|
पूनम, सईने म्हटल्याप्रमाणे तुझ्या कथांमधली पात्रं नेहेमीच खूप समजूतदार असतात. तुमच्या आमच्या आयुष्यात घडतात किंवा घडू शकतील असे प्रसंग आणि ते झेलताना त्यांनी त्यातून अधिकच शहाणं होत जाणं छान असतं. या कथेचा शेवटही असाच ' शहाणा' आहे. मात्र मला तुझ्या इतर कथांइतकी ही आटोपशीर नाही झाली असं वाटलं. नायक नायिकेची ओळख होण्यापासून प्रेमात पडण्याचा प्रवास अंमळ लांबला, तर त्या मानाने शेवट abrupt वाटला. कदाचित त्या प्रवासातला एखादा टप्पा ऋजुताच्या angle ने लिहीला असतास तर वैविध्यामुळे पहिला भाग अजून उठावदार झाला असता का?
|
Milya
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:15 pm: |
|
|
पूनम मस्त झालीय ग कथा!! आत्ता परत वाचली.. मलाही शेवट थोडा abrupt वाटला... आमच्या ट्रेकला कायम GS चे तोन्ड पहावे लागते... >>> गिर्या गिर्या तू जीएस कडे पहाण्यापेक्षा 'शितल' चांदण्याकडे पहात जा रे...
|
Kandapohe
| |
| Wednesday, March 28, 2007 - 10:10 am: |
|
|
पूनम छान लिहीली आहेस. नेहेमीप्रमाणे समाप्तचा बोर्ड लागल्यावर मी वाचल्याने सईसारखा त्रास झाला नाही. उगाच एक भाग वाचून मग वाट बघत बसण्यापेक्षा ते बरे पडते. BTW गाणी मस्त शोधली आहेस.
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:29 pm: |
|
|
पूनम, मला ही गोष्ट एक छोटेखानी सिरीयलचा भाग वाटली. खुप सुंदर लिहीली आहेस. छान वाटलं वाचुन. अगदी आवडीची भेळपुरी खाल्ल्यासारखं!
|
Ashwini
| |
| Wednesday, March 28, 2007 - 2:05 pm: |
|
|
पूनम, मस्त जमली आहे कथा. स्वातीला अनुमोदन.
|
Psg
| |
| Thursday, March 29, 2007 - 4:59 am: |
|
|
पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आवर्जून कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल स्वाती, मिलिंद, अश्विनी हो.. शेवट अजून खुलवता आला असता.. पण मला भिती होती की मग कथा फ़ारच लांबत जाईल. तरीही शेवटचा भाग अजून चांगला करत येऊ शकला असता. सगळी कथा हीरोच्या नजरेतूनच आहे. हीरोईनलाही वाव द्यायला हवा होता हे ही पटलं.. तुमच्या अभिप्रायांमुळे चुका समजतात, सुधारणेसाठी वाव मिळतो.. म्हणूनच तुमच्या प्रतिक्रिया मला हव्या असतात.. त्याही खूप! असाच लोभ ठेवा ही विनंति..
|
Ammi
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:12 am: |
|
|
psg lai bhari zaliye katha..wah..
|
Maasture
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:33 pm: |
|
|
तुमचा लिहिन्याचा उत्साह वाखणण्याजोगा आहे, संवादही चाम्गले लिहिताय. पन कथाबीजच अगदी अशक्त आनि घिसेपिटे वाटते. माहेर, मानिनि, गृहशोभिका वगैरेचा किंवा मराठी मलिकांचा खूप प्रभाव जानवतो. वरती खूप छान अशा खूप प्रतिक्रिया वाचल्या. त्या तुम्ही गंभीरपने घेतल्या तर तुमची प्रगती खुंटेल. सुधारणेला सर्वच बाजूंनी खूप जास्त वाव आहे.
|
Suniti_in
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:38 pm: |
|
|
वा. काय सुरेख कथा आहे. मला हल्ली वाचायला वेळच मिळत नव्हता. आज अगदी आवर्जून बसले ही कथा वाचायला. मस्तच लिहीली आहेस पूनम.
|
|
|