|
Princess
| |
| Tuesday, November 27, 2007 - 11:18 am: |
|
|
रसिका एमबीबीएस होऊन डॉ. स्मिथच्या हाताखाली काम करु लागली. त्यांच्याकडुन केवळ व्यावसायिक नाही तर इतरही कितीतरी गोष्टीचं गुपित तिला कळलं. "पेशंट केवळ औषधाने नाही तर डॉक्टरच्या गोड बोलण्यानेसुद्धा बरा होतो" ही जादुची गोष्ट स्मिथसरांकडुन रसिकाने आत्मसात केली. बघता बघता डॉ. स्मिथ सारखीच रसिकाची लोकप्रियता पण वाढायला लागली. कार्यक्रम संपल्यावर डॉ.स्मिथ कोणाशीतरी बोलतांना रसिकाला दिसले. त्यांचे तिच्याकडे लक्ष जाताच खुणेने त्यांनी रसिकाला जवळ बोलावले. "हे डॉक्टर सहदेव भट. आता तू यांच्यासोबत काम करणार आहेस." "आणि ही डॉक्टर रसिका. तुम्हाला assist करेल." नाव.. सहदेव... महाभारतातलं बिनमहत्वाचं पात्र...तिच्या मनात पटकन आल. रसिकाने नव्या डॉक्टरकडे पाहताच तिला जाणवले की यांचा चेहरा वेगळाच आहे.... एकदम कडवट. का कुणास ठाऊक एक क्षणही तिथे न थांबता स्मिथसरांचा निरोप घेउन ती घरी निघुन आली. आजपासुन सहदेव सरांबरोबर काम करायचय, या विचारानेच रसिकाला ताण आला होता. स्मिथसरांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिले होते. चुका केल्या तर त्याही प्रेमाने दाखवल्या होत्या. डॉ.सहदेव सदैव वैतागलेले असत. जणु काही सगळ्या जगाचाच त्यांना राग होता. कोणी चांगले केले तर कौतुक दुरच उलट वाईट म्हणण्यात धन्यता मानत. शिस्तप्रिय म्हणवुन घेत असत स्वत:ला पण शिस्त असली की जणु त्यांच्या आजुबाजुला मेडिकलचे विद्यार्थी नसुन शाळकरी मुलं असावीत. सतत ओरडणे. चुक नसली तरी चुक दाखवणे. चुक असली तरी दाखवतांना काही गोष्टींचे भान ठेवावे लागते, हेच जणु त्यांना माहिती नव्हते. गोडवा हा शब्द तर त्यांच्यापासुन दुर पळुन गेला होता. रसिकाला आणि इतर डॉक्टराना मिळणारा मान त्यांच्या डोळ्यात खुपायचा. त्यांनी दिलेली ट्रीटमेंट कशी चुक आहे हे पटवुन देण्यात ते तासंतास घालवत. पण स्वत: काय कर्तृत्व दाखवलय यावर मात्र त्यांच्याकडे काहीही उत्तर नसायच. दिवसेंदिवस रसिका कोमेजतेय हे तुकारामला जाणवल. "रसिका, डॉक्टर सहदेवशी पटत नसेल तर दुसरी नौकरी बघ." त्याने सुचवले. "नाही हो... तिथे मला भेटण्यासाठी खुप पेशंट्स येतात. त्यांची निराशा होईल." डॉ.सहदेवने हॉस्पिटलमधल्या सगळ्यांचेच जगणे भयाण केले होते. पण त्यांचा निशाणा असायचा अशा लोकांवर जे त्यांच्या पेक्षा अधिक कर्तृत्ववान असत. त्यात रसिका तर त्यांच्याच हाताखाली काम करत असूनही पेशंट्स खास तिच्या नावाने येतात हे बघुन त्यांचा जळफळाट व्हायचा. रोज नवीन नियम बनवुन त्यांनी स्टाफला त्रास देणे सुरु केले होते. फक्त दहा मिनिटाची जेवणाची सुटी, नवाच्या ठोक्याला हजर नसणाऱ्या स्टाफचा पगार कापण्यात येईल एक ना दोन... हजार बंधनं घालुन जणु स्वत:चा मोठेपणा त्यांना मान्य करवुन घ्यायचा होता. रसिकालाही त्रास देणे सुरुच ठेवले होते जेणेकरुन तिने नौकरी सोडावी. पण रसिकाला सेवा करणे हे ध्येय महत्वाचे होते त्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले खरे ; पण आप्पांच्या नंतर पुन्हा एकदा कुणीतरी तिचे पंख आवळायचा प्रयत्न सुरु केला होता. क्रमश:
|
Princess
| |
| Tuesday, November 27, 2007 - 11:22 am: |
|
|
दादासाहेबांच्या अचानक मृत्युनंतर जमिन जुमला, घरदार सगळ्यासाठी दादासाहेबांच्या इतर भावांनी आणि त्यांच्या मुलांनी बराच गोंधळ घालणे सुरु केले होते. तुकारामच्या आई कडुन फसवुन कुठल्याश्या कागदावर अंगठा घेऊन नंतर त्याच्या जोरावर कोर्टात दावा ठोकला होता. आधीच दु:खी असलेल्या तुकाच्या आईला त्याच्याशिवाय अशा वेळी कुणाची आठवण येणार बरं. तिचे पत्र पोहचताच पुढच्याच गाडीने तुकारामने कोल्हापुरला जायचे ठरवले. रसिकाला सोबत जाण्याची इच्छा असुनही डॉ. सहदेवने सुट्टी न दिल्याने ती जाऊ शकली नाही. रसिकाचा निरोप घेऊन तुकाराम धावतच बसस्टँडकडे निघाला. का कुणास ठाऊक रसिकाला आज कामात मुळीच रस वाटत नव्हता. डोकही दुखत होतं. शेवटचा पेशंट पाहुन घरी निघुन जाव असे तिने ठरवले. "सर, आज थोडे बरे नाहीये मला. पेशंट बघुन झालेत. आता मी घरी गेली तर चालेल का?" तिने सहदेवला विचारले. स्वत:चा अधिकार गाजवुन घेण्याची ही संधी सोडतील तर ते डॉ. सहदेव भट कसले... "नाही. आज मलाही घरी लवकर जायचय त्यामुळे तुम्हाला थांबायलाच हवं." रसिका नाईलाजाने अगदी ऑफिस संपेपर्यंत थांबली. घरी जाताना पण एक विचित्र अस्वस्थता तिच्या मनाला आली होती. ती घरी पोहचली तेव्हा आप्पा तिला कोल्हापुरला घेऊन जाण्यासाठी घरी आलेले तिने पाहिलेत. जमिनीच्या वादावादीत कोणीतरी तुकारामला डोक्यावर कुऱ्हाड मारल्याने तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता. तुकारामचा जीव रसिका मध्ये अडकला होता. रसिका पोहचेपर्यंत मात्र त्याच्यात अगदी शेवटची धुगधुगी राहिली होती. रसिकासारखी मोठी डॉक्टर तुकाची पत्नी असूनही तिचा त्याच्या शेवटच्या क्षणी त्याला हातही लागु नये याचे सर्वांनाच वाईट वाटले. रसिकाने तर त्याच्या मृत्युला स्वत:लाच जबाबदार ठरवले. राहुन राहुन तिला एकच वाटायचं, ज्याने मला हे सगळे दिलं त्याचा एक कणही मी परत करु शकले नाही. स्वत:ची घृणा वाटायची. तुकाराम घरी येईल असे वाटुन कितीदा रस्त्याकडे ती नजर टाकायची. त्याचे असे अचानक जाणे तिला असहाय्य करवुन गेले. वैयक्तिक आयुष्यात तुकारामच्या जाण्याने अपार दु:ख निर्माण झालं होते तितकेच किंवा जास्त व्यावसायिक आयुष्यात सहदेवच्या येण्याने झालं होतं. तिच्या वाईट काळातही सहदेवने तिला स्वत:च्या अधिकारशाहीपासुन मुक्त केले नव्हते. आप्पांसारख डॉ. भटलाही स्त्रीने घरीच बसलेले बरे असे वाटायचे. आणि इथे तर एक स्त्री यशस्वी होऊन त्याला शह देत उभी होती. शेवटी कंटाळुन रसिकाने नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला. क्रमश:
|
Prachee
| |
| Tuesday, November 27, 2007 - 2:45 pm: |
|
|
हं.... वाचतेय मी... लवकर लिही पुढे....
|
चिन्या, तुझ्या मातोश्रिंना विचार तीट म्हणजे काय ते, तुला लहानपणी लावला असेल त्यांनी!:-) आशु,मातोश्रींनी लावला असेल पण मी सध्या आईपासुन भरपुर दूर आहे ना त्यामुळे विचारल.
|
Aashu29
| |
| Wednesday, November 28, 2007 - 8:33 am: |
|
|
बरं, बाबा, चिन्या, तीट म्हणजे काजळाचा टिका!
|
Chinya1985
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:23 pm: |
|
|
बरं, बाबा, चिन्या, तीट म्हणजे काजळाचा टिका! अच्छा अच्छा आल लक्षात. मला लहानपणी तिट लावला होता आईनी. नक्की. पण आमच्या वर्गात एक मुलगा पाचवीपर्यंत डोळ्यात आणि गालात काजळ लावुन यायचा. आम्ही त्याला मुलगी,मुलगी चिडवायचो.
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:04 am: |
|
|
पुनम लवकर टाक ग पुढच पोस्ट........ किती वाट बघायची??
|
Adm
| |
| Monday, December 03, 2007 - 4:24 am: |
|
|
ही कथा मधेच बंद का पडली??? टाका की पुढचा भाद..
|
Anaghavn
| |
| Monday, December 03, 2007 - 4:46 am: |
|
|
राजकन्ये हरवलीस का? अनघा
|
Aashu29
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:17 pm: |
|
|
हलो, पुनम,बिझलिस कुठे? waiting for the remaining story
|
Gsumit
| |
| Tuesday, December 04, 2007 - 3:54 pm: |
|
|
रसिकाच्या नोकरीबरोबर प्रिंसेसची पण नोकरी सुटली क्काय???
|
Zakasrao
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:50 pm: |
|
|
राजकन्ये हरवलीस का? >>>>>>>>> अरे मित्रानो राजकन्या अस नाव असल तरी सामान्य व्यक्तीच आहे रे ती. सगळी काम तिलाच करावी लागतात. ती सध्या भारतात आहे आणि घरुन नेट अक्सेस नाही म्हणुन पुढचे भाग आता टाकु शकत नाही.
|
|
|