|
Disha013
| |
| Wednesday, March 28, 2007 - 4:13 pm: |
|
|
काय ती माणसे!बापरे! आपले जग आपणच बदलाय्चे असते,हे पटले. मला शेवट्पर्यन्त वाटत होते, तो हरीष काहीतरी करेल असे, atleast पल्लवीची बाजु घेवुन बोलेल तरी... पण,मुलिंनी इतक्या कमकुवत मनाचे नसावे. जीव गेला तिचा,बाकीचे तर मोकळेच ना.
|
काय बोलावं तेच कळत नाही. कसला विश्वास? कसलं प्रेम? कसली तडजोड? किती दिवस? आणि कशासाठी?? सॉरी प्रिन्सेस, हा अश्या सत्यकथांवरचा राग आहे. आणि तो असा बाहेर पडला हे तुझ्या कथेचं यश.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 28, 2007 - 8:15 pm: |
|
|
कधी कधी मलाही असेच वाटते. प्रेम, विश्वास,नाती गोती हे फक्त एकच माणुस निभावत असतो वरील कथांमध्ये व stituations मध्ये. एक माणुस वेगळ्या भाव विश्वात राहुन आपले सर्व पणाला लावत असतो जो पर्यन्त त्याला मोठी ठेच लागुन प्रकाश पडत नाही. पल्लव्वीचे मुलं जाणे ही मोठी ठेच होती तीला तो पर्यन्त एक शिकलेली मुलगी आजच्या काळात मुकपणे सहन करते ह्याचे आश्चर्य वाटते. माफ़ कर princess अश्या सत्यकथा खुप मनाला त्रास देतात. मलाही माझ्या नात्यातील एका मुलिचा divorce आठवला. खुप मानसिक तयारी करुन तीने शेवटी हा निर्णय घेतला. आज ती एकटी असली( blame it on society if girl is divorced it takes time to get remaaried, but her idiot ex-husband is already married. ) तरी खुष आहे. आज तीच म्हणते ज्या दिवशी एका व्यक्तीला हे जाणवेल की समोरचा माणुस आपल्याला 'साथ' देत नाही आपण 100% करुन तो आपला नाहीच. anyways हे माझे विचार आहेत. ह्या कथेमुळे बाहेर आले. प्रत्येक स्त्रीने indpeendant, confident राहीलेच पाहेजे कीतीही काही असु दे. म्हणजे नवरा चांगला असो वा नसो, कोणी मदत करो वा न करो, श्रीमंत असो वा नसो, असे माझी आजी जुन्या काळातील म्हणायची.
|
हि सत्यकथा आहे हे वाचुनच खुप दु:ख झाले....
|
Ammi
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:30 am: |
|
|
येवढ्या शिकलेल्या मुली एवढं सहन येवढ सहन कसं करू शकतात याचं नवल वाटत आणि काय ते सासू सासरे.. छे आणि हरीश ची पण कमाल वाटली.. तुझ नरेशन मस्त आहे.. वर्णन एकदम तंतोतंत केल आहेस... कथा आवडली.. सुन्दर लिहितेस.. चालू ठेव.
|
Princess
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:30 am: |
|
|
संघमित्रा, जयु, चिनु, स्वाती, मनु, रुपाली आणि अमोल... कथा वाचल्या बद्दल आणि अभिप्राय कळवल्याबद्दल धन्यवाद. या एका पल्लवीच्या कथेची मी साक्षीदार होते म्हणुन लिहिले पण अशा अजुन कित्येक मुली आहेत ज्या आजही आला दिवस ढकलताय. का आपण मुली गप्पपणे हे सहन करतो? आपल्यालाही मन असते हे का नाही सांगत आपण तोंड उघडुन? का अन्याया विरुद्ध आवाज नाही काढत? प्रश्नांची ही मालिका न संपणारी आहे... मनु म्हणते ते बरोबरच आहे, सगळ्या मुलीनी independent राहायलाच हवे. किंबहुना आईवडिलानीच मुलीना स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवायला हवे. महत्वाचे म्हणजे समाजाची मानसिकता बदलायला हवी. "सुनेला मुठीत ठेव ग बाई, नाहीतर उद्या डोक्यावर मिरे वाटायची" असले ताशेरे ओढणे बंद करायला हवे. शेवटी पुन्हा तेच... मुलीनी स्वत:ची मदत स्वत: करायला हवी. आपली किंमत नसलेल्या घरात मूल जन्माला घालुन अजुन गुंता वाढवणे मला तरी श्रेयस्कर वाटत नाही.
|
मनू तुझ्या आजीचे बोल म्हणजे लाख मोलाची बात! नुसते आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाही त्याबरोबर आत्मविश्वासपूर्ण पण. नाहीतर कित्येक स्त्रिया पैसे कमावूनही हा सगळा त्रास सहन करतात.
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:42 pm: |
|
|
अन्यायाविरुद्ध आवाज नाही काढत? काढतो. पण तो दाबला जातो. मुलींना दुबळेपणाचे पावला पावला वर शिक्षण दिले जाते. पंख पसरून उडू नये म्हणुन जिथे सख्खेच पंख छाटायला कमी करत नाहीत, तिथे नात्याबाहेरच्यांची काय कथा? सुरुवात करायचीच झाली तर आपल्यापासून करायला हवी. आपण आपल्या सुनांना चांगले वागवू शकू का? पुर्वग्रह मनात ठेवून वावरणार्या लोकांना माणुसकी शिकवू शकू का? किती अनुत्तरीत राहतात प्रश्न! प्रिंसेस सॉरी ग, राहवले नाही म्हणुन लिहीले इथे. V&C चा उद्देश्य नाहीये.
|
Supermom
| |
| Thursday, March 29, 2007 - 2:17 pm: |
|
|
प्रिया म्हणते ते अगदी विचार करण्यासारखे आहे. नुसती मुलींचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची मानसिकता बदलायलाच हवी आहे. मी अगदी जवळच्या नात्यात हुंड्यासाठी आणि हुंडा भरपूर घेऊनही मुलींचा अतोनात छळ झाल्याची अस्वस्थ करणारी उदाहरणे बघितलीत. यामुळे माझ्या मनावर या गोष्टींचा फ़ार खोलवर परिणाम झालाय. ही समाजाची एक प्रकारची कीडच आहे. आपल्या हातात आपल्या मुलींना आत्मनिर्भर करणारे शिक्षण देणे आणि मुलाच्या बायकोशी प्रेमाने वागणे हे तर नक्कीच आहे. इतके जरी आपण पक्के ठरवून केले तरी पुष्कळ झाले.
|
supermom तु म्हणते आहे ते अगदि बरोबर आहे. पण तो पर्यन्त अशा किति पल्लवि बळि जाणार आहेत कुणास ठाउक. आणि असे प्रसन्ग आणि घटना so called सुशिक्शित आणि सन्स्कारि घरा मधे होत असतात. स्वताच्या मुलिशि वागताना वेगळे standards आणि सुनेशि वागताना वेगळे standards असतात. प्रत्येक वेळेस पल्लवि सारखि च टोकाचि अवस्था होइल असा हि नाहि. पण काहि हि चुक नसताना, फ़क्त एक मुलगि तुमचि सुन आहे म्हणुन हिणकस शेरे, आइ वडिला च्या नावाने वाईट टोमणे, कुठल्याहि चुकि करता सुने ला दोषी ठरवणे हे कधि पर्यन्त सुरु राहिल? किति नाहि म्हणलं तरि या गोष्टि मन मधे राहुन जातात. त्यात नवरा पण जर समजुन घेत नसेल तर सम्पलच सगळं princess गोष्ट खुप च सुन्दर आहे. विचार करायला लावणारि आहे.
|
Badbadi
| |
| Friday, March 30, 2007 - 9:25 am: |
|
|
पण हे सगळं इतकं विकोपाला जाईपर्यंत पल्लवीचे आई बाबा काय करत होते? मुलगी गप्प बसली हे चूक आहेच पण तिच्या माहेरच्या माणसांनी काहिच करू नये???? पटलं नाही.
|
अरुंधति अगदि मनातल लिहलस ग. आणि हेहि खरच आहे कि अजुनहि so called सुशिक्षित घरांमधे सुध्दा मुलिला एक आणि सुनेला एक वागणुक दिलि जाते. प्रिंसेस, कथा थेट काळजालाच भिडली ग.
|
Princess
| |
| Friday, March 30, 2007 - 12:48 pm: |
|
|
धन्यवाद, सुमॉ, अरुंधती, बडी आणि प्रतिभा. बडी, पल्लवीने माहेरी कळुच दिले नव्हते. बर्याचदा मुली आई वडिलाना दु:ख होइल किंवा नातेवाईकात नावे ठेवतील किंवा लोक काय म्हणतील या भितीने सासरचा त्रास घरी (माहेरी) सांगत नाहीत. कदाचित तू अशा मुली बघितल्या नसशील पण beleive me जगात असे घडते आणि एक नाही दोन नाही अशा अनेक मुली मी पाहिल्यात. तुला माहितीय, या कथेतली पल्लवी तर माहेरी सुद्धा जाउ शकत नसे कारण माहेर दुर त्यामुळे वारंवार जाणे शक्य होत नसे आणि सासरच्या लोकांची सक्त ताकीद माहेरी वारंवार जायचे नाही. आई वडिल वृद्ध, भाऊ लहान म्हणुन माहेरुनही सहसा कोणी येत नसे. तसा गोतावळा होता मोठा. चुलत भावंडे, त्यांच्या बयका, पण त्यांना पण तिने काही एक सांगितले नाही. कदाचित आई वडिलानाही कधीतरी जाणवलेही असेल पण पल्लवीनेच पांघरुण घातले असेल त्यावर. अजुन एक म्हणजे सासु सासरे असु देत वाईट, नवरा चांगला आहे ना, मग त्रास सहन करायला काय हरकत आहे, असा विचारही खुप मुली करतात. पल्लवीला आशा असेल कदाचित की हरीष कधीतरी तिची बाजु घेईल.
|
princess अगदी अगदी बरोबर, माझ्या नात्यातल्या बहिणीने हेच केले. आई वडीलांना कळुच दीले नाही. काका, काकी जवळच रहणारे.शेवटी तीनेच निर्णय घेतला जेव्हा पाणी डोक्यावरुन व्हायला लागले आणि नवरा जेव्हा काहीच करु शकत नाही तेव्हा. जाताना एक शेवटचा प्रश्ण विचारला होता की हाच त्रास तुझ्या बहिणीला झाला तर काय करशील? तर म्हणे माझी बहिण एकडचे तिकडे करणारी नाहीय तुझ्यासारखी. झाले तिथेच तीने तिचा निर्णय घेतला. थोडा उशीर झाला पण ठिक आहे असे तीला वाटते. (वरील गोष्टी मध्ये मुलीचे आई वडील डॉक्टर आहेत, मुलगी डॉक्टर आहे. नवरा MD pathologist तेव्हा गरीब घरात किंवा अक्षिशित घरात ह्या गोष्टी होतात असा भ्रम चुकीचा आहे) शुक्षिशित माणुस सुसंस्कृत असतोच असे नाही असे आणखी एक वाक्य आजीच असायचे. पेशा काहीही असु दे, पण शेवटी माणसाचे विचार तो काय हे ठरवतो. माझी आजी त्या काळी social worker म्हणुन काम करायची. mainly for ladies, that cinluded awareness, education to those ladies, their rights etc etc . एक प्रश्ण मला नेहमी पडतो, हे जे त्रास देणारे असतात ना 'त्यांच्या' मुलीला मात्र सासर चांगले मिळते. आणि व्यवस्थीत असते. ह्याचे कारण मला समजले नाही. अशी दोन जवळची उदाहरणे माहीती आहेत ज्यांनी स्वःताच्या सुनेला छळुन सोडलीय पण त्यांच्य मुली अगदी सुखात असतात सासरी. उलटे मोकळा वेळ भरपुर असतो तेव्हा आईला भडकण्याचे काम छान करतात. I dont wish bad for them but I feel why this injustice? and then I wish they should be also punished in some ways. sounds stupid but still...
