Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2006

Hitguj » Views and Comments » General » निषेध » Archive through January 24, 2006 « Previous Next »

Sanjubaba
Friday, November 25, 2005 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1307579.cms

मराठी भाषेला आणी मराठी माणसाना दडपण्याच्या कर्णाटक सरकारच्या क्रुतीचा धिक्कार असो.

माझ्या मनात जशि तिथल्या मराठी लोका बद्दल सहानभुती आणि Karnatak सरकारबद्दल राग़ तुमच्याहि मनात नक्किच असेल.

पण आज तिथल्या मराठी बान्धवाना आपल्या सहानभुतीबरोबर पाठिम्ब्याची पण गरज आहे. आणि तशीच काहीशी माझ्या सारखी तुमचीही असेलच.

तेव्हा सर्व मायबोली करान्च्या मदतीने आपल्याही काही करता येईल काय या बद्दल विचार व्हावा, हेच मला माझ्या लिखानातुन सर्वाना सान्गायचे आहे.


Gurudasb
Friday, November 25, 2005 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजुबाबा
मीही निषेध व्यक्त करतो
मायबोली मराठीबद्दल कर्नाटक सरकारने घेतलेला पवित्रा १०० % निषेधार्थ आहे. सरकारी पातळीवर केंद्र आणि राज्यसरकारने आता सीमा बांधवांच्या सहनशीलतेची आता जास्त परीक्षा घेवू नये. आपण वैयक्तिक पातळीवर आज खालील गोष्टी नक्की करू शकू.
१] कुणीही कर्नाटकी दिसला तर त्याच्या बरोबर मराठीतूनच बोलणे. अगदी मित्र असला तरी.
२] कर्नाटकी लोकांच्या दुकानांवर बहिष्कार घालणे. तेथिल उत्पादीत मालावर बहिष्कार घालणे.

३] कर्नाटक वाहतूक मंडळाच्या गाड्यांवर बहिष्कार घालणे. इ
संघर्ष आता अटळ आहे. एक स्तुत्य गोष्ट म्हणजे महा. सरकारने सीमा बांधवांची बाजू उचलून धरली आहे.


Graceful
Saturday, November 26, 2005 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I do not think that it is correct to boycot the whole of Karnataka and Kannada people for the selective attitude of Karantaka Govt. towards the people of Belgaum and near-by areas.
What have the poor and inocent people of rest of Karantaka got to do with this problem?

Gurudasb
Saturday, November 26, 2005 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेसफ़ूल
हेतू कर्नाटकी जनतेला वेठीस धरण्याचा नाही. सरकार जनतेचे प्रतिनिधीत्व करते., वरील उपाय केले तर जनताच त्या सरकारवर दबाव टाकू शकते. पण विचार केला तर ती तेथिल जनतासुद्धा मराठी मनुष्य दिसला की त्याला तुच्छ मानते. खूप वर्षे हा प्रश्न तसाच रेंगाळत पडला आहे. आता तोंड फ़ुटले आहे होऊन जावूदे आणि निकाल येऊदे.सहनशक्ती संपली कि उद्रेक होणारच.तेथिल मराठी भाषिकांवर सरकारची जबरदस्ती का ? केंद्र सरकार झारखंड सारखे हल्ली निर्माणझालेले प्रश्न सोडवते व भाषिक राज्ये झाली त्यावेळेपासूनचा हा प्रष्न रेंगाळत ठेवते. प्रत्यक्ष सीमा भागातील जनता श्रेष्ठ की मतांचे लोभी भ्रष्टाचारी राजकीय नेते श्रेष्ठ ? मधल्या काळात गोवा ह्या लगतच्या छोट्या राज्याला बेळगाव, कारवार सुपे हल्याळ हा भाग व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून एक राज्य बनवण्याचा पर्याय आला होता. तोही चांगला होता.
बेळगाव, कारवारसह महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे


Graceful
Saturday, November 26, 2005 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GB,

I agree with you that people are suffering in these border-line areas.
But, honestly I do not believe that violence, threatening or ostracizing Kannadigas in Maharashtra can solve any problems. Also, in doing so, there is a possibility that similar treatment may be meted out to the Maharashtrians living in Bangalore and other places in Karnataka leading to further escalation of violence.

