|
Itgirl
| |
| Thursday, November 15, 2007 - 1:56 pm: |
|
|
नंदू, सही, अश्याच वेगाने पूर्ण कर आता ही कथा
|
कसली interesting झालेय...कधी एकदा पुढे वाचते असं झालंय....
|
Supermom
| |
| Thursday, November 15, 2007 - 3:04 pm: |
|
|
नंदिनी, मस्त गोष्ट आहे. कर पूर्ण पटापट. फ़क्त त्यानं तिला कड्यावरून ढकललं अशी कलाटणी मात्र देऊ नकोस ग बाई...
|
Itgirl
| |
| Thursday, November 15, 2007 - 3:07 pm: |
|
|
आणि मारू पण नकोस त्याला, नाही तर, काही तरी प्रवासात गुंड वगैरे भेटतील, त्यांच्याशी २ हात करता करता एशान अर्धमेला होईल, तरीही शब्द दिलाय म्हणून तिला घरात आणून पोचवेल आणि.. तसले काही नकोय!!!
|
Supermom
| |
| Thursday, November 15, 2007 - 3:08 pm: |
|
|
अन हो, तो जिवंत नाही, फ़क्त शब्द पाळायला आला असंही नको लिहूस बाई. मागे एका कथेत तू रेहानला असंच मारल्याचं आठवतंय मला. नंदू, रागावू नकोस हं, आज जरा काम कमीय ना मला, म्हणून उगाच अंदाज बांधणं चाललंय. दिवा घे.
|
Itgirl
| |
| Thursday, November 15, 2007 - 3:09 pm: |
|
|
सुमॉ, अगदी, अगदी मोदक तुम्हाला
|
Tiu
| |
| Thursday, November 15, 2007 - 4:26 pm: |
|
|
रेहान मेला? कधी?? कथा कधी संपली ती??? रेहान आजारी होता इतकच आठवतय मला!
|
Fanzarra
| |
| Thursday, November 15, 2007 - 5:30 pm: |
|
|
good story! Keep it up!
|
Akhi
| |
| Thursday, November 15, 2007 - 7:03 pm: |
|
|
मस्त खरच खुप उत्सुकता लागली आहे. please lawakar post kar
|
Manuswini
| |
| Thursday, November 15, 2007 - 7:41 pm: |
|
|
अरे यार, लेखीकेला असे नको करुस,तसे नको करुस, असा शेवट नको करूस सांगून तिचे लिहण्याचे स्वातंत्र्य घेताय?( मी पण आपले मत मांडले हां...) पण स्टाईल चांगली आहे एखाद्या एकता कपूर serial type एकदम भाग संपणार.... नी इशानला 'ती' काय उत्तर देते? ती 'हो' म्हणते का? इशान काय करेल जर तीचे उत्तर 'नाही' असेल तर.. असे आम्ही विचार करत झोपणार नी जीम वगैरे मीस करत कसे Serial बघतो तसे इथे दहादा येवून बघणार..... ...
|
Prajaktad
| |
| Thursday, November 15, 2007 - 8:55 pm: |
|
|
असे आम्ही विचार करत झोपणार नी जीम वगैरे मीस करत कसे Serial बघतो तसे इथे दहादा येवून बघणार..... ... >>> नंदु कथा छान आहे..तुझ्या कथा वाचुन कॉलेजचे दिवस आठवायला लाग़तात..आता पटकन पुर्ण कर बघु!
|
मला जो पर्यंत ठाऊक होते, तो पर्यंत तरी रेहान जिवंत होता. कथा अपूर्णच आहे असे मानून घेतले होते. नन्दिनी, रेहानचा शेवट झालाय की नाही, हे एकदा चे सांग! नविन कथा पाहून आनंद झालाच पण कदाचित रेहान तशीच राहून जाईल या विषयी हूरहुर वाटलीच! तू खूपच छान कथा लिहितेस अन तुझ्या सर्वच कथा मला आवडल्यात. ही आता पटापट पूर्ण कर अन सर्वान्ना खूश होऊन जाऊ दे!
|
Sunidhee
| |
| Thursday, November 15, 2007 - 10:45 pm: |
|
|
अहो, तिचे रेहान नावाचे ३ दोस्त आहेत. एक आजारी आहे, एक जिवंत नाही आणि एक कोणाशीतरी लगीन करून बसलाय. बाकी उरलेली कथा येउ द्या लवक्र..
|
Chinya1985
| |
| Thursday, November 15, 2007 - 10:53 pm: |
|
|
मला सुरुवातीपासुनच डाउट होताच त्याच्याबद्दल. त्याचप्रमाणे त्याने प्रपोस केलेच आहे. फ़क्त एकच suggest करतो-कृपया कथा लवकर संपवायची घाई करु नकोस.
|
Fulpakhru
| |
| Friday, November 16, 2007 - 3:34 am: |
|
|
तो जिवंत नसलेला रेहान नाही अरमान होता वाटतं. बाकी कथा मस्त चालू आहे. पण जमल्यास ती रेहान पण पुरी कर ना नंदिनी त्याचा शेवट काय आहे याची उत्सुकता आहे.
|
Maanus
| |
| Friday, November 16, 2007 - 4:07 am: |
|
|
पर ये रेहान है कौन?
|
Neelu_n
| |
| Friday, November 16, 2007 - 4:50 am: |
|
|
>>>पर ये रेहान है कौन? घ्या आता एवढे रामायण झाल्यावर रामाची सीता कोण म्हणे?
|
माझा क्षणभर कानावर विश्वासच बसेना.. "काय?" मी विचारलं... जवळ जवळ ओरडलेच त्याच्यावर. "किंचाळतेस काय? लग्न करशील का म्हणून विचारलय.." तो हसला. "अंगठी वगैरे काही आणली नाही का?" मी विचारलं. मला पक्कं माहित होतं की तो माझी गंमत करतोय. मघाशी मी घाबरलेली बघून तो माझी अजूनच खेचत असावा. "अंगठी?? ओहो.. ती नंतर देईन मी तुला. आधी तू "हो" तर म्हण," तो हसत म्हणाला. "शान, पुरे झाली आता थट्टा.. चल निघु या इथून उशीर होतोय." "थट्टा?? आय ऍम सीरियस.. मी मजा नाही करत आहे. " "शान मस्ती पुरे आता.. अरे, रात्र फ़ार झाली आहे. घरी चल आता." "तू आधी हो का नाही ते सांग." "शान.. प्लीज खूप झाली मस्करी." "मस्करी? थट्टा? गंमत वाटतेय तुला? सकाळपासून तुझा फोन घेतला नाही. मुद्दाम... हो मुद्दाम तुझं तिकीट काढलं नाही. तुला नेण्यासाठी दुपारपासून वाशी नाक्याला वाट बघत बसलो... या इथे घेऊन आलंओ आणि तुला गंमत वाटतेय.. छी... दहा वेळा तरी मनातल्या मनात हा सीन रीहर्स केला होता. पण तू अशी री ऍक्शन देशील असं मात्र वाटलं नव्हतं." तो खरंच वैतागला होता. "शान, you cant e serious ." मी शांतपणे म्हटलं. "का? का मी तुझ्याबाबतीत सीरियस असू शकत नाही?" "पण शान.. " मला काय बोलायचं ते समजत नव्हतं. एशान कॉलेजमधे फ़क्त माझा मित्र होता. तो पण काही बेस्ट फ़्रेंड वगैरे नाही. त्याची इकडे तिकडे अफ़ेअर्स चालूच असायची. पण तो माझ्याबाबतीत पण असला विचार करेल आणि ते पण लग्नासाठी.. हा सीन मी माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन केला नव्हता.. "हो की नाही?" त्याने परत एकदा विचारलं.. अंधारामधे मला त्याच्या चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याच्या चेहर्यावरचे अधीर भाव पण दिसत होते. तो खोटं बोलत नव्हता. तो माझी मस्करी करत नव्हता.. खरोखर मला प्रपोज करत होता. एका क्षणामधे एक आयुष्य माझ्या डोळ्यासमोर्रोन तरळून गेलं. कॉलेजमधे पहिल्याच दिवशी भेटलेला एशान, घरची स्रीमंती असून सुद्धा आमच्याबरोबर वडापाव खाणारा. सगळे लेक्चर्स चुकवून वर्षाच्या शेवटी अभ्यासासाठी रात्रभर जागणारा.. आणि रात्री अपरात्री फोनवर डिफ़िकल्टीज विचारून सर्वाना हैराण करणारा. स्वत्:च्याच आईला नावाने हाक मारणारा. तिच्या क्लिनिकमधे पडेल ते काम करणारा. मास कॉम झाल्यावर स्वत्:ची ऍड एजन्सी चालू करून वर्षभरात फ़्लॅट घेणारा. ग्रूपला घरी बोलावून सगळ्याना "बेस्ट कुरकुरीत डोसे" करून खायला घलणारा. एशान. माझा मित्र. मला चक्क लग्नासाठी विचारत होता. ..काय बोलू तेच सुचेना. तो एकटक माझ्याकडे बघतच होता. मी हैराण होते. गोंधळले होते. आणि खुश होते. शानसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. ग्रूपमधल्या सर्वच मुलीचं एकमत होतं. "हो की नाही?" त्याने परत विचारलं. "शान, जर मी नाही म्हटलं तर.." "काही नाही. मी गाडी घऊन मुंबईला जाईन. तशीपण तुला अंधाराची भिती वाटतेच. ये चालत इथून. हायवेपासून जास्त नाही.. फ़क्त अठरा किलोमीटर आत आहोत. "शान.." "प्लीज.. हो म्हणशील याची मला खात्री आहे." "कशावरून?" "गेली चार वर्षे खात्री आहे. पहिल्यादा तुला पाहिलं त्या दिवसापासून. त्या क्षणापासून.. तुला आठवत पण नसेल. तू क्लासमधे पहिल्यादा आलीस तेव्हा.काळा सल्वार कमीज. व्हाईट ओढणी. मोकळे सोडलेले केस. आणि ब्लॅक चप्पल.. आधी क्लासमधे सगळ्याकडे एकदम घाबरत घाबरत पाहिलंस आणि कुणीतरी तुझ्यावर कमेंट केली तेव्हा त्याच्याकडे हसून पाहिलंस. एकदम निर्धास्तपणे. जणू आधीची घाबरी मुलगी तू नव्हतीसच. तेव्हाच ठरवलं, आयुष्य काढायचं तर याच मुलीबरोबर. तेव्हापासून ते आजपर्यंत हा प्रश्न तुला विचारायचा होता. तू हो म्हणशील ना?" "शान, मला माहीत नाही.." "वा.. मला माहीत नाही. मॅडम, तुम्हाला माझ्याबरोबर आयुष्य काढायला आवडेल का? हे विचारलंय.. आणि म्हणे माहीत नाही." "शान, मला थोडा वेळ देशील?" "हो. का नाही? हवा तेवढा वेळ घे. उद्या पहाटे साडेतीनला घरी जायचय तुला." "शान, चल निघू या. उशीर होइल." "मला उत्तर हवय." "आत्ता?? लगेच?" "हो.." "मग ऐक.. नाही. मला शक्य नाही"
|
Akhi
| |
| Friday, November 16, 2007 - 6:54 am: |
|
|
मस्त.... पण हे ना serial सारख होतय....... interesting mode वर finish post कमीत कमी serail मधे one week /daily अस काही तरी असते. पण इथे तर काय वात बघयला no limits
|
त्याच्या चेहर्यावर अंधार पसरल्यासारखं मला उगीच वाटलं. तो काहीच बोलला नाही. मी दरीकडे बघत उभी होते. तो कारमधे जाऊन बसला. तरी माझं लक्ष नव्हतं. त्याने हॉर्न मारला. "आता चल" या अर्थाचा. मी निमूटपणे कारमधे जाऊन बसले. त्याने रीव्हर्स मारला. सीडी चालू झाली. "आंसूभरी है जीवन की राहे..." मी न राहवून गाणं बंद केलं. शान काहीच बोलला नाही. "आय ऍम सॉरी" मीच बोलले. त्याची शांतता मला खूप त्रास देत होती. माझ्या नकाराचं त्याने कारण तरी किमान विचारावं असं वाटत होतं. त्याचा मोबाईल वाजला. बहुतेक त्याला रेंज असावी. "बोल... हो.. अं?? नाही... माहीत नाही... नंतर बोलतो मी. हा.. डॅड.. बादमे फोन कर दूंगा. ड्राईव्ह कर रहा हू.. ह्म्म.. प्लीज... ओके. टेक केअर.. " त्याने फोन कट केला. "आई होती का?" मी विचारलं. त्याने फ़क्त मान डोलावली. "एशान.. प्लीज. तू चिडू नकोस." "मी चिडलोय असं तुला वाटतय का?" त्याने मला विचारलं. "हा प्रश्न आहे का?" "तुझं उत्तर काय आहे ते बघ ना...." "शान, तू जरा माझा विचार कर. तुला माझ्या घराबद्दल काहीच माहीत नाही." "लग्न तुझ्याशी करायचय. तुझ्या घराशी नाही," "शान, माझ्या घरचे कधीच तयर होणार नाहीत. माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेला मी पाहिलय.. आजोबानी प्रत्येक मुलाविषयी कशी चौकशी केली होती. ते तुला कधीच तयार होअनार नाहीत." मला घरातले निष्कर्ष समोर दिसत होते. कर्मठ कुटुंबातली मी. संस्कार, शील कुल असल्या गोष्टीचं बाळकडू घरात मिलालेलं. त्याच्या उलट एशानचं घर. देवब्राह्मण नाही. नास्तिकता. त्याची आई अजून जीन्स घालते. त्याच्या घरात कसले संस्कार नाहीत. वागण्याची पद्धत नाही. कुटुंब नाही. माझ्या घरात सुरू झालेला संघर्ष माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. अख्ख्या घरासाठी खपून स्वयंपाक करणारी आणी तरीही सर्वात शेवटी जेवणारी स्त्री हे आमच्या गृहिणीपणाचे आदर्श होतं. आणी कितीही शिकलेलं नोकरी केलेलं असलं तरी त्यात काहीच बदल स्विकारला जानार नव्हता. त्यामधे स्वत्:ला मेंटेन करणारे, जिममधे जाणारी डॉक्टर कांचन कुठेच बसत नव्हती. एशानमधे त्याच्या आईवडीलामधे चूक काहीच नाही, हे मला समजत होतं. पण आजोबाना आणि बाबाना कोण सांगणार? "शान, माझ्या घरी असं चालणार नाही. तुझी आई मराठी आहे, पण डॅड पंजाबी आहेत. आजोबा ऐकूनसुद्धा घेणार नाहीत." "सिंधी. एशान मीरचंदानी. दॅट मेक्स मी सिंधी." "सॉरी, पण तरी घरी..." "तुझं उत्तर हवं होतं मला. ते जर नाही असेल तर मग पुढचं बोलायचं कशाला?" "शान.. पण अरे.." "एकदा.. फ़क्त एकदा हो म्हण. तुझ्या घरच्याना समजवायची जबाबदारी माझी. मी चांगला पैसा कमावतो. निर्व्यसनी आहे. बीअर घेतो ते दे सोडून. पण तुला आयुष्यात खूप सुखी ठेवीन, कधीच कसला त्रास होऊ देणार नाही... बिलिव्ह मी." "शान, मला सर्व पटतय. पण घरी..." "परत तोच विषय का काढतेस? तुझ्या घरचे तयार होतील... मी मनवेन त्याना." "नाही.. एशान, आजोबा कधीच ऐकणार नाहीत. मी ओळखते त्याना. उगाच हे असं काही समजलं तर मला नोकरी सोडून घरी बसवतील.." "हे असं काही म्हणजे?" "शान, प्रेम विवाह तुझ्या इथे चालत असतील. माझ्या घरी त्याला थिल्लरपणा समजतात." "ओह, माझ्या आईवडीलानी पण केला होता ना प्रेम विवाह.. म्हणून आम्ही थिल्लर माणसं. तुमच्यासारखे खानदानी नव्हे, बरोबर ना?" त्याच्या आवाजातला उपरोधपणा माझ्या जीवाला अक्षरश्: कापून गेला. दातानी माझेच ओठ घट्ट दाबले. "शान सॉरी." "तीनदा की चारदा तेच ऐकवलेस. आता बास, मला समजलं की तुला काही प्रॉब्लेम नाही. घरी प्रॉब्लेम आहे, तरीही.... मला तुला काहीतरी सांगायचय.." गाडी हायवेवर आली होती. "मी तुला आयुष्यात खूप सुखी ठेवेन. कधीही काहीही वेळ आली तरी तुझा हात सोडणार नाही, हा मी दिलेला शब्द आहे. जगातल्या कुठल्याही रिती रिवाजापेक्षा, नात्यापेक्षा आणि संस्कारापेक्षा महत्वाचा. माझा शब्द... माझं वचन. असंच एक वचन डॅडने आईला दिलं होतं आणि पंचवीस वर्षापर्यन्त निभवलय. सात फ़ेरे त्यानी कधीच घेतले नाहीत. सप्तपदीपण चालले नाहीत. "नातिचरामि" अशी शपथ कधीच घेतली नाही. पण त्याचं पालन मात्र केलं." बोलता बोलता त्याचा आवाज हळूवर झाला होता. अलगद फ़ुंकलेल्या बासरीसारखा वारा खेळत होता. दूरवर कुठल्यातरी गावामधे फ़टाके उडत होते. समोरून येनार्या गाडीच्या हेडलाईटचा उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. बहुतेक कशेडी घाट सुरू झाला होत्ता. ट्रॅफ़िक तसं कमी वाटत होतं. शान पुढेही काहीतरी बोलत होता. माझं लक्षच नव्हतं. मी मनाने केव्हाच दुसर्या कुठल्यातरी जगात पोचले होते. बाबा, आजोबा चिडतील ओरदतील कदाचित मारतील सुद्धा. पण शान त्याची आई त्याना समजावतील. माझं भलं कशात आहे ते नीट सांगतील. त्याचं म्हणणं माझ्या घरचे आधी ऐकणार नाहीत. मग हळू हळू तयार होतील. एशान चांगला पैसा कमावतो. व्यसनी नाही. आणि हुंडा मागणार नाही. हे त्याना पटायला लगेल. आणि मग ते तयार होतील.... "मग काय विचार आहे?" शान मला विचार होता. "कशाबद्दल?" मी पटकन बोलून गेले. अर्थात चूक लक्षात आल्यावर जीभ चावली. "शोएब अख्तर बॉल फ़ेकतो की टाकतो याबद्दल.." "काय??" तो हसला.. मी पण हसले. "शान एक विचारु?" "विचार ना.." "तू खरंच गेल्या चार वर्षापासून माझ्यावर प्रेम करतोस?" "का? अजून शंका आहे तुला? " "ग्रूपमधे कुणाला माहित होतं?" "जास्त कुणाला नाही. पण मी माझ्या प्रत्येक गर्लफ़्रेंड्ला सांगायचो." मी खुदकन हसले. "काय झालं?" "तू तुझ्या गर्लफ़्रेंडला सांगितलेस. आणी मला कधीच नाही सांगितलं.." "तुला सांगितलं कित्येकदा... तुला समजलंच नाही," खरं खरं सांगते.. शानच्या या वाक्याचा अर्थ मला आजतागायत समजलेला नाही. विचारलं तर तोसांगतही नाही. उत्तर म्हणून परत हेच वाक्य असतं. "कॉलेजमधे किंवा त्यानंतर तुला कधी वाटलं नाही की माझ्या आयुष्यात कुणीतरी येईल म्हणून.." "मी चान्सच ठेवला नव्हता. कॉलेजमधे असल्यापासून... हमारे जासूस तुम्हारे इर्द गिर्द हमेशा घूमते रहे है.." "उगाच फ़िल्मी वाक्यं फ़ेकू नकोस." "का आपल्या कॉलेजमधलं कोणच नाही तुझ्या ऑफ़िसमधे." "आहे.. पण तो तर.. ओह नो... रुचिर आपल्याला दोन वर्षं सीनायर होता..." शान माझ्याकडे बघून फ़क्त हसला. अगदी लहान मुलासरखा गोड. "मी कधीही.. म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं.... माय गॉड.. मी खरंच इतकी स्पेशल आहे का रे?" "माहीत नाही.. पण आई म्हणते की तू तिच्यासारखी आहेस म्हणून.." "आई? तुझ्या आईला माहीत आहे हे सर्व..." "पहिल्या दिवसपासून.." "आणि ही सर्व आयडीया तिचीच. बरोबर?" "नाही. ही डॅडची. अगदी गाडीत गाणी कुठली लावायची इथपासून ते कुठे थांबायचं इथपर्यंत..." "शान, आय डोंट बिलिव्ह दिस" "परत एकदा विचारू?" "काय?" "तेच..." मीपण मुद्दाम खोडकरपणे विचारलं "काय ते नीट सांग" "मी तुझ्या निर्ढावल्या डोळ्यांत तेजाळू किती? उत्तरे देशील म्हणुनी प्रश्न ओवाळू किती?" "काऽऽऽय?" मला चक्कर यायचे बाकी होते. म्हण्जे शान मला प्रपोज करतोय वगैरे ठिक होतं.पण कविता बिविता म्हणजे. मामला भयानक रित्या गंभीर होता. "तुला.. ना रीऍक्शन कशी द्यायची तेच समजत नाही.. मी काय भूत आहे असं किंचाळायला..." "अरे पण कविता?" "माझी नाही. वैभव जोशीची आहे. सिच्युएशनला फ़िट बसत होती म्हणून...." "बाप रे.." "परत चुकीची रीऍक्शन.." रात्रीचे बारा वाजून गेले होते. रात्र उद्याच्या पहाटेच्या तयारीला लागली होती. घाटातला वळणावळणाचा रस्ता सुरू होता. "ए शान.. परत एकदा बोल ना..." "काय? कविता?" "नाही रे.. ते मघाशी म्हणालास ना.. मी तुला शब्द देतो वगैरे.. वचन वगैरे.." "ए मी काय ते पाठ करून नाही म्हणालोय. हा... आईने थोडी मदत केली होती. पण तरीही..." "तरीही काय?" "तुला ते शब्द महत्वाचे आहेत की भावना महत्वाच्या?" मी काहीच बोलले नाही. खरं तर ग्फ़रज नव्हती. आणि का ते मला माहीत नाही. पण माझ्या डोळ्यत पाणी आलं. त्याने हलकेच माझा हात धरला. "आय प्रॉमिस. मी शब्द दिलाय तुला. आयुष्यात कधीही तुला दु:ख देणार नाही. हा धरलेला हात कधीच सोडणार नाही. मी त्याच्याक्डे बघितलं. जगातले सगळे शब्द संपल्यासारखे वाटले. काहीच बोलायची गरज नव्हती. या एका क्षणापुरती का होईना.. मी या जगातली सर्वात सुखी होते. अंधार होता. रस्ता वळणावळणाचा होता. तो माझ्याकडे बघत होता. गाडी वार्याशी स्पर्धा केल्यासारखी पळत होती. आणि मझं मन गाडीपेक्षा वेगाने... आणि माझा हात त्याच्या हातात होता..... मला पुढचं काहीच आठवत नाही.. दिसत नाही.. समजत नाही. फ़क्त एवढंच माहीत आहे... त्याने आयुष्यभर माझा हात सोडला नाही. दिलेला शब्द त्याने शेवटपर्यंत पाळला. ***समाप्त्***
|
|
|