Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 17, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » Untitled » Archive through September 17, 2007 « Previous Next »

Maanus
Saturday, September 15, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Back page of Untitled book

I was literally shocked when I last visited India, two of my very good friends had started to smoke. and for no particular reason. First ones spouse used to be always away and the other one was heartbroken in relationship. Girls come-on these are not the reasons to start smoking. And they were very shameless, they'll directly go to pan stall next to their home and ask for cigarette. There was no guilt feeling, their parents know they are smoking. When did India become so much advanced? What happened in last two-three years.

I used to see other state girls smoking in my collage, at suruchi near Indsearch. but never saw a marathi girl so much addicted to smoking.

I have attended only first six months of my 11th in collage and after that I had hardly attended any lecture till end of B.Com, all these things I have written above are real life events I have seen when I was not attending lectures. I personally feel people should go to commerce after 10th, its the best way to get educated about real life. B.M.C.C. Rocks!!!

and people really eat iodex. There are many other things they eat/drink. However I skipped that part, I didnt wish this story to become an informative story.

I tried to convince both of them to quite it, still doing it. but its useless effort.

If you think above story has come somewhat good and the smokers think my, attempt to narrate your mind is good; please please do forward it to your friends who are smoking.

After all Mr. Phule has once said, if you'll educate a woman, she'll educate rest of the family

If woman have started to smoke, how can rest of the family not get addicted to such things. Thats why first the woman should quite and then as Mr. Phule said...

I have also planted seeds for my next story in this one, but I am not very sure if I should write on it, if people will accept it. Its again another dark side of our society. I am not very sure, if I can make it less graphic.


Maanus
Saturday, September 15, 2007 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्रीसुलभ रीत्या खाली वाकून

हे वाक्य पण मुद्दाम टाकलेय :-) बायानो जमीनीवरची काही गोष्ट उचलताना, उ.दा. झाडु. जरा जपुन खाली बसावे, मुल वाकतात, मुलींने बसायचे असते. स्पष्ट सांगायचे म्हणजे, जरी समोर कोणती व्यक्ती नसली तरी मागे कोणीतरी असु शकते. तेव्हा जरा जपुन :-)

hope you'll take this lightly :-)


Manuswini
Sunday, September 16, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, good attempt .

पण हे असे वर्गीकरण जरा चुकीचे वाटते. हे माझे प्रामाणीक मत आहे.
सिगरेट ही वाईटच मग मुलगा काय नी मुलगी.
आता मुलगी प्यायला लागल्यावर आपण अचंबा करतो. का? त्यात मराठी मुलगी? कारण प्रभाव असतो ना आपल्यावर मुली ने हे करु नये, असे करु नयेचा.
खरे तर मी ही अशीच shocked होते जेव्हा माझी एक india तील मैत्रिण ( catholic होती) चुकीच्या friend च्य्य संगतीत आल्याने वयाच्या १३ व्या वर्षी smoking करायची. school च्या चक्क toilet मध्ये.
चक्क thrill म्हणून सुरु केली ती अगदी वयाच्या २८ व्या वर्षी हल्लीच निधन झाले throat cancer ने.

आता माझी आणखी एक US raised मैत्रिण smoking करते, वय १८, घरी आई वडील अगदी traditional . दहा वर्षापुर्वी आलेले. वर बघता वाटणार नाही पण spanish, black च्या संगतीत सदा, घरी काही कळत नाही. college साठी लांब तेव्हा स्वांतत्र्य हवे तेव्हढे..... बाकी ही मुलगी आहे मात्र हुशार. ह्या वयात बरेच ज्ञान आहे पण ही दुर्दशा दुसरे काय.........
मला ही एकदा आग्रह करत होती try it on once, nothing would happen . असे फटकारले ना म्हटले तो घाणेरडा वास घेवून माझ्या घरी येवु नकोस. नंतर sorry म्हणत स्वःताच explaination देत होती की रोज मी करत नाही वगैरे वगैरे........ ह्यांना सुधारणे कठीण असते.