Today, there are congress-led or involved govts. in Maharashtra, Karnataka and also at the center, why can’t the concern politicians seize this opportunity and settle this complex issue once and for all through political discussions and dialogue.

In the 70s, somewhat similar situation had happened in Goa. Sizeable Goans wanted to merge with Maharashtra while the rest were in a favor of an independent state. The issue was finally settled through a peaceful opinion poll conducted in Goa.


Champak
Saturday, November 26, 2005 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Today, there are congress-led or involved govts. in Maharashtra, Karnataka and also at the center,>>>>>>>>>>>This is not the first time of such a co-incidence!:-(

Sanjubaba
Thursday, December 01, 2005 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेसफ़ुल, दर वेळेला आपणच मराठी मानसानेच का शान्त्ततेचा मार्ग धरायचा. आज ह्याच गोष्टि मुळेच महाराष्टातच अमराठी लोक आज आपल्यावर डोइजड होऊन बसलेत. ज्या लोकानी तो हल्ला केला होता तेहि कोणी राजकारणी नव्हते तर तिथलेच so called गरीब लोक होते. जे कन्नड भाषेसाठी लढतात.
गुरुदेसब ने दिलेले सल्ले आपण वयक्तिक पातळीवर विरोध नक्किच करु शकतो.


Ramachandrac
Saturday, December 03, 2005 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो, कुठलिहि क्रुति किवा मार्ग ठरवायच्या आधी सर्वप्रथम मुलभूत प्रष्ण समजावुन घेउया का?
१. सयुक्त महाराष्ट्र चळवळी च्या वेळी हा प्रश्ण का सोडवला गेला नाही?

२.महाजन अहवाल नेमका काय आहे?

३. बेळ्गाव शहर सोडुन इतर ठिकाणी सिमाभागात कितपत जनमत महाराष्ट्राच्या बाजुने आहे.


Limbutimbu
Saturday, December 03, 2005 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> The issue was finally settled through a peaceful opinion poll conducted in Goa.
बा ग्रेसफुला, तुझ्या वरल्या वाक्यात विलेक्शनीच जे हे तेच बेळगाव नगरपालीकेत वेळोवेळी निवडुन आलेल्या एकीकरण समितीच्या सत्ते ने आजवर सिद्ध झाल नाही की केन्द्र अन कर्नाटक अन महाराष्ट्रातल काॅन्ग्रेसी सरकार उन्टाप्रमाण वाळुन तोन्ड खुपसुन डोळ्यावर झापड ओढुन बसल हे? भरीस भर म्हणुन बरखास्ती?
आता अजुन कन्च लोकशाहीवादी मार्ग हव हेत?
)

Sas
Saturday, December 03, 2005 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think Ramchandra is right, first we should
find out basic problem/s n we should solve them.
But if somebody want to speak in "Marathi" then no one should take objection
कर्नाटकात वा उठेही राहणर्‍या माणसाने मराठीत बोलु नए हे १००% चुक आहे

भषा हे माध्यम प्रन्श सोडवीण्यासाठी आहे, प्रन्श, बन्धन नीर्माण करण्यासाठी नाही

Deepstambh
Monday, January 23, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुवैतमध्ये राहणार्‍या जोडप्याने आपल्या मुलाला संभाळण्यासाठी एक बाई घरात ठेवली. थोड्या दिवसांनी ते मुल खूप मलूल, उदास, संभ्रमीत अवस्थेत राहिल्यासारखे करु लागले. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्या जोडप्याने आपल्या घरात, कामाला जाण्यापुर्वी एक hidden camera लावला.

घरी परतल्यानंतर त्यांनी तो video पाहिला आणि बाळाला जी वागणुक मिळत होती ते पाहुन त्यांना धक्का बसला.

video मध्ये जे दिसते आहे.. त्याहीपेक्षा वाईट वागणुक बाळास मिळाल्याची शंका आहे..

खरंतर ' परदेशात मुल वाढवताना ' या बीबीवर खालील लिंक देणार होतो.. पण हि घटना देशातही घडु शकते..

video खोटा असेल असे वाटत नाही.. पण खबरदारी घेणे केव्हाही चांगले.

http://www.neethu.com/abbasiya

तसेच यावर आधारीत forum .. http://www.indiansinkuwait.com/showans.asp?ques=3648


Moodi
Monday, January 23, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहूनच सुन्न झाल्यासारखे झाले अन खुप संताप आला.

काही वर्षापुर्वी देशातच एक घटना झाली होती. एका बाईने एक तरुण मुलगी ठेवली होती बाळाला सांभाळायला म्हणुन. ती बाई नोकरीवर गेली की ही यायची. घरात खाणे पिणे, काम करणे हे पण होतेच.
काही दिवसानी त्या बाळाची आई एकदा अचानक घरी आली अर्ध्या दिवसाची रजा घेऊन. पाहते तर काय दुसर्‍या खोलीत ती मुलगी अन एक तरुण गप्पा मारत चहा पीत बसले होते.

ती आपल्या बाळाजवळ गेली तर बाळ हलवुनही उठत नव्हते, शेवटी तिने बाळाला डॉक्टरकडे नेले तर डॉकटर म्हणाले की ह्या बाळाला महिनाभरापासुन अफू दिली जातीय, त्यामुळे ते गुंगुन झोपते अन मग त्या मुलीला कसले कष्ट पडत नसावेत. मग तिने नवर्‍याला बोलावले अन त्या मुलीची पोलीसांकडुन चौकशी करवली तर तिने कबुल केले की ती त्या बाळाला चिमुटभर अफू देत होती, तिच्या कामात अन इतर गोष्टीत व्यत्यय येऊ नये म्हणुन. मग तिला अटक झाली, त्या बाईने नंतर नोकरीच सोडली.
माझ्या मते घरी मुली ठेवण्यापेक्षा मग पाळणा घरच बरे. अर्थात पूर्ण चौकशी करुन मगच तिथे ही ठेवावे.


Zakki
Monday, January 23, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय वाईट वाटते वाचून नि video तर बघवलाच नाही. काय बोलणार? ती baby sitter अवदसा तर राक्षसीच. तिला सुद्धा अरब पद्धतीप्रमाणे एका खड्ड्यात ठेवून लोकांनी ती मरेपर्यंत दगड मारले पाहिजेत. आता एकच विचार. लहान मूल नि करीअर, पैसे मिळविणे यात ज्यानी त्यानी आपआपल्या priorities तपासून घ्यायला पाहिजेत. आता सगळ्याच baby sitters अश्या नसतील, पण जरा extreme case scenario लक्षात घ्यायला नको का? विशेषत परदेशात, इतर गोष्टी ऐकून तरी. मी काय बोलणार? माझी धाकटी मुलगी १२ वर्षाची होइस्तवर माझी बायको पूर्ण वेळ घरात असे, नि नंतर पण बारा वर्षाच्या ओळखीचा शेजार्‍यांकडे रहायचे तिला माहित होते. आता आमच्याजवळ पैसे नाहीत, पण मुले फारच चांगली, नि त्यांच्याजवळ आहेत पैसे, त्यांच्या पुरते.


Badbadi
Monday, January 23, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप, भयानक आहे.. जेमतेम २ मिनिटे पण नाही बघू शकले.
झक्कि, नोकरी म्हणजे फक्त पैसे च का हो? इतर काही मिळवण्यासाठी पण मुली नोकरी करतात. तुम्ही मागच्या वर्षी पुण्यात आला होतात ते काय पैसे कमवायला??? काहितरी केल्याच, करत रहिल्याच.म समधान, त्याने समजात मिळणारे प्रतिष्ठा हे पन काही भाग असतात.. असो. आणि रहिला प्रश्ण आइ ने घरात रहण्याचा.. तर ती स्वेच्छेने तस करायला तयार असेल तर काहिच हरकत नाही.. नाहितर मूल हे आई बाबा दोघांची जबाबदारी आहे हे दोघांनी समजून वेळेची विभागणी केली पाहिजे.


Prajaktad
Monday, January 23, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंगावर सरसरुन काटा आला...

Lalu
Monday, January 23, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असले प्रकार ऐकले होते. इथेही घडतात. असे एकट्या दुकट्या परक्या व्यक्तीकडे मूल सांभाळायला देणे हे मला कधीच पटलं नाही. त्यामुळं चान्गले डे केअर सेन्टर हाच चान्गला मार्ग वाटतो. त्यान्ची एक सिस्टिम असते, मोठा स्टाफ असतो आणि बरीच मुलं असतात. licensed होम केअरही चालेल जिथे आणखी काही मुले आहेत आणि निदान २ तरी केअरगिव्हर आहेत. एकच मोठी व्यक्ती मुलाशी दिवसभर काय खेळणार? मुलालाही कंटाळा येईल.
अशा प्रकारापुढे डे केअर मधे मुले आजारी पडतात, पैसे जास्त द्यावे लागतात ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत.


Dineshvs
Monday, January 23, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु म्हणतेय त्याप्रमाणे प्रतिश्ठित पाळणाघरेच सर्वस्वी योग्य आहेत. कुवैत किंवा ईतर अरब देशातील प्रलोभने वेगळीच असतात. पण त्या देशात अशी पाळणाघरे असणे जरा अवघड वाटतेय.
आणि आईनी नोकरी सोडुन घरी बसणे हा पर्याय, आताच्या परिस्थितीत तितकासा योग्य नाही.


Zakki
Monday, January 23, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, अग पैसे, मान सामाजिक प्रतिष्ठा हे सगळे खरे आहे, पण आता लग्न झाल्यावर मूल होणार ही शक्यता असते, हे काय माहित नसते का? एकदा मूल झाल्यावर त्यात पुरुष नि स्त्री या दोघांनाहि किती वेळ घालवावा लागतो याची काही कल्पना असते का? आणि मूल झाल्यावर ते baby sitter कडे ठेवा, किंवा अगदी सख्ख्या बहिणीकडे ठेवा, ते जर आजारी पडले तर त्याला सोडून तुम्हाला रहावेल का, काम जमेल का? वाटते तितके सोपे नसते. आपली कुवत काय, नि काय जमेल, तसे वागले पाहिजे. उगीच हेहि हवे नि तेहि हवे असे जमत नाही, हे स्त्रीलाच नाही, तर पुरुषाला सुद्धा समजले पाहिजे. या बाबतीत पुरुष सुद्धा बायकांकडून generally फार जास्त अपेक्षा ठेवतात, नि ते जमले नाही तर रागावतात. अर्थात यात मी फक्त बायकांना उद्देशून बोलत नाही. स्त्री नि पुरुष या दोघांची ती जबाबदारी असते. इथे तर माझ्या ओळखीच्या काही जणांनी चक्क कामावरून सुट्टी घेऊन घरी दिवस काढले, कारण त्यांच्या बायकोचे काम, नि ते जे काय करते ते त्यांना जास्त महत्वाचे वाटले, त्या मुळे पुरुषाने ठरवले की स्वत घरी रहावे. घरी बसून त्याने MBA केले, नि मग छान नोकरी घेऊन बक्कळ पैसा मिळविला. बायकोलाही फार चांगली प्रसिद्धी मिळाली. नि मुलगापण व्यवस्थित वाढला. फक्त मला सगळे पाहिजे नि आत्ताच पाहिजे, असे म्हणून चालत नाही.

Seema_
Monday, January 23, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर सांगु का ज्याना छोटी मुल आहेत त्यानी तो video बघु नका. कारण बघुन अक्षरशहा मला तरी झोप लागण शक्य नाही आहे .

Maitreyee
Monday, January 23, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, खरं आहे तुझं same here :-(

Zelam
Monday, January 23, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा खरं आहे, पण तुझा message मी तो video पाहिल्यावर पाहिला

काय भयंकर बाई आहे, त्या लहानशा मुलावर कसला राग काढतेय? झक्की, तुम्ही म्हणता तशीच शिक्षा द्यायला हवी तिला


Shyamli
Monday, January 23, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भयंकरच आहे ति clip
मी ती बघत असताना माझी मुलही ईथेच होती त्यांनिहि बघितल सगळ आणी दोघही अगदी उत्सफुर्तपणे म्हणाले की बर झाल आई तु आता ऑफिसला जात नाहिस


Shyamli
Monday, January 23, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हातात असलेला जॉब सोडण हा निर्णय अवघड आहे

नुस्त्या पैश्यासाठिच बायका जॉब करत नाहीत हे जरी खर असल तरी,
पैसा हा मुळ मुद्दा असतोच. खरोखरच जर गरज नसेल्(आर्थिक्) तर मुल ५ वर्शाच होईपर्यन्त तरी आई किंवा वडील दोघांपैकी कोणितरी किंवा वेळ वाटुन घेऊन मुलासाठिच म्हणुन वेळ काढावा. शक्यातो मुलांना ईतक्या कोवळ्या वयात परक्या हातात देऊ नये.


Sas
Monday, January 23, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे मला तर भितीच वाट्तेय अजुन.
Vedio त जे आहे भयानकच आहे.
माझ्या ओळखिच्या सार्‍यांना मी हि लिन्क पाठ्वणार आहे,


Pama
Monday, January 23, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐकल होत असल काही, पण हे भयंकरच आहे.:-( माझ्या डोक्यातूनतर त्या छोट्यचा रडण्याचा आवजच जात नाही. खरच आहे, priorities ठरवून त्याप्रमाणेच निर्णय घेतले पाहिजेत. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण हे असल सोसण्यापेक्षा एका तरी पालकानी मुलाबरोबर राहिलेल चांगल.

Ashwini
Monday, January 23, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि माझ्या डोक्यातून जात नाहीये ज्या असाहाय्यपणे त्याने उजव्या कुशीवर वळून त्या सोफ्यावरच मान टेकवली ते. किमान इतकं तरी भाग्य होतं त्याचं की त्याच्यावरचा अन्याय रोखण्यासाठी आई वडिल होते. फोस्टर केअरमधल्या किंवा अनाथाश्रमातल्या कोवळ्या जीवांच काय होत असेल? त्यांच्यावरच्या abuse ची तर दखलसुद्धा घेतली जात नाही... :-(

Badbadi
Monday, January 23, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, तुमचा तो मित्र चांगलाच समजूतदार आहे :-)
माझा आक्षेप फ़क्त.. " काही झाल कि आईने घरी राहाव " या सूराला होता.. बाकि मी सगळ्यांशी सहमत आहे.


Mbhure
Monday, January 23, 2006 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फरच भयंकर आहे. पण ह्यावरुन जे काही निष्कर्ष काधले जात आहेत ते मला चुकीचे वाटतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे, ह्यात बायकांचाच सुर ’ बर झाल मी नोकरी करत नाही ’ असा वाटतो. मी लग्न करताना एकच अट ठेवली होती की, बायको नोकरी करणारी हवी. कारण आजकाल परदेशात काय किंवा भारतात काय, नोकरीची शश्वती नाही. परदेशात Hire and Fire OR project is scrapped due to lack of funding आहे(कोणावर वेळ येऊ नये, पण हे चांगलेच अनुभवले आहे)तर भारतात संप. अशावेळी, दोघांपैकी एक जण तरी पैसे मिळवत असेल तर तेव्हढे टेंशन येत नाही. तसेच, नोकरीत पैसे मिळवणॅ हा उद्देश का नसावा? For Good lifestyle, need good Money

तसेच बाई घरी राहिली म्हणजेच मुलांचे संगोपन उत्तम होते असे मला वाटत नाहे. लहान मुलांना लहान मुलेच हवीत. तुम्ही किती लहान होऊ शकता? पर्सनल केअरपेक्षा पाळणाघर हा चांगला उपाय आहे.

