Mankya
| |
| Tuesday, September 18, 2007 - 1:55 am: |
|
|
अरे माणसा .. काय लिहिलय दोस्त ! सगळे बारकावे अगदी मस्त उतरवलेस स्मोकर्सचे आणि हे ही खरं आहे की त्यांचे फ्रेंड सर्कल लवकर तयार होते अन विस्तारही खूप असतो त्याचा. परीक्षेच्या काळात जागरणासाठी सिगरेटचा खूप उपयोग ( ? ) केला जातो. एक गोष्ट मात्र कायम खटकते की व्यसनावरून निकष काढले जातात व्यक्तिमत्वाबद्दल, माणसं जवळ करण्याबद्दल ! तसं म्हटलं तर व्यसन तर प्रत्येकालाच असते ना कुठलेतरी मग ते कुठलेही असो, ती एक वृत्तीच आहे ना. काही व्यसनांनी फक्त स्वतःला त्रास होतो ( शारीरीक ), तर काही व्यसनं ईतरांना ईजा पोहोचवतात ( मानसिक ) अर्थात त्यांना व्यसन म्हटलं जात नाही आपल्यालेखी. कुठल्या गोष्टीतून किंवा कृतीतून काय मिळवायच हे पक्क माहीत असेल तर माणूस फसत नाही. प्रत्येक गोष्ट आपण अगदी आहे तशी स्विकारण्यावर, प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते; ती ईतरांनीही स्विकारावी हा अट्टाहास करून काय उपयोग. शेवटी बदल घडवण्याची किंवा बदलण्याची प्रक्रिया ही प्रत्येकावर म्हणजे स्वतःवरच अवलंबून असते. हे फक्त वैयक्तिक विचार आहेत कोणत्याही गोष्टीला दुजोरा देण्याचा मानस नाही. ही पहिली प्रतिक्रिया एका रेग्यूलर स्मोकरची ! माणिक !
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 18, 2007 - 3:26 am: |
|
|
हो पण हे iodex पहिल्यांदाच ऐकल. बहुदा माझ्या नजरेआड हे जग आहे>>>>>>>>. ह्याहुन धक्कादायक एक व्यसन मला त्या आयोडेक्ष च्या काळातच पेपर मधे वाचायला मिळाल होत. पण त्यात जीव लवकर जायचा. ते म्हणजे पाल मारुन तिच्या कातड्याचा धुर घेणे. माणसा छान लिहिल आहेस हो. पुढेही लिहित रहा. मला वाटत की कोणी गर्भवती असेल तर काळजी घेइल स्वाटाची. अशा वेळी तर पॅसिव स्मोकिन्ग पण टाळण्याकडे लक्ष असत. अर्थात हे नोर्मल स्त्रियांमधे होइल पण केस अगदीच हाताबाहेर गेली असेल तर कठीण आहे.
|
Amruta
| |
| Tuesday, September 18, 2007 - 4:39 pm: |
|
|
बापरे!! पाल मारुन तिच्या कातड्याचा धुर??? झकासराव काहीतरीच, खर नाही वाटत हे असल काहितरी.
|
Maanus
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:02 pm: |
|
|
अजुन काही ads http://altracking.com/Khaleej_Times_Smoking_Ads/4.jpg http://altracking.com/Khaleej_Times_Smoking_Ads/1.jpg http://altracking.com/Khaleej_Times_Smoking_Ads/2.jpg http://altracking.com/Khaleej_Times_Smoking_Ads/3.jpg http://altracking.com/Khaleej_Times_Smoking_Ads/5.jpg http://altracking.com/Khaleej_Times_Smoking_Ads/6.jpg
|
Athak
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:30 pm: |
|
|
माणसा छानच लिहीलेस , व्यसन म्हटले की त्याचे परिणाम आलेच खरच भाषा ओघवती का म्हणतात तशी आहे
|
बापरे!! पाल मारुन तिच्या कातड्याचा धुर <<<<<मी पण वाचले होते हे iodex आणि पालीचे व्यसन . सकाळ मधेच आले होते ,10-15 वर्षां पूर्वी .
|
Manuswini
| |
| Tuesday, September 18, 2007 - 7:18 pm: |
|
|
ईऽऽई, ही कुठली तरी विकृती दिसते,पाल मारून तिचा धूर. काय असते त्या वासात? शीऽऽ. मी तर हे iodex ,पाल इथेच एकले.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 18, 2007 - 7:27 pm: |
|
|
गूगली केल्यावर हे मिळाले, http://timesofindia.indiatimes.com/articleshow/920132.cms it might sound weird पण कालच मी पडले घरातच आणि हे टेंगूळ घोट्याला आणि घरात iodex पण नाही म्हणून विचार करत होते आणायचा आता विचारात पडलेय हे सर्व वाचून curiosity kills .....
|
Mansmi18
| |
| Tuesday, September 18, 2007 - 7:42 pm: |
|
|
मला लहानपणी cigarette पिणे हे cool गोष्ट वाटायची. नाकातोंडातून धूर काढणार्या.बद्दल मला कौतुक वाटायचे. मी एकदा cigarette ओढायचा प्रयत्न केला होता पण मला जमले नाही पण पुढे कधी मी प्रयत्नही केला नाही. खय्यामची "फ़िर छीडी रात" पेक्षा अधीक धुन्दी चढवणारे आणखी काय असणार या जगात?(हे माझे वैयक्तीक मत आहे उगाच पोस्ट्स ची मारामारी नको माणुस, साधी सरळ कथा आहे. चांगली आहे.(कृपया थोडे शुद्धलेखनाकडे लक्ष द्याल का?)
|
Chetnaa
| |
| Wednesday, September 19, 2007 - 3:49 am: |
|
|
खय्यामची "फ़िर छीडी रात" पेक्षा अधीक धुन्दी चढवणारे आणखी काय असणार या जगात?>>>> अनु मोदन मनस्मी....
|
माझ्या हॉस्टेलमधे मी अशी व्यसने करणार्या खूप मुली पाहिल्या आहेत. iodex तर खूप कॉमन होतं. कित्येकदा माझ्याकडून मागून घेऊन जायची एक मुलगी. मीडीयामधे तर त्याहून किळसवाणे प्रकार पाहिले किंवा ऐकले आहेत. त्यापुढे पालीचा धूर सुसह्य वाटेल. मी स्वत्: या खड्ड्यात कधीच पडले नाही... कारण वर मनस्मीने लिहिलेलंच आहे. एखाधा उंच कडा.. एखादी मस्त गझल किंवा आईच्या हातच्या पुरणपोळ्या याने जी धुंदी चढू शकते (झोपसुद्धा येईल, जायफ़ळ घातलेलं असेल तर.. ) त्याची सर दुसर्या कशालाच नाही... अर्थात हे वैयक्तिक मत. त्यानंतर जवळ जवळ सहा महिने एका माणसाला ड्रग्जच्या व्यसनातून सोडवण्याचा प्रयत्न करतेय. अक्षरश्: मरेल म्हणून सांगितलेला हा माझा मित्र आता जॉबवर जातो... याचा अर्थ व्यसनातून बाहेर येणं शक्य आहे. पण ते सहज मात्र नक्कीच नाही. स्मोकिंगचे सर्वात जास्त परिणाम होणार्या बाळावर होतात, त्यामुले स्त्रियानी शक्यतो धोऊम्रपान करु नये असा माझा एक कलीग सिगरेट पेटवत असतानाच सांगायचा...
|
Chandya
| |
| Wednesday, September 19, 2007 - 3:29 pm: |
|
|
सागर, चांगले लिहिले आहेस. अगदी थेट विषयाला भिडणारे.
|
Jhuluuk
| |
| Tuesday, September 25, 2007 - 4:54 pm: |
|
|
माणुस, खुप कळकळीने लिहिले आहे हे जाणवते... खर आहे कि मुलींनी smoke करताना पाहिले कि कसेसेच होते.. आणि हे हि कि सिगरेट ओढणार्या लोकांची अगदी तिडिक बसते... पण कुठे थांबायचे हे ज्याचे त्याला कळायलाच हवे... किंबहुना, काय नाही करायचे ते!! बाकि iodex आणि पाल या गोष्टी ऐकावे ते नवलच!!
|