|
Ninavi
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:55 pm: |
| 
|
अप्रतिम आहे चित्र रुपेश. केदार, कर्ण शेवटी तलवारीने लढला? खरंच की काय?
|
अरे! मला असे वाचल्याचं आठवतंय की शेवटी चाक जमिनीत रुतते आणि ते बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो असताना अर्जुन त्याला बाण मारतो असे..
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 2:54 am: |
| 
|
शेवटच्या क्षणी कर्ण तलवारीने लढतो हे मला स्मरत नाही. माझ्या मते, कर्णाला अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडायचे असते पण त्याला ती विद्या ऐन वेळी स्मरत नाही. ह्या संधीचा फ़ायदा घेऊन अर्जुन त्याच्यावर बाण सोडतो आणि कर्ण अनंतात विलीन होतो. त्या पूर्वी रथाचे चाक रक्तमासाच्या चिखलात रुतुन बसते आणि तो ते चाक काढण्याचा प्रयत्न करतो पण ते निघत नाही तेंव्हा तो जमिनिवरूनच लढतो. मृत्युंजय मी फ़क्त एकदाच वाचले आहे. महाभारत एकदाच बघितले आहे. रुपेश, कर्णाच्या चित्रासहीत मला ती मावळती केशरी रंगाची संध्याकाळ, दोन्ही बाजूला सैन्यांचे धूसर चित्र आणि चित्राचा rectangular लांबूळका आकार सगळे काही खूप खूप आवडले. कर्ण खरच पाठमोरा भासतो आहे.. पण सैन्य मात्र विखुरलेले असूनही पाठमोरे भासत नाहीत.
|
Bee आणि अमेय माझ्या माहिती प्रमाणे... कुरूक्षेत्रात ते एकमेकांच्या एकापेक्षा जास्त वेळा सामोरे येतात.. पण.. सगळ्यांचा गुरू श्रीकृष्ण हुशारीने अर्जुनाला कर्णापासून दूर नेतो.... कर्णाकडे असलेल्या ब्रह्मास्त्राची भीती श्रीकृष्णाने पहिल्या पासूनच ओळखलेली असते... जेव्हा कर्णाचा पराक्रम शीगेला पोचतो.. तेव्हा श्रीकृष्णच भीमाला आज्ञा देतो.. कि घटोत्कचाला पाचारण करा... घटोत्कच युद्धात कौरवांच्या सेनेचे अर्धे अधिक सैन्यबळ आपल्या अजस्त्र देहाच्या सामर्थ्यावर नष्ट करतो... तेव्हा कर्णाला नाईलाजाने ( दूर्योधनाच्या सांगण्यावरून ) ब्रह्मास्त्र वापरावे लागते आणि घटोत्कचाचा नाश होतो... आणि श्रीकृष्णाचा पुढला मार्ग सुकर होतो त्याला मिळालेल्या शापाचा संदर्भ बरोबर आहे पण तेव्हा अर्जुन आणि कर्णाच्या निर्णायक युद्धात कर्णाकडे ब्रह्मास्त्रच नसते.. आणि अमेय तो महागुरू म्हणजे परशुराम... जो कर्णाला ब्रह्मास्त्र देतो... जाणकार लोक काही चुकले का
|
Moodi
| |
| Friday, July 14, 2006 - 8:18 am: |
| 
|
जास्वंद एकदम बरोबर. ते गुरु परशुरामच. कर्णाने त्यांना मी ब्राम्हण आहे असे सांगुन विद्या मिळवली होती, कारण ते क्षत्रियांना विद्या द्यायला तयार नव्हते( त्याचे कारण माहीत असेल सर्वांना, नाहीतर इथेही कुणी आरक्षण वाले येऊन वाद घालतील. ) ब्रम्हासत्राविषयी पण बरोबर( हे माझे मत, बाकी सांगतीलच)
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 8:29 am: |
| 
|
जास्वंद ही रंजक माहिती ठीक आहे रे पण चित्रानुसार शेवटच्या क्षणी कर्ण तलवारीने लढला की धणुष्यबाणाने हा प्रश्न अजून कायम आहे हा एका प्रतिभावंत चित्रकाराच्या अस्मितेचा प्रश्न आहे मृत्युंजय पुस्तकात आणि बी. आर. चोप्रांच्या महाभारतामध्ये कर्ण शेवटी तलवारीने लढताना दाखविला आहे का? मला दोन्हीमध्ये हा शेवटचा भाग आठवत नाही.. कृष्णाचा मार्ग सुकर कसा झाला ते सांगशील का जास्वंदा? ऋषी परशुरामाने कर्णाला हा श्राप दिला होता की ऐन संकटच्या वेळी तुला ह्या विद्येचा काहीच उपयोग होणार नाही.. ती तुला अवगत असूनही स्मरणार नाही. हा श्राप नव्हता की तू फ़क्त एकदाच हे अस्त्र वापरू शकणार ......???? माझे नाव तू Bee लिहिलेस आणि अमेयचे छान देवनागरीमध्ये लिहिलेस हा दुजाभाव का? आणि तुझ्या नावात तीन तीन a कसे रे.. jaaaswand म्हणजे जाअस्वंद..
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 8:50 am: |
| 
|
अजून एक की कर्णाची मांडी पोखरुन काढणारा कोळी नव्हता तो विंचू होता असे वाटते आणि कर्णाच्या मांडीवर निजलेल्या ऋषींना जाग येते ती कर्णाच्या उष्ण रक्ताच्या स्पर्शामुळे. चु. भु. ध्या. घ्या. नाहीतर परत सामान्य ज्ञानासारखे होईल..
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 8:53 am: |
| 
|
अजून एक की कर्णाची मांडी पोखरुन काढणारा कोळी नव्हता तो विंचू होता आणि कर्णाच्या मांडीवर निजलेल्या ऋषींना जाग येते ती मांडीतून निघणार्या रक्ताच्या उष्ण स्पर्शामुळे. चु. भु. ध्या. घ्या. नाहीतर परत सामान्य ज्ञानासारखे होईल..
|
मी वाचलेल्या गोष्टीत भुंगा होता .. !!!
|
Moodi
| |
| Friday, July 14, 2006 - 9:07 am: |
| 
|
हो भुंग्यानेच पोखरली. बरोबर..... 
|
>>>>>अजून एक की कर्णाची मांडी पोखरुन काढणारा कोळी नव्हता तो विंचू होता आणि अरारारारारा, अरे कोळी नाही की विन्चु नाही, पोखरणारा तो एक (अनेक नाही) भुन्गा होता! बी, कोळी जाळे विणतो, विन्चु नान्गिने दन्श करतो आणि भुन्गा पोखरतो येवधे सामान्य ज्ञान बहुतेक माझ्या धाकटीला आलेल असाव अशी आशा करतो! DDD
|
अरे बी कसला दुजाभाव अन कसले काय.. मला आधी वाटले.. Honey-Bee सारखा.. काहितरी आंग्लभाषिक संदर्भ असेल तुझ्या ID ला म्हणून तसे वापरले बी माझ्या माहिती प्रमाणे.. ब्रह्मास्त्राचा उपयोग एकदाच करता येत होता .... अन्यथा.. अश्वत्थाम्याने पण.. more than 1 वेळा वापरले असते.. मणी श्रीकृष्णाने काढून घेतल्यावर... आणि.. ब्रह्मास्त्र जर.. असे reusable असते..तर श्रीकृष्णाने घटोत्कचाला कधीच कर्णासमोर आणले नसते..... त्याला.. कर्णाचा भाता.. खाली करायचा होता... अर्जुनासमोर येईपर्यंत तसेच श्रीकृष्णाचा मार्ग सुकर कसा झाला... हे सांगायला.. मोठा संदर्भ द्यायला लागेल... त्यासाठी..जमले तर युगंधर वाच एकदा... एकच सांगतो कर्णाने जरी कुंतीला वचन दिले होते कि.. कि तीचे ५ पांडव जिवंत राहतील तरी ऐन युद्धात अर्जुनसमोर आल्यावर.. त्याच्याविरूद्ध ब्रह्मास्त्र वापरण्याच्या likely possible दूर्योधनाच्या मागणीला तो नाही म्हणू शकला नसता.. आणि ह्याची पूर्ण कल्पना श्रीकृष्णाला होती... म्हणून म्हटले मार्ग सुकर झाला.. राहता राहिला प्रश्न तलवार का धनुष्याचा... तर मला exact आठवत नाही.. पण माझ्या तर्काप्रमाणे... कर्ण शेवटची लढाई धनुष्य-बाणाने लढला... कारण त्याचे अर्जुनाचे एकतर द्वंद्व चालू होते.. आणि जर अर्जुनाने बाण मारून त्याला घायाळ केले.. ह्याच अर्थ.. द्वंद्व शास्त्राच्या नियमाप्रमाणे रथाचे चाक बाहेर काढण्याआधी त्याच्या हातात धनुष्य-बाणच होता.... माझ्या नावातल्या a च अर्थ परत कधी तरी सांगीन
|
अरे अरे गोन्धळ झालाय इथे! कर्णाकडे दोन असामान्य अस्त्रे होती. १. ब्रह्मास्त्र जे त्याने परशुरामाकडून(खोटे बोलून) मिळवलेले असते. पण परशुरामाच्या शापामुळे तसेही त्याला वेळेवर आठवणार नसते. त्याची अर्जुनाला भिती नसतेच. २. इन्द्राची अमोघ दिव्य शक्ती! ही त्याने इन्द्राला ब्रह्मणाच्या रुपात त्याची जन्मजात कवच कुंडले दान केली त्यावेळी इन्द्राकडून मागून घेतलेली असते, (हे सूर्याच्या सूचनेप्रमाणे! इन्द्र आणि सूर्य दोघेही आपापल्या पुत्रांचे हित बघत असतात बिचारे!) ही त्याला एकदाच वापरता येणार असते पण याला अर्जुनाकडे कोणतेही उत्तर नसते, याचीच अर्जुनाला भिती असते. आणि हीच शक्ती त्याला नाइलाजाने घटोत्कचावर वापरावी लागते. महाभारत खरच केवढे रोमांचक आहे! मी सध्या मुलाला रोज महाभारत वाचून दाखवतेय त्यामुळे माझे ज्ञान अगदी ताजे ताजे आहे मुलाला खूप आवडते, पण अवघड प्रश्न विचारतो!( भीम होता ना तिथे? घटोत्कचाचे डॅड? मग त्याने का मरू दिले घटोत्कचाला? वगैरे!) मॉड, please हे थोडा वेळ राहू देत इथे मग ही पोस्ट्स हलवा किन्वा उडवा.
|
मैत्रेयी, अगदी बरोबर, मला घोळ जाणवत होता पण नीट आठवत नव्हता! बाकी एकुणच माहिती छान मिळाली, पुन्हा रिव्हीजन झाली हे! >>>> मॉड, please हे थोडा वेळ राहू देत इथे मग ही पोस्ट्स हलवा किन्वा उडवा. (अग मग सरळ सान्गना की मिलिन्दा, थोडावेळ चुप्प लाम्ब रहा, या बीबी पासुन, तो नक्की ऐकेल) DDD
|
Jayavi
| |
| Friday, July 14, 2006 - 1:45 pm: |
| 
|
मैत्रेयी, बरं झालं तूच लिहिलंस कारण माझ्याही माहितीप्रमाणे कर्णाला ब्रम्हास्त्र वापरायलाच मिळाले नाही कारण ऐन वेळी तुला ते आठवणार नाही असा परशुरामाचा शाप होता. घटोत्कचावर वापरलेलं अमोघ अस्त्र इंद्राकडून मिळालेलं असतं. कर्ण तलवार घेऊन लढलेला माझ्याही वाचनात नाही आला. रुपेश, चित्र काढायाच्या आधी तू नीट माहीती करुन घेतली होतीस का रे? तुझं काढलेलं चित्र अप्रतिम आहे पण जर त्याचा इतिहासच चुकीचा असेल तर......? तुझ्या चित्रकारीतेबद्दल अजिबात दुमत नाहीये.
|
Asami
| |
| Friday, July 14, 2006 - 4:34 pm: |
| 
|
ब्रह्मास्त्राच्या वापरावर reusablity शी संबधित निर्बंध असा होता कि ते सोडल्यावर ते परत घेता आले पाहिजे. अश्वथाम्याकडे ती शक्ती नव्ह्ती. महाभारतामधे अर्जुनाच्या बर्याच युद्धंमधे ब्रह्मास्त्र बरेचदा वापरल्याचे उल्लेख आठवतात. ब्रह्मास्त्रावर उतारा म्हणून मला वाटते पाशुपतास्त्र वापरत असत. अर्जुनाकडे ते होते. त्याला शंकारांबरोबर झालेल्या द्वंद्वानंतर ते मीळाले होते. द्रौप्दीबरोबर धर्मराजाला एकांतवासामधे पाहिल्याची शिक्क्षा म्हणून घेतलेल्या वनवासामधे हे युद्धा झाले होते. maybe I'm wrong about this one तसेच सुदर्शनचक्रापुढे ब्रह्मास्त्र हतबल होते असे काहीतरी होते. I guess it had to do with hierarchy of Gods एक भाग मला कधीच कळला नाही तो ईंद्राच्या अमोघ शक्तीमधे असेहि काय होते कि ती अर्जुनाला तीचा प्रतिकार करता येत नव्ह्ता ?
|
Anjali28
| |
| Friday, July 14, 2006 - 5:02 pm: |
| 
|
मैत्रेयी, तू कोणतं महाभारताचं पुस्तक आणलं आहेस please सांगशील का? मला भारतातून मागवायचे आहे.
|
Ninavi
| |
| Friday, July 14, 2006 - 5:14 pm: |
| 
|
इंद्राने दिलेल्या शक्तीचं नाव 'वासवी' शक्ती असं वाचल्याचं आठवतंय. ती एकदाच वापरता येणार होती. ती अमोघ का होती हे माहीत नाही. ब्रह्मास्त्र परत घेता आलंच पाहिजे असा ' निर्बंध' नव्हता, पण वापरणार्याला तेही माहीत असावं अशी अपेक्षा होती. अश्वत्थाम्याने युद्धोत्तर ते अविचाराने वापरलं, आणि ते त्याला परत घेता येईना, तेव्हा ते उत्तरेच्या उदरातील गर्भावर फक्त direct केलं कृष्णाने, ( म्हणजे ते सुदर्शन चक्रापुढे निष्प्रभ होत होतं हे चूक वाटतं.) आणि मग पुन्हा त्या गर्भाला जीवित केलं. तोच परीक्षित. पाशुपतास्त्राची बाकी माहिती बरोबर आहे, पण त्याचा ब्रह्मास्त्राशी काही संबंध नाही माझ्या माहितीप्रमाणे.
|
असामी, इन्द्र अर्जुनाचे पिताश्री आणि देवांचा राजा सुद्धा. म्हणजे सगळ्या दृष्टीने अर्जुनाला वरचढ च की! तेव्हा 'अमोघ शक्ती' नक्कीच तसेच काहीतरी unique अस्त्र असणार. अंजली, पुस्तकांच्या BB वर लिहितेय माहिती.
|
केदार, कर्ण शेवटी तलवारीने लढला? खरंच की काय? >>> हो. कारण, कर्णाच्या रथाचे चाक रुतते. तो लगेच धन्युषबाण घेउन खाली उतरतो. तो उतरतानाच कृष्ण सांगतो की अर्जुना मार त्याला. अर्जुन बाण सोडतो, त्या बाणाने कर्णाचे धनुष्य तुटते. कर्णा कडे गदा व तलवार रथात असतात. तो तलवारीला प्राधान्य देतो व तलवार घेउन उतरतो. आता अर्जुनाने बाण खाली ठेउन तलवार हातात घ्यायला पाहीजे, ( त्या काळात तसा संकेत होता की ज्या शस्त्राने शत्रु लढतो त्यानेच आप्ण सुध्दा लढले पाहीजे.) पण तो तसे करत नाही. कारण त्याला हे माहीती आहे की कर्ण फक्त धनुष्य बाणानेच नाही तर तलवार युध्दात सुध्दा त्याला हरवु शकतो, कृष्ण तेव्हा कर्णाचे चित्त विचलीत करन्यासाठी परत एकदा त्याला सुत पुत्र म्हनुन चिडवतो. हे सर्व होतानाच अर्जुन बाण मारतो व कर्ण खाली पडतो. आता यात बरेच प्रवाद आहेत की कर्ण रथाचे चाक काढत होता वैगरे. पण मल ते खोटे वाटतात. त्या काळी एकदा रथी ला विरथ केले कि त्याने परत त्याच रथात बसायचे नाही. तो दुसर्या रथा बसु शकतो. कर्ण एवढा मुर्ख नक्कीच न्हवता की त्याला हे नियम माहीती न्हवते. उलट अर्जुनाला हे पक्के माहीती होते की एकदा का शल्या ने दुसरा रथ आणला की परत काही अर्जुनाची धडगत नाही, त्यामुळे तो सम युध्द न करता ( नियम न पाळता) कर्णाला मारतो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|