|
Ninavi
| |
| Tuesday, January 24, 2006 - 7:03 pm: |
| 
|
लालू, आर्च.. अनुमोदन. मी क्लिप पाहिली नाही तरी मत देत आहे.(दिसली, पण पहावली नही)
|
Sas
| |
| Tuesday, January 24, 2006 - 8:25 pm: |
| 
|
केवळ लहान पणीच नाहि तर वाढत्या वयातहि आई घरात रहायला हवी. मी MBA आहे पण लग्नानंतर मला JOB नाहि करायचा. माझि आई Fasion Designer च काम करायचि. सुरवातिला घरातुनच काम करायचि Response चांगला मिळायला लागल्यावर आईने बुटिक टाकल. बुटिक टाकण्यापुर्विचि घटना, एकदा आई दोरे,अस्तर सोबतच भाजी ई आणायला बाजारात गेली. मी घरात एकटि होते. बेल वाजलि खालच्या फ्ल्याट(Apartment)मधे रहणारा ८० वयाचा माणुस ज्याला मी लहान पणा पासुन आजोबा, आजोबा म्हणायचे तो दारात होता. मी दार उघडल. एकदम आवेशात तो म्हणाला, "तुझ्या साठि मी २० पायर्या चढुन आलोय, मला माहित आहे तुझि आई बाहेर गेलिय ये जवळ ये." हा एकच प्रसंग आई घरात नसतांना ओढावलेला नाहि Watchman पासुन सेल्समन पर्यंत सार्यांनी मी घरात एकटि आहे याचा घाण फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. आजहि मला या सार्या गोष्टि विसरता येत नाहित. मला या सार्या प्रसंगांचा आजहि खुप त्रास होतो. रस्त्यावर एकट चालतांना मैत्रिणींनाहि वाईट अनुभव यायचेत मला तर रस्ता, घर कहिच सुरशित नाहि वाटायच. मुलिला आजोळिहि आपल्याशिवाय पाठ्वायला नको वा नातलगांकडे एकट झोपवायला नको. आजहि मला खुप मानसिक त्रास होतो. आईने घरिच रहाव.करियर,परिस्थिती हे JOB करण्या मागच कारण असेल तर मुल होउच देउ नयेत. Bringing Child into the World & not providing PEACE to it is not justice.!!!
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 25, 2006 - 5:53 am: |
| 
|
sorry to hear abt your bad experiences! आणि त्यामुळे तुझे मत असे आहे हे समजू शकते पण माझी आई माझ्या वयाच्या ६ - ७ व्या वर्षापासून job करत होती तेव्हापासून मी शिक्षणासाठी US ला जाईपर्यंत आम्ही एकदा घरही बदलले. पण आधिच्या वा आताच्या घरात मी जेव्हा एकटी असायचे तेव्हा सुदैवाने मला असा कधीच अनुभव आला नाही. आणि आई घराबाहेर पडत असल्यामुळे उलट एक वेगळा independance आला, आईच्या जनसंपर्कामुळे माझी जगाकडे बगह्ण्याची दृष्टी पोसली गेली आणि आईची माझ्या career आणि इतरही निर्णयांकडे बघण्याची दृष्टी अतिशय welcoming होती. आईचं घराबाहेर पडणं याच्यातल्या अर्थिक बाबींचाही उपयोग झाला होताच तेव्हा घराला पण ते कळण्याचे वय ही नव्हते आणि मानसिकताही. माझ्यासाठी त्यापेक्षा या इतर गोष्टी महत्वाच्या घडल्या. माझ्या परिचयातील काही लोकांना मी जेव्हा observe करते तेव्हा मला हेही जाणवलेले आहे की आई नोकरी करणारी असेल तर मूल जेवढे independant असते तेवढे आई नोकरी करणारी नसेल तर