|
Princess
| |
| Friday, March 30, 2007 - 5:48 pm: |
|
|
manu, u said it प्रत्येक शब्दाशी सहमत.
|
Disha013
| |
| Friday, March 30, 2007 - 6:25 pm: |
|
|
खरे आहे मनु. तडजोडीला पण मर्यादा असाव्यात आणि मुख्य म्हणजे, नवरा त्या लायकीचा असावा. माझी आजीही(वडिलांची आई) तेच सांगते. independent असावे बाईने. नव-याला एका मर्यादेपर्यन्त महत्व द्यावे,कारण आपले आयुष्य पणाला लावुन टाकावे, इतके महान या जगात कोणिही नसते.
|
आई वडिलांना माहीत असणार ना कशा प्रकारचे सासु सासरे असतात ते. मग आपलीच मुलगी देताना नीट बघुनच देतील ना. म्हणुनच 'त्यांच्या मुली' सुखात असतात.
|
Sunidhee
| |
| Friday, March 30, 2007 - 9:55 pm: |
|
|
मनुस्विनि आणि ईतर मुलींनो, माझ्या best friend च्या बाबतीत हेच झाले आहे आणि तिच्या नणंदा मात्र सुखात आहेत, कारण ????? एकीने नवर्याचे माहेर तोडले आहे.. नवर्याचा गेले कित्येक वर्षापासुन त्याच्या माहेरशी संबंध नाही. आणि तो अत्यन्त शेळपट आहे. आणि ही अत्यन्त गर्विष्ठ. पाताळयंत्री.. भांडखोर पण जास्त आवाज न चढवता कारवाया करणारी. आणि दुसरी पण तशीच. तिचे सासु-सासरे बरोबर रहातात पण ही राणीसारखी, त्यामुळे ते काही बोलु शकत नाहीत. दोघीनी अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. आई भयानक आहे... सर्वानी नवर्याला मुठीत ठेवले आहे.. आणि तो मुलगा पण सेम आई-बहिणीसारखा.. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने ५ वर्ष सहन करुन करुन, कधीतरी परिस्थीती सुधारेल अशी आशा करुन करुन मग निर्णय घेतला त्याला सोडण्याचा.. ते पण केव्हा तर त्याने तिला घरातुन छोट्याश्या कारणानी बाहेर काढले तेव्हा.. इथे USA मधे. आणि divorce नंतर पण अजुन पण ५ वर्षे झाली तरी इतक्याशा गोष्टीवरुन court case करुन करुन छळतो आहे.. त्याना एक मुलगी आहे, त्या मुळे अजुनच त्रास देतो visitation मधे. त्या मुळे divorce नंतर त्रास संपतो असे नाही.. काही माणसे फक्त दुष्ट असतात कायम. आणि त्याचे दुसरे लग्न झाले आहे. तिला मात्र problems येतात दुसर लग्न करायच. विचित्र मणसे भेटतात.. सोन्यासारख्या मुलीचे आयुष्य बिघडवले त्या लोकांनी..
|
Badbadi
| |
| Saturday, March 31, 2007 - 9:41 am: |
|
|
मध्यंतरी दोन दिवस पल्लवी माहेरी आली तेव्हा भेटले मी तिला. हरीशबद्दल, त्याच्या घराबद्दल बोलताना किती खुष वाटत होती ती. हरीष कसा तिची काळजी घेतो, सासुबाई कसे तिचे लाड करतात ते सांगताना थकत नव्हती. तिला कदाचित कल्पना नाही, पण तिचा ओढलेला चेहरा सत्य सगळ्या जगाला ओरडुन सांगत होता. >> जे जगाला कळत होतं ते आई बाबांपासून लपून राहिलं असेल?? अशक्य आहे असं माझं म्हणणं नाहिये... पन difficult to digest आहे. अन्याय करणार्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.
|
शुक्षिशित माणुस सुसंस्कृत असतोच असे नाही असे आणखी एक वाक्य आजीच असायचे. पेशा काहीही असु दे, पण शेवटी माणसाचे विचार तो काय हे ठरवतो एकदम पटलं आपलि लढाई आपल्यालाच लढावि लागते हे च खरं
|
|
|