ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2014 - 02:49

माझ्या "फ्रेंडस अ‍ॅण्ड कलीग्ज" या धाग्यावर `बेफिकीर' यांनी सुचवल्याप्रमाणे "ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव" हा वेगळा धागा काढत आहे.

धाग्याचा फायदा सर्वांनाच, खास करून माझ्यासारख्या ४-५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि तुलनेत मॅनेजमेंटच्या लोअर लेव्हलला असलेल्यांसाठी येथील अनुभवी लोकांचे अनुभव, त्याचे विश्लेषण आणि एक्स्पर्ट टिप फार मोलाचे ठरतील.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल अवचटांसारखी मण्डळी जेवा पूर्णवेळ समाजसेवा छंद याना वाहून घेतात तेव्हा रीतसर कुटुम्बाशी चर्चा करून असे निर्णय घेतात . याला जबाबदार वर्तन म्हणता येईल....>>>>>>> खरे खोटे त्यांच्या बायकोला च माहीती.
बर्‍याच वेळेला बायका "पदरी पडले आणि पवित्र झाले" अश्या न्यायानी गप्प बसतात. अ.अ. ची केस मला नेहमी तशीच वाटत आलेली आहे. अर्थात हे माझे मत आहे, चूक ही असू शकते.

माझी ( यशस्वी ठरलेली ) पॉलिसी..

कंपनीने ठराविक पगार देऊन तूमचा वेळ आणि श्रम विकत घेतलेले असतात, तूम्हाला नाही. त्यामूळे २४ तास नोकरीचा विचार करू नका. शक्यतो कामाच्या वेळेच्या बाहेर ( हे अवघड आहे, आजकाल तरूण मूलांना २४ तास कामाशी संबंधितच विचार करावा लागतो ) कामाच्या बाबतीत विचार, बोलणे टाळा. अगदी या वेळेच्या बाहेर सहकार्‍यांसोबत असलात तरी कामाविषयी चर्चा टाळा. हा स्विच ऑन / स्विच ऑफ एकदा जमवलात कि
राजकारणाचा काही त्रास होत नाही. आपल्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त उत्तम काम करत रहा.

अगदीच त्रास होत असेल तर पर्याय शोधत रहा. जितकी तूम्हाला नोकरीची गरज असते तितकीच कंपनीलाही तूमची
गरज असतेच.

स्वतःचे छंद जोपासा. कुटूंबासोबत , मित्रमैत्रिंणींसोबत वेळ घालवा.

मग म्हणाल, राजकारण गेलं चुलीत !!

ड्रीमगर्ल .. Happy

दिनेशदा .. पटलं..
माझी एक कलिग आहे इथे .. २४ तास ऑफिसचा विचार.. आधीच ओव्हरलोड असुनही नवीन काम घेतेय.. काल विकांताला मला पण व्हॉटस अप वर पिडलं की उद्या हे काम असं करु नि तसं करु..
गेट अ लाईफ!

ऱोबिनहुड, सॉरी, तुमच्या वाक्यातल्या 'क्रुर' या शब्दामागचा अर्थ समजण्यात माझा गैरसमज झाला होता. हा धागा ज्यामुळे निघाला तो मुळ धागा वाचुन, 'कार्पोरेट मधली मैत्री (खरी की खोटी)' अशा प्रकारच्या चर्चेतुन इथे आले. त्यामुळे तुमचे वाक्य फक्त त्याच चर्चेला उद्देशुन आहे असे वाटले. म्हणुन तसा प्रतिसाद होता.

पण नोकरीची असुरक्षितता, कामाचे भयानक तास ही कार्पोरेटमधली परिस्थिती अतिशय खराब (क्रुर) हे १०० टक्के मान्य.