नसते. आईने career , पैश्यासाठी घराच्या बाहेर पडण्याचे हे काही फायदे नक्कीच आहेत मुलाच्या जडणघडणीसाठी. त्यामुळे career , आर्थिक परिस्थिती या गोष्टींसाठी बाहेर पडावे लागणार असेल तर मूल होऊच देऊ नये आणि मूल झाल्यावर आईने घरातच बसावे ही अतिच टोकाची भूमिका आहे. पण तरी वरची clip पाहून अंगावर काटा येतोच. आणि आपण काय करणार वेळ येईल तेव्हा असा hypothetically विचार केला तरी tension येते. मूल वाढत असताना सुरूवातीची ३ - ४ वर्षे आईने आपले career back-seat ला ठेवणे किंवा असा काही पर्याय शोधणे जेणेकरून मूल कायम आपल्या नजरेसमोर राहील हा विचार योग्य वाटला तरी ते शक्य असेल का असेही वाटते. माझ्या बाबतीत म्हणायचे तर मला शक्य असायला हरकत नाही कारण माझ्या career मधे माझ्या कामाच्या वेळा मी adjust करू शकते. सगळ्यांनाच शक्य असेल असे नाही. अजून एक म्हणजे मूल साधारण २.५ - ३ वर्षाचे झाल्यावर दिवसातला काही काळ तरी ते शिशूवर्ग, day care centre अश्या ठिकाणी असावे जिथे त्याच्या बरोबरीची अजून मुले असतील. मुलाच्या चांगल्या वाढीसठी interaction with peers हेही खुप महत्वाचे आहे. घरी २४ तास कामाला / सांभाळायला बाई ठेवणे मला पटत नाही. कितीही विश्वासू वाटली तरी मी तिच्यावर घर आणि मूल असे दोन्हि टाकून जाऊ नाही शकणार. देशात असले तरी सासूबाईंना हे झेपण्याइतकी त्यांची प्रकृती नाही तेव्हा घरात मदतनीस म्हणून बाई ठेवणे जी ठराविक वेळात सर्व कामे पुर्ण करून जाईल हेच मला तरी योग्य वाटते.
|
Bee
| |
| Wednesday, January 25, 2006 - 3:30 pm: |
| 
|
Sas तुझा अनुभव खरच खूप वाईट आहे. अज्जुका, चांगले मत मांडलेस. वरची clip खरच इतकी भयाणक आहे की कुणीही नोकरी करून मुल day care मधे ठेवणारी बाई नोकरी सोडायचाच विचार करेन. २५ वर्षांपुर्वी आपली कुटुंब पद्धती ही विभक्त नव्हती त्यामुळे घरात आई जरी कामाला गेली असेल तरी दुसरे कुणीतरी लक्ष ठेवायला असे. बाजूला आपल्या वयाची मुलेही बरीच असत. म्हणजे प्रत्येकाला निदान तीन चार मुले तरी नक्कीच असत. आत्ता असे वातावरण मोठ्या शहरात तरी फ़ारसे दिसत नाही. एक किंवा फ़ार फ़ार तर दोन अपत्य. वरची clip इतकी खरी आहे का पण? कारण internet वर फ़सवाफ़सवी देखील बरीच चालते. मी रोज बातम्या बघतो, वाचतो मला कुठल्या वर्तमानपत्रात ह्या बातमीचा उल्लेख आढळला नाही. कदाचित लक्ष गेले नसेल. मी माझ्या ओळखीच्या एका बाईला ही घटना सांगितली तिने ही लिंकही बघितली पण ती म्हणाला अशी एखादीच घटना असेल. निदान मी तरी राजीखुषीनी माझ्या मुलाला day care मध्ये ठेवते आणि तिथे मुलांचा सांभाळ अगदी नीट करतात. भरपूर खेळ, खाणे पिणे, दंगा मस्ती, अभ्यास हे सगळे काही मुले तिथे नीट करतात आणि खूप काही शिकतातही. तिची ही प्रतिक्रिया मला खूपच positive वाटली.
|
Mbhure
| |
| Wednesday, January 25, 2006 - 9:24 pm: |
| 
|
मलाही हेच म्हणायचे होते, अज्जुका. पण परत एक वेगळा वाद होईल यासाठी लिहीले नाही. पण माझ्याही सर्व्हेमध्ये(१० - १५ कुटुंब)असे आढळुन आले की नोकरी करणार्यांची मुले बर्यापैकी independent आणि Extrovert होतात. आम्ही मुंबईत असताना देखिल, मुलीला ७ - ८व्या महिन्या पासुन थोडवेळ डेकेअरला पाठवायचो. त्यामुळे ती दिड वर्षाची होईपर्यंत बर्याच बाबतीत, जेवण वगैरे, independent झाली. तसेच तिचे एक अलिखीत वेळापत्रक आपोआप ठरत गेले
|
Storvi
| |
| Wednesday, January 25, 2006 - 9:36 pm: |
| 
|
मी office मध्ये आहे सो clip नाही बघु शकत. पण अंदाज आला. याच कारणास्तव मी nanny च्या विरुद्ध आहे. पण डे केअर सेंटर नीट पडताळुन पहाता येते. म्हणूनच मी private, family style डे केअर सुद्धा टाळले. घरी मुलांना एकटे सोडणे केव्हाही वाईट. पण sas तुला जे अनुभव आले ते फ़ार वाऍट होते, पण ते अनुभव आई नोकरी करत नसती तरी येऊ शकले असते. तुझ्या भावना justified आहेत. पण नीरजा शी मी सहमत आहे. भुमिका जरा टोकाची वाटते. तसं पहायला गेलं तर कित्येक वेळा घरातली सक्खी माणसं सुद्धा विश्वास ठेवण्यासारखी नसतात. म्हणजे मग आई ने २४ तास डोळ्यात तेल घालून मुलगी मोठी होई पर्यंत तीची रखवाली करायची की काय? मग असं जर झालं तर सहजिकच लोकांना मुली नकोश्या वाटतील. त्यापेक्श अवती भोवती समन्जस, विश्वासु माणसे गोळा करायला हवीत आणि मुख्य म्हणजे मुलांना स्वतः चे संरक्षण करायला शिकवयला हवं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पावली कोणी तरी(आआई) पाठीराखा उभा कसा राहु शकेल. असे अनुभव आले तर लगेच आआइ/बाबांना सांगण्याचे महत्व मुलांवर बिंबवलं पाहिजे .
|
Lalu
| |
| Wednesday, January 25, 2006 - 9:40 pm: |
| 
|
अज्जुका छान लिहिले आहेस. भूषण तुझ्या सगळ्या मुद्द्याना पण अनुमोदन. ३ वर्षापर्यन्त मुलाना घरी ठेवणे सर्वानाच शक्य होत नाही, जरी ठेवले तरी इतर मुलांचा सहवास मिळावा म्हणून मग प्ले ग्रुप्स, प्ले डेट्स हे करावेच लागेल. निदान इथे तरी. आणि मुलाना सांभाळण्याचे काम सहनशीलतेने करावे लागते. त्याचा ताण वाटत असेल तर घरी असणार्या आईनेही मुलाना काही वेळ अशा ठिकाणी पाठवायला हरकत नाही. त्यात गिल्टी वाटून घेण्याचे कारण नाही. इथे तर अशा गोष्टीची गरज भासते कारण नातलग, शेजारी ह्यांची मदत उपलब्ध असतेच असे नाही. बी, क्लिप खोटी असावी असे वाटत नाही. हे प्रकार घडतात हे खरे आहे, पण एक लक्षात घे की ते मूल डे केअर मधे नाही. त्या मुलाच्या घरीच एक बाई आई वडिलांच्या अनुपस्थितीत त्याला सांभाळते आहे.
|
Janakee
| |
| Thursday, January 26, 2006 - 4:50 am: |
| 
|
SAS ला आलेल्या अनुभवांमुळे मुल होउच देउ नएत अशि sas चि मानसिकता होण सहाजिकच आहे. Indipendence हा खरच चांगला मुद्दा आहे. पण वाढत्या वयात मनाची जडण, घडण विशेषता मुलिची खुप महत्वाचि असते. sas ला बरेच वाईट अनुभव आलेत तेहि विश्वास ठेवण्या योग्य वयस्कां कडुन. आई घरात नाहि या कारणाने लोकांनि हिंमत केली व sas ला वाईट अनुभव आले. वाईट अनुभव आई असतांना हि येतात पण आईच असण त्याचि त्रिव्रता कमि करत. बाहेर आई सर्वत्र येउ शकत नसलि तरि निदान घरात तिच्या असण्याने अस कहि कमि प्रमाणात होईल हे निश्चित. आज काल मुल "वेळ नाहि आमच्या साठि तर जन्मच का दिला" विचरतात. "आम्हि सांगितल नव्हत जन्म द्या" अस म्हणतात. मुलांचि मानसिकता हा खुप महत्वाचा मुद्दा होत चाललाय आजकाल in India also.
|
Seema_
| |
| Thursday, January 26, 2006 - 6:11 am: |
| 
|
भुषण आपल्या मताशी अगदी सहमत . छान लिहिलय. अज्जुका,लालु,स्तोर्वी तुमचही म्हणन अगदी पटल. sas खरच वाईट वाटल वाचुन. पण तु कधी oprah winfrey विषयी वाचलयस का? तु तीचा talk show कधी पाहतेस का?
|
Bee
| |
| Thursday, January 26, 2006 - 4:00 pm: |
| 
|
छान चर्चा चालली आहे. सीमा काय असत त्या talk show मधे? इथे दाखवत नाही.. लालू धन्यवाद! माझ्या लक्षात नव्हत आल..
|
Mbhure
| |
| Thursday, January 26, 2006 - 10:33 pm: |
| 
|
ही Oprah ची थोडक्यात बायोग्राफी आहे. http://ksks.essortment.com/oprahwinfrey_rkcr.htm
|
Sas
| |
| Friday, January 27, 2006 - 5:24 pm: |
| 
|
अज्जुका ... तुमच्या सर्वांच बरोबर आहे. अज्जुका नि लिहिल्या प्रमाणे मी हि Independent झाले. आईने हि Strong हो हि शिकवण वारंवार दिली. माणस ओळ्खता येऊ लागलित, ह्या अनुभवा नंतर कोणावर विश्वास ठेवायचा नाहि, नेहमि सर्तक रहायच हि चांगलि शिकवण मिळालि. अश्या लोकांचा सामना करयला शिकले. JOB करतांना जेव्ह्या अशि हिन माणस भेटलित तेव्हा त्यांना Handle करता आल. पण ८ वि ९ वि च्या वयात आलेल्या ह्या अनुभवांन मुळे वाईट अनुभवांमुळे मात्र माझा लोकांकडे बघण्याचा दुष्टिकोन रागिट आहे. मला भुतकाळ विसरता येत नाहि,त्यामुळे Present मध्ये मी उदास,चिड्चिडि रहाते. मला तरि लग्नानंतर JOB करयचा नाहि, मुख्यत: आई झाल्यावर.
