|
Meghdhara
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:19 am: |
|
|
ओझं कुठलं ते.. बदल. ओझं? हं..! बदल असेच घडत असावेत मीही अट्टाहासाने जपून ठेवलं इतके दिवस आधी व्रतस्थ म्हणून.. मग माझं काही म्हणून.. विरलेली गाठ म्हणून.. मग हा बदल. तूझं म्हणून.. तू टाकलेलं म्हणून तटस्थ होऊन.. कळलच नाही.. इतकं बदललं सारं.. ओझं म्हणून. मेघा
|
Pulasti
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:33 am: |
|
|
स्वाती, वैभव, शलाका, मेघा - वा... काय कविता आहेत!
|
'पसारा' आणि नंतर आलेलं 'ओझं' दोन्हीही मस्त... वैभव तुमचं 'टेक ऑफ' केलेलं प्लेन अजुनही उडतंय मनात... "पाय जमीनीवर असताना ... का जमत नाही कर्तव्य करीत पुढे जाणं ? " ह्या प्रश्नाचं उत्तर काय?
|
Jagu
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:56 am: |
|
|
माझा निसर्ग तुझे आयुष्य जेव्हा ऋतू बदलते माझे जीवन तेव्हा निसर्ग बनते तुझ्या चाहुलीचे जेव्हा आकाश दाटते कोकीळ स्वर माझे तेव्हा स्वागती गाते दुष्काळी सुख जेव्हा कोरडे पडते आसवांत तुझ्या तेव्हा मी ओलावते तुझ्या प्रीतीचे जेव्हा दाट धुके पडते गारठलेले मन माझे तेव्हा शहारते देदीप्यमान तुझे लौकिक जेव्हा झळाळते तुझ्याच सावलीत तेव्हा मी सुखावते.
|
Astitva
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:17 am: |
|
|
"शांत नयनांचा तुझा तो भाव होता... माझ्या ह्यदयाला तुझा तो घाव होता..." साहिल.... चारोळी आवड्ल्यास कळ्वावे.
|
Astitva
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:22 am: |
|
|
जागू कविता चांगली लिहीली आहे.
|
|
|