Antara
| |
| Friday, November 16, 2007 - 8:31 pm: |
|
|
चिन्या अरे शेवटपर्यन्त त्याने हात सोडला नाही या विधानाचा अर्थ सरळ असाच आहे की शेवट झालाय आलरेडि! मेबी लास्ट सीन नन्तर अक्सिडेन्त होतो वाटते गाडीचा. हो ना?
|
Aashu29
| |
| Friday, November 16, 2007 - 8:37 pm: |
|
|
आई गं, काहितरी काय निश्कर्ष काढताय लोक्स? नंदिनि मस्तच ग , मजा आलि वाचुन!! तुझ्या कथेतली नायिका मला खुप आवडते, नेहमीच, आणि नायक त्याहुन जास्त!! क्युट एकदम सर्वच!
|
Antara
| |
| Friday, November 16, 2007 - 9:15 pm: |
|
|
अंधार होता. रस्ता वळणावळणाचा होता. तो माझ्याकडे बघत होता. गाडी वार्याशी स्पर्धा केल्यासारखी पळत होती. आणि मझं मन गाडीपेक्षा वेगाने... आणि माझा हात त्याच्या हातात होता..... मला पुढचं काहीच आठवत नाही.. दिसत नाही.. समजत नाही. फ़क्त एवढंच माहीत आहे... त्याने आयुष्यभर माझा हात सोडला नाही. दिलेला शब्द त्याने शेवटपर्यंत पाळला. >> याचा अर्थ असाच होतो की!वर लिहिलाय तसा..
|
काहीतरी नाही तोच शेवट आहे. गाडीचा अपघात होतो. माझ्यामते पण ही तुझी सर्वात चांगली कथा. विषय नेहमीचाच. प्रपोझल. पण मांडनेका अंदाज अलग. जियो.
|
Tiu
| |
| Friday, November 16, 2007 - 9:23 pm: |
|
|
शेवट वाचकांवर सोडलाय... (नं.१) शेवट ज्याला जसा हवा तसा. हीरॉइननी त्याला हो म्हटलय आणि त्यांच लग्न झालय >>> शेवट वाचकांवर सोडला नाहिये! ज्याला जसा हवा तसाही नाहिये!! त्यांचं लग्न वगैरे झालं असं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पण लिहिलं नाहिये!! मला तर एकच शेवट दिसतोय...गाडिचा ऍक्सिडेन्ट झाल्याचा...लेखिकेने कृपया खुलासा करावा. हे म्हणजे रेहान सारखंच झालं. फक्त त्यात कथा संपत नव्हती म्हणुन गेस चालु झाले होते आणि इथे कथा संपल्यावर! ;-)
|
अरे गाडीचा अपघात झाला असता आणि दोघे दगावले असते तर लेखिकेने (नायिकेने) ही कथा तरी कशी काय लिहिली असती? म्हणजेच लेखिका तरी सुखरूप होती. नायकपण होता वृद्धत्वाने मरेपर्यंत अस मानायला हरकत नाही. अपघात झाला वगैरे काही नाही. लेखिका त्या अत्यानंदाच्या धुंदितच घरी पोचली असेल. म्हणून तिला पुढचे काही आठवत नाही. नंदिनी, कथा छान होती. लवकर पुर्णत्वास नेलीस त्यामूळे जास्त आवडली.
|
Antara
| |
| Friday, November 16, 2007 - 9:40 pm: |
|
|
ई वृद्धत्वाने मरेपर्यन्त वगैरे असला शेवट असेल तर मग अगदीच टिप्प्पिकल्ल होईल ही कथा एन्ड ला. i hope its not like that
|
Asami
| |
| Friday, November 16, 2007 - 9:50 pm: |
|
|
खरं खरं सांगते.. शानच्या या वाक्याचा अर्थ मला आजतागायत समजलेला नाही. विचारलं तर तोसांगतही नाही. उत्तर म्हणून परत हेच वाक्य असतं. >> एव्हढे स्पष्ट लिहिलय कि तीने
|
Deshi
| |
| Friday, November 16, 2007 - 10:02 pm: |
|
|
वृद्धत्वाने मरेपर्यन्त वगैरे असला शेवट असेल तर मग अगदीच टिप्प्पिकल्ल होईल ही कथा एन्ड ला. >>>>>> - अगदी आप्ल्यासारखी होईल. रोज तोच नवरा न तिचा बायको न तेच वाद.
|
>> ई वृद्धत्वाने मरेपर्यन्त हेहेहे.. कोणाच काय तर कोणाच काय अंतरा, तुझ्या त्या ई च फार हसायला आल बघ
|
असाम्या, रहस्यकथेत एकदम पारंगत झालेला दिसतो आहेस. पुरावा एकदम फक्कड !
|
Gsumit
| |
| Saturday, November 17, 2007 - 12:01 am: |
|
|
मला ते "इ वृद्धत्व" म्हणजे इ-सकाळ मधला इ कसा असतो तस काहीस वाटलं होतं... मायबोलीकरांनो त्यांना दिवाळीच्या दिवशीच का बर मारताये, दिवाळी तरी खाउ द्यायची कि त्यांना... नंदिनी कथा आवडली...
|
Tiu
| |
| Saturday, November 17, 2007 - 1:16 am: |
|
|
असं झालं असेल... ऍक्सिडेंट झाला, नायक नायिका दोघं वाचले. पण दुर्दैवाने नायिकेचे डोळे गेले, आणि स्मरणशक्तीही...तिला short term memory loss झाला. त्यामुळे आधिचं सगळं आठवतय तिला पण नंतरचं काही आठवत नाहिये...तरिही नायकाने शेवटपर्यंत तिची साथ दिली! बघा कथेत शेवटी लिहिलं पण आहे... "मला पुढचं काहीच आठवत नाही.. दिसत नाही.. समजत नाही. फ़क्त एवढंच माहीत आहे... त्याने आयुष्यभर माझा हात सोडला नाही. दिलेला शब्द त्याने शेवटपर्यंत पाळला." ... पुरावा!
|
बाप रे.. जाम हसतेय मी हे सर्व वाचून.. चला आता खुलासे देते. शेवट ज्याला हवा तसा आहे... कुणाला वाटतं त्याचा अपघात झाला तर कुणाला वाटतं त्याचं लग्न झालं.. माझ्या मते तर तो क्षण हाच शेवट होता. त्यानंतर काय झालं याच्याशी मला देणं घेणं नाही. नायिकेला नाव का नाही?? तीन पोस्टनंतर समजलं नाव दिलेलं नाही. आता बारसं करण्यात काझी पॉइंट नव्हता. बाय द वे ते नाव "शिवानी" होतं. खूप दिवसापासून एक गूडी गूडी कथा लिहायचीच होती. डार्क विSःअय अजिबात नको हवा होता. म्हणून ही गोड कथा. खरंतर दिवाळी अंकाला देणार होते. पण तिथे बारा भान्गडी होत राहिल्या. कथा वेळेत पूर्ण करावीच लागली कारण सोमवारपासुन पीसी नाही आहे. "एशान" हा माझंही आवडतं पात्र आहे. खरोखर भेटलेला "एशान" याहून मोठं पात्र आहे. त्याला ही कथा वाचायला दिली तर म्हणे "मी असं काही प्रपोज वगैरे करायच्या ऐवजी सरळ तिच्या घरी जाऊन मागणी घातली असती. हवेत कशाला टेन्शन्स??" सर्वाच्या प्रतिक्रियासाठी मनापासून धन्यवाद. गेल्या वर्षभरात मी पाच तरी कथा लिहिल्या असतील. (पूर्ण कथा) एरवी माझ्या वहीत पाच सहा पानापेक्षा पुढे जात नाही मी. पण इथे "केव्हा संपवणार कथा?" ह्या दमदाटीमुळे संपवावीच लागते. असंच तुमचं प्रेम सोबत राहु दे हीच देवाकडे प्रार्थना. (आज ऑफ़िसचा शेवटचा दिवस असल्याने जरा ईमोशनल झाले आहे. मेरीभी भावनाओको समझो यार,)
|
Meggi
| |
| Saturday, November 17, 2007 - 8:39 am: |
|
|
tiu, LOL नंदिनी, या नंतर लिहिणार नाहिस कि काय?? सुंदर कथा आहे एकदम...
|
लेखिकेपेक्षा मला आणि असामीलाच कथा जास्त समजली आहे असे वाटते. असामीने पुरावा दिलाच आहे की त्यांच लग्न झाल आहे. त्या हिरॉईनला काही आठवत नाही,समजत नाही दिसत नाही कारण तिला झोप लागली ना!!!कशाला उगाच नवप्रेमीयुगुलांना मारता??
|
Savyasachi
| |
| Saturday, November 17, 2007 - 11:34 pm: |
|
|
>>असामीने पुरावा दिलाच आहे की त्यांच लग्न झाल आहे. not really but proves that atleast they were alive. aso. ugach kathyakut zala.
|
Savyasachi
| |
| Saturday, November 17, 2007 - 11:36 pm: |
|
|
>>असंच तुमचं प्रेम सोबत राहु दे हीच देवाकडे प्रार्थना. आँ, एकदम थेट देवाला साकडे ती रेहानपण पुर्ण कर बर आता.
|
Fulpari
| |
| Tuesday, November 20, 2007 - 7:45 am: |
|
|
नंदिनी, छानच झाली आहे कथा. सुरेख जमली आहे.
|
R_joshi
| |
| Thursday, November 22, 2007 - 10:26 am: |
|
|
नंदिनी कथा खुपच छान लिहिलिस. कथेचा शेवट तर अप्रतिम केलास. तो क्षणच त्या दोघांसाठी महत्वाचा. नंतर काय हे प्रश्नच नसतात अशावेळी.
|
Kilbil
| |
| Monday, November 26, 2007 - 1:40 pm: |
|
|
कथा सुन्दरच!!! असा एशान सर्वांच्या जीवनात येवो.......
|
Ss_sandip
| |
| Monday, December 03, 2007 - 11:36 pm: |
|
|
नन्दिनी खूSSSप खूSSSSSप छान! आवड्ली!! अशीच लिहीत रहा.
|