Bhagya
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:10 pm: |
|
|
पूनम, छानच ग. मला तुझ्या कथांबरोबरच तू लवकर लवकर पुढचे भाग टाकतेस ते पण आवडतं.....
|
Sunilg
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:27 pm: |
|
|
अप्रतिम फरच सुन्दर आनि हलुवार आहे.
|
कथा मस्त होती. पण शेवट पटकन केला अस वाटतय. आधी जेवढी खुलवली होती तेवढा शेवट नाही.
|
पूनम, अप्रतिम जमलिये कथा. focus अजिंक्य वर असुनहि रुजुता (रु कसा लिहायचा?) च character मस्तच develop झालय.
|
>> पुनम, अग मस्त लिहिल आहेस एकदम फ़िदा २६. अगदी खर पण आहे २६..१० वर्ष पुर्वी २६. अबकड हे २६ काय प्रकार आहे? लकी नंबर आहे का? रश्मी ऋ असा लिही Ru
|
Saee
| |
| Friday, March 23, 2007 - 6:25 am: |
|
|
हल्ली प्रतिक्रियांमधुन शोधुन काढुन सापडेल तशी कथा वाचावी लागते! किंवा प्रतिक्रियांसाठी कथेचं निमित्त म्हणू या!! जे पटापट लिहीत नाहीत त्यांना आठवणी देत रहायचं, जे पटापट लिहीतात त्यांना धन्यवाद देत रहायचं, पण ताबडतोब प्रतिक्रिया ही दिलीच पाहिजे अरे, कथा कधी पुर्ण होणार माहिती नसतं तेव्हा ठीक आहे, पण पूनम अगदी वेळेत कथा पुर्ण करते हे आता माहिती आहे तर आपण थोडा धीर धरू या ना! 'पटापट येवु दे'.. 'लवकर पुढचा भाग टाक'.. अरे काय गिरणी आहे की कारखाना? शिवाय सगळे व्याप सांभाळून योग्य वेळेत लिखाण post करायला सवडही तेवढीच काढावी लागते हे नको का समजुन घ्यायला? माफ कर पूनम, इतकी अप्रतिम गोष्ट वाचताना सतत येणार्या अडथळ्यांनी मी अक्षरश: हैराण झाले म्हणुन हे लिहावं लागलं. शेवटी हासुध्दा प्रतिक्रियेचाच एक भाग. तु कधीच तिष्ठत ठेवलेलं आठवत नाही. सगळ्यांच्या प्रतिक्रियाही प्रेमापोटीच येतात हेही कळतंय मला पण त्याचा नकळत उपद्रव होतोय हेही आम्हा सगळ्यांच्या लक्षात यायला हवं. खुप छान लिहीतेस तु. तुझे सगळे लोक अतिशय प्रगल्भ असतात, तरीही प्रफुल्लित आणि नेहमी सारासार विचार करणारे, इतरांनाही उत्तम समजुन घेणारे असतात. कितीही गंभीर समस्या असल्या तरी त्यांच्या चेहर्याचे पापड होत नाहीत की आयुष्यातला आनंद हरपत नाही. त्यामुळे तुझ्या कथा वाचताना नेहमी assured वाटतं!
|
R_joshi
| |
| Friday, March 23, 2007 - 7:27 am: |
|
|
पुनम खुपच छान लिहिलिस कथा
|
पुनम, एकदम सुंदर वळणावर नेलीस कथा, छान खुप आवडली…
|
Saco
| |
| Friday, March 23, 2007 - 7:53 am: |
|
|
एक (स्त्रि) लेखिका असून सुद्धा मुलाचे अंतरंग एवढ्या सुंदर रीतीने सादर केलय. खुपच छान कथा.
|
पूनम. खूप छान कथा,, आणि शेवट तर खूपच छान. एवढी romantic कथा इतक्या practical विचारावर आणून थांबवणे खरच कठीण,, पण तुला ते सहजगत्या जमले आहे. मस्त..
|
पूनम.. फारच सुंदर कथा.. खुप आवडली
|
Psg
| |
| Saturday, March 24, 2007 - 5:18 am: |
|
|
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार! मी प्रथमच अशी मोठी आणि romantic कथा लिहिली होती. तुम्हाला आवडली हे वाचून खूप बरे वाटले! तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत माझ्यासाठी.. सई, आपण जे लिहितोय ते लोक वाचत आहेत की नाही अशी शंका कायम असते गं, त्यामुळे अधल्यामधल्या प्रतिक्रियाही तितक्याच महत्त्वाच्या असतात! शेवट अजून खुलवता आला असता हे मान्य.. पुढच्या वेळी प्रयत्न करीन.. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
|
Abhi_
| |
| Saturday, March 24, 2007 - 5:39 am: |
|
|
पूनम नेहमीप्रमाणेच मस्त!! ..
|
Giriraj
| |
| Saturday, March 24, 2007 - 6:46 am: |
|
|
काही पदार्थांची चव कशी जीभेवर रेंगाळत राहतेऽऽ.... तशीच वाटली कथा... एखाद्या रसगुल्ल्यासारखी! आमच्या ट्रेकला कायम GS चे तोन्ड पहावे लागते... त्यापेक्षा हा ट्रेक खूपच आवडला!
|
पूनम मस्त कथा. आणि शेवटही ईतका छान केलायस ना! hats off
|
Dineshvs
| |
| Saturday, March 24, 2007 - 4:39 pm: |
|
|
पूनम कथा छान आहे, पण माझेहि मत सईसारखेच आहे. ईथे लेखकानी आणि वाचकानी, दोघानीही संयम पाळायला हवा.
|
Zakasrao
| |
| Monday, March 26, 2007 - 5:29 am: |
|
|
पुनम कथा आवडली त्याच कारण ऋजुताचे प्रगल्भ विचार. खरेच प्रेमात असा व्यवस्थित विचार करणारे किती असतील आणि चित्रपट पाहुन इस्टाइल वर जाणारे किती असतील
|
अप्रतिम कथा . शेवट फारच सुरेख . सगळे प्रसंग साकार होतात अगदी . आवडली .
|
Atlya
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:39 am: |
|
|
पूनम काय romantic लिहिले आहेस.... मजा आली वाचताना trek ला जाम मजा येते पण... शेवट करच......
|
पुनम... उत्तम सुशिक्षीत आणि सुसंकृत विचार आवडले... >>>आमच्या ट्रेकला कायम GS चे तोन्ड पहावे लागते... त्यापेक्षा हा ट्रेक खूपच आवडला!... गिरी पुढल्या ट्रेकला GS ऐवजी घरचा चंद्र घेउन जा सोबतीला...
|