Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 17, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » काव्यधारा » कविता » Archive through September 17, 2007 « Previous Next »

Mankya
Wednesday, September 12, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं असच असतं

तू म्हणालीस,"हे असं नाहीच, ते पण तसं नसतं."
मलाच ठाऊक नव्हतं त्या गोष्टींना ईतकं महत्व असतं
जेंव्हा मी म्हणत होतो की हा काय प्रकार चाललाय
तू म्हणालीस,"सोड ना ! आज माझा मूड चांगलाय !"
म्हणे तूझ्या अपेक्षा आपल्यांकडून नसतात फार काही
किती गोष्टीत हट्टाने हे बोललीस तूझ्या लक्षातही नाही
सहज बोलून जातेस की तुझे कशाशीस नाही वाकडे
तेवढ्याच सहजपणे कसे करतेस गं एक घाव दोन तुकडे ?
प्रत्येक वेळी तूझं म्हणनं असतं की तूला समजून घ्यावं
पण वेळोवेळी बदललीस तर कसं कळणार तूला काय हवं
तूलाही वैतागून त्रास होत असेल तर बोलूच नये तूझ्याशी
लाडात येऊन म्हणतेस तेंव्हाच किती छान वागलास मगाशी
पून्हा बेसावध होतं मन माझ म्हणतं, कधी कधी होत असतं
पूढच्याच क्षणी तूझं वाक्य, " माझंच खरं आहे, माझं असच असतं !"

माणिक !


Zaad
Wednesday, September 12, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, कविता झकास आहे. खूप खूप आवडली.

Zaad
Wednesday, September 12, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा एकदा वाचली आणि अजूनच आवडली :-)

Vaibhav_joshi
Wednesday, September 12, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणे तूझ्या अपेक्षा आपल्यांकडून नसतात फार काही
किती गोष्टीत हट्टाने हे बोललीस तूझ्या लक्षातही नाही

वा !


Shriramb
Wednesday, September 12, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुझ्या त्या सूचक मौनाचा मी काहीसा असा अर्थ लावला होता-
की,
तुझ्या चेहर्‍यावरची ती किंचित स्मितरेषा
माझ्यासाठी एखादं सुंदर चित्र रेखाटेल
तुझे कल्पक डोळे त्यात रंग भरतील
तुझ्या केसांचा मोहक सुगंध
त्यात जिवंतपणा आणेल
आणि तुझ्या अस्तित्वाची चौकट
त्याला पूर्णत्व देईल.
पण,
शब्दांना पर्याय नसतो.
हो. त्या रंगहीन, गंधहीन, अस्तित्वहीन शब्दांना
पर्याय नसतो.
आणि शब्द कितीही असले,
तरी त्यांनी चित्र नाही रेखाटता येत!

~श्रीराम.


Kedarjoshi
Wednesday, September 12, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक वेळी तूझं म्हणनं असतं की तूला समजून घ्यावं
पण वेळोवेळी बदललीस तर कसं कळणार तूला काय हवं

सही लिहीलय. बायकोला वाचायला देतो


Mankya
Thursday, September 13, 2007 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, वैभवा, केदार .. मनःपुर्वक आभार !
केदार .. दे वाचायला पण जरा जपून.

माणिक !


Princess
Thursday, September 13, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, जबरदस्त खुप म्हणजे खुप्पच आवडली... नवर्‍याने वाचली तर माझी खैर नाही ;)

Jagu
Thursday, September 13, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक खरच खुपच छान. स्त्री मनाच छानच चित्रण केलस. मला पण नवर्‍याला एवढी छान कविता असुन दाखवता येणार नाही.

Sanyojak
Thursday, September 13, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया!
चला मंडळी आपापल्या लेखण्या, कुंचले,आणभव आणि डोकी परजून ठेवा.
कोरे कागद, स्क्रीन्स, कॅनव्हास तुमच्या प्रतिभास्पर्शाने बहरून जाऊ दे.
बाप्पांच्या मूर्तीचे बुकिंग झालेय. मखर सजतेय. तांदळाची पिठी, नारळ, गुळाच्या ढेपा, केशर, वेलदोडे यांचे वास वेगवेगळे का होईना पण दरवळायला लागलेत. जास्वंदीला फुलोरा आलाय.
आरत्यांच्या कॅसेट्स, दिव्यांच्या माळा यांचे टेस्टिंग पण झालेय.
घंटा, तबक, निरांजने, समया घासून पुसून लख्ख झाल्यात.
बॅंड आणि टेम्पोही ठरलेत.
तुम्ही सज्ज आहात ना?


Tiu
Thursday, September 13, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिलाच प्रयत्न आहे. कृपया सांभाळुन घावे! :-)

Tiu
Thursday, September 13, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस...

तोच दिवस, तेच ऑफिस आणि तेच काम,
खरच! कंटाळा आलाय जाम

ऑफिस मधे गेल्यावर आधी मेल चेक करायचे,
अगदी निरर्थक! तरी सगळे वाचायचे

तेच गुड मॉर्निंग, तेच जोक्स आणि फ़ॉर्वर्ड्स काही,
तिचा मात्र! आजही मेल नाही

फारच बिझी असेल, उद्या नक्की करेल,
विचारात विसरलोच! बॉसचा पण एखादा मेल असेल

आता मात्र विचार करायला वेळ नाही,
हाय प्रायॉरिटी वर्क! बहुतेक जेवायलाही जमणार नाही

अजुन काम थोडं बाकीच आहे, पण उद्या करावं,
१० वाजुन गेले! आता तरी निघायला हवं

घरी जाउन तरी काय करणार? जेवण टिव्ही आणि झोप,
नकोच! जरा वेळ बसुन संपवुन टाकु हे स्ट्रटजी & स्कोप

आता निघायला हरकत नाही, झालं काम एकदाचं,
पार्सलच घेउन जावं! पण कुठलं हॉटेल चालु असेल इतक्या रात्रीचं?

श्या! दुपारी जरा ब्रेक घेउन काय झालं होतं जेवुन घ्यायला,
जाउद्या आता! झोपावं, उद्या सकाळी लवकर पोहोचायचंय ऑफिसला

अलार्म वाजतोय, वाजु दे, झोपलं अजुन ५ मिनिट तर चालेल,
नको पण! ८:३०च्या मिटिंगला नाही पोहोचलं तर बॉस उचकेल

पुन्हा तोच दिवस, तेच ऑफिस आणि तेच काम,
खरच! कंटाळा आलाय जाम

---स्वप्नील


Princess
Friday, September 14, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा तिऊ छानच लिहिलीये. :-)
येईल बरे का तिचाही मेल ;)


Desh_ks
Friday, September 14, 2007 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा स्वप्नील,
छान कविता आणि सुंदर मांडणीही!
कवितेचा एकूण परिणाम उदास करून टाकणारा आहे. 'करियर' चं दुष्टचक्र यथार्थपणे मांडलं आहे.

"तेच गुड मॉर्निंग, तेच जोक्स आणि फ़ॉर्वर्ड्स काही,
तिचा मात्र! आजही मेल नाही
फारच बिझी असेल, उद्या नक्की करेल,
विचारात विसरलोच! बॉसचा पण एखादा मेल असेल"

हे वाचताना 'शं. ना. नवरे' यांच्या 'दिवसेंदिवस' कादंबरीची आठवण झाली.
-सतीश


Jagu
Friday, September 14, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्निल दैनंदीन जिवनाचे सरळ भाषेत खुपच छान वर्णन कले आहेस.

Jo_s
Friday, September 14, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, छानच लिहील्येस कविता, आवडली.

स्वप्नील, खासच आहे ही कविता, अगदी मनापासून लिहील्येस, चॅपलीनचा मॉडर्न टाईम्स आठवला. या युगाचं त्याने किती वर्षांपुर्वी चित्र रेखाटलं होतं.


Sanghamitra
Friday, September 14, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक मस्तच आहे रे कविता! अशीच काहीशी वाक्यं माझा नवराही म्हणत असतो खरा.
टिउ अपना भी हाल ऐसाही है दोस्त! अगदी पर्फेक्ट मांडलीयेस. प.प्र. जमलाय की!


Tiu
Friday, September 14, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, सतीश, प्राजक्ता, सुधीर, संघमित्रा...सर्वांना खुप खुप धन्यवाद! :-)

खरंतर इथे सगळे कवी, लेखक इतकं छान लिहितात त्यामुळे मला जरा भितीच वाटत होती कविता इथे टाकायला. त्यात पहिल्यांदिच कविता केलेली.

पण तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं त्यामुळे खुप बरं वाटतंय.

Thanks a lot! :-)


Manogat
Monday, September 17, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोंगरा येवढ्या मोठ्या
गरजा आहे
पण इवलस त्यासाठी
अर्थार्जन आहे.

झटतो आज ही मनुष्य
पहिले सारखाच आहे
पहिले थोडी भुक होती
आता तो हावरट आहे

पहिले नाती गोती होती
आज एकटाच आहे
दु:ख सांगावे कोणाला
दुरवर फ़क़्त वाळवंट आहे

आज प्रत्येक माणसाचे
हेच हाल आहे
आम्हि पुढे गेलो देव
पण तु दिलेले भुक तेवढिच आहे.

उपरति होइल कधी रे
त्या भुकेचि अम्हा
समाधानि होउ लगेल
हा माणुस जेव्हा....



Manogat
Monday, September 17, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक मस्तच रे गड्या :-) खुप खुप छान लिहिल आहेस...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators