|
'हितगुज दिवाळी अंक २००६' यंदाचा दिवाळी अंक ( PDF Format मध्ये) खालील लिंकवर उपलब्ध आहे हितगुज दिवाळी अंक २००६
|
Admin
| |
| Monday, February 12, 2007 - 12:45 am: |
|
|
मायबोलीच्या वाटचालीतले दोन महत्वाचे टप्पे गेल्या आठवड्यात पूर्ण झाले. तुमच्यापैकी काही जणाना माहिती आहेच, गेल्या काही महिन्यांपासून मायबोली स्वत:च्या पायावर उभी रहावी आणि एका व्यक्तिवर ती अवलंबून न रहाता एका संस्थेत तिचे रुपांतर व्हावे या दृष्टिने प्रयत्न चालु होते. गेल्या आठवड्यात Feb 6, 2007 ला corporatization बाबतच्या कायदेशीर गोष्टी पूर्ण होऊन Maayboli Inc. या संस्थेचा जन्म झाला. मायबोलीला स्वत:चा Tax-ID ही मिळाला आहे ज्यायोगे मायबोलीचा सगळा जमाखर्च पूर्णपणे वेगळा ठेवला जाईल. मायबोलीच्या वाटचालीत इतरांचेही सहकार्य घेण्याचा आणि इतरांनी त्यावर लक्ष ठेवण्याचा मार्ग त्यामुळे सोपा झाला आहे. दिवाळी अंक विक्रीला मायबोलीकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामूळे आमचा उत्साह वाढला आणि नुकतीच मायबोलीच्या खरेदी विभागाची सुरुवात झाली आहे. अजून तो छोटा असला तरी अधिक गोष्टी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. मायबोलीच्या व्यासपीठाचा लाभ सगळ्या मायबोलीकरांना व्हावा म्हणून मायबोली नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. म्हणुनच मायबोलीकरांपैकी कुणाला त्यानी उत्पादित केलेल्या वस्तु (पुस्तकं,सीडी, पेंटिंग, भेटवस्तू) इथे विक्रीसाठी ठेवायच्या असतील तर त्यांचे स्वागतच आहे. /kharedi
|
Admin
| |
| Monday, March 19, 2007 - 3:42 am: |
|
|
गुढीपाडव्याच्या शुभदिवशी, मायबोलीचा पुस्तक विक्री विभाग सुरु करत आहोत. पुस्तकं भारतात मिळणार्या किंमतीतच (+ airmail charges ) जगभर उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि ती थेट पुण्यातून जगभर पाठवली जातील. तुम्हाला हवे असलेले कुठलेही पुस्तक (जरी सध्या ते आमच्या सूचीत नसले तरी) आम्हाला कळवल्यास आम्ही विनामूल्य शोधून देऊ आणि केवढ्याला मिळते आहे हे ही कळवू. जर तुम्हाला वाटले तर तुम्ही online विकत घेऊ शकाल. मायबोलीवरून घेतले तर आवडेलच पण तसा आग्रह नाही. शेवटी मराठी वाचकांनी, कुठुनही का होईना त्याना हवे असलेले पुस्तक, विकत घेऊन वाचावे इतकेच. इतर विभागांमधेही (सीडी, डीव्हीडी) अधिक नवीन गोष्टी उपलब्ध आहेत. http://kharedi.maayboli.com सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
|
Admin
| |
| Wednesday, May 09, 2007 - 1:14 am: |
|
|
सेवादात्याच्या नेटवर्कमधील बिघाडामुळे आज (८ मे, २००७) सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत मायबोली उपलब्ध नव्हती म्हणून दिलगीर आहोत
|
Admin
| |
| Sunday, July 01, 2007 - 1:34 am: |
|
|
मायबोली.कॉम ला २००७ चा बृहन महाराष्ट्र मंडळाचा सन्मान पुरस्कार. (३० जून,२००७, सिऍटल, अमेरिका) गेली दहा वर्षे मराठी समाज आणि संस्कृतीसाठी उत्तर अमेरिका आणि महाराष्ट्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल , मायबोली.कॉम (www.maayboli.com) या अग्रगण्य मराठी संकेतस्थळाला या वर्षीचा बृहन महाराष्ट्र मंडळाचा सन्मान पुरस्कार देण्यात आला. मायबोलीचे मुख्य वित्त अधिकारी श्री समीर सरवटे यांनी मायबोलीकरांच्या वतीने अधिवेशनाचे प्रमुख वक्ते डॉ.श्री नरेंद्र जाधव यांच्याकडून तो स्वीकारला. ज्या मायबोलीकरांनी त्यांच्या महाराष्ट्र मंडळाला नामांकनाबद्दल आवर्जून कळवले होते त्या सगळ्यांची मायबोली ऋणी आहे. अधिक माहिती लवकरच....
|
Admin
| |
| Sunday, July 01, 2007 - 6:03 am: |
|
|
|
Admin
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:04 am: |
|
|
मायबोली सुरु होऊन ११ वर्षे झाली त्यामुळे त्यावेळेस लिहिलेले Software ही आता कालबाह्य झाले आहे. मायबोलीच्या पुढच्या वाटचालीस ही तांत्रिक अडचण असल्यामुळे गेले काही महिने नूतनीकरण करण्याचे काम सुरु होते. हे काम आता एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. नुतनीकरणाच्या मार्गातली एक मोठी अडचण होती म्हणजे नवीन आणि जुन्या software ची पासवर्ड साठवण्याची पद्धत. त्यामुळे आपोआप सगळ्यांच्या व्यक्तिरेखा (ID) नवीन प्रकारात हलवणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक सभासदाने एकदा तरी नवीन सॉफ्टवेअरमधे प्रवेश करणे जरूरी आहे. तुम्हाला फक्त प्रवेश करायचा आहे. नवीन ID किंवा password बदलण्याची गरज नाही. मी सगळ्याना विनंती करतो कि त्यानी कृपया खाली दिलेल्या पायर्या पूर्ण कराव्या. मायबोलीच्या पुढील सेवासुविधा फक्त या पायर्या पूर्ण केलेल्या सभासदांनाच उपलब्ध होतील. Goto /user login using your maayboli ID and password wait till you login and see a menu which shows your ID. Goto माझे सदस्यत्व and confirm your maayboli history is shown (how long you have been member) तुम्ही सार्वजनिक PC वरून मायबोलीला भेट देत असाल तर हितगुज (जुने सॉफ्टवेअर) आणि वर लिहिलेले नवीन सॉफ्टवेअर दोन्हीकडे वेगळी जाण्याची नोंद (logout) करायला विसरू नका. एकदाच logout करून चालणार नाही.
|
Admin
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:17 am: |
|
|
या नूतनीकरणाच्या चाचण्या करण्यासाठी खालील मायबोलीकरांची महत्वाची मदत झाली त्याबद्दल त्यांचे आभार psg, storvi,lalu, yogibear,farend,savyasachi,maanus, Mrinmayee,mahaguru,kedarjoshi,asami,gajanaddesai,svsameer,shyamli,dineshvs, upas, indradhanushya,vinaydesai,maitreyee,milya,paragkan,milindaa,anilbhai,killedar नवीन विभागात तुम्हाला देवनागरीकरण करण्यासाठी अधिक सुलभ सुविधा आहे. देवनागरीकरणाचे Software श्री ओंकार जोशी यांनी लिहिले आहे त्यांचेही आभार.
|
Admin
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:58 am: |
|
|
तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे यशस्वी रित्या प्रवेश केलात तर दोने सुविधा लगेच उपलब्ध होतील. विचारपूस्: तुमची विचारपूस करण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतंत्र पान मिळेल आणि तुम्हीही इतरांची विचारपूस करू शकता. व्यक्तिरेखा: तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगणारी व्यक्तिरेखा तयार करू शकता. तुमच्या आवडीनिवडी ठिकाण तुम्ही लिहिलेत तर त्यासारखीच आवड किंवा ठिकाण असणारे मायबोलीकर शोधणे सोपे झाले आहे.
|
ईंडीया न्यु ईंग्लंड न्युज या पाक्षिकामध्ये मायबोलीसंबंधी प्रसिद्ध झालेला लेख इथे वाचा. हे स्थानीक पाक्षिक बॉस्टन इथे प्रकाशीत होत असुन न्यु ईंग्लंडच्या ५ राज्यांमध्ये (मॅसॅच्युसेटस्, न्यु हॅम्पशायर, व्हरमॉन्ट, मेन आणि र्होड आयलंड) वितरीत केले जाते.
|
Admin
| |
| Monday, October 15, 2007 - 6:07 am: |
|
|
दिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो. रंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे. मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी आपला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे. ३ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २४% सूट ६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ३३.५% सूट ही विशेष सवलत फक्त २८ ऑक्टोबर, २००७ पर्यंतच उपलब्ध आहे. पूर्वनियोजित संचांची मागणी नोंदवा सुटे अंक नोंदवा सुटे अंक आद्याक्षराप्रमाणे (A,B.C,D,E) सुटे अंक आद्याक्षराप्रमाणे (F,G,H,I,J) सुटे अंक आद्याक्षराप्रमाणे (K,L,M,N,O) सुटे अंक आद्याक्षराप्रमाणे (P,Q,R,S,T) सुटे अंक आद्याक्षराप्रमाणे (U,V,W,X,Y,Z) अधिक माहिती १. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल. २. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.
|
Admin
| |
| Friday, November 09, 2007 - 3:06 am: |
|
|
ज्याची सर्वजण अतिशय उत्सुकतेने वाट पाहता आहात, तो दिवाळी अंक आपल्या सर्वांसमोर ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मायबोलीचा 'हितगुज दिवाळी अंक २००७' आपल्या सर्वांना आवडेल अशी आशा आहे. दीपावलीनिमित्त आपले व आपल्या कुटुंबियांचे दिवाळी अंक चमूतर्फे हार्दिक अभिष्टचिंतन! हितगुज दिवाळी अंक २००७
|
Admin
| |
| Friday, November 23, 2007 - 1:19 am: |
|
|
रंगीबेरंगी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नवीन सॉफ्टवेअरच्या रुपांतराचा पुढचा भाग म्हणून आम्ही रंगीबेरंगी विभाग हळुहळु नवीन मायबोलीमधे नेण्यास सुरुवात केली आहे. रंगीबेरंगी सभासदाना नवीन मायबोलीवर डाव्या बाजूला मेनूमधे माझे रंगीबेरंगी पान असा पर्याय दिसू लागेल आणि तिथून त्याना रंगीबेरंगीमधे लेखन करता येईल. आम्ही जसे जमेल तस मजकूर नविन विभागात हलवतो आहोतच. पण सभासदही copy+paste करून ते आताच हलवू शकतात. admin team लाही हे काम हाताने करावे लागणार असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागु शकेल आणि तुमचा हातभार लागला तर मदत होईल. सर्व रंगीबेरंगी सभासदाना याचा उपयोग करता यावा म्हणून जुन्या-नवीन रंगीबेरंगी सभासदाना १ वर्षासाठी विनामूल्य नूतणीकरण देण्यात येणार आहे. ज्यांचे सभासदत्व संपले आहे किंवा संपत आले आहे त्याना पैसे भरण्याची आवश्यकता नाही.
|
Admin
| |
| Monday, December 03, 2007 - 2:07 am: |
|
|
थोडी गैरसोय जसे जसे वेगवेगळे विभाग नवीन मायबोलीवर हलवतो आहोत तशा काही अडचणी जाणवायला लागल्या आहेत. या अडचणी मुख्यत्वे करून थोडं इकडे थोडं तिकडे अशा स्वरूपाच्या आहेत. अजूनही मायबोलीकरांना नेहमीच्या ओळखीच्या जागी जायची सवय असल्यामुळे नविन ठिकाणी काही लिहिले तर ते माहीती होत नाही. यावर एक तात्पुरता उपाय म्हणून last 1 day सारखी पाने वरच्या भागात नवीन मायबोलीवरचे ताजे लेखन आणि उरलेल्या भागात जुन्या भागातले नवीन लेखन अशी विभागली आहेत. हे थोडे विचित्र दिसते आणि वाटते आहे. पण काही आठवड्याचा प्रश्न आहे. हळुहळु सगळे एकीकडे आले की आपोआपच जुन्या ठिकाणी जायची गरज पडू नये. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
|
आजपासुन मार्गशीर्ष महिना चालु होत आहे. ह्या महिन्यापासुन गुलमोहर नवीन मायबोलीवर हलवत आहोत. आपण नवीन मायबोलीत प्रवेश केल्यावर "लेखन करा" मध्ये "साहित्य लेखन" ह्या दुव्यावर जा. आपण गुलमोहरमधील कोणताही साहित्य प्रकार इथे लिहु शकता.
|
कृपया हितगुजमध्ये last 1 day वर जा.. तिथे गेल्यावर सुरुवातीला गुलमोहर आणि रंगिबेरंगीवर आलेले नवीन साहित्य दिसेल. ते तुम्हाला विभागवार दिसेल. त्या खाली जुन्या हितगुजवरील गेल्या २४ तासातले नवीन posts दिसतील. नवीन मायबोलीवर मराठीत लिहिणे अतिशय सोपे आहे. तिथे खिडकीत सरळ लिहायला सुरुवात करा. मध्येच english हवे असल्यास CTRL + \ ह्या दोन keys एकत्र press केल्यास ईंग्लीश मध्ये दिसेल. तसेच आता नवीन रंगीबेरंगी वर गेल्यावर सर्व लेखकांची यादी उजवीकडे दिसत आहे.
|
नवीन सुविधा: पाऊलखुणा नवीन मायबोलीमध्ये अजून एक सुविधा वाढवली आहे. सभासदाच्या नावावर टिचकी मारली असता आता व्यक्तिरेखा आणि पाऊलखुणा असे २ भाग दिसतील. पाऊलखुणा मध्ये त्या सभासदाने केलेले सर्व लेखन आपल्याला पहायला मिळेल.
|
नवीन सुविधा: अप्रकाशीत लेखन आता नवीन मायबोलीवर हे शक्य आहे. लेखकाला आपलं साहित्य अपूर्ण ठेवता येईल. ते बाकी सभासदाना दिसणार नाही. जेव्हा आपलं साहित्य प्रकाशीत करण्यायोग्य होईल तेव्हा त्याची स्थिती "संपूर्ण" अशी करावी. तेव्हा हे सहित्य सर्व वाचकाना दिसेल. तोपर्यंत काही बदल करायचे असल्यास आपल्या सभासद खात्यात जाऊन पाऊलखुणा मध्ये पहिल्यास फक्त लेखकाला अप्रकाशीत लेख दिसेल. तिथे संपादन करून बदल करता येतील. नवीन लेखाची default स्थिती संपूर्ण असेल त्यामुळे ज्याना पूर्ण लेख लिहायचा आहे त्याना काहीही करण्याची आवश्यकता नाही.
|
Admin
| |
| Sunday, January 06, 2008 - 7:57 pm: |
|
|
सुलभ मदत: transliteration chart नवीन मायबोलीत Transliteration Chart आता उपलब्ध आहे. तिथल्या editor मधे प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा chart दिसू शकेल ज्यामुळे लिहिता लिहिता दुसरीकडे जायची गरज भासू नये. तुम्हाला जर हा chart दिसला नाही तर browser मधे वर जाऊन पान ताजेतवाने (refresh) करून पहा.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|