|
Sas
| |
| Friday, January 27, 2006 - 5:39 pm: |
| 
|
Seema ,Storvi, Mbhure मी स्वत: ३ वर्षे अनाथलयात नियमित जायचे. अनाथ मुला-मुलिंच, कचर्यात टाकलेल्या एक दिवसाच्या बाळाच जिवन मी प्रत्यशात पहिलय - अनुभवलय. पालक, आप्त हे नसल्याने वाईट अनुभव येण, वाईट वागणुक मिळण आणि पालक,आप्त असुनहि वाईट अनुभव येण ह्या २ वेग्ळ्या गोष्टि आहेत अस मला वाटत. पालक असुनहि वाईट वागणुक मिळत असेल तर पालक असले काय नसले काय , अस होउन जाईल. मला आई आहे म्हणुनच तिचि खुप खुप गरज वाटलि त्या प्रसंगि. Talk Show मी पाहिलेला नाहि पण मी जेव्हा अनाथालयात जायचे तेव्ह्या एकदा पत्रकार तेथिल मुलांच्या मुलाखातिस आले असतांना मुल म्हणालि "TV वाले, लेखक, पत्रकार...यांना आम्हि खर सांगु शकत नाहि कारण आम्हाला ईथे रहायचय कशिहि वागणुक मिळत असलितरि. हे लोक येतात तेव्हा आम्हाला चांगले कपडे घालायला देतात (अनाथाल्याच्या बाई) ईतकच. हि लोक पण काय आमचा Show करतात, पैसे कमवितात बाकि काहि नाहि. आमच्याशि समाजाने कस वागाव, आमच्यासाठि काय कराव कुणि दाखवत,शिकवत नाहि TV वर,वर्तमान पत्रात..." अनाथालयातलि मुल विचारायचित ताई आमच्या पालकांनि आम्हाला जन्म्च का दिला? अश्या जग़ण्यापेशा जिवनच नको. आई, पालक प्रत्येक वेळिच सोबत येवु शकत नाहित हे खरय. मी हि MBA व JOB दुसर्या ठिकाणी राहुनच केलाय. पण घरात जेव्हा आई असते, असले प्रकार कमि होतात. बाहेर तर स्वताच लढायच असत एकट, पण घरात तरि कुणितरि असाव सोबत.
|
Moodi
| |
| Friday, January 27, 2006 - 5:41 pm: |
| 
|
संप्रदा हे तुला हळु हळु विसरुन हा रागीट अन उदास स्वभाव बदलावा लागेल नाहीतर तुला पुढे होणार्या मुलांवर पण याचा मानसीक काय शारीरीक पण परिणाम होवु शकतो. उलट आई बनायचे तर स्वतला तुला आनंदी अन शांत ठेवावे लागेल तरच तू तुझ्या मुलाला वा मुलीला छान वाढवुन संरक्षण देऊ शकशील. आधी झालेल्याचा विचार करुन तु स्वतला आता अधिक हतबल अन असहाय्य बनवु नकोस. परमेश्वरी साधनेने आणखी कणखर बनशील, थोडा ३० मिनिटाचा वेळ देऊन बघ पुजेत अन योगात.
|
Storvi
| |
| Friday, January 27, 2006 - 6:40 pm: |
| 
|
sas तुला जे वाटतंय त्याला आम्ही कोणीच चुकिचं म्हणत नाहियोत हे लक्षात घे. फ़क्त आम्ही थोड्या practically बोलतोय. आणि मला एक विचारायचय तुला. २४ तास लक्षं दिल्यानेच फ़क्त आई-वडील मुला-मुलींची नीट काळजी घेतात असं असतं का? जबाबदारी पेलता येत नसेल तर मुलाला जन्म देउ नये हे मीही मानते. पण तरी देखील २४ तास मुलांवर लक्ष ठेवणे ही माझ्या लेखी जबाबदारी होत नाही. त्याने पण किती problems येऊ शकतील हे तुझ्या लक्षात येत नाहिये आणि तु जे अनुभवल्यस त्यामुळे तुला इतर सर्व problems नगण्य वाटतील, it's but natural. पण ते तेवढे क्षुल्लक नाहियेत. माझ्या डोळ्यांदेखत, आई-वडील २४ तास नजर ठेवुन असतात म्हणुन मुली त्यांना चुकवुन बाहेर उद्योग करताना मी पाहिलय. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की अपलं संपूर्णं अयुष्य पोरांभोवती बांधलं तरी पोरं पुढे जाउन कशी वागतील हे सांगता येत नाही. एकीकडे २४ तास लक्षं ठेवलं म्हणुन शामळु झालेली पोर, बाहेरच्या जगात ववरता येत नाहीत अशी तर दुसरी कडे, त्या देखरेखीतुन चोरुन काहीतरी भिषण करणारी पोरं, आणि तिसरी कडे तुमच्या अती काळजी मुळे आमचे जीवन बर्बाद झाले असे म्हणणारी पोरं आणि चवथा आणि equally important angle म्हणजे या सगळ्या मुळे सालस, आणि जाणकार झालेली पोरं, मी हे सगळे पाहिलेले आहे. तेंव्हा तु तुझ्यासाठि जो निर्णय घेतलास तो तुझे अनुभव ध्यानी घेता योग्यच आहे, पण तो प्रत्येकाला लागू पडेल असं नाही. शेवटी, parenting is a numbers game, whether you like it or not. You look at the situation, you look at how you were raised, you look at statistics and you look at the general information available to you at any given time, and make parenting decisions. Sometimes the statistics(and preferably your decisions) turn out to be right and sometimes they don't. A lot of factors go into how a child turns out to be in the very end. And by staying by your child 24 hours you may protect him/her from any obvious problems and miscreants, but you may very likely be missing the big picture. You may end up with a child that is resentful. lacks social skills, or lacks confidence, or you may not. It is not dependent only on your parenting decisions, it is also dependent on the child's temperament, the environment at home schools, the relatives and freind circle, the kind of books that the child reads and other influencing factors. To put so much emphasis on one issue alone, would be an error IMHO.
|
Seema_
| |
| Friday, January 27, 2006 - 6:53 pm: |
| 
|
http://en.wikipedia.org/wiki/Oprah_Winfrey बी इथे तुला मिळेल बघ माहिती.
|
Ninavi
| |
| Monday, January 30, 2006 - 8:35 pm: |
| 
|
शिल्पा, माझं २००% अनुमोदन.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 31, 2006 - 4:22 pm: |
| 
|
आलेल्या प्रसंगाला निर्भयपणे तोंड द्यायला शिकवणे, हेच महत्वाचे.
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 01, 2006 - 12:37 pm: |
| 
|
ओह.. ही क्लीप आणि त्याची चर्चा इथे सुरू होती तर.. माझ म्हणजे वरातीमागुन.. असो, आता बाहेरच्या देशातलं माहिती नाही पण आपल्याकडे आपल्या आसपास मुलांना सांभाअळणार्या मुलीचं बायांचं आपल्याला लक्षात आलेलं चुकीचं वाग़णं आपण त्या मुलांच्या आई बाबांना सांगायला हवं. बरेचदा जाऊदे आपल्याला काय करायचय?' किंवा अशाच काही कारणाने आपण ते सांगत नाही. यातुन सगळं दरवेळी पॉझिटिवच निष्पन्न होईल असं नाही पण या काम करणार्या लोकांवर समाजाचा धाक तरी राहू शकेल. दुसरं म्हणजे या मुलांना सांभाळायला ठेवलेल्या बायकांचा मुलींचा आपल्या मुलांशी आपल्याशी काही प्रमाणात भावनीक बंध जुळणे पण जरुरी आहे. तो तसा नसेल तर घरच्या कुणाच्या लक्षात येत कसे नाही? मेघा
|
Storvi
| |
| Wednesday, February 01, 2006 - 5:39 pm: |
| 
|
मेघा ते लक्षात आलं म्हणुनच तो video तयार झाला असावा नाही का?
|
Sas
| |
| Thursday, February 02, 2006 - 8:12 am: |
| 
|
Storvi,Seema, Mbhure.... मला कळतय तुम्हि मला विरोध नाहि करत आहात. सारे जण मला खर्या मित्र मैत्रिणिंप्रमाणे Practical Suggestions देत आहेत. Thanks to all for showing me all these sides also. Moodi Thanks for kind suggestions.
|
Meghdhara
| |
| Saturday, February 04, 2006 - 4:24 pm: |
| 
|
sTa^vaI- KrM Aaho pNa AapNa f> %yaa ivaDIAÜ ba_la baÜlatÜya kI %yaa inaima<anao Aaplao naÜkraMXaI
Asalaolyaa nasalaolyaa saMbaMQaaba_lahIÆ maoGaa
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|