|
Maanus
| |
| Friday, September 14, 2007 - 3:28 am: |
|
|
"विज्या... ते बघ" रस्त्यावर पडलेल्या पाच रुपायच्या नोटेकडे डोळ्यानेच ईशारा करत आम्ला म्हणाली. विजयाची नजर रस्त्याकडे गेली, तीने एकदा आम्ला कडे पाहीले, हसली. स्रीसुलभ रीत्या खाली वाकून ती नोट उचलली. "मग? आजच" -------------------------------------------------------------------------------------------------- ई.स. १९९५ आम्ला आणि विजयाचे हे B.M.C.C. मधले पहीलेच वर्ष. नळ्स्टॉपच्या पलीकडे कधी पुण न पाहीलेल्या दोघी प्रथमच एवढ्या मोठ्या महाविद्यालयात येणार होत्या. कॉलेजचा पहीला खोट्या शिक्षकाचा दिवस सोडला तर बाकी कॉलेज दोघीना एकदम मनासारखे मिळालेले. दोघी प्रत्येक तासाला न चुकता बसत. ९५ सपुन ९६ आले, फेब्रुवारीत कॉलेज मधले डेज सुरु झाले, सारी डे, ब्लॅक न व्हाईट डे, चॉकलेड डे, रोज डे आज चॉकलेट डे होता. म्हणजे जर तुम्हाला मैत्री हवी असेल तर kit-kat द्यायची, भांडण मिटवायचे असेल तर पान पराग, आणि कोणी खुपच आवडले असेल तर डेअरी मिल्क. सिमरन ला खुप लोक kit-kat देत होत. पण आमच्या मराठी पजाबी ड्रेस मधाल्या आम्ला आणि विज्या कडे उगाच एक दोन खडकी दापोडी पोराचे लक्ष गेले. दुपारी त्या जेव्हा कॅन्टीन मधे गेल्या तेव्हा त्यांना दिसले सिमरन आज नव्याने झालेल्या मित्रांबरोबर मुलांच्या section बसुन सिगरेट पित होती. दोघी मुलींच्या section मधे गेल्या. "तु पिलीयस का ग कधी" "काहीतरीच काय" "मला टेस्ट करायचीय एकदा" "ए गप ए" "काही नाही होत ग, ईतके लोक पित असतात, कोणी मेलेल दिसलय तुला कधी" "नाही" "फक्त वास कसा घालवायचा कळत नाहीय" "मी एकदा कुणाकडुन तरी ऐकलेले मेन्टॉस खातात म्हणुन" "ह्म्म्म, जन्म एकदाच मिळतो, तेव्हा सगळी सुख एकदा तरी चाखुन बघायला पाहीजेत" "अग पण" "लगेच थोडीच आपल्याला व्यसन लागतेय ग, बर मला सांग तुला सिगरेट कोणत्या कोणत्या असतात माहीत आहेत का, म्हणजे कधी टपरीवर जायचे डेरींग झाले तर" "ना... हा ५५५ अशी कोणतरीतरी भारी सिगरेट असते म्हणतात" "नाही रे, साधी आपल्याला परडण्यासारखी" आलेला बनवडा तोडात टाकत विजया म्हणाली "क्लासिक का काहीतरी ऐकलेल मी" "माईल्ड पितात मुली, मला एक पाकीट सापडलेले रस्त्यावर मार्लबोरो नावाच" "सिगरेट होती त्यात" "नाही ना, पण वास आवडला आपल्याला" "हा हा" दोघी बनवडा खायला लागल्या "पण पहीली सिगरेट फुकटची प्यायची, आपल्या खिशातुन पैसे टाकुन असल्या ईच्छा नसतात पुर्ण करायच्या" "बाई जरा सांभाळुन ग, मला तर तुझी भितीच वाटते कधीकधी" "श्शि बाई काय ग, आपण स.प. त नाहीय" "बर ते जाउदेत आता काही तास होतील असे दिसत नाही, जायचे का मग घरी" "चला" कॅन्टीन मधुन बाहेर पडताना परत एकदा सिमरन दिसते का पाहीले, ती अजुनही तिथेच होती, धुर सोडत. डेक्कन च्या दिशेने दोघी निघाल्या, प्रियदर्शनी पर्यंत पोचल्या नाही तोच B.M.C.C., Symbi, I.M.D.R गोखले institute, मराठवाडा इथे असलेल्या, असणार्या सर्व मुला मुलींची आवडती जागा म्हणजे प्रियदर्शनी, चहा पाण्याची छोटीशी टपरी आहे, गोखले institute च्या समोर. पहीले मोठी होती आता फारच लहाण झालीय "विज्या... ते बघ" रस्त्यावर पडलेल्या पाच रुपायच्या नोटेकडे डोळ्यानेच ईशारा करत आम्ला म्हणाली. विजयाची नजर रस्त्याकडे गेली, तीने एकदा आम्ला कडे पाहीले, हसली. स्रीसुलभ रीत्या खाली वाकून ती नोट उचलली. "मग? आजच" "देव आपल इतक लवकर ऐकतो माहीत नव्हत, बघ देव देखील म्हणतोय प्या सिगरेट, घ्या त्या धुराचा आनंद" आम्ला हाताची घडी घालुन उभी होती. "first step towards rebel my dear आम्ला" "अग पण, आपन घरी चाललेलो ना" "लवकर निघालोत ना आपण कॉलेज मधुन आज" विजयाने आम्ला चा हात पकडुन तिला रस्त्यापलीकडे प्रियदर्शनीवर नेले. "एक सिगरेट कितीला असते" "कोणती हवीय" "मार्लबोरो माईल्ड" दुकानदाराने एकदा मुलींकडे पाहीले "मार्लबोरो पाकीट घ्यावे लागेल, गोल्डप्लेक आहे सुट्टी ३ ला एक." "दोन द्या, एक माचीस पन आणि मेंटॉस" विजयाने शांतपने सिगरेट उचलल्या आणि रस्ता परत cross केला. संपुर्ण रस्ता cross करेपर्यंत धड धड सुरु होती. आपल्या हातात काय आहे ह्या कल्पनेने. आता ईथे कुणी आपल्याला पाहीले तर. "चल टेकडीवर जाऊ" I.M.D.R. च्या गल्लीतुन दोघी हनुमान टेकडीकडे निघाल्या, जिथे कधीतरी टिळक गेले होते टेकडीमागच्या जेल ला कॉलेज बनवण्यापुर्वी. हनुमान टेकडीवर दोन पाण्याच्या टाक्या आणि एक दोन पडीक खोल्या आहेत, जिथे सहसा कोणी भटकत नाही. "कशी पेटवतात माहीत आहे का तुला" "दोन घेतल्यात ना, पहीलीवर प्रयोग करुन बघु" विजयाने दोन बोटांत सिगरेट पकडली, नाकाजवळ पकडुन उर भरेपर्यंत एकदा त्या तंबाकुचा वास घेतला. आम्ला च्या नाकाजवळ नेली. तिला देखील वास आवडला. विजयाने सिगरेट गुलाबी ओठांत ठेवली. माचीस पेटऊन सिगरेट जवळ नेली. सिगरेट चा पुढचा भाग आम्ला ला निखार्या सारखा दिसु लागला. विजयाने धुर तोंडात ओढायचा प्रयत्न केला. ती जोर जोरात खोकु लागली. सिगरेट खाली पडली. ती लगेच खाली वाकली, मग तिथेच खाली बसली. सिगरेट परत तोंडात ठेवत विजया म्हणाली. "try करणार" क्रमश: मला प्रोस्ताहन दिले... भोगा आता आपल्या कर्माची फळ
|
Bhagya
| |
| Friday, September 14, 2007 - 3:36 am: |
|
|
ए माणूस, आम्ल म्हणजे acid ...तर हे आम्ला नाव बरोबर वाटतेय का अमला म्हणायचे आहे तुला? आणि चक्क गोष्टी लिहायला लागलास.... काय झाले काय तुला? पण चांगले लिहितोयस...येउ दे अज़ुन.
|
Nilima_v
| |
| Friday, September 14, 2007 - 4:03 am: |
|
|
माणूस, तु गोष्टी चांगल्या लिहितोस. मला सुरवातीला टपोरी वाटायचास, पण खुपच छान. तू मागे हडळ लिहिलीस तसाच अनुभव मला आला आहे. मी फिली जवळ Warrington मध्ये असताना शनिवार रविवार एकट्यानेच cinemala जाणे होई, तेव्हा रात्री "Sixth sense" पहातना, थेटर बंद करून लोक जात होते. मी धावत जाउन ओरडून त्यांना थांबविले. रात्री ते सामोरचे दार बन्द करीत मग मला एकट्याने underground रस्त्याने मागच्या बाजुने बाहेर यावे लागे.
|
Ana_meera
| |
| Friday, September 14, 2007 - 5:28 am: |
|
|
माणसा तुझी भाषा ओघवती आहे आणि विषय नवे. लिही रे लिहीSSS
|
Maitreyee
| |
| Friday, September 14, 2007 - 1:48 pm: |
|
|
माणसा, काय चल्लय काय,ऑं! अगदी डीटेलवार लिहिणं सुरु आहे.... चटपटीत संवाद लिहिणं जमतंय बाकी तुला
|
Maanus
| |
| Friday, September 14, 2007 - 3:33 pm: |
|
|
टपोरी हा हा भाग्या तु B.A.M.S. का? मला एक मैत्रिण होती आम्ला नावाची, जरा वेगळेच नाव म्हणुन इथे वापरले. RVG च्या शिवा चित्रपटाच्या नायीकेचे नाव पन आम्ला च होते ना? का हे नाव लिहीताना अमला असे लिहीतात, कळवा म्हणजे पुढच्या भागात दुरुस्ती करतो. काय झाले काय तुला.... काय चल्लय काय,ऑं!.... नविन जागेचे दुष्परीणाम आहेत, एकट्याला काही काम धंदे नाहीत तर तुम्हा लोकांना गिनीपिग करतोय ओघवती म्हणजे काय, चांगले का वाईट? ज्यांना कळाले नसेल त्यांच्यासाठी स.प. म्हणजे S.P. Collage . त्याला पेठी लोकांच कॉलेज देखील म्हणतात, तिथे खुप लोकांच्या जिभेचे हाड मोडलेले असते.
|
Tiu
| |
| Friday, September 14, 2007 - 3:33 pm: |
|
|
सही रे...मजा येतेय वाचायला! फक्त एक किरकोळ दुरुस्ती! मार्लबोरो माईल्ड नसते...लाईट असते. गोल्डफ्लेक पण लाईट असते. फक्त क्लासिक माईल्ड असते. आणि ९६ मधे एक सिगरेट ३ ला? इतकी महाग नसेल! म्हणजे नसावी!! मला काही अनुभव नाही...
|
Arch
| |
| Friday, September 14, 2007 - 3:38 pm: |
|
|
गिनीपीक?>> पीक, पिकवायचा विचार आहे की काय? ते गिनीपिग आहे.
|
Rakhee
| |
| Friday, September 14, 2007 - 5:54 pm: |
|
|
माणूस, ती अमला मेहेंदळे गॅरेजपाशी लक्ष्मीनारायण नगर मध्ये राहायची का? असेल, तर ती माझ्या पण ओळखीची होती. बाकी, तुझी गोष्ट छान चालू आहे.
|
Runi
| |
| Friday, September 14, 2007 - 5:58 pm: |
|
|
स.प. म्हणजे S.P. Collage . त्याला पेठी लोकांच कॉलेज देखील म्हणतात, तिथे खुप लोकांच्या जिभेचे हाड मोडलेले असते. >>> माणसा तुझ्या जिभेला काही हाड
|
Disha013
| |
| Friday, September 14, 2007 - 6:20 pm: |
|
|
>>>ती अमला मेहेंदळे गॅरेजपाशी लक्ष्मीनारायण नगर मध्ये राहायची का अरेच्चा!म्हणजे ही सत्यकथा की काय? मग माणसा,हे ललितमध्ये हवं न? विषय भारी आहे पण. चांगली डिटेल माहिती दिसते की तुला.
|
Amruta
| |
| Friday, September 14, 2007 - 8:54 pm: |
|
|
हो ना!! .. फ़ारच डिटेल माहिती आहे रे तुला माणसा, म्हणज़े विजयाचे ओठ गुलाबी आहेत वगैरे वगैरे. बाकी अगदी हात धुवुन गोष्टी लिहु लागलास कि रे.. छान छान चांगल चाल्लय.
|
Amruta
| |
| Friday, September 14, 2007 - 8:57 pm: |
|
|
आम्ला नको रे अमलाच लिही. आम्ला वाचल कि सल्फ़ुरीक,नायट्रीक असल सगळ शाळेतल आठवु लागल.
|
Gobu
| |
| Friday, September 14, 2007 - 9:42 pm: |
|
|
माणसा, अतिशय छान! रुनी, पुर्ण अनुमोदन! आणखी दोघे तिघे येऊ दे, मग बघुया याला!
|
Farend
| |
| Friday, September 14, 2007 - 10:58 pm: |
|
|
माणसा, इंटरेस्ट निर्माण केला आहेस, आता पुढचे पार्ट लौकर येउदेत. एकीचे नाव आम्ला ठेवलस, तर दुसरीचे अल्का ठेवायचं होतं, म्हणजे कथेचे नाव त्यांची 'लिटमस टेस्ट' देता आले असते प्रियदर्शिनी म्हणजे BM वरून जाणारा रस्ता Fergusson Road ला मिळतो तेथे का? तेथेच खाली एक बोळवजा रस्ता जातो.
|
Itgirl
| |
| Saturday, September 15, 2007 - 8:26 am: |
|
|
..आणखी दोघे तिघे येऊ दे, मग बघुया याला.. काय खर नाय तुझ माणसा , पटपट पूर्ण कर बघू
|
Maanus
| |
| Saturday, September 15, 2007 - 5:33 pm: |
|
|
विज्या ने एक पफ ओढला आणि सिगरेट परत बोटात पकडुन हात माझ्याकडे केला " try करणार" गोल्डफ्लेक नावाला शोभतील असे सोनेरी कण मला खुणवत होते... मेंटॉस ने नक्की वास जाईल ना... घरी गेल्यावर आईला कळाले तर... जेवुन लगेच झोपुन जावु डोक दुखतेय सांगुन... उद्यात परत सकळी बेहेरेज ला जायचेय... अमृता चांगल शिकवते accounts ... माझ accounts च पुस्तक किती खराब आहे... अजुन एक दोन दुकान तरी फिरायला पाहीजेल होती मी second hand पुस्तक घेण्यापुर्वी.... पण का म्हणुन दर वर्षी मी second hand पुस्तक वापरायची... पुढच्या बर्षी बारावीत हट्टाने नविन पुस्तक घ्यायची... हट्ट, कधी शेवटचा हट्ट केलाय आठवतय.... धुर नाकापर्यंत पोचला. मी ते सोनेरी कण... क्षण पकडायला खाली वाकले. तिथेच त्या मातीत खाली बसले, विज्या च्या हातातुन सिगरेट घेतली. न जळनार्या आणि जळनार्या सिगरेट च्या वासात किती फरत आहे. मला न जळनार्या सिगरेट चा वास आवडला... हा ईतका चांगला वाटत नाहीय. t.v. पाहीलेले तशी मी सिगरेट दोन बोटात पकडली, आणि ओठांजवळ आणली... वास अजुनच आवडेनासा झाला. पण तरीही तिला ओठांवर ठेवली, सगळ शांत वाटायला लागलेले... मनातले विचार थांबले. संथपणे मी हवा आत ओढली... तसे ते सोनेरी क्षण अजुनच प्रखर व्हायला लागले. आज कैक दिवसानंतर ईतक शांत वाटत होत. पाहील्याच पफ ला मला नाकातुन धुर सोडता येवु लागला. विज्या ने दुसरी सिगरेट काढली, मी डोळे बंद केले. आता मला त्या धुराचा, वासाचा काहीच त्रास होत नव्हता. असेच बरेच दिवस लोटले, पहीले पहीले दोन आठवड्यातुन एकदा, मग आठवड्यातुन एकदा. मग दोनदा.... कधी रोजची सवय लागली कळालच नाही. पहीले पहीले चव आवडाची नाही, उगाच काहीतरी खारट तुरट वाटायचे... पण एक thrill म्हणुन सुरवात झालेली. मग सवय झाली. बारावी आली, ह्या वर्षी देखील second hand च पुस्तक होती माझ्याकडे. पावसाळा आला, आता टेकडीवर जान जमनार नव्हत, चिखल पाऊस. तेव्हा अशिच एकदा टपरी वर सिगरेट घेताना सिमरन शी ओळख झाली. ती होस्टेल वर रहायची, मग आमची सिगरेट प्यायची हक्काची जागा तयार झाली. दिवसेन दिवस अभ्यासाचे कारण सांगुन तीच्या room वरच रहायला लागले. सिमरन मुळे प्रियदर्शनीच्या कट्ट्यावर बसुन सिगरेट प्यायची देखील हिम्मत झाली. मग काय एका नविन विश्वाचे दरवाजेच उघडण्यासारखे होते ते. सिगरेट पिण्याचे किती फायदे असतात ते कळायला लागले. किती त्या ओळखी वाढल्या त्या काळात माझ्या. आमच B.M. म्हणजे एकसे एक मोठ्या लोकांच collage शरद पवार, रवी पंडीत, सुलज्जा फिरोदीया, ज्ञानेश्वर आगाशे, मोहन जोशी, राम नाईक, आभिजीत कुंटे... त्यांना शोभतील असेच मोठ्या मोठ्या नेत्यांची मुल, business man ची मुल, पंजाबी, गुजराथी असे सगळे होते... प्रियदर्शनीवर प्यायला लागल्यापासुन ह्या सगळ्यांशी ओळखी झाल्या. मला नाही वाटत जर मी कधी सिगरेट पिली नसती तर ह्या लोकांशी इतक्या सहज ओळखी झाल्या असत्या. अजुन एक फायदा म्हणजे ही मुल काहीतरी करुन बरोबर परिक्षेच्या आधी कुठुनतरी पेपर शोधुन आनायचे, मग काय मजाच मजा. आपन तर एकद खुश होतो सिगरेट वर. घरच काही tension घ्यायची गरज नाही, परिक्षेचे tension नाही. फिरायला मित्रांच्या गाड्या आता बस ची कुणाला फिकीर होती. life एकदम सेट झालेल. C.A. ला admission घेतली, तेव्हापण आभ्यासात concentrate करायला सिगरेट ची मदत झाली. अशातच t.y. ला असताना एकदा. त्या दिवशी मी सिमरन कडेच रहानार होती. रात्रीचे जेवन करुन आम्ही आलो. घरी आल्यावर लक्षात आल रुम वर एकपन सिगरेट नाहीय. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. सिगरेट शिवाय झोप येन तर next to impossible thing होती. "यार किसी को तो फोन कर, कोई तो लेके आयेगा" "अरे मैने अभी फोन किया था, ओ सब movie गये है" " life sucks, i wont be able to sleep yaar " "सच्ची मै नही नही आ रही" "नही यार, साला ये t.y. का exam , c.a. मै पागल हो जाऊंगी" "रुक एक मिनीट" सिमरन किचन मधे गेली आणि येताना एक sandwich घेऊल आली. "इससे क्या होगा" "खा रे, निंद आयेगी मेरी गुडीया रानी" कसला तरी काळा जॅम लावलेला तीने bread ला, जॅम तर वाटत नव्हता. पण वास ओळखीचा वाटत होता. "क्या है ये" "खा बोला ना, जेहेर नही है" विचीत्रच चव होती त्याची, पण मी पुर्ण sandwich खाल्ले. थोड्या वेळाने मन शांत होउ लागल आणि निट झोप लागली. सकळी उठुन प्रियदर्शनीवर गेलो. चहा घेतला, गोल्डफ्लेक घेतली. रुम वर आलो. "क्या था रे वो, अच्छी निंद आयी कल मुझे" " iodex "
|
Chetnaa
| |
| Saturday, September 15, 2007 - 5:42 pm: |
|
|
काय? आयोडेक्स? किती धक्के देणार माणसा?....
|
Maanus
| |
| Saturday, September 15, 2007 - 8:44 pm: |
|
|
Iodex, कुठे पोचलोय आपन. सहा वर्षापुर्वी असेच रस्त्यात सापडलेले पैसे, त्याची मजा म्हणुन घेतलेली सिगरेट आणि आज iodex . नाही हे कुठेवतरी थांबवायला पाहीजे. तो पुर्ण दिवस मी सिगरेट पिली नाही. दुसरा दिवस पण कसा बसा काढला. पण तिसर्या दिवशी परत एक ओढावीच लागली. मला कळतय माझे चुकतेय आणि हे कुठेतरी थांबयाला पाहीजे, अजुन काही दिवसांनी सिमरन तिच्या गावी निघुन जाईल, मग मी कुठे सिगरेट पिनार. मी थोडी सिगरेट कमी करायचा प्रयत्न केला. दिवसाला एक वर आले. T.Y. संपल, सिमरन तिच्या गावी गेली. माझी सिगरेट काही संपली नव्हती. आज ना उद्या घरातल्यांना कळनार होतेच, शेवटी मी घरी सांगायचे ठरवले. रात्री जेवताना मी विषय काढला. "मला काहीतरी सांगायचेय" मी पर्स मधुन गोल्डफ्लेक चे पाकीट आणि माचीस काढली. आई बाबा दोघांचे घास हतातच राहीला. "मी आता बाहेर लपुन नाही पिऊ शकत" घास ताटत पडला "किती दिवस झाले" "सहा वर्ष" बाबांनी खुप समजवायचा प्रयत्न केला, मला दुष्परीनाम सांगीतले, मी काही ऐकत नव्हते. शेवटी ते चिडले, माझ्यावर हात ऊगारला. पण तेव्हा आईने बाबांचा हात पकडला व तरुण मुलीवर काय हात उगारता म्हणाली. शेवटी आई म्हणाली, घराबाहेर अनिर्बंध वाढ होण्यापेक्षा, घरात तीला काय करायचे ते करुन्देत. आपल्या नजरेसमोर असली म्हणजे थोडी तरी लाज बाळगुन ती lmit मधे राहील. हळु हळु आपल्याला काहीतरी उपाय शोधता येईल. कोणत्यातरी चांगल्या डॉक्टरला दाखवु, अता विज्ञान ईतके पुढे गेले आही की प्रत्येक रोगावर ईलाज असतो. माझे बघुन विज्या ने पण घरी सांगीतले, त्या दिवशी तिला तिच्या वडलांनी पट्याने मारले. तिची सिगरेट तिथेच संपली. दिवस असेच जात होते. मी बाथरुन मधे बसुन सिगरेट प्यायला लागले. बाबा दर वेळेला मझ्याशी बोलताना मला समजावायचे. S.N.D.T. च्या मागच्या गल्लीत किर्तणे-पंडीतांचे ऑफीस आहे, मला तिथे C.A. internship साठी नोकरी मिळाली. त्यामुळे अता घरात सारखे lecture ऐकत बसावे लागत नाही. दिवस चांगले जात होते. तिथेच प्रणय भेटला. तो देखील B.M. मधलाच होता, मला senior होता म्हणुन कधी भेट नव्हती झाली. गप्पा मारायला मजा यायची त्याच्याबरोबर. त्याने दिखील मला सिगरेट बद्दल समजवायचा प्रयत्न केला. माझ व्यसन सध्या थोड कमी झालेल. दिवसाला दोन. सकाली ११ ला एक, आणि संध्याकाली ४ ला एक. पण सध्या माझा खोकला वाढायला लागलाय. इच्छा नसताना lipstick लावावी लागतेय. एक दिवस खोकला काही केल्या थांबत नव्हता, प्रणय ने लगेच मला hospital मधे नेले. डॉक्टरांनी तपासुन मला admit केल. ३० दिवस hospital मधे होते तेव्हा मी. शेवटच्या दिवशी डोक्टरांनी समजावले जर मी सिगरेट थांबली नाही तर मला emphysema नावाचा रोग होईल. काही दिवसांनी मी परत ऑफीस मधे जायला लागले. ऑफीस च्या वातावरनात, जेथे सगळेच जन बिन्धास्त सिगरेट पित असतात तिथे मी माझ्यावर जास्त दिवस control नाही ठेवु शकले. गाडी परत दोन सिगरेट वर आली. हे बघुन प्रणय मला आजकाल संध्याकाळी चार च्या सुमारास त्या समोरच्या गल्लीत पाणि पुरी खायला घेवुन जायला लागला. त्यामुळे हळु हळु मी एका सिगरेट बर आले. अशातच एक दिवस पाणि पुरी खाताना, प्रणय ने मला मागणी घातली. "पण तुला माझा सिगरेट चा problem माहीत आहे" "मला माहीत आहे तुझा problem कसा सोडवायचा, तु मला ओळखत नसलीस तरी मी तुला कॉलेज पासुन बघतोय. मला तुझ्यासारखीच बिनधास्त बायको हवी होती." "तु thrill म्हणुन तर माझ्याशी लग्न नाही ना करत" "नाही ग" "मला उतरत्या खांद्याचे पुरुष आवडत नाही" प्रणयच्या उतरत्या खांद्याकडे बघत मी म्हणाले. त्याने माझ्या केसांतुन बोट फिरवली. पाणि पुरी वाल्याचे पैसे दिले. गाडी सुरु केली व आम्ही परत ऑफीस ला आलो. पुढे काही दिवस विचार करुन आम्ही आमच्या घरी सांगीतले. लग्न झाल. माझी सिगरेट अजुन थोडी कमी झाली. आठवड्यातुन दोन.
|
Maanus
| |
| Saturday, September 15, 2007 - 10:55 pm: |
|
|
माझी सिगरेट अजुन थोडी कमी झाली. आठवड्यातुन दोन. पण संपली नव्हती अजुन. प्रणय चे आई बाबा गावी गेले, की मला मनसोक्त सिगरेट पिता यायची. का कोण जाने पण पहील्यासारखी मजा नव्हती राहीली आता. पहीले कसे सिगरेट पेटवली की सगळ जग शांत व्हायच. दिवस सुखाचा जायचा... आजकाल सिगरेट पित असताना पण डोक्यात विचार सुरु असतात. (गणपती बप्पा, माफ करा हो) बहुतेक उंदीर मारायच औषध कसे काही दिवस त्यांच्यावर काम करते, मग उंदरांना त्या औषधाची सवय होते, आणि मग त्याचा परिणाम व्हायचा थांबतो. प्रणयने खुप प्रयत्न करुन पाहीले, पण माझी सिगरेट काही थांबत नव्हती. मग आमचे वाद वाढायला लागले. "तु सिगरेट सोडनार आहेस का नाही" "प्रणय, लग्न करण्यापुर्वी तुला माझी condition पुर्णपने माहीत होती" "हो पण मला वाटलेल, एकदा का तु संसारत रमलीस की सोडशील" "ते अवघड आहे रे, मला कळतय माझे चुकतेय, पण आता चुक सुधारण्यापलीकडे गेलीय" "व्यसनी आहेस तु, you smell like cigarette ... आता दारु कधी सुरु करतेयस" "प्रणय, तुझ्या व्यसनाबद्दल बोलायचय" मी त्याला शांत केल. दर वेळेस काहीतरी कारण काढुन मी त्याला शांत करत होती. पण मला खरच व्यसन लागलेल. कधी कधी वाद वाढले की मग त्या आठवड्यात दोन च्या ऐवजी तीन होत. अशातच एकदा सिमरनचे पत्र आले. तिला throat cancer झाला, दर वेळेस ती हॉस्पीटल मधे जायची तेव्हा डॉक्टर तिच्या घश्याचा थोडा थोडा भाग काढुन टाकत. "अमला, cigarette did this to me. " तीला आता बोलता येत नव्हत, म्हणुन ती पत्रामधुन मला कळवत होती. तिच पत्र पाहुन मी serious झाले, नाही हे थांबलेच पाहीजे. मनावर खुप ताब ठेऊन मी cigarette थांबवली. प्रणय, सासु, सासरे, आई वडील सगळ्यांनी खुप सांभळल तेव्हा. एक दोन तीन महीन्यानंतर एके दिवशी अचानक मला चक्कर यायला वाटल्यासारखे झाले. थोड्या वेळानंतर चक्कर थांवली, पण काही क्षणातच परत चक्कर यायला लागली. मला परत खोकला यायला लागला, खोकल्यातुन रक्त पडत होते. प्रणय लगेच hospital मधे घेवुन गेला. तिथे गेल्यावर कळाले मला pneumonia झालाय. but it was under control. पण ती हॉस्पीटलची भेट फार भयाणक होती. ७ दिवसातल्य एका पण रात्री त्या लोकांनी मला झोपुन दिले नाही. सारखे जाग ठेवत होते. मला कधी एकदा घरी येईल असे झाले होते, ८ व्या दिवशी घरी आल्यावर दोन दिवस मी झोपुनच होते. असेच अजुन काही दिवस गेले. गोळ्या घेऊन life परत एकदा सुरु झालेल. एका नविन life ची देखील चाहुल लागलीय. आज आम्ही सगळे परत एकदा हॉस्पीटल मधे आलोय. दिव्या जन्माला आलीय, आणि मला माझ्या smoking चा प्रचंड पश्चाताप होतोय. काधी नाही ते स्वतःबद्दल ईतकी चीड निर्माण झालीय. ती फक्त 5.5 pounds ची झालीय हो... आणि खुप रडतेय हो. तिला जन्माताच दमा झालाय. i wish, त्या दिवशी आईने बाबांचा हात नव्हता पकडायला पाहीजे होता. please माझ्यासाठी नाही, पण माझी मुलगी लवकर बरी व्हावी म्हणुन देवाकडे प्रार्थणा कराल का तुम्ही.
|
|
|