|
Gobu
| |
| Friday, September 14, 2007 - 9:10 pm: |
|
|
(१) दिनांक्: १२ जुन २००६ वेळ्: सकाळचे १०.०० "Mittal Pharmaceuticals Private Limited"चा भव्य दिव्य बोर्ड वाचुन मी हळुच आत शिरतो… आज MD राजिन्दर सिन्ग यान्च्याशी appointment आहे १०.२० ची... २० मिनीटे आधी पोहोचलो पण आता काय करायचे बुवा? मी केबिन समोरच्या खुर्चीत जाऊन बसतो आणि बैगमधील पेपर काढुन नजर त्यावरुन फिरवु लागतो Mittal Pharmaa… head office: Ahmedabad…total 22 branches…more than 3000 employee… staff above 500 … turn over 310 coroes… profit in last fiscal year 185 crores.. 34 products…17% growth last year… ambitious plan of introducing 9 new products in this year… exports to 6 countries in Africa and Asia… an Indian multinational ! "Mr. Madhav deshpande… please come in" मी receptionist च्या सोबत जाऊन MD च्या केबिन समोर जाऊन ऊभा रहातो… "may I come in sir?" "come in" आवाज रुक्ष वाटतोय! मी समोरच्या खुर्चीवर जाऊन बसतो समोर अंदाजे ५० ते ५५ वयाची व्यक्ती, गोरापान चेहरा, सफ़ेद दाढी.. मी माझी फ़ाईल पुढे करतो "sir, I am Mr. Madhav.." "oh yes! So u r the selected candidate!!" "sir" माझी file बारकाईने पहात असतानाच ते पुटपुटतात... "well, Mr. Madhav, I never bothered about awards and achievements" "..." "what I really bothered is efficiency and commitment!!" "sir" "Our company needs efficient people who will contribute to it !" "Yes sir" "well, from tomorrow u will be the Production Manager of the company, ok?" "sir" "u will be heading the unit, and Miss sarah will assist u" "sir" "ok, so today u can go and have a word with sarah" "sir" "Mr.Madhav" "sir" "Let me tell u something, u r the 5th Production manager we r having in last 2 years!" "..." "I kicked the rest!" गडगडाटी हास्य करत MD म्हणाला "..." "No work…No job" "…" "u may go now" "thank u" मी हळुच केबिनबाहेर पडलो "स्साला! माणुस आहे की राक्षस!" (२) दिनांक्: २८ जुन २००६ वेळ्: सकाळचे ०९.४० "साराSSSS…साराSSSS" "yes sir” चेहर्यावर हास्य कायम ठेवत सारा हजर "अरे वो फ़ाईल देना last meeting के minutes देखने है" "yes sir" "और वो कल trend analysis बताया था, उसका क्या हुआ?" "सर, actually मैने कल वो देखा था.." "साराSSSS" "yes sir" "make it short!" "आज शामतक मिलेगा" "और वो market research का रिपोर्ट?" "हो जायेगा सर" "मुझे आज चाहीये, किसी भी हाल मे!" "और वो finance का फ़ाईल? रामजतन को बताया था कल" "सर वो actually" "साराSSSS, make is short!" "सर, रामजतन आया नही अभी तक' इतक्यात रामजतन समोर उभा... भुत का नाम निकालो और भुत हाजिर! "रामजतनSSSS" "जी साब" "कल मेहतासे फ़ायनान्स का पेपर लानेको बोला था क्या हुआ?" "साब, मै गया था मगर साब ऑफ़िस मै नही थे" "तो? तो दुबारा क्यो नही गया?" "फिर मैडम ने बताया फोटुकोपी करानेका है, सो हम वहा गये, उसके बाद.." रामजतन ने पाल्हाळ लावायला सुरु केले "इतनी लम्बी लम्बी जबान चलाता है, पर एक काम नही कर सकता" "साब" ईतक्यात सारा मधेच... "रामजतन, अभी जाओ और तुरंत लेके आओ, उनको बोलो सर को अभी चाहीये, अभी, ओके?" "जी मैडम" रामजतन बाहेर पडलाय "सारा" "yes sir" "तुझं नाव सरस्वती नाडकर्णी आहे ना? then why everyone is calling u sarah?" साराचा चेहरा खुलला… "sir, actually it is short form, and I like it , short and sweet, isn’t is nice? छान हे नै?"…तीला मधेच थांबवत मी विचारतो "वो फ़ैक्स का फ़ाईल निकालना जरा" "येस सर" लगबगीने ती जाते बाकी ही कन्या तशी काम करायला चांगली आहे पण खुप हसत असते… …खुपच! "पूरे ऑफ़िस को आग लगेगी तो भी ये हसती रहेगी!" (३) दिनांक्: २३ जुलै २००६ वेळ्: सायंकाळ ०६.४० मी टेबलावरचे सर्व काम संपवुन निघालो सारा आणि रामजतन ला ५.३० वाजताच जायला सांगितले होते बाहेर पडणार तेवढ्यात Marketing section मधुन प्रकाश चमकला केबिन मध्ये गेलो आणि पहातो तर जाकीर बसला होता सर्व filesच्या गराड्यात! जाम टेंशन मध्ये वाटत होता सोबत HR चा त्याचा मित्र केतन ही होता मी विचारले.. "जाकीर, कैसा है? कुछ काम है क्या?" "ठीक हु यार, बस थोडा काम था" "और तुम्हारी PA कहा है?" "आज emergency छुट्टी लेके गयी है" "अच्छा, क्या काम है?" "बॉस को updated data चाहीये, और वो भी कल सुबह तक, सब फ़ाईल्स ढुंढनेको ही ४ बज गये, अब analysis कर रहा हु" "तु जरा हट तो, मै देखता हु" मी त्याला बाजुला करुन computer समोर बसलो काम जरा क्लिष्टच होते… बर्याच फ़ाईल्स मधुन माहीती काढयची होती… data management मध्ये प्रचंड गडबड ...केतनने ३ वेळा चहा आणला...काम करता करता वेळ कसा गेला ते कळालेच नाही… काम संपले तेव्हा घड्याळात पहाटेचे ३.२५ झाले होते! झाकीर motorcycyle वरुन घरी सोडायला आला होता जाताना म्हणाला.. "माधव, thanks yaar, without ur help.." मी त्याला मधेच थांबवत म्हणालो.. "चल छोड, अब घर जा, कल बॉस को रिपोर्ट दिखाने का है या नही?" तो हसत हसत निघुन गेला (४) दिनांक्: १८ ऑगस्ट २००६ वेळ्: सकाळ ०६.४० "ट्रिन्ग ट्रिन्ग" कुणाचा फोन असणार या वेळी? "हैलो?" मी अर्धवट डोळे उघडुन विचरतो "हैलो माधव" "ह…" "ए दगडा, ए ठोम्ब्या,.. झोपेतुन उठ!" "बोल" "सन्ध्याकाळचे ७ वाजताहेत आणि चक्क तु झोपला आहेस?" "इकडे ६ झालेत, पहाटेचे!" "अच्छा ऐक, एक चांगली ऑफ़र आहे, माझ्या companyची एक parent company आहे, तिच्यात vacancy आहे, तुला नक्की मिळेल, biodata माझ्याकडे आहे, ती मेल केलीय ती वाच, कळल?" "नाही कळल!" "माधवSSSS" "बोल" "तुला अमेरिकेची allergy आहे का रे?" "ऐकतोय मी" "तु दगड आहेस!" "thank u!" "बर मेल वाच आणि विचार कर, नको नको विचार करु नकोस, सरळ रिप्लाय कर, ओके? बाय!" "बाय" हा पैडी माझा बालमित्र शाळेपासुन बरोबरचा, कोलेजमध्येही बरोबर अगदी घनिष्ट मित्र अगदी सख्ख्या भावासारखा आज अमेरिकेत लठ्ठ पगाराच्या नोकरीवर आहे दर महीन्याला मला तिकडे बोलवतोय आणि मी दर महीन्याला त्याला नकार देत आलोय! काय करणार तिकडे जाऊन? पैस अडका मिळेल, प्रोपर्टी मिळेल्… पण सुख मिळेल याची काय गैरन्टी? तिकडे जाऊन परत इथे आलेले काय कमी आहेत का?... हम तो बस यही पे खुश है… अपनी तो दुनिया यही है… जैसी भी हो... I love this! (५) दिनांक्: ३ सप्टेंबर २००६ वेळ्: सकाळचे १०.०० सकाळचे १० वाजलेत प्रचंड कामे खोळंबलीत आणि वर या रामजतनचा पत्ता नाहीय "साराSSSS…साराSSSS" "येस सर" ईतक्यात रामजतन समोरुन येताना दिसला "रामजतनSSSS" "जी साब" केविलवाणा सुर्… काहीतरी चुकल्यासारखे वाटते आज्… "क्या प्रोब्लेम है" त्यला वरपासुन खाली न्याहाळुन मी विचारले "साब…" "हा.. हा.. बताओ" "साब हमार औरत की मौसी बीमार है, पिछले २ दिनसे अस्पताल मे है अन्धेरीमे, सगी मौसी है साब.." तो जवळ जवळ रडायलाच लागला "तो?" "हमार औरत कल सुबहसे जानेकी रट लगाई बैठी है, साब, अनपढ गवार अकेली औरत कैसे जायेगी?" "रामजतन, छुट्टी चाहिये तो MD से मिल" "ना बाबा ना, पिछले हफ़्ते ही छुट्टी लिया था साब" "ह्म्म्म…" "रामजतन, तुम विरार मे रहते हो ना? और मौसि अभी है अन्धेरी मे?" "जी साब" "तो तुम आज अगर जरा जल्दी याने ४ बजे यदी यहासे निकल गये तो कल १२ बजे तक आ सकते हो क्या?" "बिल्कुल साब" "तो…ठीक है…बाकी मै देख लुंगा" "बडी मेहरबानी हो गयी साब!" रामजतन खुष झाला "साराSSSS…" "येस सर" "आजका जो भी काम है, इसे अभी बता दो, अगर इसने ४ बजे तक किया तो ठीक, नही तो.." "हो जायेगा साब, हम कर देंगे" रामजतन मधेच बोलला "I got it sir, I got it " सारा हसतेय्… किती गोड हसतेय.. (६) दिनांक्: १० नोव्हेंबर २००६ वेळ्: रात्रीचे ९.०० आज ऑफ़िस चा "Annual function day" ... म्हणजे काय तर पार्टी डे!...एन्जोय!! ऑफ़िस मधले सर्व हजर झालेत वातावरण मंद सुरानी कसे भारुन गेलेय आणि सर्व मंडळी कशी नटुन थटुन आली आहेत मी आणि झाकिर एका कोपर्यात उभे राहुन सर्वाना न्याहाळतोय्… … My GOD! सारा किती सुंदर दिसते आहे आज्… कित्ती गोड हसतेय्… कित्ती बोलतेय्… कित्ती हातवारे करतेय्… ऑफ़िस मध्ये एवढी खुश कधी पाहीली नव्हते साडीत थोडी गुटगुटीत दिसतेय खरी, पण फ़िक्कट अबोलि रंग काय शोभुन दिसतोय तिला! तशी दिसायला ती प्रचंड सुंदर अशातला प्रकार नाहीय पण, गोरीपान, टपोरे डोळे आणि त्याहुनही विलक्षण बोलका चेहरा…! आता या combination च्या कितीतरी मुली असतील पण सारा म्हणजे… she’s different! they say beauty lies in eyes of beholder…i don't know… सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे… तिची न थांबणारी बडबड्… तिचे खळखळुन हसणे… तिचे डोळे मिचकावुन लाजणे… तिची निरागस नजर्… आणि चेहर्यावरचा सदैव टवटवीतपणा… हिच्या केवळ असण्याने आसमंत प्रफ़्फ़ुल्लीत व्हावे इतका liveliness… so caring! so loving! so smiling! so innocent! Full of life…always! हे ईश्वरा! कुणाच्या नशीबात ठेवले आहेस हे चिरंतन सौंदर्य? हे शाश्वत चितन्य? कुणाला मिळणार हा मधुर हास्याचा न आटणारा झरा? कोण असेल हा नशीबवान? मी? छे! शक्यच नाही! काय साम्य आहे तिच्यात आणि माझ्यात? कुठे "Cactus" आणि कुठे "गुलाब"? पण, "Cactus"चे सौन्दर्य पहायला वेगळीच नजर लागते… हिच्या कडे असेल ती??? (७) दिनांक्: ३ ज़ानेवारी २००७ वेळ्: सायंकाळी ४.५० "सर" "बोलो सारा" "सर एक बोलायच होतं" "बोल ना" "sir, actually my brother has called me in states,स्थळ शोधलेय त्याने माझ्यासाठी.." "oh.." "so I am resigning" "..." "बुधवारी flight आहे माझी" "..." "sir, say something" "oh…so u want to go?" "तस काही नाही, पण भाऊ बोलावतोय मग जायला हवे ना?" "ह्म्म.. हो हो, नक्कीच" "..." "well, I will talk to MD, u give ur resignation to his PA" "sir.." "yes?" ईतक्यात रामजतन प्रकट झाला "साब, आपको बडे साब ने याद किया है" "ओके" आतुन पुरता कोसळलोय मी साराशिवाय ऑफ़िस म्हणजे… छे! कल्पनाच करवत नाहीय्… (८) दिनांक्: ४ ज़ानेवारी २००७ वेळ्: सकाळी ९.५० बॉस प्रचंड खवळलाय "Mr.Maadhav, I want that file!" मला ठणकावुन बजावतोय "but sir" "मुझे कुछ मालुम नही, सब original documents है उसमे" "लेकीन सर" मी त्याला सांगायचा आणखी एक प्रयत्न केला "मेरी बात सुनो, मैने तुम्हे परसो जो फ़ाईल्स दी थी, उसमे ही थी" "उसमे नही थी सर" "मुझे Thursday तक वो फ़ाईल चाहीये" "सर?" "if I don’t get the file, u r fired, do u understand ?" "..." मी ओफ़िस मध्ये येऊन सारा आणि रामजतन ला सर्व फ़ाईल्स शोधायला सान्गितल्या मी ही शोधली पण फ़ाईल काही सापडली नाहीय कुठे गेली ही फ़ाईल? ही फ़ाईल मिळाली नाही तर आपण out! गुरुवार पर्यंत वेळ आहे, तो पर्यंत शोधुन ठेवु, मी मनाला समजावतोय पण गुरुवार तर परवा आहे! (९) दिनांक्: ४ ज़ानेवारी २००७ वेळ्: सायंकाळी ८.०० दादा आणि वहीनी यांना कुठेतरी बाहेर जायच होत, म्हणुन पप्पुला माझ्याकडे ठेवुन गेले, काका त्याला तुळशीबागेत फिरायला घेवुन जाणार या अटीवर! तिथे जाऊन पहातो तर बाळगोपाळाची ही गर्दी! पप्पु तर एकदम खुश झाला सगळ्याकडे फ़ुगे पाहुन त्यानेही नेहमीप्रमाणे हट्ट धरला फुगे आणायला मी पप्पुला घेवुन चाललो होतो… रस्त्याच्या मध्यभागी आलो तेव्हा मला पाठीमागुन एक कार वेगात येत असताना दिसली पण पप्पुचे लक्ष होते फक्त फ़ुग्यावर, तो माझ्या हाताला हलकासा झटका देऊन पुढे पळतोय्… आणि मी त्याच्या मागे… कार अगदी जवळ आलीय्… ड्रायवरने करकचुन ब्रेक दाबलाSSSSSSS.. ……..SSSSS…..SSSSSSSSSSS मी पुढे झेप घेवुन त्याला पकडले व गिरकी घेतली.. आम्ही दोघेही रस्त्याच्या पार गेलो… अगदी थोडक्यात वाचलो! पण, या सर्व प्रकारात पप्पुच्या हाताला मार लागला, रक्तही येतेय, तो मोठ्याने रडायला लागला… समोर प्रचंड गर्दी जमली, कुणीतरी रिक्षा आणलीय, मी त्याला उचलुन रिक्षात बसलो व hospital ला पोहोचलो डोक्टरानी त्याला त्वरीत admit करुन X-ray केला, काळजीच कारण नाही असेही सांगितले छोटं fractcure असल्याने plaster लावावे लागले पण, खरा प्रकार तर पुढे घडला… तोपर्यन्त दादा आणि वहीनी पोहोचले होते पप्पुच्या हाताचे plastar पाहुन वहीनीचे तोंड सुटले… "जा तोंड काळ करा तुमचे…" "परत आयुष्यात तोंड दाखवु नका…" "……………………………………………..." पुढचे ऐकायला मी तिथे थांबलो नाही.. (१०) दिनान्क्: ४ ज़ानेवारी २००७ वेळ्: रात्री १०.०० मी घरी येवुन जुन्या घराची चावी घेतली आणि निघालो…जुने घर्…आईबाबाचे घर्…किती दिवस तिकडे गेलो नव्हतो…सुदैवाने गेल्या महीन्यात भाडेकरुनी ते सोडलय्…तिथे मनाला जरा शान्ती मिळेल्… "ट्रिन्ग ट्रिन्ग" दादाचा फोन्… "हेलो" "हेलो माधवा? कुठे आहेस तु?" "मी जुन्या घरी आलोय" "का रे?" "..." "अरे हिच एवढे मनावर कशाला घेत्तोस?" "तसं नाही रे" "रागात काही बोलली असेल, तशी ती मनाने एवढी वाईट नाहीय रे" "दादा, मी तसो म्हणालो का कधी?" "नाही, माधवा, तसा तु शहाणा आहेस रे" "..." "बर ऊद्या नक्की ये hospital मध्ये, पप्पु आताच आठवण काढत होता" "ओके" "ओके" (११) दिनांक्: ५ ज़ानेवारी २००७ वेळ्: दुपारी ११.३० ऑफ़िस मध्ये जाऊन रामजतनना भेटुन लगेच घरी परतलो बाल्कनीत आलो तर बाबांची फ़ार आठवण आली… काही कळायच्या आत आई गेली तेव्हापासुन बाबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले दादाला आणि मला… बाबा नेहमी म्हणायचे… "माधवा, कर्ता करविता तो आहे रे, आपण कर्म करत रहावे!" .......... फोन वाजतोय्… "हेलो" "हेलो माधव" "बोल जाकीर" "अरे बॉस ये क्या कर दिया आपने, हमे तो बताया भी नही?" "क्या?" "अभी अभी रामजतन मेरे पास आया है, आपने उसे resignation दिया है क्या? मगर क्यु?" "अरे वो फ़ाईल गुम हो गया, original documents था, अब बॉस ने खुद निकालनेसे पहले…" "लेकीन फ़ाईल गुम कैसे हो गया?" "मालुम नही यार, बॉस ने दिया ही नही था मेरे पास" "पक्का?" "हा यार" "अच्छा, सुन तु जब फ़ाईल लेने गया था तब बॉस गुस्से मे था?" "हा हा" "तु ५ मिनट रुक मै दुबारा फोन करुंगा" मी काही बोलायच्या आत त्याने फोन ठेवुनही दिला .......... परत फोन वाजतोय "हेलो माधव" "वहीनी" "हेलो, माधव, मला माफ़ करा" वहीनी रडतेय की काय? "काय झाले?" "तुम्ही आधी घरी या, लगेच" "..." "हेलो माधवा" दादाने फोन घेतलाय "हेलो दादा, काय झालं?" "अरे माझ्या ऑफ़िसचे एक मित्र आहेत, गोगटेकाका, ते आले होते आताच.." "बरं मग?" "ते तुला आणि पप्पुला ओळखत नाहीत, पण काल अपघाताच्या वेळी तिथेच होते ते.." "बरं" "त्यानी सर्व प्रकार सांगितलाय आम्हाला" "..." "आणि जाताना तुझ्या वहीनीला बजावुन गेलेत, खबरदार माधवला काही बोललात तर्…त्यानेच जीव धोक्यात घालुन वाचवलेत तुमच्या लेकराला!" "..." "त्यापासुन हीचे रडणे सुरु आहे, तु ये ना इकडे लवकर…" "मी येतो दादा" "ठीक आहे" "ओके" .......... "हैलो माधव" "जाकीर, बोल" "मिल गया फ़ाईल" "क्या?" "फ़ाईल मिल गया, मेहता के टेबल पे था" "कैसे?" "अरे जब बॉस गुस्सेमे होता है तो हाथ मे जो है सब उठाकर फेक देता है" "तो?" "उस दिन भी बॉस ने फेक दिया होगा, उसके टेबल पे left side पे फ़ायनान्स का ट्रे है, तो मैने सोचा मेहता के पास ही होगा, मिल गया" "झाकिर, तुस्सी ग्रेट हो यार, लेकिन मेहता तो छुट्टीपे है!" "रामजतन है ना, उसनेही खोला केबिन!" "रामजतन?" "हा हा यही पे है, ले बात कर उस से" "रामजतन, बेवकुफ़!" "जी साब" "मर गया साब, कोई देखता तो तेरी नौकरी चली जाती!" "जाने दो साब, वैसे आपके बगैर हम ऑफ़िसमे क्या करेंगे?" "दिमाग खराब हो गया है तेरा" "साब, वैसे आप चिता काहे करते हो, हम साफ़सफ़ाई करने हेतु किसी केबिन मे तो जाते ही है, किसीको शक भी नही होगा साब" "लम्बी लम्बी जबान चलाता है, झाकीरसाब को दे" "जाकीर, thanks यार" "ऐसे नही चलेगा बॉस, कल आ जाओ ऑफ़िस मे, हम party लेंगे आपसे" जाकीर खदा खदा हसायला लागला "sure" भगवान किस किस रुप मे आता है, कोई नही बोल सकता! .......... "हेलो सर" "सारा?" "sir I heard u r leaving?" "who told u?" "रामजतन" या गाढवाने सगळीकडे दवंडी पिटवलीय की काय? "हा…" "sir, please don’t go?" "मतलब?" "sir, I have taken my resignation back" "but why?" "sir, how can I leave when u r in trouble.." "why?" "sir, actually since when u joined" मी तीला मधेच थांबवत म्हणालो... "सारा, make it short" "I can’t dear" "saaraaSSSSS?" "yes madhav, I can’t" "..." "madhav, I have never seen anyone like u" "saaraa…" "and I never loved anyone so much" "..." "I tried a lot madhav, but I can’t get u out of my system" "..." "maadhav, I will be always incomplete without u, wherever I may go" "saaraa" माझ्या डोळ्यातुन अश्रुंचा पुर सुरु झालाय्… "dear, u r the most honorable person I met in my life" "saaraa" "madhav…" "saaraa…" "make me part of ur life!" "saaraa…" आता तर माझे शब्द अश्रुंमध्ये चिंब भिजलेत... "maadhav, r u crying?" "अरे तुमने वो product design का फ़ाईल कहा रखा है?" माझा सुर अधिकाधिक हळवा होत चाललाय "माधव.." "और वो price comparison का report?" "माधव.." "सुनो वो फ़ाईल तैयार रखना" "माधव" "और वो report?" "माधवा, कळतय रे राजा!" "ओके, see u in office, tomorrow, at 9.30 sharp!" "maadhav, I am happiest woman in the world!" "h..." माझा अस्पष्ट हुंदका... "love u dear" "..." ईश्वरा तु महान आहेस रे बाबा! .......... "हैलो, पैडी?" "अरे माधवा, बरे झाले फोन केलास, तुझाच CV forward करत होतो" "करु नकोस" "का रे, अरे best opportunity आहे, 50 000 $ salary आहे per annum" "पण तिकडे सारा मिळणार नाही!" "क्कायSSSS? ही सारा कोण?" "बर तु कधी येणार आहेस इकडे?" "पुढच्या शनिवारी, पण का?" "ये, मग आल्यावर निवांत बोलु!" मी शांतपणे फोन ठेवुन दिला. ........... समाप्त.
|
Farend
| |
| Friday, September 14, 2007 - 10:49 pm: |
|
|
गोबू आवडली. कथा. सारा नव्हे पण शेवटच्या दो प्रसंगांना तारीख आणि वेळ का लिहिली नाहीस? आणि सारा का मिळाणार नाही? तिचा व्हिसा नाही करता येणार का?
|
Tukaram
| |
| Friday, September 14, 2007 - 11:53 pm: |
|
|
कथेचा वेग आणि मांडणी खुपच छान आहे.
|
Maanus
| |
| Saturday, September 15, 2007 - 2:56 am: |
|
|
हिंदी पिच्चर ची story वाटतेय gobu एक दोन english च्या चुका सुधारतो. स्वतःला introduce करताना, मी mr. अमुक अमुक असे नसतात म्हणत, direct आपले नाव सांगावे. and next rule is, when you use Mr., you should use the persons last name, and not his first name
|
Neelu_n
| |
| Saturday, September 15, 2007 - 4:37 am: |
|
|
गोबुदा एकदम आवडली कथा... मस्त.. तुमचा हा गुण अजुन ठाउक नव्ह्ता. पण खरच अशी सलग आणि वेगवान कथा वाचायला खुपच आवडले.. लिखाण चालु राहु दे तुमचे.
|
Itgirl
| |
| Saturday, September 15, 2007 - 8:22 am: |
|
|
गोबू, कथा एकदम मस्त आहे, खूपच आवडली पुढची कधी?
|
Lopamudraa
| |
| Saturday, September 15, 2007 - 8:39 am: |
|
|
गोबु मस्त...!!!! वेगवान कथा!! खुप दिवसांनी (या प्रकारच्या अनेक कथा असतील पण मांडणी वेगळी आहे.) छान कथा वाचली.
|
Chetnaa
| |
| Saturday, September 15, 2007 - 1:05 pm: |
|
|
गोबु मस्तच रे... आयटी प्रमाणे मलाही घाई झालीय पुढच्या कथेची... मागच्या एवढी गॅप नको ह...
|
एकदम मस्त कथा. Production Manager ला MD मार्केट रिसर्च, फायनान्स इ. ची माहिती विचारतोय हे बरोबर वाटले नाही. तरी पण कथा खरोखर आवडली.
|
Athak
| |
| Sunday, September 16, 2007 - 11:11 am: |
|
|
३ , ४ अन ५ तारखेत अख्खी कहाणी अरे ते अंधेरी बरोबर मधेच तुळशीबाग कशी सारा प्यार तुम्हारा माधवा केशवा हुश्श एका दमात वाचली किती फ़ास्ट लिहीतोस रे आम्हाला इतक्या फ़ास्ट वाचता येत नाही
|
Gobu
| |
| Sunday, September 16, 2007 - 11:20 am: |
|
|
फ़ार एन्ड, शेवटच्या २ प्रसंगांना तारीख दिली नाहीय, कारण त्याच दिवशी एका मागोमाग होणारे प्रसंग आहेत ते... *झोपेत आहेस का? कथा परत एकदा वाच... मित्रा,दिवे दिवे! तुकोबा, नीलु, धन्यवाद! आय टी, चेतना, धन्यवाद! आणि आता पुढची कथा लवकर मागु नका! लोपा, धन्यवाद! समीर, ठान्कु! मित्रा, मी engineering आणि management या दोन्ही क्षेत्राशी निगडीत नाहीय रे! जे सुचलं ते लिहीत गेलो! अथकभाऊ, काय करणार मुम्बैला आलो तरीही पुणं सोडवत नाही रे! ठान्कु!
|
Aashu29
| |
| Sunday, September 16, 2007 - 12:48 pm: |
|
|
gobu, khup chhan aahe katha, sagle kase god god zale akheris
|
गोबु मस्त आहे कथा खूप छान! specially ते सारा चं वर्णन खूप सही पण दोघं अमेरिकेत आले असते त्या खडुस बोस ला सोडुन तरी चाल्लं असतं ना.... हे हे हे...
|
Gobu , कथा छान जमलिये पण एक गोष्ट खटकलि pharmaceutical company मध्ये production Manager ला फ़क्त ५०,००० पगार? आणि तो म्हणजे चंगळ आहे अस कथानायकाला वाटत? इतकि वाइट परिस्थिति नाहिये हो सध्या
|
Mankya
| |
| Monday, September 17, 2007 - 1:29 am: |
|
|
गोब्या .. क्या बात यार ! सकसकाळी मूड फ्रेश करून टाकला राव तू तर. सुरूवातीला भीत भीत वाचायला घेतली कथा कारण ' राणी ' ला विसरलो नाहिये अजून. कथानक सूसाट अगदी वेगवान आहे. मस्त कथा. कथा आणि सारा दोघी आवडल्या फ़िक्कट अबोलि रंग काय शोभुन दिसतोय तिला .. अबोली रंगच तसा आहे यार ! अबोलि रंग.. आकाशी ओढणी एखादा अबोली पदर.. वैभवा ! माणिक !
|
गोबु,कथेची मांडणी छान आहे रे.. एका दमात वाचुन टाकली बघ
|
सही! ... ... ...
|
गोबुदा... माधव मागतो सहारा... देव देतो सारा...
|
गोबु, format चांगला आहे. पण कथा अपेक्षित शेवटावरच गेली! तुझ्याकडुन काहीतरी वेगळं पाहिजे होतं.
|
Jayavi
| |
| Monday, September 17, 2007 - 1:19 pm: |
|
|
गोबु..........सुरेख !! फ़ार छान जमायला लागलंय तुला खिळवून ठेवणं....तुझ्या कथा आवडायला लागल्यात येऊ देत अशाच भरपूर
|
|
|