|
नमस्कार. मायबोलीचा आठवा दिवाळी अंक यावर्षी नोव्हेंबर मधे प्रकाशित होत आहे. या अंकासाठी आपले साहित्य पाठवण्यासाठी आपल्याला आमंत्रित करत आहोत. गुलमोहोरावर साहित्य प्रकाशित करणे थांबवत नसलो तरी कृपया ते इथे प्रकाशित करण्या ऐवजी दिवाळी अंकासाठी पाठवण्याचा जरुर विचार करावा ही विनंती. गुलमोहोरावर प्रकाशित न होणारे साहित्यच दिवाळी अंकासाठी ग्राह्य धरले जाईल याची कृपया नोंद घ्या. अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयी अधिक माहिती येथे मिळेल. हितगुज दिवाळी अंक २००७ साठी साहित्य पाठवण्याकरिता 'येथे क्लिक करा'
Kkaliikaa
| |
| Sunday, October 07, 2007 - 6:08 pm: |
|
|
आयुष्य............. जगतानाही आपलं वाटणारं.... न वाटणारं एक आकर्षण........... आयुष्य....... अंतापर्यंत जगायला भाग पाडणारं...... जगणारं गुढ विलक्षण............ आयुष्य.......जगाचं............ व्यावहारिक..... प्रांपंचीक.....सामाजिक...प्रासादिक विश्लेषण............ आयुष्य......पर्मात्म्याने जीवा-शीवाशी जोडलेलं बंधन............
|
Kkaliikaa
| |
| Monday, October 08, 2007 - 10:25 am: |
|
|
कुणीतरी आठवणींने एखाद्याला आठवावं....... कुशल-मंगल विचारावं......... ह्यापलिकडली..... अपेक्षा ती काय????? आयुष्य जगताना.... हेच तर भान ठेवायचं असतं.... आपल्या आजुबाजुला इतरांचंही जग असतं...... ते आपल्याशी न जोडताही..... आपलं असतं..... कारण कधितरी..... केव्हातरी.... कुणीतरी आपलं नसतानाही............ आपल्याला आपलं मानत असतं........
|
Kkaliikaa
| |
| Monday, October 08, 2007 - 10:31 am: |
|
|
लोपा...श्यामली.... निखिल..देवदत्त...... योग.... चेतना......मयूर...ज़ुलेलाल फारच छान कविता............
|
Mkmanasi
| |
| Monday, October 08, 2007 - 12:10 pm: |
|
|
भेटता भेटता बंध रुजुनी गेला, ओल नात्याची या गंध सांगुनी गेला... झुरता झुरता अश्रु रिझवुन गेला, जाता जाता स्वप्नाची शपथ घालुन गेला... क्षण एक साद अनामिक घालुन गेला, मनाची समजुत घालताना अर्थ नीतीचा समजुन गेला.... कळ्या मनाच्या खुलवुन सुगंध मोहवुन गेला, कोमेजताना बोच काट्याची ठेऊन गेला.....
|
Sumedhap
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:27 am: |
|
|
मनाचे खेळ.... नको रे देवा खेळ मनाचे, सोडव आता यातुनी वाळलेल्या जख्मांतही नित्यसे ओल दुःखाची आतुनी नको रे देवा खेळ मनाचे, स्वप्नी सदा ते वसते अशक्य असेल जगात जे नेमके तेच तयास दिसते नको रे देवा खेळ मनाचे, सारखे गुंतते,भटकते जाणुन सारे अडकते,चुकते अधांतरी लटकते नको रे देवा खेळ मनाचे, आज कुणीही साधं नाही कळुदे त्यास सुख शोधणे स्वतचे अपराध नाही नको रे देवा खेळ मनाचे, बळ दे तयास घडवाया सत्यात जगुन, स्वप्नपूर्ती करुन जगी या लढवाया....
|
Sampadak
| |
| Wednesday, October 10, 2007 - 12:35 pm: |
|
|
बघता बघता महिनाभरावर दिवाळी येऊन ठेपलीये. घराघरात दिवाळीची तयारी, कोणाकडे रंगकाम कोणाकडे साफसफाई, कोणाच्या खरेदीच्या याद्या तयार झाल्यात, फराळाच्या पदार्थांसाठी स्वयंपाकघरं सज्ज व्हायला लागलीयेत, बच्चे मंडळीची किल्ल्यांची तयारी जोरात, आणि आम्हीही सज्ज आहोत. घराघरातून खमंग वास दरवळतोय आणि इथेही गंध पसरलाय आपल्या दिवाळीअंकाच्या तयारीचा. आपल्या लेखण्या, कॅमेरे, कुंचले,रेकॉर्डर्स आणि कल्पनाशक्ती सरसावली असेलच सगळ्यांनी. तर अजून वेळ आहे पाठवू, बघू सबबी मनात येत असतील तर...हे वागणं बरं नव्हं २४ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे तेंव्हा घाई करा आणि आपलं साहित्य लवकरात लवकर पोहोचेल यावर लक्ष असू द्या. काही शंका, प्रश्न असतील तर संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. अंकासाठी साहित्य पाठवण्यासाठी नवीन मायबोलीमध्ये प्रवेश करा. तेथे दिवाळी अंक लेखनासाठी दुवा डाव्या रकान्यात दिसेलच. तेंव्हा मंडळी पाठवा साहित्य लवकर लवकर.
|
Mkmanasi
| |
| Wednesday, October 10, 2007 - 1:51 pm: |
|
|
i m not able to access the link for subimitting material for Diwali Ank....i m gettin access denied error.....plz help
|
MkManasi आपल्याला दिवाळी अंकासाठी लेखन करायचं असल्यास नवीन मायबोलीत लॉगीन करावं लागेल. त्यासाठी मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर जा.
|
Namrata4u
| |
| Friday, October 12, 2007 - 5:34 am: |
|
|
एक होत रानफूल अवचित फूलल ...सौन्दर्य अन सुगंधावाचुन जगल त्याचा मनी त्याने एक शल्य जपल कारण काय माझ्या असण्याच नाही माध्यम मी देवाला पुजन्याच नाही सौन्दर्य नाही सुगंध कधीच नाही होणार माझ निर्माल्य पण तेवढयात एक राजकुमार आला हो तो होता भिल्लांचा राजकुमार ज्याने त्या फूलाला कल आपलस कोवल्या मृदु स्पर्शातुन दिल त्याला हव असलेल त्यातून जणू सांगीतल , प्रत्येकाच्या अस्तित्वाला महत्व असते बघणारयाच्या नजरेत तर सौन्दर्य असते
|
Namrata4u
| |
| Friday, October 12, 2007 - 5:36 am: |
|
|
|
Mkmanasi
| |
| Friday, October 12, 2007 - 6:23 am: |
|
|
i tried logging in maayboli.com home page.its giving me unrecognized username n password error...... :-( should i use same login which i m using for posts or somthing else?.....
|
Mkmanasi
| |
| Friday, October 12, 2007 - 6:26 am: |
|
|
ओढ थेंबाथेंबाची ओढ या मातीलही लागे, मॄद्गंध सांगतो हे ओलाव्याचे नाते सर पावसाची धरणीला मुक्तपणे भेटते, मैत्रीचे हे नाते पुन्हा नव्याने रंगते विचारांची बरसात होते भावनाही चिंब भिजतात, बालपणीच्या होड्याही पुन्हा पाण्यात उतरतात नभ दाटुन येतात गार वाराही वाहतो, सॄष्टीचे चैतन्य अलगद अंगावर झेलतो मन अडकते नकळत आठवणींच्या विळख्यात, आणि ऐकू येतो फक्त थेंबाचा सुरेल नाद प्रत्येकवेळी तो असाच मनमुराद बरसतो, एक अनामिक ओढ मनाला लावून जातो......
|
|
|