Sunidhee
Sunday, September 16, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म.. चांगले लिहिलेस :-(. हेतु चांगला आहे.

Kmayuresh2002
Sunday, September 16, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा,चांगला विषय हाताळला आहेस रे... मनु म्हणतेय तसे व्यसन सगळ्यांसाठी सारखचं रे.. स्त्री काय किंवा पुरुष.. शेवटी परिणाम एकच.. भारतात स्त्रीयांचे या व्यसनाचे प्रमाण पूर्वी खूपच कमी होते.. आता सर्रास चालते.. ह्याचमुळे आपल्याला आश्चर्य वाटते एवढेच..

पण सगळ्यात मला वाईट वाटतं जेव्हा doctor लोकंसुध्दा व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात.. जिथे प्रत्यक्ष जिवनदाताच आपल्या आयुष्याचा नाश करत असतो तो दुसर्‍याला काय जिवन देणार?

आणि हो तू म्हणतोयस तसं मध्ये आयोडेक्स ब्रेड्ला चोपडुन ते खायचा प्रकार बराच बोकाळला होता.. नशेचाच एक प्रकार आहे तो... आणखीही असे बरेच अघोरी प्रकार चालतात या नशेसाठी ज्याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही


Chetnaa
Sunday, September 16, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसा, सुन्न केलंस...
मनु ला अनुमोदन... व्यसन दोघांनाही घतकच... पण यातुन पुरुष मंडळींही बोध घेतीलच... आदिवासी समाजात स्त्रीया सर्रास बिड्या पितात, आपल्या देशात हे नविन नाही... पण त्यांना परिणाम माहितच नसतात.. सुशिक्षीत लोक असे का वागतात तेच कळत नाही..
पण नाही ऐकत लोक्स... हेच खरे...
माझ्यापण एका मित्राला किती समजावले... पण तो अनेक कारणे सांगतो स्वता:च्या समर्थनार्थ... पण स्मोकिंग कमी करत नाही..
अजुन लिहि सागर... जे बिज सोडलेस त्यांचे वृक्ष होऊ देत..


Dipalimarathe
Sunday, September 16, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा copy paste कशी करायची? MS word मधे पन नीट दिसत नाही

Itgirl
Sunday, September 16, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, कथा आवडली, छान लिहिले आहेस :-)

Dineshvs
Sunday, September 16, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, कथा आवडली. मलाही या व्यसनांची अत्यंत घृणा आहे.
याबाबतीत तुझे मत माझ्याचसारखे आहे, हे वाचुन खुप बरे वाटले.
अजुनही लिही. ( मायबोलीवर लिहिण्याचे व्यसन लागले तरी चालेल. )


Aashu29
Sunday, September 16, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते, स्त्रि पुरुष वर्गिकरण करू नये, पण स्त्रिच्या व्यसनाचा परीणाम तिच्या अपत्यावर होउ शकतो, त्यामुळे स्त्रियांनी जास्त जपुन असावे व्यसनांपासुन!!
बाकि माणुस, गोष्ट फ़क्कड

Ana_meera
Monday, September 17, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन सुन्न झाले माणसा वाचून. त्या बोधप्रद कथेपैकी असूनही रंजक लिहिली आहे.
आणि ओघवती- compliment आहे.
पुढची कधी?


Psg
Monday, September 17, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली लिहिली आहेस माणसा गोष्ट.. तुझी कळकळ जाणवते लिखाणातून..

Mahe
Monday, September 17, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, खुपच छान वर्णन केले आहेस. भारतात गेल्यावर मित्र-मैत्रिणीची अशी अवस्था पाहिली खुप वाईट वाटते. पण तुमची ही कथा वाचून खुपजणांचे डोळे नक्कीच उघडतील..
भाग्यश्री


Amruta
Monday, September 17, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, खरच छान लिहिलीयेस. अजुन लिहित रहा.
तु म्हणतोयस कि तुला हल्ली व्यसन जडलेल्या व्यक्ती जास्त दिसतात पण माझ्या ओळखीच्या तरुण मुला मुलीं मधे मला व्यसनांबद्द्ल खुपच जागरुकता दिसते. (त्यात तुही आलासच :-))

हो पण हे iodex पहिल्यांदाच ऐकल. बहुदा माझ्या नजरेआड हे जग आहे.


Swaatee_ambole
Monday, September 17, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती सगळ्यांनी म्हटलंच आहे, तेच मीही म्हणेन. यात स्त्री पुरुष हा भाग फारसा महत्त्वाचा नाही वाटत मला. विशेषतः smoking च्या संदर्भात. Second hand smoking मुळेही चालू आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यावर तितकेच वाईट परिणाम होतात. व्यसन वाईटच.

सागर, तुझी कळकळ भिडली.


Upas
Monday, September 17, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा कथेचा विषय छान..
व्यसन पुरुष किंवा स्त्री कोणीही केले तरी वाईटच ह्यात तीळमात्र शंका नाही..
पण परिणामांचा विचार करता ( निदान भारतात तरी ) स्त्रीच्या व्यसनाधीनतेचे कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तीक परिणाम तीव्र आणि दूरगामी होतात असं दिसतं... माझ्या कित्येक मित्रांचे वडील व्यसनाधीन असूनही घरातल्या स्त्रीने संसार सावरलाय.. मुलांवर खूप खोल परिणाम होऊ दिला नाही. उलट स्त्रीस व्यसन असेल तर संसार पटकन उध्वस्त झालेले पाहिलेत, तसेच होणारी संतती, घरातील वातावरण ह्यावर विपरीत परिणाम दिसून येतोच! म्हणजे एक बाई शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं ह्याच्या अगदी उलटं सुद्धा तितकच खरं आहे.. आणि विदारक सुद्धा!
पुन्हा एकदा स्त्री पुरुष असा भेदाभेद करायचा नाहीये पण व्यसनमुक्ती साठी स्त्री आणि पुरुष अशा दोन व्यक्ती समोर असतील तर मी स्त्रीस व्यसनमुक्त करण्याचा पहिला प्रयत्न करेन!


Manuswini
Monday, September 17, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यसन जडणे ते माणसावर माणसावर(इथे माणुस म्हणजे मनुष्य प्राणी, लेखकास उद्देशून नाही) अवलंबून आहे.
आता मी नाही का एवढ्या सगळ्या व्यसनाधीन लोकांबरोबर आहे रोज उठते,बसते,लिहिते. .






थांबा.ऽऽऽ.... कसले व्यसन तर मायबोलिचे हो. :-)




Arch
Monday, September 17, 2007 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, अगदी अगदी. तुझ्या मताशी १००% सहमत.

Maanus
Monday, September 17, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनी आवर्जुन येऊन माझ्या भावना समजुन घेतल्या, धन्य वाटले :-)

smoking विषयावर चर्चा आधिच होऊन गेलेली, पण ती नुसत्या नॉन स्मोकर्सची चर्चा होती, त्यात फक्त एकच active user दिसला. i wanted to write something through which i can narrate lifestory of a smoker, and make him realize what is going to happen in future if he doesnt stop. जर मी हे achive केले तरच ह्या कथेचा उपयोग, नाहीतर ती व्यर्थ आहे. its not v&c story, it should be looked at an inspiration story. inspiration to quite.

जर तुम्हाला वाटतेय की ही मन परीवर्तन करणारी story आहे तर कळवा, म्हणजे मी परत काहीतरी लिहु शकेल.


Disha013
Monday, September 17, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलय रे माणसा. आधी वाटलेलं की अशीच हलकीफ़ुलकी कथा असेल, पण मधेच गंभीर वळण दिलेस. असं काही झाल्याशिवाय थांबणारच नाहीत का ही व्यसनी लोकं?
सिगारेट पिणं हा बिनधास्तपणाचा मापदंड वाटतो नायिकेच्या नव-याला. :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators