|
Chetnaa
| |
| Monday, September 17, 2007 - 4:38 am: |
|
|
हवेत तरंगतच ती घरी पोचली. आज तिच्यासाठी विषेश आनंदाचा दिवस होता. गेले कित्येक महिने ती आसुसुन ज्या संधीची वाट पहात होती,ती आज अगदी आकस्मात चालुन आली होती. गेली काही वर्षे नाटकात छोटी मोठी व दुय्यम भुमिका करत असताना तिने एकच स्वप्न पाहिले होते. दादासाहेबांच्या ' उंबराचे फ़ुल' नाटकात रेश्माची छोटीशी भुमिका करत असताना साहजिकच 'रेवती' ची म्हणजेच नाटकातील प्रमुख भुमिका साकारायला मिळावी, हे स्वप्न ती जोपासत होती. अभिनयाचा कस लावणारी ही भुमिका साकारणे अनेक अभिनेत्रींचे लक्ष बनले होते. तिला तर ती भुमिका फ़ारच आवडली होती. ती भुमिका न करताही ती त्या भुमिकेत एकरुप होऊन गेली होती. घरी असताना ती 'रेवती' चीच भुमिका मनातल्या मनात साकारत असे. कालचा प्रसंग तिच्या जसच्या तसा नजरेसमोर आला. 'रेवती' ची भुमिका करणारी प्रतिथयश अभिनेत्री आजकाल फ़ारच नखरे करु लागली होती. दिग्दर्शकाच्या तर नाकीनऊ आले होते. तिच्या शिष्टपणाने सहकलाकारही वैतागत होते. स्वता:च्या वेषभुशेत बदल करण्यापासुन तर आता ती वेळेवर संवादातही बदल करू लागली होती. लेखकानेही आपली नापसंती दादासाहेबांकडे व्यक्त केली तेव्हा मात्र त्यांनी काल स्वता/; प्रयोगानंतर हजर राहुन याबाबत चर्चा करण्याचे ठरविले. कारण नाटक त्या अभिनेत्रीच्या नावामुळे जोरात चालले होए. ते कोणतीही आर्थिक रिस्क घेऊ इच्छित नव्हते.त्यामुळे स्वता/; तिच्याशी बोलण्याचे त्यांनी ठरविले. परंतु आपल्या गर्वाच्या नादात त्या अभिनेत्रीने त्यांचाही अपमान करायला सुरुवात केली. तसे भडकुन त्यांनी तिला आपल्या नाटकाबाहेर काढले. आणि ताबडतोब सर्वांची मीटिंग घेतली. कारण पुढच्या आठवड्याचे प्रयोगाचे बुकिंग झाले होते.
|
Chetnaa
| |
| Monday, September 17, 2007 - 4:55 am: |
|
|
मीटींगचा मुख्य विषय होता 'रेवती' च्या नायिकेचा शोध आणि शक्य झाल्यास ताबडतोब नविन तालमी करुन आठ दिवसात नाटक उभे करणे. सर्व कलाकारांनाही त्यामुळे उपस्थीत रहायला सांगितले होते. तेव्हा तिने ठरवले की ही संधी फ़क्त आपल्यासठीच आहे. आज ती घ्यायलाच हवी. तसं तिने मोठ्य आत्मविश्वासाने बोलायला तोंड उघडले. " सर! मी सुरभी. या नाटकात रेश्माची भुमिका करते. मला काही सांगायचय.. " दादासाहेबांनी करड्या नजरेने तिला एकदा पुरते न्याहाळले व हुंकार भरला. " सर! आपण परवानगी द्याल तर मला हा रोल साकारायला आवडेल." " ते ठिक आहे. पण एवढा चॅलेंजिंग रोल झेपेल तुला? शिवाय आठ दिवसात बसवायचाय.. " "आय'ल ट्राय माय बेस्ट सर! तुम्हाला हवं तर मी आताही या रोलचे स.वाद म्हणुन दाखवते. मला या भुमिकेचे जवळ जवळ संपूर्ण संवाद पाठ आहेत. तुम्ही ट्रायल घ्या आणि मग निर्नय द्या. पण मला एक संधी द्य, प्लिज. हा रोल हे माझं स्वप्न आहे सर. या भुमिकेला नक्की न्याय देऊ शकेन मी, याची मला खात्री आहे. " तिचा आत्मविश्वास पाहुन दादासाहेबांनी तिला काही संवाद अभिनयासह म्हणायला लावले. आणि ते चकितच झाले. हा हिरा अजुन्पर्यंत आपल्या अनुभवी नजरेला कसा दिसला नाही? उगाचच त्या चे नखरे खपवुन घेतले इतके दिवस, असा विचार करतच त्यांनी जाहिर केले, " ओ. के. ठरले तर! रेवतीचा रोल सुरभी करणार यापुढे. वामनराव, तुम्ही तिची नीट तयारी करून ग्या. तिच्या रेश्माच्या रोलसाठी दुसरी मुलगी पहा. आठ दिवसात प्रयोग उभा राहिला पाहिजे, काय? " सुरभिचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. केव्हा एकदा ही सरप्रायझिंग न्युज विश्वासला सांगते असं होऊन गेलं तिला. क्रमश्:
|
चांगली सुरूवात आहे चेतना... चालु दे पुढे
|
Chetnaa
| |
| Monday, September 17, 2007 - 6:20 am: |
|
|
तिने त्याला फोने लावायला घेतला, पण मग लगेच विचार बदलला. आठच दिवसंचा तर प्रश्न होता. ज्त्या दिवशी पहिला प्रयोग असेल त्या दिवशी डायरेcट मिठाई व पास घेऊन, त्याच्या घरी जाऊन त्याला सुखद धक्का द्यायचा व सर्वांना बरोबर घेऊनच प्रयोगाला जायचं... असं ठरवुन तरंगतच ती घरी पोहचली. ************** नंतरचे आठ दिवस तालमिंत कसे गेले कळलंच नाही. या आठ दिवसांत विश्वासनेही तिची काहीखबरबात घेतली नव्हती. तसाही हल्ली त्यांच संपर्क थोडा कमिच झाला होता. त्याला हल्ली जास्त काम असल्याने, तो बिझी असतो असं त्याचं म्हणणं होतं. आणि तिने ते मान्यही केले होते. तिला त्याची प्रत्येक गोष्ट मान्य होती. तरिही या आठ दिवसांत चक्क फोनही केला नव्हता त्याने. परंतु तिला सध्द्या विचार करायलाही अजिबात सवड नव्हती. एकदा पहिला प्रयोग यशस्वी झाला की मग मात्र ती चांगलंच उट्टं काढणार होती त्याच्यावर. ******************** आणि आज तिची प्रमुख भुमिका असलेला, अगदी मेहनतीने उभ्या केलेल्या नाटकाचा... पहिला प्रयोग होता. तयारी तर अगदी जय्यत झाली होती. प्रयोग यशस्वी होणार याची तिला आधीच खात्री वाटत होती. आज तिच्या स्वप्नपुर्तीचा दिवस. त्यामुळे सकाळपासुनच तिची लगबग चालु होती. आता मात्र निघण्याची तयारी करायला हवी म्हनून ती आरशासमोर आली. आरशात स्वत:शीच नजरानजर झाली तशी ती खुदकन हसली. तिचा आनंद आज नुसता ओसंडुन चालला होता. पटापट तयार होऊन ती आरशसमोर कपडे बदलु लागली. एकीकडे आपल्या प्रतिबि.ब्बाकडे नजर टाकीत ती स्वता:च्याच सौंदर्यावर खुष होत होती. मधेच तिला आपल्या प्रतिबि.ब्बाच्या जोडीने विश्वासचाही भास झाला. आरषात तो नेहमिच्याच मिश्किल नजरेने रोखुन पहात होता आणि म्हणत होता जणु... "हाय क्युटी का असा नखरा करून घायाळ करतेस? हाऽऽय अशी बघु नकोस प्रियेऽऽ ह्या पामराने मग काही गुन्हा केला तर रागवु नकोस मग नेहमी प्रमाणे... " जणु काही तो नेहमीप्रमाणे चावटपणा करतोय असं खरोखर वाटुन ती लाजली. मग तिनेही त्याच्या प्रतिमेला लटक्या रागाने व लाडाने धुतकारले," चल, चावट कुठला! " तिला त्याची व तीची पहिओली भेट आठवली.
|
Ana_meera
| |
| Monday, September 17, 2007 - 6:33 am: |
|
|
वा! रंगतीये हं कथा चेतनाSS चांगली आहे.
|
कथा copy paste कशी करायची? MS word मधे पन नीट दिसत नाही
|
Chetnaa
| |
| Monday, September 17, 2007 - 9:06 am: |
|
|
मला पण नाही ग येत, दिपाली... जाणकार लोक्स... जरा शिकवा ना आम्हाला... ठांकु अनघा, मयुरेश...
|
Maanus
| |
| Monday, September 17, 2007 - 1:35 pm: |
|
|
हल! चेत्स तु सुद्धा चालुंदेत दिपाली, word मधे paste केल्यावर word मधे सगळा मजकुर परत एकदा select कर आणि change font to Arial Unicode MS
|
धन्यवाद मानुस पन नाही जमल.... change font to Arial Unicode MS font Arial केला पण Unicode MS नाही करता आल. Please step by step समजवुन सन्गता का?
|
Chetnaa
| |
| Wednesday, September 19, 2007 - 7:26 am: |
|
|
तिला त्याची व तिची पहिली भेट आठवली. अगदी नाटक सिनेमात घडावी त्याप्रमाणे. नाटक सुटल्यावर ती घरी परतत होती. रिक्शासाठी गेटजवळ उभी होती. तेवढ्यात गेटमधुन बाहेर पडलेली एक कार तिच्याजवळ थांबली. एक साधारण पस्तिशीचा देखणा तरुण ड्राईव्हिंग सीटवर बसला होता. खिडकिची काच उघडत तो म्हणाला, " हॅलो! मिस सुरभी, मी विश्वास. " तिने जरा घुटमळतच त्याला हॅलो केलं. " आत्ता तुमचं हे नाटक पाहुनच बाहेर पडतोय. तुमचं काम फ़ार आवडलं. तुम्ही दिसलात तर म्हटलं सांगुनच टाकावं तुम्हाला. " " अं, थॅंक्स! " म्हणत ती परत रस्त्याकडे पाहु लागली रिक्शासाठी. या क्षेत्रात उगिचच सलगी करायला बरेच जण येत. त्यामुळे ती त्यांना व्यवस्थीत कट करण्यात पारंगत होती. " हवी तेव्हा रिक्शा मिलणंही दुर्मिळ झालंय आजकाल. तुमची हरकत नसेल मी सोडु का तुम्हाला. " आता मात्र तिला रागच आला. हा स्वत:ला समजतो कोण? जरासं कौतुक काय केलं, तर लगेच जाऊन बसेन मी याच्या गाडीत? तिने अगदी रागाने त्याच्याकडे पाहिले. " नो, थॅक्स! "इतकेच बोलुन ती जरा पुढे निघुन गेली. नंतर मात्र बर्याचदा त्या थिएटर मधे तो पुढील रांगांमधे बसलेला दिसे तिला. जाताना कधी कधी गेटजवळही दिसायचा. पण त्यानंतर मात्र तो एकदाही तिच्याशी बोलायला आला नाही. तिच्या नाटकांना मात्र आवर्जुन यायचा. एकच नाटक अनेकदा पहायचा. हे पाणी काहीसे निराळेच आहे हे तिने जोखले. तिला त्याच्याशी बोलावेसे वाटु लागले. एक दिवस ती स्वत:च त्याची गाडी बाहेर पडल्यावर मुद्दाम त्याच्या रस्त्यात आली तसा तो म्हणाला, "काय मरण्याचा विचार आहे की काय? रस्त्यावरच्या इतक्या ढिगाने असलेल्या गाड्या सोडुन माझी गाडी निवडल्या बद्दल थॅंक्स. पण सॉर्री, माझ्या गाडीत मी आता कुणाला लिफ़्ट पण देत नाही आणि माझ्या गाडीखाली मरण्याचा परवाना तर मुळीच देत नाही. " तो थोडा उपहासाने बोलला तरी त्याकडे दुर्लक्ष करीत ती हसली. " हं, तुर्तास तरी मरण्याचा विचार नक्किच नाही. जेव्हा विचार करेन तेव्हा तुमचीच गाडी निवडीन, प्रॉमिस. सध्द्या मैत्री करण्याचा मात्र विचार आहे. हॅलो, आय'म सुरभी. ती शेकहॅंडसाठी हात पुढे करत म्हणाली. "हाय! आय'म विश्वास. मला वाटतय मागच्या वेळी मी ओळख करुन दिली होती, पण तुमच्या सारखी कलावंत मंडळी आमच्या सारख्यांना लगेच विसरत असतील... " त्याला थांबवत आत बसत ती म्हणाली, " असं रस्त्यावर भांडत उभं ठेवतात वाटतं कुणी मैत्रीणीला? " " आय'म सॉर्री. पण हे मतपरिवर्तन कसं झालं कळेल का?" गाडी स्टार्ट करित त्याने विचारलं.
|
Chetnaa
| |
| Wednesday, September 19, 2007 - 7:56 am: |
|
|
" खरं तर मलाच तुम्हाला विचारायचंय. इतक्या वेळा तुम्ही माझ्या नाटकांना आलात, परंतु परत कधीच माझ्याशी बोललात का नाहीत? एवढा राग एकदा नाकारल्याचा? शेवटी म्हटलं आपणंच विचाराव.व.. " तसा हसतच तो म्हणाला, " तसं काही नाही, पण मला तुमचा अभिनय आवडतो, म्हणुन येतो तुमची नाटके पहायला. " " इतक्या वेळा? ?" तिने त्याच्या अंतर्मनाचा वेध घेत रोखुन पहात विचारलं. " ओ. के. टु बी फ़्रॅंक. मी फ़क्त नाटकासाठी नाहीतर तुमच्या येत होतो. तुमच्या फ़क्त अभिनयासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही येत होतो. खरंच तु खुप सुंदर आहेस. पहिल्यांदा तुझं नाटक पाहिलं त्या दिवसा पासुनच झपाटुन टाकलयंस तू मला. " बोलता बोलता तो केव्हा 'तू' वर आला त्यालाही कळले नाही. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याचे शब्द अगदी प्रामाणिक वाटले तिला. तिलाही जणु काही हेच ऐकायचे होते. आज प्रथमच हृदयात अगदी उचंबळुन आल्यासारखे, काहीतरी वेगळेच फ़ील होत होते तिला. तिने लाजुन नजर खाली वळवली. " खरंच, तू काय जादु केलीस माझ्यावर तेच कळत नाही. पण रात्रंदिवस तुच दिसतेस नजरे समोर. तुझा त्या दिवशिचा जमदग्नीचा अवतार पाहिल्यावर म्हटले, संपले सर्व. साधी ओळखही करुन घेऊ शकलो नाही तुझ्याशी निटपणे. आधी खुपच निराश झालो. पण मग विचार केला, ठीक आहे, तू मला साथ दिलिच पाहिजेस असे थोडेच आहे.मी तर तुझ्यावर प्रेम करतोय ना? तेच खुप आहे माझ्यासाठी. मी तुला कधीच भेटणार नव्हतो. आणि माझ्या मनातल्या भावनाही सांगणार नव्हतो.पण मग तुला बघावेसे वाटले की, तुझ्या नाटकांना यायचो. आणि मग एकांतात आपल्या भावविश्वात रमायचो. प्रत्यक्षात तुझी सोबत मिळु शकत नसली तरी माझ्या भावविश्वात तू सतत माझ्यासोबत असतेस. तिथे कुणीही तुला माझ्यापासुन दूर करू शकत नाही. अगदी तू सुध्दा. "
|
Itgirl
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:16 pm: |
|
|
चेतना, लिही की पुढचे पटपट
|
Maanus
| |
| Wednesday, September 19, 2007 - 5:50 pm: |
|
|
मला शलाका देसाई आठवायला लागलीय... दोन तीन वेळा ते यदाकदाची १ आणि यदाकदाचीत २ पाहीले तिच्यासाठी, पहील्या रांगेत बसुन. ए गरा गरा गरा, माश्याचा दोला फोडणार कोण. पण नाटकांची तिकीट परवडत नाही, म्हणुन जास्त वेळा नाही बसु शकलो
|
Chetnaa
| |
| Friday, September 21, 2007 - 5:35 am: |
|
|
ती त्याची नजर चोरत सारखी चुळबुळ करत होती. तिला काही सुचेनासे झाले होते. त्याच्या मनात आपल्या बद्दल इतकी ओढ पाहुन ती सुखावली, शहारली. त्याच्या शब्दांच्या पावसात जणु ती आनंदात भिजत होती. तृप्त होत होती. खरे तर तिच्याही मनात त्याच्या बद्दल ओढ निर्माण झाले होती. आणि म्हणुनच आज ती स्वत:हुन त्याच्याशी बोलायला आली होती. पण त्याची परिणीती इतक्या सुंदर स्वप्नात होईल असे तिला वाटलेही नव्हते. आज जागेपणीच एक सुंदर स्वप्न जणु तिच्या ओंजळीत पडले होते. जे तिने अगदी अलगद झेलले होते. आणि आपल्या हृदयाशी कवटाळले होते. तिने विचारांच्या तंद्रीतच आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. मूक होकारच दिला जणु त्याच्या प्रेमाला. ************* त्यानंतर २-३ भेटीतच तिला जाणवले की तिचा निर्णय योग्य आहे. तिला जाणवले की हाच तो.. ज्याचा शोध तिला होता. त्यादिवशी तिने घरीच बोलवले त्याला. तिला खुप बोलायचे होते त्याच्याशी. तिच्या एकट्या विस्वात तिला आता एक खराखुरा साथी मिळाला होता. आपल्या मनिचे गुपित सांगायचे होते तिला. कॉफ़ी घेत त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या.विश्वास जायला निघाला तेव्हा ती धीर एकवटुन म्हणाली, "विश्वास, मला तुला काही सांगायचंय..." तिला जवळ घेत तो म्हणाला," सुरभी, मलाही तुला काही सांगायचंय. थांब, आधी मला सांगु दे.... किती कमी भेटी झाल्या आपल्या. पण जणु काही जन्मोंजन्मी आपण एकमेकांचे होतो असंच वाटतंय. असे अगदी अचानकपणे जुळलेले आपल्या अंतरंगाचे हे बंध जन्म जन्मांतरीच्या नात्यांचे वाटतात. पण.... पण... मला तुला एक गोष्ट आज सांगायलाच हवी. मी या जन्मात तरी कुठलंही नातं नाही देऊ शकणार तुला कारण.... कारण..."
|
Chetnaa
| |
| Friday, September 21, 2007 - 5:51 am: |
|
|
तो अडखळला. सुरभीचा श्वास अगदी जड झाला होता. हृदयात धाकधुक व्हायला लागली. तशी ती शांतता सहन न होऊन ती ओरडली, "कारण काय विश्वास? सांग ना! माझा जीव अगदी वर खाली होतोय बघ..." " कारण... कारण... सुरभी, मला माफ़ कर... पण मी विवाहीत आहे आणि मला २ मुलेही आहेत..." तो चाचरतच म्हणाला. " काय? काय म्हणालास? तु... तु खोटं बोलतोयस. तु गम्मत करतोयस माझी. हो ना? खरं सांग विश्वास, प्लिजऽ नको रे असा छळुस मला..." तिला थोपटत तो म्हणाला," खरंय ते सुरभी! सर्व घटना इतक्या अकस्मातपणे घडल्या. किती चटकन आपण एकमेकांचे झालो.... पण पन मी तुला कुठलंही नातं नाही देऊ शकत. शिवाय तू अविवाहित आहेस. तुला चांगला जोडीदार मिळेल. तुला अंधारात ठेवायची किंवा फ़सवायची इच्छा नाहीय माझी. मी तुला फ़सवुच नाही शकणार. माझं प्रेम आहेस तू.." सुरभीचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती अगदी कोसळण्याच्याच बेतात होती. विश्वासने तिला सावरुन आपल्या बाहुपाशात घेतले. ती त्याला बिलगुन रडायला ई, "का? विश्वास का? का असं एका हाताने दिलस आणि लागलिच दुसर्या हाताने ओरबाडुनही घेतलंस हे स्वप्न? का??? का असं केलंस तू? तुझं जर आधीच लग्नं झालेलं होतं तर तुला काय अधीकार होता माझ्या भावनांशी खेळण्याचा? तू जर तुझ्या भावना माझ्या जवळ प्रकट केल्या नसत्यास त्या दिवशी, तर कदाचीत माझ्याही भावना अश्या उचंबळुन आल्या नसत्या. सर्व विसरणं किती सोपं झालं असतं मग! आपण आपापल्या मार्गांवर चालत राहिलो असतो अनोळखिंप्रमाणे, किंवा केवळ मैत्रीच्या नात्याने समांतरपणे. पण आता हे जे नातं निर्माण झालंय तुझ्या माझ्यात ह्याचं मी काय करू विश्वास? आता मी कशी जगु तुझ्याशिवाय??...
|
Dhoomshaan
| |
| Saturday, September 22, 2007 - 12:00 pm: |
|
|
What is he married??????????????? कहानी में एकदम twist!! hmm....... interesting!
|
Chetnaa
| |
| Sunday, September 23, 2007 - 5:36 am: |
|
|
सुरभीची ती असह्य अवस्था बघुन त्यालाही वाटु लागले आपल्या हातुन चुक तर नाही ना झाली? पण आता तो काय करु शकत होता? तिला समजावत तो म्हणाला, " स्वत:ला सांभाळ सुरभी, हे बघ सर्व निर्णय तुझ्याच हाती आहे. तू म्हणशील ते मला मान्य आहे. तुझ्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी मी हवं तर तुला यापुढे भेटणारही नाही. आपण हे नातं असंच हृदयात जपुन आपापल्या मार्गावर चालत राहु. मात्र तुला कधिही माझी गरज भासली तर मी सदैव तुझ्या बरोबर असेन हे लक्षात ठेव. माझं लग्न झालेलं असुनही मी तुझ्या प्रेमात पडलो. का? कसा? कशासाठी? हे चुक की बरोबर? याच्याशी मला काहीच कर्त्तव्य नाही. ती एक नैसर्गिक भावना आहे आणि मी तिचा आदर करतो. पण त्याच बरोबर तुझं कुठल्याही प्रकारे नुकसान झालेलं मला सहन होणार नाही. त्यामुळे मला काय हवय? याला काहीच अर्थ नाही. तुझ्यासाठी काय तोग्य, तेच प्रथम पाहिले पाहिजे. मला फ़क्त तुझं सुख हवय." सुरभी विचारात हरवली होती. नंतर मात्र काहीतरी ठरवल्याप्रमाणे ती म्हणाली, "माझा निर्णय झालाय. जे घडलंय ते तर आता बदलणार नाहीय. मलाही माझ्या भावनांचा आदर केलाच पाहिजे. अणि तू इतका चांगला आहेस की जास्तच मन अडकतंय तुझ्यात. तू थोडा जरी वाईट वागला असतास ना? तर कदाचीत तुला विसरणं सोपं झालं असतं. पण आता मला तू हवा आहेस. तुझं प्रेम हवय. तुझ्या बायको, मुलांसकट चालेल मला. तू त्यांचाच आहेस. पण तुझं प्रेम हवय मला.तुझ्या मनात सदैव स्थान हवय. मला फ़क्त आपल्या दोघांत निर्माण झालेलं हे नातं हवय. या नात्याला कुठलंही संबोधन नकोय मला या लौकिक जिवनातलं. हे दिव्य नातं, स्वप्न आहे आपलं. आपण ते प्राणपणानं सांभाळु. नाहीतरी या करियरच्या घबडग्यात लग्नाचा विचार केलाच नव्हता मी. तुझी सोबत जोपर्यंत मिळेल तो पर्यंत जगेन मी हे नातं, तुझ्या माझ्यातलं."
|
Chetnaa
| |
| Sunday, September 23, 2007 - 1:26 pm: |
|
|
"अगं पण सुरभी, तू मुलगी शिवाय अविवाहित. लोकं काय म्हणतील?" ती उसळुन अगदी कडवटपणे म्हणाली, "लोकं? कोनती लोकं? मी नाही ओळखत लोकांना. मला नाहीये पर्वा कुणाची. लहानपणापासुन अनाथा सारखी वाढले इकडे तिकडे. माझी कुणी पर्वा केली नाही. त्यावेळी पाहिली मी या तथाकथित लोकांची रुपं. सर्वांनी माझ्या कडुन फ़क्त फ़ायदा तेवढा पाहिला. मग लहानपणी ४ घासांसाठी राबवणारी काकु असो, वा लग्न खर्च वाचवण्या साठी, मुलं बाळं असलेल्या बिजवराशी लग्न ठरवणारे मामा मामी असोत. सर्व सारखेच. स्वत:च्या हिमतीवर घरा बाहेर पडले मी. ती इथवर पोहचले स्वत:च्या कष्टाने. या मार्गात लाळ घोटणारे लोकं भेटले. गिधाडासारखे टपुन होते, ते हेच लोक. आता त्यांच्या साठी मी माझं सुख का सोडावं?" तो अवाक होऊन तिच्या कडे बघत होता. तिच्या चेहर्यावर संताप नुसता ठसठसत होता. तिच्यातील एवढी दु:खाची आग पाहुन तो दिग:मूढ झाला. ती बोलतच होती, "माझं श्रेष्ठ अभिनेत्री होण्याचं स्वप्नही पूर्ण करायचंय मला. आणि लग्न झाल्यावर बायकोचं करियर नवर्याच्या मर्जीवर ठरतं. एक दिवसात झालेला हा 'नवरा' बायकोचं संपूर्ण अस्तित्व पुसुन टाकुन तिला आपल्या अस्तित्वात सामावुन जायला लावतो. न समजता उमजता कुणाशीही लग्न करुन असे आत्म समर्पण मान्य नाही मला. कदाचित फ़क्त तुझ्यासाठी असं समर्पण करायला आवडले असते मला. हरकत नाही, तुझं प्रेम मिळालं हेच खुप आहे माझ्या साठी. मी आपल्या प्रेमाशीच प्रामाणिक रहाणं पसंत करिन. पण तू तुझ्या मनातून मात्र कधीच अंतर देऊ नकोस." आणि मग दिवसेंदिवस हे नातं फ़ुलत गेलं होतं. ३-४ वर्षे सहज गेली. तो जेवढा तिच्या वाट्याला येत होता, तेवढा तिला पुरेसा होता.तिने जास्त अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. की कधीच त्याच्या भावनांचा फ़ायदा उचलला नव्हता. त्याच्या मनात कायम आपले स्थान असावे एवढीच तिची अपेक्षा होती. त्याचं प्रेम हेच तिचं बळ होतं. त्यांचं सहजीवन फ़ुलत होतं. त्याच्या कुटुंबाशीही तिची थोडीफ़ार ओळख झाली होती. त्याची मैत्रीण या नत्याने ती अधुन मधुन त्याच्या घरीही जात होती. आजही ती त्यांना सर्वांना घ्यायला निघाली होती. *************** क्रमश:
|
Chetnaa
| |
| Sunday, September 23, 2007 - 2:19 pm: |
|
|
तिने मिठाई घेतली. गेट जवळ जाताना तिला वाटलं, फोन करून थोडी गम्मत करुया. आणि अचानक प्रकट होऊन त्याला सरप्राईज देऊया. मोबाईल लागत नव्हता. तिने घरचा फोने लावला. पण फोन सुमाने उचलला. " हॅलोऽऽ, सुरभी बोलतेय. काय चाललय?" "कोण? सुरभी का? अगदी मजेत. आणि तू कशी आहेस?" "मी पण मजेत. विश्वास आहे ना?" " अं.... अगं... विश्वास नाहीये. बाहेर गेलाय." ऐकताच सुरभीचा मूड गेला. रोज तर या वेळी घरीच असतो. आता नेमका कुठे गेला असेल भटकायला. सेल पण लागला नाही तशी ती फ़ारच अपसेट झाली. सर्प्राईज मुळेच असं झालं म्हणुन ती स्वत:वरच चिडली. जावं की जाऊ नये या संभ्रमात ती पडली. पण त्यांना घेऊन नाटकाला जायची खुप इच्छा होती तिला. जाऊन थोडा वेळ त्याची वाट पहायची. नाहीच आला लवकर, तर पास देऊन पुढे निघायचे असे ठरवून ती त्याच्या घरी गेली. दारावरची बेल वाजवली. दार उघडले खुद्द विश्वासने. ती पहात राहिली. तो ही चमकला. तिची नजर चुकवु लागला.तिने फोन त्याच्या गेट समोरूनच केला होता. म्हणजे.... म्हणजे हा घरातच होता? मग फोनवर का नाही आला हा? कारण कितीही बिझी असला आणि घरी जरी फोन केला तरी लगेच यायचा तो फोनवर. मग आज सुमाने असे खोटे का सांगावे?आणि अशी नजर का चोरतोय? हा आता मला टाळतोय?? मागेही २-३ वेळा तो घरच्या फोन वर भेटला नव्हता तेव्हाही तिला शंका आली होती. अलिकडे त्याचं येणंही कमी झालं होतं. शिवाय वागण्यातही थोडासा बदल जाणवत होता. पण त्याच्या वरील प्रेमापोटी तिचं मन मानायलाच तयार होत नसे. मागे एकदा आलेला संशय तिने त्याला बोलुनही दाखवला होता. तेव्हा तो म्हणाला होता, "अगं, मी घरी नसेन कदाचीत. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? परत असा विचार चुकुनही मनात आणु नकोस. तुझं स्थान सुमा पेक्षाही मोठं आहे माझ्या मनात. ती माझी बायको असुनही तुझाच अधिकार मानतो मी माझ्यावर. आज तु मला दुखवलंस. " आणि तिनेही आपल्या भावना त्याच्या पुढे स्पष्टपणे मोकळ्या केल्या होत्या.
|
Chetnaa
| |
| Sunday, September 23, 2007 - 2:35 pm: |
|
|
"माझा तुझ्यावर विश्वास आहे रे. पण तो टिकवणं मात्र तुझ्याच हातात आहे. मला तुझ्या बायको पेक्षा जास्त अधिकारही नको. पण आपल्यातल्या नात्याच्या अधिकारा पुरता तरी तुझ्यावर हक्क हवाय. तुला वाटल्यास तू हा हक्क नाकारुही शकतोस. पण मग तसे स्पष्टपणे सांग. तुझ्या खटकणार्या वागण्याने,तुझ्यावर संशय घ्यायला नाही आवडणार मला. पण मला उगिचच लटकत ठेऊ नकोस. तुला नको असेल त्या दिवशी निघुन जाईन मी तुझ्या आयुष्यातून. परंतु कुठल्याही प्रकारचं ओझं होऊ द्यायचं नाहीय मला या नात्याचं. माझं सुंदर स्वप्न आहे ते जागेओअणी गवसलेलं, माझ्या तनमनाच्या अणुरेणुवर पोसलेलं. ते क्षणभरासाठी देखिल कुणासाठी ओझं झालेलं नाही सहन होणार मला. तु प्रेमानं झेलुन अलगद हृदयात ठेव. पण केवळ कर्तव्य भावनेनं किंवा माघार घेता येत नाही म्हनुन उगिचच वाहु नकोस ओझं समजुन. मी आयुश्यभर माझ्या हृदयात जतन करेन ते. तेव्हा मला तुला हेच सांगायचंय, ज्याक्षणी तुला या नात्याचं ओझं वाटेल, त्याच क्षणी माझं स्वप्न मला परत कर. एवढा तरी प्रामाणिक रहा या नात्याशी. मी अलगद झेलेन ते माझ्या एकट्या ओंजळीत आणि कतीन त्याची साथ सोबत, अगदी तुझ्या शिवाय देखिल." आणि आज तो क्षण तिच्या समोर उभा होता. हे केव्हातरी घडणार तर होतेच. पण या पध्दतिने घडेल याची मात्र तिने अपेक्षा केली नव्हती. त्याच्या कोणत्याही कारणावर तिने डोळे मिटुन विश्वास ठेवला असता. हे नातं संपताना देखिल एक भ्रम हवा होता तिला विश्वासाचा. ज्यायोगे मनात कुठलेही किल्मिष राहु शकले नसते. पण हे सर्व ज्या पध्दतीने घडत होते त्यामुळे संबंध संपण्या पेक्षा तिच्या स्वप्नाचा अपमान तिला सहन होत नव्हता. शिवाय मनाची पूर्वतयारी असुनदेखिल प्रत्यक्ष अनुभव मात्र जिवघेणा वाटत होता. ती मनातुन हादरली होती. तरिही विचार करत होती. का? त्याने असं का करावं?? आपण विवाहित आहोत याची सुरुवातीसच स्पष्टपणे कबुली देणारा तो आज का असा नजर चोरत उभा आहे? त्याच्या चुकवलेल्या नजरेने केव्हाच कबुली दिली होती त्याने की, त्याच्या कडुन सर्व काही संपवलय त्याने. कुठे गेला आता त्याचा तो स्पष्टपणा? की पुन्हा इतरांसारख्या नेहमिच्या गप्पा, तुला वाईट वाटु नये म्हणुन वगैरे वगैरे... आणि आता असा हा धक्का मी कसा सहन करू? मी तर माझ्या कडुन काहीच लादलं नव्हतं. सर्व काही त्याच्या मर्जीवर अवलंबुन होतं, जरी त्यात माझं सर्वस्व पणाला लागलं होतं. आता त्याला मी नकोशी झालेय हेच सत्य आहे. मग कारणे काहीही असोत. काय फ़रक पडणार आहे त्याने?? चला गूडबाय करायची वेळ आली. क्रमश्:
|
|
|