इथे ही चर्चा सुरू ठेवा
|
Ninavi
| |
| Friday, July 14, 2006 - 5:31 pm: |
| 
|
केदार, खरंतर ही जागा नव्हे हा वाद घालायची, पण अर्जुनाची धडगत नव्हती वगैरे जरा अतीच झालं. अर्जुनाने त्या आधी कित्तीतरी वेळा कर्णाचा प्रत्यक्ष ( द्रौपदी स्वयंवर, विराट गोग्रहण, राजसूय) आणि अप्रत्यक्ष ( द्रोणांना गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाचा पराभव, गंधर्वाने ( नाव बहुतेक चित्रसेन, पण नक्की आठवत नाही) दुर्योधनाला पकडलं तेव्हा कर्ण पळाला,आणि ' वयम पंचाधिकं शतम' असं म्हणून वनवासातील युधिष्ठिराने अर्जुनाला पाठवून त्याला सोडवलं.) पराभव केलेला आहे. मॉड, नवीन बीबी उघडून तिथे हलवावी का ही चर्चा?
|
भीम होता ना तिथे? घटोत्कचाचे डॅड? मग त्याने का मरू दिले घटोत्कचाला?>>> भिम तेव्हा दुसर्या युद्दात लढत होता. कर्णाला ही शक्ती अर्ज़ुनासाठी ठेवायची होती. पिता पुत्रानी हाहाकार माजविला होता. दोघेही बलशाली. घटोत्कच आपल्या मायावी? शक्तीनी कोरवांचे नुकसान करत होता. दुर्योधन युध्द भुमी वर येऊन कर्णाला नाही नाही ते बोलतो. आधीच्या दोन्ही युध्दात कर्णाचा पराभव झालेला असल्यामुळे तो कर्णाची वाट लावतो. या बोलन्याने कर्ण चिडतो. त्याने कुंती ला वचण दिलेले असते की पाच जण जिंवत राहातील. ( यामुळे तो युधिष्टीर व नकुल सहदेवांना सोडुन देतो) मग ती शक्ती जी अर्जुना साठी ठेवली होती ती तो घटोत्कचावर वापरतो. वचणामुळे ती तो भिमावर वापरु शकत नाही. पण गमतीची गोष्ट अशी की आदल्याच दिवशी भिमाने त्याला जखमी केलेले असते. त्या युध्दात तो भिमाकडुन हारतो. ( संदर्भ भिम खरा कोण होता बहुतेक दुर्गा भागवत).
|
निनावी, मी पण वाद घालत नाहीये. अर्जुनाने जेव्हा कर्णाला हरवीले तेव्हा कर्णाकडे अनेक दैवी शक्ती न्हवत्या. वनवासाचा कालावधी कर्णाने त्या कमाविल्या. मला अर्जुन व कर्ण दोधेही आवडतात. पण शेवट्च्या युध्दात पांडवानी कृष्णाचा साह्यायाने बरेचदा खोटे युध्द्द केले आहे. आणी ते बरोबर आहे असे ही मला वाटते कारण धटासी धट राहान्यात काही बिघडत नाही. एक मत असे की रथाचे चाक काढताना तो मेला. म्हणजे अर्जुनाने त्याला बाण मारला. मग निहथ्या योध्यावर तरी बलशाली अर्जुनाने का बाण चालवावा? मॉड खरच चर्चा दुसर्या बिबी वर हलवा.
|
Moodi
| |
| Friday, July 14, 2006 - 6:04 pm: |
| 
|
मॉडरेटर इथे चर्चा हलवल्याबद्दल धन्यवाद. केदार कर्ण निश : स्त्र होता, पण आठवतय ना? अभिमन्यूला कौरवांनी घेरुन मारले होते ते? कर्णाने जेव्हा श्रीकृष्णांना हे विचारले की मला असे का मारताय तेव्हा त्यांनी ती आठवण करुन दिली अन विचारले की " तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? " बाकी चालू द्या. मस्त माहिती आहे. 
|
Asami
| |
| Friday, July 14, 2006 - 6:35 pm: |
| 
|
निनावे अग reuse करायला ते परत घेता आले पाहिजे असे म्हणतोय मी. ह्या संदर्भामधे काहितरी गोष्टपण आहे कि अश्वथाम्याला काहि कारणापरत्वे द्रोणाचार्यांनी ते पूर्ण शिकवले नसते. सुदर्शन चक्रबाबत मलाही नीटसे आठवत नाही. पण कुठेतरी सुदर्शन चक्र मधे घालून कुठलेसे अस्त्र थोपवले असे काहितरी वाचल्याचे आठवते. w/e ला परत शोधाशोध करून बघतो.
|
एक मत असे की रथाचे चाक काढताना तो मेला. म्हणजे अर्जुनाने त्याला बाण मारला. मग निहथ्या योध्यावर तरी बलशाली अर्जुनाने का बाण चालवावा? >> I guess कृष्णाने सांगीतले अर्जूनला त्याला तसेच मारायला कारण probably कर्ण अर्जूनापेक्षा जास्त वरचढ होता आणि अर्जून हरायची शक्यताच जास्त वाटत असावी कृष्णाला. आणि पांडव थोडे कपटी युद्ध खेळलेच. हा सुर्य हा जयद्रथ प्रकरण अर्थात कौरव फ़ार सत्याचे पुतळे होते असही नाही. पण एक कौतुक वाटत ना, की सकाळपासून रात्रीपर्यंत युद्ध खेळाय्चे आणि रात्री जाऊन झोपायचे आणि सकाळी परत युद्धाला तयार, कोणी रात्रीचे येऊन कपटाने कोणाला मारले नाही
|
रचना exactly हेच माझ्या पोस्ट मधे मी माडले आहे. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=835046#POST835046
|
अश्वत्थामाने युद्धाच्या शेवटी तसे कपट केले होते. त्याने रात्री जाऊन द्रौपदीच्या मुलांचा वध केला. म्हणूनच द्रौपदीने भीमाकरवी त्याचा सूड घेतला
|
>>की सकाळपासून रात्रीपर्यंत युद्ध खेळाय्चे आणि रात्री जाऊन झोपायचे आणि सकाळी परत युद्धाला तयार, कोणी रात्रीचे येऊन कपटाने कोणाला मारले नाही रचना हे चुकिचे आहे. मला वाटतं कौरवान्नी रात्री सुद्धा पांडवांच्या सैनिकांना झोपेत मारल्याचं मी वाचल्याच आठवतं आहे
|
Aschig
| |
| Friday, July 14, 2006 - 10:08 pm: |
| 
|
mahabharat search for the word "sink" and read on. Karna seems to tell Arjun not to play dirty, Krishna seems to tell Karna that dirty is okay and Karna seems to die without using a sword.
|
Saurabh
| |
| Friday, July 14, 2006 - 11:42 pm: |
| 
|
राधेय पुस्तकात पुढील प्रमाणे वाचल्याचे आठवत आहे : युद्धाच्या आधि कुंती कर्णाकडून तिच्या पाच पुत्रांच्या जीवाचे दान मागते आणि कर्ण ते देतो. कुंतिला पांडवांच्या गोटात परत पाठवताना उन्हापासुन संरक्षण म्हणून तो स्वतःच्या कमरेचा शेला देतो. कुंतीने हाच शेला अर्जुनाच्या कमरेला बांधलेला असतो युद्धाच्यावेळी. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत घुसल्यावर कर्णाचा सारथी शल्य (चु भु द्या घ्या), घोडे सोडवून निघून जातो आणि कर्ण जमिनीवरून युद्ध चालु ठेवतो. त्याच्या एक बाणाने अर्जुन मूर्छीत होतो तेंव्हा कर्ण चाक काढण्याच्या खटपटीत लगतो. दरम्यान कृष्ण कुंतिने अर्जुनाच्या कमरेला बांधलेला शेला काढुन त्याला वारा घालु लागतो शुद्धीवर आणण्यासाठी आणि हे कर्ण बघतो. कर्ण तेंव्हाच कुंतिचा स्पष्टपणे अर्जुनाकडे कल आहे हे जाणतो आनि मग नन्तर अर्जुन शुद्धीत आल्यावर देखील फ़ारसा प्रतिकार न करता (रथाचे चाक काढण्याचा प्रयत्न न थांबवता) मरण पत्करतो. [खरेतर अर्जुन कर्णावर तो चाक काढत असताना वार करण्यास तयार नसतो, पण कृष्ण त्याला द्रौपदी वस्त्रहरण वगैरे ची आठवण करुन देउन बाण चालवण्यास उद्युक्त करतो असेही ह्या पुस्तकात आहे. अर्थात राधेय हे खुपच नाट्यमय पुस्तक आहे. सत्याच्या किती जवळ आहे हे कोणी सांगावे?]
|
Bee
| |
| Saturday, July 15, 2006 - 1:53 am: |
| 
|
कर्णाचे सारथ्य शल्याने केले हे बरोबर आहे पण त्याचे सारथ्य कृष्णासारखे चतूर नव्हते. अर्जुनाचे सारथ्य कृष्णाने केले म्हणून अर्जुन वाचला नाहीतर कर्ण हा केंव्हाही अर्जुनापेक्षा कुशाग्र योद्धा होता. संपूर्ण महाभारत हे छल कपट निती अनिति न्यान अन्याय ह्या सगळ्यांनी अगदी खच्चून भरलेले आहे. जितके तुम्ही तळात जाल तितके तुम्हाला ते किचकट आणि गुंतागुंतीचे वाटेल. त्या तुलनेने रामायण बरेच सरळ सरळ आहे आणि चांगुलपणाचा कळस आहे. कर्ण आणि अर्जुन ह्या दोघांमध्ये इतकी असुया असण्यामागचे व दुर्योधन आणि कर्णामध्ये इतकी अटुट मैत्री असण्यामागचे नेमके कारण कुठले? आपले साहित्य मग ते मराठी असो वा इतर कुठल्याही भाषेतील त्यात मुद्दाम काही गोष्टी रंजकता निर्माण करण्यासाठी घेतल्या आहेत. दुर्गा भागवतांचे आणि इरावती कर्वेंचे महाभारतावरील पुस्तक म्हणून मला खूप वेगळे आणि पटेल असे वाटले. कारण दोन्ही पुस्तकात रंजकप्रधान भाग वगळून वस्तुस्थीती वाचकांसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयास केला आहे. युगांत तर अफ़ाटच आहे.. महाभारतातील अस्त्रांवर कुठले एखादे पुस्तक आहे का.. मलाही ह्या अस्त्रांचे आणि त्यामागिल विद्यांचे काही कळत नाही..
|
बी, बरोबर आहे. मला ही त्यामुळेच दुर्गा भागवत व ईरावती कर्वेंचे पुस्तक आवडतात. महाभारतील डेटस वर एक पुस्तक आहे. त्यात सर्वांची वय काय असतील, कुठले महीने असतील वैगरेचा आढावा घेतला आहे. मला पुस्तकाचे नाव व लेखक दोन्ही ही आठवत नाहीये.
|
Bee
| |
| Saturday, July 15, 2006 - 2:51 am: |
| 
|
महाभारतातील तारखांबद्दल नेट वर देखील माहिती मिळू शकेल पण त्यात फ़ारसे काही तथ्य नाही.. कारण मुळात आपल्याकडे इतक्या प्राचीन अर्वाचीन घडामोडींबद्दल काही लिखित किंवा मौखीक पुरावेच नाहीत. इरावती कर्वेंनी भीष्माचे वय ज्या पद्धतीने काढले ती पद्धत मला खूप बौद्धीक वाटली. मस्तच होत्या त्या.. मागे मी वर्तमानपत्रात वाचले होते की ज्या दिवशी जयद्रथाला अर्जुन मारतो त्या दिवशी संपूर्ण खग्रास सुर्यग्रहन होते म्हणून संध्याकाळी सुर्य अस्ताला जातो आणि परत वर येतो. त्यात कृष्णाचा काहीही सहभाग नाही तो फ़क्त वेळेवर अर्जुनाला हा बघ सुर्य आणि हा बघ जयद्रथ असे बोलुन जागे करतो आणि तिथे जयद्रथ मरतो.
|
हो त्या दिवशी सुर्यग्रहण होते. हे फक्त कृष्णला माहीती होते असे म्हणतात. खरे तर भिम हा माणूसच या सर्वांत वेगळा होता. आपल्याला भिम म्हणले की गदा आठवते. पण भिम हा देखील खुप चांगला धनुर्धर होता. धनुर्युध्दात त्याने कोरवांपैकी अनेकाचा पराभव केला होता. पांडवापैकी सर्वात emotional असा तो योध्दा होता. दुशा:सन वध प्रतीज्ञा काय किंवा किचक वध काय. दोन्ही वेळेस द्रोपदी ला माहीती होते कि भिमच तिला समजावुन घेईल. म्हनुनच ती किचक च्या वेळेस भिमाकडे जाउन त्याला सांगते. अर्जुन किंवा युधिष्टीराकडे ती जात नाही. शेवटी जेव्हा उत्तर दिशेस स्वर्गारोहनास ते निघतात तेव्हा सर्वात आधी द्रोपदी खाली पडते. पांडवापैकी भिमाशिवाय कोणी थांबत नाही. भिमच थांबतो. द्रोपदीस पांडवात भिम सर्वात जवळचा होता, तिच्या emotional needs तोच समजु शकत होता. अशा अनेक गोष्टी आहेत की भिम त्याला त्याचा भांडखोर स्वभावाला वेगळे करुन पाहीले तर वेगळा जाणवेल. भिम खरा कोण होता? हे पुस्त्क त्यामुळेच माझे आवडते आहे. बिबी चे टायटल महाभारत असल्यामुळे मी भिमा बद्दल लिहिले.
|
Aashu29
| |
| Saturday, July 15, 2006 - 3:04 am: |
| 
|
मि जरा विशयाच्या दूर जतिये पण महाभारतात मला हाच प्रश्ण पडतो नेहमि कि द्रोपदि वस्त्रहरणच्या वेळि सभेत भिश्म, ध्रुतराश्ट्र असे adult असुनहि हा प्रकार घडलाच कसा? हे तर आजच्या युगातहि होणे नाहि बुवा!! या विशयाकडे वळले तर हरकत नाहिना?
|
Bee
| |
| Saturday, July 15, 2006 - 3:20 am: |
| 
|
काहीतरीच काय आशू.. हे आजच्या युगातही अगदी सर्रास घडते आहे. मागे मुंबईमध्ये एका मुलीला ट्रेनमध्ये अश्लील करण्यात आले त्यावेळी बघ्यांची भुमिका निभवणारे बरेच जण तिथे उपस्थीत होते. ते भितीने तसे होते हे एक कारण आहे. वस्त्रहरणाचे उदाहरण सोड पण असे अनेक प्रकार आहेत जिथे आपण मख्खपणे उभे असतो आणि काहीच करू शकत नाही.. मला नाही वाटत द्रौपदी वस्त्रहरणात ज्येष्ठ मंडळींनी काही वावगे केले.. कारण ते जे घडले ते पांडव दुतात डाव हरल्यामुळे कौरवांना द्रौपदी मिळाली होती. मग तिचा उपयोग कसा करायचा हे त्यांच्यावर अवलंबुन होते. त्यावेळेसच्या निती अनितीला ते धरुन होते. आज जरी हे पटत नाही तरी त्याकाळी ते नियमबाह्य नव्हते. कालच मी एका स्त्रिची निवस्त्र धींड काढण्यात आली ही बातमी वाचली. आजही काही भागात सतीची चाल रुढ आहे. ... हे अजून घडते आहे.. सतीयुगात सितेला अग्निपरिक्षेत झोकून द्यावे लागले हे तर मग कलियुग आहे..
|
Bani
| |
| Saturday, July 15, 2006 - 3:33 am: |
| 
|
मला वाटत कर्णासारखा दानशुर देखिल कर्ण च असेल जेव्हा शेवट्च्या क्षणी त्याच्याकडे याचक येतो तेव्हा तो आपले सोन्याचे दातही देऊन टाकतो र्मुत्यंजय वाचताना प्रत्येक वेळा रडू च येते.इतक सुंदर व्यक्तिमत्व रेखाट्ल आहे. आणि आशु ज़र भिष्म, ध्रुतराश्ट्र काही करु शकले असते तर महाभारत झालेच नसते. हल्लीच्या काळी म्हणशील तर वेगवेगळी महाभारत चालुच आहेत पण ती निर्दशनास येत नाहीत येव्हढ्च.
|
Bani
| |
| Saturday, July 15, 2006 - 3:43 am: |
| 
|
एक्साट बी मला पण हेच म्हणायच आहे. पण द्रोपदीला निदान क्रुष्ण तरी होता आत्ता कलीयुगात कोण आहे?
|