काय भयानक गोष्ट आहे. त्यातुन सत्य कथा आहे हे ऐकूनच अंगावर काटा आला. पूनम.. खरंच खूप छान वर्णन केलयस.
|
सव्यसाची अगदी अगदी. आणि असे लोक नीट गरीब (आणि बर्याचदा बावळट) फ़्यामिली बघून तर देतातच आपल्या मुलींना आणि वर मुलींना शिकवून पण ठेवतात कसे सासरच्यांच्या डोक्यावर बसायचे ते.
|
Princess
| |
| Monday, April 02, 2007 - 12:04 pm: |
|
|
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्याना धन्यवाद. बडी, कसे सांगु कळत नाहीये. पण वर सगळ्यानी दिलेली उदाहरणे वाचशील तर कळेल तुला. घरातल्या लोकाना बर्याचदा अशा गोष्टी सगळ्यात शेवटी समजतात असे माझ्या पाहण्यात आलेय. सन्मी
|
Meggi
| |
| Monday, April 02, 2007 - 12:19 pm: |
|
|
मला बडीचं पटलं. होणारा छळ आई वडिलांना सांगावा इतकही धीट करु नये का घरच्यांनी मुलीला? आपले घरचे यातुन मार्ग काढतिल अस विश्वास पण मुलीला त्यांच्याबद्दल वाटू नये. पूनम, तुझं लिखाण उत्तम, शैली खूप छान.
|
Chinnu
| |
| Monday, April 02, 2007 - 1:44 pm: |
|
|
मेग्गी, आईवडीलांनी ऐकुन सोडून दिले तर? परिस्थिती माणसाला फार दुबळी बनविते.
|
Princess
| |
| Monday, April 02, 2007 - 2:09 pm: |
|
|
हो मेग्गी, चिनु म्हणतेय तसे होऊ शकते. परिस्थिती खरच खुप दुबळे बनवते माणसाला. बर्याचदा मुलीना वाटते की आपले दु:ख आई वडिलाना सांगुन अजुन दु:ख का द्यावे? किंवा हळुहळु बदलेल सगळे असेही वाटते. अगदी धीट समजल्या जाणार्या मुली सुद्धा सासरचा त्रास माहेरी सांगतीलच असे नाही.
|
बर्याचदा मुली घरी सांगत नाहीत हे खर आहे. एक तर आई वडील सुरवातीला असच म्हणतात की होईल हळूहळू नीट. त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायला बर्याचदा सांगावे लागते. त्याचा कंटाळा येऊ शकतो. आणि आई वडील उतरत्या वयाचे असतील तर ते जास्तच घाबरून त्यांची तब्येत बिघडू नये असही मुलीला वाटत असणार. म्हणुन मुली घरी खुपदा सांगतच नसतील.
|
Srk
| |
| Monday, April 09, 2007 - 5:31 am: |
|
|
पूनम तुझं निवेदन सुंदर आहे. हा जरासा एकता कपुरच्या सिरीयल्सचा परिणाम असावा. सुनेनं सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायचा अगदी जीव जाईपर्यंत. तिथे नाट्यमयपणे तिचा जीव वाचतो प्रत्यक्षात मात्र...
|