नोकरी करणार्‍या बाईची अवस्था ’ घार हिंडते आकाशी... ’ असते. त्यामुळे किंवा आपण घरी असलेल्या आयांप्रमाणे आपल्या मुलाकडे लक्ष देत नाही ह्या Guilty conscious मुळे त्या बायका मुलांबद्दल जागरुक असतात.

फक्त जर must असेल तर पर्सनल केअरटेकर ही Reference घेऊन मग ठेवावी.


अश्विनि, ह्या बाबतीतील एक फिल्म डिस्कव्हरीवर दाखवली होती. ते तर UN-immaginable होते.

मला एव्हढेच वाटते की, शीतावरुन भाताची परिक्षा करु नये. फक्त योग्य काळजी घ्यावी.


Moodi
Monday, January 23, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुषण तुमचे म्हणणे बरोबर आहे की आता या काळात नोकरीची शाश्वती नाही, बायकानी नोकरी केलीच पाहिजे.

माझ्या दिरांची अन माझ्या मेव्हण्याची नोकरी जेव्हा कंपनी बंद पडल्याने गेली होती तेव्हा त्यांच्या बायकानी व्यवस्थीत घर सांभाळले नोकरी करुन. अर्थात लग्न झाल्यावरही त्या दोघीनी नोकरी मुले झाली तरी चालूच ठेवली होती.

पण माझ्या भाचीला बहिणीच्या सासुने अन पुतण्याला माझ्या जावेच्या माहेरी, जिथे आई वडील असले तरी त्या वाड्यात जे पाळणा घर होते तिथे ठेवले होते. अन त्यानी पण त्याच्यावर लक्ष ठेवले होते.

भारतात आई वडील, नातेवाईक, शेजारी अन सासरचे लोक म्हणजे मुलाचे दोन्ही आजी आजोबा हे भरपूर पर्याय असतात. पण देशा बाहेर मग डे केअर शिवाय पर्याय नाही ना. त्यामुळे हे जे दृष्य इथे मायबोलीकर स्त्रीयांनी पाहिले त्यामुळे आईच्या दृष्टीकोनातुन त्या स्वाभावीक पणे असे म्हटल्या की नोकरी न करणे बरे. ह्यात त्यांचा आईचा दृष्टीकोन आहे, पैशाचा, करीअरचा नाही.

अर्थात हे दृष्य इतके विचित्र अन जीवघेणे आहे की लग्न झालेल्या, लग्नाळू, मुले नसलेल्या अन असलेल्या सर्वांनाच संताप आणणारे आहे.

मला वाटत की मैत्रीच्या अन मायबोलीकराच्या नात्यातुन मला काय म्हणायचय ते तुमच्या लक्षात आले असेल. यात तुम्हाला दुखवण्याचा अजीबात हेतू नाही. मी तुमच्या नोकरी करण्याच्या मताशी सहमत आहे.

काय करणार काळजी घेऊन चांगली पाळणाघरे शोधणे किंवा आई वडिलांनी एकमेकांच्या मदतीने ते मुल सांभाळणे हेच पर्याय आहेत.


Arch
Monday, January 23, 2006 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील incidence चा तर निषेध आहेच आणि त्याला खूप जबरदस्त शिक्षा योग्य आहे.

माझ्यामते, मुल जोपर्यत त्यांच्याशी कोण कस वागत हे आईवडिलांजवळ communicate करू शकत नाहीत तेंव्हा आर्थिक गरज ( म्हणजे उपभोगाच्या वस्तूंची गरज असा अर्थ नाही ) असेल तरच आईने नोकरी करावी ह्या मताची मी आहे. आणि हो, जरी मी equal rights ची भोक्ती असले तरी लहानपणी आईचीच गरज बाळाला जास्त असते. ह्यावर सगळे जोरदार आवाज उठवणार हे माहित असूनही मी माझ मत मांडल आहे


Moodi
Monday, January 23, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च तुझ्या पोस्टमध्ये कुणी निषेध कराव असे माझ्या मते तरी काहीच नाही.

मुले साधारण ३ ते ४ वर्षाची झाली की नोकरीला किंवा स्वतंत्र बिजीनेसला बायकानी सुरुवात करायला हरकत नाही.
मुले शाळेत जे ३ ते ४ तास प्रारंभी घालवतात तेवढ्या वेळात पार्ट टाईम जॉब किंवा घरुन बाहेरची कामे होवु शकतात. इकडे युकेत सुद्धा मी तश्या बायका बघितल्यात अन भारतातही.

वयाच्या ४० नंतर सुद्धा नोकरी मिळवणार्‍या बायका आहेत. करीअर की मुल हा निर्णय सुद्धा लग्ना आधीच घेतलेला बरा.


Mbhure
Monday, January 23, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, मी अजिबात दुखवला गेलो नाही. कारण ही मत आहेत.

माझे फक्त एव्हढेच म्हणणे आहे की एखादी व्हिडीओ क्लिप पाहुन निर्णय घेऊ नका. मुल झाल्यावर दोघांपैकी एकाने तरी पुर्णवेळ घरी असलेच पाहिजे हे गृहितक मांडू नका.



Deepstambh
Tuesday, January 24, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नजरेसमोरुन त्या निरागस बाळाचा केविलवाणा चेहरा जात नव्हता... त्या बाईची अतिशय चीड आली..

हा तर एक नजरेसमोर आलेला प्रकार झाला. पण अनेक ठिकाणी याहुन अधिक भयंकर अत्याचार मुलांवर होत असतील. निष्पाप जीव ते.. कोणाजवळ तक्रार करणार?

पण निव्वळ पैसासाठी दोघेही पालक नोकरी करतात असे प्रत्येक बाबतीत नसते. बाळाच्या भवितव्याचाही इथे विचार होत असतो. हल्ली Higher Education साठी लाखो रुपये लागतात. इअतरही सामाजीक प्रश्न असतातच.

विभक्त कुटुंब पद्धतीचा इथे जबरी फटका बसतो. स्वताचे आईवडील बाळाला संभाळायला असतील तर प्रश्नच नसतो.

डे केअर सेंटर सुद्धा खूप चौकशी करुन घ्यावेत. कारण तिथेही बळाला गुंगी देण्यासाठी अफु किंवा तत्सम पदार्थांचा वापर नाकारता येत नाही.

शेवटी कोणीही आईवडील निव्वळ पैशासाठी आपल्या बाळाला निर्दयी लोकांच्या हाती सोपवतील असे वाटत नाही. फक्त योग्य ती खबरदारी घेऊन घेऊन सर्वांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करावाअसे मला वाटते.

निदान त्या मुलच्या पालकांनी या प्रकरणाचा छडा तरी लावला. आता त्यांनी योग्य ती काळजी घेतली असेल आणि ते फुल पुन्हा नव्या जोमाने उमलु लागले असेल अशी अशा करतो. तेव्हढाच एक मनाला दिलासा.


Meggi
Tuesday, January 24, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप, फ़ारच भयन्कर आहे ती video clip . सतांप आला त्या बाई चा. झक्कींनी सान्गितलेलिच शिक्षा योग्य आहे त्या बाइ साठी...

Bee
Tuesday, January 24, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच खूप भयंकार clip आहे ती!!!!

अर्चचे बरोबर आहे, लहान मुलांना आईच्या देखरेखीची जितकी गरज असते तितकी वडईलांची कदाचित भासत नसावी. पण नोकरी गरजेची असेल तर आपले मुल योग्य व्यक्तीकडे आपण सुपुर्त केले आहे ह्याची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा.

मला तरी पैशाची फ़ारशी गरज नसेल, भागत असेल तर career ला अल्पकाळ break देऊन मुले सांभाळणार्‍या आयांचे निर्णय योग्य वाटतात.

मी एके ठीकाणी एक वाक्य वाचले Since God cannot be present everywhere thats why He made mothers!!!!!

आज ह्या वाक्याची आठवण झाली..




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators