Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » Looking for » General » Education kuthe changale ahe?india or us » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Tustin1
Wednesday, February 14, 2007 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza mulaga 2 years ani 7 montyh cha ahe.kids sathi kuthe education changale ahe?tumhi please mala madat karal ka?
amhi indiat janyacha vichar karato ahe.pan shikshana baddal kay karayche amhala samajat nahi.please tumhi kahi marg dakhava.thanks in advance

Deshi
Thursday, February 15, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत की २री ३ री पर्यंत US मध्ये व नंतर भारतात.

लहान खेळायचा वयात ईथले एजुकेशन खरच चांगले आहे. ( offcourse आजकाल भारतात ही अशाच प्रकारचे खेळी मेळीचे वातावरन pre school मध्ये तयार केले जात आहे. माझी भाची अशा एका शाळेत जाते. अगदी US प्रमानेच प्रोजेक्ट वर्क वैगरे आहे.

पण नंतर ४ - ५ वि पासुन खुप मोठ फरक आहे. (मी टेक्स्ट बुक कंम्पेअर केले आहेत).


Satishmadhekar
Monday, February 19, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थातच अमेरिकेत! जो देश उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन यांमध्ये जगात सर्वात पुढे आहे, तोच शिक्षणातही पुढे असणारच.

Satishmadhekar
Monday, February 19, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तिसरी भाषा (हिंदी) यांसारखे अनेक निरूपयोगी विषय अभ्यासक्रमात घुसडून विद्यार्थ्यांवर अवजड बोजा टाकलेला आहे.

इतिहासात भारताचा प्रत्यक्ष संबंध अजिबात नसलेले पहिले-दुसरे महायुद्ध, फ्रान्सची राज्यक्रांती, इंग्लंडची लोकशाही असे असंख्य निरूपयोगी विषय सक्तीने शिकवले जातात.

भूगोलामध्ये आफ्रिकेतले गवताळ प्रदेश, नायजेरीयाची संपूर्ण भौगोलिक माहिती, ब्राझीलमधील पिके इ. निरर्थक गोष्टी शिकविल्या जातात. भारतातल्या विद्यार्थ्यांना भारतातल्या पूर्वोत्तर राज्यांची नावे सांगता येणार नाहीत, पण त्यांना अमेरिकेची, एखाद्या अमेरिकन नागरिकापेक्षा, जास्त माहिती असते.

नागरिकशास्त्रात तर राष्ट्रपतीपदाला उभे राहण्याच्या अटी, सरपंच पदाची पात्रता अशा अनेक निरूपयोगी गोष्टी नाईलाजाने शिकविल्या जातात.

अमेरिकेत अशा निरूपयोगी विषयांऐवजी संगणकासारखे विषय लहानपणापासून शिकवून प्रत्यक्ष अनुभवावर जास्त भर दिला जातो.


Mandard
Monday, February 19, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मढेकरसाहेब हिंदी शिकणे काही निरुपयोगी नाही.

Satishmadhekar
Monday, February 19, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी येणार्‍या माणसाला हिंदी वेगळे शिकण्याची गरज नाही. दोन्ही भाषा एकसारख्या आहेत. त्यामुळे हिंदी आपोआप येते.

परंतु, एक जास्तीचा विषय ठेवल्याने विनाकारण अभ्यासाचा बोजा मात्र वाढतो. त्याव्यतिरिक्त हिंदीमुळे मराठीवर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. दक्षिणेत किंवा बंगालमध्ये लोक हिंदी बोलत नसल्यामुळे उत्तर भारतीय कमी प्रमाणात स्थलांतरित होतात. म्हणून त्यांची भाषा टिकून रहायला मदत झाली आहे.

प्रत्येक राज्यात फक्त स्थानिक भाषा अणि इंग्लिश शिकविली पाहिज़े. त्यामुळे एक विषय कमी होऊन इतर महत्वाचे शिकता येईल.

