|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:33 am: |
|
|
तो आणि ती "हाय ब्युटी!" ,"हँव अ लवली फ़िगर!!!!" या वाक्यांच्या मालकाकडे तिरस्काचाही कटाक्ष तिची ईछा नव्हती.पण नेमकी एक सायकल मध्ये घुसली अणि करकचुन ब्रेक दाबावा लागला.तेव्हढ्यात "तो"माणूस हसताना दिसला.पुन्हा काहीतरी कॉमेंट मित्राकडे बघुन! कीव आली!! असल्या वासनांच्या आधीन असणार'या माणसाची कीव येणार नाही तर काय!एनी वे,असले पुळचट, बकवास लोक रस्त्यात आडवे येतच राहणार! भाजी घ्यायची आहे.सामानाची यादी टाकायची आहे,गणपति साठी मखर......कामाच्या यादीची मनात उजळ्णी करत ती निघुन गेली.
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 8:51 am: |
|
|
"पुढच्या शनिवारी रोहीत च्या मुलाचा वढदिवस आहे.त्या निमीत्ताने त्याने कंपनी मधल्या काही लोकांना ईन्व्हाइट केला आहे".तो म्हणाला. "ओ. के.जाऊयात.ए पण फ़ार रात्र नको हं करायला,मला आवडत नाही-----" पुढची वाक्ये न बोलु देता त्याने सर्व काही माहीत असल्यासारखी मान हलवली आणि "जी हुजूर" म्हणून "महाराजा" सारखा खाली जूकला-----मिश्किल पणे. "असा ना, हा खुपच गोड दिसतो."----तिच्या मनात आलं. आणि इतकं "मस्त मॉडेल" आपल्याला मिळाल्याबद्दल क्रुद्तन्यतेने भरून पावली.
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 8:57 am: |
|
|
"आवरा हो मँडम लवकर,नाहीतर उरले सुरले केक चे तुकडे यायचे वाट्याला". "हा ना जरा 'हाच' आहे. आत्ताच तर दुपारी प्रियाला मदत करुन आलेय्--वढदिवसाच्या तयारीसाठी". "थांब रे जरा,आवरतेच आहे."
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 9:32 am: |
|
|
"छान ज़ालेत ग छोले."ती प्रियाला म्हणाली."हो आणि गाजर हलवा सुध्धा"--प्रियाने तील म्हटले. "असं स्वतःच एकमेकींच कौतुक काय करताए?आमचीही मतं घ्या की."तो आणि रोहित एकदमच म्हणाले. "तुमची मतं माहीत आहेत आम्हाला!" ------------------------------------------------------- "नमस्कार!" "अगं,हा आमच्या ऑफ़ीस मधला मित्र,चव्हाण."इति तो. "नमस्कार!" "आणि हि स्मिता,माज़ी बायको."--चव्हाण. "नमस्कार!मी मैत्रेयी"---ती. ---------------------------------------------- "अरे ९ वाजत आले. चल ना घरी आता. अजून किती वेळ?" "थांब गं जरा.खूप दिवसांनी सगळे जमलेत. थोडा वेळ थांब न जरा." "रेवती,अगं घे नं अजून.लाजू नकोस. आणि मैत्री,तू जरा हिच्याकडे लक्श दे,मी जरा जाऊन येते." प्रिया दुसरीकडे गेली,आणि ती रेवती शी गप्पा मारु लागली. तेव्हढ्यात जोरात हसण्याचा आवाज आला,तिने सहजच त्या दिशेने पाहिले.तिचा "तो" मैत्रिणींच्या घोळक्यात होता.जोक्स चालले होते,चेश्टा मस्करी,हसणं सुरु होतं.तशी त्याच्या सगळ्याच मैत्रिणींशी ओळख होती.त्यामुळे हे काही नवीन नव्हतं.त्याचा स्वभाव सरळ आणि ओपन आहे हे तिला माहीत होतं.तो आपल्याशी "छक्के पंजे" करणार नाही,याबद्दल तिच्या मनात विश्वास होता. त्या अर्थाने ती स्वतः मात्र शांत आणि इंट्रोवर्ड होती. रेवती छान मुलगी होती."गाण्याची आवड,नाटक सिनेमा बघण्याची आवड आणि बर्याच गोश्टी सिमीलर निघाल्या. ति रेवती शी गप्पा मारण्यात रंगून गेली.पण मान मात्र मधूनच "त्या" दिशेला वळत होती.
|
Aashu29
| |
| Thursday, October 04, 2007 - 9:46 am: |
|
|
अनघा, छानच, पन इतके short भाग का टाकलेस?
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 10:49 am: |
|
|
"अरे यार!हाय! किती दिवसांनी असा भेटलास रिलँक्स मूड मध्ये. नाहीतर ऑफ़िसची कामं भेटुच देत नहीत आपल्याला. आणि काय रे काय करत होतास त्या हरीणीं च्या कळपात? च्यायला मज्जा आहे यार तुज़ी! साल्या आपलीही ओळख करून दे ना त्यांच्याशी,आम्हाला पण आवडेल सुंदरींच्या सहवासात रहायला." आवाज खूप ऐकल्यासारखा वाटला,पण कपाळावर आठी आली तिच्या. "तू बायको आणि मुली सोबत आला आहेस?कुठे आहे तुज़ी छकुली?" त्याने विशय शितफ़ीने बदलल्याचे तिला जाणवले.पण मनात प्रश्नचिन्ह उमटले. तेव्हढ्यात त्या मित्रची छकुली आणि तिची आई आल्याचं जाणवलं. "त्या"ने "ती"ला बोलावून घेतले आणि ओळख करून दिली,"हा आमच्या ऑफ़िस मधल पाटील!" तीने "नमस्कार!" म्हणून त्याच्याकदे पहिल्यांदाच समोरून व्यवस्थित पाहिलं. मनातला तो जूना तिरस्कार्--दाबून ठेवलेला--उफ़ळून वर आल. त्याच्या "नमस्कार!" ऐवजी "हाय ब्युटी,हँव अ लवली फ़िगर...." ही वाक्यं कानावर येउन आदळली. "तोच हा! लोचट साला!"तीला शरम वाटली.दुसरीकदे मान वळवावी अस वाटलं. "पण क?तुला क लाज वाटते?तू काय केलंस?"तिच्या मनाने विचारलं. "हो,मी का म्हणून लाज वाटून घेऊ?माज़ी मान ताठच अही ना?शरमेने तर त्याची मान ज़ूकली पाहिजे. तिने ताठ मानेने, करारी मुद्रेने त्याच्या नजरेला नजर देऊन पाहीलं. तो ओशाळला. खाल मानेने, खोल आवाजात म्हणाला "नमस्कार! आणि हि माज़ी बायको--"एक गोद,हसरा चेहरा समोर आलाॅहेहर्यातच एकप्रकार चा साधेपणा,सत्विकता होती. "या माकडाच्या गळ्यात हा हीर्याचा हार!" "बाकी गाढवाला गुळाची चव काय म्हणा! तो बाहेर ऊकीरडेच फ़ुंकायला बघणार!" संताप संताप होत होता.पण ती जरा मोठ्या,करारी आवजात त्याच्याशी बोलंत होती.तो नजर चुकवित बोलत होता.शेवटी त्याने काढता पाय घेतला.
|
Ana_meera
| |
| Thursday, October 04, 2007 - 11:02 am: |
|
|
छान लिहितेस अनघा तू.... पुढच्या भागाची वाट पहातेय..
|
Jhuluuk
| |
| Thursday, October 04, 2007 - 11:24 am: |
|
|
अनघा, मस्त लिहितेयस, येउ दे अजुन...
|
Manjud
| |
| Thursday, October 04, 2007 - 11:51 am: |
|
|
अनघा, छान चाललंय. घाईघाईत टायपू नकोस आणि पोस्ट करायच्या आधी प्लिज शुद्धलेखन तपासून बघ, नाहितर वाचणार्याचा इंटरेस्ट कमी होतो....
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 12:04 pm: |
|
|
मंजू, मान्य आहे मला,पण "तुज़ी" मधल "ज़" (लक्शात आल न?) कसा लिहायचा तेच कळत नहिये मला. बाकी तुज़ी सूचना मला मान्य आहे, "वाचणर्याचा इंटरेस्ट कमी होतो" यामध्येही अर्ध "र" कसा लिहायचा ते माहीत नाही.
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 12:12 pm: |
|
|
"हम्म्म......दमलो बुवा!उद्या रविवारच अहे, मस्त पैकी ताणून द्यावी उशीरा पर्यंत.पण मन्या त्य्ज़्या द्रुश्टीने मात्र जरा उशीरच ज़ाला.पण काय आहे ना,खुप दिवसांनी सगळे जण रीलँक्स मूड मध्ये होते.त्यामुळे मी पण विचार केला थांबायचा." "हं तीच तटस्थ प्रतिसाद त्याच्या लक्शात आल्यावाचून राहीला नाही.त्याच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह होते.पण रात्रीचा ऊशीर केलेला तिला आवडत नाही,हे त्याला माहीत होते. त्यामुळेच जरा चिडली असेल असा विचार त्याने केला. "पण डर्लिंग,आज जरा जास्तच गोड,स्मार्ट दिसत होतीस तू--" "म्हणजे? रोज नाही दिसत?"तिचा चिडलेला सूर.... "तूम्ही मुली म्हणजे ना! कौतुक कराव तरी पंचाइत आणि न कराव तरी!" "बरं तुज़ा गाजर हलवा मस्तच ज़ाला होता.तू प्रियाला मदत केल्यामूळे,तिचा भार हलका ज़ाला,असं रोहीत म्हणत होता मला.मी म्हटल आहेच माज़ी राणी हेल्पफ़ूल". "पूरे ज़ाल कौतूक. आता ज़ोपा..." "का बरं ज़ाली असवी अस्वस्थ ही?"त्याच्या मनात विचार आला. "त्या साळकाया माळकायांच्या घोळक्यात माज़ी आठवण तरी ज़ाली क?त्यांच्यातली नव्हती का कोणी माज़्यापेक्शा स्मार्ट आणि गोड दिसत आज?" "ओऽऽऽह आय सी!!! अं अं---- कोण बरं तुज़्यापेक्शा गोड दिसत होतं?ती? नाही नाही, मग ती? अं किंवा-----" "शट अप!!!"तिने एक ऊशी त्याला फ़ेकून मारली.त्याने ती हसत हसत चुकवली आणि तील चिडवू लागला.ती रडकुंडी ला आली. तो थांबला,तिच्या जवळ जाऊन म्हणाला,"कमॉन डार्लिंग, यू नो. त्या सगळ्या माज़्या फ़क्त मैत्रीणी आहेत.तुज़्याही ओळखीच्या आहेत.आधीहि आम्ही चेश्टा मस्करी करायचो.म्ग आजंच अस काय? तिच्या डोळ्यात पाणी आलं.त्याला लक्शात आलं,हे काहीतरी वेगळ आहे. त्याने तिच्या केसांतून हळूवारपणे हात फ़िरवला.म्रुदू आवाजात म्हणाला,"राणी.काय ज़ाला?काया घडलं?मला मोकळेपणाने सांग.तुला महीत आहे, तुज़ी गोश्टं पटली जरी नाही तरी त्याचा मी तूज़ा मत म्हणून आदरच करतो,धुडकावून लावत नाही." "तो तुज़्या ऑफ़ीस मधला पाटील....." "तो? त्याचं काय?बाकी छकुली गोड आहे त्याची.बायको पण चांगली मिळलीये.पण हा माणूस्----जाऊ दे." "हो बायको चांगली मिळलीये.गोड साधी पण मला 'बिच्चारी' वाटली ती." तो चमकला.कोणाची अश्याप्रकारे कीव करण्याच स्वभाव नव्हता तिचा. "राणी,काय ज़ाल?नक्कीच वेगळं काहीतरी आहे तूज़्या मनात." ती त्याच्या डोळ्यांत काहीतरी शोधु लागली. "मन्या,मी तुला नक्कीच ओळखतो.तुज़्या मनात कहीतरी वेगंळ आहे." तिचा चेहरा थोडा रीलक्स ज़ाला. "आपण वेगळे आहोत का आता राणी?तुज़ा चेहरा,तुज़ा स्पर्श,बोलण्याचं टोनींग यावरूनच तुज़ी मानसीकता समजते मला. निश्चिंत पणे बोल."
|
Ana_meera
| |
| Thursday, October 04, 2007 - 12:12 pm: |
|
|
"झ" साठी- jh टाईप कर.. अर्ध्या र साठी shift दाबून R दाब..
|
Anaghavn
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:31 pm: |
|
|
धन्यवाद अँना. आता ट्राय करते.
|
Mankya
| |
| Friday, October 05, 2007 - 1:25 am: |
|
|
अनघा .. हे असं लिहून बघ पाहू - tuu jhyaa - तू झ्या ri la.c aks - रि लॅ क्स la kShaa t - ल क्षा त che ha Ryaa var - चे ह र्या वर go ShTa - गो ष्ट dRu ShTii ne - दृ ष्टी ने maa jhyaa pe kShaa - मा झ्या पे क्षा mRu duu - मृ दू जमत असेल तर आधीचे भागही Edit करुन टाक, जास्त पुढे सरकली नाहियेच नाहीतरी कथा. अर्थात वाचायला मजा येईल हे वरचं दोघातील Conversation ! माणिक !
|
Anaghavn
| |
| Friday, October 05, 2007 - 11:22 am: |
|
|
धन्यवाद! माणिक. आता मी जास्त शुध्द लिहिन. पण सॉरी,मला आधीचे पोस्टस एडीट करायला परमीशन मिळाली नाही.
|
Anaghavn
| |
| Friday, October 05, 2007 - 12:09 pm: |
|
|
"...........................!!" तिने त्या दिवशीचा प्रसंग सांगितला.सांगताना रागाने,संतापाने धुसफ़ुसत होती ती. "शी!!! या इतक्या चिप लेव्हल वर जाऊन मुलींवर कॉमेंतटस करायच्या?" "राणी तो तसाच अहे.तू दुर्लक्ष्य कर. असे अनेक लोक भेटतात. आता मला कळल,तो नजर का चुकवत होता ते.एनी वे,पण हे सांगताना तुला इतका वेळ का लागावा? माझा विश्वास बसणार नाही असं वाटल का तुला? "नाही,..." "बोल राणी.." "राजा---"तिच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.तो अस्वस्थपणे तिच्याकडे पाहू लागला.... आवंढ गिळून ती शब्द जुळवू लागली. "मन्या,मला आज त्याच्या बायकोची खरंच खूप कीव वाटली.किती अनभिज्ञ वाटली ती नवर्याच्या तसल्या स्वभवबद्दल!! इतकी गोड,साधी मुलगी! आणि नुसत्या साध्या कॉमेंटस करण एखादी मुलगी पटकन आवडून जाण या गोष्टी समजू शकते मी.पण तो ज्या बरबटलेल्या नजरेने बघतो,मुलींचा ज्या लेव्हल वर जाऊन विचार करतो---खूप बिच्चारी वटली मला ती....तसल्या माणसाबरोबर बायको म्हणून रहावं लागताय." तो लक्षपूर्वक ऐकत होता "मन्या--" तिने त्याच्याकडे क्षणभर पाहिलं,आणि मान लगेच दुसर्या दिशेला वळवली.तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी होत.ती अजूनच अस्वस्थ झाल्याचं त्याला जाणवलं. कसाबसा आवंढा गिळुन ती बोलली, "माझी अशी कोणी दुसरी मुलगी कीव नाही ना करणार?मला नाही आवडणार ते?" तो स्तब्ध! ती अस्वस्थ!! त्याच्या मनात तिच्या सगळ्या बोलण्याची,वागण्याची उजळणी झाली.तिला नक्की काय म्हणायचे आहे, ते त्याच्या लक्षात आले. आश्वासक पणे तिचा हात त्याने आपल्या हातात घेतला. "राणी,मला तुझ्या मनाची अस्वस्थता समजतेय. आणि, डोंट वरी,मला अजिबात राग आला नाही.पण पुन्हा एकदा सांगतो.मी त्या लेव्हल वरचा माणूस नाहीये.मुलींचा,स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार अहेत माझ्यावर.माझ्या बयाच मैत्रिणी आहेत.त्या मझ्याशी मोकळं बोलतात.पण तू हा विचार करू शकतेस,त्यांना मझ्याशि मोकळं का बोलाव वाटत?त्यात थिल्लरपणा असता, तर त्या पाटील कडे गेल्या नसत्या का?माझ्याकडे का आल्या असत्या?आज जर ऑफ़िस मध्ये एखाद्या लांब राहण्यार्या मुलीला ११ नंतर उशीर होणार असला, तर तिची आई मला रिक़्वेस्ट करते घरी सोडण्यासाठी.तिची आई माझ्यावर विश्वास का दाखवते? त्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल एक मित्र म्हणून विश्वास, आदर असतो,तो का असतो? तूला हे मी मागेही सांगितले आहे,प्रत्येक नात्यात एक मर्यादा असते.ती ओळखली तर ते नातं आणि त्यामुळे इतर नातीही सुंदर होऊ शकतात, होतात.त्या नात्याचा आपण आनंद घेऊ शकतो.या मैत्रीच्या मर्यादा मला माहीत अहेत,आणि प्रत्येक क्षणी मला त्याचे भान असते.मी अशांशीच मैत्री वाढवतो,ज्यांना त्या मर्यादेची जाणिव असते. राणी तू मला जशी आवडलीस,आवडतेस तशी दुसरी कुठलीच मुलगी आवडू शकणार नाही. अघळपघळ पणा माझ्या स्वभावातच नाही,पण कुणाच्या मागे लो लेव्हल वर जाऊन बोलण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत.मला न पटणार्या गोष्टी आहेत त्या. आणि मी समोरून लढणार्यातला आहे,पाठीवर वार करणार्यातला नाही.एखादी मुलगी छान वाटली,तर मी तुला ते सरळ सांगू शकतो.मनात मांडे खात बसत नाहि.म्हणूनच मी नजरेला नजर देऊन बोलू शकतो--कुणाच्याहि." "तुला जशी पाटील च बायको ची कीव वाटलि,तशी तुझ्याबद्दल कुणालाही वाटणार नाही,याबद्दल निश्चिंत रहा. आय प्रॉमीस यू." तिचं शरीर हुंदक्यांनी गदगदंत होतं. आणि तो शांत मोकळा. ती त्याच्या जवळ गेली,हातात हात घेतला.बोलता येत नव्हतं,भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहण्याच प्रयत्न करत होती. "आय एम सॉरी राजा--"कशीबशी ती बोलली. त्याने तिला जवळ घेतले.ती हमसाहमशी रडू लागली.त्याच्या डोळ्यापुढची भिंतही धूसर झाली होती. "वेडाबाई,यामुळे अस्वस्थ झाली होतीस?लव्ह यू डियर!" "शोना,---आय लव्ह यू टू." "आता डोळे पुसा,मी मस्त कॉफ़ी करतो." "अरे हो,तू मघाशी विचारत होतीस ना,आज मझ्यापेक्षा कोण गोड, स्मार्ट दिसत होती म्हणून? ती,हाय बरं नाव तिचं?"अ.. .. अं......" "शट अप यू!!"तिने त्यच्याकडे ऊशी फ़ेकली. तो हसू लागला,तिनेही त्याला साथ दिली. "आणि हो,कॉफ़ी मध्ये जायफ़ळ घालू नकोस,मला आवडत नाही माहीत आहे नं?" "जी हुजूर!"--तो "महाराजा" सारखा वाकत म्हणाला. "हा का असा गोड आहे?"---मनात विचार करत ती त्याच्या पाठोपाठ गेली--त्याच्या मते शेपटासारखी!! समाप्त!
|
Itgirl
| |
| Friday, October 05, 2007 - 12:34 pm: |
|
|
क्यूट लिहिल आहे अगदी आवडल
|
Chetnaa
| |
| Friday, October 05, 2007 - 4:05 pm: |
|
|
अनघा, खरच क्युट लिहिलस.. आयटीने अगदी नेमका शब्द निवडला...
|
Ana_meera
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:06 am: |
|
|
छान लिहिलेस ग अनघा.. आणि पटापट लिहिलेस ते विशेष!
|
Manjud
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:23 am: |
|
|
अनघा, छान लिहिलंस, आवडलं.
|
|
|