|
Princess
| |
| Tuesday, November 20, 2007 - 10:17 am: |
|
|
ग्लास पुन्हा भरताना हिंदी चॅनलवर "ये बंधन तो प्यार क बंधन है" सुरु झाले आणि खटकन बंदही झाले. "बंधन... माय फूट" असे बरळत आणि हातातला बीअरचा ग्लास टीपॉयवर ठेवत रसिका धडपडत म्युजिक सिस्टमचा रिमोट शोधायला उठली. असे एकटे एकटे वाटताना पिणे आणि पिता पिता गाणे ऐकणे भयंकर आवडायचे तिला. कोणी तिच्या पिण्याबद्दल बोलले तर तडक उत्तर मिळायचे "बीअरमध्ये कुठे आहे नशा... ती तर त्या गुलाम अलीच्या गजलेने चढवलीये". दारु पिता पिता ऐकता यावे म्हणुन तिने एक स्पेशल सीडी बनवली होती. गझल्स, दर्दभरे गीत वगैरे वगैरे... "चुपके चुपके रात दिन" सुरु झाले आणि पुन्हा पिता पिता रसिकाच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागलेत. ही गझल तिची खुप आवडती होती बीअर घेताना तर हमखास आवडायची आणि बर्याचदा जुन्या नकोशा आठवणीना डोळ्यातून वाट करुन देताना याच गझलेने तिला आधार दिला होता. रसिकाचा आठवणींचा डेली डोस सुरु झाला. झरझर मन जाऊन पोहचले गिरगावाच्या चाळीत. दोन वेण्या बांधलेली, गालाला नाजुक खळ्या पडणारी एक छोटी धावतच घरात शिरली आणि आप्पांचा कडाडण्याचा आवाज आला "काही शरम आहे की नाही? मुलीच्या जातिने सातच्या आत घरात यावे आणि पावलाचा आवाजही यायला नको. हे पळणे, उड्या मारणे शोभत नाही. पुन्हा असे केलेस तर पट्ट्याने पायावर मार देईल." रसिकाने घाबरुन एकदा आप्पांकडे पाहिले आणि आतल्या खोलीत आईजवळ जाऊन उभी राहिली. मागच्याच महिन्यात दिलेला पट्ट्याचा मार तिला अजुनही लक्षात होता. कदाचित आयुष्यभरासाठी लक्षात राहणार होता. पायावरचे व्रण एक महिन्यानंतरही तसेच होते आणि मन... ते तर स्वप्नातही आप्पाना घाबरुन असायचं. तिच्या मनात आले "भुतकाळ... भुतासारखा सतत आपल्या मानगुटीवर बसतो म्हणुन त्याला भुतकाळ म्हणत असावे का?" हातातला ग्लास घरंगळत खाली गेला. क्रमश:
|
वा कथा एकदम जोरात आहे, पूनम लव्कर लिही..
|
Aashu29
| |
| Tuesday, November 20, 2007 - 4:28 pm: |
|
|
पुनम वाचतेय गं, छान चालु आहे!
|
Rashmee
| |
| Tuesday, November 20, 2007 - 7:01 pm: |
|
|
पूढचा भाग लवकर येओ द्या!
|
Akhi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:44 am: |
|
|
सुरवात तर जबरी झाली आहे.....
|
Anaghavn
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:58 am: |
|
|
Pincess सकाळी सकाळी मस्तच वाचायला दिलेस. पण आता लवकर लवकर येऊ देत वाट पहातेय. अनघा
|
Meggi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:33 am: |
|
|
princess वाट बघतेय पुढच्या भागाची.. छान लिहिते आहेस तू..
|
Princess
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:34 am: |
|
|
सखाराम जोशी उर्फ आप्पा त्यांच्या स्वभावामुळे चाळीत आवडते होते. मदतीचा हात द्यायला सदैव तत्पर असणारे आप्पा पोस्टात नौकरी करायचे. सगळेच गुणदोषानी युक्त असतात तसेच आप्पाही होते. त्यांचा स्त्री म्हणजे चुल आणि मुल यावर पक्का विश्वास होता. अतिशय कर्मठ कुटुंबात वाढल्याचा परिणाम असावा की ज्यामुळे त्यांना मुलगी म्हणजे एक जबाबदारी वाटायची. "मुलीच्या जातिला" हा त्यांचा आवडता वाक्प्रचार जो रसिकाला दिवसातून शंभर वेळा तरी ऐकावा लागायचा. चाळीतल्या मुलीनाही आप्पांची भितीच वाटायची. सूर्यास्तानंतर झिम्मा करणाऱ्या पोरींकडे ते पोस्टातून येताना असे कटाक्ष टाकत की सगळ्या खारुताई सारख्या गप्पकन झाडामागे लपत. गिरगावातून मराठी माणुस नुकताच हद्दपार व्हायला सुरुवात झाली होती. आप्पांच्या चाळीतही नवे चेहरे दिसायला लागले होते. लुंगीवाले मद्रासी, मासेखाऊ बंगाली लोकानी पण त्यांच्या चाळीत शिरकाव केला होता. शेजारच्या बंगाल्याच्या घरातला माश्याचा वास गिरगाव ओलांडुन अख्ख्या मुंबईत पसरला होता. नाकावर रुमाल घट्ट दाबुन आप्पा घरात शिरले ते पुटपुट करतच "शिव शिव... हे देवा रोजचे असे अभक्ष्य भक्षण... शिव शिव" त्याना आलेले बघताच माईंनी पाण्याचा पेला पुढ्यात ठेवला. पाणी पिताना त्यानी स्वयंपाकघराकडे कटाक्ष टाकला. आत रसिका स्वयंपाकाला मदत करत होती. "माई, पोरीनी सासरी नाव काढावे अशी अन्नपुर्णा बनवा तिला." माईनी पेला उचलत मान डोलावली. "म्हणे अन्नपुर्णा बनवा... मला रोझी सारखे नर्स बनायचय" रसिका हळुच पुटपुटली. तसे माईनी तिच्याकडे पाहुन डोळे वटारले. रसिका.. माई आप्पांचे एकुलते वाचलेले अपत्य. तिच्यापाठी झालेले सगळे भावंडे जन्मत:च गेली. आप्पांना या गोष्टीसाठी सुद्धा रसिकाचा मनातून राग यायचा. मुलगी आणि त्यातुन अवलक्षणी असच त्यांच्या मनाने गृहित धरले होते. तिचा गोरा गोमटा रंग, लांबसडक केस, गालाला पडणाऱ्या खळ्या, टप्पोऱ्या डोळ्यातली नाजुक भिरभिर... कशाकशाने आप्पांचा तिच्यावरचा राग कमी झाला नव्हता. चाळीत रसिका सगळ्यांची आवडती. चिउताई सारखी चिवचिवत असायची. चाळीतल्या ताई, दादा लोकांच्या वह्या पुर्ण करुन देणे, छोट्या पिल्लाना शुभं करोती शिकवणे सगळे काही अगदी मनापासुन करायची. तिचे निरागस बालपण तर जणु आप्पांच्या कठोर बंधनात आवळले गेले होते. आता हेच पहा ना, गेल्याच महिन्यात रसिका आप्पा घरात नसताना शेजारच्या कुसुमचे घुंगरु बांधुन नाच करत होती. आणि अचानक आप्पा घरी आलेत. कोणाला काही कळण्याच्या आत आप्पानी कमरेचा पट्टा काढुन तिला मारायला सुरुवात केली. तिला वाचवायला पुढे आलेल्या माईनाही फटक्यांची शिक्षा मिळाली. शेवटी दाराजवळ जमलेल्या चाळीतल्या पुरुषांनीच त्यांना शांत केले. पण त्यादिवसानंतर रसिकाचे हसणे हरवले ते हरवलच... आणि मन झाले बंडखोर. क्रमश:
|
Akhi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 8:58 am: |
|
|
मस्त पुनम!!! पुढच post कधी
|
Princess
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:58 am: |
|
|
"माई, ऐकलत का... उद्याच बोलवलय मी मंडळीना. रसिकासाठी याहुन उत्तम स्थळ मिळणार नाही बघा." आप्पा दोन हाताच्या लाकडी खुर्चीत बसत बोलले. "आहेत कोल्हापुरातले... पण मुलगा नौकरीला मुंबईत आहे. आमच्या कार्यालयातले देशपांडे... हं त्यांचाच भाचा आहे.सरकारी नौकरी आहे, निर्व्यसनी आहे" आप्पा काय बोलताय हेच माईंना उमजत नव्हते. मागच्याच महिन्यात पोरीनी पंधराव पुर्ण केले. जरा बदलत्या काळाप्रमाणे एखाद दोन वर्षे अजुन तरी लग्नाची घाई नव्हती. शेवटी धीर करुन त्या बोलल्याच "पण मी म्हणते, जरा काळाप्रमाणे..." "काळाप्रमाणे... अहो हा काळच घात करणार नव्या पिढीचा. पोरीना लवकर उजवुन मुक्त व्हावे सगळ्यानी. तिने नवऱ्याच्या घरात जाऊन वाटेल तो धिंगाणा घालावा, माझी ना नाही." असे बोलुन आप्पा ताडताड जिना उतरुन दामल्यांच्या घरी गेलेत. स्वयंपाक घरात रसिका सगळे काही ऐकत होती. तिच्या कोवळ्या स्वप्नांना तिलांजली देण्याची वेळ आली होती जणु. पण माईनी तिच्याशी काही बोलण्याच्या आतच रसिका उठली आणि आप्पांसारखीच ताडताड जिना उतरुन तिने दामल्यांचा दरवाजा ठोठावला. "आप्पा, तुम्ही हे जे काय करताय ते बरोबर नाही. मला अजुन शिकायचय... शिकायचय मला." आणि तिचे सगळे उसने अवसान गळुन ती जोरजोरात रडायला लागली. दामल्यानी सगळ्या चाळीने तमाशा बघण्याच्या आधीच तिला आत घेउन दरवाजा बंद केला. हमसाहमशी रडत ती म्हणाली "काका, लग्नाचे वय झालय का माझे... जग बदलतय पण आप्पा बदलायला तयार नाहीत. मुलीच्या जातिने सातच्या आत घरात हे बदलतय ना, काका " "आप्पा काय म्हणतेय रसिका... लग्न?" दामल्यानी विचारले "अहो चांगले स्थळ आलय, ते असे हातातून जाऊ देउ का? बाप आहे मी तिचा. चार पावसाळे जास्त बघितलेत तिच्या पेक्षा. तिने नवऱ्याच्या घरी जाऊन शिकावे, ना नाही" आप्पानी विरोध प्रकट केला. विरोध कसला तो अंतिम निर्णयच होता. दामल्यानाही वाद घालण्यात काही अर्थ नाही, हे कळुन चुकले. रसिकाने चाळीतल्या उंबराखालच्या देवाला जाताजाता हात जोडलेत "देवा, तूच कर्ताकरविता. आप्पांच्या शब्दाला आयुष्य दे आणि नवऱ्याघरी गेल्यावर मला शिकण्याचे स्वातंत्र्य मिळु दे." तिचे सदैव भिरभिरणारे डोळे मिटुन घेताना अगदी करुण दिसत होते. क्रमश:
|
Princess
| |
| Wednesday, November 21, 2007 - 10:00 am: |
|
|
लोपा, आशु, अखि, अनघा, मेग्गी सगळ्यांचे धन्यवाद. पुढचे भाग पण पटकन पोस्ट करेनच
|
Rajya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 11:48 am: |
|
|
राजकुमारी मस्तच काहीतरी भन्नाट वाचायला मिळणार असे वाटते
|
राजकन्या, छान वेग आलाय कथेला, लवकर येऊ दे पुढचे भाग. सुरुवात छान झालिये आणि नंतरच्या भागांमुळे "आता काय" अशी उत्सुक्ता सुध्धा!
|
Akhi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:21 pm: |
|
|
wow मस्तच!!! छान छान पोस्ट बद्दल आणि लवकर लवकर टकल्या बद्दल
|
Anaghavn
| |
| Thursday, November 22, 2007 - 5:03 am: |
|
|
सगळ्यात आधी धन्यवाद!लवकर वाचायला दिल्याबद्दल!! राजकन्ये,जीयो.मस्तच चाललंय. माणूस लोकांना कितीही मदत करणारा असला तरी एखाद्याचं आयुष्य (त्यातही बालपण) असं करपऊन टाकण्याचा अधिकार कोणाला नसतो. तो बाप असो, नवरा वा अजून कोणी. खुप राग येत होता त्या आप्पाचा. अर्थात हे तुझं कौशल्य! वाट पहातेय.... अनघा.
|
Princess
| |
| Thursday, November 22, 2007 - 7:40 am: |
|
|
तुकाराम कोल्हापुरातला. एक हुषार, होतकरु तरुण. घरी बागायती शेती. पैसा अडका भरपुर पण शेतीत त्याचे मन कधीच रमेना. शाळा शिकलो तरच यातुन बाहेर पडता येईल हे त्याला माहिती होते. सातवीची परिक्षा झाल्याबरोबर पोस्टातली नौकरी पटकावली आणि मुंबईत आला. सुरुवातीचे दोन तीन वर्षे आजी सुद्धा सोबत होती. पण तिच्याने नंतर स्वयंपाक होईना तब्ब्येतीच्या पण कुरबुरी सुरु झाल्यात मग कोल्हापुरला परत गेली. खाण्यापिण्याचे खुपच हाल होऊ लागलेत. घरुन आई बापही लग्नासाठी तगादा लावुन होतेच. त्याच वेळी देशपांड्यांनी रसिकाचे स्थळ सुचवले. तुकारामाला शिक्षणाची भारी आवड. अट एकच होती लिहिता वाचता येणारी मुलगी हवी. रसिका त्याच्या अपेक्षेतली मुलगी ठरली. लग्न होऊन रसिका तुकारामच्या घरात आली आणि संसाराचा गाडा सुरु झाला. सुरुवातीचे काही दिवस कोल्हापुरला राहुन रसिका नवऱ्याच्या मुंबईच्या घरी परत आली. स्टेशनवर उतरताच तुकाराम रसिकाला म्हणाला "रसिका, प्रवासाने थकली असशील ना तू. आजच्या दिवस तू आप्पांच्या घरी जाऊन आराम केलास तरी माझी काही हरकत नाही. उद्या ऒफिसमधुन येताना मी गिरगांवातून तुला घेऊन येईन." "नाही.. नको... मला नाही जायचय." तिच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहुन तुकारामने विचारलच "का? तुला भेटायच नाही का त्यांना?" "नाही. पुढच्या आठवड्यात जाऊन येईन. आज मला "आपल्या घरी" जायचय." तिचे बोलणे ऐकुन तुकारामला बरे वाटले. घरी पोहचताच रसिका कामाला लागली. तिच्या हाताला जणु देवाचे वरदान होतं. दोन तासात सगळे घर लखलख करु लागले. "रसिका, हे माझेच घर आहे; यावर माझा विश्वास बसत नाही. माझे आयुष्यही तुमच्या सहवासाने असच चमकावं." भावुक होऊन तुकारामने रसिकाला जवळ घेतले. रसिका काहीही न बोलता त्याच्या मिठीत कितीतरी वेळ मुग्ध होऊन उभी राहिली. "रसिका, तुला एक सांगु... मला शिकली सवरलेली बायको का हवी होती?" "का?" "कारण, माझा स्त्री शक्ती वर खुप विश्वास आहे. स्त्री आपला देश पुढे नेउ शकते असं मला वाटतं." "खरच?" मनोमन रसिकाने देवाचे आभार मानले. ही संधी दवडुन चालणार नव्हते. "मग आज तुमच्याकडे एक मागणे मागु?" "अगदी खुश्शाल माग." "मला अजुन शिकायचय. नर्स व्हायचय मला. लोकांची सेवा करायचीय. खरतर इच्छा नसताना मी लग्नाला होकार दिला." आणि तिने लग्नाची सगळी कथा तुकारामाला ऐकवली. आप्पांच्या बंधनात कसे तिचे पंख आवळले गेलेत हे सांगतांना तिचे अश्रु अनावर झालेत. तुकाराम सगळे ऐकुन झाल्यावर तिला म्हणाला "रसिका, नर्सचं काय तू डॉक्टरकीचे शिक्षण घे. माझा पाठिंबा आहे तुला." तिच्या पाठीवर आश्वासक हात फिरवत त्याने तिच्या मनातल्या सगळ्या शंका दुर केल्या. बोलता बोलता रात्र चढत गेली. मन सोपवुन झाले होतच... रसिकाने शरीरही तुकारामला अर्पण केलं. क्रमश:
|
Akhi
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:00 am: |
|
|
सुरेख! मस्त!!! अजुन वाट बघतोय सगळे!!!
|
Manjud
| |
| Friday, November 23, 2007 - 5:30 am: |
|
|
प्रिन्सेस. मस्त चाललीये कथा. एकच सांगू का फक्त? 'नौकरी' नको लिहूस. तो हिंदी शब्द आहे. 'नोकरी' लिहिलंस तर वाचायला अजून मजा येईल.
|
Anaghavn
| |
| Saturday, November 24, 2007 - 11:55 am: |
|
|
राजकन्ये,कुठे हरवलीस? ------(एक वाट पाहणारा चेहरा) अनघा
|
Mansmi18
| |
| Saturday, November 24, 2007 - 1:16 pm: |
|
|
नागपुरी मराठीत "नौकरी" हा मराठीच शब्द आहे. पुढचे भाग लवकर टाका हो. कथानक थोडेफ़ार दळवींच्या "अधांतरी" सारखे वाटत आहे. पण छान आहे. चालु द्या. पुढचा भाग आल्याच्या आनंदात जे होते त्यांची निराशा झाली असल्यास क्षमस्व!
|
|
|