|
Zoom
| |
| Monday, May 08, 2006 - 2:20 pm: |
| 
|
गजानन तुझ्या मताशी मी पुर्ण सहमत आहे. फक्त मायबोलीपुरतच बोलायच झाल तर, असे अनुचित प्रकार करणार्या सभासदास admin एक / दोन वेळा warning देऊ शकतात आणि तरीही अशे प्रकार बंद झाले नाहीत तर त्या सभासदाचे सदस्यत्व रद्द करावे अस मला वाटत.
|
दिनेश अहो तुम्ही म्हणताय ते किती अवघड नव्हे अशक्य आहे! असे प्रत्येक new registration request नन्तर घरी जाऊन खातरजमा? त्याला लागणारा वेळ आणि श्रम खर्च करायला कोण दर वेळी तयार होईल? तुम्ही सदाशिव पेठे चे उदाहरण घेतलेत ते तरी बरे पण होनोलूलू,बोटस्वाना अशा ठिकाणचा पत्ता असेल तर? कशी करणार खात्री? आणि मुळात ही एक Internet community आहे याची जाणीव सर्वांनीच ठेवावी. लोकांना खरी माहिती देण्याची जबरदस्ती का? तसा अधिकार आपल्याला आहे असे नाही वाटत. खरी ओळख न देणे याची कारणे अनेक असू शकतात, केवळ वाईट हेतू हे फ़ार कमी वेळा आढळते पण इतर कारणे म्हणजे (जी जास्त common अहेत)सुरक्षितता हे कारण असू शकते(आणि ते genuine कारण आहेच), काही वेळा ओळख न देता आपला एखादा गंभीर problem लिहायला जास्त मोकळेपणा वाटत असू शकतो. त्यापेक्षा जेव्हा एखाद्या युजर चा उपद्रव दिसेल तेव्हाच काय ती (शक्य असेल ती) action घेणे हाच पर्याय बरा वाटतो.
|
Dineshvs
| |
| Monday, May 08, 2006 - 5:14 pm: |
| 
|
मी घरी जा असे कुठे म्हणालो ? होनालुलु, आणि बोट्स्वाना हे तर माहितीतले देश आहेत. पण तिथले सभासद किती आहेत. पुर्वी खरेच असे नव्हते, बरिच नावे टोपणनावे असली तरी त्यांचे खरे नाव प्रोफ़ाईल मधे असायचेच. वाईट हेतुच हल्ली जास्त वेळा दिसतो. सुरक्षिततेचा मुद्दा मला अजिबात पटत नाही. टोपणनावाने लिहिणारे लेखक हि पुर्वी फ़ॅशन होती, कालांतराने त्यांची खरी नावे ऊघड झालीच, यात ठणठणपाळ सुद्धा आले. आणि खुप वेळा मॉडरेटर्स चे लक्ष जायच्या आधीच हि मंडळी चिखलफेक करुन निघुन गेलेली असतात. तुमचे काम हल्ली वाढलेय, असे नाही वाटत ? Admin च्या चांगुलपणाचा गैरफायदाच जास्त घेतला जातो. जर परखड मत मांडायचे तर सुरक्षिततेची ढाल कश्याला ? शहानिशा नंतरची गोष्ट, प्रोफ़ाईलमधे माहिती देण्याची तर करा सक्ती, मग बघु.
|
Chafa
| |
| Monday, May 08, 2006 - 6:47 pm: |
| 
|
अजिबात पटलेलं नाही दिनेश. इथे दिलेली माहीती जोपर्यंत जगातल्या कुठल्याही व्यक्तिला विनासायास दिसू शकते तोपर्यंत अशी माहीती देणे इथे सक्तीचे केले तरी मी ती नक्कीच देणार नाही. आणि मुळात जोपर्यंत कोणी मर्यादेचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने अनामिक राहीले तर इतरांना काय त्रास आहे? Privacy हा वैयक्तिक विषय आहे; कोणाला त्यांची ओळख कोणालाही देण्यात अडचण वाटत नाही, कोणी ठराविक लोकांनाच आपली ओळख देतील तर बाकी उरलेल्यांना ती माहीती कोणालाही द्यावीशी वाटणार नाही. मुळातच ज्याला खरी माहिती लपवायची आहे, त्याच्या हेतुची शंका येते. >>> हे सरळसओट विधान म्हणजे नुसते हास्यास्पदच नव्हे तर अपमानास्पदही आहे. मला इथे येऊन साडेचार वर्षं होऊन गेली आणि माझा एकही duplicate id नाही. पण मी माझी खरी माहीती लपवली म्हणजे माझा हेतू चांगला नाही म्हणून? मला ज्यांना ही माहीती द्यावीशी वाटली अशा अनेकांना ती दिलेली आहे (आणि त्यांनी मला). पण त्यातल्या कोणी चूकूनही ती माहीती इथे प्रसिद्ध केलेली नाही (किंवा मी त्यांची). तेव्हा आपली माहीती कोणाला द्यायची याचा निर्णय आपला असणे म्हणजे हेतू वाईट? आणि पूर्वी म्हणजे कधीचे म्हणताय तुम्ही दिनेश? मी इथे आल्यापासून खरे नाव न देणारेच लोक मी इथे जास्त पाहीलेत.
|
Storvi
| |
| Monday, May 08, 2006 - 8:40 pm: |
| 
|
मला तर वेगळाच प्रश्ण पडतो आहे. मायबोली हे विरंगुळ्याचे, आपापल्या प्रतिभांना रूप द्यायचे ठिकाण आहे. कधी कधी heated debates करायचे तर कधी फ़ालतु गप्पा मारायचे... एखाद्या गावाचा पार असतो तसा. कोणचे moral policing करायचा आपल्याला काय अधिकार? एखादी गोष्ट आपल्या(बहुतांश लोकांच्या) द्रुष्टीकोनातुन अश्लील असली तर काढुन टाकावी. त्याहुन अधिक काही करावे असे मला तरी वाटत नाही. शेवटी हा online forum आहे. शिवाय हा काही इतका सोपा उपाय नाही. जर का लोकांना block करणे इतके सोपे असते, तर शाळकरी मुलांवर लक्ष ठेवणार्या वाईट प्रव्रुत्तीच्या माणसांना मुलं जिथे frequently visit करतात त्या साईट्स पासुन लांब ठेवता आले असते. पण तसे करता येत नाही म्हणुन पोलीस आणि आइ-वडील यांना सतर्क रहावे लागते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 09, 2006 - 4:17 pm: |
| 
|
चाफा, प्रोफ़ाईल नंतर बदललेय का ? मी त्यापुर्वीचे म्हणत होतो. :-D खरी माहिती ईथे होती तेंव्हाचे. Storvi मी मायबोलिला कधीच फालतु गप्पा मारण्याचे ठिकाण मानले नाही. मी कधी त्या मारल्याहि नाहीत. असो आदर्श मी पुढे ठेवलाय. माना वा मानु नका.
|
Yog
| |
| Tuesday, May 09, 2006 - 7:24 pm: |
| 
|
दिनेश, well said.. aggree with you completely!
|
Peshawa
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:19 pm: |
| 
|
Infact I request ADMIN to put notice on the personal information page similar to one on the Bhawishya BB...
|
Yogibear
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:58 pm: |
| 
|
आत्ताच एकदम सभासदांची खरी ओळख पटावी ह्याची गरज का उदभवली? जे आहे ते काय वाईट आहे?
|
Asami
| |
| Wednesday, May 10, 2006 - 3:29 pm: |
| 
|
YB तुझा तोंडओळखचा अनुभव लिही रे
|
पेशवा, १०० टक्के सहमत! योगी, प्रश्ण रास्त हे! असामी, हे तोन्डओळख म्हन्जे काय GTG चाच प्रकार हे ना? चाफा, पटल! माझ्या पुरत बोलायच तर गेल्या साली कोणा एक मेल / फ़िमेल आयडीने माझ्यावर घणाघाती घातपाती हल्ला चढविला होता! तरीही, त्या आयडीमागे कोणाच की कितिकान्ची कोणकोणती टाळकी हेत हे जाणुन घ्यायची मला काडीचीही गरज वाटली नाही, याचे सर्वात महत्वाचे कारण मी येथिल आयडीन्शी सन्वाद साधत असतो.. आयडीमागिल व्यक्तिमत्व काय हे कस हे त्याच जेन्डर काय, त्याचे शिक्षण किती, त्याची अर्थिक स्थिती कशी, तो करतो कय, त्याचे कुटुम्ब काय हे प्रश्ण माझ्या दृष्टीने अनावश्यक हेत! मायबोलीवरील आयडीज हे एक कुटुम्ब मानले तर आयडीमागिल भौतिक वास्तव माहित करुन घ्यायची गरज काय? अन ज्यान्ना माहीत करुन द्यायचे असते ते ते एकमेकान्शी वेगवेगळ्या प्रकारे सन्वाद सम्पर्क साधुन असतातच की, शिवाय काही उत्साही मायबोलीकरान्मुळे GTG सारखे कार्यक्रमही होत असतातच जिथे ज्यान्ना उघडपणे ओळख दाखवायची हे ते दाखवितातच! पण ज्यान्ना आपली वास्तव ओळख, कोणत्या का कारणाने असेना, उघड करायची नाही त्यान्च्या वर कोण कशी काय सक्ती करु शकेल? अन तशी सक्ती झाली तर मायबोली चे स्वरुप म्हन्जे एक निवडक लोकान्चा कम्पू असे होणार नाही का? 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|