- सतीश माढेकर


Chyayla
Monday, February 19, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे तर माझ्या माहितीप्रमाणे US मधे लहान मुलान्ना Spanish पण शिकवतात. त्याचप्रमाणे भारतातही हिन्दी शिकवायला काही हरकत नाही शिवाय विषय पण सोपा जातो.

असो माझा एक अनुभव ईथे देतो, माझ्या मित्राची मुलगी ती दुसर्या वर्गापर्यन्त भारतात शिकली आणी मग ईथे US मधे शिक्षण सुरु केले. ईथला अभ्यास तिला फ़ारच Backward वाटतोय. ती वर्गात सगळ्याच बाबतित पुढे, ईथल्या मुलाना Spellings , Numbers आणी हो Calculas जमतच नाही त्यामानानी ही फ़ारच पुढे अगदी शिक्षक ही तिच्याशी स्पर्धा करतात व त्याना पण या गोष्टीच फ़ार आश्चर्य वाटत. माझा मित्र म्हणतो तशी ती सामान्यच पण भारतात तीचा पाया पक्का झाल्यामुळे ईथे फ़ारच सोपे जात आहे. तीच्याकडे पाहुन असे वाटते की आधीचे काही शिक्षण भारतातच चान्गले नन्तर US मधे, बाकी त्यान्ची प्रगती वैगेरे आणी त्या द्रुष्टीने शिक्षण म्हणाल तर माझ्या मते हे शिक्षण पदवी, किन्वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी खरच चान्गले.

तसे भारतातले शिक्षणही वाईट नाही पण US मधली शिक्षण पद्धती त्यामानानी चान्गली पण शिकणारे पाहिजेत ना ईथे बेरोजगारी नौकरी आणी शिक्षण याचा जास्त सम्बन्ध नसल्यामुळे ईतक्या सोयी देउन सुद्धा फ़ारच कमी मुले शिकतात व पुढे येतात.

भारतातही अश्याच सोयी मिळायला सुरुवात झाली याचा आनन्द आहे, आपल्याकडे शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे अगदी झोपडपट्टीतली आई सुद्धा पोराला शाळेत जा म्हणेल त्यामानानी ईकडे आनन्दी आनन्द आहे.




Varadakanitkar
Friday, February 23, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ता US मधे शिकतेय. मी हे नेहेमी पाहते की india मधे शिकलेले लोक इथे खूप पुढे जातात इथे शिकलेल्यंपेक्षा. ईथे सुधा india सारखं electives घ्यावेच लागतात. २ langauge घ्याव्याच लागतात. civics and history इथेही आहे. उलट maths and science पेक्षा जास्तं इतर खूप गोष्टी शिकाव्या लागतात. Science BS करणार्‍या Student ला ३ electives other than science, math, computer घ्यावे लागतात तेही cooking and music सारखे. मला वाट्टं भारतातंलं शिक्ष्ण खूप छान आहे इथल्यापेक्षा. इथे फार वेळ काढतात लोकं शिकायला. हो पण एक मात्र आहे घोकंपट्टी कमी आहे इथे. मुद्दा समजण्यावर जास्तं भर देतात. पण ते तर तिथे राहुनही आपण मुलांना शिकवू शकतो. पण परीक्षा पद्धत एक्दम रद्दड आहे भारतातली

Satishmadhekar
Monday, February 26, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अमेरिकेत त्यांचा स्वत:चा इतिहास शिकवितात की त्यांचा कुठलाही संबंध नसलेल्या देशाचा शिकवितात? पहिले आणि दुसरे महायुद्ध झाले युरोपियन देशांमध्ये. भारताचा त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही. पण आपण मात्र जर्मनीवर लादलेल्या तहाच्या अटी विनाकारण घोकत बसतो. तसंच आपला काहीही संबंध नसलेली फ्रान्सची राज्यक्रांती आणि त्यांचे इंग्लंड बरोबरचे सप्तवार्षिक युद्ध आपल्याला खडानखडा पाठ असते, पण आपल्याला भारतातली ८ पूर्वोत्तर राज्ये माहित नसतात.