दिनेश.. हा बॅलन्स जमला तर आयुष्य फार सुखाचं होतं.
पण हल्ली वर्क फ्रॉम होम ची सोय जेव्हा मिळते तेव्हा ऑफिसच काम घरी न करणं अवघड होऊन बसतं. तरीही सहकर्मचार्‍यांना आणि विशेषतः साहेबाला हे दाखवूनच दिलं पाहिजे कि मी माझ्या वैयक्तिक वेळात कंपनीचं काम करणार नाही. आणि केलच तर ते इमर्जन्सी म्हणता येईल अशाच वेळी असेल. व त्याबद्दल मला नंतर मोबदला (सुट्टीच्या स्वरुपात किंवा दुसर्‍या दिवशी उशीरा येण्याची मुभा असे काहीतरी) मिळाला पाहिजे.
ग्रॅज्यएट झाल्या झाल्या काम करणारे बरेच तरुण लोक स्वतःला 'प्रूव्ह' करण्याच्या मागे असतात आणि उत्साहाच्या भरात अती काम करून चुकिचा पायंडा घालतात. साहेबाला काय शेवटी जमेल तेवढे काम रेटून करून घ्यायचं असतं आणि हे लोक ते करतात म्हणून साहेबाचं फावतं. ते करून दिल्याबद्दल नंतर साहेबाचीच पाठ थोपटली जाते असा माझा अनुभव आहे. कामाच्या वेळात भरपूर काम करावे पण ते नंतर घरी आणु नये हे महत्वाचे.
मी पण नवीन होतो तेव्हा साहेब म्हणेल ते करायचो. "मल्टीनॅशनल" कंपनी मधे कामाला असलो तरी साहेब भारतीयच होता. तो मला जाम पळवायचा. ऑफिसमधल्या इतर लोकांशी चालणार्‍या त्याच्या पॉलिटिक्स मधे मला उगाच बकरा करून ह्याला असा नीरोप दे, त्याला नाही सांग असली कामं करवायचा. ऑफिसातल्या एका प्रोजेक्ट्साठी त्यानी मला ३१ डिसेंबरच्या रात्री काँट्रॅक्टरचे काम संपेपर्यंत कंपनीत थांबायला लावले होते. का तर म्हणे आमचा गोरा साहेब सुट्टीवरुन परत येईल तेव्हा त्याला सगळं काम झालेलें दिसेल. मला काही ऑप्शन नव्हता म्हणून मी थांबलो आणि रात्री २ वाजता त्याला फोन करून सांगेतलं कि काम झालं आता मी घरी जातो!
आताच्या विदेशी साहेबाचा अनुभव एकदम उलटा. मी कामासाठी कधी कधी आठवडाभर बाहेर असतो. हा साहेब शुक्रवारी स्वतःच मला सांगतो कि काम झालं कि जा घरी, तुला पुढचा आठवडा बाहेर काढायचाय तेव्हा विकेंड जमेल तेवढा एन्जॉय करून घे!
मला कुतुहल आहे.. भारतीय साहेब वि. परदेशी साहेब ह्यात बहुतांश वेळा परदेशी साहेब जास्त चांगला असतो का? आणि ह्याचा अर्थ भारतातलं 'वर्क कल्चर' चांगलं नाही असं सरसकट म्हणता येईल का?

चौकट राजा, ५ दिवस भरपूर काम आणि २ दिवस नुसता आराम हे भारताबाहेरचे कल्चर आहे ( बहुतेक देशांत )
आपल्याकडे जरा हाती सत्ता आली तर ती गाजवण्याची ( मूळ ) वृत्ती उफाळून वर येते. माझ्या उमेदवारीच्या काळात, दिवसभर टिवल्या बावल्या करून, कामाच्या वेळेनंतर कामाचे नाटक करणारे बरेच बघितले. आणि
कळस म्हणजे तेच सिनियर लोकांना आवडत असे. ( अर्थात मी तिथे फार राहिलो नाही. )

मी करीयरमधे लगेचच वरच्या हुद्द्यावर गेलो आणि या असल्या प्रकाराना कधीही प्रोत्साहन दिले नाही.

मूळात जर वेळेच्या बाहेर काम करणे जर नियमित बाब असेल तर काम वाजवीपेक्षा जास्त, काम करणारे कमी किंवा त्यांची क्षमता कमी किंवा काम योग्य वेळेत पूर्ण करण्याच्या साधनांची कमतरता यापैकी एक काहीतरी असावे, अशी शंका पण येत नाही का ?

आणि हे असे लोकच, तथाकथित साहेब लोकांचे कान भरून राजकारण करण्यात पुढे असतात. आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी त्यांना याशिवाय मार्ग नसतो. अश्या लोकांना डील करायचे मार्ग असतातच म्हणा, त्यासाठी त्यांच्याच तंगड्या त्यांच्याच घश्यात घालायची गरज असते.

इन्सिक्युरिटी हि लग्नानंतर नाही तर कमी आत्मविश्वासामुळे येते , तुझ्यावर घराची बायको मुलांची जबाबदारी आहे तर नोकरीही करावीच लागणार पण जर प्रत्येक काम हे आत्मविश्वासाने केल तर इन्सिक्युरिटी हि येणारच नाही <<प्रत्येक काम जरी आत्मविश्वासाने वैगरे केले तरी ऑफिसच्या राजकारणाचे काय? तुमच् काम सगळ्यात चांगल असतांनाही तुम्हाला डावलुन दुसर्‍याला पुढे आणन्च राजकारण ना? जेव्हा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला बिल्स पे करायचे असतात तेव्हा नोकरीवर लाथ मारायचा अ‍ॅटीट्युट कसा चालेल?

, तथाकथित साहेब लोकांचे कान भरून राजकारण करण्यात पुढे असतात. आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी त्यांना याशिवाय मार्ग नसतो>>>>> आणी तरी हुश्शार साहेब अश्या लोकांना कामाच्या वेळी /घाईच्या वेळी सफाईने मागे टाकतात ,आनि काम करणार्यांना पुढे घेउन काम आटपुन घेतात. कान भरणार्या लोकांची अकार्यक्षमता साहेब लोकांना ही माहित असतेच.फकत ते साहेब असल्यामुळे अश्या लोकांचा पण पदधतशीरपणे उपयोग करुन घेतात हे त्या कानभरु लोकांना ही कधी कळत नाही.त्यामुळे आपल काम आपण नीट पार पाडण हे केव्हापण चांगल.

निवांत पाटील:
<हायला मी एकटाच हाय कि कॉय,
बॉसला पण जरा तुमचेच चुकते म्ह्णुन
सांगणारा आणि नाही म्हणणारा ? >

मीपण आहे. चुक नसली तर कोणाचेही ऐकून नाही घेत. मग तो कोणीही असो.

बॉसला पण जरा तुमचेच चुकते म्ह्णुन
सांगणारा आणि नाही म्हणणारा ?>>> मी पण आहे. पण दुर्दैवाने माझ्या बॉस ला हांजी हांजी वाले लोकच पटतात. लोकल कं. असल्याने मागच्याच वर्षी आलेल्या एका लोकलला (ज्याच्याकडे फक्त २ प्रोजेक्ट आहेत) एका वर्षात पर्म करण्यात आले, पण मी जीव तोडून कामं उपसत असूनही, एकटी १०-१२ प्रोजेक्ट सपोर्ट करूनही, मला पर्म करायला ५ वर्ष लावले Sad फार वाईट वाटलं. जास्त वाईट अशाचं की, हिने जास्त मागण्या करू नयेत म्हणुन आधीच नन्ना चा पाढा वाचला अप्रेजल ला, आणि माझ्या प्रेगनन्सीचे भांडवल मला पगारवाढ न देण्यात केले ते वेगळेच Sad

रच्याकः "हा" धागा चांगला आहे Happy

पण मी यावर पुढील उत्तर दिले: जर माझ्या कामात इतकीच खराबी असेल, तर मला कॉन्ट्रॅक्ट सुद्धा पुढे चालवायचे नाही, मला पर्म नाही केलेत तर मी ही चालले ...दुसरीकडे कुठेतरी मिळेलच.

असं म्हंटल्यावर मात्र १ दिवसात पर्म चे ऑर्डर्स आलेत, शिवाय कामाशी निगडीत लोकांनी सुद्धा हिला गमाऊ नका, काम चांगले करते असा निर्वाळा दिला.

बॉसच्या बॉसशी आणि कस्टमरशी संबंध ठेवा म्हणजे बॉस जरा वचकून राहतो. कंपनीसाठी अतिरिक्त काम करा, बॉससाठी नव्हे म्हणजे जे काम कराल ती वेळ नमूद झाली पाहिजे.

बॉस लोकांना पण असे हांजी हांजी करणारे लोकच आवडतात, हे अगदी खरे. मूळात आपली चूक कुणी दाखवली तर ती खिलाडूपणे स्वीकारायची तयारी नसते शिवाय हाताखालच्या ( सॉरी या शब्दासाठी ) लोकांनी दाखवली म्हणजे इगो दुखावला जातो ना !

खुपदा दुसरा पर्याय हातात नसतो हे पण सहन करण्याचे मोठे कारण असते. त्या साठी गरज नसताना जॉबसाठी अर्ज करत रहावे. कितपत रिस्पॉन्स मिळतोय ते पहात रहावे. मित्रमैत्रिणींमधे कल्पना देऊन ठेवावी. कुणाला कुठे व्हेकन्सी आढळली तर कळवायला सांगावे.

मी ही चालले ...दुसरीकडे कुठेतरी मिळेलच.
>>>
मला या बाबी विषयी माहीती पाहिजे आहे. प्रायव्हेट मध्ये जॉब बदलायचा ऑप्शन असतो हे खरे. पण आता वेगवेगळ्या डिसिप्लिन मध्ये नवीन उमेदवार भरपूर उपलब्ध असतात . म्हनजे एम्प्लॉयरला भरपूर आणि कमी पैशात माणसे उपलब्ध असतात शिवाय त्यांचे ज्ञानही अद्ययावत असते ,करीअर उभारण्यासाठी कष्ट घेण्याची, बेकारीच्या अगतिकतेपोटी कोणत्याही अटींबर काम करण्याची तयारी असते. अशा स्थितीत जुन्या माणसांना एवढ्या सहजी जॉब बदलता येतो का? २००३-०४ ला सॉफ्टवेअर मध्ये जेवढ्यासंधी जेवढे पगार होते तेवढे आता राहिलेले नाहीत . आता जॉब लागला तरी खूप झाले अशी स्थिती आहे . किंबहुना इंजीनीअरिंगमध्ये ही अनएम्प्लॉयमेन्ट आली आहे. मित्राचा मुलगा इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी ई होऊन व यू केत एम्बी ए करून ३ वर्षे जॉबलेस आहे.दर वर्षी महाराष्ट्रात ५० ६० हजार इंजीनीअर्स अ‍ॅड होतात . मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहे.

अगदी अनुभवाचे जरी म्हटले तरी प्रत्येक जॉबला अनुभव क्लागतोच असे नाही. त्यापेक्षा नवीन माणूस कमी पगारात मिळतो . शेवटी कंपनी व्यवहारावर चालते भावनेवर नाही.. शिवाय अतांत्रिक कामात लीडरशिप क्वालिटी, व्यक्तिगत गुणवैशिष्ट्ये महत्वा ची असतातच ना. ती काही अभ्यासाने येत नाहीत. ती व्यक्तिमत्वाचा भाग असतात. शिवाय नेहमी जॉब बदलण्याने पेमेंटचा तोटा होत नाही का?

आपल बरोबर असेल तरी ते समोरच्याला सांगण्याची एक पद्धत असते.
ती जर पाळली गेली नाही तर नुकसान आपलच होत. आणि हे प्रयत्नपूर्वक नक्कीच टाळता येत.
प्रत्येक नात्यामध्ये हा नियम लागू होतो. साहेब आणि कर्मचारी असो किवा नवरा आणि बायको.
जर तुमच काम एक नंबर आहे तर तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे कि तुमच्या साहेबा बरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. त्यातून मिळणारे फायदे हे नक्कीच जास्त असतील.
त्याऐवजी जर तुमची प्रतिमा हुशार पण भांडखोर अशी निर्माण झाली तर काय उपयोग?
त्याचे पर्यवसान तुम्ही निराश होण्यात आणि राजकारणाचे बळी जाण्यात होण्याची शक्यता जास्त आहे.

रॉबीन.. आता वर्षानूवर्षे एकाच कंपनीत चिकटून रहायचे दिवस राहिले नाहीत. दोन तीन वर्षे म्हणजे डोक्यावरून पाणी. एखाद्या क्षेत्रातला अनुभव असेल तर स्पर्धक कंपन्या टपलेल्याच असतात. कधी कधी तर आधीच्या कंपनीचा नोटीस पे पण द्यायची तयारी असते.. पण हे जरा मिडल लेव्हलवरचे आहे आणि हे माझे निरिक्षण तेही बहुतांशी भारताच्या बाहेरचे.
भारतातले जॉब मार्केट जरा कठीणच झालेले दिसतेय.

<हायला मी एकटाच हाय कि कॉय, बॉसला पण जरा तुमचेच चुकते म्ह्णुन सांगणारा आणि नाही म्हणणारा ? >
नाही नाही. मी पण त्यातलीच.
किंबहुना आमच्या CIO पर्यंत माझी ख्याती होती.

ऑस्ट्रेलियात गेली पंधरा सोळा वर्षं मोठ्या रिटेल कंपनींत आयटीत काम करतेय. बॉसेस - ऑस्ट्रेलियन गोरे, भारतीय.. स्त्री, पुरुष वगैरे सगळ्या प्रकारचे.

मी, माझा बॉस आणि त्याच्यावरचे सगळे कंपनीचेच नोकर आहेत. कंपनीचं हीत हेच सगळ्यां च्या कामाचं उद्दिष्टं असायलाच हवं... हे माझं तत्वं आहे. मी पगारासाठी आणि मनाच्या समाधानासाठीही काम करतेय. बॉस म्हणेल त्याला हो म्हणत वर्स्।आतून एकदा लठ्ठं बोनस आणि कदाचित वरची जागा ह्यासाठी रोजची झोप घालवणं मला परवडणारं नाही. Happy

माझी टेक्निकल अ‍ॅबिलिट्ञ आणि बिझिनेस अ‍ॅक्यूमेन ह्यासाठी मला माझ्या पोस्टवर नेमलं आहे. मॅनजरला योग्य तो सल्ला देणं आणि दोघांच्या संगनमताने काम वेळेत आणि पैशात पूर्णं करण्याचे पैसे आम्हाला दोघांनाही मिळतात.
मॅनेजरला माझं न ऐकता दुसर्‍या मार्गाने जयाचं असेल तर, मिटिंग मिनिट्स, इमेल ह्या द्वारे मी त्याच्या पद्धतीमागचं कारण मागते आणि परत कम्युनिकेट करते. माझी कारणमिमांसा ही ऑप्शन्स आणि त्याचे चांगले वाईट परिणाम ह्यासह इमेल किंवा फॉर्मल डोक्यूमेंट द्वारा त्याला देते.
त्यानं निवडलेल्या मार्गा चे दुष्परिणाम तर खास करून त्याला एमलने कळवते.
त्याउप्पर पायावर धोंडा पाडून घ्यायचा असेल तर.. त्याचं अन कंपनीचं नशीब.

माझा अनुभव असा आहे की, बहुतेक मॅनेजर्स एकदा-दोनदा ह्या प्रोस्स मधून गेले की शिकतात. माझा अनुभव असाही आहे की, पुरुष मॅनेजर्स 'ह्या बाबतीत तू चुकतो आहेस' ह्या वाक्याचा अर्थं त्यच्या कॉन्टेक्स्ट सकटच घेतात.
स्त्री मॅनेजर ह्याचा अर्थं 'मी नेहमीच अशा चुका करते आणि असे निर्णय घेते असं हिला म्हणायच' असा घेण्याच्या शक्यता अधिक आहे Happy

सगळ्यात खटके उडून, भांडणं होऊन काम केलेल्या मॅनेजरने (पुरुष) जेव्हा मला त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम करायला बोलावलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं.
स्वतःचा इगो बाजूला ठेवून काम करवून घेणार्‍या चांगल्या मॅनजर्सना चांगली कंपनी रेकगनाईज करते.. करायला हवं.
नाहीतर पॉलिटिक्स हा एक अत्यंत घातक, घाणेरडा किडा वळवळत असतोच आजूबाजूला.

इथे बघितले तर प्रत्येकालाच असे वाटतय की दुसरे लोक बॉस ची हांजी हांजी करतात. हे कसे शक्य आहे कळत नाही.
कदाचित
मायबोलीवर हांजी हांजी न करणार्‍यांनाच प्रवेश दिला जातो का?

स्वतःचा इगो बाजूला ठेवून काम करवून घेणार्‍या चांगल्या मॅनजर्सना चांगली कंपनी रेकगनाईज करते.. करायला हवं.
नाहीतर पॉलिटिक्स हा एक अत्यंत घातक, घाणेरडा किडा वळवळत असतोच आजूबाजूला.>> मस्त दाद.

रॉबीनहूड >>मला जी माहिती झाली आहे, आयुष्याच्या मध्यावर ज्यांचे जॉब्ज गेलेले आहेत आणि जे कुटुम्बप्रमुख आहेत त्यांची जी उदाहरणे मी पाहिलेली आहेत त्यावरून माझे मत तरी तसे झाले आहे खरे...

प्रचंड असुरक्षितता या एकाच शब्दात मला तरी त्याचे वर्णन करावेलागेल... >>>>>>>>>>>>

हे अनुभव आयटी क्षेत्रातील असावेत मला वाटते. तडका फडकी माणसे काढण्याचे प्रकार manufacturing पेक्षा आयटी मध्ये जास्त आहेत असे ऐकिवात आहे.आपणच या विषयावर अधिक माहिती द्यावी .

डाऊनसाइझिंग हा विषय वेगळा आहे, त्याचा राजकारणाशी संबंध 'थेट' नाही आहे. अप्रत्यक्ष संबंध असू शकतो.

चार पाच भारतीय कंपन्यात नोकरी केल्यावर मी जर्मन कंपनीत कामाला लागलो. बॉसला 'सर' म्हटलं की तो लगेच खेकसायचा. फर्स्टनेम नी बोलवत जा असं दरडावून सांगायचा. 'सर' ते बॉसचं नाव यासाठी सुरुवातीचे काही महिने जावे लागले. त्याच बरोबर बसल्या ठिकाणाहून ऑफिसबॉयला आदेश सोडण्याची सवय भारतीय कंपन्यात असताना नसानसात उतरलेली. अन जर्मन कंपनीत एम.डी. स्वतः कॉफी मशीनवर जाऊन कॉफी घ्यायचा. पहिल्या मजल्यावरुन प्रिंट घेण्यासाठी ग्राउंड फ्लोअरवर यायचा. स्वतः फोटोकॉपी करायचा. आता कंपनीचा एम.डी. ही सगळी कामं स्वतःच करतो म्हटल्यावर आम्हालाही ती स्वतःच करावी लागायची. थोडक्यात जर्मनांच्या साथीने चांगले गुण हळू हळू भिनले. त्याच बरोबर कुवतीचं खरं मुल्यांकन जर्मन कंपनीत झालं.

तरी भारतीय कलीग पोलिटिक्स करायचे, पण ते तेवढ्या पुरताच. खाजगी क्षेत्रात शेवटी टॅलेंट चमकतो हेच खरं.

आपल बरोबर असेल तरी ते समोरच्याला सांगण्याची एक पद्धत असते.
ती जर पाळली गेली नाही तर नुकसान आपलच होत. आणि हे प्रयत्नपूर्वक नक्कीच टाळता येत.>>>
हो बरोबरच आहे आपलं म्हणणं, पण काही चिकट कंपन्न्यांमधे, कायम स्वतःला कगदोपत्री प्रुव करत रहावे लागते, आपलं टॅलेंट दिसत असूनही त्याची पावती मिळेलच असं नसतं, कधी कधी आवाज मोठा करून बोलल्यानेच अ‍ॅक्शन्स घेतले जातात.
आमच्या कडे २-३ जण मेहनती,कामात चांगले असूनही, वरचे लोक अपरीशिएट करत नाही म्हणुन सोडुन गेलेले लोक ही आहेतच, त्यावरूनच हे लिहिले आहे Sad

राजू ७६ - यांच्या मताशी सहमत.
आपल्या बोस ला देखील एक बोस असतो, त्याच्याशी संबंध जर चांगले असतील तर तर आपला बोस आपल्याला टरकुन असतो, आपल्या बोसच्या कमकुवत गोष्टी हेरून ठेवायच्या अणि याची कल्पना त्या बोसला नक्की द्यायची. मग तो आपल्या मर्यादेत राहतो.
अजुन एक गोष्ट म्हणजे "नाही" म्हणायला शिकायचे.जरा अवघड आहे पण हे शिकायचे.

आपल्या भारतीय कंपनी मधे बऱ्याच वेळेला सीनियर लोक्स यारी दोस्ती मधे किंवा सिनियारिटीचा धाक दाखवून पॉलिसीला फाटा मारून काम करायला लावतात. हीच वेळ असते नाही म्हणायची. या गोष्टीची थोड़ी बोम्बाबोम्ब करायची म्हणजे बोसच्या बोसला ही गोष्ट कळली पाहिजे.

माझ्या आधीच्या शिपिंग कंपनीत माझा GM मला काम सोडून ओवल मैदानावर लीग क्रिकेट खेलायला पाठवायचा, म्हणायचा तुझे काम तुझा म्यानेजर करेल, मी या वयात नाही खेलु शकत पण तू खेळ.

नंतरच्या कंपनीत एक महिला मला म्यानेजर होती, लग्नासाठी १५ दिवसांची सुट्टी नामंजूर करुण ९ दिवसांवर केली, मी राजीनामा खराडला तर तिने १५ दिवसांची सुट्टी मंजूर केली. लग्नाच्या दिवसापर्यंत ती मला मोबाईलवर फोन करुण त्रास द्यायची, सिम कार्ड काढून फेकून दिले, अणि १७ व्या दिवशी ओफिसमधे गेलो अणि पुन्हा राजीनामा दिला, कारण विचारले, मी सांगितले - सुट्टीच्या दिवशी इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करू नये एवढी साधी गोष्ट माझ्या वरिष्ठाला कळत नाही, लगानच्या दिवशी सुद्धा ही बाई मला फोन करुण रिपोर्ट मागते, एवढ्या सूडबुद्धीने वागणारे निर्बुद्ध अणि नॉन प्रोफेशनल लोकांसोबत मी काम करू इच्छित नाही.

सध्याच्या कंपनीत सीईओ शी रोजचे संभाषण असते त्यामुळ, म्यानेजर टरकुन आहे.

थोडक्यात का्य तर कंपनी नाही बोस निवडावा.
अणि तुमच्या कामात तुम्ही निपुण असायला हवे.

छान एक एक अनुभव...!!

बॉसने सांगितलेले चुकीचे असले तरी मुकाट्याने करा याचा मी बळी पडलो होतो. (बॉसच पलटी मारू होता त्याला मी तरी काय करणार ?)
बर्‍याच आधीचा हा प्रसंग आहे (१९९८ साल). त्यावेळी मी एका मोठ्या प्रतिथयश कंपनीत होतो आणि नुकतीच माझी चेन्नाईहुन मुंबईला प्रॉडक्ट नॉलेज चांगले होते म्हणून सेल्स मध्ये बदली झाली होती. सेल्सचा प्रांत तसा नवीनच होता. त्यामुळे मुंबईच्या सेल्स मॅनेजरकडून धडे घेत होतो. ह्या सेल्स मॅनेजर विषयी आधी खूप ऐकले होते आणि फॅक्टरीवाले सर्व त्याला खुप मान देत होते. त्यामुळे चांगल्या माणसाबरोबर काम करतोय असे वाटत होते.
पण हळूहळू लक्षात यायला लागले की हा माणूस मला वापरून घेतोय. त्याकाळात कंप्यूटर तसा नवाच होता (म्हणजे या सेल्स मॅनेजरला नवा होता) त्यामुळे याला लागणारी प्रपोजल्स, प्रिंटस आणि सेल्स डेटा सगळा माझ्याकडून बनवून घ्यायचा. बर्‍याच वेळा फिल्डवर नको जाऊ, इथे बसूनच काम कर असे सांगायचा. त्यामुळे हा जरी अनुभव मिळत असला तरी माझी सेल्स टारगेट व्हायची नाहीत आणि वरून ओरडा बसायचा. अशा वेळी मात्र हा सेल्स मॅनेजर (डॅमेजर?) उलटा कांगावा करायचा की मी सांगतो याला की मार्केट मध्ये हिंड, लोकांना भेट पण यालाच (म्हणजे मला) ऑफिसमध्ये बसून काम आवडते. असे दोन-तीन वेळा झाल्यावर मी त्याचे न ऐकता फिल्डवर्क वाढवले आणि माझा परफॉर्मन्स सुधारला. याबाबतीत एका कलिगनेच मोलाचा सल्ला दिला की सकाळी तू घरून कधीच ऑफिसला येऊ नको. डायरेक्ट क्लायंट कडे जा. ऑफिसला आलास की हा तुला कामाला लावणार. आठवड्यातून १-२ दिवसच ऑफिसला जा. मग मी त्या प्रमाणे वागू लागलो पण कधी कधी हा डॅमेजर मला ऑफिसला बोलवून त्याची कामे करवून घ्यायचा.
एकदा मोठा झटका दिला ह्या माणसाने. आमचा जर्मन कोलॅबरेटरचा डायरेक्टर आला होता. त्याला घेऊन एका मोठ्या प्रॉस्पेट्सकडे गेलो होतो. बरोबर हा सेल्स मॅनेजर आणि आमचा व्हीपी (म्हणजे बॉसचा बॉस) पण होता. मिटींग छान झाली. क्लायंटने सांगितले की आम्ही तुमच्या कंपनीबरोबर काम करू इत्छित आहोत. तुमच्या टेक्निकल माणसाला (म्हणजे मला) आमच्या तारापोरच्या फॅक्टरीला जाऊन तिथल्या टेक्निकल लोकांना भेटायला सांगा आणि मग सगळा फॅक्टरीचा अभ्यास करून तुमचे प्रपोजल द्या. लगेचच आमच्यातर्फे सर्वांनी हे मान्य केले. नंतर दुसर्‍या दिवशी मी तारापोरला जायची तयारी करत असताना हा बॉस माझ्याकडे आला आणि मला त्याने तिकडे जाऊ नको, इकडूनच फोनवर त्यांच्याशी बोल आणि काय ती माहिती घे असे सांगितले. मी थोडाफार ह्या विषयावर वाद घातला पण त्याने मला जर मी तारापुरला त्याच्या परवानगी शिवाय गेलो तर माझा तो टुर रिपोर्ट (म्हणजे खर्च) मंजूर करणार नाही. तसेच चेन्नाईला परत पाठवीन अशी धमकी दिली. मी पण घाबरून क्लायंटला येत नाही असे कळवले आणि तारापुरला फोनवर बोलूनच काही माहिती घेतली आणि प्रपोजल बनवून त्यांच्या मुंबईच्या ऑफिसला पाठवले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी आमचे लटांबर (म्हणजे मी, आमचा जर्मन डायरेक्टर, बॉस आणि त्याचा बॉस (व्हीपी)) असे क्लायंटच्या ऑफिसमध्ये प्रपोजल डिस्कस करायला आणि डील फायनल करायला पोहोचलो. क्लायंटच्या लोकांनी आमची चांगलीच इज्जत काढली आणि म्हणाले की साधे तारापुरला जाऊन तुम्ही येऊ शकत नाही आणि फोन वर बोलून इतके करोडोचे प्रपोजल बनवता. त्यापेक्षा टेली मार्केटींगच करा म्हणून अक्षरशः हाकलवले. मी तारापुरला गेलो नाही म्हणून माझी चांगलीच धुलाई आणि कारण दिले तर बॉसने मी असे म्हणालोच नव्हतो. यालाच कुठे हिंडायला नको असा पवित्रा घेतला. त्यामुळे मला सर्वांची चांगलीच बोलणी खावी लागली. जर्मन कोलॅबरेटरने मी सेल्ससाठी फीट नाही असे सांगून मला नापासच केले. नोकरी जातेय की काय असे वाटायला लागले.
पण सुदैवाने माझ्या बॉसचा बॉस स्वभावाने चांगला होता. नंतर मला एकट्याला गाठून त्याने सगळी माहीती घेतली. तसे त्याला ह्या माणसाच्या पलटीमारू स्वभावाचा अंदाज होताच. त्याने नंतर मला फुल्ल गो अहेड दिले. तो म्हणाला तुला योग्य वाटेल ते कर. उगाचच याचे ऐकू नको. पण तूझ्या निर्णयाची तुलाच जबाबदारी घ्यावी लागेल. तुझा टुर रिपोर्ट याने नाही केला तर मी मंजूर करीन. मग काय मी मोकाटच सुटलो. दोन वर्षात स्वतःला छान पैकी सेट केले. सेल्समध्ये जो पर्यंत तुम्ही चांगला बिझनेस आणत आहात तो पर्यंत कोणीच तुमचे वाकडे करू शकत नाही. यामुळे माझा बॉस ही जरा माझ्याशी दबूनच वागायला लागला. तरी काही वेळा बॉसगिरी करायचा प्रयत्न करायचा पण अनुभवामुळे मी त्याला पुरून उरलो. असेच जवळजवळ दोन वर्षांनी आणखी एका मोठ्या प्रॉस्पेटकडे मी सुरतला जायला निघालो असताना मला अडवण्याचा प्रयत्न केला पण वरील अनुभवामुळे मी त्याचे न ऐकता गेलो आणि ती मोठ्ठी ऑर्डर मिळवली. माझ्या कौतूक समारंभात मात्र हा स्वतःला क्रेडीट घ्यायचा प्रयत्न करत होता. म्हणत होता की मीच याच्यामागे लागलो, त्याला पाठवले म्हणून ही ऑर्डर मिळाली. अर्थात त्यावेळी ह्याचा हा स्वभाव माहीत असलेले माझे कलिग आणि त्याचा बॉस माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते.
तो हे असे माझ्या इतर कलिगबरोबरपण वागायचा. चेन्नाईला बदली करीन अशी त्याची पेटंट धमकी होती. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा शाप म्हणून की काय पण कंपनीने यालाच चेन्नाईला बदली दिली. ह्याला जाणे शक्य नव्हते (मराठी होता + पुण्यात त्याचे घर, आई, वडील होते). त्यामुळे ह्याने ही नोकरी सोडली आणि कुठल्यातरी साध्या कंपनीची काहीतरी डीलरशिप घेऊन पुण्यातच स्थायिक झाला. ह्याच्या सेंडॉफला मात्र मी आणि माझे कलिग डोळ्यातले पाणी (न आलेले) पुसत ह्यांना आम्ही खूप मिस करू, ह्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही छान काम करतोय असे काहीतरी बरळलो होतो. नंतर आम्हा सगळयांना फोन करायचा की ह्याच्याही प्रॉडक्टचे मार्केटिंग करा, कमिशन देतो वगैरे वगैरे पण ह्याच्या पलटीमारू स्वभावामुळे कोणीच ह्याला भाव दिला नाही. काही काळाने त्यालाही हे जाणवले असावे आणि त्याचे फोन बंद झाले.

Pages