|
लोपमुद्रा, मला पण तोच प्रश्ण पडला बघ. 'सख्खा भाऊ असला तरी' असं वाक्य संयुक्तिक वाटतं. पण ब्राम्हण्य हे एखाद्या qualifiaction सारखं उल्लेखणं कितपत योग्य आहे?
|
Ekanath
| |
| Sunday, May 07, 2006 - 5:25 am: |
| 
|
दिनेश साब तुम्हारा चुक्याच "राजकारण वाईट आणि राजकारणी नालायक" असा सरळ सरळ समज करून घेणे धोक्याचे आहे! प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबद्दल इतक्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कारण त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. अकाली आहे. दुर्दैवी आहे. प्रवीन महाजन सारख्या बांडगुळाच्या हातून प्रमोद महाजनांना मृत्यू यावा हे दुर्दैव आहे. या प्रवीण महाजनला भावाच्या जीवावर मनमानी जगायचे होते. प्रमोद महाजनांनी ते नाकारले त्याचा राग आला. वास्तविक, त्याचे सगळे शिक्षण, नोकरी हे प्रमोद महाजन यांनी स्वतः केले होते. त्याला अनेक नोकर्या मिळवून दिल्या होत्या. तरीही हे बांडगूळ स्वतःच्या आळशीपणाला आणि निष्क्रियतेला "एगो" मखर चढवून धुमसत होते. त्यातूनच ह्या माणसाने थंडपणे आणि व्यवस्थित प्लन करून प्रमोद महाजनांचा खून केला! वाईट ह्याचे वाटते की धडाडीच्या आणि कर्तृत्त्ववान प्रमोद महाजनांचा एका कर्तृत्त्वशून्य बांडगुळांकडून खून व्हावा. तुम्ही काही कारणे काढून नाकारले तरी महाजनांचे कर्तृत्त्व स्वच्छ दिसतेच आहे. कुणाची खरी प्रतिमा कशी होती, हे त्याच्या मृत्यूनंतर कळते. महाजनांवरच्या हल्ल्यापासून किती विविध प्रकारच्या लोकांनी कशा कशा प्रतिक्रिया दिल्या, यावरूनच त्यांचा आवाका लक्षात येतो. सगळेच काळे नसते दिनेश. किंवा सगळीकडेच काळे पहायचे नसते. ते तसे दिसले तरी "औचित्य" नावाचा काही एक प्रकार असतो. माफ करा पण तुमच्याकडून औचित्यभंग झालाच. महाजन हे कुणी दावूद नव्हेत! त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटले, तर कोनीही आक्षेप घ्यायचे काहीच कारण नसावे. आणि GS1 म्हणतात तसाच दावा करायचा तर तुम्ही म्हणता तो कोणताही आरोप महाजनांवर जाहीर झालेला नाही किंवा सिद्ध झालेला नाही. मग एका मृत व्यक्तीचे, जिला सम्पूर्ण समाजातून, पक्षनिहाय, मनःपूर्वक श्रद्धांजली, सद्भावना मिळते आहे, त्या व्यक्तीचे तिच्या मृत्यूसमयी चारित्र्यहनन, हा औचित्यभंग नव्हे काय? तुम्ही म्हणता ते सगळे कदाचित खरेही असेल पण जसे देवळात गेल्यावर वेश्याबाजीचे विचार मनात आणणे गैर असते तसेच कोणाही मान्यवर व्यक्तीच्या मृत्यूसमयी, त्याच्यावर सिद्ध न झालेल्या आरोपांचा उच्चार करणे गैर आहे. महाजनांचे राजकीय कर्तृत्त्वही मोठे आहे, हे नाकारताच येत नाही. त्याविषयी मी कालच दुसर्या एका संकेतस्थळावर लिहिले होते. तेच इथे पुन्हा देत आहे. वर कुणी तरी म्हटले आहे की प्रमोद महाजन हा "राजकारणी" गेल्याने काहीच फरक पडत नाही ! त्याचे थोडे विश्लेषण करावेसे वाटते. काही दिवसांपूर्वी आडवानी म्हणाले की भाजपाने देशाला काय दिले ? तर द्विपक्षीय राजकारणाची देणगी! हे निःसंशय खरे आहे. भाजपा ताकदवान व्हायच्या आधी काँग्रेसला मोठे आवाहन देऊ शकेल असे कोण होते? कुणीच नव्हते! काँग्रेसशिवाय पाच वर्षाचा कालखंड पूर्ण करणारा भाजपा ( त्याच्या मित्रपक्षांसमवेत) एकमेव पक्ष होता. कशाही कारणाने असो, पण भाजपा powerful झाल्याने काँग्रेसचा एककलमी अंमल संपला होता. पण पुढे भाजपाची दुर्दशा झाली. ( त्याची कारणे इथे देत नाही). भाजपाकडे आता ताकदीचा एकही नेता शिल्लक नाहीये. आडवाणी आणि वाजपेयी यांना जमेत धरण्यात काही अर्थ नाही. नवीन पिढीत महाजनांएवढा प्रभावशाली नेता कोणीही नव्हता. भाजपाला सध्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रमोद महाजनांचा फार मोठा उपयोग झाला असता. पण सध्याच्या कोणत्याही नेत्यामधे ती ताकद दिसत नाही.( आडवाणी आणि वाजपेयी यांनी सन्मानाने निवृती पत्करावी!) महाजनांचे वैशिष्ठ्ये अशी की नरेंद्रे मोदी, विहिंप यांच्या कट्टरतावादी राजकारणाला विरोध करणारा हा नेता होता. ज्या इंग्रजीत pragmatism म्हणतात ती वस्तुनिष्ठता महाजनांकडे पुरेपुर होती. ह्याचे उदाहरण म्हणजे, मागच्या लोकसभा निवडणूकीत "भाजपाला १८० जागा राखणेही कठिण जाईल" अशी शंका वर्तवणारा, महाजन हा खुद्द एकच माणूस होता. पराभवानंतर पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारणारा हा एकच नेता असावा! ( मागच्या निवडणूकीत भाजपाच्या प्रचाराची सूत्रे महाजनांकडे होती.) त्यावरून त्यांची प्रवाह समजण्याची ताकद, आणि वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी दिसून येते. महाजनांनी mobile communication आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी भर टाकली आहे. ( त्यांचा एक निव्वळ मराठी माणसाचा विनोद फारच प्रसिद्ध आहे. एका भाषणात त्यांनी म्हटले की, माहिती तंत्रज्ञान हे एकमेव क्षेत्र असे आहे, जिथे सरकारने ढवळाढवळ केली नाही, त्यामुळे या क्षेत्राने भारतात फारच प्रगती केली आहे! --- हे त्यांनी स्वतः मंत्री असताना म्हटले होते.) ह्यात मला कोठेही महाजनांचे उदात्तीकरण करायचे नाही. महाजन अनेक विवादास्पद गोष्टीत गुंतले होते, हे सत्य आहे. पण ती चर्चा करण्याची ही वेळ नाही. परंतू, भाजपाला आता पुन्हा स्थैर्य येणे महाकठिण आहे. धर्माच्या प्रश्नावरून मते मिळत नाहीत हे उघडच आहे. तेंव्हा त्यांना महाजनांसारख्या, भविष्याकडे बघणाऱ्या नेत्याची, फार आवश्यकता होती. भाजपा कमजोर झाल्याने काँग्रेसचा एकछत्री अंमल पुन्हा सुरु होईल की काय, अशी भीती वाटते. डाव्यांचा निकाल या पोटनिवडणूकीत काय लागतो हे कळेलच. एकंदरीत, कितीही नाकारले तरी महाजनांच्या मृत्यूमुळे देशाचे राजकारण प्रभावित झाले आहे, हे नाकारता येतच नाही. त्यांच्या मृतात्म्यास सद्गती मिळो.
|
खरय... दिनेशची मते आणि आणि एकनाथची मते... नाण्याच्या दोन बाजु आहेत... दोघीही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.. सन्घाची निर्थक idealogy घेउन राजकारणात चालणार नाहि.. हे त्यांनी ठामपणे सांगितले होते... द्विपक्षीय राजकारणाशिवाय लोकशाहि नाही... राजकारणाबद्दलची तुमची मते.. बरोबर आहेत..
|
Yog
| |
| Monday, May 08, 2006 - 1:26 am: |
| 
|
hhmm interesting... सत्य वा अस्त्य हा वाद चालूच राहील पण राजकीय स्तरावरील एक महान सन्घटक व पुरोगामी नेता अन सामाजिक स्तरावर, एक प्रभावी अन दूरदर्शी " मराठी " मनुष्य हरपला याची जास्त हळहळ आहे. सोनीयाच्या चरणी लोळण घेवून देश घुसखोराना आन्दण देणार्यान्पेक्षा महाजन नक्कीच परवडले. असो. ईश्वर त्यान्च्या आत्म्यास सद्गती देवो!
|
मला महाजनच काय पण भारतातला कोणताही पुढारी मेल्याचे दु:ख्ख वाटणे कधीच बन्द झाले आहे. एक व्यक्तिच्या मरण्याचे काय तेवढेच. महाजन करप्ट होते हे सिद्ध करण्यची जरुरी सुद्धा वाटत नाही. ओतप्रोत गिळायचं आणि समाजाचं आपण काही देणं लागतो याच काहीही भान नाही. मी तर म्हणतो की गिळा, पण थोडी तरी सामजिक बान्धीलकी ठेवा. स्वर्गीय इन्दिरा गांधींनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या वृक्षाला आतातर फळे फुले आली आहे. आतातर सामजिक मान्यता मिळालेली आहे. कशाला उगाच रडण्या भेकण्याचं नाटक करायच लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा हेच खर.मुळात आपण लोकच प्रामाणीक नाही, तर राजकारण्यांकडुन अपेक्षा कशाला आणी महाजनांनी भ्रष्टचार केला नसता तर ते राजकारणात जाउच होउ शकले नसते. अहो आज राजकारणाची ती किमान पात्रता आहे. म्हणजे एखाद्याला काही विधायक करायचे असले तरीही प्रथम त्याला भ्रष्टाचार करणे प्राप्त आहे. बाकी महाजनांना काही विधायक करायचे होते असे नाही. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. भाजपा (म्हणजे त्यात वेस्टेड इंटेरेस्ट बरं का) सोडुन महाजनांनी समाजासाठी काय केले फारसे काहीही नाही. त्यामुळे एका सामान्य माणसाचा खुन याच्यापलिकडे काहीही वाटले नाही. सारांश काय की दिनेश १००% बरोबर. मी सुद्धा सत्याला संस्कृतीपुढे जास्त समजतो.
|
Santu
| |
| Monday, May 08, 2006 - 6:57 am: |
| 
|
एकनाथ तुम्हि म्हणता ते बरोबर आहे. महाजन एक उमदा माणुस होता यात शंकाच नाही. pm ची दुरुन का होइना संधी असणारा एकमेव मराठी माणुस होता. ता.क. आपण धर्माच्या नावावर मते मिळत नाहित असे म्हणाला. म्हणजे फ़क्त्त हिदु का हिन्दु मुसलमान दोन्ही. दुसरे अहो पण bjp बर्याच राज्यात सत्तेवर आहे ते कसे
|
>>>> पण ब्राम्हण्य हे एखाद्या qualifiaction सारखं उल्लेखणं कितपत योग्य आहे? लोपामुद्रा आणि मृण्मयी, मी जे लिहील ते माझ्या अनुभवविश्वातुन लिहिल नि तसच लिहावस वाटल कारण तुमचे शहरातील अनुभव काय हेत ठाव नाही पण खेड्यापाड्यातील आमचे अनुभवान्नी मला तशी शब्दरचना करणे भाग पडले! अर्थात हा या बीबीचा विषय नसल्याने अन कुठेही या प्रश्णावर जरुर चर्चा करु!
|
Milindaa
| |
| Monday, May 08, 2006 - 10:58 am: |
| 
|
एकनाथ, एकदम व्यवस्थित लिहीले आहे.
|
Santu
| |
| Monday, May 08, 2006 - 11:56 am: |
| 
|
मुदि तुज़े बरोबर आहे. या सर्व कांर्गेसी पेक्षा त्या मानाने महाजन काय वाइट नव्हते. अरे इथ गवळी ठाकुर या सारख्या लोकाशीं टक्कर द्यायची म्हणजे खायचे काम नाही. उलट जनता च भ्रष्ट आहे नाहितर जिथे लोक educated आहेत तिथे गवळी निवडुन कसा आला. आणी राम नाइक हे निश्चितच नाच्या गोविन्दा पेक्षा सरस होते(तोच जो दाउद च्या पार्टीत नाचला होता) आणी भुजबळ ज्यांनी तेलगिला होटेलात ठेवला होता. असे लोकांना जर जनता डोक्यावर घेत आसेल तर त्याला राजकारणी तरी काय करणार. या उलट काहि ठिकाणि अशिक्षित लोक उदा.सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख हे सलग 25 वर्षे शे.का.प. मधुन निवडुन येतात.यांनी कधी पक्ष बदलला नाहि कि पैसे खाल्ले नाहित. यांच्या निवडणुकीला लोकच वर्गणी काढ्तात. अशी उदा: आहेत पण थोडी जे या खेडवळ लोकांना कळते ते मुंबई त ल्या शहाण्यांना कळत नाही.
|
लोकहो, कृपया बीबीच्या विषयाप्रमाणे बोला. काळा बाजार वाले व्यापारी, पोलिस, लाच, शेतकर्यांच्या आत्महत्या, गोविन्दा, शे का प वगैरे चर्चा योग्य बीबीवर केल्या तर बरे होईल.. धन्यवाद!
|
Asami
| |
| Monday, May 08, 2006 - 2:30 pm: |
| 
|
eknath एकदम चोक्कस लिहिले आहे.
|
Aschig
| |
| Tuesday, May 09, 2006 - 4:23 am: |
| 
|
eknath, fairly well written, but I think Dinesh's objection is to the completely one-sided reaction. I do not know enough about pramod mahajan, so my comments here are general. Though we tend to not say ill things about the deceased (immediately after she has died), that is perhaps the only time when most people listen for anything that is said about that person. As some have said, may be in case of a politician (Indian?) it is assumed that she is bound to be corrupt and so people do not need to say it, or as many seem to agree in this case, a politician gets rated not by her ratio of goodness-to-badness (1/0=infinite being best and 0/1=0 being worst) but just by the magnitude of their goodness (with the bad parts brushed under the carpet). To make sense of the ongoing discussion as well as to actually be useful, may be we should apply such a ratio metric to many current politicians(, and see where mahajan stood amongst them?) e.g. I would rate vajpeyee, manmohan singh, kalam fairly highly. Also, saying all politicians are bad by definition is discouraging for good people aspiring to be in politics, and good people in politics is the need of the hour.
|
लिम्बु... मी खेड्यातलीच आहे बरका... तुझ्या वाक्यावर जर v &c झाले ना तर मला शहरातील मायबोलीकर... वाळीत टाकतील... आणि वाक्प्रचार म्हणुन ठिक आहे... एकिकडे बातमी गायब झाली म्हणुन आणिबाणी म्हणतोस.. दुसरीकडे असे लिहितोस...
|
लोपामुद्रा, तो उल्लेख खटकला असल्यास त्याला माझा नाईलाज हे! आणि V&C वर वेळ येताच जरुर माझी भुमिका मान्डीन, पण हा बीबी त्याचा नाहीहे! बायदीवे, आणिबाणि अन "ब्राह्मण असला तरी" या शब्दरचनेचा सम्बन्ध ध्यानात नाही आला माझ्या!
|
Arch
| |
| Tuesday, May 09, 2006 - 7:43 pm: |
| 
|
लिंबू, तुम्ही आहे ऐवजी हे का लिहिता हो?
|
Zakki
| |
| Tuesday, May 09, 2006 - 11:02 pm: |
| 
|
मला वाटते चंपकपण असेच लिहितो, नि बरेच दिवस मला पण हाच प्रश्न विचारायचा होता. पण मागे नुसते मस्तानी म्हणजे काय, असे विचारले तर माझी अक्कल काढण्यात आली, नि माझा मेंदू पण आता काम करत नाही, अश्या प्रकारची प्रतिक्रिया झाली कुणा पुणेकराकडून. म्हणून मी गप्प बसलो. बरे झाले Arch ने विचारले.
|
आर्च, झक्की, माझी बोलीभाषा ही मराठीतील अनेकविध बोलीन्ची सरमिसळ भेसळ हे! त्यात आहे च्या ऐवजी हे चा शॉर्टफॉर्म कधी तोन्डवळणी पडला मला ठावुक नाही! विषय आणी वाक्याच्या आशयाच्या ओघात मी आहे, आहेत असे शब्दही अधुन मधुन वापरतोच, पण मुद्दमहुन वापरायला गेलो तर लिहिण्याचा ओघ मन्दावतो, या उप्पर विशेष कारण नाही. अन झक्की, नशिब माझ, चम्पक पण "हे" लिहितो अस म्हणुन चम्पक म्हणजेच लिम्बु असे तुम्ही समजला नाही हे माझे (अन खास करुन चम्प्याचे) भाग्यच नव्हे का? DDD
|
Ninavi
| |
| Wednesday, May 10, 2006 - 4:14 pm: |
| 
|
>>>>> लिंबू, तुम्ही आहे ऐवजी हे का लिहिता हो? तो ' हे' म्हणून जे लिहीतो त्यावर बाकीचे लोक ' आ' वासतात. 
|
लिही... लिम्बु... तुला जसे लिहायचे तसे... आपला आपला ऍक्सेंट असतो... छान वाटते बोलिभाशेत वाचायला.... भारतात २२ भाषा ८४४.. डायेलेक्ट्स आहेत अंदाज अपना अपना.... हिंदी नाहीका... मुम्बैय्या
|
डायेलेमा? डायलेक्ट म्हणायचे आहे का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|