इतिहासच शिकायचा तर आपल्या देशातला शिका ना! आपल्याऐवजी परक्यांचा शिकणे हे गुलामगिरीचे लक्षण आहे!


Mahesh
Tuesday, February 27, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, तुम्ही म्हणताय ते काही प्रमाणात बरोबर आहे.
मेकॉलेने घालून दिलेले धडे आपली शिक्षण व्यवस्था अजुनही गिरवित आहे.
शासनाची उदासिनता, स्वाभिमान आणी दूरदृष्टिचा अभाव...


Suyog
Wednesday, May 02, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

my son is in 1st grade in LA how to teach him history , science,geography at home as they dont have any books how we can come to know what to teach him or what is he learning in school

Disha013
Wednesday, May 02, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही अगदी हाच प्रश्न पडलाय. माझा मुलगा पहिलीत जाईल पुढच्या वर्षी. तो शाळा enjoy कर्तोय. पण घरी आले की काय करावे ते समजत नाही. homework नसतो. १ ते १००,२०० आकडे लिहिणे, alphabets लिहीणे, drawings , colouring , अशा सटर्फ़टर गोष्टी गेली २वर्षे करतोय. शाळेतही तेवधेच शिकव्लेय केजी मधे. तोच काय,मिही कंटाळलेय! आता अ,आ,इ शिकवायला घेतलिये!
पहिली,दुसरीतील मुलांना इंग्लिश or मराठी grammer ,मॅथ्स शिकवण्यासाठी एखादी website आहे का?


Vinaydesai
Thursday, May 03, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.edhelper.com

एकदा मेम्बर झालात ( Under 20$ per Year ) तर बर्‍याच विषयांचा अभ्यास करता येतो.. (पेपर काढून मिळतात.. ते सोडवून घ्यायचे...)



Malavika
Saturday, May 05, 2007 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

edhelper.com वर teaching material आहे का? की नुसतेच worksheets आहेत?
mathwizard.net पण चांगली आहे

Vishee
Friday, August 17, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मधे शाळेत जाणार्‍या मुलांसाठी त्यांच्या ईयत्तेनुसार भारतातुन अभ्यासक्रमाची पुस्तके मागवता येतील आणि maths, science चा थोडा जास्तीचा अभ्यास घेता येइल. हेच मराठी, english grammer साठी पण करता येइल. वर्षातुन एकदाच पुस्तकं आणली की झालं.

Satishmadhekar
Tuesday, September 04, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी Nursery Rhymes ऑनलाईन ( Text or MP3 Format ) कुठे मिळू शकतील?

Mrinmayee
Tuesday, September 04, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.geocities.com/badbadgeete/ ही साइट चांगली आहे ' marathi badbadgeete' नावाने google करुन बघा.

Amruta
Tuesday, September 04, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे मी देशात असताना माझी एक मैत्रीण US वरुन परत आली आणी तिचा मुलगा १ लीत जाणार होता. पण पहिलीची पुस्तक बघुन तिला खुप tension आल. हिंदीचा तर गंध पण त्या मुलाला नव्हता.

आम्ही इथे आल्यावर माझ्या मुलीसाठी इथल्या शाळेत admission घेताना तिला थोडे प्रश्ण विचारलेले. तिला सगळे alphabets,numbers,2,3 letter words येतायत हे पाहिल्यावर त्या teacher ला एवढ आश्चर्य वाटल. मला म्हणे she is ready for first grade . (पण ठेवल kindergarten मधेच.)

मी माझ्या मुलीची india मधली sr kg ची सगळि पुस्तक आणली आहेत. english,maths,hindi सगळ्याचा अभ्यास रोज थोडा थोडा करतो. नाहीतर जेव्हा परत जाउ तेव्हा तिथे म्हणतिल she should stay in sr kg :-)

इथे तिला आता capital letters शिकवतील आणी तिथे तिच्या एवढी मुल cursive मधे words लिहितायत.

पण बाकी काहिहि असो इथली शाळा मुल जाम enjoy करतात.


Sunidhee
Wednesday, September 12, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा. ह्या bb ला जास्त संबंधीत नाही पण इथेच लिहिणे योग्य वाटले. नसेल तर प्लिज़ सांगा..
२-३ भारतातले शाळाचालकांचे अनुभव..
माझी एक मैत्रीण हल्लिच पुण्याला परत गेली. मुलगी साडेतीन ची. तिथे शाळेला घातले. एक दिवस अचानक तिने आईबाबांना ओठांवर टिचकीने सटासट मारायला सुरु केले. ते किती लागते ते आपल्याला माहीत आहे. आई तिला रागावली आणि विचारले "हे कुठे शिकलीस?" तर निरागसतेने मुलीनी सांगितले "शाळेत बाई असेच मारतात आम्हाला"???? . मग मैत्रिण आणि तिचा नवरा दोघे गेले शाळेत आणि प्रिन्सिपल ला सांगितले, तेव्हा प्रिन्सिपल नी कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता लगेच त्याना सांगितले 'your daughter must be imagining such things' .. ???? मान्य आहे मुले खोडकर असतात. पण त्यांना शिस्त लावण्याची शाळेची पध्धत नीट असावी. आणि कोणी तक्रार करतय म्हटल्यावर थोडेतरी लक्ष घालावे ना. मला तर तासभर उभे करणे पण अघोरी वाटते. एवढासा जीव किती थकुन जाईल! वर्गात समोर जमिनीवर बसवावे म्हणजे जरा लाज वाटते मूलांना. अगदी भयानक वात्रट असेल तर आईबाबांना बोलावुन घ्या आणि चर्चा करा ना.

दुसर्‍या मैत्रिणीची मुलगी दिल्ली ला शाळेत जाते. तिथे असेच काहीसे झाल्यावर ते गेले शाळेत, तेव्हा प्रिन्सिपल म्हणाले "तुम्ही तिला दुसर्‍या शाळेत घालू शकता". निदान टीचर बरोबर बोलून पाहायचे ना चूक मुलीची आहे की टीचर ची शिक्षा करायची पध्धत चुकिची आहे.

तिसरी मैत्रीण पण पुण्याची. ती २ वर्षात परत जाईल. आत्ता ती भारतात गेली होती. तिथे international school मधे चौकशी करायला ते नवराबायको गेले. तेव्हा स्वागतिका काहीतरी जोरजोरात टाइप करत होती. ते न थांबवता तिने "काय हवे" विचारल्यावर त्यांनी शाळेची माहिती विचारली. तिने तरीही टाइपिन्ग थांबवले नाही आणि record लावल्यासारखे त्यांच्याकडे ढूंकुन न पहाता धडाधड माहिती दिली. त्यात मुख्य अवाढव्य फी बद्दलच जास्त होते. मग मैत्रिणीने "शाळा पहाता येइल का, कोणा टीचरशी बोलता येइल का,चालू वर्ग ते पण बालवाडीचे बाहेरुन पहाता येइल का" असे विचारले तर सरळ नकार मिळाला. वर हे ही सुनावले गेले की हल्लि भरपुर NRI परत येतात आणि ह्या शाळेत मुलाना घालतात त्या मुळे त्याना customer ची कमी नाही.

इतकी मस्ती ह्या शिक्षण क्षेत्रात??? तरी हे basic गोष्टीतलेच अनुभव आहेत. आणि ते पण नावजलेल्या शाळेत. अजून कायकाय होत असेल देव जाणे. तुम्ही पुढारलेल्या देशांच्या बरोबर चालायची इछ्छा करता ना मग आधी व्यावसायिक नम्रता शिका.


Malavika
Thursday, September 13, 2007 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी,
मी २००८ च्या सुरवातीला भारतात (पुण्यात) परत जाणार आहे. माझी दोन्ही मुले तिथे शाळेत जातील. तुमच्या मैत्रिणीला हा अनुभव कुठल्या शाळेत आला ते लिहाल का प्लीज? म्हणजे मलाही मदत होईल.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators