|
"ए काय मस्त दिसतेयस? एकदम फ़टाकडी?" अंजु जवळ जवळ माझ्या पाठीत धपाटा घालत म्हणाली. "ए बावळे हळू मार.." मी म्हणाले. मी छान दिसत होते हे मलाही माहीत होतं. तशी मी काही त्रिलोक सुंदरी वगैरे नाही. पण एरवी ऑफ़िसला येताना फ़ॉर्मल ड्रेस आणि नो मेकप. पण आज ऑफ़िसमधे दिवाळी सेलीब्रेशन होतं. त्यामुळे मी जरा साडी नेसून मेकप करून केसांचा फ़्रेंच रोल घालून (हे सर्व ब्युटी पार्लरमधे दोनशे रूपये खर्च करून मी आले होते.) त्यामुळे मी नेहमीपेक्षा वेगळी दिसत होते. अर्थात सर्वाच्या नजरा माझ्यावरच. "मग आजचा प्रोग्राम काय आहे?" आयटीमधला रुचिर माझ्याकडे बघत म्हणाला. "जास्त काही नाही. लंच आणि त्या दरम्यान थोडीफ़ार सरप्राईज गंमत... आणि मग..." "मॅडम, तुमचा प्रोग्राम विचारतोय.." तो गालातल्या गालात हसत म्हणाला. "ओह... माझा प्रोग्राम सरळ आहे. इथुन घरी जाईन. उद्या दिवाळी आहे. त्यामूळे मला रत्नागिरीला जायचं आहे. ट्रेनचं रीझर्वेशन झालेले आहे. माझा एक मित्र तिकीट घेऊन येईल संध्याकाळी पाचची ट्रेन आहे..." "मित्र??"त्याने भुवया उंचावत विचारलं. "हो.. मित्र. त्याचे वडील रेल्वेमधे आहेत. त्यामुळे माझ्या तिकिटाची जबाबदारी त्याच्याकडे असते. तो माझ्या कॉलेजमधे होता. बास्स.. अजून काही?" रुचिर हसला. मी त्याला व्यवस्थित ओळखून होते. एक नंबरचा फ़्लर्ट होता. पण कामालाही तितकाच चांगला होता. मी ऍडमिनमधे होते. त्यामुळे आजच्या ईवेंटचा सर्व जबाबदारी आमच्याकडे होती. तसं साडी नेसून काम करताना थोडं अवघडल्यासारखं होतं. मला तर सलवार सूटची पण सवय नाही. त्यात ही धावाधाव. दुपारचा एक होत आला होता. लंचची सर्व तयारी झाली होती. एम डी येऊन सर्वाना ऍड्रेस करणार होते. मी माईक टेस्टिंग वगैरे आवडीची कामं करून घेतली. तितक्यात अंजू परत आली. "तुझं रीझर्वेशन झालं?" तिने मला हल्केच विचारलं. "आयला. विसरलेच मी. थांब जरा. " मी माझ्या मित्राला फोन लावला. सकाळपासून तो फोन उचलत नव्हता. पाचची ट्रेन आणि अजून माझ्या हातात तिकीट नह्वतं. तशी जास्त काळजी नव्हती. तिकीट त्याने आणून दिलंच असतं. "छीट हा गधा आताच फोन उचलत नाहिये..." मी मनातल्या मनात त्याला शिव्या घातल्या. लंचला सर्वजण आले. आणि माझं काम सुरू झालं. फोटोग्राफरकडून हवे तसे फोटो काढायला सांगणं. सर्व डीपार्टमेंटच्या लोकाशी बोलणं कुणाला काय हवं नको ते विचारणं. अशी एक ना दोन.. दुपार कशी संपली ते समजलंच नाही. घड्याळ पाहिलं तेव्हा अडीच वाजले होते. "ओह माय गॉड.... " मी जवळ जवळ ओरडलेच. परत एकदा त्याचा नंबर ट्राय केला. त्याने यावेळेला मात्र फोन उचलला. "माझ्या तिकिटाचं काय झालं?" मी हेलो वगैरेच्या भान्गडीत न पडता विचारलं. "क्या? कौनसा तिकीट?" त्याच्या या उत्तराने मला चक्कर यायचीच शिल्लक होती. "मेरा तिकीट,, रत्नागिरीका.. पाच वाजताची ट्रेन आहे. " मी जवळ जवळ ओरडतच विचारलं. "ओह शिट.. मी विसरलोच.. डॅडला सांगायाला. नेमका तो पण आता टाऊनमधे नाहिये.. सॉरी यार.." तो म्हणाला. "उद्या नरक चतुर्दशी आहे. मला पहाटेच्या आत घरी पोचायचं आहे." माझ्या डोळ्यासमोरून मला तुडुंब भरलेल्या ट्रेन्स, ओसंडून वाहणार्या बसेस आणि त्याच्या पाठीमागून धावणारी मी असं काहीबाही दिसायला लागलं. "सॉरी. रीअली सॉरी. मी काहीतरी व्यवस्था करतो. एक अर्ध्या तासात तुला कळवतो. प्लीज आय प्रॉमिस" "एशान... I am going to kill you. " मी ओरडले. क्रमश्:
|
नंदिनी.... चांगली सुरवात आहे...प्लीज रेहान सारखी मधेच संपवू नकोस
|
Akhi
| |
| Tuesday, November 13, 2007 - 11:14 am: |
|
|
चांगली सुरवात आहेपुढचा पोस्ट कधी?
|
खरं तर मला काहीच सुचत नव्हतं. आतापर्यंत कधीही मला तिकीट हवं असलं की एशान तिकीटची व्यवस्था करायचा. माझीच काय पण अख्ख्या ग्रूपची तिकिटं तो द्यायचा. आता जरी कॉलेज संपलं तरी त्याचे वडील रेल्वेमधे खूप मोठे ऑफ़िसर होते. त्याला दिवाळीच्या आधी चांगले पंधरा दिवस आधी फोन केला तरी त्याने आयत्यावेळ घोळ घातला होता. ऑफ़िसमधल्या एका कलीगला मी निघते म्हणून सांगितलं आणि सरळ रिक्षा पकडून रूमवर आले. डोळ्यात आपसूक पाणी यायला लागलं. ताई काल सकाळीच घरी पोचली होती. तिचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण. भावोजी पहिल्यादा घरी येणार होते. आजी आजोबा दादा काका काकू सर्व नातेवाईक पोचले होते. फ़क्त मीच एकटी उशीरा जाणार होते. आणि त्यात हा तिकीटाचा घोळ झाला होता. आयत्यावेळेला जनरलमधे सुद्धा चढायला जागा मिळाली नसती. रूमवर गेल्यावर तर अजूनच रडायला यायला लागलं. कारण माझी रूममेट सकाळची ट्रेन पकडून हैद्राबादला गेली होती. रिकाम्या रूममधे मी सकाळी भरून ठेवलेलं माझं सामान मलाच टूक टूक करायला लागलं. एक कप चहा करून घेतला. साडी बदलली. केव्हाचे घट्ट बांधलेले केस मोकळे सोडल्यावर जरा बरं वाटलं. शॉवर घेऊ या आणि सामान घऊन निघू या, मिळेल त्या गाडीने जाऊ. वाटल्यास वाटेत एसटी बदलू. हा विचार मी करत होते. तेवढ्यात मोबाईल वाजला. एशानचा फोन. "हा शान. बोल पटकन." देवा... काहीतरी चांगली बातमी असू दे रे.. "यार.. लोचा झालाय. एकापण ट्रेनचं तिकीट मिळत नाहीये. मी झाअंकलना पण फोन केला. व्ही आयपी कोटा पण फ़ुल्ल आहे." मी मटकन खुर्चीत बसले. "आता...?" एवढाच प्रश्न मला सुचला. "एक काम कर. तू पंधरा मिनिटे थांब, मी फोन करतो तुला.." "आणि परत हेच सांगतो की काही होऊ शकत नाही. त्यापेक्षा मीच काहीतरी व्यवस्था करते. " "अगं पण..." त्याला काही न बोलायचा चान्स न देता मी फोन ठेवून दिला. अस्सा राग आला होता मला. परत एकदा मोबाईल वाजला. उचलावासा वाटतच नव्हता. पण घरचा नंबर होता. "काय बेटा कधी निघतेयस?" बाबानी विचारलं आणि मला अजूनच रडू फ़ुटलं. "काय झालं?" त्याचा आवाज घाबरलेला. मी मुसमुसत रडत झालेलं सर्व सांगितलं, मग आईन फोन घेतला. "हे बघ, हातात तिक्कीट नसेल तर निघू नकोस. उगाच कुठे काय झालं म्हणजे.... त्यापेक्षा उद्याचं वगैरे तिकीट मिळतय का ते बघ.. आणि ये," तिची काळजी मला समजत होती. पण दिवाळीला असं घरी न जायला मिळणं म्हणजे...... मी "ठिक आहे" असं बोलून फोन ठेवला. सामान परत एकदा चेक केलं तीन बॅगा होत्या. थोडेफ़ार इकडचे तिकडचे कमी करत करत दोनच सुटसुटीत बॅगा केल्या. रूमबाहेर आले तेव्हा चार वाजत आले होते. रिक्षा पकडली. आणी हायवेवर आले. आता इथून पनवेल गाठायचं. मग मिळाली तर एसटी किंवा प्रायव्हेट बस.. घरी सांगितलं असतं तर नक्की फ़टके पडले असते. त्यापेक्षा घरी जाऊन काय ते सांगू या हा विचार केला. तेवढ्यात परत मोबाईल वाजला. एशानचा नंबर. एकदा वाटलं फोन घेऊ नये. मग वाटलं कदाचित त्याने तिकीटाच्या व्यवस्था केली असेल. "काय झालं?" "हे बघ डीअर.. तिकीट तर मिळत नाही आहे. आता चार वाजले आहेत. बाय ड्राईव्ह पोचायला तुला पाच सहा तास लागतील. म्हणजे तु आता जरी निघालीस तरी मध्यरात्रीपर्यंत पोचशील.." "मूर्ख.. साल्या एक तर मला लटकावतो वर लेक्चर देतो.. तू गाढवपणा केलास. तुझ्यावर विसंबून मी केला. आता माझं मी निस्तरते. परत तुला माझं काही काम सांगणार नाही..." मी बडबडतच होते. "ए तू मूर्ख आहेस. आणि दीडशाणी पण. " तो नेहमीप्रमाणेच माझ्यावर खेकसला. "आता मुकाट कुठे आहेस ते सांग. मी कार घेऊन इथून निघालोय. अर्ध्या तासात तिथे पोचेन. तुला घरापर्यंत सुखरूप सोडायची जबाबदारी माझी." "काय? तुझ्यासोबत कारमधून येणार? काय दारू पिऊन बोलतोयस का?" मी शान असला काही मार्ग काढेल याचा विचारच केला नव्हता. "मॅडम, मी शब्द दिलाय. शेवटपर्यंत माझा शब्द पाळेन. तुला तुझ्या घरी न्यायची जबाबदारी माझी. क्या समझे?" क्रमश्:
|
Vrushs
| |
| Tuesday, November 13, 2007 - 2:31 pm: |
|
|
छान चाललंय.येऊ द्या लवकर.
|
नंदिनी, खूप छान रंगतेय कथा. प्लीज बाकीची कथा लवकर पोस्ट करा.
|
Rajankul
| |
| Tuesday, November 13, 2007 - 4:50 pm: |
|
|
जब वी मेट ची कथा अशीच आहे त्यावर आधारीत आहे का?
|
Anaghavn
| |
| Wednesday, November 14, 2007 - 5:17 am: |
|
|
मस्तए. सहज आणि अगदी समोर घडल्यासारखी. अनघा.
|
रिक्षेमधून खाली उतरले पण मला काहीच समजेना.शान ऑलरेडी निघाला होता. पण घरी जर हे समजलं असतं की मी अशी एखाद्याच्या कारमधून आलेय तर चांगलेच फ़टके पडले असते. बाबाना तर मी एखाद्या मुलाशीबोलतेय हे समजलं तरी राग यायचा. त्यामुळे घरी गेलं की मी मोबाईल बंदच ठेवायचे. त्यात हा येडचॅप म्हणे मी तुला घरापर्यंत सोडतो, दिवाळीच्या दिवशी माझ्या घरात शिमगा झाला असता... परत त्याचा फोन आला. "अरे कुठे आहेस तु? मी वाशीच्या पुढे आलोय." आता काय कप्पाळ बोलणार मी. "मी हायवेवर उभी आहे" "ओके जान..." काहीही करून घरी जाणं गरजेचं होतं. एशान तसा चांगला मुलगा होता. त्याची एक गर्लफ़्रेंड पण होती. अर्थात त्याची आर्थिक परिस्थिती आमच्या अख्ख्या ग्रूपमधे चांगली होती. त्याच्यासोबत जाण्यात तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. घरी सांगितलं असतं की मी प्रायव्हेट बसमधून आले. घरी असं खोटं बोलायचं की एशानला मला बसमधे बसवून दे असं सांगायचं तेच मला समजत नव्हतं. तितक्यात एशानची कार येताना दिसली. कॉलेजमधे असल्यापासून ही त्याच्या पाचवी की सहावी कार. ही बहुतेक होंडा सीटी होती. माझं कारविषयी ज्ञान जरा कमीच होतं. "चल अस पटकन." त्याने सामान पाठीमागे ठेवलं. "काय जड बॅगा आहेत? घरी काय दगड धोंडे घेऊन चालली का?" त्याने वैतागत विचारलं. "तु हमाल म्हणून आहेस हे माहीत असतं तर अजून चार पाच लगेज वाढवलं असतं" मी पण हसत उत्तर दिलं. एशान तसा दिसायला चान होता. मूळचा गोरा रंग पण उन्हाने रापलेला. अस्ताव्यस्त विंचरलेले केस. भरपूर उंची आणि लहानपणापासून स्पोर्ट्समधे असल्यामुळे lean body . आणि कायम ओठावर मिश्किल स्मित. तो माझ्या चेहर्याक्डे निरखून बघत होता. एकटक. "काय झालं?" मी विचारलं. "यार... काय पण फ़ॅशन असतात ना हल्ली..." तो शांतपणे म्हणाला. आणि त्याचे गाडी स्टार्ट केली. मी सहज चेहर्यावरून हात फ़िरवला. आई गं.. साडी बदलली होती. पण कानताले झुमके, गळ्यातला नेकलेस आणि कपाळावरची बिंदी काढलीच नव्हती. खाकी टी शर्ट आणी निळी केप्रीज. काय ध्यान दिसत असेल मी? मेकप वॉटरप्रूफ़ होता. त्यामुळे तोही तसाच. वर मघाशी रडल्यामुळे डोळे सुजलेले. माझं मलाच हसू आलं. पटापट मी ती आभुषणं उतरवली. आणि पर्समधे टाकली. "शान, कुठेतरी चांगल्या ठिकाणीकार थांबव. मला मेकप काढायचा आहे." घरी जर या मेकपसकट गेले असते तर वेगळीच पूजा बांधली असती... "मॅक्डोनाल्ड्स्ला थांबू." त्याने उगाच सीरियसली उत्तर दिलं. मघासपासून तो हसू आवरण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात मला ते समज्लं होतं. उद्या ग्रूपमधे प्रत्येकाला त्याने फोन करून त्याने माझं वर्णन केलंच असतं. आणि जर कधी एकत्र भेटलोच तर मग माझ्या नक्कलसकट हे सर्व काही. "शान प्लीज. कामतमधे थांबू. तिथले वॉशरूम्स चांगले आहेत." "जशी तुमची मर्जी.. मी काय सध्या तुमचा ड्रायव्हर.." त्याने नाटकी अदबीने उत्तर दिलं. "व्यवस्थित तिकीट काढलं असतंस तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. आण काय रे? गेल्या चार वर्षात तु एकदाही माझं तिकीट विसरला नाही मग आजच कसं काय??" माझा मघाचा राग परत उफ़ाळून आला. "अगं कॉलेजमधे असताना रोज दिसायचीस त्यामुळे लक्षात रहायचं नेमका या वेळेला विसरलो." "हो ना, त्यामुळे ही ड्युटीकरावी लागतेय." तो खिडकीतून बाहेर पहात म्हणाला. "शान. सॉरी. माझ्यामुळे तुला इवाळीच्या दिवशी यावं लागतय." "सॉरी काय त्यात? तसंही आमच्या घरी दिवाळी नसते. वर्ष झालं कॉलेज सोडून. इतक्यात विसरलीस पण?" अचानक मला आठवलं. एशानचे बाबा पक्के नास्तिक होते. त्याच्या घरी कुठलेच सण साजरे व्हायचे नाहीत.
|
Akhi
| |
| Wednesday, November 14, 2007 - 8:18 am: |
|
|
मस्त पकड घेतेय कथा......
|
एशानचे आई बाबा हा आमच्या ग्रूपमधला गॉसिपिंगचा अतिशय आवडता उद्योग. एशान एकदा कॉलेजच्या कार्यक्रमाला एका छान मुलीला घेऊन आला होता. कुरळ्या केसाची. काळ्या डोळ्याची एकदम मस्त मुलगी होती. सर्वाशी त्याने पण ओळख पण करून दिली. मुलीचं नाव कांचन होतं. असेल पंचवीस सव्वीस वर्षाची. शेवटी कुणीतरी "ही तुझी कोण लागते रे?" हा शांतपणे. "माझी सख्खी आई आहे ती." ही मुलगी नसून बाई आहे आणि चाळीस वर्षाची आहे यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. इतका वेळ आम्ही सर्व जण त्याना नावानेच हाक मारत होतो. खुद्द एशानपण. भारीच इब्लिसपणा केला होता त्याने हा. अर्थात काकूही त्याला सामिल होत्याच. त्यादिवशी ग्रूपमधे सर्वानुमते ठराव पास झाला.."आई असावी तर अशीच.." गंमत म्हणजे त्या स्वत्: न्युरोसर्जन होत्या. पण त्याच्याकडे पाहिल्यावर इतकी कठीण ऑपरेशन्स त्या करत असतील असं वाटायचंच नाही. मी एशानच्या बाबाना मात्र कधीच भेटले नव्हते. तो त्यानासुद्धा एकेरी हाक मारायचा. मला या गोष्टीचं कायम अप्रूप वाटत आलं होतं. एशानच्या एकंदर बोलण्यावरून वाटायचं की त्याची आई जितकी मनमोकळी होती तितकेच त्याचे बाबा कठोर होते. कार पनवेलच्या पुढे आली होती. Nh 17 पकडला होता. ट्रॅफ़िकपण आता जरा कमी झालं होतं. एशानने जुन्या गाण्याची सीडी लावली होती. "तुला जुनी गाणी केव्हापासून आवडायला लागली?" मी विचारलं. "अगं, घाई गडबडीत निघालो ना. माझ्या सीडीज घेतल्याच नाहीत. परवा डॅड ही कार घेऊन गेला होता. त्याच्याच आहेत या सीडीज. पण बरं झालं ना तुला जुनी गाणी आवडतातच..." "हं.. नाहीतर तुझ्याबरोबर पाच सहा तास तो धांगडधिन्गा ऐकायचा म्हणजे विअताग आलाच असता ना.. " तो नुसतंच हसला. "रिचा कशी आहे?" "कोण रिचा?" "शान, तुझी गर्लफ़्रेंड.." "माहीत नाही... गेल्या वर्षभरात आम्ही भटलो नाही.." "काय सांगतोस? मला कायम वाटायचं की तु तिच्याबद्दल खूप सीरीयस आहेस म्हणून," "रिचा,,, आणि मी तिच्याबद्दल सीरियस?? नो वे.." "ओह.. बिच्चारी," "बिचारीकशाला? तिला आधीपासून माहित होतं. इन फ़ॅक्ट तिलाच मी पहिल्यादासांगितलं की मी कुणाबद्दल सीरियस अहे ते.,," "कुणाबद्दल??" "तुला माहीत नाही??" "नाही..." "अख्ख्या ग्रूपला मीहीत आहे आणि तुला माहीत नाही?" "शान, खरंच माहीत नाही.. सांग ना कोण आहे ती.." तो माझ्याकडे बघुन हसला. तितक्यात ओम शांति ओम वाजायला लागलं. "ओह आईचा फोन.." त्याने मोबाईल उचलत म्हटलं. "हा आई बोल.. नाही... पनवेलला आहे. पुण्याला कशाला जाऊ मी? नाही एका फ़्रेंडकडे चाललोय. बॉय असेल नाहीतर गर्ल फ़्रेंड आहे हे महत्वाचं... नाही उद्या परत येईन.... ओके.. हा... हेल्मेट कशाला? कार चालवत असताना पोलिस कशाला पकडेल? हो सीट बेल्ट टाकलेत गाडीत.. तु कुठे आहेस?... हो आपण नंतर बोलू.. चल बाय,, हो गं बाई हेड फोन घालुनच बोलतोय," त्याने मोबाएल ठेवला. "तुझी आई फ़ार काळजी करते ना तुझी?" मी सहज विचारलं. "हो तिला मी अजून पण कुकूलं बाळ वाटतो." वडखळ नाका गेलं आणी एशानने गाडी कामतच्या समोर लावली. मी वॉशरूमधे जाउन फ़्रेश झाले. चेहर्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटत होत. तोवर त्याने कॉफ़ी मागवली होती. माझ्यासाठी. आणि स्वत्:साठी लाईम सोडा. सहा वाजून गेले होते. आता हळू हळू हायवेवरचं रात्रीचं ट्रॅफ़िक वाढलं असतं. "अकरा वाजेपर्यंत आपण घरी पोचू." मी त्याला म्हटलं. "पण दिवाळी उद्या सकाळी असेल ना?' "सकाळी नाही पहाटे. उद्या साडेचारला पहिली अंघोळ." "ओह.. मग अजून आठ नऊ तास आहेत आपल्याला घरी पोचायला." "अरे पाच तासात घरी पोचू.." "नो.. उद्या साडेतीनला तू घरी पोचशील. मी शब्द दिलाय.." मला तो काय म्हणतोय हे समजतच नव्हतं. "आणि आपण इतका वेळ करणार काय आहोत?" उत्तरादाखल एशान फ़क्त गालातल्या गालात हसला.
|
Fanzarra
| |
| Wednesday, November 14, 2007 - 6:12 pm: |
|
|
nice story. can't wait. please write fast. thanks
|
Neelu_n
| |
| Wednesday, November 14, 2007 - 6:35 pm: |
|
|
नंदे आता एशानचे लग्न व्ह्यायच्या आधी ही कथा संपव बाई बरं 'तिच' नाव कळलं नाही अजुन.
|
Manuswini
| |
| Wednesday, November 14, 2007 - 9:08 pm: |
|
|
मला तर पक्का डाऊट आहे की एशान कथेतील नायीकेला पसंत करत असेल.(नंदीनी, राहवले नाहे म्हणून्म अध्येच पोस्टतेय)
|
Varsha11
| |
| Thursday, November 15, 2007 - 7:44 am: |
|
|
मस्तच चालु आहे. नंदिनी लवकर टाक ग पुढचे भाग फार वाट पहायला लावु नकोस हं.
|
Abhijat
| |
| Thursday, November 15, 2007 - 7:47 am: |
|
|
सुरेख कथा नंदिनी. पण ही पूर्ण मात्र जरूर करा रेहान सारखी अर्धवट सोडू नका.
|
Manogat
| |
| Thursday, November 15, 2007 - 11:28 am: |
|
|
नंदु, पुन्हा एकदा मस्त कथा ...लवकर टाक पुधचे भाग.. }
|
Akhi
| |
| Thursday, November 15, 2007 - 11:43 am: |
|
|
पुढचा भाग कधी मिळनार
|
त्याच्या बोलण्याचा मला अर्थच कळत नव्हता. "चल, पटकन आटप. उशीर होतोय.." एवढं बोलून तो उठला सुद्धा. "आता तर म्हणत होतास ना की पहाटे घरी पोचू, मग लगेच उशीर होतोय काय?" माझ्या बोलण्याकडे साफ़ दुर्लक्ष करत तो गाडीकडे निघाला. "काय विचित्र माणूस आहे..." मी पण वैतागले. तसाही एशान त्याच्या उलट सुलट वागण्यासाठी प्रसिद्ध होता. मनमानीपणा असाच त्याचा स्वभाव होता. कारमधे काहीतरी सोबत असावं म्हणून मी दोन चिप्सचं पाकिट आणि पाण्याची बाटली घेतली. "कशाला? गाडीत पाणी आहे. आणि आईने सॅंडविचेस दिली आहेत दोघासाठी. ती कोण खाणार?" एशानने मला विचारलं. "शान, तुझ्या आईला माहीत होतं की तू मला न्यायला येतोयस ते..." मी अजूनच चाट पडले. "तिला हे माहित होतं की मी लॉंग ड्राईव्हला चाललोय." त्याने गाडी हायवेवर आणत उत्तर दिलं. मघासपासून का कुणास ठाऊक मला भिती वाटत होती. तसा एशान चांगला मुलगा होता. पण तरीही त्याचं बोलणं मात्र मला गोंधळात टाकत होतं. तसंही साडेसहा वाजत आले होते. थंडीचे दिवस असल्याने अंधार पडायला लागला होता. "एक मिनिट... तुला माझी भिती वगैरे वाटतेय का?" त्याने माझ्याकडे न बघता विचारलं. "भिती कसली? गेली चार वर्षे ओळखते मी तुला.. " मी हसत उत्तर दिलं.. स्वत्:च्या समाधानासाठी. "घाबरू नकोस. माझ्या मनात काहीही वावगं नाहिये.." त्याने मघासारखे सीरियसली उत्तर दिलं. मला मात्र एकदम हसू आलं. "काय झाले?" त्याने विचारलं. "शान, एक तर तू माझी मदत करतोयस. मला घरी घेऊन जातोय. आणि वर हे विचारतोस की मला तुझी भिती वाटते का? जर तुझी भिती वाटली असती तर तुझ्यासोबत आलेच नसते. घरी खोटं सांगणार आहे मी... इतका विश्वास आहे माझी तुझ्यावर.." ""घरी काय सांगणार आहेस?" "हेच की मी बसने आले... तुझ्यासोबत आले म्हणून सांगितलं तर वाट लागेल माझी," "अं हं.. प्लान चेंज कर.. तू मला घरी घेऊन जाणार आहेस." "याड लागलय का तुला? बाबा बदडतील मला चांगलेच." "नाही बदडणार. मी सांगतो." "शान, माझ्या बाबाना मी नीट ओळखते. समजलं.? तू मला हायवेवर सोडणार आहेस. तिथून मी घरी फोन करेन बाबा नाहीतर दादा येऊन मला घेऊन जातील.. उगाच हीरो बनू नकोस. आजच्या दिवसात माझी वाट लावलीस तितकं पुष्कळ आहे.." "ओके. लेट्स सी, आगे आगे क्या होता है.." एक बैलगाडीवाला येऊन आम्हाला ओव्हरटेक करून गेला. इतकी आमची गाडी जोरात धावत होती. "शान. हायवेवर जरा स्पीडने चालव ना गाडी. सीटीमधे नाही आहेस आता..." "चिल यार.. काय गडबड आहे. उद्या पहाटे साडेतीनला पोचायचं आहे." आता मात्र मी शांत बसले. रफ़ीचं "अभी न जाओ छोडकर" चालू होतं. मी खिडकीमधून बाहेर बघत बसले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. आम्ही पोलादपूरच्या पुढे आलो होतो. ट्रॅफ़िक अपेक्षेप्रमाणे चालू झालं होतं. त्यातच शान कुणाचीही पर्वा नसल्यासारखा हळू हळू कार चालवत होता, "ही होंडा सीटी इतक्याच हळू जाते का?" मी विचारलं. "होंडा सीव्हीक आणि हिचा टॉप स्पीड २०० आहे. बघायचाय?" "नको.. अजिबात नको. चालव इतक्याच हळू चालव." मला अचानक कॉलजमधे त्याने नवीन गाडी चालवून दाखवलेली आठवलं. जवळ जवळ गाडी उडवलीच होती त्याने. आता रफ़ीची गाणी संपून मुकेश ची चालू झाली होती. "सुहानी चांदनी राते. हमे सोने नही देती...." "चांदणं तर कुठे दिसतच नाही.." "गधड्या आमवस्या जवळ आली.. " "अरे पण उद्या दिवाळी आहे ना.." "शान, दिवाळी अमावस्येच्याच रात्री असते. " "हो का? मला काय माहीत. आम्ही मिशनर्याच्या शाळेत शिकलेले." "शान, प्लीज.." "अगं चिडतेस काय? माझ्या आईच्या घरी दिवाळी वगैरे करतात. पण तिथे आम्हाला कुणी बोलवत नाही. आणि डॅडकडे तर कायमचीच दिवाळी आहे" "शान तुझी आई मराठी आहे ना?" "मग काय मजा म्हणून इतकं चांगलं मराठी बोलतो का? कंचन पुणेरी मराठी आहे. म्हणून तर..." मला कॉलेजमधे कुणीतरी सांगितलेलं आठवलं.. एशानचे आई बाबा ते दोघं कॉलेजमधे असल्यापासून एकत्र होते. तेव्हाच त्याचं प्रेम जमलं होतं. एशानची आई अवघी अठरा वर्षाची होती तेव्हा त्यानी लग्न केलं अर्थात कारणही तसंच होतं. लग्नानंतर सहाच महिन्यानी एशानचा जन्म झाला. त्याला संभाळून नवर्याची फ़िरतीची नोकरी सांभाळत त्याच्या आईने मेडिकल पूर्ण केलं होतं. पण त्याच्या आईचं तिच्या घराशी संबंध सुटला ते कायमचं.... "कसला विचार करतेयस?" त्याने मला विचारलं. "काही नाही. तुझ्या आईने तुला कसं संभाळलं असेल त्याचा विचार करतेय." "कधीतरी आईला विचार. ती सांगेल तुला बसून. ती एमडीचा अभ्यास करायची आणि मी स्कूलचा होमवर्क. डॅड सांगत होता की मला बोर्डिंग स्कूलला पाठव म्हणून.. पण तिने कधीच ऐकले नाही.. I am so proud of her. मी त्याच्याकडे बघून हसले. आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. एकदम छोटा, एकेरी रस्ता. एकसुद्धा गाडी रस्त्यावर नव्हती. "शान, आपण रस्ता चुकलोय. हायवे नाहिये हा.." मी ओरडले. "मी बरोअब्र रस्त्यावर आहे. डोंट वरी... " तो म्हणाला, "अरे शान पण बाहेर बघ ना." "काही नको, मला माहीत आहे आपण कुठे चाललोय ते." मला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. माझ्या मोबाईलला रेंज नव्हती. बाहेर मिट्ट काळोख होता. रस्ता कुठे चाललाय हे समजत नव्हतं. आता मला मात्र भिती वाटायला लागली. शान काहीच बोलत नव्हता. मी परत एकदा मोबाईल पाहिला. रेंज नव्हतीच. तरीही घरी कॉल लावला. "घाबरू नकोस. मी तुला व्यवस्थित घरी पोचवेन. माझं प्रॉमिस आहे तुला." एशानने बाजूला गाडी थांबवत सांगितलं. "पण आपण इथे का थांबलोय? आजूबाजुला तर काहीच नाही.." "चल बाहेर उतर.." "नको.. मी नाही. चल परत जाऊ या.." मी फ़क्त रडायची शिल्लक होते. "मूर्ख... खाली उतर. आणि बाहेत ये." एशान परत एकदा खेकसला. त्याच्या या ओरड्यावरून का कुणास ठाऊक मला सर्व काही नीट असल्याची खात्री पटली. कारच्या बाहेर आले तर थंड वारा अंगाला लगेच झोंबला. इकडे तिकडे नजर फ़िरवली... आमची गाडी एका दरीच्या टोकाला उभी होती. समोर डोंगरच डोंगर दिसत होते. अंधारामधे काळे काळे. मधेच कुठेतरी लकाकणारा एकाद दिवा. वर आकाशात चंद्र दिसत नव्हता. त्यामुळेशाळा सुटल्यासारख्या चांदण्या धावत होत्या. त्याचा मंद प्रकाश वेगळाच वाटत होता. आमच्या कारचे हेडलाईट्स सुद्धा बंद होते. त्याअंधुकशा प्रकाशात एकदम वेगळंच वाटत होतं. "मागच्या वर्षी आम्ही इथे ट्रेकला आलो होतो तेव्हा अडकलो होतो. खूप आवदली ही जागा मला. म्हणून तुला घेऊन आलो. आता पण माझी भिती वाटतेय का?" एशानने हळूच विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं. "सॉरी," मी इतकंच म्हटलं. "अंहं इतक्या ईझीली नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे." "आता तू काय माझी घटक चाचणी घेणार आहेस का?" "नाही. एकच प्रश्न आहे.. पण मला खरं खरंउत्तर हवय.. " तो हसला आणि हळूच म्हणाला. "माझ्याशी लग्न करशील?" क्रमश्:
|
अप्रतिम! खुपच सुंदर... सलग वाचायला आणखी मजा आली असती. पुढचे भाग लवकर पोस्ट करा,म्हणजे परत एकदा सगळी वाचता येईल
|
|
|