Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 09, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 09, 2007 « Previous Next »

Jagu
Thursday, April 05, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस तुमची कविता फ़ारच सुंदर आहे.
वैभव आणि माणिकजी माझ्या श्रावणीचे गोड कौतुक केल्यबद्दल धन्यवाद.


Bhramar_vihar
Thursday, April 05, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, शहारा शहारा मस्तच!!

Daad
Thursday, April 05, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, शहारा शहारा आवडली. एक झकास लय आहे.

बोलतोसच हेच का रे?
लागणारे ठेच, का रे?

गुंतल्यावाचून झाली
उत्तरेही पेच का रे?

टाळले दु:स्वप्न मी जे
भेट आले तेच का रे?

श्वास झाला नाव तुझे
सांग हे, भलतेच का रे?

सावलीही साथ नाही
संपले सारेच का रे?
-- शलाका


Me_anand
Thursday, April 05, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहा रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात तुमचही असच कहीसं झालय का...

कधी वाटते व्हावे प्रश्न
इतका अवघड! इतका अवघड!!
उत्तरच नये कुणा सापडू

कधी वाटते व्हावे दगड
इतका बथ्थड! इतका बथ्थड!!
मुळीच नये कुणा आवडू

काय सांगू हो अहो आश्चर्यम
दोन्ही इच्छा झाल्या पूर्ण
देहच झाला अवघड प्रश्न
झाला मनाचा ठोंब्या दगड...


Bee
Thursday, April 05, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद कविता अर्थात कल्पना छान आहे.. पण असे कुणाला का वाटावे खरच :-)

Princess
Thursday, April 05, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद कविता एकदम छान आहे. कधी कधी उलट झालेले पण पाहिलय मी :-)

Bee
Thursday, April 05, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू निघून गेल्यानंतर
वाटलं होतं जीव जडेल
तू मागे ठेवून गेलेल्या
खाणाखुणांवर..

मग त्यांच्याच आधारने
दिस सरून रात्र उगवेल
तुझी हरेक आठवण
जगण्याची उमेद बनेल..

पण..एका सर्द हिवाळी
बाभळीला कोंब फ़ुटले
तिला पाहून मीही
नव्या वाटेला लागले..


Mankya
Thursday, April 05, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद ... 'रे' फार गोड प्रभाव पाडतोय !
उत्तरेही पेच का रे ... जाम आवडलं !
सावलीही साथ नाही .. खूपच आर्त, एखाद्या विषारी तिरासारखं रूतलं !

आनंद ... अतिशय सुंदर आशय, खूप अर्थपुर्ण !
जेव्हा दुसर्‍याच्या अन स्वतःच्या कोणत्याच अपेक्षा पुर्ण करण्यास असमर्थ ठरतो माणूस तेव्हा प्रसवतात असे विचार मनात, एकंदरीत ना परीस्थिती साथ देते ना दैव, केवळ एकतर्फि लढा ! दुःख माणसाला अंतर्मुख करतं हेच खरं !

माणिक !


Ganesh_kulkarni
Thursday, April 05, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
खुप आशादायी आहे कविता!



Ganesh_kulkarni
Thursday, April 05, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशातल्यां ढगांनो..
आकाशातल्या ढगांनो...
माझं एवढं काम करा
भिजली नसेल ती कधी चिबं...
तिला चिबं चिबं भिजवा! || ध्रु||
सजली असेल ती आता त्याच्यासाठी
तिला माझी आठवण करा
माझ्याकडे ना दागिने,अंलकार...
तिला तुमच्या थेंबानेच सजवा! ||१||
तिचा महाल आहे खुप महाग
बाग बागीच्या तिच्या दारात.
फुलासांठी जगवा तिला...
तिला काट्यांपासून वाचवा! ||२||
आवडत नाही पाऊस तिच्या सारखा कुणाला
थोडा वेळ तिच्या मेंदूत माझा विरह भरा
झोपलेल्या तिच्या मनाला पुन्हा...
पुन्हा परत एकदा जागवा! ||३||
माझी आठवण झाल्यावर...
ती विसरेल तुम्हाला
तेव्हा मात्र तुम्ही...
मला माफ करा! ||४||
गणेश(समीप)


Chinnu
Thursday, April 05, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश :-) धृवपद बरयं. बी कविता आवडली.
शलाका, इथेही सिक्सर! का रे चा काफिया पकडून ही छान गझल होते. यमके जुळवत वाचतांना मजा आली. गालगागा सहीच! :-) पण लागणारे ठेच का रे, काही समजले नाही. म्हणजे लागणार आहे ठेच का?


Mankya
Friday, April 06, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दवेध

शस्त्रामागच्या मुठिचा तर मुठिमागच्या निश्चयाचा
प्राण हरतो शब्दवेध

भळभळणार्‍या जखमा तव शूल शल्याचा
निरंतर सलतो शब्दवेध

भावनांची राख अन अंगार क्रोधाचा
अखंड धगधगतो शब्दवेध

निरागस कलेवर वा वध निष्पाप मनाचा
असा डाव उधळतो शब्दवेध

शब्दच प्राणही शब्दच ईश्वर पण शब्दाशब्दाचा
अविरत संहार करतो शब्दवेध !

माणिक !


Pulasti
Friday, April 06, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, प्रिंसेस, दाद, माणिक - तुमच्या कविता आवडल्या!
-- पुलस्ति.

Meghdhara
Friday, April 06, 2007 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति
मी लिहीतो अलगद मग तो
वाचून मला उलगडतो..
हे प्रत्येकवेळी अनुभवायला मिळतं.
हीच ती अलौकीक अनुभुती असेल कदाचीत.
अगदी छान लिहीलस.

माणिक
शब्दवेध शब्द खूप वेळा असल्याने वाचणार नव्हते नीट..
पण सुंदरच लिहीलयस.
मुठीमागच्या निश्चयाचा.. तर सॉलीडच.
या कवितेवर अजून संस्कार होऊ शकतात.

गणेश
अरे मेंदूत विरह.. ?
तीला शब्दशः पागल करायचा विचार दिसतोय.. :-)

आनंद.. बाप रे! एवढी वेळ येऊ नये कोणावर.

शलाका
श्वास झाला.. व्वा! मस्तच.

मेघा



Priyasathi
Saturday, April 07, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरयाच दिवसानी आलोय कसे आहात मित्रानो......?

Amruta_w
Sunday, April 08, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक विचारू?

एक विचारू तूला
परत वाटतं जाऊ दे
पण किती दिवस
हे असचं चालणार?
किती दिवस भावना माझ्या
मी अशा दडपणार?
आज विचारतेच तूला
जमलं तर समजून घे
नाही पटलं तर
सोडून दे.. नेहमीप्रमाणे...
माहीत आहे का तूला
नक्की कशाला म्हणतात प्रेम?
रोज म्हणतोस तू
प्रेम आहे तुझ्यावर
प्रेमाच्या नावाखाली त्या
निव्वळ करतोस वापर
..स्वत:च्या अधिकारांचा,
स्वत:च्या हक्कांचा
असेच असते का रे प्रेम?
यालाच म्हणशील का तू प्रेम?
व्हायलाच हवी मी तुझी
..पुर्णतः
कारण तुझ्यामते तो आहे
..तुझा हक्क,
तुझं प्रत्येक मत
असायलाच हवं माझं मत
कारण तुझ्या मते तो आहे
..तुझा अधिकार
..याला म्हणतोस तू प्रेम?
मी नाही करून देत
प्रेमाची जाणीव तूला
फ़क्त ठेवते तूला
मी मनात...
ढाळते अश्रू मी
तुझ्या दु:खात,
मला नाही माहित अधिकार
आणि हक्क..तो कोटून आला प्रेमात?
नाही म्हणत तूला
कर माझं स्वागत हसून
करते मी फ़क्त प्रयत्न
तुला सुखी ठेवण्याचा,
करते देवाकडे प्रार्थना
तूला हवं ते मिळण्यासाठी,
असते सतत उभी पाठीशी
अडचणी तुझ्या सोडविण्यासाठी..
बहुदा नसेल दिसत तूला
माझं प्रेम
कारण जाणतच नाहीस तू
अर्थ प्रेमाचा..
करते तुझ्यावर मी
निरागस प्रेम
करते मी वेडी माया..
पण नाही कळत तूला
अन
म्हणूनच अडखळतात शब्द
संभ्रम पडतो
विचारावं का तूला...
खरचं माझ्या या बोलण्याने
तुझ्याही डोळ्यांत दाटतील का रे अश्रू?
बोलता बोलता जर
कोसळले रडू मला
समजावशिल का रे तू
मला मिठीत घेऊन?
एक विचारू तूला
तुही माझ्यावर कधी
निरागस प्रेम करशील का?
तुलाही कधी माझ्यावर
वेडी माया करावीशी वाटेल का??


Meghdhara
Sunday, April 08, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्रुता!!!

अनकंडिशनल प्रेम... ?
मेघा


Nilyakulkarni
Monday, April 09, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्रुता...
अगदी सहज आणि निरागस
खरच छान...

निलेश


Meenu
Monday, April 09, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगणं ..?

भौतिक इच्छा आकांक्षा पुर्‍या करत,
दिवस ढकलण्याला, कसं म्हणावं जगणं ..?
वर वर हसताना, खोल खोल मनात
कुढत राहण्याला, कसं म्हणावं जगणं ..?
दिसायला दिसत असेलही, संपन्न, शांत ..
अशा धुमसण्याला, कसं म्हणावं जगणं ..?
वर्षानुवर्ष जगुनही, ध्येय न सापडता ..
चालत राहण्याला, का म्हणावं जगणं ..?


Jagu
Monday, April 09, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव जीवन

आयुष्यात माझ्या येऊन
मला नविन जीवन देतोस

माझ्या श्रुंगाराला सजवून
स्वत्: त्यात मोहुन जातोस

माझ्या शब्दांना अर्थ देऊन
माझ्या काव्यांचे वाचन बनतोस

माझ्या अश्रूंना वाट देऊन
सारी दुख्: स्वत्:च झेलतोस

माझ्या आनंदात स्मित करुन
माझ्या सुखात सुख पाहतोस

मला स्वप्न नविन देऊन
स्वत्:च त्यात रंगुन जातोस!

मला नविन आयुष्य देऊन
स्वत्: नविन आयुष्य जगतोस






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators