Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 08, 2006

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » मायबोलीवरची सभासद नोंदणी » Archive through May 08, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Saturday, May 06, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की, तुमच्या कडुन दुखावला जाण्यायेवढा काही मी शेळपट नाही हां! काहितरीच काऽऽय? अन माफी कसली मागता? तुम्ही केवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ! माफी मागुन आम्हाला का बरे लाजवता? बर ते जावु दे!
तुमच्या पोस्ट्स चा म्हणजे "अमेरिकेविरुद्ध काही लिहावे की नाही" अशा काही अर्थाची पोस्ट होती (मला लिन्क मिळत नाहीहे) आणि त्यानन्तर ऍडमिनने अचानक वाढलेल्या ट्रॅफिकचा लिन्क्स देवुन उल्लेख केला होता! मैत्रेयीला दिलेल्या उत्तराशी याचा सम्बन्ध हे!
तुमच्या मुळ मला काही दुखल किन्वा खुपल तर मी ते मैत्रेयीला काहुन सान्गिन? (सरळ तुम्हालाच धरीन की) DDD
आणि झक्की, तुमच्याही डोक्यात ते विषकन्येन पेरलेल वीष अजुनही भिनलेल असेल तर काही उपाय करुन घ्या... मात्र एक लक्षात ठेवा, की...
तुम्ही आमरस नी अजुन काय काय जेवला खाल्लात ज्याच्याकडे, तो वाकड्या होता (जल्ला मेला काला की गोरा ते पण ठाव नाही मला) DDD , मी नव्हे!
ज्यान्ना ज्यान्ना तुम्ही भेटलात त्यात मी नवतो! असणेही शक्य नव्हते!
माझ्याकडचे मीठ तुम्ही न खाल्याने कशाला जागायचे नि कशाला नाही ते तुमचे तुम्हीच ठरवा! दोनदोनदा उल्लेख केलात म्हणुन खणखणीतपणे लिहिल हे!
बाकी इतरवेळी, लोभ आहेच, वृद्धिन्गत व्हावा!


Robeenhood
Saturday, May 06, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहा, किती खुबीने आम्बरसात मीठ पडले होते हे दाखवून दिलेय......
मी काही बोललो की माझे तोंड दिसते आणि प्रशासकाचे खाजगी तम्बी देणारे मेल येतात.
अहह... खर्‍याची दुनव्याच नाही र्‍हायली

पुण्यात होतात काय हो काही दिवस का होईना?...

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला.........
(येथे आम्ही (ग्रेट लोक स्वताला नेहमी आम्हीच म्हणतात)किती खुबीने एका प्राणीविशेषाचा उल्लेख केलाय हे आले का लक्षात?)

छे छे तुम्हाला येथे बंदी घातल्यावर मी काय करू?


Limbutimbu
Saturday, May 06, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> पहा, किती खुबीने आम्बरसात मीठ पडले होते हे दाखवून दिलेय......
बाकी हे मात्र खर असाव हां, वाकड्याला विचारल पाहीजेल, मिठाची फॅक्टरी खोल्ली हेस का म्हणुन! DDd
बायदीवे, रॉबिनहुड, जरा पेठेत चक्कर मारुन ये! (आता बहुतेक मला पण मेल मधुन तम्बी मिळणार अस वात्तय)
DDD

Kmayuresh2002
Saturday, May 06, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालुला शंभर टक्के अनुमोदन.. असल्या आयडीजना अनुल्लेखाने मारणे हाच उत्तम उपाय:-) आणि तरिही अती प्रकार झालेच तर योग्य ती काळजी घ्यायला राज ऍडमीन आणि मॉड्सची सेना समर्थ आहेतच की शिवाय आपणही खारीच वाटा ऊचलुच की :-)

Milya
Saturday, May 06, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे समजायचे का? दिनेशना विरोध करणार्‍या प्रत्येकाचे इथे duplicate ids आहेत दिवे घ्या ~DDD

दिनेश हेतु स्तुत्य आहे तुमचा पण बाकीचे लोक म्हणतात ते पण बरोबर आहे अश्याने मायबोली नविन खरोखर चांगल्या सभासदांना मुकेल

अनुल्लेख हाच उपाय...



Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक पर्याय म्हणजे, नविन सभासदाने, आपली सगळी माहिती, जाहिर करावी. आणि शक्य झाल्यास त्याची खातरजमा करण्यात यावी.
जी जुनी टोपणनावे आहेत, त्यानी आपली पातळी कधी सोडली नव्हती, पण हल्ली हे फारच होतेय.
काहितरी ऊपाय हवाच ना करायला ?
मी दुर्लक्ष करतोच, ( खुपदा तर मला कल्पनाच नसते, असे काहि घडुन गेलेय याची. नेमस्तकानी आधीच साफसफाई केलेली असते. )
पण तरिही यांच्या हेतुबाबत शंका यावी, असे वैयक्तिक हल्ले होत असतात.


Ekanath
Saturday, May 06, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे दिनेश यांना संपूर्ण अनुमोदन!

इथे खुप लोकांच्या चांगल्या ओळखी होतात. अशा घडणार्‍या प्रकारांनी नवीन व्यक्तीवर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण होतो.

मी आधीही (समीक्षक प्रकरणाच्यावेळेस) म्हटलेच आहे, पुन्हा सांगेन की प्रशासकांनी यावर उपाययोजना करावी.

मी गेल्याकाही दिवसात जवळपास सगळे संकेतस्थळ नजरखालून घातले आहे. हा विषय आधीही बर्‍याच मार्गांनी येऊन गेल्याचे दिसते. अशा प्रकारांना प्रतिबंध करावा, असे अनेकांचे मत असल्याचे दिसते. परंतु, काही तिच तिच मंडळी, असे करण्यात अर्थ नाही, असे सुचवत आहेत.

पण बहुसंख्य जनता तत्वतः या उपाययोजनेला पाठिंबा देईल, असे अन्य चर्चांवरून दिसते.

धन्यवाद.


Asami
Saturday, May 06, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी खातरजमा करणे एका non-profit org ला कितपत practical होईल ?

eknaath मी मिल्या आम्ही जवळजवळ 6-7 वर्षे HG वर आहोत. असे प्रकार होतच असतात. त्यांची intensity कमी जास्त होत राहते but they do not prevail ह्यात काहीतरी असेल ?


Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण असामी, खरी माहिती देण्याची सक्ती तर असावीच, असे मला वाटते. मुळातच ज्याला खरी माहिती लपवायची आहे, त्याच्या हेतुची शंका येते. मी जेंव्हा सभासद झालो, तेंव्हा बहुतेकानी खरी नावे दिली होती.
आता मुद्दाम विचित्र टोपणनावे घ्यायची पद्धतच पडुन गेलीय.
ईथले अनेक पत्ते खोटे आहेत, हे तर सहजच कळते.
खातरजमा, आपल्यापैकी कुणालाहि करता येईल.


Milya
Saturday, May 06, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण असामी, खरी माहिती देण्याची सक्ती तर असावीच >>> पण दिलेली माहिति खरेच खरे आहे की नाही हे कसे तपासणार? आसाम्या म्हणतो तसे non profit organization ला ते शक्य होइल असे वाटत नाही..

मुळातच ज्याला खरी माहिती लपवायची आहे, त्याच्या हेतुची शंका येते. >>> एकदम पटले अश्या लोकांच्या हेतुची शंका येते.. पण सर्वजण काही वाईट हेतुने आपली identity लपवत नाहीत. काहीजण सुरक्षिततेचा एक उपाय म्हणून तसे करतात. मी ह्या बाबतीत एक पथ्य पाळायचा प्रयत्न करतो. ज्यांची identity संशयास्पद आहे त्याच्याशी शक्यतो कुठला संवाद साधत नाही किंवा त्यांना उत्तरे देत नाही.. माझ्याकडुन एक प्रकारे बहिष्कारच

कारण अश्या लोकांशी वाद घातला तर ते जास्त चेकाळतात त्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष न दिलेलेच उत्तम

नविन सभासदांवर अशी बंधने घातली तर आपला स्वर्थ साधला जाइल पण आपण आलो आत सहज आता दुसर्‍यांना इतक्या सहज आत येउ द्यायचे नाहि असा प्रकार होईल असे वाटते

एकनाथजी तुम्ही हे विसरत आहात जी जुनी तीच ती मंडळी विरोध करत आहेत त्यांनी पूर्वी ही भूमिका घेतली असती तर तुम्हिही आज येथे नसतात...
खरे तर व्यक्तीश्: मला ही आवडेल फ़क्त authenticate लोकांनाच इथे प्रवेश द्यायला पन मग वरचे सगळे मुद्दे त्या आड येतात... म्हणुनच मी दिनेशना त्यांचा हेतु चाम्गला आहे असे म्हनले पण...


Lopamudraa
Saturday, May 06, 2006 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु... अशे विषय हाताळायची(?) इतकी हौस आहे... तर id लपवुन कारे.... समोर येउन वार करायचा....

Dineshvs
Sunday, May 07, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मिल्या, मी पण हे सुरक्षिततेचे कारण ऐकले आहे. पण नाही पटले ते.
पण यातुन खरेच मार्ग निवडला पाहिजे. हवी तर अशी माहिती Admin कडे गुप्तपणे असू दे. पण मायबोलिकडे ती असायलाच हवी.



Ekanath
Sunday, May 07, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांची intensity कमी जास्त होत राहते but they do not prevail ह्यात काहीतरी असेल ?

महोदय (तुमचे नाव छानच आहे, मीही पुलंचा भक्त आहे!:-) )

तुमचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे माझा विरोध कुचकामी असेल, पण असे प्रकार वारंवार का होतात? हे पहाणेही जास्त संयुक्तिक ठरत नाही का? वारंवार काय झाले याची मला कल्पना नाही. पण माझ्यासमोर घडलेले उदाहरण म्हणजे "समिक्षक". ह्याने विनाकरण अनेकांवर राग काढला आहे? (तो कदाचित प्रवीण महाजन चा clone असावा!) ह्यातून अनेक कवी आणि लेखक दुखावले गेलेच ना? असे प्रकार व्हावेतच का? असा मलाप्रश्न पडतो.

म्हणजे आज एक गप्प बसला उद्या उठून दुसरा आणखी काही तरी करणार, परवा तिसरा. ह्यात तुम्ही म्हणता तसा एका प्रकरणाला अंत असला तरी ह्या प्रकाराला शेवट नाही, हे पटते का?

तेंव्हा हे प्रकार होऊ नयेत म्हणूनच काही उपाययोजना कराव्यात, या दिनेश च्या मागणीला माझे संपूर्ण अनुमोदन आहे.

धन्यवाद.


Ekanath
Sunday, May 07, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांनी पूर्वी ही भूमिका घेतली असती तर तुम्हिही आज येथे नसतात... ----

माफ करा, मला असे वाटत नाही. authenticity सिद्ध करण्याची कसोटी लावावी, हा दिनेशचा आग्रह आहे,(आणि माझे त्याला अनुमोदन आहे.) नवीन सभासद नोंदणी बंद करावी असा नाही.

Milya
Sunday, May 07, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकनाथजी पन कसोटी काय लावावि ते तर सांगा..

just एक उदाहरण म्हनुन तुमचेच उदाहरण घेतो...
तुमच्या profile प्रमाणे तुम्ही एकनाथ फडके गुलबर्गा ५८५१०३ आहात. register करताना तुम्ही अजुन माहितीही दिली असेल पण ति खरी आहे हे admin कश्याच्या आधारावर ठरवणार... म्हणुन मी असे म्हणले होते की आधीच हा नियम आला असता तर तुम्हिही इथे नसतात... माझा दुसरा काहि उद्देश नव्हता त्यात

मायबोलीवर register करायला काय लागते?

username पडीक
password
full name मिलिंद जोशी
email address :
milindjoshi2006@yahoo.com
postal address : २५ सदाशिव पेठ, पुणे ३०
city पुणे
state, country
zip ४११ ०३०
M/F male

आता ही माहिती पूर्ण खोटी आहे हे कसे prove करायचे?


Dineshvs
Monday, May 08, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, आता आपले सभासद जगभर आहेत, मग एखाद्या सदाशिव पेठेतल्या माणसाला, मिलिंद जोशी हि व्यक्ती अस्तित्वात आहे कि नाही, हे तपासणे काय अवघड आहे ?
काय आहे ना या मुक्त व्यासपिठावर तुम्हाला मते मांडायची आहेत. जमतील तितके वाद घालायचे आहेत. ईथुन मिळतील तितके चाहते वा शत्रु मिळवायचे आहेत. पण स्वत : मात्र गुप्त नावाने वावरायचे.
म्हणजे ईतरांवर वार करा, पण स्वत : ची चामडी वाचवत रहा.
पटत नाही हे यार !


Ekanath
Monday, May 08, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"एक उदाहरण" म्हणून तुम्ही खुद्द प्रशासकांचे उदाहरण घेतले तरी माझी हरकत नाही. पण माझ्याबाबत मी २ गोष्टी सांगू शकतो.
१. असा काही नियम झालाच तर माझ्या अस्तित्त्वाची सत्यता पटवण्यासाठी आवश्यक ते करणारा मी पुढाकार नक्कीच घेईन.
२. जेंव्हा मी एखादी मागणी करतोय तेंव्हा तिला अनुसरून माझे वागणे ठेवण्याची तयारी माझी असते.

"कसे करायचे" हे सांगण्याइतके ज्ञान माझ्याकडे नाही. ह्या विषयातले ज्ञान असते तर जरूर काही उपाय सुचवण्याचे प्रयत्न केले असते!


Limbutimbu
Monday, May 08, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> लिंबु... अशे विषय हाताळायची(?) इतकी हौस आहे... तर id लपवुन कारे.... समोर येउन वार करायचा.... लोपामुद्रा... नो कॉमेण्ट! बट... वार करणे म्हन्जे लक्ष्मीरोडवर जाऊन लिम्बीला पाचवार, सहावार, नऊव्वारि पातळ आणण्यायेवढ सोप नसत ग! आणि कुणावर करतो मी वार?
मला फक्त एक सान्गा की मी माझी आयडेन्टीटी लपवतो हे! त्यामुळ कुणाला काय भलाबुरा फरक पडतो हे? सोदाहरण स्पष्ट करा!
ज्या उपद्रवी आयडीज येतात, इथले प्रशासन योग्य ती कारवाई करतेच करते असा आजवरचा अनुभव हे! मग विनाकारण ओरड कशाला?
ऍट एनी कॉस्ट, मला माझी वैयक्तिक ओळख द्यायला आवडणार नाही, कारणे काहीही असतील, मला माझ वैयक्तीक खाजगी आयुष्य आणि येथिल आयडी यान्च्यात सरमिसळ होवु द्यायची नाही हे! माझ खाजगी आयुष्य त्यातल जगण वेगळ आणि डिजिटल विश्वातली माझी आयडी वेगळी!
मी पुर्वीही सान्गितल होत, अनेकानेक कविन्नी लेखकान्नी टोपणनावाने लिखाण केल हे! टोपण नावाने वृत्तपत्रिय लिखाण तर आजही अनेकजण करतात, वाटल तर ओळख उघड करतात अन्यथा नाही! आणि काही लेखन टोपणनावाने देखिल करायचे नसल्यास वृत्तपत्रे देखिल अशी वाक्य रचना करतात की "विशेष प्रतिनिधिकडुन" किन्वा "विशेष सुत्रान्कडुन असे समजते की" वगैरे! अर्थात ते काय करतात हा त्यान्चा प्रश्ण पण ओळख लपवुन लेखन करणे किन्वा वावरणे हा प्रकार म्हन्जे काही गुन्हा नाही, आणि तो नविनही नाही!
किम्बहुना, सुरक्षेच्या कारणासाठी डिजिटल विश्वातल्या सार्वजनिक फोरम मधे आपली ओळख पुर्णपणे देऊच नये अशा मताचा मी हे! त्याला कुणी भेकड म्हणुदे किन्वा अन्य काही!
:-)

Gajanandesai
Monday, May 08, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका मराठी गाण्याच्या lyric करता शोधाशोध करताना मला मायबोली सापडली. ती ब्राऊज केल्यावर मला 'मायबोलीकर' व्हावेसे वाटले. तेव्हा मी इथल्या एकाही सभासदाला ओळखत नव्हतो. शिफारस जारी केल्यावर माझ्यासारख्या मायबोलीकर होऊ इच्छिणार्‍या अशा अनोळखी व्यक्तींनी काय करायचे?

मायबोलीचे सभासदत्व मिळवण्यासाठी त्या इच्छुक व्यक्तिला आपली सगळी खरीखुरी माहिती देण्याची सक्ती कशासाठी? काही कारणांमुळे (व्यक्तिगत / व्यावसायिक - जी दुसर्‍याला पटतीलच असे नाही) एखाद्याला आपली माहिती उघड करणे योग्य वाटत नसेल तर त्या व्यक्तिला सदस्यत्व न घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का? किंवा मायबोलीवर दिलेल्या त्या खर्‍या माहितीचा दुरुपयोग केला गेल्यास त्याला जबाबदार कोण?

दिनेश, तुम्ही म्हणता तशी माहितीच्या सत्यासत्यतेची पडताळणी करणे व्यवहारात कितपत शक्य आहे? एखाद्याने आपली खरी माहिती देऊनही काही अनुचित प्रकार केला तर त्याच्यावर काय कारवाई केली जाणार? पुन्हा, एवढा वेळ कुणाकडे आहे?

वरच्या पोस्टस् वाचल्यावर हे काही प्रश्न पडले.
मिलिंदा, कूल, लालू, स्तोरवी, असामी, मिल्या, रॉबीन यांची मते पटली.

असे अनुचित प्रकार करणार्‍या सभासदाचे सभासदत्व block करून त्याच्या इन्टरनेट कनेक्शन वितरकाला तशी सूचना करून अशा प्रकाराला आळा घालणे शक्य होईल का यावर इथल्या तज्ज्ञांची मते वाचायला आवडतील.


Peshawa
Monday, May 08, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते माय्बोलिवरील profile हे फ़क्त fake च असले पाहिजे अगदि नियमानी खरि माहिती देणार्यास दंड करावा!

ज़्याना खरी माहितिची देवाण घेवाण करायची आहे त्यांच्या साठि इतर मर्ग उपल्ब्ध असतातच!

उगाच duplicate ID मुळे होणारे मन्स्ताप होताहेत ते टळतील!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators