण ती फोटो लिंक चालत नाही गं. 
|
Bsk
| |
| Tuesday, September 05, 2006 - 9:48 am: |
| 
|
हो ती लिंक नाही चालते. कारण '@' च्या पुढचे लिंक मधे येत नाही. टाईप करावे लागेल पुढचे अंक किंवा शब्द.
|
Bsk
| |
| Tuesday, September 05, 2006 - 10:05 am: |
| 
|
ही घ्या लिंक http://www.flickr.com/photos/bhagyashree/
|
Bee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 10:10 am: |
| 
|
मी हे पुस्तक नाही वाचले भाग्यश्री पण तू दिलेली माहिती इतकी रोचक वाटली की असे वाटते आता ते पुस्तक आणावे आणि फ़डशा पाडावा. तू रोम ईजिप्त फ़िरून आलेली दिसते. ती वरची लिन्क चालते आहे फ़क्त पुढचे characters cut n paste करावे लागतात. मूडी, काय झाले मेक्सिकोला आम्हालाही सांगत जा..
|
Bsk
| |
| Tuesday, September 05, 2006 - 10:45 am: |
| 
|
नाही हो बी.. मी फक्त पुस्तकांतुनच फिरलीय.. त्यातुन नुकतच ईजिप्तायन वाचले. त्यामुळे हे लिहावसे वाटले. माहीत नाही कितपत खरय.. पण विचार करायला लावते हे पुस्तक हे बाकी खरे! हो.. मेक्सीकोला काय झाले आणि?
|
Moodi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 1:03 pm: |
| 
|
बी अरे मी अजून नीट नाही वाचले, पण ही लिंक बघा. bsk मला वाटत तू जी लिंक दिलीयस त्यात पण यातले फोटो आहेत. चला आपण ट्रिप काढुया. http://www.crystalinks.com/pyramidmesoamerica.html
|
Moodi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 1:08 pm: |
| 
|
अमेरिकन्स लकी आहेत यार. ही लिंक बघा.कुठे कसे जाता येईल ते दिलयं. http://www.mexperience.com/guide/archaeology/teotihuacan.htm
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:21 am: |
| 
|
माझ्याकडे आहे ते पुस्तक. त्यानी ते खरे आहे असा दावा केलेला नाही पण यावर संशोधन व्हावे असे लिहिले आहे. त्यातील माहिती ऐकीव आहे. लेखकानी प्रत्यक्ष स्थळाना भेट दिलेली नाही. डॉ. मीना प्रभुंच्या मेक्सिकोपर्व आणि ईजिप्तायन मधे त्या स्थळांचे प्रत्यक्ष वर्णन आहे, ( पण त्याना या पुस्तकाची कल्पना नाही. ) डॉ. नाडकर्णी यांचे पुस्तक मात्र मुळातुनच वाचायला हवे.
|
Raina
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:44 am: |
| 
|
BSK नाडकर्णींची सकाळ मधील लेखमाला नक्की ९२-९३ च्या आसपासची. ती अजून आठवते आहे. "देव येउन गेले, राहिल्या फक्त खुणा" हे त्यातले वाक्य चांगले लक्षात आहे. त्यावेळी आम्ही शाळेत त्यावर चर्चा वगैरे केल्याची आठवण आहे- आणि दुर्दैवाने ज्या शिक्षकांच्या कानावर ती चर्चा पडली त्यांना त्याचे अजिबात कौतूक नव्हते- त्यांनी उलट- महत्वाची शिक्षणाची वर्ष आहेत तुमची- अभ्यास करा- असल्या फालतू चर्चा करु नका- अशी आम्हाला दमदाटी केली होती. :-) आम्हा मुलांच्या चर्चा म्हणजे काय- प्रत्येकाचे घरचे वळण आणि आईवडिलांच्या विचारसरणीचा पगडा त्यावर स्पष्ट जाणवत असे कारण अजून आपल्या बुद्धीला पटतय का किंवा शास्त्रकाट्याची कसोटी लावून विचारांना लख्ख घासून पुसून पाहण्याचे ते वय नव्हत.- ज्यांच्या घरच वळण सश्रद्ध होतं त्या मुलांच म्हणणं- पहा देव आहेच- त्याशिवाय नाही असले चमत्कार होतं- जागोजागी त्याच्या खूणा आहेत. बुद्धिनिष्ठ वातावरणात वाढलेल्या मुलामुलींच म्हणणं- वस्तुनिष्ठ पुरावा काय? This is just the author's perception.
|
मी पण एक पुस्तक वाचले होते त्याचे नाव देव छे परग्रहावरची माणसे. लेखक अज्जीबात आठवत नाहीये पण अनुवाद होता तो. तर आम्ही पण प्रचंड प्रभवित वगैरे झालो होतो त्या पुस्तकाने. पण मी नंतर ते कसे चुक आहे अस पुराव्यानिशी शाबीत केलेले पुस्तक देखिल वाचले आणि मला ते देखिल पटले I am sorry मला मुळीच नावे आठवत नाहीयेत लेखकांची
|
Bsk
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:56 am: |
| 
|
रचना, त्या पुस्तकाचे लेखक बाळ भागवत. मी खूप पुर्वी वाचलय ते. पण आता काही आठवत नाही. मला 'हे' सगळे कसे चुकीचे आहे हे सांगणारी पुस्तके हवी आहेत.कारण आजपर्यंत मी हेच पुस्तक वाचत आलीय, त्यामुळे हेच बरोबर असे वाटण्याचा संभव आहे. दिनेशदा, नाडकर्णींनी हे पुस्तक यांच्या संशोधनावरुन लिहीले आहे.. आणि ने तर हे सगळे प्रत्यक्ष फिरुन पाहीले ना? मी अलिकडेच ईजिप्तायन वाचले(बाकी मीना प्रभूंची पुस्तके आधीच वाचली होती.)त्यामुळे ह विषय परत डोक्यात आला.इथे लिहीले कारण बाकीच्या लोकांची मते कळतात,आणि वस्तुस्थिती काय आहे ते कळते.
|
Zakki
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:28 am: |
| 
|
काही काही लोक तर नुकतेच परग्रहावरून आल्यासारखे वागत असतात. त्यांना विचारले पाहिजे!

|
Moodi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:06 pm: |
| 
|
हे परग्रहावरुन आलेले लोक कोण म्हणे? 
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:57 pm: |
| 
|
अरेवा. मस्त आहे विषय. US मधील बर्याच लायब्ररीत Area 51 बद्दल्च्या विडीओ टेपस मिळतात. google वर पण बरीच माहीती मिळेल. ज्यांना माहीती नाही area 51 त्यांचासाठी हा एक classified area आहे. त्याचा नकाशा कुठेही उपलब्ध नाही. असे म्हणतात की येथे काही aliens आहेत व त्यांचा वर शोध घेने चालु आहे. तसेच ईथेच नविन bomber विमांनाचा शोध लावला जातो. http://www.crystalinks.com/nazca.html
|
I read this book when I was young. Like most , I was intrigued impressed and perplexed. But this book and all others by him are most likely hoax. please read wikipedia article on him.
|
Neelu_n
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:53 pm: |
| 
|
BSK , मूडी 'पृथ्वीवर माणुस...' हे पुस्तक मी वाचलय. पुस्तक वाचुन बरेच दिवस झालेयत. त्यामुळे सगळ काही नीट आठवत नाहीय पण एवढे नक्की आठवतय की हे पुस्तक वाचताना खुप रोमांचीत वगैरे व्हायला झाले होते. आपल्या कल्पनेपलीकडे जगात अश्या काही गोष्टी असु शकतात याचा फार विस्मय वाटतो. ते बर्मुडा ट्रंगल आणि स्पेस ट्रॅंगल वाचतना पण असच होते. फार पुर्वी विचित्र विश्व म्हणुन पुस्तकं वाचनात आली होती त्यात अश्या गोष्टींची भरपुर खजिनाच असे. त्यावेळी वाचताना त्यात किती सत्य आहे याचा विचार केला नव्ह्ता. पण आता वाटतय खरच त्या खर्या असतील का?? त्यातली काही आठवतायत त्या अश्या... भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर एक तळे आहे त्या तळ्याकडुन जाताना भारतीय सैन्याच्या कित्येक तुकड्या गायब झल्या आहेत म्हणे. नंतर त्याविषयी संशोधन करायला गेलेले शास्त्रज्ञ पण परत आले नाहीत. किंवा अमेरीकेमध्ये खुप लोक हवेत विरुन गेली आहेत, अचानक नाहीशी झालीयेत. केदार म्हणतात तसे खरच हा विषय मस्तच आहे. यासाठी हा बीबी चालु केला हे बरे झाले. याविषयीची अजुन माहिती तरी वाचायला मिळेल.
|
Bsk
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:49 pm: |
| 
|
हो नीलु, या पुस्तकामधले सिद्धांत कितपत विश्वासार्ह आहेत माहीत नाही. पण अशी शिल्पे,वास्तु या जगात आहेत किंवा पुर्वीची लोकं इतकी प्रगत होती हे वाचून आणि त्यांनी केलेले कॅलेंडर वगेरे पाहीले की आश्चर्यच वाटते. मधे मी पण एक बर्म्युडा ट्रॅंगलवरचे पुस्तक वाचले होती. त्यात लिहीलेल्या अनुभवांना तर चमत्कारच म्हंटले पाहीजे!
|
Bsk
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:53 pm: |
| 
|
केदार, तुम्ही दिलेली लिंक सगळी नाही झाली वाचुन, पण सही आहे!
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 7:24 pm: |
| 
|
भाग्यश्री, मला अरे म्हणले तरी चालेल. आणखी काही लिंकस http://www.alien-ufos.com/ufosandaliens.shtml BTW माझा स्वत:चा विश्वास नाही पण माहीती म्हणुन वाचायला काय हरकत आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|