चूक विश्वासच्या आईवडिलांची आहे. अश्या माणसाचं नाव विश्वास ठेवायचं म्हणजे काय? चेतना,
|
Lalu
| |
| Wednesday, September 26, 2007 - 6:15 pm: |
|
|
(विश्वास, सुरभी, सुमा, विश्वासची आई सगळ्यांना दोष देऊन झाला. आता राहिलं कोण...) मला तर वाटतंय दादासाहेबांचीच चूक आहे. तिला नाटकात घेतले काय अन्... ~D चेतना दिवे घे गं. नाहीतर म्हणायचीस गोष्ट लिहून चूक झाली.
|
Sashal
| |
| Wednesday, September 26, 2007 - 6:19 pm: |
|
|
पण मी म्हणते चूक कोणाची हा मुद्दा आहे का खरंच? आणि असलीच कोणाची तर ती आपलीच म्हणावी लागेल .. एका काल्पनिक कथेतली पात्र आपल्या अपेक्षेप्रमाणे वागतील अशी अपेक्षाच का करावी .. असल्या रुढीप्रिय चष्म्यातून वाचणारे वाचक च चूक! :p
|
Runi
| |
| Wednesday, September 26, 2007 - 7:16 pm: |
|
|
चेतना एकदम सत्यकथा वाटते. मला Life in a Metro हा सिनेमा आठवला. चुक कोणाचि किंवा कोणी काय करायला पाहीजे होते-नव्हते अशा सगळ्याच प्रश्नांची खरी उत्तरे मिळतातच असे नाही, आणि मिळाली तरि प्रत्येक जण तसे करेलच असेही नाही. तु अगदी योग्य जागी कथा संपवलीस.
|
Maanus
| |
| Thursday, September 27, 2007 - 2:25 am: |
|
|
जेव्हा एखाद्या बाईला कोणी पुरुष खरोखरच आवडतो तेव्हा ती खरीच अंधळी होत असते, त्या पुरुषाच्या सगळ्या चुका माफ असतात. you can really see the fire within her, when someone says something wrong about that person पण पुरुषांच्या बाबतीत तसे नसावे, they cannot be as passionate as woman can be. म्हणजे आजपर्यंत जितीकी उदाहरणे पाहीलीत त्यावरुन असे वाटते... स्वानुभव नाही
|
Athak
| |
| Thursday, September 27, 2007 - 3:01 am: |
|
|
काय काय चुका दाखवणे सुरु आहे का आता चेतना पण म्हणेल चुक झाली ही कथा लिहीली
|
Storvi
| |
| Friday, September 28, 2007 - 2:12 am: |
|
|
>>जेव्हा एखाद्या बाईला कोणी पुरुष खरोखरच आवडतो तेव्हा ती खरीच अंधळी होत असते, त्या पुरुषाच्या सगळ्या चुका माफ असतात>>तुला रे काय माहित?
|
Maanus
| |
| Friday, September 28, 2007 - 3:22 am: |
|
|
ह्म्म्म्म आते जाते हुए मै सबकी खबर रखता हु ;)
|
Chetnaa
| |
| Friday, September 28, 2007 - 6:21 am: |
|
|
हाय सर्व, थॅन्क्स सर्वाना... अभिप्राय बद्दल आणि अभिप्राय वरील अभिप्राय बद्दल पण..
|
Gobu
| |
| Saturday, September 29, 2007 - 4:32 pm: |
|
|
कथेबरोबर कथेचा अभिप्रायही चांगलाच रंगलाय! चेतना, अभिनंदन!
|
Mrinmayee
| |
| Saturday, September 29, 2007 - 10:26 pm: |
|
|
चेतना, चांगली रंगवलीय कथा! स्वाती, लालु.. गैरसमज होतोय!!! चुक झालीय ती प्रेक्षकांकडून! लफ़ड्याच्या विरोधात एकजण आवाज उठवेल तर शपथ! (म्हणून तर दोघं सोकावली!) नाहीतर एरवी कलाकारांच्या 'शिंकण्या-खोकण्याला' बोंबा ठोकतात! ('शिंकण्या-खोकण्याला' ... मायबोलीच्या आणि माझ्या लेखन सभ्यतेच्या मर्यादेमुळे ह्या क्रिया ल्याहायला घ्याव्या लागल्या हे (नम्रपणे) नमुद करु इच्छीते!)
|
Manuswini
| |
| Monday, October 01, 2007 - 9:00 pm: |
|
|
अरे वा चांगलेच रसायन इथे जमले आहे. " चुक की बरोबर मुद्दा " पण मी काय म्हणते वाचकांच्या चुक का बरोबर मुद्द्याच्या प्रतिक्रियेवर आपले गुद्दे.. अहं... मुद्दे का प्रतिक्रिया मारणे मांडणे पण चुकच. ही रुढी का प्रथा ही वाईटच.
पण माझी ही सुद्धा अपेक्षा चुकीचीच मुळात की कोणी असे करु नये त एही इथे... ही प्रतिक्रिया सुद्ध जरा हलकीच घ्या हो वाचकांनी
|
भारी कथा आहे. मात्र त्या विश्वासनी अस मधुनच बायकोला का सांगितल??काहितरी कारण आहे का??थोडि कथा अजुन मोठी झाली असती तरी चालल असत असे मला वाटते. प्रतिक्रिया देणार्या समस्त स्त्रियांनी विश्वासला दोष दिला आहे असे दिसते. माझ्यामते चुक कोणाचिच नाही. विश्वासनी हिरॉइनला 'गुड बाय' म्हणाव अस हिरॉईनला वाटत. पण विश्वासला तस करण्याच धाडस होत नसेल. हे काही सोप आहे का??विश्वास संपर्क कमी करतोय यावरुन तिने ते लक्षात घ्यायला हव होत. आणि समजा हिरॉइनच्या मताप्रमाणे त्याने तिला 'गुडबाय' म्हटल असत तरी तिच दु:ख कमी झाल असत का??विवाहित पुरुष असल्याने कधीना कधी हे होणारच होत ना??या नाही तर त्या मार्गाने आणि आज नाही तर उद्या हे होणारच होत ना??
|
Radha_t
| |
| Friday, October 05, 2007 - 8:32 am: |
|
|
मला तर वाटत maximum पुरुषांसारखा हा विश्वासही मेभळट असला पाहिजे. बायको पुढे भिगी बिल्ली. त्याच्या बायकोला सुरभी नको असेल तिने त्याला तस सांगितल असेल. आणि सुरभिला नाही म्हणायची हिम्मत ह्याच्यात नसेल किंवा जमल नसेल. असो. चेतना कथा एकदम फ़क्कड जमलिये.
|
Vaaghobaa
| |
| Friday, October 05, 2007 - 8:30 pm: |
|
|
चेतना, छान लिहिलयस ग. पण पण असल्या चगळूण चोथा झालेल्या विषयावर लिहिण्या पेक्षा... ? समजल ना मी काय म्हणातेय ते ? { उगाच maximum माणसांच्या पुरुषांच्या डोक्यात नुकोत्या कल्पना
|
Chinnu
| |
| Monday, October 08, 2007 - 3:50 pm: |
|
|
चेतना कथा जमली आहे. अजुन येउ द्या.
|