|
कर्णाची आणि दुर्योधनाची मैत्री नक्की केव्हा होते? सगळे पांडव आणि कौरव शस्त्रविद्या शिकुन हस्तिनापुरात आपापली कौशल्य दाखवत असतात तेव्हा तिथे कर्ण येतो. सगळे धनुर्धर स्थिर गोष्टींवर किंवा उडण्यार्या पक्षांवर बाण मारत असतात पण कर्ण एका पक्षाला जखमी न करता बाणानी जायबंदी करतो... बहुतेक तिथे भिष्म त्याला सुतपुत्र म्हणुन किंमत देत नाहीत... त्यानंतर दुर्योधन त्याच्या पाशी जातो आणि मैत्री चा हात पुढे करतो.(हाच एक अर्जुनाला तोडीसतोड आपल्याकडे असावा म्हणुन कदाचित) तिथुन कर्ण active महाभारताचा भाग बनतो. ह्यात काही चुकीचं असेल तर प्लीज दुरुस्त करा.
|
Ninavi
| |
| Saturday, July 15, 2006 - 6:43 am: |
|
|
अमेय, तपशील असा आहे की शस्त्ररंगाच्या वेळी कर्ण (आमंत्रित नसताना..) तिथे येतो आणि ' जे अर्जुनाने करून दाखवलं ते मीही करतो पहा' अश्या अनुचित spirit मधे काही कौशल्यप्रदर्शन करतो. बरं, तिथेच थांबत नाही, तर अर्जुनाला द्वंद्वासाठी आव्हान देतो. तेव्हा त्यावेळच्या प्रथेनुसार दोन्ही योद्ध्यांची ओळख विचारली जाते. कर्ण सूतपुत्र असल्याचं सांगायचं टाळत असताना ( आणि दुसरी काही ओळख त्याची त्यालाच माहीत नसताना) अधिरथ तिथे येऊन त्याला सर्वांसमोर ' पुत्र' म्हणतो. दुर्योधन पांडवांच्या एकूण शक्तीप्रदर्शनाने जळत असतो म्हणून त्यांना आव्हान देणारा कुणीतरी आला या आनंदात कर्णापुढे मैत्रीचा हात करतो. ( त्याला अंग देशचं राज्य देतो अशी आख्यायिका आहे, पण ते कसं शक्य आहे? तेव्हा दुर्योधन काही स्वतः राजा झालेला नव्हता, कुमारच होता.)
|
Ninavi
| |
| Saturday, July 15, 2006 - 6:45 am: |
|
|
केदार, तू भीमावरचं जे पुस्तक म्हणतोयस ते डॉ. प. वि. वर्तकांचं ' स्वयंभू' तर नव्हे?
|
निनावी, नाही ते स्वंयभु नाही कारण पुस्तकाचे नावच भिम खरा कोण होता? हे आहे. बहुतेक ते दुर्गा भागवतांचे आहे. मला exact लेखक आठवत नाहीये. पण त्यातील सर्व तपशिल आठवतो. युध्दरंगाचा तपशील खरा आहे व तो सर्वमान्य आहे. आता प्रश्न असा की ओळख का करुन द्यावी व दुर्योधन राजा नसताना अंग देश कसा देतो. त्या काळी युध्द देखील सम होत असे म्हनजे क्षत्रीयाशी क्षत्रीय पुढे जाउन रथी शी रथी ई. त्यामुळे ओळख तर करुन द्यावीच लागनार. अंग देश बहुतेक दुर्योधनाचा मामा चा देश आहे त्यामुळेच तो दुसर्याला देउ शकतो. कारण तो राजा नसल्यामुळे स्वत्:चा देश देऊ शकनार न्हवता शिवाय त्याने युध्दरंगा आधी कुठल्याही मोहीमा केल्या न्हवत्या, त्या कडे कुठलेही राज्य न्हवते. पण आई कडुन आलेले राज्य बहुतेक तो पहात असे. (तसाही शकुनी राज्यकुशल न्हवताच). त्यामुळे हे राज्य त्याने कर्णाला दिले. दान केलेल्या राज्याचा राजा जरी तो झाला तरी तो खरा राजा ठरत नाही. दान केलेल्या वस्तु क्षत्रीय घेत नसावेत. त्यामुळे राजा असुनही त्याला युध्दरंगा भाग घेताना द्रोणंनी विरोध केला. कुठल्याही पुस्तकात अंग देश दुर्योधना ने का दिला ह्यावर स्पष्ट माहीती नाही. तर्कावरुन ह्या पर्यंत मी पोचलो आहे. तो चुकीचा ही असु शकतो.
|
छ्या! Mahabharat! Ever tempting to read still again & again. Start at any time, from any line.. doesn't matter!
|
गजा आणि मित्रानो, तुमच्यापैकी कोणी 'पर्व' नावाचे पुस्तक वाचले आहे का? नसल्यास जरुर वाचा ते महाभारतावरच आहे आणि थोड वेगळ आहे. या पुस्तकाला राष्ट्रपती पुर्स्कार मिळाला आहे मुळ पुस्तक कन्नड आहे आणि लेखक आहेत डाॅ एस एल भैरप्पा! अनुवाद सौ उमा कुलकर्णी यानी केला आहे. पुस्तक सुंदरच आहे. ७८८ पाने आहेत पण एकनएक पान वाचाव अस आहे जुन्य पुस्तकांमधे महाभारतावर 'कल्पवृक्ष' नावाच पुस्तकही होत, मला वाटत त्याचे दोन भाग होते मी शाळेत असताना वाचलेल. ते पण छान होत. महाभारत खरच खुप tempting आहे कारण त्यात अनेक पात्रांच्या अनेक गोष्टी आणि त्यांचा विलक्षण परस्पर संबंध आहे. त्यामानाने रामायण monotonus वाटत.
|
वर चालू असलेली चर्चा वाचली. मला महाभारत ह्या विषयावर वाचायला, बोलायला, चर्चा करायला, वाद्-विवाद घालायला खूप खूप आवडते. कारण तो विषयच तसा आहे. पण येथे मी माझे प्रामाणिक मत मांडू इच्छितो: युद्धरंगाच्या वेळी दुर्योधन भलेही राजा नव्हता, तरी एका सम्राटाचा थोरला पुत्र होता. आणि त्या काळी अशा युवराजांकडेही काही राज्ये असत. एवढेच नाही तर त्यांचा स्वत:चा असा खजिना असे. त्यामुळे दुर्योधनाने कर्णाला राज्य देणे ह्यांत तांत्रिकदृष्ट्या काहीच गैर वा अनुचित नव्हते. किंबहुना द्रोणांनी कर्णाला जो विरोध केला होता तो पांडवांवरील अती प्रेमामूळे आणि दुर्योधनद्वेषामूळेच केला होता असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. आणि मूळात दुर्योधनाने जे केले त्यांत काहिच गैर नव्हते. कुठल्याही आदर्श युवराजाने जे करायला हवे होते तेच त्याने केले. आत ह्यावर पांडवांचा कैवार घेणारे आक्षेप घेतीलही कदाचित. पण त्याला काही इलाज नाही. दुर्योधन म्हणजे एक धगधगता निखारा होता.... आणि कर्ण म्हणजे साक्षात अग्नीच ! त्या दोघांकडूनही पुर्ण आयुष्यात फक्त एकच चूक झाली.... आणि तीच त्यांच्या नाशास कारणीभूत ठरली. .... .... .... असो. कुणालाही माझे म्हणणे खोडून काढायचे असल्यास ते मोकळे आहेत. आणि कुणाला ह्या विषयावर साधक-बाधक चर्चा करायची असेल तर त्यालाही माझी पूर्ण तयारी आहे. कळावे. चौकटचा राजा
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|